सगळ्याना प्रेम दिवसाच्या मनापासून शुभेच्छा .....त्या निमित्ताने .....माझ्याकडून एक छोटीशी भेट ..
माझ्या लिखाणाला ज्या छोट्याश्या लेखातून सुरुवात झाली ..ते माझ्या आयुष्यातल .....माझ पाहिलं लिखाण ...
म्हणजे " चिंब पावसान ....!! "
पहिलाच प्रयत्न होता हा ..त्यामुळे जस लिहील होत तसच मांडतेय ..
...................../\....................
सकाळपासूनच ढगाळलेल होत ,आज कॉलेजला बँक मारून बाहेर भटकायचा मूड होता .बहुतेक आज नक्की
पावसाच आगमन होणार .किती मस्त वाटतंय ,छानसा थंड गार वारा,अंगावर शहारा आणणारा , त्यात आभाळ आलय
,त्यामुळे उन्हाचा सकाळपासूनच अजिबात पत्ता नव्हता . मी फोनच्या जवळच बसली होती,आईने हाक मारली तरी
दोन मिनिटात काम आटपून पुन्हा फोन जवळ .वाजलाच एकदाचा ." हेल्लो .......हा बोल .....अरे हो मीच बोलतेय
..........हम्म चालेल ...पण गेटच्या बाहेरच थांब हा .........नको नको .....हो रे हो ......बर बाबा ...नक्की ......हम्म
...चल चल ठेवते आई आली " अस म्हणत झालही बोलून . मग पटापट आवरायला घेतल .आज मी छानसा चुडीदार
घालणार होती .हलक्याश्या पांढर्या आणि गुलाबी रंगाचा mixmatch . त्याला फार आवडतो हा रंग आणि हा ड्रेसहि .
त्याला matching सगळ काही .बांगड्यांचा khnkhanaat ..तर त्याच्या चेह्र्य्वारचे रंग बदलतो .
मी तयार झाले .आरशात शेवटची नजर मारून घेतली .धुक्यातल्या दावाबिंदुसारखी दिसत होती मी .जणू पानाच्या
ओंजळीत जाण्यासाठी एवढी सुंदर नटली होती ,माझ मलाच हसू आल .अन नजरही लाजली .
" आई येते ग...थोडा उशीर होईल ......बहुतेक extra lecture असेल संध्याकाळी ...काळजी करू नकोस
......फारच उशीर झाला तरच फोन करेन "..अस म्हणत आईच्या प्रतिक्रियेची वाट न बघताच मी झरझर पावल टाकत
निघाली .
सुधीरचा फोन होता शिवाजी नाट्यमंदिरची दोन तिकीट काढली होती त्याने .त्याला कस कळत माझ्या मनातल तोच
जाने .इतक्यात अंगावर मोठे मोठे पाण्याचे थंडगार थेंब पडू लागले . वर बघितल तर ढग अगदी डोक्यावर उभा राहून
फूल उधळावित तसा पाण्याच्या थेंबांची उधळण करीत होता अस वाटल .
पहिला पावूस ........केवढे मोठे थेंब......अंगावर पडताना वेगळीच स्पर्शाची जाणीव देवून जात होते .
बघता बघता मी भिजू लागले ,छत्रीही आणायची विसरली होती .धावतच जावून रिक्षा पकडली . मनात
फक्त त्याचेच विचार घोळत होते . रोज भेटतो कॉलेजात तरीही अश्या भेट ण्याच एवढ अपरूप का वाटत कुणास ठावूक
.आतुर झाली होती मी त्याला भेटायला .
आजच्या पहिल्या पावसाचा आनंद दोघांना एकमेकासोबत भिजून घ्यायचा होता,एकमेकात हरवून घ्यायचा होता .माझी
अधीरता पाहूनच हा पावूसाही माझी साथ द्यायला नेमका आज हजेरी लावतोय ,आमच्यासारखाच तो हि आतुर आहे
,आम्हाला भिजवायला .
मी गेट च्याजवळ पोहोचले .रिक्षाचे पैसे देत देतच सगळीकडे नजर फिरवली .सुधीर दिसला नाही ,म्हणून मग माझी
नजर थोडी कावरीबावरी झाली .पावूस चालूच होता ,अन मला पुन्हा भिजवायला लागला .सरीवर सरी अंगावर येवून
हलकाच हात लावून जातायत अस वाटल .कुठे असेल हा ?नेहेमी माझ्या आधी येतो ...आज काय झाल त्याला . एकतर
किती छान पावूस,एकही क्षण आज वेस्ट करायचा नाहीय मला .पण राहिला कुठे हा ?
एकामागून एक विचार डोकावून जात होते,अन डोक खावून जात होते.मी आता जवळ जवळ भिजून चिंब झाली होती
.केसातून पाण्याचे ओघळ गालावर येवू लागले होते .थंडी ने अंगावर काटा उभा राहिला होता . डोळ्यात पाणी जावून डोळे
पाणेरी दिसू लागले होते . ओठांवर तर पावसाच्या काही थेंबानी बस्तान बांधल होत .
एकंदरीत चिंब..चिंब...अन,......चिंब.
इतक्यात छत्रीचा असून नसल्यासारखा उपयोग करत सुधीर आलाच .छत्री असूनही भिजला होता .निळ्या रंगाचा शर्ट
त्यावर हिरव्या linings ,अन काळ्या रंगाची trawzar .छान दिसत होता .पुढचे केस भिजून कपाळावर पसरले होते .
हातात छत्री नावालाच धरली होती ,कारण कुठेही सुका दिसत नव्हता ."हे काय रे सुधीर ,कितीवेळ ,मी कधीची वाट
बघतेय ,अन छत्री असून भिज्लास कसा रे ? अगदीच वेंधळा आहेस "....मी फारच चिडली होती .
पण तो मात्र शांतपणे माझ्या चेहेर्याकडे बघत उभा ,मला न्याहाळत होता .चेहेर्यावर्ण नजरच हटेना त्याची ,मला फार
लाजल्यासारख झाल . मी खाली जमिनीकडे पाहू लागले...तीही माझ्यासारखी चिंब भिजली होती ..........भिजून
ओल्या मातीचा सुगंध देत होती .सुधीरच्या नजरेत आज वेगळीच चमक होती .सगळ प्रेम डोळ्यात दाटून गर्दी करत होत
.ओठांवरच स्मितहास्य..त्याच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवायला भाग पाडत होत .
"अस आहे तर एकंदरीत " अस म्हणाला .
का ? अस का म्हणाला ?.
कारण जेव्हा त्याच्याकडे शब्दच नसतात बोलायला तेव्हा तो मनातल सगळ याच ओळीने व्यक्त करतो .हे माझ्याइतक
कोण ओळखणार .
"पण भिज्लास कसा एवढा ?"...माझ्या प्रश्नावर पुन्हा एकदा गालातल्या गालात हसत "अग तुला दुरून
पाहत होतो बराच वेळ ,तू माझी वाट बघत होतीस ,अन पावूस येवून तुला भिजवत होता ,तुझी नजर मला शोधत होती
,अन पावसाचे थेंब तुझ्या चेहेर्याला स्पर्शून जात होते .तुझ्या केसात्न पाणी टपकत होत,अन माझ्या काळजाचा ठोका
चुकत होता .आज नक्कीच पावसाला माझा हेवा वाटत असावा .म्हणत असणार तो ,कि मी जिला इतक्या आतुरतेने
,प्रेमाने भिजव्तोय ,ती मात्र कुणा दुसर्याबरोबरच माझ्याकडून भिजून घेण्याची स्वप्न बघतेय ,"
मग मीही भिजून घेतल मनसोक्त .अगदी छत्री बाजूला करून .म्हटल पावसाला ,"बघ मला भिजवून ...माझ्याच्बरोबर
भिजायची ती स्वप्न बघतेय .माझ्याही मनाला तुझ्या थेंबांचा स्पर्श करून बघ ,कारण याच मनावर ती मनापासन प्रेम
करतेय."
एक क्षण मी सुधीरकडे बघतच राहिले . काय बोलत होता तो आज .माझ्या सौंदर्यावर तो आज प्रथमच बोलला होता .मी
खरच लाजली .त्याच्या नजरेला नजर भिडेना माझी .मग अलगद हनुवटीला हाताने वर करून त्याने पुन्हा एकदा
माझ्याकडे पाहिलं . " मी चेहेरा बाजूला करून," पुरे आता ,उशीर होतोय आज अश्याच अवस्थेत नाटक बघावं लागणार
बहुतेक ".
अस म्हणत त्याच लक्ष दुसरीकडे वळवल .पण तो मात्र अजूनही त्याच पावसात ..त्याच धुंदीत..त्याच मोहोरलेल्या
क्षणांना डोळ्यात घेवून तसाच उभा होता.
" नको जावूया नाटक बघायला ,चल समुद्राच्या किनार्यावर जावून मनसोक्त पावसात भिजू.,एकाच छत्रीत
पावसाच्या थेम्बांशी लपाछुपी खेळू . खूपवेळ एकमेकांना सहवासाने ,स्पर्शाने भिजवू ,
आज मनाला मुक्तपणे मनातल सांगायला,अन बोलायला देवू ....चल ....येतेस ना".
आता पावसाचा जोर माझ्या श्वासांप्रमानेच वाढला होता .
माझ्या हाताने केव्हा त्याचा हात धरला ,केव्हा त्यच्या बोटात बोट गुंफली ,केव्हा त्याच्या नजरेत नजर मिसळली ,केव्हा
मनानं होकार दिला ,अन केव्हा पावलांनी त्याच्या पावलांना साथ दिली ................मला काहीच कळल नाही .
_______________________END__________________________
प्रतिक्रिया
14 Feb 2012 - 11:52 am | पियुशा
फर्मास !!!!!!!
14 Feb 2012 - 12:04 pm | तुषार काळभोर
पर्फेक्ट शब्द आहे!!
14 Feb 2012 - 3:37 pm | बिपिन कार्यकर्ते
फर्मास + २!!!
14 Feb 2012 - 11:54 am | स्पा
खूपच चान...
दोन लेख सलग वाचायला मिळाल्याने आनंद जाहला :)
--(तिसर्या लेखाच्या प्रतीक्षेत)स्पा
14 Feb 2012 - 3:24 pm | ५० फक्त
मा. स्पाजी, नक्की कशाची प्रतिक्षा करताय, तिस-याची, तिस्-या लेखाची का युबिस्लेटची, ?
14 Feb 2012 - 12:09 pm | जेनी...
अजून खूप लेख आहेत माझे
पण एक एक करून टाकेन ...
प्रतिक्रियांबद्दल ..पुन्हा एकदा मनापासून आभार
14 Feb 2012 - 12:10 pm | जेनी...
अजून खूप लेख आहेत माझे
पण एक एक करून टाकेन ...
प्रतिक्रियांबद्दल ..पुन्हा एकदा मनापासून आभार
14 Feb 2012 - 12:28 pm | पियुशा
अजून खूप लेख आहेत माझे
पण एक एक करून टाकेन ...
हो नक्की टा़का ,पण दोन लेखांमध्ये किमान ३-४ दिवसाचे अंतर ठेवले तर जास्ती सोइस्कर होइल वाचकाकरिता :)
14 Feb 2012 - 6:47 pm | चिंतामणी
"तीकडुन" आयात करताना थोडा वेळ घे.
नाहीतर
असे करतील. ;) ;-) :wink:
14 Feb 2012 - 12:32 pm | जेनी...
हो नक्किच ....
ह लेख हि नन्तर
टाकणार होती ..
पण valentine 's च्या निमित्ताने टाकलाय ..
पुढचे सगळे आठवड्यातून एकेक ;)
14 Feb 2012 - 1:11 pm | परिकथेतील राजकुमार
अतिशय....सुरेख...लिखाण.
वाचून,.... मस्त....
....वाटले.... एकदम.....
पुढील.... लिखाणाला...
शुभेच्छा....
14 Feb 2012 - 2:39 pm | सानिकास्वप्निल
हा ही लेख छान जमलाय :)
पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत
14 Feb 2012 - 2:45 pm | मोहनराव
पुलेशु!!
14 Feb 2012 - 3:24 pm | ५० फक्त
छान मोरपंखी लेखन, लाटलेली पोळी तव्यावर जाण्यापुर्वी जशी मउ लागते ना तसं, पण ती तशीच खाता येत नाही.
14 Feb 2012 - 7:50 pm | शुचि
पूजा यांचे लेखन तर अप्रतिमच पण ५० यांचा प्रतिसाददेखील क्या केहेने :)
14 Feb 2012 - 3:25 pm | वपाडाव
कल्ला का काय म्हणतात तसलं लेखन....
जागतिक प्रेमदिन मुबारक हो...
14 Feb 2012 - 6:02 pm | किसन शिंदे
व्वा!!
तो पाऊस, ते दोघांचही भिजणं अगदी छानपैकी डोळ्यासमोर उभं केलत तुम्ही.
14 Feb 2012 - 6:38 pm | स्वाती२
मस्तच!
14 Feb 2012 - 7:57 pm | अन्नू
आवडले! :)
14 Feb 2012 - 8:14 pm | रेवती
रोम्यांटिक.;)
14 Feb 2012 - 8:25 pm | जेनी...
:)........
14 Feb 2012 - 8:42 pm | गणेशा
तुमचा मी पहिलाच लेख वाचला ..
आवडला ..
लिहित रहा... वाचत आहे...
14 Feb 2012 - 10:15 pm | पैसा
लेख आवडला, आता पुढचा लेख मुपीवरून इथे कॉपी पेस्ट न करता इथल्या 'पूर्वदृश्य ' या सोयीचा वापर करून बघा. म्हणजे नीटस दिसेल.
14 Feb 2012 - 10:48 pm | जाई.
छान लेखन
15 Feb 2012 - 10:36 am | अमृत
मंझील चित्रपटातील लताच्या गाण्याची आठवण झाली. अनवाणी पायांनी अमिताभच्या चालीशी चाल जुळवून घेतांना अक्शरशः धावणारी साडीतील मौसमी आणि पाण्यानी निथळलेला सुट घातलेला अमिताभ डोळ्यांपुढे उभे राहीलेत.
तुमचे लिखाण आवडले. आणखी वाचायल आवडेल.
अमृत
15 Feb 2012 - 3:27 pm | प्राजक्ता पवार
सुरेख !
11 Mar 2016 - 6:13 pm | जेनी...
=)) टिंबं बघुन जुन्या आठवनी जागा झाल्या .. :(
11 Mar 2016 - 6:16 pm | बॅटमॅन
असं आहे तर एकंदरीत!