बर्याच दिवसात मॅक्रो काढला नव्हता. तसे फुलाचे मॅक्रो काढायचा कंटाळा आला होता. तेवढ्यात एका मित्राच्या किचेनमधे हा काचेचा छोटा बूट दिसला. त्याला म्हटले देतोस का हा एक दिवस ? घेतला आणि काही फोटो काढले...त्यातील हा एक...
फोटोला नाव दिले आहे "सिंड्रेलाच्या बेड्या".
श्री. जयपाल यांनी picsizer हे सॉफ्टवेअर सुचवल्याबद्दल त्यांचे आभार मानतो.
यात फोटो अजिबात खराब होत नाही. उदा. वरील चित्र १४ mb चे आणि आता आहे ९० kb चे.
प्रतिक्रिया
19 May 2012 - 9:15 am | प्रचेतस
सुंदर.
19 May 2012 - 9:59 am | निवेदिता-ताई
मस्त्च
19 May 2012 - 10:33 am | संजय क्षीरसागर
फोटोची बॅकग्राउंड वेगळी हवी होती, तसा पुन्हा प्रयत्न केला तर आणखी सुरेख होईल. कॅमेरा कोणता आणि अॅपर्चर, शटरस्पिड, झूमिंग काय ठेवलंय?
19 May 2012 - 10:46 am | जयंत कुलकर्णी
फोटोची बॅकग्राउंड वेगळी का हवी होती ? हा फोटो बघणार्यांपैकी लोकांमधे आपण पहिलेच असे सांगत आहात म्हणून विचारतोय.
मी ही बॅकग्राउंड मुद्दाम अशी ठेवली आहे.
19 May 2012 - 12:14 pm | प्यारे१
संजय'जी,
आपण पिंचिं मनपा क्षेत्रामध्ये राहता का हो????
19 May 2012 - 1:03 pm | संजय क्षीरसागर
नाय हो, सौंदर्याचा नजरीया वेगळा आहे त्यामुळे `अंदाजे बयां और ' http://www.misalpav.com/comment/reply/21681/397376 आहे
19 May 2012 - 10:44 am | जागु
वा खुपच सुंदर दिसत आहे.
19 May 2012 - 11:07 am | संजय क्षीरसागर
बॅकग्राउंडची मराठी अक्षरं, त्यांचे केशरी, काळे आणि ग्रे रंग सिंड्रेलाच्या (निळ्या पारदर्शक काचेच्या बुटाच्या) नजाकतीला स्युट होत नाहीत असं वाटतं. तुम्ही ती बॅकग्राउंड मुद्दाम तशी ठेवली त्याचं कारण काय आहे? आणि कॅमेरा कोणता आणि अॅपर्चर, शटरस्पिड, झूमिंग काय ठेवलंय? याची पण उत्सुकता आहेच. पिक सायजरनं काय काम केलय ते सांगीतलत तर आणखी आनंद होईल
19 May 2012 - 11:19 am | जयंत कुलकर्णी
अच्छा ! तो फोटो काढताना आलेले विचार असे....
सुंदर बूट, स्त्री सौंदर्य.....जुनाट कल्पना, एंटिक...रंग.... आणि तिच्या पायातील बेड्या.... म्हणून ही बॅकग्राउंड...
मॅक्रो आहे. रींग वापरून काढला आहे. लेन्स प्राईम आहे. कॅमेरा ५० डी. बाकिचे आत्ता देऊ शकत नाही पण नंतर देऊ शकेन.
19 May 2012 - 11:32 am | संजय क्षीरसागर
झालं ना क्लिअर? सौंदर्यासक्ती कमालीचीये ती स्वस्थ बसू देत नाही म्हणून असे वेगळे प्रतिसाद असतात त्यात कुणाची खेचायचा प्रयत्न कधीच नसतो (कारण ते पुन्हा असौंदर्यात्मक होतं ) . इतर गोष्टी तुम्हाला वेळ झाल्यावर जरूर कळवा.
19 May 2012 - 11:29 am | सानिकास्वप्निल
मस्तचं फोटो :)
19 May 2012 - 11:52 am | जयंत कुलकर्णी
////झालं ना क्लिअर? सौंदर्यासक्ती कमालीचीये ती स्वस्थ बसू देत नाही म्हणून असे वेगळे प्रतिसाद असतात त्यात कुणाची खेचायचा प्रयत्न कधीच नसतो (कारण ते पुन्हा असौंदर्यात्मक होतं )////
हे खेचाखेचीचे काही कळले नाही......मला असे काही वाटले नाही.
19 May 2012 - 12:18 pm | संजय क्षीरसागर
(>हा फोटो बघणार्यांपैकी लोकांमधे आपण पहिलेच असे सांगत आहात)
पण तुम्ही > `मला असे काही वाटले नाही' म्हटल्यामुळे बरं वाटलं!
19 May 2012 - 12:01 pm | परिकथेतील राजकुमार
काय 'बूटी'फूल फटू आलाय.
19 May 2012 - 12:20 pm | जयंत कुलकर्णी
////आ हा हा हा /////
परा असा प्रतिसाद देतो की साला याला काय म्हणायचे आहे ते समजतच नाही.
आता हेच बघा... (आ) हा हा हा....विकट हास्य....
आता काय करायचं....
19 May 2012 - 12:50 pm | परिकथेतील राजकुमार
ते 'आ हा हा हा' म्हणजे 'आ हा हा' मध्ये एक 'हा' वाढवला आहे. 'आ हा हा' पेक्षा देखील अधिक चांगली अनुभूती आली म्हणून एक 'हा' जास्ती. ;)
बाकी आमच्या मनातला प्रश्न विचारल्याबद्दल श्री. प्यारे १ ह्यांचे २दा आभार.
19 May 2012 - 12:57 pm | प्यारे१
आभाराबद्दल आभारी आहोत... अर्थात मुद्दा तो नाही. ;)
पण त्यांनी चक्क नकार दिलाय रे!
एकक्षेत्राधिकार असा विखुरताना पाहून हृदय पिळवट्ल्या गेले की!
आता रे ????????
19 May 2012 - 1:05 pm | संजय क्षीरसागर
आता संपादित प्रतिसाद वाचलात की पुन्हा `दिलके तार' जुळून येतील
19 May 2012 - 5:50 pm | जयंत कुलकर्णी
धन्यवाद !
19 May 2012 - 12:12 pm | स्वातीविशु
सुरेख फोटो... आवडला.
19 May 2012 - 5:35 pm | पैसा
बूट मस्त आहे. आणि फोटो पण आवडला.
19 May 2012 - 6:40 pm | तिमा
फोटो खूप आवडला. 'सिंड्रेलाच्या बेड्या' हे नांवही चपखल वाटले.
20 May 2012 - 2:32 pm | अत्रुप्त आत्मा
सॅल्यूट.... :-)
20 May 2012 - 2:26 pm | जयंत कुलकर्णी
सगळ्यांना मनापासून धन्यवाद !