मालवुन टाक दीप... ई -डंबन

बेचवसुमार's picture
बेचवसुमार in जे न देखे रवी...
5 Aug 2008 - 6:51 pm

ती "मूड" मध्ये असताना आणि तो मूड मध्ये नसताना"मालवुन टाक दीप"..आणि ती "मूड"मध्ये नसेल तर...

(स्व.सुरेश भटांची माफी मागुन...)

----------------------------------------------------------------

मालवू नकोस दीप..चेतवू नकोस अंग..
बंद ठेव राजसा..तुझे "पिसाट" रंगढंग..
होऊनि जरा निवांत..बैस आज धूळखात..
टाक मोडुनी उद्या..रे खुशाल तू पलंग..
दूर दूर तारकांत..दातओठ खातखात..
पछाडतोय चांदण्यांस..दुष्ट चंद्र जंगजंग..
ते तुला बरे कळेल..फक्त तुझेच रे जळेल..
स्वत:वरी नको असा..गूदरवु अतीप्रसंग..
काय हा तुझाच वास!..घमघमाट आसपास..
पुन्हा ढोसलीस तू..वरी चघळली लवंग..

------------- बेचवसुमार

--------------------------------------------------------------

ई-डंबन हे असे तसे.."बेचवा" लिहले खरे.

सांगणे मिळेल तूज..फक्त प्रसिध्दी सवंग..

विडंबन

प्रतिक्रिया

अविनाश ओगले's picture

5 Aug 2008 - 8:35 pm | अविनाश ओगले

मस्त... या विडंबनात एखादे अक्षर, एखादा शब्द बदलून अर्थाचे (किंवा अनर्थाचे) नवे पैलू पाडता येउ शकतात. इच्छुकानी कामास लागावे.

श्रीकृष्ण सामंत's picture

5 Aug 2008 - 10:14 pm | श्रीकृष्ण सामंत

विडंबन आवडले
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

विसोबा खेचर's picture

7 Aug 2008 - 1:03 am | विसोबा खेचर

इतक्या सुरेख, विलक्षण हळूवार व अत्यंत तरल गीताच्या सदर विडंबनाची कीव कराविशी वाटली..

असो, हे माझं व्यक्तिगत मत. बाकी चालू द्या...

तात्या.

बेचवसुमार's picture

8 Aug 2008 - 5:03 pm | बेचवसुमार

प्रतिसादाबद्द्ल आभार!