मध्यंतरी मि. पा वर करणी भानामती हे खरे कि खोटे ह्या वर बराच गोंधळ उडाला होता, डोळ्यामध्ये खडे घालणारी मुलगी, आणि अंधश्रद्धा निर्मुलन वाले ह्याच्या मध्ये बरीच खडाजंगी चालु होती. ह्या सर्व प्रकारामध्ये मि माझा एक - दोन अनुभव ऐकवू इच्छितो. मी साधारणतः ५-६ मध्ये होतो. त्यावेळी मी माझ्या मावशी कडे शिकायला होतो. त्यावेळेस माझ्या मावशीचे मिस्टर अचानक आजारी पडले. हा हा म्हणता आजार बळावत गेला आणि पाहता पाहता ते अंथरुणाला खीळले, हा डॉक्टर तो वैद्य सर्व उपाय करून झाले. पण काही फरक नाही, शंका कुशंका मनात घर करू लागल्या होत्या, पण सर्व शिकलेले असल्या मुळे करणी भानामती सारख्या कल्पना वर कोणाचाहि विश्वास बसत नव्हता, पण कुठल्याही रोगाचे निदान होत नव्हते.
त्या काळी मुंबई च्या मोठ्या दवाखान्यात पण दाखवून काही गुण नव्हता. मला फार काही समजत नसले तरी मोठ्यांच्या गप्पातून त्यांची तब्येत खूप खराब होत आहे हे समजत होते. त्यांचे खाणे पिणे सर्व अंथरुणावर असल्यामुळे आणि मावशी ला मदत म्हणून मी त्यांच्या खोलीत झोपत असे, मला आठवते दिवाळीच्या एक दिवस अगोदर म्हणजे अभ्यंग स्नानाच्या दिवशी सकाळी ते अचानक जोरात ओरडत होते मी त्याच खोलीत झोपलेलो होतो. उठून पाहतो तर त्यांच्या बेंबी (नाभी ) मधून कापूस जमा झाला होता, त्यांना पोटात खूप दुखत होते. मावशी तो कापूस साफ करत होती व परत परत तेथे कापूस जमा होतो होता. ह्या सर्व प्रकारामुळे मी खूप घाबरलो होतो व तेथे कोपऱ्यात उभा राहून घडलेले सर्व पाहत होतो.
घरातील सर्व जन खूप अस्वथ होते, कोणी तरी एका मांत्रिकाला बोलावून आणले. त्याने सांगितले हा करणी चा प्रकार आहे. आणि आमवस्या असल्यामुळे त्यांना त्रास होत आहे. हा त्या करणी व भानामती मधला एक प्रकार आहे. आणि हा प्रकार येथून पुढे वाढत जाण्याची शक्यता आहे. त्या दिवसा पासून पुढे बरेच दिवस त्या नाभी तून कापूस निघत होता. आम्ही मुळे तर गमती ने म्हणत पण आसू कि आजी तू हा कापूस का नाही घेत वाती वळायला. कारण तेवढे प्रसंगाचे गांभीर्य आम्हाला नवते. पण पुढे या पेक्षा भयानक प्रसंग येऊ लागले. ते एवढे क्षीण झाले होते कि कूस बदलणे हि मुश्कील होऊन जायचे. वाती भर भात किवा दुध हि त्यांना जात नवते मारता जशी जशी आमावस्या जवळ येत तसा त्यांच्यातला आक्रमक पणा वाढत जात. आमावस्ये च्या रात्री तर ते खूप बे चैन होत, घाण घाण शिव्या देत, त्या रात्री तर आम्ही कोणी भीती पोटी त्या खोली जवळ सुद्धा फिरकत नसू.
दिवसेंदिवस हा प्रकार वाढत होता. आता मात्र घरच्या मंडळींचा धीर सूटतांना दिसत होता. सगळे रिपोर्ट मात्र नॉर्मल येत असे. त्यामुळे डॉक्टर मंडळी हि चकित होऊ लागली डॉक्टर सोबत मात्रिक पण घरी येऊ लागले होते. हा देव तो देव , ना ना प्रकारचे इलाज करण्यात येऊ लागले. पण काही गुण येत नाही हे पाहून सगळे हतबल होत होते. त्या मध्ये आमावस्ये ला त्यांचे (करणी ) चे प्रताप वाढत होते. मला आठवते तसा एक प्रकार खूप भयानक होता. शिरा पाहिजे म्हणून ते त्या रात्री ओरडू लागले. मावशी तर खूप खूप खुश झाली हा माणूस जेवायला मागतो आहे म्हणून तिने लगेच किचेन मध्ये जाऊन रात्री ११ वाजता शिरा बनविला. त्या माणसाने जवळ पास एक छोटे पातेले भर शिरा खाल्ला. व अजून एक पातेले हवे म्हणून गोंधळ घातला म्हणून मावशी ने अजून शिरा बनवून खाऊ घातला मंडळी २kg जवळ पास त्यांनी शिरा फस्त केला. इथून पुढे तर मटन चिकन च्या फार्मायीशी होऊ लागल्या.
ज्या माणसाने कधी अंडा सुद्धा शिवला नाही तो यासर्वाची मागणी करू शकेल???
ज्या माणसाला कूस बदलणे अवघड त्याला आमावस्ये ला दोर खंडाने बांधून ठेवावे लागे का ??
माझा एकदा त्यांनी शर्ट पकडला होता तो अक्षरश फाडून मला माझी सुटका करावी लागली होती, माझ्या वर एवढे प्रेम करणारे काका माझ्या वर एवढे आक्रमक कसे झाले??
या सर्व प्रश्नाची मी उत्तरे आजून शोधात आहे
आणि या सगळ्या प्रकारात त्यांची एके दिवशी त्यांची प्राण ज्योत मालवली असो भरपूर गोष्टी आहेत आणि त्या स्व अनुभावाच्या आहेत. त्या आठवणी आल्या तरी अंगावर नुसता काटा येतो.
माझा अनुभव सर्व मि. पा. करांसाठी
प्रतिक्रिया
16 Feb 2012 - 4:36 pm | यकु
अवघड आहे.
हा तुमचा प्रत्यक्ष अनुभव.
त्याचं मानसशास्त्राच्या दृष्टीनं कुणी विश्लेषण करायला गेलं तर वेगळी उत्तरं मिळतील
आणि करणी-भानामतीच्या दृष्टीनं करायला तर अजून वेगळी
मूळ मुद्दा ज्यानं हे अनुभवलं तो तसाच लटकत राहिल, आणि आपण चर्चेचा आनंद घेऊ
अवांतर: व्यंकटेश माडगूळकरांची बहुतेक 'करणी' नावाची एक अशीच कथा आहे (कथासंग्रह: गावाकडच्या गोष्टी).
मस्त आहे ती पण कथा.
16 Feb 2012 - 8:08 pm | मराठी_माणूस
अगदी हेच आठवले होते. पोलिसात तक्रार दाखल होते त्यात शेवटी फौजदार ही हात टेकतो असे दाखवले होते
16 Feb 2012 - 4:50 pm | तर्री
एकदा एका शेजारी माणासाला असाच त्रस होत होता. घरी रोज बायको - पोरांना मार झोड करित असे.
दर शनिवारी संध्याकाळी "शिव्यां" विषेश कार्यक्रम असे. अमावास्येला तर कहर. त्याला बाहेरची बाधा झाली आहे हे सर्वाना माहित होते. सवयच झाली होती.
एकदा एका अमावास्येला आंमच्या घरी वडिलांचा पोलीस खात्यातील नोकर आला होता.
त्याने हा प्रकार ऐकला.स्वत:च्या पोरांना "माद! @त" / "बैन!@" चे किताब वाटले जात होते. आईने त्या पोलीसाला प्रकार हा शनिवार / अमावास्येचा प्रोग्राम सागितला .
ह्या पोलीसाने हे सगळे एकले. त्यांच्या घरी गेला. बायको समोर २ श्री मुखात भडकवल्या . बाबा गप्प गार !
परत शिवी गाळ केलीस तर तुरूंगात किंवा वेड्याच्या हॉस्पिताल टाकेन असा दम सज्जड भरला.
दुसर्या दिवशी एक मांत्रिक आला आणि त्याने ह्या बाबाची बाधा ऊतरवली असे त्यांची बायको - पोरे सांगत सुटली होती.
विवेक राव : तुमच्या नावातच सगळे आहे हो . ध्यानाकर्षणचा हा प्रकार असतो. मानसोपचार किंवा पोलिसोपचार हेच बरे ह्या प्रकारा करता.
16 Feb 2012 - 4:58 pm | वपाडाव
भारीच किस्सा...
16 Feb 2012 - 4:59 pm | पिलीयन रायडर
माझं सुद्धा बर्याच बाबतीत असं मत आहे की हा उपाय सर्वात जास्त लागु होतो... कुणी विचित्र / अनाकलनीय वागु लागलं तर आधी २ कानाखाली मारुन पहाव्या...
मला "कापुस" येण्याबद्दल काही कल्पना नाही पण मानसिक कारणं असु शकतात आजारपणाची....
16 Feb 2012 - 10:37 pm | किचेन
१००% सहमत. निदान १५-२० दिवसांसाठी तरी शांतता घरात नांदते.त्यानंतर परत एकदा हा डोस द्यावा.
18 Feb 2012 - 11:22 am | मितभाषी
:D
भोंदूबाबा 'बि'घडला, एका देवरुष्याचे आत्मपरिवर्तन हे ही वाचा.
16 Feb 2012 - 4:52 pm | प्रचेतस
खोतानु, करणी, भानुमती आता बाजूला ठेवा की जरा, लग्नानंतरच्या फुलपाखरी दिवसांबद्दल काहीतरी लिहा आता. ;)
16 Feb 2012 - 5:06 pm | विवेकखोत
ते हि लिहू कि पण मि. पा. वर करणी चा विषय निघाला म्हणून जुन्या आठवणी जाग्या झाल्या लग्न पाहावे करून परत ३ लवकर देऊ कि भेटीला!!!!
16 Feb 2012 - 5:12 pm | प्रचेतस
अहो, आता नव्या आठवणींमध्ये रममाण व्हायच्या ऐवजी तुमच्या मनात अजूनही जुन्याच आठवणी का रूंजी घालताहेत?
पार्ट ३ लवकर येऊ द्यात.
16 Feb 2012 - 4:56 pm | वपाडाव
त्यावेळी मांत्रिकाकडुन काही इलाज नव्हता का? त्याचा अवलंब केला असता तर जीव वाचला असता असे आता वाटत नसेल तर मिळवलं...
प्रत्यक्षदर्शी अनुभवावर मिपाकरांचे चर्चा/वाद वाचायला आवडेल...
-(या बाबतीत अज्ञानी)वपाडाव
16 Feb 2012 - 4:58 pm | गवि
तुम्ही स्वत : एका व्यक्तीच्या नाभीतून कापूस येताना पाहिलात. अमावास्येला ते वाढायचं हेही खूपकाळ पाहिलंत..
अजिबात न खाणारी व्यक्ती पातेलेभर शिरा खाते.
अजिबात नॉनव्हेज न खाणारी व्यक्ती मटण मागते..
आजाराने खंगलेली आणि पूर्वी तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती तुमच्याशी आक्रमक होते..
इतकं सर्व प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहूनही अजून तुम्हाला शंका आहे?
"करणी / भानामती खरे कि खोटे " अशी?
कमाल आहे.. इतका विश्वास नाही आपल्या स्वतःच्या अनुभवावर?
16 Feb 2012 - 7:13 pm | ५० फक्त
इतकं सर्व प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहूनही अजून तुम्हाला शंका आहे?
"करणी / भानामती खरे कि खोटे " अशी?
कमाल आहे.. इतका विश्वास नाही आपल्या स्वतःच्या अनुभवावर?
अहो, गवि तुम्ही असं का विचारताय, सध्या त्यांना असले अनुभव येत असतील की स्वताच्या जुन्या अनुभवांवर विश्वास ठेवावा की नाही अशी शंका येत असेल त्यांना, काय सांगावं. ?
16 Feb 2012 - 4:58 pm | यकु
माझ्याही पहाण्यात असाच प्रकार आलेला आहे.
आमच्या गल्लीतील एक मुलगी (वय 20-21) उन्हाच्या पार्यात गोवर्या वेचायला गंगेतल्या डोहाकडे जायची. तिचं नाव भुंडी म्हणू. तिला नीट बोलता यायचं नाही - गेंगाणं बोलायची. घरात भरपूर काम.. अवहेलना वगैरे.
एका उन्हाळ्यात रात्री बारा साडेबारा वाजता ती आरडाओरडा करीत गंगेतल्या त्या डोहाकडे पळत गेली.
मला कुणीतरी तिकडं बोलावतं आहे.. मी तिकडे जाणार नाहीतर मी मरणार अशी बडबड करायची.
सगळ्यांनी ितची समजूत घालून घरी आणलं तरी कितीतरी दिवस तो अर्ध्या रात्री डोहाकडे पळण्याचा प्रकार सुरुच होता.
गल्लीतला तो एक शोच झाला होता.
मांत्रिक-तांत्रिक झाले.. त्यांनी तिच्यावर करणी वगैरे झालीय म्हणून काटेरी फांदीनं भरपूर झोडपलं पण..
मग पुढे चालून तिचं कसंतरी लग्न झालं... आता बरी आहे म्हणे.
16 Feb 2012 - 5:04 pm | परिकथेतील राजकुमार
तात्पर्य काय, तर लग्न महत्वाचे !
भल्या माणसाला आयुष्यातून उठवायचे असो, किंवा आयुष्यातून उठलेल्याचे भले करायचे असो.
16 Feb 2012 - 5:09 pm | स्पा
प्रचंड अवांतर
तुम्ही विषयाला सोडून बोलत हात परा शेठ
अशाने विषयच गांभीर्य कमी होत आहे
16 Feb 2012 - 5:12 pm | यकु
हो. हो. हो.
पराशेठ पुनम, कावेरीकडे कशाला पळतात ते आज कळलं ! ;-)
=)) =)) =))
16 Feb 2012 - 5:16 pm | गणपा
मुळ्ळीच नाही.
लग्न मग ते दुसर्याचेच का असेना तो पर्याच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.
होय की नाय रे परा?
16 Feb 2012 - 10:41 pm | किचेन
लग्न मग ते दुसर्याचेच का असेना तो पर्याच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.
स्वतःच्या लग्नाच बघा आता.;)
16 Feb 2012 - 11:23 pm | पैसा
गणपा, काय रे?
16 Feb 2012 - 6:44 pm | परिकथेतील राजकुमार
अंमळ गल्लत होते आहे का ?
"लग्नाआधी नक्कीच माझ्यावरती काहीतरी करणी / भानामती झाली असणार, म्हणून असली मुलगी गळ्यात मारुन घेतली." असे मत अनेकांनी माझ्याकडे नोंदवलेले असल्याने, लग्न हा विषय देखील ह्याच सदरात मोडतो अशी मी तुम्हाला पूर्ण खात्री देऊ इच्छीतो. मिपावरील लग्नबाधीत मिपाकर अजून प्रकाश टाकतीलच.
@ श्री. गणपा
विशेषतः लोकाचे लग्न हा आमच्या जिव्हाळ्याच्या विषय आहे. डॉक्टरसाहेबांचा लेख वाचल्यापासून तर खासच जिव्हाळ्याचा. ;)
17 Feb 2012 - 9:49 am | जेनी...
:bigsmile:
16 Feb 2012 - 5:12 pm | तर्री
मानवी मनाचे आकलन अशक्य आहे. काही वेळेला माणसे "अशक्य व अतर्क " वागतात. पण तरिही माझे स्पश्ट मत सांगतो :- भानामती नाही की करणी नाही.
खोत साहेब : मनोविकारांचा मागोवा हे पुस्तक जरूर वचावे हा एक अगांतुक सल्ला ही देतो जाता जाता.
16 Feb 2012 - 5:22 pm | विवेकखोत
पण मनोविकार आणि मि उल्लेख केलेल्या गोष्ठी मध्ये तफावत आहे साहेब आजून एक गोष्ट तुमाला सांगावीशी वाटते ह्या सगळ्या सुरु होण्या आगोदरचा एक प्रसंग आमी सर्व जन जेवायला बसलो होतो जेवता जेवता त्यांच्या तोंडात दोरा असल्याचे त्यांना जाणवले दोरा ओढत ओढत त्या शेवटी आम्हाला एक बोट भर लांब अशी सुई निघाली कोणी एवढी मोठी सुई खाऊ वा तोंडात ठेऊ शकणे शक्य नवते मग अचानक ती सुई आली कुठून हा तर मनो रुग्ण प्रकार निच्छित असू शकत नाही
16 Feb 2012 - 5:28 pm | गवि
बघा दोरा अन सुई.. तीही तोंडातून.. याने तरी तुमची खात्री व्हायला हवी होती..
16 Feb 2012 - 5:41 pm | विवेकखोत
पन मनोविकार आणि सत्य यामध्ये बरीच तफावत आहे कदाचित त्या गोष्टी मि तेवढ्या प्रकर्षाने मांडू शकलो नसेन पण अनुभवल्या आहेत. असो ज्याचे त्याचे मत असते
16 Feb 2012 - 5:48 pm | गवि
माझं म्हणणं फक्त तुम्हाला प्रश्न पडण्याविषयी होतं.. इतके ढळढळीत अनुभव येऊनही ते अतींद्रीय नसतील आणि त्यामागे अन्य काही लॉजिकल कारण असेल असा प्रत्यक्षदर्शी माणसाला प्रश्न पडावा याचं आश्चर्य वाटलं इतकंच.
इतरांच्या अन तुमच्या लिखाणात हा महत्वाचा फरक आहे की, इतर ऐकीव माहितीवर लिहितात. तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलंत..
मी पाहिलं असतं तर नक्कीच यात विज्ञान किंवा अन्य काही असल्याची शंका घेतली नसती.
अहो.. नाभीतून कापूस.. तोंडातून सुई.. तेही माझ्यासहित सर्वांना दिसताहेत असं पाहून मला स्वतःच्या आणि त्यांच्या नजरेवर विश्वास ठेवावाच लागला असता..
16 Feb 2012 - 6:07 pm | वपाडाव
अगदी, अगदी !!
16 Feb 2012 - 6:05 pm | चौकटराजा
असे अनेक प्रकार लहान पणापासून ऐकून आहे. फार वर्षापूर्वी १९६७ सालाच्या दरम्यान शिवाजीनगर पुणे येथील रेल्वे क्वार्टर्स मधील खिडकीतून आख्खी कॉट बाहेर येई . व गज जागचे जागी.
मी म्हणतो यावर विश्वास नाही ना बसला ? आता जे पुणेकर साठीला आले असतील त्याना त्या कर्जबाजारी इसमाची खरी हकिकत आठवत
असेल.
वि.सू भानामती दिसल्यास मला कळवावे मी तिच्याशी लग्न करू इच्छितो. माझ्या बायकोची लेखी परमिशन आजच घेतली आहे. धरम साहेबांचा फोन आला लगे रहो म्हणून !
दरम्यान - माझे क्वालिफिकेशन विषयी- मी मंत्राशिवाय अग्नी पेटवू शकतो. शिव्या देउन देखील पेटविता येतो व मौन पाळूनही मला अग्नि पेटविता येतो. एखादा विशेषत: " परा " किंवा पक पक पक म्हणतील त्यात काय ? काडीने पेटवायचा ! पण नाही बाबानो नो म्याचष्टिक नो
गारगोटी !
16 Feb 2012 - 6:10 pm | यकु
>>>>आता जे पुणेकर साठीला आले असतील त्याना त्या कर्जबाजारी इसमाची खरी हकिकत आठवत
असेल.
---- असे कसे हो तुम्ही वेगळे??? ;-)
आता अथ म्हणालाच आहात तर इति पण करुन टाका ना..
सांगा त्या कर्जबाजारी माणसाचा किस्सा..
साठीला आलेले पुणेकर सांगणार नाहीत.
16 Feb 2012 - 10:46 pm | किचेन
चांगल आहे न.फुकट कोट मिळतीये.निदान तेवढा खर्च वाचला.
17 Feb 2012 - 1:35 am | मोदक
अहो किचन काकू... टाईपता येत नाही मान्य आहे पण मग सरळ कॉपी पेस्ट करा की..... :-)
>>>निदान तेवढा खर्च वाचला.
'रुखवताचा' हा शब्द राहिला आहे काय..?
17 Feb 2012 - 4:53 pm | वपाडाव
हे रे म्हणजे काय... चोप्य पस्ते म्हणायचंय का तुला...
16 Feb 2012 - 6:48 pm | शुचि
सोमवारी महाशिवरात्र आली रे बाबांनो. देवाचे काहीतरी बोला. ह्या भुताखेतांच्या गोष्टी एकदम बंद.
16 Feb 2012 - 7:30 pm | Pearl
या विषयावरील डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचे 'अंधश्रद्धा विनाशाय' हे पुस्तक वाचले आहे. एकदम छान पुस्तक आहे. तसेच 'खुपते तिथे गुप्ते' कार्यक्रमात त्यांची मुलाखत पाहिली. वेळ मिळाल्यास ती पण नक्की पहा.
त्याची लिंक देत आहे यूट्यूब बरची,
Khupte Tithe Gupte April 08 '11 Part - 1
http://www.youtube.com/watch?v=HpjWKpxYqE8
यामध्ये मी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना पहिल्यांदाच ऐकलं. या आधी पेपर मधे नाव खूप वाचलं होत. माणूस खूप शांत आणि छान वाटला. मुलाखत तर छानच झाली आहे.
16 Feb 2012 - 7:40 pm | मराठे
नाभीतून कापूस म्हणजे लिंट म्हणताय का? मग त्यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे?
16 Feb 2012 - 8:09 pm | अन्नू
खोत, कोणी काहीही म्हणो पण मला यावर विश्वास आहे, कारण माझ्या भाचीबद्दलसुद्दधा असेच झाले होते, ती सध्या सहावीला आहे. गेल्या वर्षी ती रात्रीची गावामध्ये मैत्रीणींबरोबर संगीत खुर्ची खेळायला गेली होती, त्या दिवसानंतर तिची प्रकृती खालावत गेली. सकाळपासून चांगली असणारी मुलगी संध्याकाळ झाली की पोट दुखते म्हणून अक्षरशः किंचाळायला लागायची, डॉक्टरी चेक अप झाले रिपोर्ट पुर्ण नॉर्मल! त्यानंतर आमच्या शेजारीच एक पुजारी आहेत त्यांच्याकडे नेली. त्यांनी सांगितले भुतबाधेचा प्रकार आहे.
तिने काहीतरी रात्री बघितले असेल त्यामुळे तिने भिती खाल्ली असेल असे आंम्हाला वाटले त्यासाठी तिला इकडे मुंबईला आणण्याचा निर्णय घेण्यात आला, परंतु पुजार्याच्या मते तुंम्ही जर तिला शिवेपलिकडे न्यायचा प्रयत्न केला तर तिला जास्तच त्रास होईल त्यामुळे असे करु नका. परंतु आंम्ही ऐकले नाही आणि तिला इकडे आणण्याचा प्रयत्न करु लागलो आणि शेवटी रस्त्यातच तिच्या पोटात जास्त दुखु लागले, त्यावेळी लगेच तिला जवळच्या दवाखान्यात नेण्यात आले पण डॉक्टरांनी त्याच्यावर फक्त नॉर्मल आहे असेच सांगितले. काही दिवसांनी नाना उपक्रम केल्यानंतर आता ती बरी आहे.
एकंदर या प्रकारावरुन तरी मला यावर विश्वास ठेवावाच लागला.
तसा मी कट्टर नास्तिक आहे पण या प्रकारामुळे भुतांबद्दल तरी सध्या मी आस्तिक झालो आहे ;)
अवांतर:- चमत्कार तेथे नमस्कार!
16 Feb 2012 - 11:35 pm | पिंगू
>> काही दिवसांनी नाना उपक्रम केल्यानंतर आता ती बरी आहे.
जरा नाना उपक्रम सविस्तर सांगा की..
- पिंगू
17 Feb 2012 - 12:26 pm | अन्नू
तिला त्या पुजार्याने दोन ताईत बांधून दिले. एक नॉर्मल होता तो हाताच्या मनगटावर बांधला आणि जो जास्त जालिम होता तो गळ्यात बांधला. जेणेकरुन तिच्या अंगात ती बाधा पुन्हा येऊ नये. त्या दिवशी ती अगदी निट वागु लागली, मग तिला बाहेर फिरायला म्हणून बाजारात घेऊन गेलो आणि संध्याकाळी सहाच्या दरम्यान ती पुन्हा तशीच किंचाळू लागली. आंम्ही तिच्या हातातील ताईत बघितला तो पुर्णपणे तुटून हाताशी लोंबकळत होता आणि गळ्यातला ताईत गायब! आंम्ही त्याबाबत तिला विचारले पण तिच्या काहीच लक्षात नव्हते. शेवटी तिला पुन्हा पुजार्याकडे नेण्यात आले. पुजार्याने तात्पुरता त्याच्याकडील अंगारा दिला, आणि काही सुचना दिल्या, पुजार्याच्या म्हणण्यानुसार तिला एक नव्हे तर दोघीजणी त्रास देत होत्या आणि वेळीच काही केले नाही तर त्या कायमच्या तिच्या अंगात प्रवेशही करणार होत्या. शिवाय अडचण अशी की पुजारी आता मदत करु शकणार नव्हता कारण, पाच दिवसांनी घटस्थापना होती म्हणजे कल्याणच! शेवटी मग पुजार्याच्या सांगण्यानुसार आंम्ही गावातील स्थित दोन देवींना रोज संध्याकाळी नारळ फोडुन तो अंगारा नित्यनेमाने तिला लावायचे ठरले. त्याचप्रमाणे डोंगरावर आमच्या गावदेवीचे एक जागृत देवस्थान आहे तेथे तिला घेऊन जाऊन तिथे सुद्धा असाच उपक्रम करावा असे ठरले.
हा आमचा उपक्रम घटस्थापनेनंतरही एक दोन आठवडे सलग चालला त्यानंतर ती हळूहळू शांत झाली. येथे एक चमत्कारीक गोष्ट अशी कि ज्या मुलीला साध्या घरातील अंधारात भिती वाटत होती ती या बाधेच्या दरम्यान घरामागील रानांत चक्क रात्रीच्या दोन अन् तिन वाजता फिरत होती आणि तिला याबाबत विचारले, ओरडले किंवा मारले तरी तिला काहीच आठवत नव्हते.
16 Feb 2012 - 8:20 pm | तर्री
सत्य साईबाबाचा अवतार येणार आहे असे एकले होते ते सत्य होणार असे वाटते.
तस्मात "कुभार होणे" जमते का ? ते पहावे.
पोटापाण्याची सोय विना प्राप्ती कर + सुंदरींचा सहवास . सुखाची परिसीमाच की .
-अनिरुध्द नाणीजकर
16 Feb 2012 - 9:38 pm | चौकटराजा
मनातील विकारामुळे विचारामुळे म्हणाल तर अक्शरशः काहीही होउ शकते. कारण मनाचे अगाध सामर्थ्य हा फार गहन , विस्मयकारक
विषय आहे. मी घुमणारी , भूत लागल्यासारखी करणारी माणसे पाहिली आहेत . त्याना बाहेरची बाधा झाली असे म्हणत. खरी तर ती आतली
बाधा असते.
भानामति म्हणजे जड वस्तूंवर कशानेतरी दुरून सत्ता प्रथापित करणे. त्यात मनाच्या गाभार्याचा काही प्रश्न येत नाही. विज्ञानाच्या साह्याने
आता पाच वर्षाचा मुलगाही रिमोटने छोटी कार चालवू शकतो व म्हाताराही. तो भाग वेगळा आहे. पण उदी येणे , भात पडणे ई. गोष्टी पाहिल्याचे
लोक बोलतात . लोक काहीही बोलतात. विचित्र विश्व या मासिकात असे चमत्कारिक किस्से येत असत पण ते सारे आफिकेतले, रशियातले की
जिथे पडताळा घेण्यासाठी आपल्याकडचा माणूस जाणे अवघड.
कृपा करून मनोविकार व भनामति यांची गल्लत करू नये.
16 Feb 2012 - 10:08 pm | हंस
हा प्रतिसाद आधी एका धाग्यावर दिला होता, इथे पुन्हा देत आहे-
हा माझा अनुभव आहे, मी साधारण सातवीत असेन त्यावेळेस घडलेली घटना आहे ही, एके दिवशी मी, आई आणि वडिल आमच्या गावाकडे चालत निघालो होतो, साधारण रात्री १२ ची वेळ असावी, गावाच्या बाहेर वळणावर एक वड आहे, लोकांच्या म्हणण्यानुसार तिथे एक भुताचे वास्तव्य आहे, त्या वळणावरुन जात असताना अचानक वडील तिथेच खाली बसले आणि त्यांच्या एका पायात असह्य वेदना सुरु झाल्या, काही केल्या त्यांना चालता येईना. कसेबसे मी आणि आईने त्यांना उभे केले, तेवढ्यात समोरुन दोघेजण M80 वरुन आमच्या जवळ आले आणि अचानक गाडी घसरुन पडले, हे बघताच वडीलांनी पळत जाऊन त्यांना उठ्वले, आई आणि मी हे बघतच बसलो, ज्या माणसाला काही क्षणांपूर्वी चालताही येत नव्हते त्याने पळत जाऊन त्या दोन माणसांना उठवले. पुढे आम्हि घरी आलो काही वेळ जाताच वडिलांची दातखिळी बसली, बरेच उपाय करुन त्यांना normal केले. अचानक ते जोरात ओरड्त त्या वडाच्या दिशेने पळत सुट्ले, ३-४ लोकांनांही आवरेनासे झाले, त्या रात्री ही घटना अनेक वेळा घड्ली, शेवटी त्यांना दोरीने बांधून ठेवावे लागले, पण दुसर्या दिवशी त्यांना यातले काहिही आठ्वत नव्हते.
ही घटना घडली त्यावेळी ते पिलेले होते, पण हे रोजचे होते आणि असा त्रास ह्या घटनेच्या आधी आणि नंतर कधीही झाला नाही. मी पण त्या झाडाखालून बर्याच वेळा रात्रीच्या सर्व वेळी गेलो आहे, पण मला कधीही वेगळे जाणवले नाही. माझा भुतांवर विश्वास नाही पण ह्या घटनेची उकल मी अजुनही करु शकलो नाही.
17 Feb 2012 - 12:40 am | आनंदी गोपाळ
करणी / भानामती = खोटे.
17 Feb 2012 - 1:28 am | अन्नू
दिलेले उदा.-
करणी/ भानामती = खोटे.
येथे "खोटे" म्हणजेच "साफ खोटे" होय.------(समीकरण १)
करणी/ भानामती = खोटे
करणी = खोटे * भानामती------------------ (समीकरण २)
आता,
करणी/ भानामती= खोटे
खोटे * भानामती/ भानामती= खोटे --------- (समीकरण २ वरुन)
खोटे= खोटे
येथे,
खोटे= साफ खोटे ------------ (समीकरण १ वरुन)
समीकरणातील "खोटे" हे साफ (पुर्णपणे) खोटे असुन करणी/ भानामती हे खरे आहे! :P
17 Feb 2012 - 8:21 am | सूड
मानलं ब्वा!! __/\__
17 Feb 2012 - 8:55 am | स्पा
ह्या ह्या ह्या
अन्नू....
__/\__
बेक्कार वारल्या गेलो आहे!!!!!!!
17 Feb 2012 - 9:42 am | चौकटराजा
@हंस, आपण बर्याच वेळा तिकडून गेलात आपल्याला काही झाले नाही. एका भुताला दुसरे भूत घाबरवू शकत नाही. असे मागे वेदात पुराणात, अरण्यकात -- तिसरा मनू असताना म्हटले आहे.
ज्योक चे सोडा. आपले व इतरांचे मन वेगवेगळे . सबब फोबिया ही वेगळाच असणार ना ? मला ज्याची अॅलर्जी आहे त्याची तुम्हाला असेल असे
नाही. मी प्रतिसादातच वर म्हटले आहे ही आतली बाधा असते बाहेरची नाही. फोबिया वा अॅलर्जी सारखीच !
17 Feb 2012 - 8:15 pm | हंस
@हंस, आपण बर्याच वेळा तिकडून गेलात आपल्याला काही झाले नाही. एका भुताला दुसरे भूत घाबरवू शकत नाही. असे मागे वेदात पुराणात, अरण्यकात -- तिसरा मनू असताना म्हटले आहे.
:)
जर हे मनाचेच खेळ असतील तर, नंतर का त्रास झाला नाही हा ही प्रश्न आहेच की, पण कदाचित त्या दिवशीची त्यांची मनस्थिती ही ईतर दिवसांपेक्षा वेगळी असू शकेल आणि त्यामुळेच त्यांना तो त्रास झाला. बाकी देवाक ठावूक!!!!!!!!!!
17 Feb 2012 - 12:19 pm | मृगनयनी
विवेक'जी.. अश्या अवघड प्रसंगाच्या वेळी तुम्ही "नाडी ज्योतिष" प्रेफर करायला हवे होते.... कदाचित "हे" असले प्रकार नक्की कश्यामुळे घडत आहेत.. किन्वा तुमच्या म्हणण्यप्रमाणे ती जर भानामती वगैरे असेल... तर ती नक्की कुणी आणि कश्यासाठी केलेली आहे... हेही कळले असते....व उचित उपाय आणि शान्तीदीक्षेच्या माध्यमातून कदाचित तुमचे काका वाचू शकले असते. :|
अर्थात अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्हाला अजूनही तुमच्या काकांच्या मृत्यूचे गूढ उलगडले नसेल, तर तुम्ही 'अत्री जीव नाडी'च्या माध्यमातून ते गूढ जाणून घेऊ शकतात.... अर्थात तुमची मनापासून इच्छा आणि विश्वास असेल तर!!!! :)
17 Feb 2012 - 12:45 pm | स्वातीविशु
ज्यांच्या अंगात देव/देवी येतो / येते, अशांना त्यावेळी विचारले असते तर त्यांनी काही सांगीतले असते. अन उपायही सांगितला असता. (क्रु. ह. घ्या.):-)
तुम्ही कोकणातले का खोत? तिकड्ची भुते / करणी /भानामती हे प्रकार फारच जीवघेणे असतात, अशी ऐकीव माहीती आहे. :ghost:
"शिवाय भित्यापाठी ब्रम्हराक्षस" अशी एक म्हण आहे. आम्ही ती खरी मानत आहे. ;)
17 Feb 2012 - 1:36 pm | विवेकखोत
हा सर्व प्रकार संपत्ती च्या वादाचा आहे, पण असो जुन्या गोष्टी उकरून काढून मनस्ताप करून घेण्याची माझी इच्छा नाही. आणि बोलणार्या लोकांपैकी स्वतः अनुभव असणारे मला नाही वाटत कोणी आहे, मी ऐकले, त्याने सांगितले असे बोलणारे भरपूर लोक आहेत, आणि आमच्या घरात बरेच लोक उच्य शिक्षित आहेत त्या मुळे मनोविकार, इतर काही रोग वा अजून काही आणि करणी या प्रकारामध्ये गल्लत होणार नाही बाकीच्या लोकांसाठी हा कदाचित चेष्टेचा विषय असेल पण आमच्या साठी नक्कीच नाही, जेव्हा या कारण मुळे एखादा माणूस दगावतो तेवा तर नक्कीच नाही.
17 Feb 2012 - 2:31 pm | मृगनयनी
:| ह्म्म्म... जर तुम्हाला माहित आहे, की हा प्रकार सम्पत्तीच्या वादातून निर्माण झालेला आहे आणि जुन्या गोष्टी पुन्हा उकरून काढून मनस्ताप करवून घेण्यात तुम्हाला रस नाहीये.. तर मग हा धागा काढलाच्च्च का... असाही एक मोठ्ठा प्रश्न येतोच्च!!!!
बरं... मग आम्ही असा काही अनुभव घ्यावा.. अशी इच्छा आहे का तुमची? :|
आमच्या घरात सगळेच जण उच्चशिक्षित आहेत...
आपल्याला नक्की काय म्हणायचे आहे, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही... की उच्चशिक्षित लोकांना मनोविकार होत नाही..असे म्हणायचे आहे का?
माझ्याकडून मी तुम्हाला काही उपाय सुचवलेले आहेत.. जे तुम्ही आत्ताही अॅप्लाय करू शकतात.... :)
आणि चेष्टेबद्दलच्च म्झणत असाल, तर तुम्ही या तुमच्या लेखात देखील... "पोटातून बाहेर पडणार्या कापसाच्या वाती करायच्या" ...वगैरे सन्दर्भ देऊन तुमच्या काकांना झालेल्या भनामतीची थट्टाच्च्च केलेली आहे की!!!!... तेव्हा तुम्हाला दगावणार्या माणसाबद्दल- काकांबद्दल काहीच कसे वाटले नाही हो!!!! :|
_______
अर्थात शेवटी येवढा मनस्ताप करून घेण्यापेक्षा तुम्ही हा धागा काढायलाच्च नको होता.. असे मनापासून वटते.... :)
17 Feb 2012 - 2:50 pm | विवेकखोत
अहो मृग नयनी मला वाटते आहे कि थोडे विषयांतर होत आहे, या सर्व प्रकारास १८ वर्षा पेक्षा हि जास्त कालावधी लोटला असून मध्यंतरी मि. पा वर अंध श्रद्धे चा विषय सुरु झाल्या मुळे आठवला,
१) "पोटातून बाहेर पडणार्या कापसाच्या वाती करायच्या" ..
त्या वेळेस मि इयत्ता ५ मध्ये असल्याचे हि नमूद केले आहे,
२) आमच्या घरात सगळेच जण उच्चशिक्षित आहेत.
म्हणजे करणी किवा मनोविकार हे समजण्यात गल्लत करणार नाही असे म्हणायचे होते.
३)अर्थात शेवटी येवढा मनस्ताप करून घेण्यापेक्षा तुम्ही हा धागा काढायलाच्च नको होता.. असे मनापासून वटते
बऱ्याच लोकांसाठी करणी हा निव्वळ थट्टेचा विषय असतो वा आहे वरील प्रतिक्रिया वलयात तर तुमाला कळेल
४) आणि जुन्या गोष्टी पुन्हा उकरून काढून मनस्ताप करवून घेण्यात तुम्हाला रस नाहीये.
कारण या गोष्टी का झाल्या कोणी केल्या या आठवण्यात किवा प्रकाशित करण्यात रस नाही आहे,
17 Feb 2012 - 3:08 pm | गवि
२) आमच्या घरात सगळेच जण उच्चशिक्षित आहेत.
म्हणजे करणी किवा मनोविकार हे समजण्यात गल्लत करणार नाही असे म्हणायचे होते.
या धाग्यावर मी तिसर्याचौथ्यांदा तेच म्हणतो की तुम्हाला खात्रीच आहे की हा मनोविकार नाही आणि भानामती / करणी आहे.. भले ती इस्टेटीच्या वादातून असो की आणखी काही..
तुम्ही हे अमानवी अतींद्रिय अनुभव स्वतःला आले असं म्हणता (भले पाचवीत का असेना)
तरीही तुम्ही हे सर्व लिहीताना "करणी / भानामती खरे की खोटे" अशी शंका उत्पन्न करता.. तुमचा उद्देश लोकांचं मत विचारण्याचा आहे की करणी भानामती आहेच्च मुळी हे सांगण्याचा आहे? अर्थात तुम्ही हे सांगू इच्छिता, विचारु किंवा चर्चा करु इच्छित नाही..
या आधी हेच वक्रोक्तीने म्हटलं होतं.. पण चेष्टेने / टिंगलीने नक्कीच नव्हे.. आणि ज्या विषयाची टिंगल झाली तर दुखावले जाईल असे विषय शक्यतो पब्लिकली मांडू नयेय, इन दॅट केस..
खरं तर उदाहरण द्यायची गरज नाही पण वेळ आहे म्हणून लिहितो..
समजा मी इथे धागा काढून म्हटलं की
"माझे दिवंगत वडील मला त्यांच्या निधनानंतर दोन वर्षांनी अमावास्येला त्यांच्या खुर्चीत बसलेले दिसले."
मला खात्री आहे की ते माझे वडीलच होते. मला मनोविकार असण्याचा प्रश्नच नाही.
तर माझा प्रश्न असा की भुतेखेते खरी की खोटी?
आता पहा.. इथे मला मृत व्यक्ती दिसल्याची खात्री आहे.. म्हणजे "भूत खरे" असं माझं पक्कं विधान आहे.. तरीही मी प्रश्न विचारायचा की ते खरं की खोटं..
कोणी उलट मत दिलं की खोटं.. तर म्हणायचं "मी सुशिक्षित आणि शहाणा असल्याने भास आणि सत्य यातला फरक मला कळतो. मी दारुही पीत नाही. त्यामुळे मानसिक असणं शक्यच नाही.."
जर कोणी गमतीने काही बोललं की "काय म्हणाले वडील?", "अभ्यास करण्यावरुन ओरडले का?" इ इ.
तर म्हणायचं की माझ्या वडिलांबाबतीतली ही वेदनादायक आठवण आहे.. या बाबतीत चेष्टेचा विषय होऊ शकत नाही..
---------------
अशा रितीने काथ्याकूट होऊ शकत नाही हो साहेब..
17 Feb 2012 - 3:25 pm | यकु
यांचे पाय (आणि हातही) धरा रे कुणीतरी..
गविकाकांच सदर सुरु कराच संपादको..
17 Feb 2012 - 4:12 pm | अन्या दातार
प्रचंड अनुमोदन!!!!
गविकाकांचे सदर चालू झालेच्च पाहिजे
18 Feb 2012 - 12:11 pm | हंस
हमारी मांग पुरी करो, वरना.......... (सं.मं. हळुच घ्या)
17 Feb 2012 - 2:38 pm | दादा कोंडके
राजा, कलमाडी यांच्यावर करावी म्हणतोय. स्पाँसर तर करेनच शिवाय त्यासाठी कलमाडीच्या दाढीचा केस उपटून आणण्याची 'रीक्स' घ्यायला तयार आहे. :)
अजुनही ब्लॅकलीस्ट वर बरेच आहेत.
17 Feb 2012 - 2:43 pm | मृगनयनी
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
दादा कोन्डके'जी... त्यापेक्षा एखाद्या हत्तीच्या शेपटीचा केस उपटून तो सोन्याच्या अन्गठीत घालून ती अन्गठी परिधान करा... एका आठवड्याच्या आत करोडों रुपयांमध्ये लोळाल!!! ;) ;) ;)
17 Feb 2012 - 3:12 pm | आत्मशून्य
मी १३ वर्षाचा होतो तेव्हां सहल म्हणुन मित्राच्या एका शेतामधे हुरडा खायला व १ रात्र जागायला गेलो होतो. रात्री ८ वाजता सोबतीला चंद्रप्रकाश असुनही घनदाट भासणार्या काळोखात आम्ही ४ जण हातात टॉर्च सांभाळत शेतामधे पाउल वाटांनी गप्पा मारत फिरत होतो. मला लहर आली म्हणुन कंपुपासुन मी जरासा मागे थांबलो तो कोणी तरी सटकन माझ्या कानाखाली वाजवली. व दबकं कुजबुजत हसणं माझ्या कानी आलं, इथं थांबण्यात माझं काय चुकलं ? मी चोर वगैरे नाही अशा नजरेत वर बघीतलं , तो डोळ्यामधे केवळ चंद्रप्रकाश घुसला इतर काही कळलचं नाही, लगेच आजु बाजुला बघीतलं तर कोणीही न्हवतं. परीसर संपुर्ण सपाट होता कोठेही लपायला खड्डा, झाड, आडोसा वगैरे जवळपास न्हवत की चटकन गायब होता यावं.
मला लागलं तसच जोरात आवाजही झाला जे समोर चालणार्या मित्रांना सहज ऐकु जाणे अपेक्शीत होते. पण ते चालतच राहीले. जेव्हां मला हाक दिली अरे मागे का थांबला आहेस ? मी त्यांना विचारलं आता इथे इतर कोणी आहेत काय , शेतात काम करणारे लोकं वगैरे ? अर्थातच नकार आला. त्यांना मी सांगितलं मला कोणी तरी मारलं आहे म्हणुन मी मागे पडलो होतो पण बाजुला कोणीच दिसत नाहीये .... तर अर्थात त्यांनी हसण्यावारी न्हेलं. मी सुध्दा या घटनेचा धसका वगैरे कधीच घेतला नाही, वा आजही मला याचा फोबीया वगैरे तर अजिबात नाही. पण घडलेल्या घटनेचं कुतुहल आहे.
राहीली गोश्ट भानामती/करणीची तर स्वतःला मला अनुभव नाही पण लोकांचे किस्से जबरदस्त बुचकळ्यात पाडतात. एकदा एका मित्राला कर्वे पुतळ्या जवळील एका नाडी केद्रांत घेउन गेलो होतो (तिथं काय घडलं ही वेगळी गोश्ट आहे) तर त्या केद्रां बाहेर करणीचे लाल लिंबु आम्हाला पडलेले दिसले होते. पण एक असा नगही माझ्या चांगल्या माहीतीत आहे जो सकाळ झाली की करणीची (लाल) लिंब हुडकत त्याच्या गावभर फिरतो व पुरेशी जमल्यावर त्याचे सरबत बनवुन फार आवडीने पितो. नादच आहे त्याचा तो.
17 Feb 2012 - 4:20 pm | यकु
तरीच!!
मला राहून राहून तुझ्या कानाखाली का मारावी वाटायची. (ब्लॅकबेल्ट धारक आहेस हे माहितीय म्हणून गप बसलोय ;-))
भूताला पण तसंच वाटलेलं, म्हणजे बघ.
17 Feb 2012 - 4:24 pm | गवि
अरे आता करा मारामारी ..
17 Feb 2012 - 4:32 pm | पैसा
सुरक्षित अंतर ठेवा!
(यशवंता सुरक्षित अंतरावर आहे, म्हणून एवढ्या जोरात बोलतोय!)
17 Feb 2012 - 5:25 pm | आत्मशून्य
वेळीच आवरलसं की स्वतःला. कारण मी भुताचा मुर्खपणा सहन करु शकेन ! महा-मुर्खाचा न्हवे ;)
17 Feb 2012 - 5:27 pm | यकु
तरी पण मी आज रुम वर येणार नाहीये ऽऽऽऽ!!!
17 Feb 2012 - 6:00 pm | आत्मशून्य
जिथे असशील तिथुन असशील तसाच परत ये, वा हे वाचल्या वाचल्या ताबडतोप फोन कर. या शाहण्या लोकांच्या जगात तुझा कसा निभाव लागणार याची फार चिंता वाटु राहीली है. माझंही काही चुकलं माकलं वाटत असेल्/नसेल तरीही क्षमा कर. इतकच काय तुझ्या कधी ही नसुटणार्या मुर्खपणाबद्दल इथे तुला कोणी काहीही टाकुन बोलणार नाही, अगदी एका शब्दानेही... मग तरं झालं ? आता राग गिळुन टाक बघु ;) १० ते १ उलट आकडे मोजत शाहण्या बाळा सारखं लवकर परत ये रे मुडद्या.
17 Feb 2012 - 4:39 pm | कवितानागेश
छान छान गोष्टी!
पण अशा बेसिक गोष्टीवर गोंधळ निर्माण होउन धागा काढवा याचे वाईट वाटतंय...
माणसाची मते नेहमीच ठाम असवीत, मग भले ती चुकीची का असेनात!
अवांतरः हव्या तिथे, हव्या तशा, हव्या तेवढ्या स्मायली आपल्या पण टाकून घ्याव्यात.
कारण येथे आंतर्जाल शुद्धीकरण मोहिम चालू आहे.
17 Feb 2012 - 4:48 pm | गणपा
अजून लोकांचे 'अनुभव' ऐकायला आवडतील.
17 Feb 2012 - 8:58 pm | मृगनयनी
अजून लोकांचे 'अनुभव' ऐकायला आवडतील.
बॉर्र.... सत्यसाईबाबांना म्हणे एक कर्णपिशाच्च वश झाले होते. हातचलाखीने स्वतःच्या किमोनोतून भस्म, उदी वगैरे काढण्याचे काम फक्त सत्यसाईबाबा स्वतःचे स्वतः करायचे.. बाकी "कुणाचे काय "चाल्लेये.. कोणाच्या काय व्यथा आहेत.. हे ते "कर्णपिशाच्च" सत्यसाईबाबांना कानात सान्गायचे..
आणि अर्थातच ते पिशाच्च फक्त स.सा.बा. नाच्च दिसायचे...
स.सा.बा.'च्या मृत्यूनन्तर ते पिशाच्च कुठे गेलं.. हे माहित नाही....... :(
17 Feb 2012 - 9:21 pm | तर्री
अपनेही जाल मी शिकारी फस गया था अबउसे मुक्ती मिली.
17 Feb 2012 - 10:49 pm | मेघवेडा
खोतानुं, जल्लां तुमी चिपलूनचे ना? मंग ह्ये असले प्ररस्नं पडततंच कशे तुमका? कॉकनातल्या करनी भानामतीच्या गोष्टी सांगल्यांव नाय का तुमका कोनी? तां जांवद्या.. जल्लां सोताच्या दॉल्यांनी बगूनपन इश्वास बसनंव नाय काय तुमचा? खुल्यागत परस्नं इच्यारू नका ह्ये आसले.. काय समजलांव?
17 Feb 2012 - 10:53 pm | संपत
आमच्या चाळीत आमच्या घराच्या बरोबर खाली तळमजल्यावर राहणाऱ्या एका कोकणी कुटुम्बाच्या दारासमोर एकदा रात्री अचानक हवेतुन नारळ येउन फुटला. त्यानी बोलावलेल्या मांत्रिकाने हे त्यांच्या एका चुलतभावाने केलेल्या करणीमुळे हे झाले आहे असे पाण्यात बघून सांगितले.घरात एकच गोंधळ उडाला होता आणि त्या चुलत भावावर लगोलग त्या मांत्रिकाने उलट करणी केली असे नंतर आम्हाला कळले. ह्या सर्व प्रकारामुळे मी आणि माझा भाऊ खूप घाबरलो होतो.त्या दिवसानंतर आम्ही घरामध्ये कधीच नारळाने कॅच कॅच खेळलो नाही. पुन्हा खिडकीतून नारळ खाली पडला तर?
(सत्य घटना : आशा आहे की त्या कुटुंबातील कोणी हा धागा वाचत नसावा)
17 Feb 2012 - 11:00 pm | अन्नू
सध्या नारळ पण कित्ती महाग झालेत, नाही? :P
17 Feb 2012 - 11:02 pm | तर्री
कुणाचा नारळ अन कुणाची "करणी" !
विवेक राव : भानामती च्या संदर्भात काही विशेष अभ्यास करता आहात का ?
एक भानामती कट्टा करूया की ?
18 Feb 2012 - 2:54 am | रामपुरी
एवढा दिलखेचक धागा आणि "ओककथा" कश्या नाहीत? कमीतकमी "गळतगेकथा" जरी वाचायला मिळाल्या असत्या तरी धन्य झालो असतो.
नारळाची गोष्ट लै भारी. आणखी किस्से येऊद्यात. कमीत कमी शतक दिडशतक तरी फलकावर झळकलेच पाहिजे.
18 Feb 2012 - 12:22 pm | हंस
एवढा दिलखेचक धागा आणि "ओककथा" कश्या नाहीत? कमीतकमी "गळतगेकथा" जरी वाचायला मिळाल्या असत्या तरी धन्य झालो असतो.
जैसा हुक्म मेरे आका........ ये लिजिए...............................कर्नाटक सरकारचा भानामतीचा ‘बुद्धिवादी शोध’ विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मुलन प्रकरण ८. ---
19 Feb 2012 - 9:41 pm | एम.जी.
या भानामतीवगैरे बायकांना [?] हेही कळत असले पाहिजे की कोण त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत..
त्यांच्या वाटेला जात नाहीत कधी त्या.
ज्यांचा विश्वास असतो त्यांनाच नडतात..