तमाशा खरंच महाराष्ट्राची संस्कृती आहे का ? ह्या शंकेच उत्तर मला अजुन मिळाल नाही आहे.
ह्याला कारणही तसच घडल. परवा रवीवारी , मी व माझे दोन मित्र एका प्रसिध्द फडात तमाशा पहायला गेलो होतो.
बाहेर बरीच लांब रांग लागली होती. त्या रांगेत उभे रहीलो असतो तर सहजच आम्हाला दोन ते तीन तास लागले असते तिकिटं काढायला. माझ्या मित्राने तिथे असलेल्या 'साखरभाताला' विचारले आज ही रांग एव्हढी लांब का आहे? तर तो म्हणाला जत्रेच्या सुपारीची आहे. ती रांग एव्हढी लांब होती की मला खरंच नवल वाटल की जर जत्रेत फड भरवून ह्या मातीची संस्कृती जपली जात असेल तर मग आपली संस्कृती फक्त तमाशांवर चालायला हवी. नाचव बाई जप संस्कृती. काहीही सांस्कृतीक काम न करता बाई नाचवून संस्कृती रक्षण व्हायला पाहीजे.पण तसे होत नाही. मग तमाशा देखील आपली संस्कृती आहे अस का म्हटल जातं? म्हणुन खरंच तमाशा महाराष्ट्राची संस्कृती आहे का ?
प्रतिक्रिया
27 Mar 2012 - 11:38 am | अमोल खरे
आम्ही तमाशा बघायला जात नाही. बाकी तमाशा कसा होता ते नाही सांगितलं ? पुढील वेळी पुर्ण माहिती देत जा, म्हणजे तमाशाला जायचे की नाही , त्याने संस्कृती जोपासली जाते का नाही ह्यावर मत व्यक्त करता येइल.
27 Mar 2012 - 11:43 am | परिकथेतील राजकुमार
मुळात शंका काय आहे ते आधि नीट समजावुन घ्या. घाईगडबडित प्रतिसाद देउ नका. माझ्या शंकेच उत्तर तुमच्या कडे नसेल तर मग ते शोधा किंवा इतर लोक जे उत्तर देतील ते वाचा.
27 Mar 2012 - 11:51 am | अमोल खरे
असे बोलुन तुम्ही सभासदांच्या मताचा अनादर करत आहात. आपण लोकशाहीत राहतो आणि वाट्टेल ते बोलायचा आणि अपशकुन करायचा हक्क आम्हाला आहे. आणि तुमच्या लेखात मोजुन १० पेक्षा जास्त ओळी नव्हत्या, त्यामुळे नीट वाचुनच प्रतिक्रिया दिली आहे. बाकी जरी तमाशामुळे संस्कृती जोपासली जात नाही असा निष्कर्ष निघाला तरी तुम्ही तमाशाला जाणं थांबवणार आहात का ? फेटे उडवणे, हाताला गजरे बांधुन धुंद नजरेने नर्तकीला पाहने थांबवणार आहात का ? बाकी तुमचे गु-हाळ चालु द्या.
27 Mar 2012 - 12:31 pm | निश
परिकथेतील राजकुमार साहेब, मस्त लिहिल आहेत.
ह्याला म्हणतात लिहिण.मस्त आमच्याच धाग्याच तमाशा हा विषय घेउन विडंबन केल आहात. मस्त लय भारी कारण तुम्हि एका महत्वाचा विषय मांडला आहात तमाशा खरंच महाराष्ट्राची संस्कृती आहे का ? ह्या धाग्यातुन. धन्यवाद तुम्हाला.
कळत नकळत का होईना तुम्ही एक खरच योग्य विषय ईथे मांडला आहे.
27 Mar 2012 - 12:41 pm | निश
परिकथेतील राजकुमार साहेब, कोल्ह्याट्याच पोर हे पुस्तक जरुर वाचा .
तमाश्यात नाचणार्या स्त्रिच्या मुलाने ते लिहिल आहे. त्या मुलाच नाव किशोर शांताबाई काळे.
पुस्तक वाचताना तमाशाच भयाण वास्तव बघुन आपण सुन्न होतो.
वेदनेचा हुंकार आहे हे पुस्तक. कदाचित तुम्ही काढलेल्या, तमाशा खरंच महाराष्ट्राची संस्कृती आहे का ? ह्या धाग्याच उत्तर कदाचीत हे पुस्तक असेल.
2 May 2014 - 12:48 pm | परिजात
पुस्तक माहीती बद्द्ल धन्यवाद.
27 Mar 2012 - 5:20 pm | निश
जौ दे हो ! परा साहेब , तुम्ही लक्ष नका देउ. तुमचे म्हणण कितिही बरोबर असल तरी हे लोक ऐकणार नाहित तुम्हि इतक तळंमळीने सांगता आहात. तुम्ही खरच लक्ष देउ नका
नाहितर हे लोक उगाच पराचा कावळा करतिल. सवयच आहे त्याना.
निश
.
27 Mar 2012 - 5:22 pm | परिकथेतील राजकुमार
पण हा प्रतिसाद तुम्ही स्वतःच्याच प्रतिसादाखाली देऊन नक्की काय सुचवत आहात ? :P
27 Mar 2012 - 5:37 pm | निश
हेच की ज्यासि सांगितले त्यासि कळे,
प्रतिसादाकरिता धन्यवाद .
हे हे हे........
27 Mar 2012 - 11:40 am | पैसा
त्यामानाने लेख अंमळ लहान झालाय. सूक्ष्म नीरिक्षण करून दीर्घ लेख लिहायला हवा होता असे मत नोंदवते.
2 May 2014 - 10:17 pm | आयुर्हित
लेखकाने "महाराष्ट्राची संस्कृती" काय आहे हे पूर्णपणे समजून घ्यावे.
ते समजून न घेता असे एकांगी लिखाण पाहून लेखकाच्या अगाध ज्ञानाची कीव येते!
तोवर सर्वांना चौरंग प्रस्तुत अशोक हांडे यांच्या "मंगलगाणी दंगलगाणी" या कार्यक्रमांची सीडी जरूर पहावी ही नम्र विनंती.
27 Mar 2012 - 11:42 am | पियुशा
+१ टु पैसा तै :)
थोड अजुन लिहायला हव होत !!!
27 Mar 2012 - 11:43 am | तर्री
सहमत.
ऊगाचच अवांतर : तसे तर मग डान्स बार ही सुध्दा संस्कृतीच होत्याल की.
27 Mar 2012 - 11:47 am | स्वातीविशु
तमाशा/लावणी ही महाराष्ट्राची खुप जुनी कला आहे असे म्हणता येईल. ती काही अंशी लोप पावत आहे.
27 Mar 2012 - 11:52 am | प्यारे१
तुमच्या विश्वास नाही ना? (एकंदर जो सुर आहे धाग्याचा त्यावरुन काढलेल अनुमान) तर मग नका हो बघू तमाशा. वाटते संस्कृती आहे ते बघतील.
मुळात तुमचा प्रॉब्लेम काय तोच कळला नाही? तुम्हाला नाही वाटत तमाशा ही महाराष्ट्राची संस्कृती आहे तर गेलातच का?
सच्याने महाशतक काय मारल... साला हल्ली शतकांची हाव वाढत चालली आहे लोकांची. ;)
(फेटेउडवू) प्यारे
27 Mar 2012 - 1:00 pm | गणपा
प्यारे १ साहेब, तमाशावर विश्वास नाही ह्यावर हा धागा नसुन तर हा धागा ती कला संस्कृती आहे का? असा आहे.तो तुम्ही नीट वाचलेला दिसत नाही आहे.
दुसर जर हे सदर तुम्ही सभासदानी शंका विचाराव्यात म्हणुन जर चालवत असाल तर मग परा यांना *शंका विचारायचा हक्क नाही आहे का?
मुळात त्यांची लघु* शंका काय आहे ते आधि नीट समजावुन घ्या. घाईगडबडित प्रतिसाद देउ नका. पराच्या शंकेच उत्तर तुमच्या कडे नसेल तर मग ते शोधा किंवा इतर लोक जे उत्तर देतील ते वाचा.
शिकलेल्या माणसाचे हे लक्षण म्हणजे विचार करुन बोलण किंवा लिहीण. वरचा तुमचा प्रतिसाद बघता तुम्हाला उत्तर देता येत नाही. मग जरुर इथे प्रतिसाद येतिल ते वाचा.
तमाशाला न जाणारा
बा-लिश
*< खुलासा>केवळ सहा ओळींचा धागा असल्याने लघु . < /खुलासा संपला>
27 Mar 2012 - 2:08 pm | निश
गणपा साहेब, सहमत बरोबर आहे तुमच.
लगे रहो गणपा साहेब.
(अडाणी बाळ)
निश.
27 Mar 2012 - 2:37 pm | प्यारे१
सॉरी शक्तिमान, धागा पुर्ण वाचला (होत्याच कितिशा ओळी म्हणे?) आणि पुर्ण विचार करुनच तो प्रतिसाद दिला आहे.
फक्त एक सांगा.. जर उद्या तुमच्या या कुटलेल्ल्या काथ्याचा कौल "हो तमाशा हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे " असा लागला तर तुम्ही पण त्या रांगेत उभे रहाणार का?
बाकी चालुद्या तुमचं गुर्हाळ.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*
27 Mar 2012 - 11:53 am | यकु
>>>>तमाशा खरंच महाराष्ट्राची संस्कृती आहे का ?
अलबत! महाराष्ट्राचीच संस्कृती आहे, आणखी कुणाची असणार :p
आमच्याकडच्या तमाशांमध्ये कागदी तिकीट नसतं बुवा.. बाहेर बसलेला मास्तर हातावर निळाभोर शिक्का मारतो आणि मग आत सोडतो. ते धुवून काढल्याशिवाय घरी परत जायचे वांधे..
27 Mar 2012 - 12:19 pm | संपत
आमच्या हिथं बी मास्तर बोटावर काळा दाग काढतो आनी आतमध्ये सोडतो.. मंग आमी एका पेटी वरचे बटन दाबतो आनी घरला येतो.. त्याला तमाशाची नांदी म्हणतात..
27 Mar 2012 - 11:54 am | कपिलमुनी
म्हणजे फक्त बाइचा नाच एवढच स्वरूप उरलेल आहे .
पूर्वी तमाशाच्या वग , गण गौळण असे स्वरूप होते ..
पूर्वी चैत्रानंतर शेतीची कामे संपली कि तमाशाचे फड सुरु व्हायचे ..
प्रबोधन आणि मनोरंजन असे स्वरूप असायचे ..खेड्यात मनोरंजनाची दुसरी कोणतीच सोय नसायची..आणि पूर्वी तमाशामध्ये पुरुष हेच स्त्री वेश घेउन नाचायचे ..स्त्रीया नंतर नाचायला लागल्या
27 Mar 2012 - 2:10 pm | मी-सौरभ
धाग्याचा उद्देश कळल्याने
प्रकाटाआ :)
27 Mar 2012 - 2:57 pm | मृगनयनी
सहमत!
"तमाशात बाई नाचवणे"... ही आपली काय किन्वा इतर कुणाची काय.पण संस्कृती होऊ शकते काय? ऐक्चुली सध्याच्या घडीला "तमाशा" हे पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्याचं सोपं साधन बनलेलं आहे.
पूर्वीच्या काळी -साधारणतः पेशवाईच्या उत्तरार्धात 'पठ्ठे बापुरावां'नी लावणी- तमाशासाठी आपले आयुष्य वाहून दिले. पण तेव्हा "तमाशा"चा उद्देश लोकमनोरन्जनाबरोबरच समाजप्रबोधन हाही होता. तसेच पूर्वीच्या काळी बायकांनी नाचणे म्हणजे- पाठीला पोक काढून जास्त ताठ न होता...नुसते अलगदपणे जीव नसल्यासारखे आपले हातपाय आणि कम्बर हलवणे आणि जागच्या जागी उड्या मारणे... असे होते. ;) (सन्दर्भासाठी जुने मराठी पिक्चर पहावेत!) ;) नन्तर कालपरत्वे तमाशाचे सन्दर्भ बदलले. काही गरजू लोकांनी तमाशा'ला ...मुलींना, बायकांना नाचवून पैसे कमवण्याचे साधन बनवले. अर्थात त्या गरजू लोकांची गरीबी, अज्ञान पाहता त्यात विशेष गैर असे नव्हते.
पण पुढे पुढे तमाशातील नाचाची स्टाईल बदलली, वग-गौळणी यांचे कन्सेप्ट जरी तेच्च असले तरी त्यांची भाषा बदलली... थोडीफार अश्लीलतेकडे झुकू लागली.... साहजिकच जनतेचा प्रचन्ड प्रतिसाद मिळतोय म्हटल्यावर पारम्पारिक लावण्यांच्या ऐवजी सिनेमातील गाणी वाजू लागली.. व लावणीतला उत्तानपणा वाढला..
अर्थात "सुलोचना ताई चव्हाणां"सारख्या लावणीसम्राज्ञी स्टेजवर देखील डोक्यावरचा पदर ढळू न देता आपली ९६ कुळी खानदानीपणा टिकवून होत्या. जयश्रीताई गडकर, लीला गान्धी, गेला बाजार- सुरेखा पुणेकर. सगळ्यांनी लावणी-तमाशातले आपापले वेगळेपण सिद्ध केले.
आणि लावणीमध्ये जरी अनेक लुभावन्या अदा असल्या तरीही त्यास कोणी "शास्त्रीय नृत्यप्रकार" म्हणू शकत नाही. भरतनाट्यम, कथक इ. नृत्यप्रकारांकडे ज्या आदराने पाहिले जाते त्या आदराने लावणीकडे पाहिले जात नाही. आज मध्यमवर्गीय / उच्च मध्यमवर्गीय लोक ज्या उत्साहाने आपल्या मुलींना शास्त्रीय नृत्याच्या क्लासेसला घालतात.. त्या उत्साहाने कुणी या वर्गातील लोक मुलींना लावणी शिकवत नाहीत. कारण माझ्या मताप्रमाणे लावणीमध्ये तो सुसंस्कृतपणा नाही. याबद्दल कुणाला कितीही खन्त वाटत असली तरी हेच सत्य आहे.
27 Mar 2012 - 2:59 pm | यकु
>>>>पूर्वीच्या काळी -साधारणतः >>>>पेशवाईच्या उत्तरार्धात 'पठ्ठे बापुरावां'नी लावणी- तमाशासाठी आपले आयुष्य वाहून दिले. पण तेव्हा "तमाशा"चा उद्देश लोकमनोरन्जनाबरोबरच समाजप्रबोधन हाही होता. तसेच पूर्वीच्या काळी >>>>बायकांनी नाचणे म्हणजे
थोडीशी सुधारणा: उत्तर पेशवाईतील तमाशांत बायका नाचत नसत, बायकांची कामे नाच्ये करीत, खरं सांगायचं तर नाच्येच तमाशात शोभून दिसतात
- ( साभार, औंधाचा राजा, ग. दि. माडगूळकर )
28 Mar 2012 - 10:31 am | मृगनयनी
यकु'जी... "पठ्ठे बापुराव" नामक एका अत्यन्त जुन्या मराठी धवलकृष्ण चित्रपटात लावणीवरती बायकाच नाचताना दाखवल्या गेल्या आहेत. दुसर्या बाजीराव पेशव्यांच्या दरबारात पठ्ठे बापुराव स्वतः लावणी म्हणत आहेत, बाजूला डफवाला वाजवत आहे आणि त्या तालावर बायका नाचत आहेत.. असे दृश्य दाखविले गेलेले आहे. अर्थात या बायका म्हणजे पेशव्यांच्या पदरी असलेल्या दासी-बटकीच असत. तसेच त्या बायकांना जसे नाचायला जमेल.. तश्या त्या नाचत असत व "लावणीप्रकारावर बाई नाचणे" ही संकल्पना तेव्हा नवीन असल्याने लोकही कुतुहलाने बघत असत.
बाकी "बाईला नाचवणे" ही संकल्पना फार पूर्वापार चालत आलेली आहे. पहिल्या पेशव्यांच्या काळात "मस्तानी" नामक एक मुस्लिम युवती नाचगाण्यात निपुण होती. पण बुन्देलखन्डावरील स्वारीत आलेल्या लुटीमध्ये ज्या काही स्त्रिया तिकडून पुण्यात आणल्या गेल्या.. त्यामध्ये " मस्तानी " देखील होती. काहीलोकांच्या मते ती बुन्देलखन्डाची राजकन्या होती... पण तरीही पेशव्यांच्या राजदरबारी ती नाचायची. पुढे पहिले बाजीराव'जी तिच्या प्रेमात पडल्यावर मस्तानी फक्त बाजीरावांसाठीच नाचायची..
तसेच इतरही अनेक मुघल स्त्रिया.. ज्यांना जुलमाने दासी बनवले जायचे...त्यांना देखील त्या त्या मुलखाच्या राजदरबारी सरदारांचे मनोरन्जन करायला नाचावे लागायचे... अर्थात लावणीशी याचा सम्बन्ध नाही. पण "बाई नाचवणे" ही संकल्पना खूप जुनी आहे..
अगदी पुराणात देखील इन्द्राच्या दरबारी रम्भा, उर्वशी, मेनका..इ. अप्सरा होत्याच्च की!
28 Mar 2012 - 3:52 pm | विजुभाऊ
पहिल्या पेशव्यांच्या काळात "मस्तानी" नामक एक मुस्लिम युवती नाचगाण्यात निपुण होती. पण बुन्देलखन्डावरील स्वारीत आलेल्या लुटीमध्ये ज्या काही स्त्रिया तिकडून पुण्यात आणल्या गेल्या.. त्यामध्ये " मस्तानी " देखील होती. काहीलोकांच्या मते ती बुन्देलखन्डाची राजकन्या होती... पण तरीही पेशव्यांच्या राजदरबारी ती नाचायची
कित्ती खोट बोलताय हो. ( २५० वर्षांनन्तर तरी त्या स्त्री बद्दल पुणेकरांचा आकस कमी होणार नाही का?)
पेशव्यांच्या राजदरबारात नाचगाणे व्हायचे हे नव्यानेच ऐकतोय. असो.
मस्तानी नर्तकी होती वगैरे वावड्या पेशव्यांच्या वाड्यातूनच ( काशीबाई ने) उठवल्या गेल्या होत्या. मस्तानी ही बुंदेलखंडचा हिंदु राजा छत्रसाल बुंधेला याची मुलगी ( पर्शियन पत्नीपासूनची ) होती महंमदखान बंगेश याच्या कैदेतून बाजीरावाने छत्रसालाला सोडविले आणि त्याचे राज्य पुन्हा मिळवून दिले त्यावेळेस केलेल्या उपकाराची फेड म्हणून छत्रसालाने स्वतःची मुलगी बाजीरावाला दिली लग्नाचा आहेर म्हणून त्याच्या राज्याचा काही भाग ( काल्पी, झाशी , सागर) यांच्या समवेत ३३ लाख सुवर्णमुद्रां देखील दिल्या.
घरुन होत असलेल्या विरोधामुळे बाजीरावाने शनिवारवाड्यात मस्तानीसाठी वेगळा दरवाजा बांधला. ( मस्तानी दरवाजा) त्या नंतर गृहकलह टाळण्यासाठी मस्तानीला वेगळा महल बाम्धून दिला.
बाजीरावाच्या मृत्यूनंतर मस्तानी सती गेली ( आत्महत्या केली ) पाबळ येथे मस्तानीची समाधी ( कबर नव्हे) आहे.
मस्तानीच्या समशेरबहाद्दूर या मुलाचा सांभाळ काशीबाईने केला. या मुलाने पानिपताच्या लढाईत मोठा पराक्रम गाजवला.
कृपा करून आता तरी मस्तानीची विटंबना थांबवा
29 Mar 2012 - 3:13 pm | मृगनयनी
:| :| :| मस्तानीबद्दल पुणेकरांच्या मनात आकस वगैरे कधीच्च नव्हता आणि नाहीये.... आकस असता तर पुण्याच्या आईसक्रीमला, आईसक्रीम-पार्लरला, फालुद्याला... "मस्तानी" नाव कधीच दिले गेले नसते.. ;)
तसेच आपले "पेशव्यांच्या राजदरबारात नाचगाणे व्हायचे हे नव्यानेच ऐकतोय. असो." खरोखरंच हस्यास्पद वाटते.. किन्वा मग आपला पेशव्यांच्या इतिहासाबद्दलचा अभ्यास थोडा कमी पडला असावा!! कारण शनिवारवाड्याच्या वास्तुरचनेतच ४ प्रशस्त चौक आणि ८ प्रचंड मोठे दिवाणखाने होते.- १. ग़णपती रंग महाल- मुख्य दरबाराचा महाल, २. नाचाचा दिवाणखाना, ३. आरसे महाल, ४. जुना आरसे महाल, ५.रघुनाथ बाळाजी यांचा दिवाणखाना, ६. पहिल्या पेशव्यांच्या दिवाणखाना ७. नारायणरावाचा महाल, ८. हस्तीदंती महाल
याशिवाय पेशवे कुटुंबातील इतरजणांना रहाण्यासाठी, अनेक दालने व सदनिका शनिवारवाड्यात होत्या.
त्यांपैकी- गणेश रंग-महाल किंवा मुख्य दरबाराचा महाल हा बाळाजी पेशव्यांनी १७५५ मध्ये गणेशोत्सव भव्य प्रमाणात साजरा करता यावा म्हणून मुद्दाम बनवून घेतला होता. हा महाल अतिशय भव्य असाच होता. एका वेळी १०० नर्तकी सुद्धा यात नाच करू शकत असत. एका टोकाला सोन्याचा पत्रा चढवलेली संगमरवरी गणेशमूर्ती ठेवलेली असे. या मूर्तीच्या भोवती पुराणातील प्रसंगांचीच सजावट केलेली असे.
पेशव्यांना काय किन्वा इतर कोणत्याही राजघराण्यातल्या, सरदार घराण्यातल्या लोकांना काय... कोणत्याही लढाई-युद्धाच्या नन्तर घरी परतल्यावर मनोरन्जनाची नितान्त गरज असायची. त्यासाठीच अनेक नर्तकी ठेवल्या जायच्या. त्यांना प्रशिक्षणही दिले जायचे
रणजीत देसाईंच्या "स्वामी" मध्ये देखील या नर्तकींचा उल्लेख आहे. राघोबादादांना अश्या नाचगाण्याची खूप आवड होती. शनवारवाड्यात राघोबादादांसाठी (हेच ते ज्यांनी पहिल्यांदा अटकेपार झेन्डे लावले) बर्याचदा "अश्या" मैफिली वेगवेगळ्या कारणांनी सजायच्या त्यांच्या आग्रहाखातर एकदा "माधवराव पेशवे" देखील या नर्तकीच्या मैफिलीला बसले.. "नर्तकी" विविध अदांनी माधवरावांना इशारे करत होती.. परन्तु माधवराव बर्यापैकी सात्विक वृत्तीचे असल्याने त्यांना ते काही रुचले नाही..व ते तडक त्यांच्या प्रियपत्नीच्या "रमा" बाईंच्या महालाकडे गेले.
आपण कुणीही रणजीत देसाईंच्या "स्वामी" मध्ये या सर्व गोष्टींची खातरजमा करू शकता... :)
अरे बापरे!!... काशीबाईंवर असे आरोप म्हणजे अति होतंय... कारण काशीबाई या अत्यंत सालस आणि गरीब गाईसारख्या होत्या. तसेच त्या नेहमी आजारी असल्याने पहिल्या बाजीरावां- राऊंच्या दुसर्या ल्ग्नाबद्दलही त्यांना आक्षेप नव्हता.
तसेच "मस्तानी" ही बुन्देलखन्डाचा राजा- छत्रसाल याची मुलगी असली, तरी ती "अनौरस" होती... त्यामुळे काही ठिकाणी "मस्तानी ही बुन्देलखन्डाची राजनर्तकी" असल्याचेही उल्लेख आढळतात. तसेच नृत्याबरोबर मस्तानी "गायनकले"तही कुशल होती. छत्रसाल स्वत:च्या "औरस" मुलींना आंदण म्हणून कुणाला "असेच" देणे कधीच शक्य नव्हते. नृत्य (कथक) आणि गायनकलेत निपुण असल्याने मस्तानी पेशवेदरबारी या दोन्ही कला सादर करीत असे.. परन्तु राऊ पेशवे तिच्या प्रेमात पडल्यावर साहजिकच तिला दरबारात नाच गाणे करावे लागले नाही.. पुढे मस्तानी-बाजीराव विवाहबन्धनात अडकल्यावर घरातल्याच अनेक जणांनी हिन्दु-मुस्लिम विवाहामुळे नाके मुरडली. फक्त एक बाई त्यांच्या पाठीशी उभी राहिली आणि ती म्हणजे "काशीबाई"..
त्यामुळे काशीबाईंवर वाट्टेल ते आरोप करणे उचित वाटत नाही... एकीकडे राजारामांना राज्य मिळावे, म्हणून सावत्र मुलावर- लहानग्या सम्भाजी राजांवर विषप्रयोग करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्या "सोयराबाईं"ना अतिशय सोज्वळ प्रेमळ आई वगैरे ठरवायचं.. किन्वा सोयराबाईंनी असे काही केलेच नाही.. म्हणून आव आणायचा.. ( विजु भौ- हे आपल्याला उद्देशून नाही...शिवरायांचा.मूळ इतिहास बदलू इच्छिणार्यासांठी आहे.. ) आणि दुसरीकडे अतिसोशिक, नवर्याचे हित चिन्तणार्या काशीबाईंना मात्र वावड्या उठवणार्या म्हणायचं... हे काही पटत नाही.
सहमत!... नाना फडणवीसांनी याच दरवाजाला नन्तर "अली बहादूर दरवाजा" असे नाव दिले .. "अली बहादूर" हा मस्तानीचा नातू होता..
मस्तानीने मानसिक अस्वास्थ्य असह्य झाल्याने आत्माहत्या केली.. आणि साहजिकच लग्नानंतर मस्तानी हिन्दु बनल्यामुळे (पक्षी : तिने हिन्दु धर्म स्वीकारल्यामुळे) तिची समाधी बान्धणे रास्त वाटते..
मस्तानी आपल्या मुलाची देखील दोन नावे ठेवली - समशेरबहादूर (मुस्लिम )आणि कृष्णसिन्ग (हिन्दु)
सहमत!.. पहा.. काशीबाई किती चांगल्या होत्या... :)
तूर्तास कुठेही मस्तानीची विटम्बना झालीये.. असे वाटत नाही...कारण जे सत्य आहे ते आहे..... त्यामुळे काही थाम्बवण्याचा प्रश्नच नाही... :)
* मस्तानी नि:संशय सुन्दर होती. तिने काथ घातलेले विड्याचे मसाला पान खाल्ल्यावर त्याचा लालसर रस तिच्या गळ्यातून - खाली पाझरताना दिसायचा.. असेही काहीसे कानावर आल्याचे स्मरते... अर्थात ती जेव्हा दरबारी नाच -गाणे करायची तेव्हा दरबारातल्या लोकांच्या या प्रतिक्रिया असाव्यात बहुधा... :)
30 Mar 2012 - 6:19 pm | कपिलमुनी
तुमचे संदर्भ चित्रपट , स्वामी आणि दंत कथा आहेत ..त्यामुळे जरा वाचन वाढवा आणि मग लिहा ..
उचलला हात आणि लागले टंकायला ...
30 Mar 2012 - 7:07 pm | मृगनयनी
तुमचे संदर्भ चित्रपट , स्वामी आणि दंत कथा आहेत ..त्यामुळे जरा वाचन वाढवा आणि मग लिहा ..
कपिलमुनी.. मी दिलेले शनवारवाडा, त्यातील दालने, खोल्या यांचे वर्णन नक्कीच कोणती दन्तकथा नाही. तसेच रणजित देसाईंची "स्वामी" कादम्बरी दन्तकथेवर आधारित असेल, तर मग "श्रीमान योगी", "मृत्युंजय", "छावा", "राधेय" या देखील दन्तकथाच म्हटल्या पाहिजेत.. ;) ;) ;)
कारण कर्ण, शिवाजी महाराज, सम्भाजी हे सगळे नक्कीच पेशव्यांच्या आधी होऊन गेलेत.. आणि वर नमूद केलेल्या कादंबर्यांवरून देखील अनेक चित्रपट येऊन गेले...
बाकी तुमचे काही थोडेफार वाचन झालेले असेल, तर तुम्हीही तुमच्या अकलेचे दिवे प्रज्ज्वलित करू शकता..(पक्षी: पाजळू शकता)....अर्थात दन्तकथेव्यतिरिक्त इतर कुठले उचित सन्दर्भ दिलेत, तर तुमच्याही वाचनाची खोली कळेल... :)
30 Mar 2012 - 8:12 pm | मी-सौरभ
पुढच्या वेळेपासून टंकताना..
तुमच्या वाचनाची खोली (कुठे आहे? कुणाच्या घरी आहे? त्याचे क्षेत्रफळ किती, खोलीत काय काय आहे, खोली वातानूकूलित आहे की पंखा आहे?) बद्दल आगाऊ माहिती दिलीत तर अश्या आदरणिय आय डींना त्रास होणार नाही हे लक्षात ठेवा...
(तुमचा हितचिंतक)
30 Mar 2012 - 9:07 pm | मृगनयनी
@ सौरभः- "खोली" हा शब्द "DEPTH" या अर्थाने घ्याल, अशी किमान अपेक्षा होती...!!!!!!! :)
30 Mar 2012 - 9:54 pm | धन्या
जेव्हा कादंबर्यांचे दाखले पुरावा म्हणून दिले जातात तेव्हा कपाळावर हात मारुन घेण्यापलीकडे आपण काहीच करु शकत नाही. :)
कादंबरीकाराने लेखन करताना कादंबरी विषयाचा अभ्यास केला असेल, त्या अनुषंगाने संबंधीत ठीकाणी जाउन माहिती मिळवली आहे असं जरी थोडा वेळ गृहीत धरलं तरी असं लेखन हाच ईतिहास समजणं हे जरा अती होतं.
30 Mar 2012 - 11:02 pm | मृगनयनी
धन्या... "स्वामी" या कादम्बरीचा उल्लेख मी सन्दर्भासाठी दिलेला आहे... अर्थात "आग असल्याशिवाय धूर दिसत नाही". ... हेही तितकेच्च खरे. :)
"स्वामी" मध्येच्च उल्लेख असलेली "रमाबाई पेशवें" ची समाधी आजही "थेऊर" येथे आहे. थेऊरच्या गणपतीमन्दिराचा उद्धार पेशव्यांनी केल्याचा सन्दर्भ "स्वामी" मध्ये आहे. जो थेऊरच्या गणेशमन्दिरातही आढळतो.
शनवारवाड्यात गेल्यावर तिथल्या भित्तीफलकावर गणेश-रंगमहालाचा उल्लेखही आढळतो.
नॉर्मली कादम्बरी जास्त आकर्षक करण्यासाठी त्यात जरी थोडाफार मसाला किन्वा अतिभावनाप्रधान वाक्ये घातली जातात...पण ही तर सत्य घटनेवर आधारलेली एक ऐतिहासिक कादम्बरी. त्यामुळे मूळ इतिहासाला किन्वा घटनांना धक्का लावणे सहसा शक्य नसते.
"स्वामी" च्या सत्यासत्यतेचा पडताळा घेणारे कर्णा'बद्दल बोलताना लिहिताना मात्र "मृत्यूंजय" या एका कादम्बरीचाच आधार घेतात.. हे पाहून अम्मळ मौज वाटली. :)
तसेच "स्वामी" मध्ये काही गोष्टी कपोलकल्पित आहे, असे म्हणणार्यांना "छावा" मधल्या अनेक घटना आणि गोष्टी कश्याकाय खर्या वाटतात बरं ? :)
30 Mar 2012 - 11:18 pm | चिंतामणी
>>>"स्वामी" च्या सत्यासत्यतेचा पडताळा घेणारे कर्णा'बद्दल बोलताना लिहिताना मात्र "मृत्यूंजय" या एका कादम्बरीचाच आधार घेतात.. हे पाहून अम्मळ मौज वाटली. Smile
तसेच "स्वामी" मध्ये काही गोष्टी कपोलकल्पित आहे, असे म्हणणार्यांना "छावा" मधल्या अनेक घटना आणि गोष्टी कश्याकाय खर्या वाटतात बरं ? Smile
सहमत
2 May 2014 - 1:58 pm | बन्डु
* मस्तानी नि:संशय सुन्दर होती. तिने काथ घातलेले विड्याचे मसाला पान खाल्ल्यावर त्याचा लालसर रस तिच्या गळ्यातून - खाली पाझरताना दिसायचा.. असेही काहीसे कानावर आल्याचे स्मरते... अर्थात ती जेव्हा दरबारी नाच -गाणे करायची तेव्हा दरबारातल्या लोकांच्या या प्रतिक्रिया असाव्यात बहुधा... Smile >>> ती राणी पद्मीनी हो....! इतिहासातील सर्वांत नाजूक स्त्री.
27 Mar 2012 - 12:07 pm | नंदन
शतकी - खरं तर, त्रिशतकी धाग्यांच्या 'निश' मार्केटचा परा हा अनभिषिक्त सम्राट आहे याची पुन्हा एकदा खात्री पटली ;)
27 Mar 2012 - 12:32 pm | Nile
=))
1 May 2014 - 11:57 am | बालगंधर्व
मला काय वटते कि तमाशा हि करनातकि सन्स्कुत्री अहे. हिकदे महराशत्रात गान्यामधे पन (करनातकि कशेदाआ मे काडला, हाथ नगा लौ मज्या साडीला) अश्य वोळी अहेत. अनि अपलया शिवाजि म्हराजानचे पन मुल सन्थान हे कर्नातक अहे. लवनी कर्ताना डोकीवर गजरा मलन्याचे परमपरा पन आमचया करनातकाचेच अहे. करन हिक्डे महाराशतरात बैका शेवनतीचे फुल घलतत. तमाशामधे लवनी असते कि लवनीमधे तमशा असतो, हे मला न सुतलेला कोडा आहे.
1 May 2014 - 12:09 pm | कवितानागेश
मला मात्र सगलाच्या सगला कोडा सुतलाय! :)
2 May 2014 - 11:16 am | बालगंधर्व
लिमौजेत आक्काआ, तुमाला सगला कोडा सुतला अहे तर्र मग मजी मदद क्रु शत्का तुमे. मला प्लेज सनगा तमाशात लवनी असते का लवनीत तमशा> कारन मे पन कुहुप लवन्या पैल्या अहेत. अमच्या गवला मि डोलकि वाजवयचो. पन ते फत्क शलेच्यया करयकर्मआत. अमचया गवाला ( शलिनि बिदर्कर) चे ल्वनी फेमस होते. लिमौजेत अक्का, तुमेच मजे मदद क्रु श्क्ताअ.
27 Mar 2012 - 12:39 pm | मृत्युन्जय
एकदम नवा कोरा आणि युनिक प्रश्न.
ह्या विषयावरती चर्चा व्हावी अशी आमची गेली अनेक वर्षाची मागणी होती.
नौवारीमधल्या गोग्गोड तमासगिरीणीचा फ्यान
परा
27 Mar 2012 - 1:48 pm | अनुप ढेरे
'संस्कृती ' या शब्दाची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असु शकते... संस्कृती बद्दल तुमची कल्पना सांगा आधी...
27 Mar 2012 - 1:56 pm | मोहनराव
कसं काय परा बरं हाय का? काल काय ऐकलं ते खरं हाय का? ;)
27 Mar 2012 - 2:07 pm | किचेन
आजच्या सकाळ्मधल्या एका बातमीचा संदर्भ टाकला असता तरी चालल असत.
पोवड्याला महाराष्ट्राची संस्कुती बनवण्याचं बघा.मनावर घ्या.पोवाडा फक्त शिवाजीम्हाराजान्पुरता मर्यादित न ठेवून इतर वाक्तीन्वारही करावा.शहीद भगतसिंह, स्वामी विवेकानंद इ.इ. अनेक व्यक्तींवर पोवाडा लिहू शकतो.
27 Mar 2012 - 2:08 pm | स्मिता.
मोजून साडे सात ओळींचा धागा?? आपल्यासारख्या जेष्ठ, अनुभवी सदस्याकडून ही अपेक्षा नव्हती.
27 Mar 2012 - 2:13 pm | परिकथेतील राजकुमार
जर हे सदर तुम्ही सभासदानी शंका विचाराव्यात म्हणुन जर चालवत असाल तर मग मला शंका विचारायचा हक्क नाही आहे का?
27 Mar 2012 - 2:36 pm | स्मिता.
आम्ही छुप्या संपादिका असू नाहितर आणखी कश्या संपादिका असू, त्याबद्दल तुम्हाला एवढी जळजळ का? इनोचा डबल डोस घेवून शांत पडा.
आणि हो, हे सदर फक्त शंका विचारायला नसून चर्चा करण्याकरता आहे. आता तुमच्यासारख्या सूज्ञ व्यक्तिला 'चर्चा' या शब्दाचा अर्थ कळत असेलच. नसेल कळत तर एवढंच सांगते की चर्चेत तुमचीही अतिशय मौलिक अशी २-४ मतं मांडली असती तर आम्हाला चर्चा कशी करायची ते तरी कळलं असतं.
27 Mar 2012 - 3:01 pm | गणपा
आता बोला सन्माननिय पराजी, बोला आता! टेल टेल परा सर, टेल नाउ! ;)
27 Mar 2012 - 3:05 pm | पैसा
अच्रत हल्क्त बव्ल्त!
27 Mar 2012 - 3:05 pm | प्यारे१
ड्वाळे पाणावले....
27 Mar 2012 - 3:21 pm | परिकथेतील राजकुमार
हे आले लगेच गो. रा. खैरनार.
27 Mar 2012 - 3:17 pm | परिकथेतील राजकुमार
नुसते संपादक म्हणालो तर येवढे रागवायचे कारण काय ?
एखाद्याला संपादक म्हणणे, हे अपशब्द वापरणे अथवा अपमान करणे ह्या सदरात बहूदा मोडत नाही.
जाणकार अधिक प्रकाश टाकतीलच.
27 Mar 2012 - 2:27 pm | मालोजीराव
तमाशा महाराष्ट्राची संस्कृती आहे कि नाही माहित नाई...पण पाटील,सरंजाम,इनामदार घराण्यांची नक्कीच संस्कृती होती !
या लोकांचा राजाश्रय होता तमाशाला, पूर्वीच्या काळी आमच्या वाड्याच्या चौकात तमाशा व्हायचा.
बाई नाचवणे हा उद्देश कधीच नव्हता ...एक मनोरंजन,तत्कालीन सामाजिक स्थितीचे वर्णन असायचे ,गण-गौळण,पोवाडे इ. अंतर्भूत असायचे.
आताच्या काळात जो बीभत्सपणा,अश्लीलता तमाशात आलीये ती पूर्वी नक्कीच नव्हती हे खात्रीने सांगू शकतो.
- मालोजीराव जगदाळे-पाटील
27 Mar 2012 - 2:29 pm | सुहास..
>>>>> तमाशा खरंच महाराष्ट्राची संस्कृती आहे का ?
हा ज्याच्या त्याच्या पसंतीचा प्रश्न आहे. आम्ही कोणाच्याही तमाशात लुडबूड करत नाही.
बाय द वे, सुरे (सुरेखा पुणेकर) परवा काळाराममंदीरात भजनाला गेल्यापासून साली आपली दोलायमान अवस्था झाली आहे. विश्वचषक क्रिकेटच्या अंतिम सामन्याच्या दरम्यान मी चैत्रालीचा नाद करायचा नाही ची तिकीटे ब्लॅक ने असेना मिळु दे .......मी काळाराम मंदीरात भजनं गाईन असं बोलून गेलो. . आणि कर्मधर्म संयोगाने चैत्रालीच्या तमाशाची तिकीटे मिळाली... आता भजन गायची जवाबदारी माझी आहे. आणि ती मी पूर्ण करणार नाही. कोणाला काय म्हणायचे असेल ते म्हणू दे..........!
-बाकीचे मरुदे
(तमाशाळु )
27 Mar 2012 - 6:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)
-दिलीप बिरुटे
27 Mar 2012 - 2:44 pm | सूड
एवढासा लेख म्हणजे चटावरचं श्राद्ध उरकल्यागत वाटलं, आणखी तपशील हवे होते.
27 Mar 2012 - 2:56 pm | मोहनराव
+१
एखादा फोटो द्या चिकटवुन!!
27 Mar 2012 - 3:18 pm | कपिलमुनी
आंजा वरून साभार
27 Mar 2012 - 3:18 pm | कवितानागेश
टाका तमाशासाठी चारशे आठशे तंबू,आणि मग तुम्हाला काय बघायचं ते.मिळाल तर समजा तमाशा संस्क्रुतिक बनवतो,नाही मिळाल तर समजा आपली संस्क्रुती एवढी स्वस्त नव्हती थोडी महाग होती.पुढच्या वेळेस चारशेआठश्या ऐवजी हजार तंबू टाका बघा काय होतंय ते, अन सांगा आम्हाला.आम्ही पण ठरवू तमाशा बघायचा कि न्हायी.
---------------------------------------------------------------------------------------
सुखि भेळेतली मिरची लाललाल!
27 Mar 2012 - 3:24 pm | सूड
माताय, बायामान्सं पन तमाशाला जायाच्या गगोष्टी कराया लागल्या. सही वाचून तुम्ही खजूरबागेतल्या वाटता.
27 Mar 2012 - 3:29 pm | परिकथेतील राजकुमार
माननीय माउ ह्यांचा अतिशय निरागस प्रतिसाद.
तुम्ही डाव्या शेपटीच्या मारुतीच्या देवळाजवळ राहता का हो ?
27 Mar 2012 - 3:24 pm | पियुशा
माउ ग्रेट आहेस ग __/\__
27 Mar 2012 - 3:35 pm | जाई.
माऊ तुस्सी ग्रेट हो
27 Mar 2012 - 8:36 pm | निनाद मुक्काम प...
तमाशा , पोवाडे ,कीर्तन , भजन, शास्त्रीय संगीत , भावगीते आणि सिनेसंगीत , नाट्य संगीत ,भारुड आणि अजून बरेच संगीताचे प्रकार महाराष्ट्रातील जनतेने पिढ्यानपिढ्या जोपासले आहेत.
ह्यातील प्रत्येक संगीत ऐकणारा श्रोतावर्ग हा भिन्न सामाजिक गटात पूर्वी मोडायचा. पण शेवटी ह्या संगीतातून सर्वांना निखळ आनंद मिळायचा.
उदा शास्त्रीय संगीत ऐकतांना मंत्रमुग्ध होणारा श्रोत्याच्या आनंद आणि तमाशाच्या फडात फेटे उडवून शिट्या मारतांना बेभान होणारा श्रोता ह्यांच्या आनंदात उजवे कोणते हे ठरविण्यासाठी कोणता निकष लावावा? मुळात का लावावा.?
तुला शास्त्रीय संगीतातले काय कळते ? असे विचारून हिणवणे मी समाजात खुपदा पहिले आहे.
पण पोवाड्यांनी सयुक्त महाराष्ट्र चळवळ किंवा दादांच्या वगाने शिवसेनेचा जनमाणसात प्रचार किंवा शिवरायांच्या आणि स्वातंत्र्य पूर्व काळात कीर्तनाने झालेली जनजागृती किंवा सामाजिक सुधारणा आपण नाकारायच्या का ?
तमाशा हीच फक्त आपली संस्कृती नसली तरी महाराष्ट्राची जगभरात ओळख जसा पंजाब्यांचा भांगडा ,गुजरात्यांच्या गरबा तशी महाराष्ट्राची लावणी हे जगमान्य समीकरण आहे.
मला असे वाटते कि सध्याच्या काळात निर्विवादपणे तमाशा हे आपल्या संस्कृतींचे प्रतिनिधित्व करते. ह्याचे एकमेव कारण क्लास आणि मास ह्यांना आवडणारा व मोठ्या प्रमाणात जनाश्रय मिळणारा हा प्रकार पाहण्यासाठी मोठी संगीत साधना करणे किंवा उच्च दर्जाचे कानसेन असणे हि अट नसते. येथे फक्त अनुभवणे असते
.
जर्मनी मध्ये दक्षिण भारतीय आयटी मध्ये प्रचंड संख्येने असल्याने त्यांनी येथे कत्थक व त्यांचे इतर प्रकार इतके लोकप्रिय केले आहेत की अनेक महिने त्यांच्या क्लास ला प्रवेश मिळत नाही.
पण नुकतेच हेनोवर ह्या शहरात जर्मनी ह्या शहरात बेली डान्स वर एक मोठा मेळा झाला त्यात असलेल्या बॉलीवूड संगीतात सर्वात जास्त लोकप्रिय गाणे आपले जाऊ द्या न घरी हे ठरले.
माझ्या काही परदेशी मित्रांनी कथ्थक आदी प्रकार खूप हास्यास्पद वाटतात.
मी त्यांना एकदा तू नळीवर लावणी दाखवली. अर्थात त्यांना ती आवडली.
ढोलकीची थाप आणि नृत्याविष्कार आणि मुद्राभिनय सारेच आवडले.
काहीही काळत नसले तरी हि मुलगी तुमचे मनोरंजन करत आहे हा संदेश त्यांच्या पर्यंत पोहोचला.
मनोरंजनाची व्याख्या व्यक्तीसापेक्ष असते. मात्र लोकशाहीत संख्येनुसार निदान तमाशा किंवा लावणी टीवी वर लागली कि त्यावर डोळे खिळतात हे सत्य आहे.
27 Mar 2012 - 8:56 pm | Nile
आपण बरोबरच (योग्य अंतर ठेऊन*) तमाशाला जाऊ आणी अनालीशीश करू, काय म्हंतो?
*बावळट प्रश्न(आणि येडपट लोक) टाळण्याकरता खुलासा.
27 Mar 2012 - 11:19 pm | राजेश घासकडवी
आपल्या हाताची तर्जनी कोणाच्या डोळ्यासमोर नाचवण्याइतकं बाई नाचवणं सोपं असतं का? कायहो, आत्तापर्यंत तुम्ही किती बाया नाचवल्या सांगता का? तुम्ही मुकाट्याने तुळशी वृंदावनाची आरती करून जपा संस्कृती. तेवढाच खारीचा वाटा. च्यायला, स्वतः काही करायचं नाही, आणि जे लोक काही चांगलं संस्कृतीरक्षण करताहेत त्यांचे पाय ओढायचे. काय म्हणावं?
माझ्या मते तुमचा निष्कर्ष साफ चूक आहे. बाई नाचवली की संस्कृती रक्षण होत नाही याबद्दल काही विदा आहे का तुमच्याकडे? बॉलिवुडी चित्रपट हे आपल्या संस्कृतीचं मोठं अंग आहे. ते बाया नाचवल्याशिवाय टिकलंय का? नुसतं टिकलं नाही, चांगलं भरभराटीला येतं आहे.
रडव बाई आणि जप संस्कृती हेही नवीन मराठी सीरियल्सवरून दिसून येतं. शिव्यांच्या संस्कृतीबद्दलही असंच काहीसं (थोड्या वेगळ्या शब्दांत) म्हणता येतं. आपल्या संस्कृतीत स्त्रीला देवीचं स्थान दिलं आहे ते उगीच का?
27 Mar 2012 - 11:24 pm | Nile
लै भारी!
साष्टांग स्विकार करावा!!
28 Mar 2012 - 1:45 pm | परिकथेतील राजकुमार
बाया नाचवणे हे एकदा जमून गेले की अत्यंत सरळसोट काम आहे ह्याची कदाचीत आमचे वयोवृद्ध मित्र माननीय श्री. घासुगुर्जी ह्यांना जाणिव नसावी. 'केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ' हे ध्यानात ठेवून त्यांनी देखील हे कार्य करून पहावे.
बाकी आम्ही किती बाया नाचवल्या हा आमचा खाजगी प्रश्न असल्याने आम्ही उत्तर देण्यास बांधील नाही. अर्थात आमच्या धमालपंताच्या शेतावरल्या घराच्या आजूबाजूला चौकशी केल्यास आमचे प्रताप तुम्हाला समजतीलच.
आम्ही काय करतो आणि काय नाही हे तुम्हाला कळाले तर तुमचे पांढरपेशी आयुष्यच थरारुन उठेल. बाकी उसात राहणार्यानी तुळची वृंदावनाचे गोडवे गावेत हे एक आश्चर्यच.
अतिशय चुकीची तुलना.
मुळात बॉलिवुडला आपली संस्कृती म्हणता येईल का ? आणि बॉलिवुडवाल्यांना बाया नाचवायचे देखील रग्गड पैसे तिकिटबारीवरती मिळून जातात. भिकार भिकार नाचांमुळे टूकार टूकार चित्रपट देखील गल्ला जमवतात. इथे आम्हाला एक बाई नाचवायची म्हणले तर स्वतःच्या खिशात हात घालावा लागतो आणि बाटलीचा खर्च होतो तो वेगळाच.
आम्ही सीरियल्स बघत नाही आणी शिव्या देखील देत नाही त्यामुळे नो कॉमेंटस.
29 Mar 2012 - 1:44 am | राजेश घासकडवी
सरळ सांगा ना एकही नाचवली नाही म्हणून. शेपूट घालायचंच तर मुकाट्याने सरळ घालावं, अशा गाठी कशाला मारून ठेवता?
हा आणखीन बोलबच्चनपणा. मूठ बंद करायची आणि म्हणायचं, 'आत माहित्त्ये का, मोठ्ठा अजगर आहे.' उघडली की अळी तरी दिसेल की नाही कोण जाणे!
घ्या, तिरकसपणादेखील कळत नाही. बाया नाचवणं हे तुळशीवृंदावनाची पूजा करण्यापेक्षा अधिक कठीण अधिक भरीव संस्कृतीरक्षक कार्य आहे, एवढंच सांगायचं होतं.
धागाच का नाही काढत नवा?
अहो मग संस्कृतीरक्षण काय फुकटात होतं का? उगाच काहीतरी पिरपीर करायची, म्हणे फुफाट्याकडे बघायचं तर डोळे दिपतात आणि गॉगलचा खर्च येतो! खर्च नाही केला तर सौंदर्य कसं दिसणार? म्हणून तर तुम्हाला तुळशी वृंदावनाचा सोपा उपाय सांगितला तर ऐकत नाहीत...
30 Mar 2012 - 11:47 am | परिकथेतील राजकुमार
पण आम्ही बाई नाचवली का बाया नाचवल्या का बाप्पे नाचवले ह्यात तुम्हाला इतका विंटेष्ट्र का ?
तुम्हाला 'अळी मिळी गुपचिळी' माहिती आहे का हो ?
आम्ही इथे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा प्रगल्भ विषय काथ्याकूटाला घेतलेला असताना, तुम्ही उगाच आमच्या वैयक्तिक आयुष्यावरती चिखलफेक करण्यात मग्न आहात. ह्याच्यामुळेच आज महाराष्ट्र मागे पडला आहे. आणि महाराष्ट्राला मागे टाकून तुम्ही स्वतः खुशाला परदेशात मजा मारत आहात.
मूळात तुळशीवृंदावन पूजा आणि बाया नाचवणे ह्यांची तुलनाच कशी होऊ शकते ? दरवेळी तुम्ही अशा आमच्या भावना दुखावून काय साध्य करता बरे ?
विचार केल्या जाईल.
अहो पण संस्कृतीरक्षण कायम लोकाच्या खिशातून पैसे खर्च करून करायचे असते ना ?
उदा. :- शनिवार वाडा फेस्टिवल, पुणे फेस्टिवल, शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रात पुतळा इ. इ.
आणि हो जाता येता तुमच्या डोळ्यात आमचा सौंदर्य फुफाटा का हो सलत असतो ?
28 Mar 2012 - 9:19 am | दिपक
माहित नाय
पण महाराष्ट्राची संस्कृती तमाशात आहे. ;-)
28 Mar 2012 - 10:06 am | मदनबाण
तमाशा खरंच महाराष्ट्राची संस्कृती आहे का ? ह्या शंकेच उत्तर मला अजुन मिळाल नाही आहे.
मलाही मिळालेले नाही ! तुम्हाला उत्तर मिळाले की मला नक्की सांगा बरं का ! ;)
काहीही सांस्कृतीक काम न करता बाई नाचवून संस्कृती रक्षण व्हायला पाहीजे.पण तसे होत नाही. मग तमाशा देखील आपली संस्कृती आहे अस का म्हटल जातं?
काहीही कामे न-करता,तथाकतिथ जनजागॄती केली जाते तर मग बाई नाचवुन संस्कृती रक्षण होत नाही का ? ;)
म्हणुन खरंच तमाशा महाराष्ट्राची संस्कृती आहे का ?
तमाशा करुन घेणे ही काही लोकांची संस्कॄती असावी, अशी मात्र खात्री पटत चालली आहे ! ;)
बाकी तू-नळीवर बरेच तमाशाचे(लावणीचे) इडियो उपलब्ध आहेत्,त्यातही उसगावात राहणार्या मंडळींच्या स्त्रीया मोठ्या प्रमाणात नाचताना दिसतात !
28 Mar 2012 - 12:31 pm | अभिज्ञ
टोरेंटवर डाऊनलोड न मारता प्रत्यक्ष "तमाशा" स्वतः पहायला गेल्याबद्दल पराशेठ ह्यांचे अभिनंदन.;)
तुम्ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक रक्षणाबद्दलचा बोललेला नवस अशा त-हेने तमाशा पाहून फेडलात त्याबद्दल हि अभिनंदन.
आता पराशेठ ह्यांनी पाहिलेल्या तमाशाचे रसग्रहण इथे टाकावे हि त्यांना विनंती.
:)
अभिज्ञ
28 Mar 2012 - 1:52 pm | परिकथेतील राजकुमार
मला एकदम "गुरुवर्य येरकुंटकरांचा सत्कार, म्हणजे साक्षात विद्वत्तेच्या सूर्याचा सत्कार.." आठवले रे अभिज्ञ.
30 Apr 2014 - 8:22 pm | बॅटमॅन
ठ्ठो =)) =)) =))
28 Mar 2012 - 3:03 pm | सहज
:-)
बाकी श्री पॅपिलॉन पंडीत सेठ, अहो दस्तुरखुद्द मराठीसंस्कृतीतज्ञ माननीय श्री पु. ल. देशपांडे (भाईकाका) यांच्या पंचांगात, आपलं ग्रंथात उल्लेख नसल्याने तमाशा हा महाराष्ट्री संस्कृतीचा भाग दिसत नाही. बहुदा महाराष्ट्रातल्या अनार्यांच्या संस्कृतीचा भाग असेलही. आधीक माहीतीकरता सहज उपाध्ये यांना भेटा ;-)
मुळ ग्रंथातला उतारा खाली. पैलवान स्पा यांच्या प्रकाशन संस्थेतून..
शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी,वांग्याचे भरीत...
गणपतीबाप्पा मोरयाची मुक्त आरोळी...
केळीच्या पानावरील भाताची मूद आणि त्यावरचे वरण...
उघड्या पायानी तुडवलेला पंचगंगेचा काठ...
मारुतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातले उडालेले पाणी...
दुसरयाचा पाय चुकून लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार...
दिव्या दिव्याचा दिपत्कार...
आजीने सांगितलेल्या भूताच्या गोष्टी...
मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहान मोठी होणारी शेपटी...
दसरयाला वाटायची आपट्याची पाने...
पंढरपूरचे
धूळ आणि अंबीर याचे समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफूटाणे...
सिंहगडावर भरून आलेली छाती आणि दिवंगत आप्ताच्या मूठभर अस्थिन्चा
गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श...(पु ल)
28 Mar 2012 - 3:10 pm | यकु
>>>>माननीय श्री पु. ल. देशपांडे (भाईकाका) यांच्या पंचांगात, आपलं ग्रंथात उल्लेख नसल्याने तमाशा हा महाराष्ट्री संस्कृतीचा भाग दिसत नाही.
माननीय श्री. सहज मामांच्या या विधानावर तीव्र आक्षेप! खुद्द पुलंनी ते (ही) 'तमासगीर'(च) (Performing Artist) असल्याची कबूली दिलेली आहे.
योग्य ती क्लीप संधी मिळताच इथे आणून आदळली जाईलच :p
28 Mar 2012 - 4:01 pm | सहज
हे पहा आपल्याकडे प्रथाच आहे. पुराणात अनेक देव आपल्या फावल्या वेळात अनेक आक्षेपार्ह वाटतील असे प्रकार करत होते पण त्यांच्या त्या कृत्यांना आपण आपली संस्कृती म्हणत नाही. त्यामुळे भाईकाका फावल्या वेळात काय तमाशा करत होते याची दखल घ्यायची गरज नाही. त्यांची महाराष्ट्र बहुसंख्य मान्यताप्राप्त संस्कृती परिभाषा मंडळात केलेली सोवळ्यातली विधानेच ग्राह्य. बाकी सगळी विधाने अनधिकृत आहेत.
28 Mar 2012 - 4:08 pm | यकु
>>>>> त्यांची महाराष्ट्र बहुसंख्य मान्यताप्राप्त संस्कृती परिभाषा मंडळात केलेली सोवळ्यातली विधानेच ग्राह्य. बाकी सगळी विधाने अनधिकृत आहेत.
--- असं कसं, असं कसं.. :p
तमाशा ही महाराष्ट्राचीच संस्कृती आहे.. आत्ताच जुने रुमाल चाळून पाहिले तर प्रत्यक्ष शिवाजीराजे त्यांचे बंधू व्यंकोजींना 'पराक्रमाचा तमाशा दाखवा' वगैरे बोलताना दिसले.. आता तुम्हाला इतिहासातील सत्ये मान्यच करायची नसतील तर मात्र तुम्ही ब्रिगेडी झालात असे खेदाने म्हणावे लागेल :p
28 Mar 2012 - 4:13 pm | परिकथेतील राजकुमार
काय तमाशा लावलाय पोट्टे हो ?
28 Mar 2012 - 4:15 pm | यकु
काही नाही तुमची वाट पहात उगं आपली तालीम करुन पहात होतो..
घ्या ती ढोलकी आता की पेटीवर बसता? .. :p
28 Mar 2012 - 4:21 pm | गणपा
आणि त्याला तुणतुणं वाजवायची हुक्की आली असेल तर ? ;)
पळा तेज्यायला येतय आता परा काठी घेउन ..........
28 Mar 2012 - 4:28 pm | परिकथेतील राजकुमार
आम्ही हाथरुणं पाहून तुणतुणं वाजवतो. ;)
आणि आम्हाला तमाशा बघण्यात जास्ती विंटेष्ट्र आहे, तमाशाचा भाग होण्यात नाही.
28 Mar 2012 - 4:44 pm | यकु
तमाशा बघणं काय आणि त्याचा भाग होणं काय दोन्ही सारखंच ;-)
ती सातारकरीण नाचली तेव्हा फेटे, रुमाल उडाले आणि न राहवून तुम्ही पण शेवटी बोर्डावर चढलातच, मग तो एक वेगळाच तमाशा झाला असं उडत उडत कळालं होतं ब्वॉ मागे... ;-)
28 Mar 2012 - 5:04 pm | परिकथेतील राजकुमार
यक्कुशेठ या की एकदा फार्महाऊसवरती. निवांत बसून बोलु ;) उगा इथं आणि कशाला बोंबा मारुन राहीले राव ?
बाकी बोर्डावरती काही 'मधल्यांचा' मध्ये मध्ये येऊन नाच चालू होता त्याविषयी काय कळले का नाय तुम्हाला ?
28 Mar 2012 - 5:07 pm | निश
हि हि हि......
28 Mar 2012 - 5:09 pm | यकु
>>>> यक्कुशेठ या की एकदा फार्महाऊसवरती. निवांत बसून बोलु उगा इथं आणि कशाला बोंबा मारुन राहीले राव ?
---- आता तुम्ही बोलावणार आणि आम्ही येणार नाही असं कधी होईल का? ;-)
नक्की येऊ! :)
>>>> बाकी बोर्डावरती काही 'मधल्यांचा' मध्ये मध्ये येऊन नाच चालू होता त्याविषयी काय कळले का नाय तुम्हाला ?
---- अं? त्याचं काय, आता तमाशा म्हटल्यावर थोडीशी ढकलाढकली, मिशांवर ताव, दौलतजादा वगैरे चिल्लर गोष्टी होत रहातात ;-)
यापेक्षा गंभीर काही घडलं असलं तर कल्पना नाय ब्वॉ..
28 Mar 2012 - 5:20 pm | परिकथेतील राजकुमार
ज्जे बात !
या निवांत वेळ काढून, जौ मग नगर रोडला.
छे छे ! अहो दोन्ही पार्ट्या समजूतदार असल्या तर कशाला काय गंभीर घडेल ?
आन तसे पण आम्ही येता जाता कोणाचा पण 'नटरंग' करत नाही. ;)
28 Mar 2012 - 5:35 pm | निश
हे हे हे , अगदी बरोबर माझही तसच मत ....
28 Mar 2012 - 8:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पराचा पहिला धागा आठवून जाहीर शरम वगैरे जे काय असतं ते वाटलं.
29 Mar 2012 - 12:54 am | चिंतामणी
ह्या प्रतीसादाची प्रेरणा इथे आहे होय.
निळूभाउ मोड म्हणालो ते बरोबरच आहे.
29 Mar 2012 - 12:20 am | चिंतामणी
हे वाक्य निळूभाउ मोडमधे आहे असे (उगाचच) वाटून गेले.
29 Mar 2012 - 12:26 am | यकु
चला, फार्महाऊसवर पराशेठची भेट घेताना चिंकांच्या पाठीस दडून जाण्याचा मार्ग मोकळा झाला ;-)
खीखीखी
28 Mar 2012 - 4:56 pm | निश
सहमत एकदम
लोकाना ऊपरती होते म्हणतात , बघितली.
सौ चुहे खाके बिल्ली हज को चली......
चालुदे
28 Mar 2012 - 4:13 pm | विजुभाऊ
पुराणात अनेक देव आपल्या फावल्या वेळात अनेक आक्षेपार्ह वाटतील असे प्रकार करत होते पण त्यांच्या त्या कृत्यांना आपण आपली संस्कृती म्हणत नाही
अरे व्वा . कशाला संस्कृती म्हणायचे याची व्याख्या इतकी सोप्पी आहे हे माहितीच नव्हते.
आपले पूर्वज एकमेकांवर हल्ले करायचे. भाऊ भावाच्या विरोधात शत्रुकडुन लढायचे पण ती आपली संस्कृती नाही.
सख्ख्या भावाचा /पुतण्याचा राज्याच्या गादीसाठी खून केला जायचा.
ईद्रदरबारी अप्सरांचा नाच चाले.
देव /ऋषी सुरापान करत
रामाने अकारणच शंबूकाचा वध केला.
त्याच रामाने झाडाचा आडोसा घेवून वालीचा एन्काउंटर केला
धर्मराजा जुगार खेळायचा
पण ही आपली संस्कृती नाही. तरीही हे प्रकार समाजात सर्वमान्य आहेत. आजही ते चालतातच.
बुद्धाने राज्याचा त्याग करून बौद्धत्व प्राप्त केले.
शिवाजीने परकियांविरुद्ध युद्ध पुकारून स्वाभिमान दिला ही आपली संस्कृती आहे मात्र त्याचे आपण सोयीस्करपणे विसर्जन केले आहे. आज आपण असे काहीच करत नाही.
म्हणजे ज्याचे गोडवे गातो आणि करणे टाळतो करत नाही ती संस्कृती . ज्याला नावे ठेवतो मात्र आवर्जून त्या गोष्टी करतो ती संस्कृती नाही
28 Mar 2012 - 4:43 pm | सहज
पण असा खुलासा करु नका हो जरा संभ्रम राहू दे, मग आपण सगळेच अर्जुन होणार मग कुठे तो कल्की अवतार होईल सगळे आपल्याला समजुन देईल व आपले पुन्हा एकदा भले होईल.
त्यामुळे सध्या फक्त संभ्रम वाढवत राहूया कसे ;-)
28 Mar 2012 - 11:54 pm | इरसाल
अज्याबात शिरेस वाटत नाय......आय्ला पुरा दिवस खावून १०० नाय म्हण्जे काय ?
29 Mar 2012 - 12:26 am | जेनी...
वाघ्या मुरळि काय आहे ?
:(
29 Mar 2012 - 3:33 pm | निनाद मुक्काम प...
इतिहास माझा आवडता विषय त्यात मस्तानी चा विषय आला म्हणून मनीचा सल येथे खरडतो,
ती राजनर्तिका होती क राजकन्या हा वाद घालण्यापेक्षा माझ्या मनात नेहमी असा विचार येतो,ती जर पेशवीण बाई म्हणून शनिवार वाड्यात नांदायला आली असती. तर यवनी पेशवीण ह्या मुद्यांचा मराठ्यांचा तत्कालीन राजकारणावर व राज्यकार्त्यांशी कसा प्रभाव पडला असता. उदा राजपूर राणी केल्यावर अकबराचे राजपुतांशी संबंध सलोख्याचे झाले अपवाद वगळता.
पण राजपुतांनी पुढे मुघल साम्राज्य विस्तारास मोलाची मदत केली.
मस्तानी व राऊ चा मुलगा कदाचित निजाम व भारतातील अनेक नबाब ,भविष्यातील हैदर अली व नजीब ह्यांच्याशी मराठ्यांचे असलेल्या दुष्मनीला पर्याय ठरू शकला असता कदाचित इंग्रजंना अधिक काळ वाट पहावी लागली असती. किंवा प्लासी ची लढाई ते जिंकलेच नसते. पानिपत झाले नसते. मुघलांनी सरत शेवटी राजपूत राजकन्या स्वीकारली आम्ही मात्र .........
आणि ती जर राजकन्या नव्हती हाच मुद्दा असेल तर पूर्वी नुरजहा ही कनीज पुढे मुघल राज्यकर्ती दिल्लीत होऊन गेली.( हे पात्र साकारलेली गौरी प्रधान आणि तिच्यावर फिदा मुघला शहेजादा मिलिंद सोमण डोळ्यासमोर येतात.) सलीम अनारकली अशी प्रेमळ भाकडकथा लिहिण्यापेक्षा तिच्यावर सिनेमा करायला हवा होता ,दासी ते महाराणी पर्यंत प्रवास
कोणतीही शक्यता अशक्यप्राय किंवा अविश्नीय वाटली तरी अश्याच घटना इतिहास जागोजागी विखुरल्या गेल्या आहेत.
2 May 2014 - 9:57 pm | फिरंगी
(प्रश्नकर्त्याच्या) विचारण्यात शंकेपेक्षा आगाऊपणा (!!! -- दुसरा शब्द सुचवावा ) जास्त वाटतो .......