होळी
अंगास रंग लावू दे,
अंगास अंग लावू दे,
सण होळिचा आहे,
प्रेम रंगात न्हाऊ दे..
दिवस आज मस्तीचा
प्रेमाचा व जबरदस्तीचा
गाली गुलाल फासू दे
थोडीशी मस्ती करू दे
उघडा खांदा रंगवू दे,
गोरे तन चिंब करू दे,
ओलेती तुला बघू दे,
प्रेम रंगात न्हाऊ दे,
तनू रंगात रंगली
सखी सचैल न्हाली
वस्त्रे तनूंस लिपटली
गुन्हे माफ,असे होळी
मुठीत रंग,मनात रंग
मन तव प्रेमात दंग
रंगात श्रीरंग रंगू दे,
राधे आज होळी खेळू दे
अविनाश
प्रतिक्रिया
6 Mar 2012 - 1:26 pm | पक पक पक
नाय आवड्ल.....
6 Mar 2012 - 1:56 pm | चिरोटा
मस्त.अर्थव्यवस्था,अभियांत्रिकी,फ्लोर शॉपच्या जंजाळातून मन बाहेर येतेय म्हणायचे.
6 Mar 2012 - 2:04 pm | परिकथेतील राजकुमार
अतिशय सुरेख.
एकदम रंगबाज कविता.
6 Mar 2012 - 2:14 pm | नगरीनिरंजन
हे काय पटलं नाही.
असो. डॉक्टरांच्या लेखासारखी वाटू नये म्हणून शेवटी बळंच श्रीरंग आणि राधा टाकले आहेत असे वाटले.
6 Mar 2012 - 4:00 pm | मस्त कलंदर
हे काय 'डर' मधल्या 'अंग से अंग लगाना सजन हमें ऐसे रंग रंगाना' चं भाषांतर आहे का? निदान जरा बरं तरी गाणं निवडायचं मग!!!
6 Mar 2012 - 4:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उघडा खांदा रंगवू दे,
गोरे तन चिंब करू दे,
ओलेती तुला बघू दे,
प्रेम रंगात न्हाऊ दे,
देवा होऊ दे कुलकर्णीसाहेबाच्या मनासारखं. :)
-दिलीप बिरुटे
6 Mar 2012 - 4:53 pm | वपाडाव
नीट वाचा ते कशाबद्दल बोलताहेत...
6 Mar 2012 - 5:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला कै समजले नाही. जरा समजून सांगा राव.
-दिलीप बिरुटे
6 Mar 2012 - 5:11 pm | सूड
हो हो, मला पण समजलं नाही. कशाबद्दल बोलतायत रे भाऊ ??
(निरागस)सूड
6 Mar 2012 - 5:17 pm | वपाडाव
उघड उघड नै बोलता येत काही गोष्टी, मी काय डॉ. दिवटे आहे का?
6 Mar 2012 - 5:20 pm | यकु
काही ऐकू नका ह्या वप्याचे..
त्याला काहीही दिसतं आणि काहीही ऐकू येतं.. ;-)
6 Mar 2012 - 5:23 pm | सूड
काय सांगता यकु ?? तुम्हाला बरं हो माहित.
6 Mar 2012 - 5:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>> डाक्टरसाहेब, नीट वाचा ते कशाबद्दल बोलताहेत...
कविता नीट वाचल्यानंतर मला असं लक्षात आलं की, कवी होळीच्या निमित्तानं रंगमय झाला आहे. आणि या उत्साहानं रंगात रंगल्यावर काही चुकुन सखीशी घडलाच लटका गुन्हा तर होळीचा सणच असा आहे की सर्व गुन्हे माफ होतील. असा आशय मला कविता वाचतांना डोकावून गेला.
आता अपेक्षा अशी आहे की, आपण सांगावे कविता कशाबद्दल आहे. म्हणजे आणखी कवितेत कोणता अर्थ दडला आहे ?
-दिलीप बिरुटे
6 Mar 2012 - 5:29 pm | परिकथेतील राजकुमार
आमचे प्रा. डॉ. म्हणजे अगदी अवखळ कृष्ण कन्हय्या आहेत.
6 Mar 2012 - 6:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
" पुरुषानं कसं सडेतोड असावं...... धडाकेबाजपणा हा पुरुषाचा मूळ गुणधर्म. तो त्यानं जपला पाहिजे अन् योग्यवेळी व्यक्त केलाही पाहिजे. मनात कुढत बसणे त्याचा पिंड नाहीच. जे वाटते, जे आवडते, जे पटते ते बोलून मोकळे होणे हाच खरा पुरुषार्थ "
[ मिपाच्या संग्रहातून ] ;)
-दिलीप बिरुटे
6 Mar 2012 - 6:33 pm | वपाडाव
धनाजीरावांनी ह्या रसग्रहणाचे धारिष्ट्य करावे अशी विनंती करण्यात येत आहे...
(सखुच्या पिशवीचा पंखा)वप्या
6 Mar 2012 - 7:16 pm | अत्रुप्त आत्मा
@धनाजीरावांनी ह्या रसग्रहणाचे धारिष्ट्य करावे अशी विनंती करण्यात येत आहे... >>> टाळ्या...आणी पूर्ण अनुमोदन.... @ह्या रसग्रहणाचे धारिष्ट्@ >>> ही एक सकाम उपासना आहे... आणी धनाजींशिवाय दुसरं कोणी हे काम मार्गी लाऊच शकत न्हाई ;-)
हे काम मार्गी लावल्यास आमच्या तर्फे धनाजीस शाजीत पार्टी ;-)
7 Mar 2012 - 10:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कुलकर्णी साहेब, श्रीरंग रंगात रंगला की नाही ?
-दिलीप बिरुटे
(रंगात रंगलेला)
7 Mar 2012 - 10:33 pm | सांजसंध्या
काका
मस्त आहे कविता