प्रवास जीवनाचा...!

वेणू's picture
वेणू in जे न देखे रवी...
31 Mar 2012 - 1:43 pm

जगण्याची लय गवसली,
असं जाणवताच
सर्वांग सरसावतं ठेका धरायला....

'पण-परंतू' येणारच आडवे.....!
खाच-खळग्यांशिवाय मजा ती कसली?

अपरिहार्य प्रवासातलं- ठेचकाळणं,
बांधीलच जणू!
बिघडतोच ठेकाही!

प्रवास मात्र, तसाच
अखंडित..
त्याच्याच गतीचा...!!

येणार खळगे,
विस्कटणार सूरही..

तालास लयीची भेट
घडवून आणण्याची
कसरत आणि जिम्मा,
फक्त आपलाच!

जगणं असं स्विकारलं ना
की मग सहज जमतं,

लयीत ठेचकाळायला....

-बागेश्री
(पूर्वप्रकाशित- दीपज्योती दिवाळी अंक २०११ - http://deepjyoti2011.blogspot.com/2011/10/blog-post_09.html)

कविता

प्रतिक्रिया

सांजसंध्या's picture

31 Mar 2012 - 2:07 pm | सांजसंध्या

बागेश्री

सुंदर आहे कविता...
दीपजोती मधे प्रकाशित झालीये का ? अभिनंदन तुझं ! मनापासून कौतुक :)

निनाद's picture

31 Mar 2012 - 2:11 pm | निनाद

आवडली.

तालास लयीची भेट
घडवून आणण्याची
कसरत आणि जिम्मा,
फक्त आपलाच!

जगणं असं स्विकारलं ना
की मग सहज जमतं,

हे मुक्तक छान आहे.
यात गझलेची जान आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

31 Mar 2012 - 9:42 pm | अत्रुप्त आत्मा

@जगणं असं स्विकारलं ना
की मग सहज जमतं,

लयीत ठेचकाळायला....>>>

<<< व्वा...व्वा....अर्थपूर्ण,आणी खुप काही शिकवणारी कविता

आभारी आहे..
आत्मा तो स्मायली खुप गोड आहे! :)