सत्यमेव जयते

सोत्रि's picture
सोत्रि in काथ्याकूट
6 May 2012 - 1:31 pm
गाभा: 

भल्या भल्यांना टीव्हीच्या छोट्या पडद्याने मोहात पाडले आहे. अमिताभ, सलमान, शाहरूख ह्यांच्या मांदियाळीत आता मि. परेफेक्ट, आमिर खान, हाही सामिल होतो आहे. तो सत्यमेव जयते ह्या एका कार्यक्रमाद्वारे छोट्या पदद्यावर येतो आहे. आजपासून दर रविवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम १६ भागांत दाखवला जाणार आहे. ह्या कार्यक्रमाचा कॉन्सेप्ट 'थीम्ड टॉक शो' असा आहे. स्त्री भ्रूण हत्या, बाल कामगार असे वेगवेगळे सामाजिक विषय/मुद्दे घेऊन, समाजातल्या विवीध स्तरातील लोकांचे अनुभव आणि प्रतिक्रिया ह्यावर चर्चा असे ह्या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे. ह्या कार्यक्रमासाठी आमीरने तो 'मि. परेफेक्ट' आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केले. कार्यक्रमाची वेळ, कार्यक्रमाची प्रमोशल गाणी आणी कॅम्पेन हे त्याने त्याच्या परफेक्ट स्टाइलने एकदम व्यावसायिकरित्या केले आहे.

आजचा विषय होता "स्त्री भ्रूण हत्या". आमिर नेहमीप्रमाणेच त्याच्या परफेक्ट मुडमध्ये कार्यक्रम सादर करत आहे. वेगवेगळ्या स्तरातील स्त्रिया त्यांचे भयानक, अतिशय अंगावर येणारे, अनुभव सर्व दर्शकांसमोर व्यक्त करत आहेत.

आता बर्‍याच जणांना 'ह्यात काय' नविन?' असा प्रश्न पडेल आणि तो सार्थ आहेच. अश्या फॉर्मॅटमधले आणि अश्या विषयांना वाहिलेले ढीगभर कार्यक्रम आत्तापर्यंत येऊन गेलेत. पण आज पहिलाच भाग झाला आहे, जरा वेळ देवूयात आमिरला टीव्हीच्या छोट्या पडद्यावर स्थिर स्थावर व्हायला. काळच ठरवेल हा कार्यक्रम कसा आहे ते, तो यशस्वी होईल का ते आणि आमिर छोट्या पदड्यावर सेटल होईल का ते.

मला तरी असे वाटते आहे, तुम्हाला काय वाटते?

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

6 May 2012 - 1:45 pm | अत्रुप्त आत्मा

किशोरअहिरे's picture

6 May 2012 - 2:08 pm | किशोरअहिरे

मालिकेचे फक्त १३ एपिसोडच आहेत आणी ते बनवायला २ वर्ष लागली असे कळाले..
पहिला एपिसोड तर एकदम हीट झाला आहे.. त्याबद्दल वादच नाही..
प्रथमच बॉलिवुड ने रियाल्टी शो मधुन सरकार ला धारेवर धरले आहे.. बघुया राजस्थान सरकार वर काही फरक पडतो का ते..
नाहीतर चालुच आहे आपली लोकशाही आणी पहिले पाढे पंच्चावण

असो.

कार्यक्रम जरी नेहमीच्याच विषयावरील चर्चेचा असला तरी सोत्री भाषेतच सांगायचे तर "वेगवेगळ्या स्तरातील स्त्रिया त्यांचे भयानक, अतिशय अंगावर येणारे, अनुभव " सुन्न करून गेले.

सुहास झेले's picture

6 May 2012 - 2:43 pm | सुहास झेले

सुरुवात एकदम दणक्यात.... पब्लिसिटी तुफान झालीय आणि पहिला एपिसोड प्रचंड वादळ उठवून गेलाय. बघुया पुढे काय होतंय.....

||सत्यमेव जयते ||

चिरोटा's picture

6 May 2012 - 5:05 pm | चिरोटा

सुरुवात एकदम दणक्यात

+१.
बॉलिवूडच्या काळ्या धंद्यावरही एखादा एपिसोड यावा आणि आमीरने दुवे घ्यावेत.

आमीर माझा आवडता अभिनेता.. त्याच्या परफेक्शनीझ्मच्या गफ्फा लोकांना आवडत नसतीलही, पण तो वेगळ्या विषयांना हात घालतो, हे नक्की.. नाहीतर आपल्या स्वतः दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात डिस्लेक्सियासारख्या विषयाला घेऊन, त्यात इंटर्व्हलला एंट्री घ्यायचं धाडस आणि धैर्य फार कमी लोकांत असतं..

असो. आता कार्यक्रमाविषयी.. पहील्याच भागात त्याने कन्या-भृण-हत्या सारख्या विषयाला हात घातला. ह्या भागात दाखवलेल्या अमिषाची कहाणी आणि त्या नवर्‍याने केलेल्या क्रूर हल्ल्याला तोंड दिलेल्या स्त्रीची कथा तर भयानक होतीच, पण अत्यंत उच्चशिक्षीत घरातील डॉ.ची कहाणी आणखीच व्यथीत करणारी होती. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ह्या गुन्ह्यांची सुरुवात होण्यामागे सरकारची "जनसंख्या घटाओ" वाली अति-महत्त्वाकांक्षा होती, ही माहिती नवीन आणि विदारक होती.

कुरुक्षेत्रातल्या "रंडवों की टोली" आणि लग्नासाठी बायकांची खरेदी करण्याची गोष्ट "मातृभूमी" ह्या चित्रपटाची आठवण देऊन गेल्या.. एक गोष्ट आपल्या सगळ्यांना लक्षात घ्यावी लागेल, की ही आग माझ्या-तूमच्या घरांपर्यंत झळ कधीही पोहचवू शकते.स्त्रीयांचे पुरुषांच्या तुलनेत असलेले कमी प्रमाण आणि त्यामूळे होणारी पुरुषांची होणारी लैंगिक उपासमार हे स्त्रीयांवर होणार्‍या लैंगिक अत्याचाराचे मुख्य कारण असावे. (दिल्लीचे "रेप स्टॅटीस्टिक्स" ह्याकडे इशारा करते, असं मला वाटतं.) आणि आजची परीस्थिती येत्या काही वर्षांत आणखीच बिकट होऊ शकते.

श्रीरंग's picture

6 May 2012 - 6:34 pm | श्रीरंग

>>धाडस आणि धैर्य फार कमी लोकांत असतं..

अगदी योग्य बोललात. निव्वळ गल्लाभरूपणा न करता, हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून दूरदर्शन वर प्रक्षेपणासाठी आग्रही असणं, यासाठी स्टार समूहाला राजी करणं, टेलीकॉम कंपन्यांना या कार्यक्रमासाठीच्या एसेमेस चा दर वाढवू न देणं, या छोट्याश्या गोष्टी असल्या, तरी महत्वाच्या आहेत.
याचप्रमाणे, नुसता लोकांच्या दु।खाचा बाजार न मांडता यावर कृती करण्यासाठी लोकांना उद्युक्त करण्याचा प्रयत्न करणं, यातून निर्माता म्हणून आमीरची स्वच्छ नीयत दिसून येते.

आबा's picture

7 May 2012 - 12:25 am | आबा

+१

हा कार्यक्रम पाहू न शकल्याने, चिगो यांचा विस्तृत प्रतिसाद खूप आवडला. निदान पहील्या भागात काय झाले याचा थोडाफार आढावा घेता आला.
स्त्रीभ्रूणहत्या हा घृणास्पद गुन्हा करणार्‍या नालायक लोकांनी कमीत कमी देवीची स्तोत्रे कधीही आयुष्यात म्हणू नयेत ना देवीची (स्त्री तत्वा असल्याने) उपासना करू नये.
बाकी राहीली बाब - आमीर खान च्या नव्या वेंचर (प्रकल्पाची)ची, खूपच कौतुकास्पद आहे. नावदेखील सुरेख शोधले आहे - "सत्यमेव जयते"

चिगो's picture

6 May 2012 - 6:36 pm | चिगो

स्त्रीभ्रूणहत्या हा घृणास्पद गुन्हा करणार्‍या नालायक लोकांनी कमीत कमी देवीची स्तोत्रे कधीही आयुष्यात म्हणू नयेत ना देवीची (स्त्री तत्वा असल्याने) उपासना करू नये.

हाच तर दुटप्पीपणा असतो ना ताई.. दुर्दैवाने, दुरच्या नात्यात एका कुटूंबाने दोन मुली झाल्यावर तिसरीच्या वेळी भृणहत्या करवली आणि हे कोल्हापुरच्या अंबाबाईचे उपासक आहेत म्हणे. कोल्हापुरात आणि महाराष्ट्रातही कन्याभृणहत्येचे प्रमाण चिंताजनक आहे, हे वाचल्याचे स्मरते.

"सत्यमेव जयते"मध्ये भिलवाडा, राजस्थान मधून आलेल्या एका डॉक्टरीणबाईंच्या मते आदिवासी लोकांमध्ये हा प्रकार अजिबात नाहीये. ते लोक मुलगा वा मुलगी दोघांचाही जन्म अगदी समानरीत्या सिलेब्रेट करतात. नृवि़ज्ञान (Anthropology) मध्ये शिकल्याप्रमाणे बहुतेक आदिवासी संस्कृतींमध्ये मुलीचे/स्त्रीचे स्थान पुरुषांसारखेच असते. किंबहुना, बर्‍याच ठीकाणी स्रीचे स्थान पुरुषांपेक्षाही उच्च असते. (उदा. मेघालय)..

कदाचित, सुसंस्कृत/उच्चभ्रू /उच्चशिक्षीत होत असतांना आपण माणुसकी नावाची बेसिक गोष्टच विसरलोय..

अर्धवटराव's picture

6 May 2012 - 8:37 pm | अर्धवटराव

>>दुरच्या नात्यात एका कुटूंबाने दोन मुली झाल्यावर तिसरीच्या वेळी भृणहत्या करवली आणि हे कोल्हापुरच्या अंबाबाईचे उपासक आहेत म्हणे.
-- :( . देवीच्या उपासना करताना स्वतः दुनीयाभरचे व्रतवैकल्ये -अनुष्ठानं करायचे आणि त्याकरता दिवसभर घरच्या स्त्रीयांना राब राब राबवायचे, वृद्ध आईला कस्पटाची देखील किंमत द्यायची नाहि.. हे सगळं मी फार जवळुन बघितलय :(

अर्धवटराव

तुम्हाला जर हा भाग बघायचे असतील तर ते या दुव्यावर आहेत

शुचि's picture

7 May 2012 - 9:10 am | शुचि

धन्यवाद.

सहज's picture

7 May 2012 - 9:40 am | सहज

दुव्याबद्दल धन्यवाद.

गणपा's picture

7 May 2012 - 4:47 pm | गणपा

दुव्या बद्दल धन्यवाद देतो.

अनामिका's picture

6 May 2012 - 6:36 pm | अनामिका

ह्या कार्यक्रमाचे पुन:प्रक्षेपण कधी होते मला कुणी सांगेल का?इथे त्या डिश टिव्हीच्या सिग्नल प्रणालीने वात आणलाय्!!!!!!!!!!!!!बातम्यांमधे दाखवले त्यावरुन तरी कार्यक्रम उत्तम आहे अर्थात आमिरचा असल्याकारणाने कुठलीही शंका घेण्यास वाव असणार नाही याची पुर्ण खात्री आहेच्....पहिल्याच भागात ज्या कन्या-भृण-हत्या सारख्या विषयाला हात घातलाय तो पाहता टिव्हीचे माध्यम देखिल आमिर आपल्या खुबीने आणि वैविध्यपुर्ण शैलीने पादाक्रांत करणार हे निश्चित...

JAGOMOHANPYARE's picture

6 May 2012 - 6:54 pm | JAGOMOHANPYARE

इथे आहे बघा.. http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=NG3WygJmiVs

शेवटचे गाणे तर अगदी सुंदर आहे.. http://www.youtube.com/watch?v=_bv0Q9HTegE

चिगो's picture

7 May 2012 - 2:23 pm | चिगो

गाणे बघायचे राहून गेले होते.. धन्यवाद. कंठ दाटून येण्याइतपत आणि डोळे झरण्याइतपत माणूसकी अजून माझ्यात जिवंत आहे, हे ह्या गाण्याने नव्याने कळले..

सानिकास्वप्निल's picture

6 May 2012 - 8:14 pm | सानिकास्वप्निल

खूपचं सुंदर असा कार्यक्रम आहे :)
सुरुवात जोरदार झाली आहे आणी आजचा स्त्री-भृण-हत्या विषय तर गंभीर होता त्यावर काही स्त्रीयांचे अनुभव तर खूपचं वाईट व भयानक होते .

आमीर खान माझा आवडता अभिनेता आहे आणी तो जे काम करतो ते तितकेच जास्तं बघायला आवडते ही , तो खरचं एक परफेक्शनीस्ट आहे ह्यात माझं दूमत नाही.

स्वानंद किरकिरे ह्यांचे ओ रे चिरैया हे गाणं तर उत्तम होतं , अगदी मन भरुन आले.

पुढचे भाग बघण्याची उत्सुकता आणखीनच वाढलिये.

अतिशय उत्तम कार्यक्रम आहे. उत्तम सुरुवात आहे. आजच्या पहिल्या भागात 'स्त्री भ्रूण हत्ये 'च्या निमित्ताने सुशिक्षित- अशिक्षित स्त्रियांचे अनुभव, विविध समाज गटातील स्त्रियांचे अनुभव ऐकल्यानंतर पहिल्याच भागाने कार्यक्रम पाहणार्‍यांच्या मनात प्रश्नांचा कल्लोळ उठवला असेल.

आता कार्यक्रम हा व्यावसायिक दृष्टीने यशस्वी करण्याचा उद्देशही आहेच. अमिरखान या कार्यक्रमाचा संचलन करणारा नसता तर कार्यक्रम किती लोकांनी कार्यक्रम पाहिला असता ? कार्यक्रमाच्या निमित्ताने दिग्दर्शकाने अमिरखानचा उपयोग करायचे ठरवलेले दिसते. अमिरखानला मोठी रक्कम देऊन कार्यक्रमासाठी तयार केले आहे. बाकी, काहीही असो. पहिल्या भागाने कार्यक्रमाची उत्सूकता वाढवली आहे. पुढील भागात काय येते. कार्यक्रम काय अनुभव देतो. प्रेक्षकांचा पसंतीला हा कार्यक्रम उतरतो का ? या आणि अनेक प्रश्नांच्या उत्तरे पुढील काही भाग देतीलच असे वाटते.

-दिलीप बिरुटे

निखिल देशपांडे's picture

6 May 2012 - 11:18 pm | निखिल देशपांडे

कार्यक्रमाच्या निमित्ताने दिग्दर्शकाने अमिरखानचा उपयोग करायचे ठरवलेले दिसते. अमिरखानला मोठी रक्कम देऊन कार्यक्रमासाठी तयार केले आहे.

खरे काय ते माहित नाही पण अमिर खानच्या मुलाखती नुसार स्टार वाले त्याचा कडे गेम शो घेउन गेले होते. अमिर ने त्याला नकार दिला व नंतर ह्या शो ची कल्पना चॅनल कडे घेउन गेला. सत्यमेव जयतेची पुर्ण कल्पना त्याचीच असल्याचे सांगितले आहे.

भडकमकर मास्तर's picture

6 May 2012 - 11:25 pm | भडकमकर मास्तर

हेच म्हणतो...

सर्व खानांमध्ये आमीर बेस्ट आहे, वेगळा आहे...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 May 2012 - 9:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्टार वाले अमिरखानकडे रियलॅटी शोच्या कार्यक्रमासाठी गेले होते आणि त्याने नकार दिला इथपर्यंत बरोबर वाटते. पुढे सत्यमेव जयतेच्या कार्यक्रमाचे रेकॉर्डींग होत गेले तेव्हा या कार्यक्रमाचे संचलन अमिरने करावे असे टीमला वाटत होते, सुरुवातीला अमिरने त्यास नकार दिला. (अमिरने नकार दिला असता तर कार्यक्रमाला प्रसिद्धी मिळाली नसती) पुढे सत्यमेव जयतेच्या टीमने अमिरला थेट विविध गावांमधे फिरवून आणल्यावर सामाजिक विषयावरच्या कहाण्या-समस्या पाहून अमिरचे डोळे पाणावले वगैरे आणि त्याने या कार्यक्रमासआठी होकार दिला, असे वाचनात आले.

एका भागाचे संचलन करण्यासाठी अमिरला तीन कोटी मिळणार आहेत. आता हे तीन कोटी कोण देणार आहेत ते मला काही कळलं नाही. अमीरने सदरील कार्यक्रमाच्या भागासाठी ज्या अटी टाकल्यात 'रविवार सकाळची वेळ आणि विविध वाहिन्यांवरचे प्रसारण' व्हावे. अमीरखानच्या भाषेत रामायण मालिकेप्रमाणे सर्व कुंटुंबाने एकत्र बसून कार्यक्रम पाहावा. उद्देश चांगलाच आहे. पण, यात काही व्यावसायिक गोष्टी दडून बसल्या आहेत काय, याचाही विचार व्हायला पाहिजे. कारण इतर प्रतिसादात अनेकांनी म्हटल्याप्रमाणे सामाजिक समस्येवरचा हा काही पहिला कार्यक्रम नाही.

असो, आपण फक्त कार्यक्रमच नव्हे तर त्यानिमित्ताने काय काय घडते त्यावरही चाणाक्षपणे लक्ष ठेवले पाहिजे. उगाच नंतर अपेक्षाभंगाचे प्रसंग येतात.

निखिल, कालच्या कार्यक्रमात डॉ. चा अनूभव ऐकतांना तिचे अनुभव सांगणं झालं की, कॅमेरा अमिरखानच्या चेहर्‍यावर फिरायचा. अ.खानच्या विविध भाव-भावना, छटा, डोळे पाणावणे वगैरे (डोळे पाणावणे खरेच होते त्यात काही वाद नाही.) त्यामुळे कार्यक्रम थेट भिडतो ही क्लृप्ती मला आवडली.

असो, कार्यक्रम अजून खूप बाकी आहे. आपण प्रेक्षक जागृक राहू इतकेच.

-दिलीप बिरुटे

श्रीरंग's picture

7 May 2012 - 11:01 am | श्रीरंग

तुम्ही म्हणता त्याप्रमाणे व्यावसायिक गणितं या कार्यक्रमामागे नक्कीच असणार. पण तरीदेखील, आपल्या सेलेब्रिटी स्टेटस चा, माध्यमांमध्ये असलेल्या दबदब्याचा वापर अशा कार्यक्रमांसाठी करणं, हे कोणत्यातरी टिनपाट पुरस्कारासाठी लॉबींग करणं, सहकलाकारांचा रोल कापून स्वतःचा वाढवणं, असल्या चाळ्यांपेक्षा कितितरी जास्त श्रेयस्कर आहे. म्हणून आमीरचं कौतुक. इतर सेलेब्रिटीजनी देखील यातून शिकण्यासारखं आहे.
.

कोणाच्याका कोंबडयाने होईना पण उजाडल्याशी कारण!!

कार्यक्रम आवडला. बायकांनाच मुलाची भारी हौस आहे असं दिसलं...स्त्रीच स्त्रीची वैरी !!

अवांतरः पैशाचं गणित हे असणारंच पण आमिर खानने कुठलातरी गेम शो करण्यापेक्षा हा कार्यक्रम करण्याचं ठरवलं हेसुद्धा चांगलं लक्षण आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 May 2012 - 11:26 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> कोणाच्याका कोंबडयाने होईना पण उजाडल्याशी कारण !!

हे आवडलं.

-दिलीप बिरुटे

मृगनयनी's picture

22 May 2012 - 11:27 am | मृगनयनी

स्त्रीच स्त्रीची वैरी !!

हे पटल!! ;)

स्मिता.'s picture

7 May 2012 - 12:51 am | स्मिता.

विविध समाज गटातील स्त्रियांचे अनुभव ऐकल्यानंतर पहिल्याच भागाने कार्यक्रम पाहणार्‍यांच्या मनात प्रश्नांचा कल्लोळ उठवला असेल.

अगदी असेच झाले. वर लेखात लिहिलेल्याप्रमाणे काही स्त्रियांचे अनुभव अंगावर येणारे होते आणि ते बघून काही वेळापुरती माझीच मनस्थिती बिघडली.

अमिरखान या कार्यक्रमाचा संचलन करणारा नसता तर कार्यक्रम किती लोकांनी कार्यक्रम पाहिला असता ?

हेच मत माझ्या नवर्‍याचेही पडले. याआधी इतर वाहिन्यांवरही अश्या प्रकारचे कार्यक्रम झालेले आहेत पण त्यांना तेवढी प्रसिद्धी मिळालीच नाही. पण अमिर खानच्या निमित्ताने का होईना, थोडी जनजागृती झाली तर उत्तमच!

तसेच या कार्यक्रमात समस्येचा सर्व अंगांनी विचार होण्याऐवजी चार पिडितांच्या दु:खाचा बाजार झाल्याचे किंचितसे वाटले. स्त्री-भ्रूणहत्येच्या समस्येचे बीज असणार्‍या आपल्या विवाह व्यवस्थेचा (ज्यात आई-वडिलांना मुलीच्या पालन-पोषण, शिक्षणावर खर्च करून, वर हुंडा देवून तिचे लग्न करून द्यायला लागते आणि पुढे तिच्याकडून कुठल्याही आधाराची अपेक्षा करता येत नाही) आजच्या एपिसोडमधे उल्लेखही झाला नाही. अनेक कुटुंबांत मुली नकोश्या होण्याला हे एक सगळ्यात महत्त्वाचे कारण आहे असं मला वाटतं. अर्थात ही एक वेगळी समस्या म्हणून पाहिलं जात असेल तर पुढे काय बोलावं ते कळत नाही.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

7 May 2012 - 10:36 am | विश्वनाथ मेहेंदळे

कार्यक्रमाच्या निमित्ताने दिग्दर्शकाने अमिरखानचा उपयोग करायचे ठरवलेले दिसते. अमिरखानला मोठी रक्कम देऊन कार्यक्रमासाठी तयार केले आहे.

एपिसोडचे टायटल क्रेडिट्स तुमच्यासाठी इथे देतो.

दिग्दर्शक :- सत्यजित भटकळ. (लगान पासून आमीर खान बरोबर काम करतो आहे)
कोर क्रिएटीव्ह टीम :- आमीर खान, सत्यजित भटकळ , ...
कल्पना आणि निर्मिती :- आमीर खान

निखिल देशपांडे's picture

6 May 2012 - 11:14 pm | निखिल देशपांडे

कार्यक्रमाचे आवडलेले काही वेगळे मुद्दे

  • हा कार्यक्रम स्टार चा जरी असला तरी रविवारी सकाळी ११ वाजता दुरदर्शन वरही दाखवला जातोय.
  • आज कार्यक्रमात मागवलेल्या एस एम एस ची कॉस्ट ही फक्त १ रुपया आहे. साधारणता एस एम एस वाल्या रिअ‍ॅलिटी शोज साठी कॉस्ट ३-६ रुपये असते.

आमिर नसता तर हे कदाचीत घडले नसते.

दादा कोंडके's picture

6 May 2012 - 11:15 pm | दादा कोंडके

कार्यक्रम बघताना काही वेळेला डोळे भरून आले. शेवटच गाणं तर मस्तच.

हा कार्यक्रम ज्या लोकांना आजुबाजूला काय चाल्लय हे माहीत नाही/परीणामांची कल्पना नाहीये. आणि जे लोक हे सगळं कळत असूनही शाइनिंग इंडीया, उद्याची आर्थिक महासत्ता म्हणत डोळ्यावर कातडं ओढून मॉलमध्ये रमत आहे त्यांच्यासाठी आयओपनर असेल.

पुढील पंधरा भागांची थीम काय काय असेल त्याची कल्पना आली आहे, पण कार्यक्रम बघण्याची उत्सुकता आहेच.

उपक्रम चांगलाच आहे पण आता या विषयावरचे कार्यक्रम पाहणार नाही असे ठरवले आहे. नंतर दोनेक दिवस फार वाईट वाटत राहते. काये ना की आपण मुलगा मुलगी हा भेद मानात नाही, जातियता मानत नाही, नोकराचाकरांना चांगले वागवायचे आणि पुन्हा वाईटही वाटून घ्यायचे. हा कार्यक्रम बघूनपु न्हा घरातल्या बायकांना राबवून घेणारे असतातच. त्यांचे काही म्हणता काही बिघडत नाही. निर्लज्जपणे आल्या प्रसंगात "हो, आम्ही तसेच आहोत." म्हणताना लाजा वाटत नाहीत. सगळा त्रास काय तो आपण करून घ्यायचा मक्ता घेतलेला नाही.

भडकमकर मास्तर's picture

6 May 2012 - 11:43 pm | भडकमकर मास्तर

या विषयावरचे कार्यक्रम पाहणार नाही >>>>>>>>>>>>
अवांतर : माझी अशीच परिस्थिती ज्यू होलोकॉस्ट वरचे चित्रपट पाहिल्यावर होते... मग आठवड्यात तसले चार पाच सिनेमे पाहून टाकतो.. ( मग त्या सिनेमाच्या अनुषंगाने गूगलून जी मिळेल ती माहिती काढणे ,वाचणे वगैरे) . मग रीतसर त्रास वगैरे होतो. .. मानवाच्या मनात असले टोकाचे विचार येतात आणि ऑर्गनाईज्ड आधुनिक मशीनरी वापरून अनेक माणसं या सार्‍या हत्याकांड घडवून आणण्याला साथे देतात , हे काही दशकांपूर्वी आपल्याच जगात खरोखर घडलेलं आहे; याचा प्रत्येक मानवाने विसर पडू देऊ नये, अस्लं काही डोक्यात यायला लागतं... त्या काळात घरी/ मित्रांच्यात वगैरे मी याच विषयावरती बोलायला लागतो ..... मग लगेच वाटतं, " एवढा त्रास होतो तर पाहायचे कशाला असले सिनेमे? आणि कशाला वाचायचं हे सारं?"
______________________________________

स्पंदना's picture

7 May 2012 - 7:01 am | स्पंदना

रेवती अगदी खर.

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Jun 2012 - 10:50 am | llपुण्याचे पेशवेll

नोकराचाकरांना चांगले वागवायचे आणि पुन्हा वाईटही वाटून घ्यायचे.
यावरून आठवले. नोकर चाकरांवर अन्याय होत असेलही, नाही म्हणत नाही पण हे नोकर चाकर विशेषतः मोलकरणी प्रचंड माजलेले आहेत. गॅस सिलींडरांची डिलीव्हरी देणारे भैय्ये, फर्निचर वस्तू घरी आणून पोचत्या करणारे हमाल. याबाबत २-३ किस्से असे
१. आमच्या घरी भांडी घासणार्‍या बाईला विचारले माझे शर्टपॅट धुशील का? आणि त्याचे किती घेशील? तिने सांगितले १ वेळेला १० पँट, १० शर्ट धुण्याचे ९० रुपये. जर कपडे त्यापेक्षा कमी असतील तरी पैसे तेवढेच. विचार केला ९० रु. २० कपडे धुतले जात असतील तर चांगले आहे १ जोडी २ दिवस या हिशोबाने महीन्याभरा साठी पुरतील. चालेल. त्या महीन्यात २ वेळा तिला बोलावून पहिल्यांद २० कपडे आणि दुसर्‍यांदा १३च कपडे धुवून घेतले. एकून पैसे दिले १८० . म्हटले असूदे जरा जास्तच कपडे होते.
पुढच्या महीन्यात तिला बोलावले तर सदर बाईंनी रेट डायरेक्ट वाढवून १७० रु एकावेळेचा करून टाकला होता. म्हणलं जवळ जवळ ८५ % वाढ एका महीन्यात? काय कारण? तर आमच्या शेजारच्या फ्लॅट मधे एक ये**वी आयटीवाली राहते तिला ४०००० पगार आहे तर ती या बाईला एका वेळेला १६०- १७० देते म्हणून हिला माझ्याकडूनही तितके पैसे पाहीजेत. मी म्हटलं माझे कपडे काही इतके मळके नसतात. परत तू साबण पण प्रचंड वापरतेस. मी काही इतके पैसे देणार नाही मला परवडत नाही. तर मला म्हणे "तुम्ही इतके पैसे कमावता मग आम्हाला थोडे द्यायला काय होतंय?" त्यावर प्रचंड संतापून मी म्हणलं "आम्ही दिवसातले १२-१२ तास सुधा ऑफिसमधे थांबतो. दिलेल्या वेळा पाळतो. तुला कामाला बोलावले तर १० येते सांगून दुपारी २ ला येतेस. न सांगता खाडे करतेस. तेव्हा भांडी आम्हीच आमची घासून घ्यायची. मस्ती आली आहे तुम्हाला. आमच्या सारखी मर मर करून कामं करा म्हणजे कळेल. तुमची ज्वारी १६० रु किलो झाली की मग उतरेल मस्ती तुमची".
२. अशीच पैशाची मागणी सिलिंडर आणून देणारा मनुष्य करत असे. त्याला चांगलाच फटकारला. पैसे दिले नाहीत तर हा मुद्दामहून सिलिंडरची डीलीव्हरी द्यायचा नाही. डीलर कडे घरात कोणी नव्हते असे रीपोर्टींग करायचा (अर्थात हे डीलरकडे जाऊन विचारल्यावर कळले). मग एक दिवस त्याची रीतसर कंप्लेंट करून त्याच्या नोकरीवर गदा आणली मग कुठे जरा सुधारला.

अरे पुपे, तुझं सगळं म्हणणं मान्य आहे बाबा, पण आजकाल त्यांना लाडीगोडी लावली नाही तर कामं करत नाहीत. शिवाय मला म्हणतात की ताई, तुमचं काम वर्षातून चार पाच दिवस, तुम्ही इथं विमानात बसून येता, आम्ही चालत येतो मग द्याकी पैसे! तरीही त्यांचा वाट्टेल तसा अपमान करणं जमतं का? तुझं एक ठिके ब्याचलर मनुष्या! संसारी लोकांना कसं जमावं असं वागणं . ;)
त्यावर वेगळा धागा सुरु केला तर कमी का प्रतिसाद येतील पण मोह आवरते. ;)

चित्रगुप्त's picture

19 Jun 2012 - 9:41 am | चित्रगुप्त

आम्ही वर्षानुवर्षे हरियाणात रहात आहोत, महाराष्ट्रात रहायला मिळत नाही, म्हणून वाईट वाटून घेत.
परंतु हे असे अनुभव ऐकून वाटले, इकडले लोक त्यामानाने पुष्कळ बरे आहेत.

दादा कोंडके's picture

19 Jun 2012 - 9:58 am | दादा कोंडके

कुठेही जा जस्तीच्या वरच्या पैश्यांसाठी तोंड वेंगाडणं आहेच. सिग्नलवरच्या भिकार्‍यापासून डिलीवरी बॉइज पर्यंत, रिक्षावाल्यांपासून ते देवळातल्या पुजार्‍यांपर्यंत. (बंगळुरूच्या नंदी टेंपलमध्ये प्रदक्षीणा मारत असताना माझ्यापुढं काही परदेशी नागरीक होते. त्या मुख्य पुजार्‍याने ताटात दोन-चार शंभरच्या नोटा ठेउन "ब्लेसिंग्स, ब्लेसिंग्स" म्हणत अक्षरशः भीक मागयला सुरुवात केली. त्यांच्या मागोमाग मी येत होतो, त्याला म्हणालो, त्यापेक्षा तीथं बाहेर पायर्‍यांवर बसून भीक माग. नंतर शिवीगाळ होउन मारहाणीपर्यंत प्रकरण गेलं होतं, असो) त्यांची गरीबी वगैरे मान्य केली तरी कधिकधी असह्य होतं. इतकी लाचारी बघून आपणच लाचार होतो,आणि बहुतेक वेळा पैसे देतो. :(

आनंदी गोपाळ's picture

19 Jun 2012 - 9:20 pm | आनंदी गोपाळ

तुमची ज्वारी १६० रु किलो झाली की मग उतरेल मस्ती तुमची

पुपेजी,
खरे आहे तुमचे. अन मला मान्यही आहे. रेशनवर स्वस्तात धान्य, राजीवगांधी विम्यात फुकट औषधोपचार, घरकुले फुकट झोपडपट्टी निर्मूलनात.. इ. इ. खरंच मातले आहेत हे लोक.
मग मी ही सगळ्याच सबसिड्या सरकारने काढून टाकाव्यात या मतापर्यंत येतो. मग सगळा लोचा होतो..
मग तिथे ग्यास अन पेट्रोल महागले म्हणून आपणच हळहळतो.
मुळापासून सगळे इलाज करण्याची गरज आहे. त्यात प्रत्येकालाच झळ बसेल, ती सोसायची तयारी हवी!

भडकमकर मास्तर's picture

6 May 2012 - 11:23 pm | भडकमकर मास्तर

ओ री चिरैया
नन्हीसी चिडिया
अंगना में फिर आ जा रे

अंधियारा है भरा और लहू से सना
किरनोंके तिनके अंबरसे चुनके
अंगना में फिर आ जा रे

हमने तुझपे हजारो सितम है किये
हमने तुझपे जहांभरके जुल्म किये
हमने सोचा नही , तू जो उड जायेगी
यह जमीं तेरे बिन सूनी रह जायेगी
किसके दमपे सजेगा मेरा अंगना

तेरे पंखोमें सारे सितारे जडूं
तेरी चूनर थनक सतरंगी बुनूं
तेरे काजलमें मैं काली रैना भरूं
तेरी मेहंदीमें मैं कच्ची धूप मलूं
तेरे नैनो सजा दू नया सपना

ओ री चिरैया, मेरी चिरैया
अंगना में फिर आजा रे

ओ री चिरैया
नन्ही सी चिड़िया
अंगना में फिर आजा रे
ओ री चिरैया

आताच ऑनलाईन पहिला भाग पाहीला आणी आवडला. एका महत्वाच्या विषयाला हात घातल्याबद्दल आमिर चे धन्यवाद.

--टुकुल

पैसा's picture

6 May 2012 - 11:35 pm | पैसा

आताच कार्यक्रम पाहिला. प्रश्नाचा सर्व बाजूनी विचार केला आहे. आमिरचा कार्यक्रम म्हटल्यावर हे अपेक्षितच होतं. पुढचे कार्यक्रम असेच उत्तम असणार यात काही शंका नाही.

स्त्री भ्रूणहत्या हा प्रश्न गावांपेक्षा शहरातच जास्त असावा सं वाटलं, कारण गावांमधे अजूनही इतक्या मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स उपलब्ध नसावेत. कार्यक्रमातल्या भाग घेतलेल्या महिलांवर घरातल्या मंडळीनी जबरदस्ती केली होती, पण माझ्या माहितीतल्या काही घरातून सुशिक्षित, नोकर्‍या करणार्‍या स्त्रियानी आपणच हे प्रकार करून घेतलेले माहिती आहेत. अमूक एका गटाकडूनच असे प्रकार होतात असं म्हणण्यात काही अर्थ नाही.

खेडेगावात प्रॅक्टिस करणार्‍या सातीचे या विषयातले अनुभव वाचायला आवडतील.

भडकमकर मास्तर, गाण्यासाठी धन्यवाद!

किसन शिंदे's picture

6 May 2012 - 11:41 pm | किसन शिंदे

अतिशय सुंदर कार्यक्रम!!

अवघ्या १३ भागांसाठी घेतलेली २ वर्षांची मेहनत कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात दिसुन आली.

तद्दन भिकारड्या सास-बहुच्या सिरियल्स, तसेच उगाच भंपकपणा दाखवणार्या रिअॅलिटी शोंपेक्शा आमीर खानचा 'सत्यमेव जयते' नक्कीच कौतुकास्पद आहे.

किसन शिंदे's picture

7 May 2012 - 8:35 am | किसन शिंदे

.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

6 May 2012 - 11:42 pm | निनाद मुक्काम प...

हा कायक्रम पाहून मला लहानपणी पाहिलेल्या आव्हान ह्या मराठी मालिकेची आठवण झाली. हुंडा बळी ह्या विषयाला वाचा फोडण्यासाठी भेंडे ह्यांनी ही मालिका काढली. ह्या मालिकेचा परिणाम व जनजागृती होऊन समाजात विवाहित बायका जळून मारण्याचे प्रमाण लक्षणीय घटले.
आता ह्या कार्यक्रमामुळे एक मात्र नक्की होईल की तलाश वर राजस्थान मध्ये बंदी येईल.

भडकमकर मास्तर's picture

6 May 2012 - 11:49 pm | भडकमकर मास्तर

http://www.misalpav.com/node/2758

२००८ मधले याच विषयावरचे मी लिहिलेले संपादकीय...

चावटमेला's picture

7 May 2012 - 9:03 am | चावटमेला

कालच हा कार्यक्रम पाहिला.अतिशय दर्जेदार कलाकृती आहे. अर्थात, आमिर खान असल्यावर दर्जाबाबत शंका घेण्याचे कारणच नाही. कार्यक्रमावर ओप्रा विन्फ्रेचा प्रभाव मात्र प्रकर्षाने जाणवला.

इरसाल's picture

7 May 2012 - 10:26 am | इरसाल

की आमीर खान आहे.

समजा हाच शो शाहरुख खानने सादर केला असता तर.....................................( नैइइइइइइइइइइइइइइइइइइइ केह दो कि ये झुट है.)

माझ्या मते तरी शाहरुख खानाला तरी असे कार्यक्रम करणे झेपणार नाही असो हे माझे वैक्तिक मत आहे

बाळ सप्रे's picture

7 May 2012 - 11:12 am | बाळ सप्रे

सर्वात महत्वाचा भाग हा वाटला की बहुतेकांची असलेली समजूत चुकीची ठरली..
या गुन्ह्यात अल्प उत्पन्न गट, ग्रामीण भाग, अल्प शिक्षित लोक यांचा सहभाग जास्त नसून शहरी भागातील सुशिक्षित लोक जास्त सहभागी आहेत!!!

ते सुशिक्षित कसले साक्षर आहेत असे म्हणायचे

मोदक's picture

9 May 2012 - 9:02 am | मोदक

सुशिक्षित, साक्षर आणि सुसंकृत हे तीन वेगवेगळे शब्द आहेत.

स्वातीविशु's picture

7 May 2012 - 12:39 pm | स्वातीविशु

"सत्यमेव जयते" कार्यक्रम खरोखरच एक उत्तम निर्मिती आहे, त्यात आमीर खान असल्याने नक्कीच तो त्याचे चीज करेल. :)

कार्यक्रम पाहताना अनेकदा डोळे भरुन येत होते. :( त्या तीनही स्त्रीयांना ज्यांनी स्वतःचा विचार न करता, आपल्या मुलींसाठी जे काही सोसले व खंबीरपणे मुलींचे पालनपोषन करत आहेत त्यांना मनापासून सलाम.

"सत्यमेव जयते" निमित्ताने भारतात सर्वत्र कन्या भ्रुणहत्तेविरुद्ध जनजाग्रुती व्हावी आणि भ्रुणह्त्या करणारे डॉक्टर, करुन घेणारे पालक यांना त्वरीत शिक्षा व्हावी अशी खुप तळमळीने इच्छा झाली.

चला तर सुरुवात आपल्यापासून करुया. :)

ओ री चिरैया, नन्ही सी चिडीया घर आजा रे.......

स्पा's picture

7 May 2012 - 3:07 pm | स्पा

ओके

पहाटवारा's picture

7 May 2012 - 4:41 pm | पहाटवारा

मागे वाचले होते कि एका पुण्यातील कंपनी ने कोल्हापूर जिल्ह्याच्या पायलट प्रोजेक्ट साठि एक यंत्र बनवले होते.
हे यंत्र अल्ट्रासाऊंड मशीनला जोडले जाते आणी जर कुणी लिंग तपासणी करण्याचा प्रयत्न केला तर त्याची नोंद होते.
हे कितपत यशस्वी पणे राबवले जातेय याचि कल्पना नाहि.
याच प्रकारे जर अल्ट्रासाऊंड मशीन मूळे जर सोय झाली असेल लिंग तपासणी ची तर सरकारने त्यातील लिंग तपासणी ची सुविधा बंद करण्याचे निर्देश या कंपन्यांना दिले तर ह्यावर मोठ्या प्रमाणावर आळा बसू शकेल. जिथे जिथे हि तपासणी वैदयकिय गरज म्हणून आहे , तिथे मोजक्या ठिकाणी ऊपलब्ध करून त्यावर कंट्रोल ठेवता येऊ शकेल.

मानस्'s picture

7 May 2012 - 5:21 pm | मानस्

२ वर्षापूर्वी झी मराठीवर 'याला जीवन ऐसे नाव' नावाचा रेणुका शहाणे यांचा Talk शो होता.तो पण असाच ह्रीदयस्पर्शी शो होता.पण यात सामाजिक सामाजिक विषय/मुद्दे नव्हे तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशश्वी झालेल्या आणि त्यांना मदत केलेल्या लोकांना शो मध्ये बोलावलं जायचं.सत्यमेव जयते साधारण तसाच वाटला...

तिमा's picture

7 May 2012 - 8:05 pm | तिमा

आमीरचा कार्यक्रम आवडला. त्यांत सत्यावर झगझगीत प्रकाश तर टाकला आहेच पण हा प्रश्न का निर्माण झाला तेही दाखवले. तसेच केवळ निराशावादी सूर न लावता पंजाबातील गावात या रानटी प्रथेविरुद्ध जे सकारात्मक प्रयत्न झाले ते पण दाखवले.
पहिला भाग तर मन जिंकून गेला.

अप्पा जोगळेकर's picture

7 May 2012 - 10:05 pm | अप्पा जोगळेकर

कार्यक्रम आवडला.
कार्यक्रमाच्या आड व्यावसायिक गणित दडलेली असतील तर कोणाच्या पोटात दुखण्याचे काय कारण आहे? मला वाटते हे एक उघड गुपित आहे.

सोत्रि's picture

7 May 2012 - 10:29 pm | सोत्रि

कार्यक्रमाच्या आड व्यावसायिक गणित दडलेली असतील तर कोणाच्या पोटात दुखण्याचे काय कारण आहे

करेक्ट!
एकतर 'शिवाजी जन्मावा तो दुसर्‍याच्या घरात आणि जन्माला आला रे आला की त्याने लगेच लष्कराच्या भाकरी भाजाव्यात' ही अपेक्षा कशी काय रास्त असू शकेल ?

- (व्यावसायिक + सामाजिक) सोकाजी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 May 2012 - 10:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कार्यक्रमाच्या आड व्यावसायिक गणित दडलेली असतील तर कोणाच्या पोटात दुखण्याचे काय कारण आहे ?

सहमत आहे. उगाच आपण कशाला कोणाला किती पैसे मिळतात वगैरे चर्चा करायच्या ? . याच्यामागे काही व्यावसायिक गणितं आहेत काय ? कोणी छोटा पडदा कॅश करण्याचा प्रयत्न करत आहे का ? स्टारवाल्यांना किती मिळतील, लगान टीमला किती मिळतील ? आपल्याला एका सामाजिक प्रश्नाची डोळ्यात अंजन घालणारी ओळख करुन दिली जात असतांना एक स्टार कलाकार सामाजिक विषयाला हात घालत असतांना लोकांना उगीच का पोटदूखी होते काही कळत नाही. :)

-दिलीप बिरुटे

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

7 May 2012 - 10:56 pm | निनाद मुक्काम प...

मेडिकल टुरिझम मुळे परदेशी लोक भारतात येत असतांना अनेक भारतीय परदेशात म्हणजे इंडोनेशिया व बेन्कोक मध्ये जात्तात.
कारण येथे ह्या चाचण्या करता येतात आणि बिन भोपट शस्त्रक्रिया एकाच पेकेज मध्ये
व परत भटकंती
महाराष्ट्रातील प्रगत भागात ह्या हत्या वाढल्या. आणि मुलींचा टक्का घसरला पण महाराष्ट्रातील जेष्ठ व दृष्ट्या नेत्याने हरयाणा व राजस्थान मधील भीषण परिस्थिती पाहून आपल्या भागात हि वेळ येऊ नये म्हणून भ्रूण हत्येबाबत जागृत्ती सुरु केली आहे.
देर आये ,लेकीन दुरुस्त आये असेच म्हणावे लागेल.

पांथस्थ's picture

8 May 2012 - 2:43 pm | पांथस्थ

पण महाराष्ट्रातील जेष्ठ व दृष्ट्या नेत्याने हरयाणा व राजस्थान मधील भीषण परिस्थिती पाहून आपल्या भागात हि वेळ येऊ नये म्हणून भ्रूण हत्येबाबत जागृत्ती सुरु केली आहे.

कोण हो?

लोकशिक्षण हे विविध प्रकाराने सारखे करावे लागते. एखादी गोष्ट पब्लीकने ऐकावी म्हणून सातवेळेस सांगावी लागते असे काहीसे समाजशास्त्रीय सांख्यिकी आकडा येथे ऐकला होता. खरे-खोटे माहीत नाही. तो मुद्दा नाही तर बर्‍याचदा सांगावे लागते इतकाच मुद्दा आहे.

आमिर खानने जर स्वत:चे नाव वगैरे वापरून जर समाजातील दोषांवरचे पांघरूण दूर केले लोकांना समजेल अशा भाषेत सांगितले तर चांगलेच आहे. त्याची इतरांनी कॉपी करायचे ठरवले तरी उत्तमच आहे... पब्लीकला केवळ जाहीरातीतून खरेदीदार करण्याऐवजी जरा जबाबदारी शिकवणारे हे कार्यक्रम आहेत.

दूरदर्शनच्या आधी जेंव्हा आकाशवाणी केंद्र चालू झाले तेंव्हा त्याचे ध्येयवाक्य हे "बहुजन हिताय बहुजन सुखाय " असे ठेवले गेले होते. ते वास्तवीक केवळ आकाशवाणीचे नव्हते तर भारतातील "पब्लीक ब्रॉडकास्टींग"साठीचे ध्येयवाक्य होते. मला वाटते असले कार्यक्रम हे ध्येयवाक्यास योग्य ठरतात...

८०च्या दशकात जेंव्हा दूरदर्शनवर मालिका चालू झाल्या, जाहीराती आल्या तेंव्हा मनोरंजन+लोकशिक्षण अशा दुहेरी कार्यंक्रमांसाठी बराच वापर झाला... त्यात या क्षणाला आठवणारे लोकप्रिय कार्यक्रम महणजे: प्रिया तेंडूलकरची "रजनी", हुंडाबळीवरील "आव्हान" ही मालीका, किरण बेदीच्या जिद्दीवरून तयार केलेली "उडान", शहारूख खानने पहीले काम केलेली "फौजी", "बोल बाबी बोल" या नाटकावरून (नाव आठवत नाही पण) १०-१२च्या प्रवेशावरून होणार्‍या मुलांच्या छळणुकीवरची मालीका, कॉलेजमधील ड्र्ग्जच्या व्यसनावरील तसेच इतर समस्यांवरील "चुनौती" असे अनेक काही आठवते... त्यातील काही फिल्मी होते पण काहीतरी विचार करायला लावणारे देखील होते.

नंतर हळू हळू अनेक चॅनल्स आले आणि वास्तवातल्या भृणहत्यांकडे दुर्लक्ष होऊन सास-बहुंनी टिव्हीचा कब्जा करून खर्‍या अर्थाने "इडीयट बॉक्स" केला... जर सत्यमेव जयतेच्या निमित्ताने त्यात बदल होत असेल तर ते स्वागतार्हच आहे.

JAGOMOHANPYARE's picture

8 May 2012 - 7:32 pm | JAGOMOHANPYARE

आमचा ई मेल गेला.

---------------------------------
माननीय मुख्यमंत्री,
महाराष्ट्र शासन.

विषय : स्त्रीभ्रुणहत्येविरोधात गांभिर्याने दखल घेणेबाबत

संदर्भ : देशभर प्रसारीत झालेला कार्यक्रम सत्यमेव जयते- भाग १ Daughters are precious

महोदय,

काही दिवसांपूर्वी दूरदर्शनवरुन सत्यमेव जयते या मालिकेचा पहिला भाग प्रसारीत झाला. त्यात आपल्या देशात आणि आपल्या राज्यात होत असलेल्या स्त्रीभ्रूणहत्येच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली. या अनुषंगाने मी आपणास खालील विनंती करत आहे..

१. सामाजिक संस्थानी स्टिंग ऑपरेशन द्वारे शोधलेल्या दाव्यांचीसुनावणी जलद गतीने व्हावी.

२. गुन्हे शाबीत झालेल्या लोकाना शिक्षा सुनावल्या असतील तर त्यांची अंमलबजावणी त्वरीत करणेत यावी.

३. स्त्रीभ्रूणहत्येविरोधात व्यापक प्रमाणात प्रसिद्धी द्यावी. यात स्त्री भ्रूणहत्येचे समाजावरील दुष्परिणाम आणि हा गुन्हा केल्याबद्दल दिली जाणारी शिक्षा यांचा प्रामुख्याने उल्लेख असावा.

धन्यवाद.

आपला विश्वासू,

------------------------------------------------------------------------------------
http://www.sarkaritel.com/states/chief_ministers.php इथे ई मेल आय डी मिळाला. आमीर खान , सत्यमेव जयते, स्टार यांचे ई मेल मिळू शकतील का, त्याना सी सी पाठवायची आहे.

या धाग्याला भाग १ हे नाव द्या.. प्रत्येक भागावर एकेक धागा काढा.

यकु's picture

8 May 2012 - 7:36 pm | यकु

+1

अविनाशकुलकर्णी's picture

10 May 2012 - 5:16 pm | अविनाशकुलकर्णी

Manjusha Thatte Joglekar यांची मूळ पोस्ट आहे मी इथे फक्त शेअर केली

६ मे ला रविवारी आमीर खानचा ‘सत्यमेव जयते’ हा कार्यक्रम काय संपला आणि
फेसबुक, ट्विटर पासून दूरदर्शनवरील विविध वाहिन्या सगळीकडे या आमीर खानचा
नुसता उदो उदो. जसं काही श्री. विष्णूंनी या आमीरच्या रुपानी अवतारच घेतलाय
आणि नुसता त्याला पाठिंब्यावर पाठिंबा. का ? कशासाठी हा उदोउदो ? काय महान
कार्य केलंय या आमीर खानने ? या कार्यक्रमाची एव...ढ्या
मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली होती आणि त्याचे सादरीकरण खुद्द मि.
परफेक्शनिस्ट करणार आणि त्यात रविवार त्यामुळे या कार्यक्रमाची सुरुवात
मोठ्या दणक्यात होणार हे स्वाभाविकच होतं. मी स्वतः आमीर खानची चाहती आहे.
पण जर नीट विचार केला तर या कार्यक्रमासाठी आमीरला एवढं डोक्यावर घेण्याची
खरंच गरज आहे ?

एक तर आमीर खान हा या फिल्मी जगतातला एकमेव नाही
की जो समाजासाठी काही कार्यक्रम करत आहे. वारंवार समाजकार्य करणाऱ्या
वेगवेगळ्या कलाकारांची नावं ही पुढे येतंच असतात. पण हा आमीर खान समाजकार्य
करत आहे हे कसं म्हणता येईल ? कारण हा कार्यक्रम योग्य तो मोबदला घेऊनच तो
करत आहे. समाजकार्य कारायचं म्हणून तो विनामूल्य किंवा अत्यल्प मोबदला
घेऊन नक्कीच करत नाही. त्यामुळे जशा त्याच्या फिल्म्स, जाहिराती तसाच हा
कार्यक्रम. त्यामुळे तो समाजासाठी काही फार मोठं करत आहे हे असं आजिबात
नाही. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात स्त्रीभ्रूणहत्या सारखा एक मोठा
ज्वलंत आणि चिंतेचा सामाजिक प्रश्न मांडला गेला. आता या पहिल्या भागाचा
परिणाम समाजावर किती झाला आहे म्हणजेच या पहिल्या भागाला यश किती मिळालं
आहे हे तेव्हाच कळेल जेव्हा या कार्यक्रमामुळे या स्त्रीभ्रूणत्येचं प्रमाण
कमी होईल.

आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आणि तो म्हणजे आमीर खान.
या कार्यक्रमाचे १३ भाग प्रसारित केले जाणार आहेत आणि त्यात वेगवेगळे
सामाजिक विषय हाताळले जाणार आहेत. हे सर्व भाग आमीर खान सादर करणार आहे.
सामाजिक विषयांवरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमीर खान सारखा एक अभिनेता
करणार, हो अभिनेताच कारण जसा तो चित्रपटांमध्ये अभिनय करतो तसाच तो या
कार्यक्रमात अभिनय करणार. कारण एक माणूस म्हणून हा आमीर खान अशा
कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी आजिबात योग्य नाही. आपल्या घरच्यांचा,
आईवडिलांचा विरोध पत्करून एक महिला या आमीर खान बरोबर लग्न करते. त्यांना
दोन मुलेही होतात. हा असा संसार चालू असताना हा आमीर खान या महिलेला टाकून
म्हणजे चांगल्या शब्दात सांगायचं तर घटस्फोट घेऊन सरळ दुसरा संसार थाटतो,
असा माणूस काय सामाजिक प्रश्न कार्यक्रमात सादर करणार ? हा शब्द वापरू नये
पण त्याची काय लायकी आहे हा कार्यक्रम सादर करण्याची ? उद्या या
कार्यक्रमात घटस्फोटीत महिलांचा प्रश्न हाताळला गेला तर हा प्रश्न या
आमिरने सादर करावा ?

काही नाही हा फक्त इतर कार्यक्रमांसारखा फक्त
व्यावसायिक दृष्टिकोन आणि टी.आर.पी. हे डोळ्यांसमोर ठेवून तयार केलेला
कार्यक्रम आहे. त्याला या प्रसिद्धीमाध्यमांनी नको तेवढं डोक्यावर घेतलंय
बस्स.

मुक्त विहारि's picture

14 May 2012 - 12:46 am | मुक्त विहारि

हे सगळे खान एकाच माळेचे मणी आहेत..

सलमानने काय केले हे तर आपणा सर्वांना माहितच आहे.

आणी ईतर सगळे खान आधी हिंदू मुलींशी लग्न करून आणि मग तिला घट्स्फोट देवून इतर मूलींशी लग्न करायला मोकळे झाले.

ह्यातल्या एकालाही लग्न टिकवता आले नाही आणि लोकांना अक्कल शिकवायला निघाले.

दुनिया झुकती है.झुकाव...

स्साला आपून तो टी.व्ही, और ये खान लोगोंका पिक्चर देखताच नही है.गांधी बाबांचे असहकार तत्व.

आपण काही ह्या पापात सहभागी होणार नाही.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 May 2012 - 2:28 am | निनाद मुक्काम प...

मग ह्या खान मंडळींनी काय राज कपूर चा आदर्श बाळगायला हवा होता का

म्हणजे नर्गिस वर अमाप प्रेम करून स्वतःच्या बायकोला सोडचिठ्ठी न देता तिची रवानगी जशी त्यांच्या कॉटेज मध्ये हलविण्याचा त्याचा बेत होता तर तिला हक्काचे आणि मानाचे स्थान हवे होते.

का हिंदू सुपर स्टार अमिताभ सारखा सिलसिला करायचा होता.

अमीर ची दुसरी बायको सुद्धा हिंदूच आहे. तर शाहरुख बायकोसोबत प्रामाणिक आहे. व त्यांचा करण अर्जुन ह्या हिंदू जिवलग मित्रांशीसुद्धा

सलमान तर हिंदू व मुसलमान सगळ्याच मैत्रिणींवर त्याच्या (आजी माजी )अजूनही सारखाच प्रेम करतो.

तेव्हा ह्याबाबतीत उगाच धर्म आणू नका

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Jun 2012 - 11:03 am | llपुण्याचे पेशवेll

तेव्हा ह्याबाबतीत उगाच धर्म आणू नका
प्रिय अमीर खान याने एका हिंदू मुलीशी लग्नं करणार्‍या मुसलमान मुलाला त्या मुलीच्या घरच्यांनी ठार मारलेले दाखवले. त्याच्या आईला शोमधे बोलावून तिच्या कडून रडून घेऊन भावनिक आवाहन वगैरे केले. हे सारे बघताना आम्हाला अत्यंत आनंद झाला. चला म्हणलं कुठेतरी हिंदू जागृत आहेत.
अमीर महाशयांनी याच्या उलट्या केस मधे म्हणजे जिथे मुलगा हिंदू होता आणि मुलगी मुसलमान होती तिथे मात्र मुलगा जिवंत असल्याची केसच दाखवली होती. मुलालाही मारले गेले आहे अशा केसेस कोकणात देखील पुष्कळ मिळाल्या असत्या. (तो आमीर पक्का भारतभरात गेला पण कोकणात नाही आला! ;) )
सदर अमीर महाशयांचे लक्ष लव्ह जिहाद या संकल्पनेकडे गेले नाही काय? गेले असेल तर ते तितके सिरीयस वाटले नाही काय? जर खरोखर त्यांचे विचार समतोल असतील तर याविरुद्ध आवाज उठवासा वाटला नाही का? का हिंमत नाही तेव्हढी?

अविनाशकुलकर्णी's picture

10 May 2012 - 5:17 pm | अविनाशकुलकर्णी

आधी दुसर्यांच्या पोरींना पळवून, त्यांच्या अपरिपक्व वयाचा आणि अर्धवट कायद्याचा फा...यदा घेवून
त्यांच्याशी लफडी करून त्यांच्या आईबापाला फसवून लग्न करायचे. नंतर तिला सोडून द्यायचे.
आणि वर स्त्री भरून हत्या थांबवा यावर कार्यक्रम करून लोकांच्यात प्रसिध्धी मिळवायची.

अरे हराम खोरा ज्या पोरीला पळवून लग्न केलेस तिच्या आई बापाला काय वाटले असेल ? त्यांना
विचारले कि तुम्हाला मुल होईल..तुमचा choice ..तर ते मुलगी होऊ देतील..?

भिक्कार्ड्यांनो , आधी ज्यांच्या ज्यांच्या मुली अशी लफडी करून लग्न करून पळाल्या त्यांच्या आई
बापांना विचारा काय वाटते ते..त्यांच्यावर एक programme घ्या आधी..See More
By: मंदार संत

अविनाशकुलकर्णी's picture

10 May 2012 - 8:12 pm | अविनाशकुलकर्णी

..

अविनाशकुलकर्णी's picture

10 May 2012 - 5:19 pm | अविनाशकुलकर्णी

आमीर खान हा सुप्रसिद्ध नट आहे म्हणून त्याचा कार्यक्रम इतक्या मोठ्या प्रमाणार चर्चिला जाणे साहजिकच आहे. त्याच्या आयुष्यात घेतलेल्या घटस्फोटाचा उल्लेख मला तरी पटला नाही. छापून येणार्‍या बातम्यांवर किती विश्वास ठेवायचा? कशावरून त्याची पहिली बायको त्याला त्रास देत नसेल? "पूर्व पत्नी और बच्चोंके दर्दनाक अनुभव" असा उल्लेख करण्यासाठी आपल्याकडे काही ठोस पुरावा आहे काय? चांगली घरघशीत भरपाई घेतल्याशिवाय ती बरी घटस्फोट देईल (आणि का द्यावा?). आमीर खान शिवाय इतर कोणत्याही व्यक्तीचा घटस्फोट झालाच नाहिये का जगात? हजारो लोकांचा घटस्फोट होतो. काहींची चूक असते तर काहींना दुर्दैवाने नुसतेच दु:ख पदरी येते. ते लोकही आयुष्यात उभे राहतात, पुढे कर्तबगार बनतात. मग बाकीच्या लोकांनी सतत भूतकाळच आठवत का रहायचा?

सोत्रि's picture

10 May 2012 - 8:52 pm | सोत्रि

प्रसिद्ध व्यक्ति जेव्हा असे काही मोठ्याप्रमाणावर कार्यक्रम हाती घेतात तेव्हा त्यांच्यावर राळ उडणे सहाजिकच आहे. जसे त्याच्या बाजूने बोलणारे आहेत तसेच त्याच्या विरोधात बोलणारेही असणारच. त्याच्या प्रसिद्ध असण्यामुळे वैकक्तिक पातळीवर असणारी टीका, ही जरी बोचरी असली तरी, ती होणारच हे गृहीत धरलेच पाहिजे. त्यानेही ते गृहीत धरले असणारच. शेवटी 'व्यक्ती तितक्या प्रवृत्ती'.

पण आमिरला 'हाथी चले बजार, कुत्ते भौके हजार' ही म्हण माहिती असावीच :)

- (हाथी) सोकाजी

अवांतरः दुसर्‍यांची मते अशी इथे डकवणे हे पटले नाहीच.

+१

त्याच्या पर्सनल लाईफचा इथे काय संबंध? आपल्याला काय माहीती की नक्की कशामुळे घटस्फोट झाला ते? लोकांना एक काड्या सारायची फार हौस असते..

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Jul 2012 - 8:57 pm | llपुण्याचे पेशवेll

सहमत आहे. जे उपदेशपांडे बनून फिरत असतात त्यांचे स्वतःचे चारित्र्यही तितकेच परीक्षणीय का नसावे . :)

श्री. अविनाशकुलकर्णी यांनी जे काही वर कदाचीत मिपासदस्य नसलेल्या व्यक्तींचे बाहेरचे प्रतिसाद चिकटवले आहेत, ते चिकटवणेच पटले नाही, अमान्य आहे. कारण मग असे कोणिही, कुठल्याही विषयावर बाहेरून कुणाच्याही इमेल्स, फेसबुक पोस्टींग, वृत्तपत्रातील प्रतिसाद, ट्वीट्स, ब्लॉग पोस्टींग मधले तोडलेले तारे येथे चिकटवत बसू शकतात.

अविनाशकुलकर्णी यांनी स्वतःचे विचार येथे मांडले तर ते योग्य ठरेल.

रेवती's picture

10 May 2012 - 8:20 pm | रेवती

सहमत. हेच लिहिण्यास आले होते.
ज्यांचे प्रतिसाद येथे दिलेत ते मिपाचे सदस्य आहेत काय?

अविनाशकुलकर्णी's picture

10 May 2012 - 9:41 pm | अविनाशकुलकर्णी

ज्यांचे प्रतिसाद येथे दिलेत ते मिपाचे सदस्य आहेत काय?
......................................
नाहि....
फेबु व इतर समुहावर पण चर्चा चालु आहे या विषयाची..
त्या प्रतिक्रिया दिल्या आहेत..
नसेल नियमात बसत तर जे मोदरेतर्स ना वाटते ते करावे.......
केजरीवाल नपण महत्वाचा विषय हाताळत आहे..त्याच्या वर पण वैयक्तिकटिका होतेच..
आणी त्याच्या घटफोटाचे काय ..३ वेळा तलाक म्हटले संपले.
पुन्हा ४ लग्ने करायला कायद्याने व धर्माने मोकळीक आहेच..
वर स्त्रीयांचा कळवळा घेऊन प्रष्ण मांडायला तयार.

अर्धवटराव's picture

10 May 2012 - 10:38 pm | अर्धवटराव

>>आणी त्याच्या घटफोटाचे काय ..३ वेळा तलाक म्हटले संपले.
-- दुसर्‍या कोणि ते कोर्टात जाउन २ महिन्यात केले असते हाच काय तो फरक. पण ज्याला धटस्फोट घ्यायचा तो या ना त्या मार्गाने घेईलच.
>>पुन्हा ४ लग्ने करायला कायद्याने व धर्माने मोकळीक आहेच..
-- इतर लोक लग्न न करताच एकत्र राहुन मोकळीक साधतात... त्यात काय विशेष? नक्की आक्षेप कश्यावर आहे?
>>वर स्त्रीयांचा कळवळा घेऊन प्रष्ण मांडायला तयार.
-- घटस्फोटीतांना इतर स्त्रीयांचा कळवळा येऊ नये हा काय नियम ?

अर्धवटराव

विकास's picture

10 May 2012 - 11:27 pm | विकास

अर्धवटरावांशी पूर्ण सहमत. :-)

सर्वप्रथम आमिरखान ने का लग्न केले, नंतर का घटस्फोट घेतला आणि परत लग्न केले ह्या बाबतीत मी त्याचा वैयक्तिक मामला आहे असे वाटते. तेच मला इतर कुणाबद्दलही वाटते.

अर्थात तरी देखील म्हणेन की जर तो "घट्स्फोट घेऊ नका" म्हणत इतरांना उपदेश करू लागला तर ढोंगी ठरेल. त्याने घटस्फोट घेतला असला तरी आधीच्या बायकोस काही मारहाण करून, हुंडा देण्यावरून काही तुटल्याचे ऐकीवात तरी नाही...

पुन्हा ४ लग्ने करायला कायद्याने व धर्माने मोकळीक आहेच..

त्याचा येथे काय संबंध ? समान नागरी कायदा असावा असे मला देखील वाटते, पण तो वेगळा मुद्दा आहे.

तरी देखील लाकूडतोड्यावरून तयार केलेली एक मजेशीर गोष्ट अवांतर म्हणून सांगतो.

प्रामाणिकपणा बद्दल सोने-चांदी आणि स्वतःची लोखंडाची कुर्‍हाड देवाने बक्षिस दिल्यावर खुष झालेला लाकूडतोड्या दुसर्‍या दिवशी देव कुठं भेटला हे दाखवायला बायकोला घेऊन जातो. बायको विहीराच्या काठावरून नवरा कसा लाकड तोडतोय हे बघत असताना तोल जाऊन विहीरत पडते. देवभक्त लाकूडतोड्या लगेच देवचा धावा करतो... देव आल्यावर सगळे सांगून बायकोस वाचव म्हणून प्रार्थना करतो. देव लगेच विहीरीत उडी मारतो आणि येताना स्वर्गीय सुंदरी असलेल्या अप्सरेस घेऊन येतो आणि विचारतो, "हीच का तुझी बायको?" लाकूडतोड्या म्हणतो, "हो हीच माझी बायको!" देव चिडतो आणि म्हणतो, "खोटे बोलतोस, तुला हाव झाली आहे!" , गरीब बिचारा लाकूडतोड्या म्हणतो की, "तसे नाही रे देवा, उगाच परत तू तीन तीन बायका वर काढून माझा प्रामाणिकपणा बघणार आणि त्या सगळ्याजणींना मला बक्षिस म्हणून देणार... इतक्यांना सांभाळणे कसे मला परवडणार?" ;)

अविनाशकुलकर्णी's picture

10 May 2012 - 10:15 pm | अविनाशकुलकर्णी
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 May 2012 - 8:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काका, दुव्याबद्दल आभार. आमिरखानच्या व्यक्तिगत जीवनाची चर्चा सामाजिक समस्यांवरील या मालिकेच्या निमित्ताने होणारच आहे. माणूस म्हणून आदर्श जीवन जगत असलेल्या माणसानेच अशा कार्यक्रमाचं अँकरींग केले पाहिजे अशी अपेक्षा ठेवू शकतो, पण तसे शक्य नाही. शक्य झाले तरी असे कार्यक्रम कोणी पाहणार नाही, पाहिले तरी फारसा प्रेक्षकवर्ग लाभेलच याची काही शाश्वती नाही. कार्यक्रमावर वेगवेगळ्या अंगाने टीका पुढे होणारच आहेत. कार्यक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत जावा, लोकांना सामाजिक प्रश्नासंबंधी जागरुकता यावी आणि मालिकेच्या निमित्तान काही व्यावसायिक गणितं या कार्यक्रमामागे असतील तर तीही यशस्वी व्हावी, हा भाग यात आहेच.

पहिल्याच भागानंतर आमिरखानने राजस्थानच्या मूख्यमंत्र्यांची भेट घेऊन स्टींग ऑपरेशन मधे सापडलेल्या डॉक्टरांवर कार्यवाहीसाठी काय केले पाहिजे अशी चर्चा केलीच आहे. जलदगती न्यायालयापुढे सदरील प्रकरणे घेऊन जाता येतील काय याबद्दल एक समाधानकारक चर्चा झाल्याचे विविध वाहिन्यांवरील बातम्यांमधून दिसले आहे. कार्यवाही होईल अथवा न होईल. अन्य कोणी सामाजिक चळवळींनी असे आंदोलन करुन मुख्यमंत्र्याचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असता तर त्यांना मुख्यमंत्र्यांनी शासकीय पातळीवरील उत्तरे देऊन तोंडाला पाने पुसली असती, स्टार कलाकार आणि कार्यक्रमाला मिळालेल्या प्रसिद्धी, लोकभावना यामुळे मुख्यमंत्र्यांना सदरील प्रकरण जलदगती न्यायालयापुढे घेऊन जावे वाटले, हेच मला पहिल्या भागाचे यश वाटते.

मागे प्रतिसादात म्हटल्या प्रमाणे कार्यक्रमाचा एकच भाग आत्ता संपतोय. अजून बरेच भाग येणार आहेत तेव्हा पडद्यासमोरील आणि पडद्यामागच्या अनेक गोष्टी समोर येणार आहेत. तो पर्यंत कार्यक्रमाच्या निमित्तानं आपली मतं एकमेकांना पटोत अथवा न पटो प्रतिसादांच्या निमित्तानं सोत्रींच्या धाग्याला आपण मात्र हलते ठेवू.....!

जाता जाता : राखी सावंत म्हणाल्याच आहेत ही तर माझ्याच कार्यक्रमाची कॉपी आहे. :)

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 May 2012 - 12:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लहान मुलांचे लैंगिक शोषणावरील दुसरा भागही चांगला झाला. लहान मुलांच्या शरिराशी खेळणार्‍या विकृतांपासून घ्यावयाची काळजी, असा संदेश देणारा हा भाग.

दोनच दिवसापूर्वी कायद्याच्या बाबतीत राज्यसभेने विधेयक मंजूर केले. [बातमी मटा ]विधेयक मंजूर व्हावे यासाठी लोकांना आवाहन करण्यात आले. अर्थात कार्यक्रमाचे रेकॉर्डींग अगोदर झालेले असले तरी अद्यावत माहिती कार्यक्रम निर्मात्याने ठेवले पाहिजे असे वाटले.

पहिला भाग आणि आजच्या भागाची तुलना केली तर पहिला भाग आजच्या भागापेक्षा उजवावाटला. अर्थात आजचा भाग कोणाला उजवा वाटू शकतो. काय म्हणता ?

-दिलीप बिरुटे

दादा कोंडके's picture

13 May 2012 - 3:22 pm | दादा कोंडके

असहमत!

हा भाग सुद्धा तितकाच सुंदर होता.

हे विषय ऐकून असं वाटलं होतं की काहितरी माहित असलेलंच सांगून मशी विडिओज, मुलाखती सांगून लोकांना रडवतील. पण काही माहिती आणि निष्कर्श धक्कादायक होते आणि काहितरी उपाय सुचवला जातोय. जसं की मगच्या भागात स्त्री भृणहत्येची सुरवात कशी झाली किंवा मेडीकल कौंसीलनी अजून एकाही डॉक्टरचं सर्टीफिकेट रद्द केलं नाहिये. वर्षानुवर्षे रोजचं वर्तमान पत्र वाचून निगरगट्ट झालेल्या माणसाला देखिल याचं आश्चर्य वाटेल. :) तसंच या केसेस मध्ये ५३% टक्के मुलं असतात किंवा आपल्या कडे अजून पर्यंत कोणताही या संदर्भात कायदा नाहिये असं कळल्यावर वाईट वाटलं.

शेवटचं वर्कशॉप पण छान होतं. मध्ये "रिस्पेक्ट एल्डर्स" वगैरे संस्कारावर केलेली टिपणी सुद्धा मस्तच!

हॅट्स ऑफ टू यू अमिर खान!

माफ करा, पण तुम्ही आणि इतरांनी जोडलेला बादरायण संबंध पटला नाही.. आमीरने पहील्या पत्नीला, जिच्याशी त्याचा प्रेमविवाह झाला होता, तिला घटस्फोट दिला ही गोष्ट मान्य.. पण त्याचा त्याच्या कार्यक्रमाशी काय संबंध?

वर विकास बोललेयत त्याप्रमाणे, "अर्थात तरी देखील म्हणेन की जर तो "घट्स्फोट घेऊ नका" म्हणत इतरांना उपदेश करू लागला तर ढोंगी ठरेल. त्याने घटस्फोट घेतला असला तरी आधीच्या बायकोस काही मारहाण करून, हुंडा देण्यावरून काही तुटल्याचे ऐकीवात तरी नाही..." त्याच्या बायकोला किती पोटगी मिळालीय, ती पुरेशी आहे का त्या, प्रथमपत्नी आणि मुलांची जबाबदारी तो निभावतोय की नाही, हे माहीत नसतांना त्यावर उगाच टिप्पणी का करावी? आणि नुसत्या चित्रपटसृष्टीत पहील्या पत्नीला घटस्फोट देऊन दुसरे लग्न करणार्‍यांची यादी लै लांबलचक आहे.. की बोनी कपुरशी लग्न केलं म्हणून आज श्रीदेवीने कार्यक्रमात येणंही आक्षेपार्ह आहे?

आमीरने वैयक्तिक आयुष्यात काय केलंय, ह्यापेक्षा तो कुठले सामाजिक प्रश्न उजेडात आणतो हे माझ्यासाठी महत्वाचे आहे. "तारें जमीं पर" नंतर जास्त जागरुक झालेले पालक माहितीत आहेत. त्यामागची व्यावसायीक गणितांशी आपल्याला घेणं-देणं नाही..

आजचा कार्यक्रमही अगदी अंगावर येणारा होता.. "बाल-लैंगिक उत्पीडन" ह्या बाबतीत आपण आणि आपला समाज किती अज्ञानी आणि उदासीन आहे, हेपण ह्या कार्यक्रमातून कळले. मागच्या भागातले स्त्री-भृण-हत्येचा प्रकार जर जीवन नाकारणारा होता, तर आजच्या कार्यक्रमातला विषय हा जीवनातला आनंद नासवणारा होता.. जरा त्या पिडीत स्त्री-पुरुषांच्या नजरेतून विचार करा, म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तिकडून असा त्रास / बलात्कार, तोही वर्षोनुवर्षे,भोगणे ह्यातील दुखः समजू शकेल कदाचित. मी पुढे चालून माझ्या मुला/मुलीला ह्या बाबतीत नक्की शिकवणार..

असो.. "सत्यमेव जयते" नंतर इनोची मागणी एवढी भरमसाठ वाढेल, असं वाटलं नव्हतं.. :D का इथेही आमीरने "व्यावसायिक गणिते" ध्यानात घेतली असतील ;-) ??

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

13 May 2012 - 8:55 pm | निनाद मुक्काम प...

लंडन मध्ये माझा मित्र राज जो तेथील स्टार दस्त चा युके मधील आवृत्तीचा संपादक होता. महाराष्ट्रीयन व दादरचा रहिवासी अत्यंत उमदा व आपल्या कामात तरबेज.

त्याने सर्वप्रथम आमीर चे युकेमधील प्रकरण शोधले व आपल्या व्यवसायाशी इमान राखत हे प्रकरण आपल्या मासिकात सचित्र छापले. पुढे ह्या मुळे आमीर चा भारतात घटस्फोट झाला.

सदर महिला काही बार्बी एवढी सुंदर किंवा आकर्षक नव्हती. पण आमीर आणि तिचे सुत जमले. माझ्या मित्र राज ला मी तेव्हा सुद्धा सांगितले की मी शन्ना नवरे ह्यांचा कळत नकळत सिनेमा पहिला आहे. किंबहुना म्हणून मी समजू शकतो कि विवाहित माणसांचा खाजगी आयुष्यात काही गोष्टी घडतात. जेव्हा आपण महापुरुषाचे पाय मातीचे असतात ह्या विधानांवर विश्वास ठेवतो. तेव्हा आमीर एक चांगला नट व संवेदनशील माणूस आहे. त्याच्या खाजगी आयुष्यात घडलेल्या गोष्ट जी माझ्या किंवा इतर कोणाच्याही आयुष्यात होऊ शकते. त्यामुळे त्यांचे सिनेमा कार्य किंवा भूमिका किंवा समाजातील कार्य दुर्लक्षित ठेवू शकत नाही.
त्याने सौरभ व नगमा प्रकरण सुद्धा बाहेर काढायचा प्रयत्न केला पण इतके यश मिळाले नाही. पण ही गोष्ट कालांतराने काही मासिकांमध्ये आली पण म्हणून काय दादावर प्रेम करणारे त्यांच्या पंख्यांवर काहीही परिणाम झाला नाही.
येथे मी माझ्या मित्राला दोष देत नाही. तो त्यांचे काम निष्ठेने करत होता.
नाण्याचा दोन बाजू असतात. प्रत्येक माणसाचा स्वतःचा एक दृष्टीकोन किंवा एक भूमिका असतात.

शिल्पा ब's picture

14 May 2012 - 4:59 am | शिल्पा ब

आताच दुसरा भाग पाहीला: त्याआधी सोत्रिंना धन्यवाद की हा धागा सुरु केला.

लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबद्दल एकच म्हणेन की " पालकांनी मुलांचा त्यांच्यवर जो विश्वास आहे तो कायम ठेवला तरच मुलांच्या बाबतीत काय चुकीचं चाल्लंय ते कळु शकतं". मुलांवर अविश्वास दाखवत राहीलं तर मुलं सांगण्यापेक्षा त्रास भोगत राहतील.

इथे चाललेली गंमत जास्त विंटरेस्टिंग वाटतेय. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 May 2012 - 8:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सत्यमेव जयतेच्या तिसर्‍या भागानंतर उत्सूकता आता रुटीन मालिकांसारखी व्हायला लागली आहे. आजच्या भागात 'लग्नात दिला जाणारा हुंडा' या विषयावर विविध स्त्रियांचे अनुभव बघायला मिळाले. अर्थात हा विषय फारसा नवा नव्हता. 'पकडा ब्याह' हा लग्नाचा प्रकार पाहून मात्र हहपुवा झाली. मारुन मुटकून घोड्यावर बसविणे म्हणतात त्याची आठवण झाली.

सत्यमेव जयतेला आता यानंतरच्या भागात वेश्याव्यवसाय आणि समाज किंवा असाच काहीतरी
''भडक ''विषय घ्यावा लागतो किंवा तसेच काही घेतलेले असेल, तसे झाले नाही तर सत्यमेव जयतेच्या कार्यक्रमाची आठवणही पब्लिकलाही राहणार नाही, असे वाटते.

अवांतर : आमिरखानच्या हावभावाबद्दल काही लिहू नये. उफ्फ, ओह, आणि प्रयत्न करुनही टीपूसभरही डोळ्यात न येणारं पाणी.

-दिलीप बिरुटे

शिल्पा ब's picture

21 May 2012 - 8:59 am | शिल्पा ब

एका तासात प्रत्यक्ष लोकांना बोलावुन त्यांचे अनुभव - चांगले अन वाईट दोन्ही दाखवत आहेत...प्रश्न अन संभाव्य उत्तर (जे दुसर्‍या कोणी करुन पाहीले आहे) ते दाखवत आहेत ते चांगलंच आहे..भडक सादरीकरण नाही हे आवडलं. आता विषय नवा नाही कारण इतक्या वर्षांनंतरही त्याच समस्या कायम आहेत...चुक आपली - समाजाचीच आहे...लोकांचे विचार बदलत आहे ही चांगली गोष्ट आहे. रोजच्या जीवनातील सबला स्त्रिया दाखवुन इतरांना प्रेरणा मिळत आहे...

समस्यांचे विषय भडक आहेत म्हणणं सोपं आहे...पण नाईलाज आहे.

सोत्रि's picture

21 May 2012 - 12:22 pm | सोत्रि

सहमत!
- (भडक) सोकाजी

क्लिंटन's picture

21 May 2012 - 9:15 pm | क्लिंटन

सत्यमेव जयतेच्या तिसर्‍या भागानंतर उत्सूकता आता रुटीन मालिकांसारखी व्हायला लागली आहे.

माझा आणि टिव्हीचा संबंध केवळ न्यूज बघण्यापुरता आणि मालिकांपासून मी शेकडो कोस दूर असतो. त्यामुळे ही मालिका रूटिन व्हायला लागली आहे की याची कल्पना नाही.सत्यमेव जयतेच्या पहिल्या भागाविषयी बरेच ऐकले आणि शेवटी तिसरा भाग पहिल्यांदाच बघितला.या मालिकेतून थोडे तरी परिवर्तन होऊन काही स्त्री-भ्रूणहत्या किंवा हुंडाबळी जरी टाळले गेले तरी ते मालिकेचे चांगले फलितच असेल. कोणत्याही कारणाने एखादी चांगली गोष्ट होत असेल तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे?

विकास's picture

21 May 2012 - 9:32 pm | विकास

कोणत्याही कारणाने एखादी चांगली गोष्ट होत असेल तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे?

हेच म्हणणे आहे....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 May 2012 - 10:02 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझा टीव्हीचा संबंध फक्त न्यूज चायनल्स एनजीसी डिसकव्हरी इतकाच मर्यादीत आहे. सुट्ट्या असल्यामुळे बालगोपाळांचा डान्स इंडिया डान्स चे ऑडिशन्सही अलिकडे पाहात होतो. या डान्स इंडिया डान्सच्या एक परिक्षक 'गीता मा' उर्फ गीता कपूर आहेत. (लैच मस्त आहेत दिसायला आणि बोलायलाही) कार्यक्रमात कधी कधी खूप गरीब मूलंही ऑडिशनला असतात तेव्हा ही मूलं कधी बूट पॉलीश करणारी असतात, कधी गवंडीच्या हाताखाली काम करणारी असतातं, कधी एखाद्या पित्याला मुलांनी असा डान्स वगैरे करणं आवडत नसतं त्या पेक्षा मुलाने कुठल्या रोजंदारीवर कामाला जाऊन पैसे मिळवावेत अशी अपेक्षा असते तेव्हा ही मुलं जेव्हा परिक्षकांशी बोलत असतात तेव्हा परीक्षक विशेषतः गीता मा अशा कुंटुंब कर्त्यांना आणि प्रेक्षकांना आवाहन करतात हे आवाहन प्रामाणिक, भावनिक आणि अगदी मनमोकळं असतं. लहान मुलांना कामावर पाठवू नका, उनका बचपना मत छीनो, वगैरे. तेव्हा या आणि अजून काही मालिका अधून-मधून सामाजिक प्रश्नांवर संदेश देतच असतात. प्रश्नांच स्वरुप अशा माध्यमातून कमी-जास्त प्रमाणात उमटतच असते म्हणून माझ्या दृष्टीने रुटीन मालिका.

आपला प्रश्न आहे की आक्षेप का ? मला इतकंच म्हणायचं आहे की सत्यमेव जयतेच्या कार्यक्रमाबद्दल संजय पवारच्या लेखातून बाजारमूल्याचा विचार अतिशय उत्तम मांडल्या गेला आहे. छोट्या पडद्याच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नावर चर्चा घडवून आणून परिवर्तन होत असतात का ? टीव्ही मालिका पाहून किंवा सामाजिक प्रश्वावरील चर्चेने सामाजिक प्रश्न सुटतात किंवा सुटले आहेत याचा काही विदा आहे का ? अन्य देशात असा एखाद्या कार्यक्रमाने असे काही क्रांतीकारक काही बदल घडवून आणले आहे काय ? एखादी पाऊलवाट तरी पडली आहे काय ? आणि सामाजिक प्रश्नावरचा हा काही पहिलाच कार्यक्रम आहे काय ? अशाने प्रश्न सूटत नसतात फार तर हळहळ च्च च्च करण्यापलिकडे काहीही होत नसते. असाह्य व्यक्ती आणि कोणाचेही दु:ख पाहिल्यानंतर माणूस आतून कळवळतो. कोणाच्याही दु:खाशी सहानूभूती निर्माण होत असते. अशा दु:खाचं सामाजिक प्रश्नाचं एक हायपो निर्माण करुन जे भांडवल केल्या जातंय यावर माझा मूख्य आक्षेप आहे.

जाता जाता : अरे हो, नांदा सौख्य भरो असा एका मराठी वाहिनीवर कार्यक्रम (कोणत्या वाहिनीवर ते विसरलो) आहे. एकदोन एपिसोड पाहिले आहेत. नवरा-बायको आणि नव-याची आई अशांना बोलावले जाते त्यांच्यातल्या मतभेदांवर चर्चा केली जाते कोण कुठे चुकले त्याची चर्चा होते आणि कार्यक्रमाच्या शेवटी प्रेक्षंकाच्या समोर त्यांचे मनोमिलन होते, गैरसमज दूर होतात. मला कधी कधी प्रश्न पडतो असे सार्वजनिकरित्या कौटुंबिक प्रश्वावर चर्चा करुन प्रश्न सूटत असतील की वाढत असतील.

-दिलीप बिरुटे

पॅरिस मधे अनेक भारतीय तरूण हे पाण्याच्या बाटल्या, भाजलेली कणसे, फळे वा आयफेल टॉवरच्या लहान प्रतिकृती वगैरे विकत रस्त्यावर उभे असतात. या लोकांशी बोलल्यावर कळते, की यातील बहुतांश पंजाब मधून आलेले असतात, आणि त्यांना इथवर पोहोचवण्यासाठी पंजाब मधील एजंटला दहा-पंधरा लाख रुपये द्यावे लागतात. हे पैसे तुम्ही कुठून आणले, असे विचारता सर्वांचे उत्तर "पापाने दिये" असे होते.
आमिरचा आजचा एपिसोड बघितल्यावर कळले, की "पापा" कुणाचे.

या तरुणांना किमान सहा वर्षे भारतात जाता येत नाही, कारण इथे आल्या आल्या त्यांनी स्वतःच पासपोर्ट नष्ट केलेला असतो, महिनाभर जेल मध्ये काढून, बाहेर आल्यावर फ्रान्स चे सरकार त्यांना एक फोटो कार्ड बनवून देते, त्या आधारे ते अशी छोटी छोटी कामे करत जगत असतात. सहा वर्षांनन्तर हजारो युरो खर्चून ते "पेपर्स" बनवण्यासाठी अर्ज करतात.
मी त्यांचेशी बोलत उभा राहिलो, तर ते अस्वस्थ चोरटेपणाने इकडे तिकडे बघत, नंतर लक्षात आले, की त्यांच्यावर लक्ष ठेवणारा माणूस दूर उभा असतो.
यातील अगदी तरूण असणारे उत्साही, आनंदी वाटले, तर चाळीशीत आलेले उदास-हताश. पॅरिस मध्ये ते एका खोलीत सात-आठ-दहा जण रहात असतात. त्यांना उघड्यावर जेवणाचे वेळी अल्प किमतीत राजमा-चावल वा छोले -कुलचे पोहोचवणे, हाही धंदा काहीजण करत असतात.
यातील काही दरमहा साठ-सत्तर हजार रुपये भारतात पाठवतात, आणि त्यांचे वडील त्यांच्या खेडेगावात अलिशान घरे बांधतात. तिकडे म्हणे गावा-गावात अश्या भव्य हवेल्या झाल्या आहेत. त्या बघून इतर सर्व तरुणांना वाटते, की आपणही परदेशी जावे. (हवेल्या बघून अश्या घरात मुली द्यायला वधुपितेही उत्सुक असणार)
आमिरच्या हुंड्यावरील आजच्या एपिसोड मधे सरदारजीने सांगितलेल्या तीस हजार विवाहित तरुणींचे नवरे, ते असलेच तरुण असणार, असे वाटले. (त्या तरुणींचे नवरे पुन्हा घरी परतणार नाहीत, हे उघडच आहे)
आमिरचा हा कार्यक्रम, तो हाताळत असलेल्या समस्यांची ज्यांना प्रत्यक्ष झळ लागलेली नाही, अश्या प्रेक्षकांना जरी धंदेवाइक, वा नावे ठेवण्यासारखा वाटत असला, तरी झळ लागलेल्यांसाठी अत्यंत महत्वाचा ठरत असणार ...
सत्यमेव जयते....

हा कार्यक्रम मी यावेळी बघितला आणि फारसा धक्का बसला नाही. वाईट सगळ्यांना जेवढे वाटले तेवढेच वाटले असावे.;)
वडील त्यांच्या खेडेगावात अलिशान घरे बांधतात
अगदी अगदी.
माझे नातेवाईक पंजाबात गेली दहा पंध्रा वर्षे रहात असल्याने अगदी हीच आणि आणखी भयानक माहिती काहीवर्षांपूर्वी कळली होती. ज्यांना झळ लागली त्यांच्यासाठी कार्यक्रम महत्वाचा वाटणारच. सहमत.

नगरीनिरंजन's picture

21 May 2012 - 2:05 pm | नगरीनिरंजन

काल लोकसत्ताच्या लोकरंग मध्ये संजय पवार यांचा हा एक अत्यंत समर्पक लेख आला आहे आणि त्याच्याशी मी सहमत आहे.

बाकी चालू द्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 May 2012 - 3:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्वा लेख आवडला. सालं आम्ही इतकं बोंब मारुन म्हणत होतो की सामाजिक विषयामागे आर्थिक गणितंच दडलेली असतात तर पब्लिक आम्हालाच वेड्यात काढायला निघालं होतं. च्यायला, लेख वाचून खूप खूप आनंद झाला.

नगरीनिरंजन शेठ, लेखाचा दुवा दिल्याबद्दल आभार.... !!!

-दिलीप बिरुटे
(लेख वाचून आनंद कुठे ठेऊ नी कुठे नै असा झालेला)

त्या लेखात असहमत असण्यासारखं काहीच नाहिये.
अनेक वर्षांपूर्वी झालेले परिक्रमा, रजनी (मी दोन्ही पाहिलेले नाहीत) यानंतर काळ किती बदलला. समाजाची विचारसरणी बदलली. पूर्वी एका कार्यक्रमातून (कदाचित) साध्य होणारी गोष्ट आता वाजत, गाजत, अश्रुपात दाखवून, शॉक देऊन आणि अनेकदा 'दिखावा' केल्यानेच पब्लिकला समजत असेल तर याचा व्यवसाय करून का होईना ती लोकांपर्यंत पोचवणे आलेच. समाजाच्या (मीही त्यात आलेच) इन्सेन्सिटीव्हिटीच्या प्रमाणात कार्यक्रमाचे सादरीकरणही बदलेल शिवाय त्याची किंमत आपण सगळेजण या ना त्या मार्गाने मोजत राहणार. पूर्वी देवळाच्या ओवरीत, राहत्या वाड्यात, लहान कार्यालयात होणारे लग्नसमारंभ आता तसे किती होतात? तसे ते साजरे केल्यास कितीजणाना रुचेल? उद्या मी कर्यक्रम सादर करायला गेले तर दुनिया राहू दे तुम्हीही तो बघायला टिव्ही चालू करणार नाही ;). आमीर तर आमीर, त्यामुळे का होईना कार्यक्रम पाहिला जातोय, चर्चा केली जातीये. त्या 'सेलेबल' अ‍ॅक्टरची किंमत जर काही कोटी असेल तर ती मोजणे भाग आहे. दोनचार मुलींच्या पालकांनीही जर धडा घेतला तर तेवढे जीव वाचले, कुटुंबावर कायमस्वरूपी होणारा वाईट परिणाम थांबला असे म्हणावे लागेल. वडीलांनी कर्जामुळे आत्महत्या केलेल्या मुलीची एक्सप्रेशन्स तर सगळ्या सासुरवाशिणींची कथाच सांगून गेली. किती गोड मुलगी होती ती.

कार्यक्रमात दाखवलेला 'पकडवा ब्याह' की असेच नाव असलेला प्रकार मात्र वाईट आहे. त्यावेळी हसू आले पण नवर्‍यामुलांसाठी धोकादायक असलेले प्रकरण आहे. हुंडा, लग्नाचा खर्च परवडत नाही म्हणून असे प्रकार भविष्यात वाढले तर मात्र मुलांची खैर नाही. ;)

नगरीनिरंजन's picture

22 May 2012 - 9:56 am | नगरीनिरंजन

पूर्वी एका कार्यक्रमातून (कदाचित) साध्य होणारी गोष्ट आता वाजत, गाजत, अश्रुपात दाखवून, शॉक देऊन आणि अनेकदा 'दिखावा' केल्यानेच पब्लिकला समजत असेल तर याचा व्यवसाय करून का होईना ती लोकांपर्यंत पोचवणे आलेच.

म्हणजे लोकांची संवेदनशीलता वाढली की कमी झाली?
आज वाजत-गाजत, डोळ्यातून पाणी आणून लोकांना जाणीव होतेय असं मानलं तर उद्या काय करावं लागेल?
म्हणजे या कार्यक्रमाने अवेअरनेस वाढतोय वगैरे सगळी बकवास आहे, उलट लोकांना त्याचं काही वाटेनासं होतं किंवा काही वाटण्यासाठी खूप ड्रामेबाजी करावी लागते.
अवेअरनेस असता तर स्त्रीभ्रूणहत्या हा शब्द चुकीचा असून स्त्रीलिंगीगर्भपात असा शब्द वापरावा असे याविरुद्ध लढणारे कार्यकर्तेच कळकळीने सांगत असतात हे लोकांना कळले असते. पण लक्षात कोण घेतो? स्त्रीलिंगीगर्भपात करणे ही जर भ्रूणहत्या आहे तर इतर कोणताही गर्भपात हीसुद्धा भ्रूणहत्याच आहे.
मध्यंतरी एक लेख वाचला होता लोकप्रभामध्ये. कोकणात काम करणार्‍या एका डॉक्टरांनी लिहिला होता. त्यात अगदी साधे मुद्दे मांडले होते. सामान्यतः नको असलेला गर्भ काढून टाकण्याचा निर्णय पहिल्या तीन महिन्यातच घेतला जातो. गर्भाचे लिंग चौथ्यामहिन्यानंतरच कळते. त्यामुळे स्त्रीलिंगीगर्भपात नेहमी उशीरा केले जातात असे त्या लेखात म्हटले होते.असे उशीरा केलेले गर्भपात ओळखण्यासाठी अत्याधुनिक वगैरे तंत्रज्ञानाची गरज नाहीय. फक्त इच्छाशक्तीची गरज आहे.
पण मुळात ते करून घेणारे लोक चांगले शिकलेले आणि चांगल्या उत्पन्न गटातले असल्याने अशी इच्छाशक्ती निर्माणच होत नाही. हे असले कार्यक्रम पाहून या शिकलेल्या, श्रीमंत वगैरे लोकांचे मतपरिवर्तन होईल हा फारच भाबडा आशावाद आहे. उदाहरणार्थ तंत्रज्ञानाचा अतिवापर चांगला नाही, इंटरनेट व गेमिंगचा मुलांवर वाईट प्रभाव पडतो हे अनेक माध्यमांतून सांगितले जात असूनही कितीतरी सुशिक्षित मंडळी आजकालच्या स्पर्धेच्या जगात आवश्यक आहे म्हणून पोरांना अकाली कॉम्प्युटर आणि गेम्स आणून देतच असतात. तसंच हे.
म्हणजे या शो ने फायदा तर काही होत नाही फक्त सामाजिक प्रश्नाबद्दल आपण जागरुक झाल्याचं लोकांना समाधान मिळतं जे एकप्रकारे मनोरंजनच आहे.
शिवाय आता समाज जागृत झाला आहे वगैरे समज होऊन प्रश्न त्यामुळे कमी झाला असेल अशी परस्पर सोयीस्कर समजूत केली जाऊन लवकरच लोक त्या प्रश्नाला विसरून जातात.
प्रश्नाचं निर्मूलन करण्यासाठी काय केलं पाहिजे हे लोकांना सांगितलंही जात नाही कारण करमणुकीत त्याची गरज नसते. मग नुसते सांगण्यासाठी किस्से उरतात, आमच्या लांबच्या नातेवाईकाने एका मुलीनंतर गर्भपात करून घेतला वगैरे गोष्टी कोणत्याही कृतीशिवाय चघळल्या जातात.
सर्वात वाईट म्हणजे काही लोकांची तर आपल्यासारखे बरेच लोक आहेत असे वाटायला लागून अपराधीपणाची भावनाच नष्ट होते.
आमीरखानला काय, तो आधीच दुसर्‍या प्रोजेक्टच्या मागे लागलाही असेल.

शिल्पा ब's picture

22 May 2012 - 10:13 am | शिल्पा ब

तुम्ही खुपच निगेटीव्ह विचार करत आहात असं वाटतंय.

नगरीनिरंजन's picture

22 May 2012 - 10:17 am | नगरीनिरंजन

कोणाच्या तुलनेत?
वास्तवाच्या तुलनेत ते निगेटीव्ह असेल तर चांगलं होईल.
बाकी, आजवर झालेल्या भागांमधला कोणता प्रश्न तुम्हाला माहित नव्हता?

शिल्पा ब's picture

22 May 2012 - 10:27 am | शिल्पा ब

वरती मी एका प्रतिक्रियेत लिहिलंय सविस्तर पण तरी...
या कार्यक्रमात आपल्यासारखेच सामान्य लोकं येउन त्यांच्या कथा सांगतात, त्यांनी काय केलं ते सांगतात, प्रश्नाचं उत्तर काय असु शकतं हे उदा. देउन दाखवतात - जे की सामान्य लोकांपैकीच कोणीतरी केलं असेल..वाईट काय ते समजलं नाही. आमीर खान अँकर असल्याने जास्त प्रसिद्धी मिळतेय ही एक गोष्ट.

अन प्रश्न माहीत आहे याचा अर्थ गंभीरता माहीती असेलच असं नाही. एका बाईचे तिला न सांगता प्रत्येकवेळी एक इंजेक्शन देउन ६ गर्भपात करवले गेले असं मी कल्पनेतही आणलं नसतं...लोकांची मानसिकता कुठे पोहोचलीये!!

दुसरा एपिसोड खास महत्वाचा वाटला.. असो. तुम्हाला पटलं तर पहा नाहीतर त्या डेली सोप पेक्षा वेगळं काहीतरी म्हणुन हवं तर पहा...नाहीतर नका पाहु.

तुम्हाला नेमकं काय अपेक्षित होतं?

नगरीनिरंजन's picture

22 May 2012 - 11:21 am | नगरीनिरंजन

तुम्हाला नेमकं काय अपेक्षित होतं?

जाहिराती पाहूनच दर वेळी एका प्रश्नावर काथ्याकूट असणार हे माहित होतं. त्यामुळे अनपेक्षित असे कार्यक्रमात काही वाटले नाही. बालकामगार वगैरे प्रश्नही येतीलच पुढे. आमीरखानच्या मार्केटिंग तंत्राबद्दल कौतुकही वाटले. कारण या असल्या विषयांवरचे 'मातृभूमी', 'स्टॅनली का डब्बा' सारखे चित्रपट साफ आपटतात.
सगळंच अपेक्षित असल्याप्रमाणेच असल्याने अपेक्षाभंग झालेला नाही आणि दर काही वर्षांनी आणखी भडक कार्यक्रम येत जाणार हेही अपेक्षित आहे.

आनंदी गोपाळ's picture

19 Jun 2012 - 9:53 pm | आनंदी गोपाळ

तुमच्या वरिजिनल प्रतिसादाशी सहमत! @ नगरीनिरंजन.

नगरीनिरंजन's picture

5 Jul 2012 - 12:51 pm | नगरीनिरंजन

डॉ. मिलिंद कुलकर्णींचा लोकप्रभामध्ये आलेला हा लेख नक्की वाचा.

लोकांची संवेदनशीलता वाढली की कमी झाली?
संवेदनशीलता कमी झालिये म्हणूनच तर असले प्रकार घडतायत.
तशी ती कमी झालिये म्हणून मग काही बोलायचे, सांगायचेच नाही का?
हुंडाबळी कार्यक्रमाकडून मलाही फारश्या अपेक्षा नाहीत पण तो पाहिल्यावर ज्यांच्या मुलींची लग्ने ठरलेली आहेत, ठरण्याच्या मार्गावर आहेत, याच परिस्थितीतून जात आहेत त्यांच्यापैकी काही जणांनी भावनेच्या भरात जरी चांगले पाऊल उचलले तर तो फायदा मानावा लागेल. आता चार घरच्या मुलींच्या फायद्यासाठी काही कोटी ही किंमत जास्त नाही काय? तर नक्कीच आपण सगळेजण सगळ्या गोष्टींची भरपूर किंमत मोजतच आहोत. कार्यक्रम करून किंवा न करूनही. माझ्या मुलाच्या लग्नाच्यावेळी कदाचित मी याचा विचार जास्त करू शकीन्........आत्ता 'गरज' नाही म्हणून तो खूप सिरियसली होणार नाही हे मान्य. पण खेड्यापाड्यातल्या मुलींना फसवून, पैसे घेऊन परदेशी पळून गेलेल्या नवर्‍यांना पकडण्यासाठी पासपोर्ट ऑफीसची मदत होते हे आणखी बरेच जणांना समजले असेल असे मानते.
कोणताही गर्भपात हीसुद्धा भ्रूणहत्याच आहे
अगदी हेच म्हणणे आहे. मुलींचा गर्भ काढून टाकला तर डोळ्यात पाणी आणि मुलाचा काढला तर का नाही? याच धाग्यावर मागे किंवा कुठेतरी माझे मत मी नोंदवले होते की मुलगी हवी असणार्‍यांकडे आश्चर्यमिश्रीत कौतुकाने पाहिले जाते तर "आता मुलगा हवा" असे चांगल्या भावनेने व्यक्त झाले तरी गुन्हेगारासारखी अवस्था येते. कोणतीही भ्रूणहत्या नकोच!
इलेक्ट्रॉनिक गेम्सबाबतीत सहमत.
या शो ने फायदा आपल्याला होत नाहिये असे आत्ता वाटत आहे कारण आपण असे वाईट काही करत नाही म्हणून. ज्यांना व्हायचाय त्यांना झालाय (भावनेच्या भरात तात्पुरता का होईना). ज्यांच्या घरातल्यांची मनस्थिती एखाद्या अशाप्रकारच्या फटक्याने खालावलेली (त्यावेळी साध्या साध्या गोष्टी सुचत नाहीत, अगदी समोर असल्या तरी) आहे त्यांना निदान आशेचा किरण तरी दिसला असेल. यातून सपोर्ट गृप्स निर्माण झालेले मी पाहिले, अनुभवले आहेत, भारतात.
आमीरखानने पुढचा सिनेमा दणदणीत मानधनासह स्विकारला असण्याची शक्यता जास्त, आणि का नाही?;)
(चांगल्या रितीने) पैसे मिळवण्यात गैर ते काय?

अर्धवटराव's picture

22 May 2012 - 1:40 am | अर्धवटराव

अजीबात नाहि पटला. जे लोक प्रामणिकपणे प्रयत्न करताहेत त्यांना आमीरच्या शो मुळे काहि नुकसान होणार नाहि, झाला तर फायदाच होईल.
समाजसेवेवर मनोरंजन कब्जा करेल काय या भितीऐवजी मनोरंजनावर समाजसेवेचं कलम चढलय हे ध्यानात घ्यायला हवं. टीव्ही माध्यमाची मुळ जबाबदारी मनोरंजनच आहे. या मनोरंजनाच्या खिडकितुन जर सामाजीक सत्याला वाचा फोडायला स्कोप मिळत असेल तर ते स्वागतार्हच म्हणावं लागेल. एवीतेवी आमीरखान वगैरे मंडळी लोकांच्या मनावर मनोरंजनाच्या माध्यमातुनच कब्जा करताहेत... तर त्यांच्या डोक्यावर समाजसेवेची टोपी चढवुन लोकांच्या मनात सामाजीक प्रश्नांना चंचुप्रवेश मिळत असेल तर काय वाईट??

अर्धवटराव

चित्रगुप्त's picture

22 May 2012 - 9:18 am | चित्रगुप्त

......समाजसेवेवर मनोरंजन कब्जा करेल काय या भितीऐवजी मनोरंजनावर समाजसेवेचं कलम चढलय हे ध्यानात घ्यायला हवं.....

अर्धवटराव यांचेशी सहमत.... थोडी अवांतर गंमतः कुणाला हा शो बंद पाडायचा असेल तर एक कल्पना:

हुंड्यावरील शोमध्ये रडणार्‍या, पीडित महिला या हिंदु, पंजाबातील तीस हजार पीडित तरुणी हिंदु, याउलट शो मध्ये शामिल मुसुलमान महिला बुरख्यात असूनही (किंबहुना त्यांचे मुस्लिमत्व अधोरेखित करण्यापुरताच बुरख्यांचा वापर)चेहरा न झाकलेल्या, स्मार्ट, हसर्‍या... बर्‍हाणपुर मधील मुस्लिम समाजाचे पुरोगामित्व, आमिरला "आप कुर्बानी दे रहे हो" वगैरे भाव देणे, (एका एपिसोड चे तीन कोटी रुपये घेण्यात "कुर्बानी" कसली, हे त्या सर्वशक्तिमान परवरदिगारलाच ठाउक)....
..........ही कल्पना योग्य त्या गोटात पसरवणे...

मृगनयनी's picture

22 May 2012 - 11:24 am | मृगनयनी

छान छान!!.. लेख आवडेश!.....

ही १०० वी प्रतिक्रिया!!!!! अभिनन्दन!!! :)

सोत्रि's picture

27 May 2012 - 12:35 pm | सोत्रि

आजचा भाग वैद्यकिय क्षेत्रातल्या नैतिकतेवर होता.
आजच्या भागात अतिशय उपयुक्त माहिती समोर आली आहे.

डॉ. समीत ह्यांनी 'जनरीक मेडीसिन' नावाचा एक प्रकल्प राजस्थान सरकारच्या मदतीने चालू केला आहे. माझ्यामते आपण सर्वजण डॉक्टरांकडे ही जनरीक मेडीसिन प्रिस्क्राइब करायला सांगून हा उपक्रम महाराष्ट्रातही चालू करण्याचा प्रयत्न करू शकतो. ह्यामध्ये दिलेल्या उदाहरणाप्रमाणे १.५ लाखाचे डायबेटीसच्या औषधाच्या पॅकची जनरीक मेडीसिन ची किंमत ८,०००-१०,००० इतकी होते आणि औषधांचे इंग्रेडियंट्स तेच असतात. ३५,००० कोटी रूपयांची वार्षिक निर्यात ह्या जनरीक मेडीसिन ची भारतातून होते आहे. ह्याचा पाठपुरावा आपण करू शकतो.

डॉ. शेट्टींनी दक्षिण भारतात लो कॉस्ट हेल्थ इंश्युरन्स स्कीम तिथल्या सरकार मार्फत केली आहे जी देशभर जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न ते करीत आहे. आंध्रात ७०% तर तामिळनाडूत ६०% जनता ह्या स्कीमचा फायदा घेत आहे.

मुख्य मुद्दा ह्या भागातून समोर आला तो म्हणजे, वैद्यकिय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पायाभूत उभारणीची जरूर नसून, योग्य ती माहिती सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचणे आणी त्या सर्वसामान्यांनी त्याचा पाठपुरवा करायला हवा.

- ( एकेकाळी मेडिकल रॅकेटला बळी पडलेला) सोकाजी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 May 2012 - 5:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉक्टरांचा गोरखधंदा या विषयी अनेकदा छापून येत असते. आपले मिपाकर भड्मकर मास्तरांनी मिपावर संपादकीय लिहितांना ”आधुनिक वैद्यकातली नीतीमत्ता....यावर दोनहजार आठलाच लिहिले होते त्याची आठवण होत आहे. डॉक्टर तुमचे दोन विषय आत्तापर्यंत आमिरखाने हाताळले आहेत. :)

आजच्या सत्यमेव जयतेच्या भागात सोत्रींनी वर विशेष असा सारांश टाकलाच आहे. किरकोळ आजारी असणार्‍यां रुग्णांना कसं फसवल्या जातं. एका डॉक्टरचा अन्य रेफर करणार्‍या डॉक्टरांशी असलेला सबंध, डॉक्टरांचा औषध कंपन्यांशी असलेले साटेलोटे. औषधांचे भरमसाठ भाव आणि बोगसडॉक्टरांवर कार्यवाही का होत नाही. तसेच मेडिकलला जाणारी पिढी जी डोनेशेन देऊन जात आहे, त्यांच्याकडून काय अपेक्षा कराव्यात ? खासगी महाविद्यालये आणि शासकीय महाविद्यालये यांची एक तुलनात्मक चर्चा वगैरे अशा तर्‍हेने आजचा माहितीपूर्ण भाग संपन्न झाला.

आमिरखानचा दीर्घ पॉज वगैरे मला हसू येतं राव. पण चालायचंच. कोंबडा आरवल्याशी मतलब असल्याने आपण सालं कार्यक्रम गंभीरपणे बघत आहोत.

-दिलीप बिरुटे

शिल्पा ब's picture

28 May 2012 - 3:36 am | शिल्पा ब

नालायक डॉक्टर्स आहेत.. फक्त स्वतःचे खिशे भरायचे दुसरं काही नाही.
आमचाही एक अनुभव इथे शेअर केला होता तो सापडेना म्हणुन इथे लावलंय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Jun 2012 - 4:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जातीतील आणि आंतरजातीय प्रेम विवाह. या निमित्तानं प्रेम विवाह करणार्‍यांना काय काय अडचणींना सामोरे जावे लागते त्यावरील उहापोह करणारा आजचा भाग. आजच्या भागात सर्व भावनिक विषय असल्यामुळे आणि दु:खाचे विषय असल्यामुळे मला लैच आणि सारखं सारखं गहिरवरुन येत होतं.

-दिलीप बिरुटे
(हळवा)

आमिरखानच्या टीमला यापेक्षाही सामाजिक विषयांच्या बाबतीत उत्तम असे विषय पुढील कार्यक्रमात घ्यावे लागतील. आजच्या कार्यक्रमातही भावविवश होणार्‍या प्रेक्षकांच्या चेहर्‍यावर क्यामेरा उत्तम फिरला आहे. प्रेम विवाह करणार्‍यांना काही काळापूरते पोलीसांचं संरक्षण मिळतं. असं असलं तरी काहींना आपला जीवही गमवावा लागतो. सामाजिक बहिष्काराला सामोरं जावं लागतं. परंतु अशा विवाहांच्या बाबतीत आता काही सामाजिक बदल स्वीकारले पाहिजेत असा ठाम संदेश देण्यात आजचा भाग यशस्वी ठरला काय याचे माझे उत्तर नाही, असेच आहे.

-दिलीप बिरुटे
(तटस्थ)

पुण्याच्या १५ डॉक्टरांची नोंदणी रद्द?
डॉ. अनुराधा संत, डॉ. आर. व्ही. परांजपे, डॉ. एन. सी. आंबेडकर, डॉ. लक्ष्मीकांत शहा, डॉ. अविनाश देशमुख, डॉ. एस. एम. हडीर्कर, डॉ. एम. एच. शेठ, डॉ. मनोज अग्रवाल, डॉ. कुसुम ताम्हाणे, डॉ. विलास गायकवाड, डॉ. संजीव कानिटकर, डॉ. अनुराधा केळकर, डॉ. गणेश गाडगीळ, डॉ. अरविंद कुलकणीर् (सर्व पुणे) आणि डॉ. मोहन नागणे (पिंपरी चिंचवड) या पुण्यातील पंधरा डॉक्टरांच्या विरोधातही व्यवसायाची नोंदणी रद्द करण्याबाबत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे शिफारस करण्यात आली आहे.

सत्यमेव जयते! :)

मृत्युन्जय's picture

6 Jun 2012 - 11:06 am | मृत्युन्जय

वा वा खुपच चांगली बातमी की. खालील लोकांची नोंदणी रद्द झाली आहे ना?

डॉ. अनुराधा संत, डॉ. आर. व्ही. परांजपे, डॉ. एन. सी. आंबेडकर, डॉ. लक्ष्मीकांत शहा, डॉ. अविनाश देशमुख, डॉ. एस. एम. हडीर्कर, डॉ. एम. एच. शेठ, डॉ. मनोज अग्रवाल, डॉ. कुसुम ताम्हाणे, डॉ. विलास गायकवाड, डॉ. संजीव कानिटकर, डॉ. अनुराधा केळकर, डॉ. गणेश गाडगीळ, डॉ. अरविंद कुलकणीर् (सर्व पुणे) आणि डॉ. मोहन नागणे (पिंपरी चिंचवड) या पुण्यातील पंधरा डॉक्टरांच्या विरोधातही व्यवसायाची नोंदणी रद्द करण्याबाबत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे शिफारस करण्यात आली आहे.

सुदाम मुंडे आणी सरस्वती मुंडे या महानालायक लोकांवर तर अटक वॉरंट जाहीर झाले आहे.

किती छान नै?

मृत्युन्जय's picture

6 Jun 2012 - 11:11 am | मृत्युन्जय

अर्रे आणी हो एक डॉ. शिवाजी सानप पण गजाआड गेला आहे म्हणे आत्ता. कित्ती छान .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jun 2012 - 11:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शारिरीक द्रष्ट्या अपंग असलेले मनाने इतरांप्रमाणेच सक्षम असतात त्यांना इतर माणसांप्रमाणे माणूस म्हणून वागवले पाहिजे. प्रत्येक ठिकाणी समान संधी दिली पाहिजे. अपंगाकंडे पाहण्याची दृष्टी बदलली पाहिजे. चित्रपटांमधे अपंग म्हणजे भिकारी, गाणे म्हणनारे, असे दाखवण्याऐवजी सक्षम असे दाखवावे, असा संदेश देणारा आजचा सहावा भागही संपला.

आजच्या भागात एका लहान मुलीला तिच्या शारीरिक व्यंगासहित दाखवून लोक तिच्याबद्दल कसा वाईट व्यवहार करतात हे पाहतांना वाईट वाटले.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jun 2012 - 11:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अपंग मुलांना सर्वसामान्य मुलांप्रमाणे शाळेत प्रवेशाबद्दल मत मागविले गेले. अपंग मुलांना शाळेतही इतराप्रमाणेच प्रवेश दिला पाहिजे. परंतु काही मुख्याध्यापकांची अशी तक्रार होती की, अशा मुलांना पाहून बाकीचे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नसतात तेव्हा अशा मुलांच्या प्रवेशाबद्दल आमिरने आज प्रेक्षकांची मत मागवली. मला वाटतं हा एक वेगळा गुंतागुंतीचा प्रश्न आहे, आपल्याला या बद्दल काय वाटते.

सवडीनं माझं मत इथे डकवतोच.

-दिलीप बिरुटे

शिल्पा ब's picture

10 Jun 2012 - 11:37 pm | शिल्पा ब

ज्या मुख्याध्यापकांनी अशी तक्रार केली त्यांच्याकडे याविषयीचा डेटा आहे की "त्यांना असं वाटतं की लोकांना तसं वाटेल" या प्रकारचं मत आहे? एपिसोड बघेनच.

बाकी शारीरीक व्यंगाचा बुद्धीशी काय संबंध? शारीरीक व्यंग असलेले रीटार्डेड असतात असं नाही. मी आमच्या शाळेत अन कॉलेजात शारीरीक व्यंग असलेले विद्यार्थी पाहीलेले आहेत. सगळेजण त्यांच्याशी सर्वसामान्यच वागताना बघितल्याच आठवतंय. एक विद्यार्थी तर पुर्णपणे शारीरीकदृष्ट्या दुर्बल होता. त्याची आई त्याला सगळीकडे मदत करायची. उत्तरपत्रिका लिहिताना लेखनिक म्हणुन कोणी विद्यार्थी दिला जायचा अन परीक्षेसाठी जिम वापरली जायची.

खरं तर हा चर्चेचा विषय असु शकतो हेच कधी मनात आलं नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Jun 2012 - 9:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जि.परिषदांच्या शाळेंमधे अशी अडचण येणार नाही. महाविद्यालयांमधेही नाही. मी अनेक विकलांग मुले महाविद्यालयीन शिक्षण घेतांना पाहिले आहेत. अपंगांसाठी शिष्यवृत्तीही असते त्यामुळे शासकीय शाळेची ही गोष्ट नसावी, ही गोष्ट खाजगी शाळांची असावी.

>>>>>मुख्याध्यापकांनी अशी तक्रार केली त्यांच्याकडे याविषयीचा डेटा आहे की "त्यांना असं वाटतं

मुख्याध्यापकांना असं वाटतं अर्थात हे असं का वाटतं तर आलेल्या अनुभवामुळेच वाटतंय. माझा अंदाज की अशी एखादी मुलगी [सत्यमेव जयतेच्या कार्यक्रमात दाखवलेली मुलगी. हा फोटो मी नंतर काढणार आहे] मुली-मुलांच्या शेजारी बसणे वगैरे इतर सामान्य मुलांना अडचणीचे वाटत असावे. आपली दृष्टीच तशी असते. बर्‍याचदा आपली मुलं शाळेत असा कोणी मुलगा असला की सांगतात. तेव्हा, विकलांग मुलांची काळजी घेण्याची सोय खासगी शाळांमधे किती असावी ते माहिती नाही. अशा शाळेंना पैसा खोर्‍याने ओढायचा असल्यामुळे अशा सोयी सवलती शाळांमधे देणे त्यांना गरजेचे वाटत नाही. दुसरी गोष्ट अशी की उच्चभ्रू लोकांच्या जमातीला असे वाटत असावे की, आम्ही शाळेच्या वाटेल तितक्या फिया भरतो तेव्हा आमच्या मुलांना आमच्या बरोबरीच्या मुलांबरोबर शिकवायला पाहिजे तसेच सर्व मुले निरोगी असणारी सुदृढ अशी असावीत अशा अपेक्षेने कदाचित मुख्याध्यापकांचे मत तसे बनले असावे.

>>>>> बाकी शारीरीक व्यंगाचा बुद्धीशी काय संबंध ?
शारीरिक व्यंग असलेल्या मुलांचा बुद्धीचा काही संबंध नसेल परंतु काही मंद बुद्धीची असू शकतील. अशावेळी अनेक समस्या निर्माण होत असाव्या असे वाटते.

बाय द वे, तुमच्या अमेरिकेत विकलांग मुलांच्यासाठी काही विशेष सोयी असतात काय ? काय पद्धत अशा मुलांसाठी ?

-दिलीप बिरुटे

शिल्पा ब's picture

11 Jun 2012 - 12:42 pm | शिल्पा ब

http://www2.ed.gov/about/offices/list/ocr/504faq.html#protected

इथे पहा. मला एवढंच माहीती आहे अन अनुभवलं आहे की लोकं डीसएबल्ड पब्लिकला वेगळी- निम्न वागणुक देत नाहीत. त्यांच्यासाठी बहुतेक सगळया सार्वजनिक ठीकाणी सोयी असतात. उदा. रॅम्प - व्हीलचेअर साठी, दाराच्या उजव्या बाजुला ब्रेल लिपीत सुद्धा सुचना/ नाव/वगैरे असते. नोकरीत अथवा इतर कुठे केवळ अपंगत्व आहे याकारणाने डीस्क्रीमीनेशन केले तर ते बेकायदेशीर आहे.

दादा कोंडके's picture

10 Jun 2012 - 11:50 pm | दादा कोंडके

मला वाटतं आपली संवेदनशिलता फक्त अपंगांना 'हँडीकॅप' किंवा 'डिजेबल' न म्हणता 'फिजिकली-विजुअली चॅलेंज्ड' म्हणण्याइतपतच आहे. इतर पालकांचं काय मत आहे वगैरे पळवाट आहे. मुळात लोकं बदलली पाहिजेत, मानसिकता बदलली पाहिजे हे कागदावर ठिकंय. पण याची सुरुवात जर व्हायला हवी असेल तर वरूनच. त्याबरोबरच लोकजाग्रूती वगैरे होत राहील. नुसत्या लोकजागृतीवर विसंबून राहिलो तर सद्य परिस्थिती पाहता हे व्ह्यायला शेकडो वर्षे लागतील. त्यासाठी प्रत्येक शाळा अपंग विद्यार्थ्यांसाठी खुल्या पाहिजेत आणि कुठल्याही पालकाची तक्रार आली तर शहानिशा करून त्या संस्थेवर कारवाई व्हायला हवी.

या कार्यक्रमाचं एक शक्तीस्थान म्हणजे टीम नी पुढची टिका काय असेल याचा विचार करून त्यावर आधिच टिप्पणी असते. म्हणजे आज आमिरनी म्हणल्यासारखं भारतापुढे आधिच एव्हड्या समस्या असताना अपंगांसाठी काय वेगळं करायचं असंही लोकांना वाटू शकेल असं विचारलं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Jun 2012 - 9:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रत्येक शाळा अपंग विद्यार्थ्यांसाठी खुल्या पाहिजेत आणि कुठल्याही पालकाची तक्रार आली तर शहानिशा करून त्या संस्थेवर कारवाई व्हायला हवी.

करेक्ट. खासगी शाळांमधून असे सांगोवांगी कळाले तरी कार्यवाही व्हावी. नुसत्या चर्चा करुन काय होईल.
शाळेंवर कार्यवाही करण्याची वेळ आली तरी प्रशासकीय कामकाज पाहता कार्यवाही होईल असे वाटत नाही. पटपडताळणीचे पुढे काय झाले आपण सर्वांना माहित आहेच.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jun 2012 - 11:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सत्यमेव जयतेच्या सातव्या भागावर प्रतिसाद टाकायचा विसरलो. घरगुती हिंसाचार. विवाहित प्रत्येक दोन स्त्रियानंतर एका स्त्रीला पुरुष मारहाण करतो. मारहानीचे कारण अतिशय किरकोळ असतं. स्नेहलता, रश्मी, या स्त्रीयांनी पंधरा पंधरा वर्ष नवर्‍यांच्या छळ सहन केला आणि शेवटी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. पुरुषांचा जन्मसिद्ध हक्क आहे स्त्रियांना कमी लेखलं पाहिजे. स्त्रियांना मारनं म्हणजे पुरुषत्त्व. अनेक पुरुष म्हणाले की, आम्ही स्त्रीयांवर हात का उचलतो. कधी कधी जी गोष्ट करायची नसते ती केल्यामुळे राग येतो आणि म्हणून थापड मारणारा पुरुष या कार्यक्रमात भेटला. कामावरुन परतल्यानंतर जेवण देण्याऐवजी झोपून राहीलेल्या पत्नीला पाहिल्यानंतर तिचे दात तोडणारा नवर्‍याची भेट याच कार्यक्रमात झाली. एकुणच पितृसत्ताक पद्धती आणि परंपरेने हुकुमत गाजवण्याची मानसिकतेमुळे स्त्रियांया या छळाला सामोरं जावं लागतं, अशा एक चर्चेचा सूर आजच्या कार्यक्रमात दिसला.

आपल्या लहान मुलांसाठी, आई-वडील, समाज यांच्यासाठी नवर्‍याच्या छळ सहन करणार्‍यांची संख्या अधिक आहे. वरवर सुखी दिसणा-या कुटुंबाच्या आतही असा छळ दडलेला असतो. जोपर्यंत चर्चा बाहेर येत नाही तो पर्यंत तिथे काय चालले आहे, त्याची माहिती होत नाही.

अत्याचारित स्त्रियांच्या बाबतीत संरक्षणासाठी कायदा आहे. कायद्याच्या आधारे पती स्त्रीला घराबाहेर काढू शकत नाही. अशा अत्याचारित स्त्रियासाठी न्यायालयात बाजू मांडण्यासाठी वकीलही असतो, वगैरे. बर्‍याचदा अशी अडचण होते की, अशी अत्याचारित स्त्री पोलीस स्टेशनला जाते तेव्हा पोलीस तडजोड करण्याचा प्रयत्न करतात. गुन्हा नोंदवला जात नाही, अशा वेळी अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं.

शन्नु.... एक स्त्री नवर्‍याच्या मारहानीला कंटाळून आपलं एक नवं जीवन सुरु करते, अशा तर्‍हेने सातवा भागही संपला.

बाकी, दुसरा उपप्रतिसाद माझाच पण... थोड्याशा सवडीनं....

-दिलीप बिरुटे

रेवती's picture

19 Jun 2012 - 12:19 am | रेवती

माहितीतल्या बर्‍याच सुशिक्षित, कमावत्या मुली, स्त्रीया नवर्‍याकडून मार खातात त्यामुळे मला तर पटला विषय.
अमेरिकेतही बर्‍याच बायका नवर्‍याकडून मारहाण सहन करतात असे ऐकले आहे.
व्यायामशाळेत भेटलेल्या मैत्रिणीला तिच्या गळ्यावर काळेनिळे बोटांचे ठसे पाहून मी विचारल्यावर ती काही न बोलता (व्यायाम अर्धा सोडून) निघून गेली होती. बाकी माझ्याच प्रतिसादांमध्ये प्रसंगाने आणखी अत्याचारही पूर्वी लिहिले होते. आमीरच्या कार्यक्रमात त्याने सहज केलेला विनोदही खरा आहे. मैत्रिण तिचा नवरा कामानिमित्त दौर्‍यावर गेला की "बरं झालं गेला, मला जरा चार दिवस सुखाचे मिळतील" असे कित्येकवेळा म्हणताना ऐकलीये. माझ्या सासूबाईंच्या मैत्रिणीचा नवरा साठाव्या वर्षी अचानक गेल्यावर त्या बाईंची प्रतिक्रिया "सुटले एकदाची!" अशीच (स्पष्टपणे) होती.
या सगळ्या स्त्रिया उच्चशिक्षित, श्रीमंत, स्वावलंबी आहेत.
टिव्हीवरही एकदा त्या विषयावर कार्यक्रम सुरु होता जो तीन ते चार मिनिटांपेक्षा पाहणे शक्य नव्हते. त्यात एक अमेरिकन बाई (साठ पासष्ठ वर्षांची असावी) तिच्या भयानक आयुष्याबद्दल सांगत होती. डिव्होर्स होऊनही त्यानं धमक्या देणं थांबवलं नव्हतं आणि स्वत:च्या घरात ती बाई दिवस रात्र भीतीच्या छायेत जीवन कंठत होती.

मृत्युन्जय's picture

19 Jun 2012 - 11:21 am | मृत्युन्जय

निकोला जेम्सचे The Price of Love वाचुन तर अंगावर काटा येतो. एखादा माणूस किती विकृत आनि रानटी असु शकतो याचे ते उत्तम उदाहरण आहे. ते पुस्तक वाचुन Sleeping with the Enemy (आणि त्याची कॉपी अग्निसाक्षी) अगदीच् बालिश वाटायला लागतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jun 2012 - 12:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्त्रीयांना घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायदा-२००५ (दुव्यावर बरीच माहिती आहे) अंतर्गत बरीच सुरक्षा आहे. आपल्या प्रतिसादावरुन म्हणता येतं की, जगभर स्त्रीयांना या छळाला सामोरं जावं लागत असावं. घरगुती हिंसेला केवळ नवराच जवाबदार असतो असं काही नाही. कालच्या भागात जवळ-जवळ नवराच अशा छळाला जवाबदार असतो, असा एक संदेश दिसत होता. अर्थात सासरी सर्वात अधिक सुरक्षित जागा म्हणजे नवरा असतो आणि तोच जेव्हा बेताल वागायला लागल्यावर स्त्रीची मोठी कुचंबना होते. घर सोडलेलं, समाजाचं प्रचंड दडपण. आणि नव्या कुटुंबात होणारी वाताहात, तेव्हा ती काही निर्णय घेत नाही, सर्व जाच सोसल्याशिवाय तिच्याकडे पर्याय उरत नाही.

कालच्या सत्यमेव जयतेच्या भागात सामाजिक अंगाने थोडी चर्चा व्हायला पाहिजे होती. स्त्रीयांना बरोबरीचे स्थान, मानाचे स्थान, याचबरोबर पुरुष जसा काही ठिकाणी चुकत असेल तर काही ठिकाणी स्त्रीही चुकतच असेल. [कोण चुकतं म्हणुन वाद घालायचा नाही] पण, स्त्री आणि पुरुष दोघांच्या ठिकाणी असलेले अहंकार आणि नव्या समाजाच्या मांडणी आणि पारंपरिक कुटुंब व्यवस्थेतील कुत्तरओढ हेही अशा हिंसाचाराचे मुळ आहे. स्त्री कर्ती झाली असेल तर तिच्याठिकाणी मी हे सर्व करते असा एक अहंकार डोकावतो कौटुंबिक वादाची ठिणगी पडत असावी, अर्थात स्त्रीयाच दोषी आहेत अशा माझा विधानाचा आशय नाही. अशा मताला माझ्याकडे काही विदा नाही. पण, एकदम नॉर्मल असणारी स्त्री एका क्षणात बदलते तिच्या वागणुकीत, चेह-यात, बोलण्यात, एकदम फरक पडतो. असेच पुरुषाच्या बाबतीतही होत असते अशा समस्यांमागे काही मानसिक कारणे असतात अशा मानसिक कारणांचा शोध घ्यायला हवा होता, असे वाटले.

असो, या विषयावर जालावर अनेकदा चर्चा झालेल्या आहेत. याच धाग्यातही कोणी तरी प्रतिसादात म्हटलं आहे की भारतातील समस्या त्याच आहेत फक्त नव्याने तुमच्या- आमच्यासमोर येत आहेत. कालच्या भागात मला वाटतं फक्त स्त्रीयांना घरगुती हिंसाचार कायद्याची माहिती सांगण्याचा एक केविलवाणा प्रयत्न आमिरखान करत होता, आता या कायद्यामुळे किती स्त्रिया अशा कायद्याचा आधार घेऊन अशा छळाचा बंदोबस्त करतील आणि सुखी होतील हे आमिरखान आणि सत्यमेव जयतेवाली टीमच जाणो.

-दिलीप बिरुटे

घरगुती हिंसेला केवळ नवराच जवाबदार असतो असं काही नाही.
सहमत. सासू सासरे, दीर, जाऊ, नणंद इ. लोकही जबाबदार असतात. ;)
मुख्य म्हणजे सगळेजण आपला राग, वैफल्य कोणावर तरी काढायचा प्रयत्न करत असतात.
पुरुष जसा काही ठिकाणी चुकत असेल तर काही ठिकाणी स्त्रीही चुकतच असेल
नक्कीच. स्त्रीया नक्कीच चुकतात, जसे पुरूष चुकतात पण चुकीची जाणीव करून देण्यासाठी नवर्‍याला बायको रोज धोपटून काढते किंवा मुलीचे भाऊ, वहिन्या, आई, वडील जावयाला लाथाबुक्क्यांनी तुडवतात असे कितीसे दिसते? नवर्‍यांच्या चुकांसाठी त्यांच्या वाट्याला शारीरिक, मानसिक जाच कितीसा येतो? बायको गर्भार बघायची नाही की लहानगं लेकरू बघायचं नाही आणि मारत सुटायचं, जिन्यावरून ढकलून द्यायचं ही विकृतीच आहे.
या कायद्यामुळे किती स्त्रिया अशा कायद्याचा आधार घेऊन अशा छळाचा बंदोबस्त करतील आणि सुखी होतील अगदी नगण्य प्रमाणातही कायद्याचा वापर केला जाणार नाही असे वाटते.
यावर याच धाग्यात मी म्हटले होते. फरक पडणार नाही म्हणून प्रयत्नच करायचा नाही का?
न जाणो एखादी दुसरी या यमयातनातून मोकळी होईल.

अर्धवटराव's picture

19 Jun 2012 - 10:09 pm | अर्धवटराव

>>न जाणो एखादी दुसरी या यमयातनातून मोकळी होईल.
-- असं झालं तरी ही संपूर्ण मालिका सफल झाली माझ्याकरता. १००% सुधारणा कधिही कोणिही कुठल्याही उपायाने करु शकत नाहि. पण कुठलाही प्रयत्न, अल्प - स्वल्प का होईना, फरक नक्की पाडतो.

अर्धवटराव

शिल्पा ब's picture

19 Jun 2012 - 10:49 pm | शिल्पा ब

गावाकडे माझ्या पाहण्यात एक स्त्री आहे. नवरा असला त्रासदायक अन कुचकामाचा म्हणुन सरळ त्याला सोडुन स्वतःच्या लेकीला वाढवते आहे. घरची कामं करते, जमेल ते काम करते. समाजाकडुन काही त्रास नाही तिला.

अन अजुन एक स्त्री - मुंबईत- भरपुर पगाराची नोकरी - नवर्‍याने सोडलेली- आई वडीलांकडे राहते. भाउ, वहीनी त्रास देतात, मारतात. तिचे पैसे घेतात, एकदा तर तिचं मंगळसुत्रसुद्धा काढुन घेतलं अन घराबाहेर काढलं म्हणुन आमचं दार वाजवुन रडत होती.

कोणावर कधी कशी वेळ येईल हे सांगता येत नाही म्हणुन स्वतः खमकं राहुन स्वतःच्या लेकरांना स्वावलंबी अन धीट करणं तर आपल्याला शक्य आहे ! कीतीकाळ रडारडी करणार? प्रत्येकाला स्वतःचे उद्योग, दुसर्‍याच्या लफड्यात कोण पडणार?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jun 2012 - 6:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शेती-मालावर किटकनाश फवारणीमुळे त्याचा आरोग्यावर होणारा दुष्परिणाम. नैसर्गिक खतामुळे आणि उपायांमुळे शेती उत्पन्नात कशी वाढ होते. आणि ते आरोग्यासाठी ते कसे चांगले असते. सिक्किम सरकारनं जैविक शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे. वगैरे वगैरे.

आता प्रश्न असा आहे, की किटकनाशक फवारणीमुळे शेतीचे उत्त्पन्न वाढतं आणि जैविक खतांमुळे शेती उत्त्पन्न कमी होते. आता अशा वेळी आरोग्याचा विचार करण्याचा प्रयत्न काही राज्यामधे चालु आहे, अशा वेळी शेतकरी कोणता मार्ग निवडेल, काही सांगता येत नाही.

च्यायला, मला आजचा विषय समजलाच नाही, माझा तरी गोंधळ झाला. गोंधळातून थोडं सावरल्यावर
जमलं तर माझ्याच प्रतिसादाला उपप्रतिसाद लिहीन. तो पर्यंत कोणी जाणकारांनी ’हरीत क्रांती’ आणि निमित्तानं स्पष्टीकरण केलं तर बरं राहील.

-दिलीप बिरुटे

विषय समजला तरीही मी शेतकरी नसल्यानं जाणकार नाही म्हणून येणारे प्रतिसाद वाचीन म्हणते.
पंजाबात कीटकनाशक (अजैविक) फवारणीचं प्रमाण भरपूर आहे. माझ्या तिथे राहणार्‍या नातेवाईकांनी गंमत आणि प्रयोग म्हणून त्यांच्या घराच्या आगेमागे मोकळ्या (भरपूर) जागेत चार, पाच प्रकारच्या भाज्या, दोन प्रकारची कडधान्ये पेरली. माळी ठेवला. अजैविक औषध प्रकार वापरला नाही. किडे जितकं खातील ते खाऊ द्यायचं जे राहील ते आपलं. असे करणे शेतकरी नसल्यामुळे (त्यावर उपजिवीका नसल्याने) परवडेल म्हणून प्रयोग करण्याचे ठरवले. कीड पडलीच पण त्यानंतरही घरगुती प्रकाराने काढलेले कडधान्य लोकांना वाटून, स्वत:ला वर्षभराचे ठेवून संपेना. भेंडी, वांगी व आणखी भाज्या वर्षभरात एकदाही बाजारातून आणाव्या लागल्या नाहीत. दोन वर्षं हा प्रयोग केला. नंतर साठवणूक आणि आणखे काही प्रश्न आले असतील म्हणून बंद केला पण आपण छोटी शेती करू शकतो ही गंमत अनुभवता आली.
हौस म्हणून आत्ता मी कोथिंबीर, टोमॅटो, बेसील, कढीपत्ता लावला आहे. छान आलाय. ;)

दादा कोंडके's picture

24 Jun 2012 - 11:42 pm | दादा कोंडके

"टॉक्सीक फूड" हा विषय असेल असं वाटलं नव्हतं. पण चर्चेमुळं एकुणच गांभिर्य कळालं. भ्रष्टाचार आणि लोकसंख्या या शिवाय भारतात प्रचंड प्रमाणात भेडसावत असणार्‍या कोणकोणत्या समस्या आहेत हे कळतंय. मला वाटत होतं की रासायनिक किटकनाशक आणि खतं यामुळे थोडासा साईड इफेक्ट होत असेल पण मोबाइलच्या/हायटेंशन लाईन्सच्या रेडीएशन सारखंच अतिशयोक्ती करून त्याचे परिणाम दाखवले जातात. आणि खूपवेळी खणखणीत वैज्ञानीक पुराव्यांऐवजी स्टॅटीस्टीकल अ‍ॅनॅलिसीस केलेलं असतं जे १००% विश्वासार्ह नसतात. आणि त्यांचा उपयोग बघितला तर साईड इफेक्ट्सकडे एक कोलॅटरल डॅमेज म्हणून दुर्लक्ष करू शकतो.

पण सत्य वेगळच आहे. अगदी कागदोपत्रीसुद्धा भाजीपाला/फळं यांमधल्या किटकनाशकांचं प्रमाण तपासणारी यंत्रणाच नाहिये. इतर देशात बंदी असलेली किटकनाशकं सर्रास प्रमाणित केली जातात, केरळमधला प्रकार आणि पंजाबमधली कँसरट्रेन बघून वाईट वाटलं. :( अवघड आहे.

प्रतिक्रिया मोठ्याने वाचून दाखवा प्लीज :)

सगळीकडे हीच चर्चा आहे. उपक्रम वर चक्कर टाकली नाही अजून पण मायबोलीवर प्रत्येक भागावर चारशे पोष्टी पडताहेत (अपवाद घरगुती हिंसाचाराचा ;) )

कालच्या भागाचे हिरो श्रॉफच ठरले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jul 2012 - 5:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दारुचे दुष्परिणाम.

विजय सिन्हा, एक मोठा पत्रकार. आयुष्यात ’एकच प्याला’ आला आणि पुढे त्याचं व्यसन झालं आणि आयुष्य कसं काळाखोत गेलं. समाजातील बदनामी. आणि नंतर पुढे व्यसनापासुन सुटका. अशाच अनुभव असलेल्यांची काही अनुभव आणि दारु पिऊन गाडी चालवू नये, वगैरे. दारु एक आजार असुन त्यापासून सुट्का होऊ शकते. डॉक्टरांची मतं. काही गावात दारु बंदीचा असलेला अधिकार वगैरे आणि थर्टी एमएल घेतली तर ठीक आहे, असं सांगुन आजचा भाग संपला.

सत्यमेव जयते हा कार्यक्रम 'यशस्वी' झाल्यामुळे 'सत्यमेव जयते पार्ट २' येत असल्याची बातमी आजच वाचली.

-दिलीप बिरुटे

अप्पा जोगळेकर's picture

8 Jul 2012 - 5:56 pm | अप्पा जोगळेकर

तुमच्या नावामागे डॉ. नसते तर आमिर खानच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने येणारे तुमचे प्रतिसाद वेगळे झाले असते अशी शंका वाटते.

प्रा.असता तर प्रतिसाद कसे झाले असते, डॉ. असता तर प्रतिसाद कसे झाले असते, दिलीप असता तर प्रतिसाद कसे झाले असते, बिरुटे असता तर प्रतिसाद कसे झाले असते, असा विचार करण्याऐवजी सत्यमेव जयतेच्या कार्यक्रमाविषी आपलं मत काय ते लिहिले असते तर समजायला मदत झाली असती आणि समजा सत्यमेव जयतेच्या कार्यक्रमाविषयीचा काहींचा (माझाच) सूर कसा न पटणारा आहे, आणि त्यामुळे देश कसा बुडणार आहे, असे स्पष्ट लिहिले असते बरे झाले असते असे वाटले.

-दिलीप बिरुटे

'सत्यमेव जयते भाग- २ साठी महाविषय सुचवा' अशी महाप्रतियोगिता होणार असून त्यात राखी सावंत आणि भप्पीदा परिक्षक, तर सचिन पिळगावकर 'मान्यवर' म्हणून झळकणार आहेत, अशी चर्चा ऐकिवात आहे.
पूर्वतयारी म्हणून मिपाकरांनी इथे विषय सुचवावेत.

सोत्रि's picture

8 Jul 2012 - 1:01 pm | सोत्रि

आजचा भाग अस्पृश्यता / वर्णाधारित जातिव्यवस्था ह्या विषयाला वाहिलेला होता.
इथे ह्याविषयावर एक चर्चा झाली होती. त्यावर मी दिलेला प्रतिसाद:

जातीयवाद संपला नाही, आणि संपणारही नाही. जातीयवाद हा समाजात नसून समाजातल्या प्रत्येकाच्या रक्तात भिनलेला आहे. तो संपणे शक्य नाही कारण तो संपवण्याची दुर्दम्य इच्छा कोणातही नाही.

खेड्यांमध्ये, निरीक्षरतेमुळे आणि त्यामुळे असलेल्या अज्ञानामुळे तो खेड्यांमधून संपणे शक्य नाही, तसेच शहरांमध्ये, सुशिक्षीतांमध्ये तोच जातीयवाद 'अस्मिता' नावचे गोंडस रुपडे धारण करून असतो त्यामुळे तो शहरांतुनही संपणे शक्य नाही.

ह्यावर मिपाकरांची मते जाणून घ्यायची ईच्छा आहे.

- ( जातियवाद संपणे कठीण आहे असे मानणारा ) सोकाजी

जाई.'s picture

8 Jul 2012 - 1:11 pm | जाई.

सोत्रिशी सहमत

नागरी सेवासारख्या प्रतिष्ठेच्या नोकरीतही जातपात पाळली जाते हे पाहून अस्वस्थ वाटल

चतुरंग's picture

9 Jul 2012 - 1:25 am | चतुरंग

जातीव्यवस्था एकदम संपणार नाहीच. बदल एकेका स्तरावर व्हायला हवा. प्रथम आपण कोणालाही जात विचारणार नाही कोणालाही सांगणार नाही असा निश्चय तर करु शकतो? त्याबद्दल काही दुमत असायचे कारण नाही. त्याशिवाय आपल्या मुलाबाळांना योग्य वयात या व्यवस्थेबद्दल कल्पना देऊ त्यांनी असा भेदभाव करु नये आणि कोणी त्यांच्या बाबतीत केला तर खपवून घेऊ नये असे सांगू शकतो. असा बदल तातडीने होऊ शकतो. त्यानंतर आपण जर असा अन्याय होताना बघितला तर तुमच्या ताकदीमधे शक्य असेल तितका आवाज उठवणे गरजेचे आहे ते करु शकतो.

कार्यक्रमात स्टालिनने आंतरजातीय विवाहाबद्दल मत मांडले ते बरोबर आहे. परंतु कदाचित ते एकदम या पिढीत होणार नाही. विचारात होणारे बदल हे कित्येक वर्षे चालू राहावे लागतात ती एकप्रकारची उत्क्रांतीच असते.
कार्यक्रम बघणार्‍या लक्षावधी तरुण तरुणींचे विचार निदान या दिशेने धावायला लागले तरी पहिली पायरी गाठली गेली असे मी म्हणेन.
निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचा सहभाग अतिशय आवडला. अत्यंत उत्स्फूर्तपणे, विनोदाची पखरण करत त्यांनी ज्या संयत शब्दात विषय मांडला त्याला दाद द्यायला हवी!

शिक्षण आणि नोकरीमधले जाती आधारित आरक्षण आणि जातीभेद हे परस्परविरोधी मुद्दे आहेत यावर काही चर्चा अपेक्षित होती ती मात्र झाली नाही असे वाटते. कारण आरक्षण हवे असेल तर जातीव्यवस्थेनुसार विभागणी आवश्यक ठरवली जाते. आणि जातीव्यवस्था नष्ट करायची असेल तर तीवर आधारित आरक्षण होऊ शकत नाही.
तेव्हा आरक्षणाची संख्या जातीपेक्षा हळूहळू आर्थिक परिस्थितीवर आधारित असलेली करत जावी का? अशी काही चर्चा होऊ शकली असती असे वाटते.

माझ्या मते अजून २५-३० वर्षात जातीव्यवस्था घृणास्पद अवस्थेतून बरीच सुधारलेली असेल. रोटीबेटी व्यवहार सर्रास होत असतील. आणि त्यापुढल्या वीस वर्षात आपल्या देशाची स्थिती अमेरिकेसारखी होईल की जिथे जात विचारली जात नाही! :)

-रंगा

सोत्रि's picture

9 Jul 2012 - 9:03 am | सोत्रि

खुपच संयत आणि सुंदर प्रतिसाद!

-( पुरोगामी) सोकाजी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jul 2012 - 5:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सत्यमेव जयतेच्या दहाव्या भागानंतर, सोत्री, रंगाशेठ, आणि जाईनं आपापली मतं मांडून धागा हलवलाच आहे. आमिरखानंच्या सत्यमेव जयतेच्या आजच्या भागानं देशात अस्पृश्यता आहे, हे दाखवून दिलं त्याबद्दल आभारी, नाही तर आता समाजात अस्पृश्यता राहीलीच नाही, असे आम्ही समजत होतो. धन्स. :)

बाकी, प्रतिसाद सवडीनं डकवतो.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jul 2012 - 10:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्टालीन म्हणत होता अजूनही आपला समाज १६ ते २२ व्या शतकात वावरतो आहे, आणि त्यात न पटण्यासारखं काहीच नाही. जात जाईल तेव्हा समता येईल असे म्हणनारे खूप सापडतील पण जात सोडायची आहे, कोणाला.

अस्पृश्यता नवीन नाही. हजारो वर्षापूर्वी आमच्या शास्त्रकारांनी समाजाची विभागणी चार वर्णात केली. आणि सर्वात शूद्र वर्ण हा हीन ठरला. कोणतेच हक्क न देता त्यांचे कर्म ’सेवा’ हा उच्च ठरवला गेला. आजही शाळेत भंगीच्या घरी जन्माला आलात म्हणून शाळेतले संडास स्वच्छ करायला लावणा-यांची वृत्ती अजूनही पाचहजारवर्षापूर्वीचीच आहे, असे म्हणावे लागेल. गावात प्यायचे पाणी भरु दिले जात नाही, बरोबरच आहे म्हणा. उच्च जातीत जन्माला आले नाही, तो त्यांचा दोषच, नाही का ?

अहो, जास्त कशाला आत्ताच काही दिवसापूर्वी मिपावरच ’मी अमुक अमुक आहे आणि मला अमुक अमुक असण्याचा अभिमान आहे’ असं वाचलं होतं. अशा अभिमानातूनच मग दुसरा हीन ठरायला लागतो. आणि स्वत: कसे श्रेष्ठ आहोत असे मग वृत्तीतून यायला लागते. डॉ.बाबासाहेब आंबडेकरांनी जातीव्यवस्थेला अनेक मजली इमारतीचे उदाहरण दिले होते. इमारतीला जीना नसल्यामुळे तळ मजल्यावरचे कनिष्ठ राहीले तर वरच्या मजल्यावरचे वरीष्ठ ठरले, संवादाअभावी हे अंतर कमी झालेच नाही.

’श्रुतीवचन म्हणजे देववचन’ आणि देववचनाच्या विरोधात जाण्याचं काम नाही. वर्णाचे धर्म, निर्बध, आणि अधिकार एकदा देववाणीने ठरवले की त्याच्या विरोधात जाणे तसे कठीणच काम. आपण आज आधुनिक झालो आहोत पण अजूनही विचारांनी परंपरावादीच राहीलो आहोत. शाळेत शिकणा-या मुलाच्या जवळ कोणी डबा खायला बसत नाही, हाच मुलगा कोणाच्या जवळ बसला तर आजूबाजूची मुलं उठून जातात. गावातून उच्च वर्णीयांच्या घरासमोरुन जातांना हातात चपला घेऊन चालणारे आजही आहेत, त्याचे क्षणभरच आश्चर्य वाटले.

शिक्षणाने अशा जातीपातीच्या भिंती अधिक मजबूत होतात की काय असे संस्कृतच्या प्राध्यापिका असलेल्या महिलेच्या अनुभवातून दिसलेच आहे. वाल्मिकी समाजात जन्मलेल्या मुलीनं शिकायचंच कशाला आणि तेही संस्कृत घेऊन. असं म्हणनारे शिक्षक अगदी अलिकडचेच आहेत. लोकमान्य टीळकांनी म्हटलं होतं ’शिंप्यांनी कौन्सिलात जाऊन काय मशीन चालवायची आहे. कुणब्यांना काय नांगर धरायचा आहे” त्याची आठवण झाली. शोषित, पिडितांचे दु:ख भल्या भल्यांना समजले नाही. मोठमोठ्या माणसांना माणसातला माणूस दिसला नाही. आपण तर किती तरी लहान.

धर्माधिकारी म्हणाले ते तर कोणालाही पटेल. मी जन्माला आलो ते उच्च जातीत पण मला ही जातीयता पाळावी लागली नाही. स्वातंत्र्यापूर्वी आम्ही काही स्वप्न पाहिली (समता, बंधुता) होती ते स्वप्न आजही पूर्ण होऊ शकले नाही.

सत्यमेव जयतेच्या कार्यक्रमामुळे फार काही उजेड पडेल असे वाटत नाही. पण, शोषित, पिडितांचे हाल अपेष्टा पुस्तकातच ब-या वाट्तात. स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्य,समता, बंधुताचे स्वप्न पाहणा-यांना नामदेव ढसाळांनी विचारलम होतं ’स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे, रामराज्याच्या कितव्या घरात आपण राहतोत. उद्गम विकास उंची संस्कार संस्कृती कंचा मूलभूत अर्थ स्वातंत्र्याचा” असो.

नामदेव ढसाळाच्याच गोलपिठातल्या ’कॉम्रेड अर्थात १२ बलुतेदारांसाठ” या दीर्घ कवितेतल्या शेवटच्या चार ओळी डकवतो.

”ही लोकशाही नाहीहे ही विटंबना सतरा पिढ्यांची
म्हणा म्हणा कॉम्रेड दंड ठोकून म्हणा
’ हाण सख्या तुझीच बारी
लोकशाही मेली तरी डेंगण्या मारी’
द्या द्या दवंडी कॉम्रेड
ही लोकशाही नाहीहे
ही विटंबना सतरा पिढ्यांची
मूग गिळून पोसलेली” (गोलपिठा. पृ;क्र.६८)

समाजात समता येईल आणि समता नांदावी अशा आशावाद बाळगलाच पाहिजे. हळुहळु बदल होत आहेत. बदल होतील. आंतरजातीय विवाह, जात-पोटजातीतले भेद हळुहळु कमी होत आहेत. कोणाचीही जात न विचारता सर्वांचेच रोटीबेटी व्यवहार आत्ताच होणार नाही, व्हायला वेळ लागेल, पण हे अंतरही फार दुरचं असणार नाही, असं ही मला कालचा भाग पाहतांना वाटले. असो.

-दिलीप बिरुटे

रोटीबेटी जाउ द्या पण इतरांना माणुस म्हणुन वागवायला काय हरकत आहे. जात कोणती का असेना जर माणुस स्वभावाने, विचाराने चांगला असेल तर मित्रतेत बाधा येउ नये.

इथेही केवळ निम्न जातीतला आहे म्हणुन वाट्टेल ते लिहिणारा एक आय डी आहेच. अशा लोकांमुळे प्रगती नाहीच पण अधोगतीच होणार हे निश्चित.

अजुन मी एपिसोड पाहीला नाही. पण आंतरजातीय म्हणजे ब्राह्मण - मराठा, ब्राह्मण-आगरी असे जोडपे माहीत आहेत. विशेष म्हणजे दोन्ही ब्राह्मण मुली आहेत.

विषय खुपच मोठा अन खुप वेगवेगळे उपविषय असणारा आहे. अन्याय करणारा अन अन्याय सहन करणारा दोघांचही चुकतं. फक्त भारतच नाही तर इतर देशातही...अन इतर बाबतीतही.

अजुनही काही ठीकाणी अगदी शाळेपासुन वेगळी वागणुक दिली जाते हे वाचुन सखेद आश्चर्य वाटलं.

अर्धवटराव's picture

10 Jul 2012 - 11:20 pm | अर्धवटराव

१६ व्या शतकातली मानसीकता २१ व्या शतकात जोपासणे, पोथीनिष्ठ कर्मठपणा, संवादाचा अभाव, कुठल्याही कालीन विचारवंतांना समानतेचे महत्व न जाणवणे, समता - बंधुता वगैरे आधारीत कॉन्स्टिट्युशन, आंतर जातीय विवाह ... जातीव्यवस्थेतील उणिवांवर बोट ठेवायला आणि त्या दूर करायला हा सगळा मसाला कितीही चर्वण केला तरी त्यातुन काहिही साध्य होणार नाहि. कल्पना करा कि आज घडीला या सगळ्या उणीवा नष्ट केल्या गेल्या आहेत... तरी एका नव्या जातीव्यवस्थेचे बीजारोपण झालेले आहे, अगदी वैज्ञानीक पद्धतीने... व्हिकी डोनर. ५०० वर्षांनी ब्राह्मण, कुणबी, चांभार, भंगी अशी जातीव्यवस्था जाऊन क्लास ए, क्लास बी वगैरे इन्स्टिट्युट मधुन सर्टीफाय झालेले स्पर्म्स आपली नवी उतरंड तयार करतील. एक नवी डिजीटल मनुस्मृती, गोलपीठ, आणि कोड ऑफ कंडक्ट आपली जबाबदारी चोख निभवतील.

समता, बंधुता वगैरे उपाय कधीच नव्हते आणि पुढेही त्याचा उपयोग नाहि. हि घडी सफलतेची व्याख्या बदलायची आहे. एक साधा प्रॅक्टीकल उपाय करता आला तर हे प्रोब्लेम्स निश्चित कमी होतील. शाळेत प्रथम क्रमांकाने पास होण्याची व्याख्या बनलुन टाकावी. ज्याला सर्वोत्तम गुण तो पहिला असं समिकरण न ठेवता जो अजीबात "ढ" होता त्याला पास होण्यास सर्वाधीक मदत कोणि केली तो प्रथम, असा उफराटा कारभार करावा. आपण एक साखळी तयार केली आहे, ज्यात एका मनुष्याने दुसर्‍याचे पाय पकडले आहेत. ति साखळी मोडुन एकमेकांचा हात धरणारी नवीन साखळी तयार करावी. वेगवान प्रगतीला हे गुणोत्तर अत्यंत मारक आहे, मान्य... पण सुखी सामाजीक जीवनाला सध्यातरी हाच एक उपाय दिसतोय.

अर्धवटराव

शिल्पा ब's picture

11 Jul 2012 - 12:14 am | शिल्पा ब

बाकी काहीही असलं अन कितीही भेद असले तरी माणसाला माणुस म्हणुन वागवणं तर शक्य असावं !