उदय सप्रेम स्पष्ट सांगतो त्याबद्दल राग मानू नका पण व्यक्तिचित्र(पोर्टेट्स) तुम्हाला नाही जमत. कोणत्याही कोनातून ही माधुरी (दिक्षितांची असल्यास)दिसत नाही. ह्याआधीही तुम्ही काही लोकांची व्यक्तिचित्रे इथे चढवलीत पण तीही खास जमली नव्हती.
मात्र नुसते चित्र म्हणून छान आहे. तुम्ही अमूर्त चित्र काढत जा त्यात तुलना होत नाही. साम्य शोधले जात नाही.
अहो, तुम्हाला काही आवडलं नाही तर त्यावर टिचकी मारू नका. रसग्रहण करू नका. ते चूक लक्षात घेऊन प्रयत्न करत आहेत तेव्हा जमली तर मदत करा.
उदय,
मला चित्रातलं फारसं कळत नाही. घाणेकरांचे डोळे तुम्ही छान काढले होते पण चेहरा गुबगुबीत दिसत होता. माधुरीचा चेहराही गुबगुबीत दिसतो. अभिनेत्री आहे हो! तिला बाकी सर्व परवडेल पण जाडं होणं परवडणार नाही.
येथील कुठल्याही सदस्यास, "लिहू नका" असे लिहू नये. वाटल्यास सदर सदस्यांकडून आलेले लेख तुम्हाला बोअर वाटत असतील, तर वाचू नका, प्रतिसाद देऊ नका, तुमच्या लेखनातून टोचा त्यांना, वाटल्यास. पण कुणालाही लिहू नका असे मात्र म्हणू नका.
लिहा लिहा लिहा, असेच म्हणत राहा. त्याचा योग्य समाचार आम्ही घेऊच, असे म्हणा वाटल्यास.
ह्या माझ्या वाक्यामुळे इथे बर्याच जणांना क्लेष झालेले दिसताहेत,तेव्हा त्या सर्वांबरोबर उदयराव सप्रेम मी आपलीही बिनशर्त माफी मागतो.
प्रमोदकाका तुम्ही पण ते बाळपणीचे लेख लिहुन बोर मारु नका बॉ!
बैलोबांची ही सुचनाही आम्ही नोंदवून घतलेय. त्यावर मी इतकेच सांगेन की मी लिहिणे दुसर्या कुणाच्या सांगण्याने बंद करणार नाही हे नक्की . मात्र आपल्या विनंतीला मान देऊन माझे ह्यापुढचे लिखाण इथे मिपावर प्रसिद्ध करून तुम्हाला बोर मारणार नाही.
मात्र आपल्या विनंतीला मान देऊन माझे ह्यापुढचे लिखाण इथे मिपावर प्रसिद्ध करून तुम्हाला बोर मारणार नाही.
प्रमोदकाका
आपण आमच्या नेहमीच फिरक्या घेत आला आहात, कधी "नाही लिहिणार आता, कध्धीच, कारण आमच्या दूरस्थ पुतण्याच्या संध्येत व्यत्यय येतो" असे लिहून, आणि कधी "द्राक्षासवाचा अंमल" ह्याशीर्षकाखाली काहीच न लिहून. मग आता, हे वरचे जे आपण लिहिले आहे, ती फिरकी आहे की नाही, हे ठरवण्यात येथील सदस्यांचे बीपी वाढवण्यापेक्षा, नीट ठरवा बुवा. येथील सदस्यांच्या बीपी आणि डायबेटीसचा सवाल आहे ;-)
बाकी, मिसळपावाच्या कार्यकरिणीत एकाच स्त्रीचा बडेजाव नसावा, ह्याबद्दल आपल्याला संमती. विशेषतः सदर स्त्री सदस्यांच्या वरिष्ठतेचा सन्मान करत नाही, नुस्त्या संकेतस्थळाच्या धोरणाची अंमलबजावणी करत राहते, तेव्हा तर आम्हाला अशा स्त्री-पुरुष असमानतेची चीडच येते.
हे विचारपूर्वक उचललेले पाऊल आहे.
माझ्या लेखनाचा कंटाळा आलाय हे इतक्या स्पष्ट पणे आणि प्रामाणिकपणे सांगितल्यावर देखील ते इथे प्रकाशित करत राहणे मला
योग्य वाटत नाहीये. प्रामाणिक आणि स्पष्ट मतांचा मी स्वत: समर्थक आहे आणि म्हणूनच अशा तर्हेच्या मताचा आदर राखणे ही देखिल माझी जबाबदारी आहे असे मला वाटते.
मात्र माझे लिहीणे हे स्वांतसुखाय असल्यामुळे ते मात्र मी बंद करणार नाही. माझ्या जालनिशीवर ते मी प्रकाशित करणारच. ज्यांना ते वाचावेसे वाटत असेल त्यांनी ते तिथे वाचावे.
अरे स्वतःच्या समाधानासाठी असा प्रतिसाद लिहिलास, आणि मिसळपावाच्या जन्मापासून येथील सुखदु:खांत सहभागी असणार्य देवमाणसाला इथून उठवलेस. आता भोग आपल्या कर्माची फळे.
आता प्रायश्चित्त घे, बैला. एक तर ह्या देवमाणसाला परत आणण्यास करुणा भाक, अथवा, अहमदाबाद, बडोदा, बंगलोर येथील तुझी स्वतःची प्रवासवर्णने लिही.

योग्य वाटत नाहीये.
का बरं? ज्यांना तुमचे लेखन आवडत नाही ते नाही वाचणार, परंतु मला तुमच्या आठवणी वाचायला आवडतात. तेव्हा तुमचे लेखन तुम्ही मिपावरही अगदी अवश्य प्रसिद्ध करावे ही विनंती.
प्रमोदकाका सांगतात त्यापेक्षा थोडे बदलून सांगतो (पण साधारण तेच). प्रयत्नांती पूर्णता - व्यक्तिचित्रे काढतच राहा. फक्त ते कोणाचे आहे ते नाव येथे देऊ नका. लोक एक स्वतंत्र सुंदर चित्र म्हणून दाद देतील. जसे-जसे चित्रण हुबेहूब होऊ लागेल, लोक आपणहून ओळखू लागतील कोण आहे. ती स्थिती आल्यावर पुन्हा नावासह व्यक्तिचित्र देण्यास हरकत नाही.
धनंजय भौ , योग्य आणि व्यवस्थित प्रतिसाद.
सप्रे बॉस.. धनंजय भौ बरोबर म्हणाले ! तुमची चित्रकला खरोखर ऊत्तम आहे. परंतू व्यक्तीचित्र काढताना होतं काय, आपण जी प्रतिमा बघून ड्रॉ करतो , तशीच ती असेल देखिल पण पेन्सिलच्या शेड मधे ती बहूतेक वेळा तशी नाही भासत. त्यामूळे व्यक्तिचित्रणासाठी चित्र थोडे सिलेक्ट करून घ्यावे. ह्या चित्रात ओठ अप्रतिम जमलेले आहेत. चालू द्या... निगेटीव्ह प्रतिक्रीयांनी आपले प्रयत्न बंद नका करू.. ड्रॉईंग ऊत्तम आहे.
प्रमोदकाका , आपला प्रतिसाद एकदम खच्ची करणारा होता बॉ . हे म्हणजे राग नको मानू अन् थोबाडीत मारायची असे वाटले.
कुबड्या खवीस
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
माधुरी तुम्हाला दिसली तशी तुम्ही काढली. स्वांतःसुखाय प्रयत्न करत रहायला हरकत नाही. एक ना एक दिवस तुम्हाला दिसणारी माधुरी दुसर्यानाही दिसेल :-)
चारोळी मला आवडली नाही. पण तुम्ही अशा चारोळ्या लिहीणे - न लिहीणे हा तुमचा प्रश्न :-)
व्यक्तिचित्रणातील सर्वात अवघड आणि महत्वाची गोष्ट मला तरी डोळे रेखाटणे वाटते. तुमची चित्रे सुंदर असली तरी नेहमी डोळ्यात काहीतरी गडबड होते असे वाटते (नक्की काय ते मी सांगू शकत नाही). किंचीत उघडलेले ओठ मात्र मस्तच जमले आहेत आगदी माधुरी सारखे.
म्हणुन चांगले आलेय्..थोडे नाकावर लक्ष पाहिजे होते..असे वाटते..
व्यक्तिचित्र काढणे कठीण असते पण तुमची पेन्सिल चित्रकला उत्तम आहे..असच सुरु राहु दया..
>>प्रयत्नांती पूर्णता - व्यक्तिचित्रे काढतच राहा. फक्त ते कोणाचे आहे ते नाव येथे देऊ नका. लोक एक स्वतंत्र सुंदर चित्र म्हणून दाद देतील. जसे-जसे चित्रण हुबेहूब होऊ लागेल, लोक आपणहून ओळखू लागतील कोण आहे. ती स्थिती आल्यावर पुन्हा नावासह व्यक्तिचित्र देण्यास हरकत नाही.
धनंजय यांच्या या मताशी मी पण पुर्णपणे सहमत...
कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रीया वाचुन चित्रे काढणे बंद करु नका..
माधुरी आम्हाला २ वर्षे जूनिअर , त्यामुळे पाहिली नकीच आहे , पण हे आता म्हणायचं, कॉलेजमधे माधुरीपेक्षाही सुंदर मुली होत्या, त्यामुळे त्यावेळी तिच्याकडे फारसं लक्ष नाही गेलं.ती डान्समधे आणि आम्ही गाण्यात्.....तिची बहीण भारती दिक्षित ही अप्रतीम सुंदर होती , बॉब केलेले कुरळे केस , हिरवे डोळे, फिजिक्स शिकवायची , मी तिचा लाडका होतो (इतर वाचकांनी आचरट अर्थ काढू नयेत ! ती मला तेंव्हा कमीत कमी १५ वर्षे सिनिअर असेल !).....
आता इतर प्रतिक्रियांबाबत :
जे नीट जमलं नाहिये ते नाही जमलेलं , ते सांगितलं म्हणून अजिबात राग नाही येत्.वाईट एव्हढ्याच गोष्टीचं वाटत की या चित्राबरोबर बाकी सगळ्याच चित्रांना नावे ठेवली जात आहेत्.तमाम लोकांनी परत एकदा पुढील चित्र बघावीत आणि मग सांगावे :
चार्ली चॅप्लीन
मधुबाला
नूतन
मदन मोहन
या व्यतिरिक्त घरी अजून बरीच आहेत ती पण पाठवणार आहेच्.टीका जरूर करा पण एक चोखंदळ वाचक वा रसग्रहण करणारी व्यक्ती म्हणून.उगीच काही तरी लिहायचे म्हणून लिहू नका.
मी मांजराच्या जातीचा आहे , कितीही उंचावरून फेकलंत तरी पायांवरच उभा रहाणार , डोक्यावर पडणार आणि जखमी होणार नाही , माझे प्रयत्न चालूच रहातील.
प्रमोदकाका तुम्ही छान लिहिता , आम्हाला आवडते , माझी स्वतःची "रात्र थोडी सोंगे फार" अशी स्थिती असल्याने मी सगळ्याच लोकांना माझ्या प्रतिक्रिया देऊ शकत नाही याबध्दल क्षमस्व , (म्हणजी मी इंटिरिअर डिझाईनर आहे, वास्तूशास्त्र सलागार आहे, कविता, लेख्,कादंबरी लेखन, गाणे ऐकणे-म्हणणे,नकला करणे,मुलांचा अभ्यास घेणे,नोकरी - इंजिनिअर ची.....) पण मिपा हे संकेतस्थळ आणि त्यावरील सर्व सदस्य हे फार सुजाण आणि चांगले आहेत असे माझे स्पष्ट मत आहे.कृपया एव्हड्याशा कारणांवरून हमरीतुमरीवर येवून या संकेतस्थळाची शांती बिघडवू नका आणि तात्यांसारख्या सिनिअर माणसाचे इतके छान यश याला गालबोट लावू नका !
या समाजाचं माझ्यावर फार मोठं ऋण आहे हे मी कधीही विसरलो नव्हतो , नाहिये आणि विसरणार पण नाही.कौतुक करणार्या हरएक व्यक्तीला माझा कान पिळायचा पूर्ण अधिकार आहे आणि मला असे सगळ्यांकडून योग्य त्या शब्दात आणि योग्य त्या कारणासाठे कान पिळून घेण्यात आणि नंतर अशा चुका सुधारण्यात कोणताही कमीपणा वाटणार नाही.
इतक्या स्पष्टपणे लिहून पण ज्यांना माझ्याबध्दल वा माझ्या लिखाणाबध्दल वा कलाकृतींबध्दल वा माझ्या रॅशनल ऍप्रोच बाबत काही गैरसमज असेल त्यांनी मला माफ करावं , पण एक छान शेर आठवल तो सांगून थांबतो (हा शेर "श्रीमान योगी" मधे कै.रणजित देसाई यांनी मिर्झा राजे जयसिंग यांच्या तोंडी घातला आहे :
खुदही को कर बुलंद इतना के खुद खुदा भी
हर तहरीर से पहले आके तुझसे पूंछें के,
"बता तेरी रझा क्या है?".....
स्वतःलाच इतकं श्रेष्ठ बनव की प्रत्यक्ष परमेश्वर पण तुझी ललाटरेषा बनवायच्या आधी तुला येवून विचारेल ,"बोल तुझी काय मर्जी आहे?".....
मी चुकतो यात वाद नाही , पुन्हा सुधारण्यासाठी उठतो
"मला हे येत नाही" या जाणिवेनं मी जिद्दीला पेटतो
तुम्ही हात द्याल तर लवकर ध्येय गाठीन मी ,
अडथळे आले तर उलट मी अधिक वेगाने पळत सुटतो !
हनुवटीपासून वरती नाकाच्या शेंड्यापर्यंत माधुरी छानच जमली आहे. कपाळ, गालाची हाडे वगैरे भागही बर्यापैकी साधर्म्य दाखवतो.
डोळ्यांची गंमत अशी असते की तेवढेच जरी जमले तरी चित्र जमून गेल्यसारखे असते पण ते अवघडही असतात!
तुमच्या हातात कला आहे, चित्रे काढत रहा . पुढच्या चित्राला शुभेच्छा!
ए अगदी सहमत गं.. थोडी जुही चावलाच वाटते..
चित्रं अजुन चांगलं येऊ शकलं असतं.. थोडं तिरकं झालय का? डोळ्यामधे जो पांढरा ठीपका असतो, त्याने डोळे अगदी सजिव वाटतात, तो इथे नीट दिसत नसल्याने डोळे बरोबर वाटत नाही आहेत का? काही सुधारणा, म्हणजे जे मला बघायला ऑड वाटतंय ते सांगते..
१) टिकली जरा उजवीकडे सरकलीय.. बरोबर मधे पाहीजे..
२) डावी नाकपुडी चुकलेली वाटते.. काय बरोबर करता येईल कळत नाही.. कदाचित उजव्या नाकपुडीच्या लेव्हलला नाही आली.
३) उजवा डोळा जरा उजवीकडे झुकल्यासारखा वाटतो..
या सगळ्या गोष्टी बरोबर आल्या असत्या तर खूप उठाव मिळाला असता चित्राला असे वाटते.. तुम्हाला इतकं चांगलं जमते म्हणून सांगायचे धाडस करतीय. प्लीज डोन्ट माईन्ड..
तसेच,चित्राबरोबर कुठला पेपर्,किती नं ची पेन्सिल(एच्बी, टुबी वगैरे) किंवा चारकोल असं लिहीलंत तर अजुन बरं पडेल.. आम्हा नवशिक्यांसाठी सोयीचं! :) अजुन चित्रं नक्कीच येऊदे.. सडेतोड मतं येतील एकवेळ, पण इतकं सुद्धा जमणं अवघड आहे, त्यामुळे प्रयत्नांनी अजुन चांगलं नक्कीच जमेल..

सर्कीट रावाशी सहमत!!!!!!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
हे चित्र माधुरीचं तर वाटत नाहीच, परंतु नुसतं एका स्त्रीचं रेखाचित्र म्हणून बघायला गेलो तरीही ते मला आवडलं नाही. बाई अंमळ बटबटीत वाटली/वाटते! आणि मला बटबटीत बायका दिसायला आवडत नाहीत! ;)
असो, चित्र आवडलं नाही, पुढील चित्रकलेकरता अनेकानेक शुभेच्छा!
प्रतिक्रिया
23 Jul 2008 - 4:37 pm | सुचेल तसं
चारोळी छान आहे.
स्केचही सुंदर आहे. पण माधुरीचं वाटत नाही.
http://sucheltas.blogspot.com
23 Jul 2008 - 4:49 pm | उदय सप्रे
पुढच्या वेळी आणखीन सुधारणा होईल याचा नक्की प्रयत्न करीन.
यावेळी अपेक्षाभंगाबध्दल क्षमस्व.
23 Jul 2008 - 4:55 pm | सुचेल तसं
पुढील स्केचसाठी शुभेच्छा!!
[तुम्ही स्केच अप्रतिम काढता ह्यात काहीच वाद नाही.]
http://sucheltas.blogspot.com
23 Jul 2008 - 4:48 pm | आनंदयात्री
टिकली मस्त आलीये, त्या टिकलीची बाजुची शेड वैगेरे खासच अन त्यावरुन ओघळणारी बट तर कात्तिल्ल !!
आपलाच,
आंद्या सप्रे'म
23 Jul 2008 - 5:00 pm | प्रमोद देव
उदय सप्रेम स्पष्ट सांगतो त्याबद्दल राग मानू नका पण व्यक्तिचित्र(पोर्टेट्स) तुम्हाला नाही जमत. कोणत्याही कोनातून ही माधुरी (दिक्षितांची असल्यास)दिसत नाही. ह्याआधीही तुम्ही काही लोकांची व्यक्तिचित्रे इथे चढवलीत पण तीही खास जमली नव्हती.
मात्र नुसते चित्र म्हणून छान आहे. तुम्ही अमूर्त चित्र काढत जा त्यात तुलना होत नाही. साम्य शोधले जात नाही.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
24 Jul 2008 - 3:59 am | विकेड बनी
अहो, तुम्हाला काही आवडलं नाही तर त्यावर टिचकी मारू नका. रसग्रहण करू नका. ते चूक लक्षात घेऊन प्रयत्न करत आहेत तेव्हा जमली तर मदत करा.
उदय,
मला चित्रातलं फारसं कळत नाही. घाणेकरांचे डोळे तुम्ही छान काढले होते पण चेहरा गुबगुबीत दिसत होता. माधुरीचा चेहराही गुबगुबीत दिसतो. अभिनेत्री आहे हो! तिला बाकी सर्व परवडेल पण जाडं होणं परवडणार नाही.
24 Jul 2008 - 7:20 am | धमाल नावाचा बैल
प्रमोदकाका तुम्ही पण ते बाळपणीचे लेख लिहुन बोर मारु नका बॉ!
बैलोबा
24 Jul 2008 - 8:31 am | सर्किट (not verified)
येथील कुठल्याही सदस्यास, "लिहू नका" असे लिहू नये. वाटल्यास सदर सदस्यांकडून आलेले लेख तुम्हाला बोअर वाटत असतील, तर वाचू नका, प्रतिसाद देऊ नका, तुमच्या लेखनातून टोचा त्यांना, वाटल्यास. पण कुणालाही लिहू नका असे मात्र म्हणू नका.
लिहा लिहा लिहा, असेच म्हणत राहा. त्याचा योग्य समाचार आम्ही घेऊच, असे म्हणा वाटल्यास.
- सर्किट
24 Jul 2008 - 8:54 am | प्रमोद देव
तुम्ही व्यक्तिचित्र नका काढू बॉ!
ह्या माझ्या वाक्यामुळे इथे बर्याच जणांना क्लेष झालेले दिसताहेत,तेव्हा त्या सर्वांबरोबर उदयराव सप्रेम मी आपलीही बिनशर्त माफी मागतो.
प्रमोदकाका तुम्ही पण ते बाळपणीचे लेख लिहुन बोर मारु नका बॉ!
बैलोबांची ही सुचनाही आम्ही नोंदवून घतलेय. त्यावर मी इतकेच सांगेन की मी लिहिणे दुसर्या कुणाच्या सांगण्याने बंद करणार नाही हे नक्की . मात्र आपल्या विनंतीला मान देऊन माझे ह्यापुढचे लिखाण इथे मिपावर प्रसिद्ध करून तुम्हाला बोर मारणार नाही.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
24 Jul 2008 - 9:55 am | सर्किट (not verified)
मात्र आपल्या विनंतीला मान देऊन माझे ह्यापुढचे लिखाण इथे मिपावर प्रसिद्ध करून तुम्हाला बोर मारणार नाही.
प्रमोदकाका
आपण आमच्या नेहमीच फिरक्या घेत आला आहात, कधी "नाही लिहिणार आता, कध्धीच, कारण आमच्या दूरस्थ पुतण्याच्या संध्येत व्यत्यय येतो" असे लिहून, आणि कधी "द्राक्षासवाचा अंमल" ह्याशीर्षकाखाली काहीच न लिहून. मग आता, हे वरचे जे आपण लिहिले आहे, ती फिरकी आहे की नाही, हे ठरवण्यात येथील सदस्यांचे बीपी वाढवण्यापेक्षा, नीट ठरवा बुवा. येथील सदस्यांच्या बीपी आणि डायबेटीसचा सवाल आहे ;-)
बाकी, मिसळपावाच्या कार्यकरिणीत एकाच स्त्रीचा बडेजाव नसावा, ह्याबद्दल आपल्याला संमती. विशेषतः सदर स्त्री सदस्यांच्या वरिष्ठतेचा सन्मान करत नाही, नुस्त्या संकेतस्थळाच्या धोरणाची अंमलबजावणी करत राहते, तेव्हा तर आम्हाला अशा स्त्री-पुरुष असमानतेची चीडच येते.
- (आपला पुतण्या) सर्किट
24 Jul 2008 - 10:10 am | प्रमोद देव
हे विचारपूर्वक उचललेले पाऊल आहे.
माझ्या लेखनाचा कंटाळा आलाय हे इतक्या स्पष्ट पणे आणि प्रामाणिकपणे सांगितल्यावर देखील ते इथे प्रकाशित करत राहणे मला
योग्य वाटत नाहीये. प्रामाणिक आणि स्पष्ट मतांचा मी स्वत: समर्थक आहे आणि म्हणूनच अशा तर्हेच्या मताचा आदर राखणे ही देखिल माझी जबाबदारी आहे असे मला वाटते.
मात्र माझे लिहीणे हे स्वांतसुखाय असल्यामुळे ते मात्र मी बंद करणार नाही. माझ्या जालनिशीवर ते मी प्रकाशित करणारच. ज्यांना ते वाचावेसे वाटत असेल त्यांनी ते तिथे वाचावे.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
24 Jul 2008 - 11:07 am | सर्किट (not verified)
बैलोबा,
बघितलेस आपल्या स्वान्तसुखाय लेखनाचे परिणाम ?
अरे स्वतःच्या समाधानासाठी असा प्रतिसाद लिहिलास, आणि मिसळपावाच्या जन्मापासून येथील सुखदु:खांत सहभागी असणार्य देवमाणसाला इथून उठवलेस. आता भोग आपल्या कर्माची फळे.
आता प्रायश्चित्त घे, बैला. एक तर ह्या देवमाणसाला परत आणण्यास करुणा भाक, अथवा, अहमदाबाद, बडोदा, बंगलोर येथील तुझी स्वतःची प्रवासवर्णने लिही.
- (दु:क्खित) सर्किट
24 Jul 2008 - 6:26 pm | विसोबा खेचर
माझ्या लेखनाचा कंटाळा आलाय हे इतक्या स्पष्ट पणे आणि प्रामाणिकपणे सांगितल्यावर देखील ते इथे प्रकाशित करत राहणे मला
योग्य वाटत नाहीये.
का बरं? ज्यांना तुमचे लेखन आवडत नाही ते नाही वाचणार, परंतु मला तुमच्या आठवणी वाचायला आवडतात. तेव्हा तुमचे लेखन तुम्ही मिपावरही अगदी अवश्य प्रसिद्ध करावे ही विनंती.
तात्या.
23 Jul 2008 - 10:39 am | संदीप चित्रे
मीही असेच म्हणतो देवकाका !
--------------------------
www.atakmatak.blogspot.com
24 Jul 2008 - 2:34 am | धनंजय
असू शकेल माधुरी.
पेन्सिलवर तुमचे प्रभुत्व खासच. मानले तुम्हाला!
प्रमोदकाका सांगतात त्यापेक्षा थोडे बदलून सांगतो (पण साधारण तेच). प्रयत्नांती पूर्णता - व्यक्तिचित्रे काढतच राहा. फक्त ते कोणाचे आहे ते नाव येथे देऊ नका. लोक एक स्वतंत्र सुंदर चित्र म्हणून दाद देतील. जसे-जसे चित्रण हुबेहूब होऊ लागेल, लोक आपणहून ओळखू लागतील कोण आहे. ती स्थिती आल्यावर पुन्हा नावासह व्यक्तिचित्र देण्यास हरकत नाही.
24 Jul 2008 - 3:24 am | टारझन
धनंजय भौ , योग्य आणि व्यवस्थित प्रतिसाद.
सप्रे बॉस.. धनंजय भौ बरोबर म्हणाले ! तुमची चित्रकला खरोखर ऊत्तम आहे. परंतू व्यक्तीचित्र काढताना होतं काय, आपण जी प्रतिमा बघून ड्रॉ करतो , तशीच ती असेल देखिल पण पेन्सिलच्या शेड मधे ती बहूतेक वेळा तशी नाही भासत. त्यामूळे व्यक्तिचित्रणासाठी चित्र थोडे सिलेक्ट करून घ्यावे. ह्या चित्रात ओठ अप्रतिम जमलेले आहेत. चालू द्या... निगेटीव्ह प्रतिक्रीयांनी आपले प्रयत्न बंद नका करू.. ड्रॉईंग ऊत्तम आहे.
प्रमोदकाका , आपला प्रतिसाद एकदम खच्ची करणारा होता बॉ . हे म्हणजे राग नको मानू अन् थोबाडीत मारायची असे वाटले.
कुबड्या खवीस
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
24 Jul 2008 - 6:35 am | मुक्तसुनीत
माधुरी तुम्हाला दिसली तशी तुम्ही काढली. स्वांतःसुखाय प्रयत्न करत रहायला हरकत नाही. एक ना एक दिवस तुम्हाला दिसणारी माधुरी दुसर्यानाही दिसेल :-)
चारोळी मला आवडली नाही. पण तुम्ही अशा चारोळ्या लिहीणे - न लिहीणे हा तुमचा प्रश्न :-)
24 Jul 2008 - 3:30 am | कोलबेर
व्यक्तिचित्रणातील सर्वात अवघड आणि महत्वाची गोष्ट मला तरी डोळे रेखाटणे वाटते. तुमची चित्रे सुंदर असली तरी नेहमी डोळ्यात काहीतरी गडबड होते असे वाटते (नक्की काय ते मी सांगू शकत नाही). किंचीत उघडलेले ओठ मात्र मस्तच जमले आहेत आगदी माधुरी सारखे.
24 Jul 2008 - 4:00 am | स्वप्निल..
म्हणुन चांगले आलेय्..थोडे नाकावर लक्ष पाहिजे होते..असे वाटते..
व्यक्तिचित्र काढणे कठीण असते पण तुमची पेन्सिल चित्रकला उत्तम आहे..असच सुरु राहु दया..
>>प्रयत्नांती पूर्णता - व्यक्तिचित्रे काढतच राहा. फक्त ते कोणाचे आहे ते नाव येथे देऊ नका. लोक एक स्वतंत्र सुंदर चित्र म्हणून दाद देतील. जसे-जसे चित्रण हुबेहूब होऊ लागेल, लोक आपणहून ओळखू लागतील कोण आहे. ती स्थिती आल्यावर पुन्हा नावासह व्यक्तिचित्र देण्यास हरकत नाही.
धनंजय यांच्या या मताशी मी पण पुर्णपणे सहमत...
कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रीया वाचुन चित्रे काढणे बंद करु नका..
स्वप्निल..
24 Jul 2008 - 4:44 am | प्रियाली
या जगात टिकाकार होणे तसे सोपे असते. मला पेन्सिलीने फक्त रेघोट्या मारता येतात एवढंच... तुमची केवळ पेन्सिल वापरून रेखाटन करण्याची कला जबरदस्त आहे.
असो,
माधुरीला प्रत्यक्ष पाहिलं होतं का? तुमच्यापेक्षा अंमळ लहान असावी... पार्ले कॉलेजात दिसली होती का कधी?
24 Jul 2008 - 12:21 pm | उदय सप्रे
प्रियाली जी,
माधुरी आम्हाला २ वर्षे जूनिअर , त्यामुळे पाहिली नकीच आहे , पण हे आता म्हणायचं, कॉलेजमधे माधुरीपेक्षाही सुंदर मुली होत्या, त्यामुळे त्यावेळी तिच्याकडे फारसं लक्ष नाही गेलं.ती डान्समधे आणि आम्ही गाण्यात्.....तिची बहीण भारती दिक्षित ही अप्रतीम सुंदर होती , बॉब केलेले कुरळे केस , हिरवे डोळे, फिजिक्स शिकवायची , मी तिचा लाडका होतो (इतर वाचकांनी आचरट अर्थ काढू नयेत ! ती मला तेंव्हा कमीत कमी १५ वर्षे सिनिअर असेल !).....
आता इतर प्रतिक्रियांबाबत :
जे नीट जमलं नाहिये ते नाही जमलेलं , ते सांगितलं म्हणून अजिबात राग नाही येत्.वाईट एव्हढ्याच गोष्टीचं वाटत की या चित्राबरोबर बाकी सगळ्याच चित्रांना नावे ठेवली जात आहेत्.तमाम लोकांनी परत एकदा पुढील चित्र बघावीत आणि मग सांगावे :
चार्ली चॅप्लीन
मधुबाला
नूतन
मदन मोहन
या व्यतिरिक्त घरी अजून बरीच आहेत ती पण पाठवणार आहेच्.टीका जरूर करा पण एक चोखंदळ वाचक वा रसग्रहण करणारी व्यक्ती म्हणून.उगीच काही तरी लिहायचे म्हणून लिहू नका.
मी मांजराच्या जातीचा आहे , कितीही उंचावरून फेकलंत तरी पायांवरच उभा रहाणार , डोक्यावर पडणार आणि जखमी होणार नाही , माझे प्रयत्न चालूच रहातील.
प्रमोदकाका तुम्ही छान लिहिता , आम्हाला आवडते , माझी स्वतःची "रात्र थोडी सोंगे फार" अशी स्थिती असल्याने मी सगळ्याच लोकांना माझ्या प्रतिक्रिया देऊ शकत नाही याबध्दल क्षमस्व , (म्हणजी मी इंटिरिअर डिझाईनर आहे, वास्तूशास्त्र सलागार आहे, कविता, लेख्,कादंबरी लेखन, गाणे ऐकणे-म्हणणे,नकला करणे,मुलांचा अभ्यास घेणे,नोकरी - इंजिनिअर ची.....) पण मिपा हे संकेतस्थळ आणि त्यावरील सर्व सदस्य हे फार सुजाण आणि चांगले आहेत असे माझे स्पष्ट मत आहे.कृपया एव्हड्याशा कारणांवरून हमरीतुमरीवर येवून या संकेतस्थळाची शांती बिघडवू नका आणि तात्यांसारख्या सिनिअर माणसाचे इतके छान यश याला गालबोट लावू नका !
या समाजाचं माझ्यावर फार मोठं ऋण आहे हे मी कधीही विसरलो नव्हतो , नाहिये आणि विसरणार पण नाही.कौतुक करणार्या हरएक व्यक्तीला माझा कान पिळायचा पूर्ण अधिकार आहे आणि मला असे सगळ्यांकडून योग्य त्या शब्दात आणि योग्य त्या कारणासाठे कान पिळून घेण्यात आणि नंतर अशा चुका सुधारण्यात कोणताही कमीपणा वाटणार नाही.
इतक्या स्पष्टपणे लिहून पण ज्यांना माझ्याबध्दल वा माझ्या लिखाणाबध्दल वा कलाकृतींबध्दल वा माझ्या रॅशनल ऍप्रोच बाबत काही गैरसमज असेल त्यांनी मला माफ करावं , पण एक छान शेर आठवल तो सांगून थांबतो (हा शेर "श्रीमान योगी" मधे कै.रणजित देसाई यांनी मिर्झा राजे जयसिंग यांच्या तोंडी घातला आहे :
खुदही को कर बुलंद इतना के खुद खुदा भी
हर तहरीर से पहले आके तुझसे पूंछें के,
"बता तेरी रझा क्या है?".....
स्वतःलाच इतकं श्रेष्ठ बनव की प्रत्यक्ष परमेश्वर पण तुझी ललाटरेषा बनवायच्या आधी तुला येवून विचारेल ,"बोल तुझी काय मर्जी आहे?".....
मी चुकतो यात वाद नाही , पुन्हा सुधारण्यासाठी उठतो
"मला हे येत नाही" या जाणिवेनं मी जिद्दीला पेटतो
तुम्ही हात द्याल तर लवकर ध्येय गाठीन मी ,
अडथळे आले तर उलट मी अधिक वेगाने पळत सुटतो !
तात्यांचे आभार !
स्वप्निल जीं चे विशेष आभार !
उदय सप्रेम
24 Jul 2008 - 5:59 am | चतुरंग
हनुवटीपासून वरती नाकाच्या शेंड्यापर्यंत माधुरी छानच जमली आहे. कपाळ, गालाची हाडे वगैरे भागही बर्यापैकी साधर्म्य दाखवतो.
डोळ्यांची गंमत अशी असते की तेवढेच जरी जमले तरी चित्र जमून गेल्यसारखे असते पण ते अवघडही असतात!
तुमच्या हातात कला आहे, चित्रे काढत रहा . पुढच्या चित्राला शुभेच्छा!
चतुरंग
24 Jul 2008 - 7:19 am | धमाल नावाचा बैल
सप्रेम साहेब माधुरी जाम आवडली बरका! मलातर चारोळी पण आवडली. :)
बैलोबा
24 Jul 2008 - 7:24 am | शितल
मला ती थोडी जुही चावला वाटली.
पण रेखाटन चांगले आहे.
24 Jul 2008 - 7:42 am | भाग्यश्री
ए अगदी सहमत गं.. थोडी जुही चावलाच वाटते..
चित्रं अजुन चांगलं येऊ शकलं असतं.. थोडं तिरकं झालय का? डोळ्यामधे जो पांढरा ठीपका असतो, त्याने डोळे अगदी सजिव वाटतात, तो इथे नीट दिसत नसल्याने डोळे बरोबर वाटत नाही आहेत का? काही सुधारणा, म्हणजे जे मला बघायला ऑड वाटतंय ते सांगते..
१) टिकली जरा उजवीकडे सरकलीय.. बरोबर मधे पाहीजे..
२) डावी नाकपुडी चुकलेली वाटते.. काय बरोबर करता येईल कळत नाही.. कदाचित उजव्या नाकपुडीच्या लेव्हलला नाही आली.
३) उजवा डोळा जरा उजवीकडे झुकल्यासारखा वाटतो..
या सगळ्या गोष्टी बरोबर आल्या असत्या तर खूप उठाव मिळाला असता चित्राला असे वाटते.. तुम्हाला इतकं चांगलं जमते म्हणून सांगायचे धाडस करतीय. प्लीज डोन्ट माईन्ड..
तसेच,चित्राबरोबर कुठला पेपर्,किती नं ची पेन्सिल(एच्बी, टुबी वगैरे) किंवा चारकोल असं लिहीलंत तर अजुन बरं पडेल.. आम्हा नवशिक्यांसाठी सोयीचं! :) अजुन चित्रं नक्कीच येऊदे.. सडेतोड मतं येतील एकवेळ, पण इतकं सुद्धा जमणं अवघड आहे, त्यामुळे प्रयत्नांनी अजुन चांगलं नक्कीच जमेल..
24 Jul 2008 - 9:18 am | अनिल हटेला
उदय भौ !!!
माधुरी सारखीच दिसनारी एखादी तरुणी असावी !!
बाकी चित्रकला छान आहे तुमची!!!
येथील कुठल्याही सदस्यास, "लिहू नका" असे लिहू नये. वाटल्यास सदर सदस्यांकडून आलेले लेख तुम्हाला बोअर वाटत असतील, तर वाचू नका, प्रतिसाद देऊ नका, तुमच्या लेखनातून टोचा त्यांना, वाटल्यास. पण कुणालाही लिहू नका असे मात्र म्हणू नका.
लिहा लिहा लिहा, असेच म्हणत राहा. त्याचा योग्य समाचार आम्ही घेऊच, असे म्हणा वाटल्यास.
सर्कीट रावाशी सहमत!!!!!!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
24 Jul 2008 - 6:26 pm | विसोबा खेचर
हे चित्र माधुरीचं तर वाटत नाहीच, परंतु नुसतं एका स्त्रीचं रेखाचित्र म्हणून बघायला गेलो तरीही ते मला आवडलं नाही. बाई अंमळ बटबटीत वाटली/वाटते! आणि मला बटबटीत बायका दिसायला आवडत नाहीत! ;)
असो, चित्र आवडलं नाही, पुढील चित्रकलेकरता अनेकानेक शुभेच्छा!
धन्यवाद.
25 Jul 2008 - 11:32 am | मदनबाण
निराश होउ नका,, जमेल चांगल काढायला,,मला तर माधुरीचे केस फार आवडले..
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda