झालेलं इन्फेक्शन अजून वाढलंय एवढंच म्हणेन :)
"बराकत" जिंदाबाद !!
श्रीखंडी रंगाचा दोरा..... पुस्तकातलं आवडलेलं डिझाइन एवढ्या शिदोरीवर केलेली सुरवात.
पुस्तकातलं डिझाइन तसं छोटं वाटलं पण जसं जसं बनत गेलं....... बर्यापैकी मोठं तयार झालं. मला वाटलं टेबल मॅट बनेल पण तयार झालं टेबल रनर. पुस्तकात एकाच रंगात होतं. श्रीखंडी दोरा संपला म्हणून मग मधला भाग जवळ असलेल्या काळ्या दोर्याचा बनवला. शिवाय वेगळं वाटायला नको म्हणून बॉर्डर सुद्धा काळीच केली.
प्रतिक्रिया
5 Apr 2012 - 8:29 pm | रेवती
वाह! काय ती कलाकुसर.
मस्त! फारच छान.
अशी रंगसंगती असलेल्या रनरमुळे टेबलावरच्या पदार्थांपेक्षा त्याकडेच लक्ष जायचे.
लगेच हात लावावासा वाटतोय.
5 Apr 2012 - 10:51 pm | स्मिता.
वाह! काय ती कलाकुसर आणि एवढं बारीक काम करायला किती तो पेशंस! आमचा सलाम स्विकारा :)
अगदी अगदी.
5 Apr 2012 - 9:16 pm | मीनल
काम फार नाजूक आहे.
करायला पेशन्स हवा हे खरे.
5 Apr 2012 - 10:02 pm | ५० फक्त
श्रीखंडी रंग, चला एक नविन रंग कळाला.
बाकी त्या लाल बॅकग्राउंडपेक्षा फरशीच्या पांढ-या बॅकग्राउंडवरच जास्त उठुन दिसतं आहे.
6 Apr 2012 - 5:03 am | रामपुरी
श्रीखंडी रंग मी सुद्धा पहिल्यांदाच ऐकला... म्हणजे नक्की कुठल्या श्रीखंडाचा रंग प्रमाण धरायचा? :) :)
5 Apr 2012 - 10:58 pm | कवितानागेश
मस्त झालय. :)
6 Apr 2012 - 12:26 am | अत्रुप्त आत्मा
हायक्लास.... येक नंबर जमलय काम... :-)
6 Apr 2012 - 9:10 am | पैसा
अगदी मस्त झालंय. पण जेवणातले पदार्थ याच्यावर सांडले तर?
6 Apr 2012 - 9:47 am | पियुशा
वॉव !!!!
मला कुणी टीचर भेटेणा एकडे क्रोशे शिकवायला
तिकडे येउ का जयवी तै ,तु शिकवशील का मला ;)
असो , हे प्रकरण शिकौन साधा ५" x ५" चा रुमाल बनवता आला तरी नशीब माझे ;)
6 Apr 2012 - 2:54 pm | पिंगू
चेपुवर जा. सगळंच शिकशील.. ;)
- पिंगू
6 Apr 2012 - 6:17 pm | परिकथेतील राजकुमार
येवढ्या मेहनतीने तो क्रोशेचा रुमाल बनवायचा आणि त्याला नाक पुसायचे म्हणजे काहीतरीच वाटते.
6 Apr 2012 - 9:55 am | मदनबाण
वल्ला क्या जबरदस्त दिखती ! ;)
काय हो... कसा काय इतक मस्त मस्त विणकाम करता तुम्ही ? ;)
तुमच्या मधे प्रचंड पेशंन्स आहे याची खात्री पटली मात्र ! ;)
मनातल्या गप्पा :--- बाण्या तू उगाच मेंढ्यांची चिंता करु नकोस बरं ! ;)
6 Apr 2012 - 2:50 pm | पिंगू
रनर घेऊन पळून जाउ का? ;)
- पिंगू
6 Apr 2012 - 6:14 pm | जयवी
शुक्रिया शुक्रिया :)
आमच्या श्रीखंडाचा रंग असाच असतो.... आम्रखंड म्हणा हवं तर ;)
ज्योती..... पदार्थ वाढून घेणारे नक्कीच घेतील गं काळजी :)
पियुशा......नक्की शिकवेन......ये लग्गेच इकडे :) खरं सांगू का.........आजकाल नेटवर इतके मस्त व्हिडियो असतात ना.... त्यावरुन शिकता येतं. क्रोशे वगैरे तर नक्कीच. पण हे शटलवर्क थोडं ट्रिकी आहे. एकदा गाठ जमली की झालं !!
पिंगू..... बघ उचलता येतंय का ;)
6 Apr 2012 - 9:43 pm | जाई.
सुरेख झालय
तुझ्या पेशन्सला सलाम
7 Apr 2012 - 2:12 am | दीपा माने
जयवी , वेळेचा फारच छान उपयोग करता. आणखीही नमुने येऊ द्यात.
7 Apr 2012 - 6:06 am | नरेंद्र गोळे
जयू,
सृजनाचा आनंद एकसारखाच, टॅटिंग असो की कविता!
कलाकारी आवडली. अगदी "रुजवू मराठी, फुलवू मराठी" तल्या कवियित्रीसारखीच.
7 Apr 2012 - 12:37 pm | जयवी
मनापासून आभार :)
नरेंद्र.... अगदी अगदी :)