कविकिरडुंची साठमारी ... (विडंबनाची भेळपुरी)

केशवटुकार's picture
केशवटुकार in जे न देखे रवी...
7 Aug 2008 - 2:49 pm

घाटावरच्या भटसाहेबांनी विडंबनाची भेळपुरी लिहुन आमच्या प्राण:प्रिय साहित्यप्रकारावर टिका केली (मारली). त्यात आमच्या प्रातःस्मरणी सदगुरु केशवसुमारांचा उल्लेख पाहुन तर आमची अस्मिताच दुखावली (शेजारच्या क्युबिकल मधली नाही). आमची ती वेदना मग ही अशी आम्ही झरझर उतरवुन काढली.

(डिस्क्लेमरसाठी कृपया पहिले कडवे पहा नाही समजले तर गेलात उडत !)

मिपाकरांनो झोडुन घ्यावे मांडतो त्यांची व्यथा
विडंबन माझे ह. घेणे, आहेच ते यथातथा

नवकवी आहे सदस्य मी अन खाजही आहे काव्याची
म्हणुनच होई अजीर्ण मजला विडंबन केसु शिष्यांची

झुरता झुरता रात्र सरे मी तगमगीने बेजार
कसे हाणावे कसा टळावा केसुगणांचा शेजार ?

कोण कुठला केश्यागुर्जी अन हलकट ते आंद्या-रंग्या
वृत्त तपासी बेला अन मग मीटर फाडी सरक्या

या शिंच्यांचा प्रभाव खासा काव्यापुरता नाही बरे
गद्यालाही घेउन संगे केसुधर्मा वाढविले

हताश होउन भटो बैसला अमरिक्केच्या घाटावरी
विचार करतो कशी करावी कविमनाची खाज पुरी

आज माजली टुकार साली दंगा करती जिकडेतिकडे
द्राक्षच आंबट विचार करोनी भटो निघाला परसाकडे

-केशवटुकार

विडंबन

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Aug 2008 - 2:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=))
तू फारच मनाला लावून घेतलेलं दिसतंय!

मेघना भुस्कुटे's picture

7 Aug 2008 - 3:23 pm | मेघना भुस्कुटे

जोरदार चाललंय! लगे रहो!

धमाल मुलगा's picture

7 Aug 2008 - 3:25 pm | धमाल मुलगा

कोण कुठला केश्यागुर्जी अन हलकट ते आंद्या-रंग्या
वृत्त तपासी बेला अन मग मीटर फाडी सरक्या

या शिंच्यांचा प्रभाव खासा काव्यापुरता नाही बरे
गद्यालाही घेउन संगे केसुधर्मा वाढविले

=))

बेक्कार गुण लागला की रे टुकारा तुलाही......
;)

शेखर's picture

7 Aug 2008 - 3:32 pm | शेखर

कोण कुठला केश्यागुर्जी अन हलकट ते आंद्या-रंग्या
वृत्त तपासी बेला अन मग मीटर फाडी सरक्या

जबरा ... चालु द्या ..

लई भारी .....
सुधीलेखन कोण तपासतय मग ... ;-)

विसोबा खेचर's picture

7 Aug 2008 - 3:55 pm | विसोबा खेचर

मस्त! :)

घाटावरचे भट's picture

7 Aug 2008 - 4:02 pm | घाटावरचे भट

या शिंच्यांचा प्रभाव खासा काव्यापुरता नाही बरे
गद्यालाही घेउन संगे केसुधर्मा वाढविले

हताश होउन भटो बैसला अमरिक्केच्या घाटावरी
विचार करतो कशी करावी कविमनाची खाज पुरी

हे आवडलं बुवा...अगदी माझ्या मनातलं... :)

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Aug 2008 - 5:11 pm | बिपिन कार्यकर्ते

उच्च.... तुम्हालाही _||_ (कोपरापासून नमस्कार) :)

बिपिन.

शितल's picture

7 Aug 2008 - 8:00 pm | शितल

अफलातुन झाले आहे विडंबन :)
टुकार शेठ,
तुमच्या विडंबनाची एक्प्रेस मेल फार्मात आहे. :)

मनस्वी's picture

8 Aug 2008 - 4:07 pm | मनस्वी

मस्त रे टुक्या..

या शिंच्यांचा प्रभाव खासा काव्यापुरता नाही बरे
गद्यालाही घेउन संगे केसुधर्मा वाढविले

येउदेत अजून!

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *