भस्सकन् ..
मागल्या बाजुने भस्सकन् किंकाळींचा आवाज कानात घुसला...
कोणाच्या तरी मोबाईलवार्ता चालू असणार..
कानात धडाधडा कंपनं आणि मनात कचकचीत शिव्या आल्या...
सवयीने तोंडाला चाप लावलेत म्हणून त्या नुसत्या तोंडातच फडाफडा वाजल्या...
पुन्हा पुन्हा कानात घुसणारा कचाकचा आवाज..
कोण साला घुसतोय टाळक्यात... नडतोय खालीपिली **चा..
काळ्या पैशाची पैदास सोडलेली ही...
मान वळवून मागे बघितलं तर ती माझीच सौ फोनवर होती...
मग मी गपगुमान हातातील शॉपिंग बॅगा सांभाळत चालू लागलो..!!!!
प्रतिक्रिया
वा!! मज्जाच आहे...
आई ग्गं....
मायला भस्सकन विडंबनं पडायला
प्रत्यक्षाहुनि प्रतिमा उत्कट
मस्त विडंबन
=))
किंकाळी आर्त का काय असते न.