मागिल गुरुवारी कंटाळा आला म्हणून ऑफिसला दांडी मारली. मिस्टरांना वेळ होता तसेच मुलीला, भाचे कंपनीला सुट्टी पडलेली. मग दिवस सार्थकी लावू म्हणून कुठेतरी फिरायला जायचा बेत आखत होतो. बेत करता करताच १ वाजला. रोज रोज आसपासची स्विमिंग पुल आणि गार्डन पाहून मुले कंटाळली होती मग म्हटल चला आज पनवेलला जाऊया आयुष रिसॉर्टला.
जेऊन निघता निघता ३ वाजले. गाडी घेतली आणि बच्चे कंपनी सकट आमची स्वारी आयुष रिसॉर्ट कडे वळली. गेट मधून आत गेलो. गुरुवार असल्याने गर्दी आजीबात नव्हती हे पाहून अजून समाधान झाल. मिस्टरांनी जाऊन आधी तिथले चार्जेस भरले. तस ते महागडच आहे. मला वाटत लहान मुलांचे २०० आणि मोठ्यांचे ३०० असा त्यांचा चार्ज आहे. त्या पैशात स्विमींग, आत फिरणे, पक्षी, प्राणि पहाणे हे होते. पण नाश्ता वगैरे लागला तर तो स्वतःच घ्यायचा होता वेगळे पैसे भरून. खरे तर लोकल रिसॉर्टला गेलो असतो तर आम्हाला फक्त स्विमींगचेच पैसे भरावे लागले असते त्यामुळे जरा खर्चिकच झाले हे पण तिथल्या निसर्गाने ही रक्कम भरून काढली. जर सकाळ पासून ह्या आयुष रिसॉर्ट मध्ये गेलो तर १००० रु. बुकींग करून नाश्ता, जेवण वगैरेची सोय होते.
बुकींग होताच मिस्टर, मुलेस्विमींगला पळाली. मी थोडावेळ बसले आणि कॅमेरा घेऊन फेरफटका मारायला गेले. तब्बल एक तास चालून खालील फोटो पटापट काढले.
१) हा आहे रिसॉर्ट मध्ये एन्ट्री केल्यावरचा निसर्गपुर्ण मार्ग.
२) इथून आत गेल्यावर बुकींग होते.
३) स्विमींग पुल अजिबात खोल नाही. ६-७ वर्षाच्या मुलांनाही चालू शकेल.
४) आतील पाणी स्वच्छ होते शिवाय आजुबाजूला झाडे असल्याने दुपारी चांगली सावली होती.
५) स्विमींग पुलच्या आधी मुलांच्या मनोरंजनासाठी छोटे गार्डन आहे.
७) इथले सगले झोपाळे टायरपासुन बनवलेले आहेत.
१०) स्विमींग पुलच्या पाठी एक ग्राऊंड आहे. त्याची ही एन्ट्री.
११) मैदानाभोवती असणारी कलाकुसर.
१४) आवारात असणार्या छोट्या रुम्स.
आतील देखावे
१६) स्विमींग पुल जवळील
१७) बोट हाऊस. ह्यात पाणी नाही.
आता जरा आतील वृक्ष संपदा पाहू. आत पुष्कळ प्रकारची झाडे आहेत.
२०) सीता अशोकची भरपूर झाडे आहेत.
३८) ही फळे कसली कोणाला माहीत आहेत का ? असतील तर प्लिज सांगा.
आता प्राणी आणि पक्षी पाहू.
४१) रशियन माकड. ह्याचा पिंजरा खुप छोटा आहे आणि जाळीदारही.
५०) white deer
५१) हरण
५२)
५५) एका ठिकाणी नारळाच्या झाडांमध्येच गच्ची बांधली आहे.
५८) रिसॉर्टच्या एका बाजूला मोठा महाल आहे. बहुतेक फायबरचा आहे. तिथे शुटींग तसेच समारंभ साजरे केले जातात.
आयुष रिसॉर्टचा पत्ता:
Mumbai-Pune National Highway, (NH4)
Between Amol & raigad Petrol Pump, Village Shedung,
Panvel, Raigad 0 410 206, Maharashtra, India.
Tel : 02143 - 239185/86/87/88
जायचे असेल तर आधी फोन करुनच जा म्हणजे तिथले रेट, बुकींग, गर्दी ह्याबद्दल चौकशी करता येईल.
प्रतिक्रिया
18 May 2012 - 12:36 pm | कवितानागेश
आवडले. फोटो नेहमीप्रमाणेच सुंदर.
पत्ता दिल्याबद्दल धन्यवाद. :)
18 May 2012 - 12:52 pm | Maharani
छान फोटो..फोटो ३८ -ही फळे बदामाची वाटत आहेत...
18 May 2012 - 1:43 pm | स्पा
जागू तै , हि बदामाची फळे नसून.. मोहाची आहेत..
मस्त लागतात खायला
बाकी रिसोर्ट वेग्रे आम्हा गरिबांना झेपत नसल्याने , आमचे गड किल्लेच बरे त्यामुळे सदर लेखाला पास :)
18 May 2012 - 12:53 pm | अमृत
छान सफर घडली.... फोटो ५० ते ५२ शिर्षकांची आणि फोटोंची चुकामूक झालेली आहे :-)
अमृत
18 May 2012 - 1:00 pm | जागु
होय अमृत खाली वर झालेय. पण आता अपडेट कसे करू ?
लिमाऊ, महाराणी धन्यवाद.
ते बदाम नाहीत ह्याची मी तेंव्हाच खात्री केली.
18 May 2012 - 1:18 pm | मुक्त विहारि
आणि सुरेख वर्णन...
हे रेसॉर्ट एखाद्या मारवाड्याचेच असावे अशी शंका आहे.
18 May 2012 - 2:25 pm | स्वैर परी
जागु ताई, तुझ्या चाणाक्ष नजरेला, फुलांबद्दल च्या ज्ञानाला, चौकस बुद्धीला ...
साष्टांग __/\__ :)
18 May 2012 - 2:30 pm | प्रेरणा पित्रे
फोटो अप्रतिम...
लवकरच प्लॅन करण्यात येईल.. :)
18 May 2012 - 3:38 pm | संजय क्षीरसागर
वॉट अ लवली नॅरेशन! मनःपूर्वक धन्यवाद!
18 May 2012 - 3:41 pm | ५० फक्त
मस्त आले आहेत फोटो.
18 May 2012 - 3:49 pm | इरसाल
फोटो ४७ जास्त आवडला आहे.
काही म्हणा टर्कीचे स्यांडविच जाम भारी लागते.
18 May 2012 - 6:14 pm | निवेदिता-ताई
कित्ती छान आहेत सर्वच फ़ोटो.....आवडले...रेसॉर्ट छान..जायला हवे एकदा...बघू केव्हा जमतेय
18 May 2012 - 9:43 pm | सानिकास्वप्निल
छान आहे रीसॉर्ट :)
माहीती आणी फोटो उत्तम :)
जमेल तेव्हा नक्की जाऊ
धन्यवाद जागुतै :)
19 May 2012 - 12:26 am | शिल्पा ब
कॉटेज अन लाकडी पुल आवडले. रशियन माकड खुपच दु:खी वाटतंय फोटोत..
19 May 2012 - 2:09 am | रेवती
बहावा आणि बांबू जास्त आवडले.
कोणाला समारंभ करायचा असल्यास त्यासाठी राजवाडा पाहून बरे वाटले..........सगळे जण कसे लक्षुमी मित्तल असणार? ;)
19 May 2012 - 10:36 am | जागु
सगळ्यांचे धन्यवाद.
19 May 2012 - 11:36 am | स्वातीविशु
जागुतै, नेहेमीप्रमाणेच फोटो आणि वर्णन खुप छान. पत्ता दिल्याबद्दल धन्यवाद. :) वाचनखुण साठवत आहे.
वीकांताला जवळपास फिरायला जायची सोय झाली. :)
19 May 2012 - 4:19 pm | प्रभाकर पेठकर
मस्तं दिसते आहे 'आयुष रिसॉर्ट'. मिपाचा एखादा जंगी कट्टा जमवायला उत्तम जागा आहे.
19 May 2012 - 4:42 pm | मितभाषी
असेच म्हणतो.
:)
20 May 2012 - 9:02 am | मोदक
+२
21 May 2012 - 10:51 pm | सुकामेवा
+३
20 May 2012 - 2:11 pm | सही रे सई
फोटोज आणि त्याची माहिती फारच आवडली... बरयाच नवीन गोष्टी पण कळाल्या जसे पीतमोहोर आणि वडाचा जुळा भाउ.
गुगलल्यावर या रिसॉर्ट ची लिंक पण मिळाली. ही घ्या:
http://www.aayushresort.com/
यावर सगळी इत्यंभूत माहिती पण मिळते.. एकदा जायलाच हवे.
20 May 2012 - 2:11 pm | सही रे सई
फोटोज आणि त्याची माहिती फारच आवडली... बरयाच नवीन गोष्टी पण कळाल्या जसे पीतमोहोर आणि वडाचा जुळा भाउ.
गुगलल्यावर या रिसॉर्ट ची लिंक पण मिळाली. ही घ्या:
http://www.aayushresort.com/
यावर सगळी इत्यंभूत माहिती पण मिळते.. एकदा जायलाच हवे.
22 May 2012 - 10:36 am | जागु
सहीरे सही बरे केलेत लिंक टाकलीत ते. आता अजून सोयीस्कर पडेल कोणाला जायच असेल त्यांना.
22 May 2012 - 1:59 pm | बिपिन कार्यकर्ते
जबरी!