रिसेल फ्लॅट घेताना

राजो's picture
राजो in काथ्याकूट
31 May 2012 - 1:14 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,

मी पुण्यामधे रिसेल फ्लॅट घेण्यास इच्छुक आहे. तरी यासंबंधी कोणती खबरदारी घ्यावी? फ्लॅट्स बद्दल जाहिराती गोळा करतांना अनेक शब्द कानावर पडले. जसे कि गुंठेवारी, कलेक्टर एन ए,... यासंबंधी अधिक माहिती मिळेल का?

रिसेल फ्लॅट साठी गृहकर्जाचे काय नियम आहेत?

प्रतिक्रिया

विश्वनाथ मेहेंदळे's picture

31 May 2012 - 3:31 pm | विश्वनाथ मेहेंदळे

कॉलिंग कांगारू ! कॉलिंग कांगारू !! कॉलिंग कांगारू !!!

स्पा's picture

31 May 2012 - 3:47 pm | स्पा

+१११११

कोण रे कांगारू?

थोडा फार माहीत आहे. रघू सावंत.
एरीया नुसार रेट असतो. घर घेताना विकणार्‍याला विचारा कि किती बॅकानी लोन दिलेली आहेत. ही माहिती सोसायटी देईल कारण सोसा. एन ओ सी देते. त्यामुळे तुम्हाला रेफरन्स मिळेल. एचडिफसी,.एलआयसी होऊसींग फायनांस, एक्सीस होम फायनांस, अश्या बॅकांचे रेफ्ररंस मिळाले कि समजा टायटलचे पेपर चांगले आहेत. घर घेण्यास हरकत नाही. विकणारा जर १ ला असेल तर एकच अ‍ॅग्रीमेंट असेल (बेल्डर व तो) .
तुम्हाला अ‍ॅग्रीमेंट व्यॅल्यू +स्टॅम्प ड्यूटी+रजिस्टेशन च्या ८०% लोन मिळेल ते लोन तुमच्या पगारात पाहीजे .
तुम्ही एक काम करा ना . रामदास काकांना फोन करा.गरज लागल्यास मी आहेच.
रघू सावंत.

इरसाल's picture

31 May 2012 - 5:23 pm | इरसाल

१.प्रथम जिथे तो फ्लॅट घेत आहात तिथला सध्याचा आणि फ्लॅट घेतला तेव्हाचा रेट माहीत करुन घ्या.
२.फ्लॅटची सद्य स्थिती काय आहे.(विचाराधीन-बांका चालु -बांका पुर्ण-रेडी तो पझेस)
३.मालक डायरेक्ट तुम्हाला विकतोय की मधे दलाल आहे.(म्हणजे १-२ की १-२-३)
४.बॉण्ड्पेपरवर फ्लॅटची जी किंमत असेल त्याव्यतिरिक्त मुळ मालक ब्लॅकमधे पैसे मागेल(चालु भावानुसार) आणि तुम्हाला कर्जही त्यारकमेनुसार व तुमच्या पगारनुसार मिळेल. (८०-८५ %). (समजा फ्लॅटची मुळ रक्कम १० लाख बॉण्ड्पेपरवर तर ८.५ लाख कर्ज बँकेकडुन, १.५ लाख + चालुभावाचा फरक हे कॅश, तिकडे काही वेगळे असल्यास माहित नाही )
सध्या एवढेच गरज पडल्यास नन्तर बोलुच.

५० फक्त's picture

31 May 2012 - 7:59 pm | ५० फक्त

रिसेलच्या घराला ८० - ८५ % कर्ज मिळंणे अंमळ मुश्किल आहे, सध्या सरकारी बँकाच्या नियमानुसार नविन घरालाच ८० % कर्ज मिळु शकते सहजपणे, तिथल्या ओळखी आणि आपला सिबिल रिपोर्ट यावर सुद्धा बरंच अवलंबुन असतं.

जागांच्या किमती वाढल्याअसल्या तरि जुन्या जागेला बँक डिप्रेशियेशन पकडणारच याचा विचार करा, आपण एखाद्या किमतीला घर घेतो आहे याचा अर्थ बँकेला त्या घराची तिच किंमत मान्य आहे असा होत नाही. त्यांची व्हॅल्युएशनचि पद्धत वेग़ळी असते.

साधारणपणे आंगठेनियमानुसार तुमच्या मासिक घरीन्या पगाराच्या ३० ते ३६ पटीपर्यंत कर्ज मिळु शकते.

प्रकाश घाटपांडे's picture

1 Jun 2012 - 1:14 pm | प्रकाश घाटपांडे

आपल्याला काही माहिती http://www.misalpav.com/node/8993 इथे मिळेल.