हळूवार तुझे पाऊल
मला चाहूल
तरीही उराशी
होईल पहाट
नको जाऊस
थांब जराशी
उतरो न कधी ही धुंद
श्वासात गंध
रात्रीचा
हा असाच चालो
नसा नसात उत्सव
प्रीतीचा
आकंठ बुडूदे डोळ्यात
तुझ्या देहात
मला खोल
ते खुजे लाजरे
शब्द नको
स्पर्शाने बोल
हे स्वप्न जरी वाटे
कशास खोटे
बोलू तुझ्याशी
ठेवलीत जपून मी
फुले सापडलेली
उशाशी
- अनिरुद्ध अभ्यंकर
प्रतिक्रिया
5 Aug 2008 - 3:13 am | मुक्तसुनीत
सिद्धहस्त रचना ! सुरेख, लयबद्ध काव्य ! पहिल्या दर्जाची प्रेमकविता !
हे स्वप्न जरी वाटे
कशास खोटे
बोलू तुझ्याशी
ठेवलीत जपून मी
फुले सापडलेली
उशाशी
हाय ! काय कातिल ओळी लिहीता राव तुम्ही सुद्धा ....
(थोडी गम्मत : बैठकीच्या लावणीच्या मीटर मधे ही सुरेख प्रेमकविता चपखल बसते !) :-)
5 Aug 2008 - 3:46 am | धनंजय
सिद्धहस्त!
5 Aug 2008 - 9:03 pm | ऋषिकेश
अगदी हेच म्हणतो.. पहिल्या दर्जाची , सिद्धहस्त, सुरेख, लयबद्ध प्रेमकविता !
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
8 Aug 2008 - 5:23 pm | राघव१
:) खूपच छान... शुभेच्छा!
5 Aug 2008 - 3:17 am | सर्किट (not verified)
ते खुजे लाजरे
शब्द नको
स्पर्शाने बोल
ओ हो हो !!
क्या बात है !!
वा !
(जालकवीसम्मेलनासाठी ही तुमची एण्ट्री समजावी का ?)
- सर्किट
5 Aug 2008 - 8:17 pm | अनिरुद्ध अभ्यंकर
सर्किट,
(जालकवीसम्मेलनासाठी ही तुमची एण्ट्री समजावी का ?)
आपली हरकत नसेल तर .. माझी हरकत नाही :)
(बिना हरकत)अनिरुद्ध अभ्यंकर
5 Aug 2008 - 3:46 am | बेसनलाडू
फारच छान कविता. मजा आ गया!
ते खुजे लाजरे
शब्द नको
स्पर्शाने बोल
आणि
कशास खोटे
बोलू तुझ्याशी
ठेवलीत जपून मी
फुले सापडलेली
उशाशी
हे विशेष आवडले.
(आस्वादक)बेसनलाडू
आपण आधीच बोलल्याप्रमाणे अशा फॉर्म असलेल्या कवितेतील थेट अर्थापेक्षा लपलेले इतर पदर उलगडले (कॉनोटेशन्स्),तर कवितेची लज्जत वाढते/वाढेल, असे वाटते. हा फॉर्म तुम्ही बरेच आधीपासून हाताळत असल्याने तुमचेही मत यापेक्षा वेगळे नसावे,असा अंदाज आहे :)
(सूचक)बेसनलाडू
5 Aug 2008 - 8:14 pm | अनिरुद्ध अभ्यंकर
बेला,
अशा फॉर्म असलेल्या कवितेतील थेट अर्थापेक्षा लपलेले इतर पदर उलगडले (कॉनोटेशन्स्),तर कवितेची लज्जत वाढते/वाढेल, असे वाटते.. १००% सहमत.
(सहमत)अनिरुद्ध अभ्यंकर
5 Aug 2008 - 4:01 am | चतुरंग
आकंठ बुडूदे डोळ्यात
तुझ्या देहात
मला खोल
ते खुजे लाजरे
शब्द नको
स्पर्शाने बोल
खल्लास!!
"राजसा, जवळी जरा बसा " अशा ढंगाने जाणारे काही जाणवले!
चतुरंग
5 Aug 2008 - 5:50 am | सुवर्णमयी
कविता खूप आवडली.
5 Aug 2008 - 7:27 am | मेघना भुस्कुटे
कविता खूप आवडली.
5 Aug 2008 - 7:20 am | श्रीकृष्ण सामंत
कविता आवडली.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
5 Aug 2008 - 7:33 am | शितल
सुंदर काव्य रचना
भाव एकदम मस्त मांडले आहेत. :)
5 Aug 2008 - 8:23 am | प्राजु
हे स्वप्न जरी वाटे
कशास खोटे
बोलू तुझ्याशी
ठेवलीत जपून मी
फुले सापडलेली
उशाशी
वा व्वा! मार डाला...!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
5 Aug 2008 - 10:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कविता
5 Aug 2008 - 3:57 pm | नारदाचार्य
पुन्हा एक षटकार.
5 Aug 2008 - 4:08 pm | स्वाती दिनेश
हे स्वप्न जरी वाटे
कशास खोटे
बोलू तुझ्याशी
ठेवलीत जपून मी
फुले सापडलेली
उशाशी
सुरेखच..कविता फार आवडली.
स्वगत- केसु ब्याकसीटवर आणि अनिरुध्द अभ्यंकर ड्रायविंग सीट वर आलेत ते चांगलेच झाले म्हणायचे की..
स्वाती
5 Aug 2008 - 7:12 pm | विसुनाना
वाह! क्या बात है!
6 Aug 2008 - 12:35 pm | अनिरुद्ध अभ्यंकर
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मना पासून आभार!!
(आभारी) अनिरुद्ध अभ्यंकर
6 Aug 2008 - 6:06 pm | अविनाश ओगले
आकंठ बुडूदे डोळ्यात
तुझ्या देहात
मला खोल
ते खुजे लाजरे
शब्द नको
स्पर्शाने बोल
सुंदर!
8 Aug 2008 - 11:30 am | विसोबा खेचर
छान कविता!
वार्याने हालते रान या कवितेची उगाचंच आठवण झाली...
तात्या.
10 Aug 2008 - 1:14 am | चंपक
ही वाचूनी सुंदर कविता
कंठ रूध्द झाला.
चंपक
11 Aug 2008 - 1:19 am | चित्तरंजन भट
आकंठ बुडूदे डोळ्यात
तुझ्या देहात
मला खोल
ते खुजे लाजरे
शब्द नको
स्पर्शाने बोल
अनिरुद्ध, ही रोम्यांटिक कविता एकंदर चांगली झाली आहे.
माझ्या मते, ही सुरेख प्रेमकविता बैठकीच्या लावणीच्या मीटरमध्ये (पेक्षा लयीत) नीट बसत नाही. चूभूद्याघ्या.
आकंठ बुडो डोळ्यात
तुझ्या देहात
मला ने खोल
ते खुजे लाजरे शब्द
नको ते शब्द
स्पर्शाने बोल
(स्पर्शाने लवकरलवकर उच्चारायचे)
असे काहीसे केल्यास बसू शकेल.