आमचे प्रेरणास्थान आमच्या सदगुरु अनिरुद्ध अभ्यंकर उर्फ केशवसुमारांची चैन
कविता हल्ली सारख्या छळतात मजला
आणि ओळी चार मग सुचतात मजला
टंकले नाही मी काही तरीपण
अर्थ कडव्यांचे सलतात मजला
कवीलोकांची का खुलली कळी ?
प्रश्न हे आता असे पडतात मजला
कायदेही काही निवृत्तीचे असू द्या
फायदे पुनरागमनात हे दिसतात मजला
मी भरवसा कवितांचा काय द्यावा?
प्रतिसादही जर असे गिळतात मजला
प्रतिसादांचे सर्व रिकामे रकाने
खरडीही आजकाल ते विकतात मजला
एकदा टाकिन म्हटले मी विडंबन
ट्रॅकर छद्मीपणे हसला मजला
चैन विडंबनाची मला करता न आली
एवढी कोठे सुखे मिळतात मजला
मेलास तु टुकारा मेल्या
आता कोण आहे वाली तुजला
प्रतिक्रिया
30 Jul 2008 - 8:29 pm | ब्रिटिश टिंग्या
प्रतिसादांचे सर्व रिकामे रकाने
खरडीही आजकाल ते विकतात मजला
एकदा टाकिन म्हटले मी विडंबन
ट्रॅकर छद्मीपणे हसला मजला
टुकारा,
पहिलेच विडंबन काय?
सही जमलेय.....और आने दो!
- टिंग्यायात्री :)
30 Jul 2008 - 8:31 pm | शितल
टुकार्या तु ही विडंबनाच्या प्रेमात पडलास :)
मेलास तु टुकारा मेल्या
आता कोण आहे वाली तुजला
मस्तच
चालु दे.
30 Jul 2008 - 8:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
भट्टी जमली आहे ...
(कवितेपेक्षा विडंबनं जास्त वाचणारी) अदिती
30 Jul 2008 - 9:40 pm | मेघना भुस्कुटे
सहिये! मस्त जमलं आहे विडंबन! आता केसु आणि रंगा यांच्या लायनीत तुम्हीपण का? मजाय!
30 Jul 2008 - 9:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहिये! मस्त जमलं आहे विडंबन! आता केसु आणि रंगा यांच्या लायनीत तुम्हीपण का? मजाय!
विडंबनकारांचे वारकरी म्हणुन आम्ही आपल्याकडे पाहतो.
लगे रहो !!!
1 Aug 2008 - 9:57 am | विजुभाऊ
विडंबनकारांचे वारकरी म्हणुन आम्ही आपल्याकडे पाहतो.
हे थोडेसे सुधारुन
विडंबनकारांचे वार करी म्हणुन आम्ही आपल्याकडे पाहतो.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
30 Jul 2008 - 9:56 pm | प्राजु
कायदेही काही निवृत्तीचे असू द्या
फायदे पुनरागमनात हे दिसतात मजला
अच्छा... असं आहे तर!!! कळलं बरं....
मस्त विडंबन.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
30 Jul 2008 - 10:24 pm | यशोधरा
मस्तच लिहिलय!!
30 Jul 2008 - 10:44 pm | सर्किट (not verified)
टुकारशेठ,
आणखी खूप प्रयत्नांची गरज आहे. गझल, हझल, वृत्त, लय वगैरे शब्दांचे अर्थ डिक्शनरीत शोधा,
पहिला प्रयत्न म्हणून बरा आहे.
(स्वगतः आंद्या, लेका, जरा दमानं घे ;-)
- सर्किट
30 Jul 2008 - 10:45 pm | बेसनलाडू
ठीक आहे. वृत्त सांभाळता यायला हवे;काही ठिकाणी साफच बोंबलले आहे :( शेवटच्या द्विपदीत अचानक मजला चे तुजला झाले? असो.
प्रगती होण्याची आशा करावयास हरकत नाही. चालू द्यात.
(वाचक)बेसनलाडू
30 Jul 2008 - 11:01 pm | चतुरंग
(स्वगत - ह्या'केटु'ला कसा बरं शह देऊ? काहीतरी करायला हवं खरं! 'केसुं'नाच विचारु का? :/ )
चतुरंग
31 Jul 2008 - 12:36 am | इनोबा म्हणे
विडंबनकारांचे वारकरी म्हणुन आम्ही आपल्याकडे पाहतो.
हेच म्हणतो
आंद्या, लेका, जरा दमानं घे
च्यामारी, हे खरंय का रे आंद्या? लेका तुच आहेस का हा 'केटू'?
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
31 Jul 2008 - 8:58 am | विसोबा खेचर
केशवटुकार?
हम्म! कोण रे तू? पुन्हा केसूच नव्हेस ना? की कुणी मिपाच्या प्रेमात पडलेला नमोगती, जो काही व्यक्तिगत आणि आंतरजालीय (!) कारणांमुळे स्वत:चं नाव लपवू पाहतोय? ;)
असो,
कायदेही काही निवृत्तीचे असू द्या
फायदे पुनरागमनात हे दिसतात मजला
ह्या ओळी जास्त आवडल्या. उत्तम विडंबन. अभिनंदन...
तात्या.
31 Jul 2008 - 9:05 am | आनंदयात्री
>>कोण रे तू? पुन्हा केसूच नव्हेस ना? की कुणी मिपाच्या प्रेमात पडलेला नमोगती, जो काही व्यक्तिगत आणि आंतरजालीय (!) कारणांमुळे स्वत:चं नाव लपवू पाहतोय?
कोणतरी हलकट नमोगती असणार तात्या ;) .. प्रोफाईल बघा की त्याचं :D (नायतर आयपी चेक करा ;) )
आपलाच
-
आंद्या अभ्यंकर
31 Jul 2008 - 6:58 pm | केशवटुकार
सर्व प्रकट / अप्रकट आस्वादक / टिकाकारांचे धन्यवाद.
सदगुरुंनी काही सुचना दिल्या नाहीत याबद्दल खेद वाटतो.
आपलाच
(एकलव्य) केशवटुकार उर्फ आनंदयात्री
1 Aug 2008 - 1:25 pm | केशवसुमार
सदगुरुंनी काही सुचना दिल्या नाहीत याबद्दल खेद वाटतो.
टुकारशेठ,
हे सदगुरु कोण हो? :?
बाकी पहिला प्रयत्न उत्तम, बेला शी सहमत..
चालू द्या..
(गुरुघंटा)केशवसुमार
1 Aug 2008 - 3:35 pm | मनस्वी
प्रतिसादांचे सर्व रिकामे रकाने
खरडीही आजकाल ते विकतात मजला
छान प्रयत्न आहे केशवटुकार :)
वा आता विडंबने.. तू छुपा रुस्तम आहेस म्हणजे!
अजून येउदेत.
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *