चुकते कोण?

स्वातीविशु's picture
स्वातीविशु in काथ्याकूट
25 Jan 2012 - 4:09 pm
गाभा: 

घरातील वडिलधा-यांना जास्त काम लावू नये, शक्यतो स्वत:चा हातभार वाढवावा,असे माझे मत आहे. असो.

आई-वडिल, मुलगा-सून, नातवंडे असे भरलेले कुटूंब दिसणे हल्ली दुर्मिळ होत चालले आहे. त्यातही जी काही थोडी कुटूंबे आहेत, तिथे ज्येष्ठांना योग्य वागणूक मिळत नाही. जेष्ठांनी नेहमी समजुन घ्यायचे आणि लहानांनी नेहमी चुका करायच्या असे समीकरण सर्रास दिसते. [ काही अपवाद सोडून...]

माझ्या गावाला (वाई) ओळखीचे अशा एक कुटूंबात आई-वडिल, दोन मुले -सुना, नातवंडे आहे. तर झाले काय... धाकटा मुलगा मुंबईत नोकरी करतो. त्याची बायकोसुद्धा चांगल्या कंपनीत नोकरी करते, अर्थात घरकामातही ती अजिबात कमी पडत नाही. त्यामुळे घरी-दारी तिचे कौतुक होत असते.

हे पाहून थोरली सून गावाला राहून नोकरी करु लागली.[ म्हट्ले जाउद्या...घरात, शेतात काही काम होत नाही, नोकरीवर तरी उजेड पडेल....] मधे एकदा गावाला जाण्याचा योग आला असता असे दिसले की, बाईसाहेब फक्त स्वतःचे आवरून कामाला निघून जातात. सासूबाई घरी नाष्टा, स्वयंपाक, धुणे, भांडी, पाणी भरणे, दोन नातवंडांचे आवरून त्यांना शाळेत पाठवून शेतात जातात.

नोकरी करणे म्हणजे घरकामातून रजा घेणे असे कुठेही लिहिलेले नाही. कितीतरी प्रतिष्ठित ठिकाणी नोकरी करणा-या महिला घरची कामे तितक्याच समरस होऊन करतात.

वरिल उदाहणातील सासूबाई उच्च रक्तदाबाच्या पेशंट आहेत, वयोमानानुसार, स्थूलतेमुळे त्यांना धावपळ, उठ्बस जमत नाही. स्वभावाने समंजस व शांत आहेत. तरीही विनातक्रार सर्व करत आहेत. पण दुसरीकडे सुनबाईला वाटते की तिला कोणी विचारत नाहीत / किंमत देत नाही. [चोराच्या उल्ट्या बोंबा.....]

हे सर्व पाहीले की असे वाटते चुकते कोण? सासू की सून?

{मिपाकर यावर नक्कीच काही चांगले मार्गदर्शन करतील अशी खात्री आहे.}

प्रतिक्रिया

गणपा's picture

25 Jan 2012 - 4:17 pm | गणपा

हे सर्व पाहीले की असे वाटते चुकते कोण? सासू की सून?

{मिपाकर यावर नक्कीच काही चांगले मार्गदर्शन करतील अशी खात्री आहे.}

यात आम्ही काय डोंबल मार्गदर्शन करणार?
आणि समजा केलचं (आपले मिपाकर हौशी हो भारी. ;) ) तर त्या गावच्या सुनबाई ऐकतीलच याची ग्वाही तुम्ही देणार का? ;)

मृत्युन्जय's picture

25 Jan 2012 - 5:43 pm | मृत्युन्जय

डु आयडी घेण्यासाठी काय करावे यावर संपादक मंडळ मार्गदर्शन करु शकेल काय? आणि विशेषत: सगळ्यांच्या नजरा चुकवुन डु आयडी कसे घेता येतील?

वरिल उदाहणातील सासूबाई उच्च रक्तदाबाच्या पेशंट आहेत, वयोमानानुसार, स्थूलतेमुळे त्यांना धावपळ, उठ्बस जमत नाही. स्वभावाने समंजस व शांत आहेत. तरीही विनातक्रार सर्व करत आहेत
स्वभावाने समंजस व शांत आहेत म्हणुनच विनातक्रार सर्व करत आहेत :)

नोकरी करणे म्हणजे घरकामातून रजा घेणे असे कुठेही लिहिलेले नाही. कितीतरी प्रतिष्ठित ठिकाणी नोकरी करणा-या महिला घरची कामे तितक्याच समरस होऊन करतात.

१०० % सहमत :) हे बाकी खरे हो ;)

हे सर्व पाहीले की असे वाटते चुकते कोण? सासू की सून?

दोघीही चुकत आहे , सुनेला जर खरच नोकरी करायची आहे तर मग घरकामाला बाइ लावु शकते की ,सासुला का म्हणुन भार ;)
अन सासुला काय गरज आहे ह्या वयात इतकी काम उपसन्याची " जीव तुट्त असेल बिचारीचा "
पण म्हनुन इतके सहन करायचे का सुनेच्या प्रेमाखातर ? ;)

मृगनयनी's picture

25 Jan 2012 - 7:37 pm | मृगनयनी

दोघीही चुकत आहे , सुनेला जर खरच नोकरी करायची आहे तर मग घरकामाला बाइ लावु शकते की ,सासुला का म्हणुन भार Wink
अन सासुला काय गरज आहे ह्या वयात इतकी काम उपसन्याची " जीव तुट्त असेल बिचारीचा "
पण म्हनुन इतके सहन करायचे का सुनेच्या प्रेमाखातर ?

१००% सहमत गं पियुशे!!!! :)

१००% बरोबर कुणीच्च्च्च्च्च्च नसते... ना सासू ना सून..... दोघीही थोड्याश्या चुक आणि थोड्या बरोबर असतात.!!! :)

"घरकामाला बाई ठेवणे" हा सगळ्यांत किन्वा त्यातला त्यात सोप्पा पर्याय..... सून नोकरी करत असेल.. तर ती त्या घरकामी बाईला "पे" करू शकते. पण तेव्हा मात्र सासूने आढेवेढे घेऊन स्वतः कामं करायचा अट्टाहास धरू नये. संसार करताना घरातल्या सगळ्यांनीच आपले मूळ उद्देश- "घरात शान्तीयुक्त प्रसन्न वातावरण राखणे" हे ठेवायला पाहिजे.

परिकथेतील राजकुमार's picture

25 Jan 2012 - 4:48 pm | परिकथेतील राजकुमार

फक्त आणि फक्त असे धागे उघडणारे मिपाकर.

नितिन थत्ते's picture

25 Jan 2012 - 4:58 pm | नितिन थत्ते

सहमत आहे.

धागालेखक म्हणजेच कथेतील सासूबाई आहेत का?

तिमा's picture

25 Jan 2012 - 8:26 pm | तिमा

परा, द्या टाळी! एकदा नाही तर दोनदा उघडला, एकाखालचा एक.

शेफ चेतन's picture

26 Jan 2012 - 4:54 pm | शेफ चेतन

१०० %

स्वातीविशु's picture

25 Jan 2012 - 5:02 pm | स्वातीविशु

@गणपा: ग्वाही नाही पण समजावून सांगण्याचा प्रयत्न करु शकेन अशी खात्री देते. (खरेच हो..मिपाकर फारच हौशी हो ...)
@पियुशा: प्रतिक्रिया आवड्ली.
@परा: तुमची ही प्रतिक्रिया ग्रुहीत धरावी असे वाटते, "Only Fairytales Have Happy Endings ... "

सर्वांना धन्यवाद....

स्वातीविशु's picture

25 Jan 2012 - 5:05 pm | स्वातीविशु

@ नितीनः लेखक फक्त प्रत्यक्षदर्शी आहे.

विनायक प्रभू's picture

25 Jan 2012 - 5:54 pm | विनायक प्रभू

पुढचे पोस्ट नणंद, वैनी बद्दल येउ द्यात हो तै.
ते पण प्रत्यक्ष दर्शी असेल अशी आशा करतो.
साधारण ५१ पोस्ट झाल्यावर आपण कपुर कन्येस भेटू.

पुष्करिणी's picture

25 Jan 2012 - 6:24 pm | पुष्करिणी

सासूबाईंनी वेळीच स्वतःच्या मुलांना कामं शिकवली असती तर म्हातारपणात अशी सगळी कामं करायची वेळ आली नसती.
त्यामुळे सासूबाईंच चुकलय.
अजूनही फार उशिर झाला नाही आहे, त्यांनी सूनेच्या आणि स्वतःच्या मिष्टरांना थोडी थोडी कामं करायला शिकवावीत, घरांत सगळेच काम करतात हे बघून नातवंडांवरसुद्धा चांगले संस्कार होतिल, पुढेमागे कधी मुंबैवाले सुट्टीवर येतिल तेही यातून काही शिकवण घेतिल. त्यांना हा निरोप पोहोचवाच .

मस्त कलंदर's picture

25 Jan 2012 - 8:17 pm | मस्त कलंदर

खरं गं पुष्करिणी..
उगीच माझ्याशिवाय पान हलत नाही असं म्हणून हुतात्मा व्हायला जाऊ नये बायकांनी. अशा बायका स्वतःच्या नवर्‍याला बिघडवतातच, वर भावी सुनेच्या नवर्‍यालाही बिघडवतात. तिला मदत न मिळण्याचा त्रास आणि वर मी कसं सगळं करत होते, आता तू पण कर असं चारचारदा सुनेला ऐकवून तिला पण तसं वागायला सुचवून आणखी कामात भर टाकतात.
आणि हो, मोलकरीण लावली तरी तिच्या वाटणीची कामेही या करायला कमी करत नसाव्यात असं वाटतं!!

पैसा's picture

25 Jan 2012 - 8:25 pm | पैसा

अगदी अगदी! पण जावई कामसू मिळाला तर मात्र त्याचं कवतिक, आणि मुलाने जर काम करायला सुरुवात केली तर "जावई माझा भला आणि मुलगा बाईलबुद्ध्या झाला! हा आहेर असतोच!

श्रावण मोडक's picture

26 Jan 2012 - 2:27 pm | श्रावण मोडक

पुष्करिणी, मस्त कलंदर आणि पैसा या तिघीही स्त्रीजातीच्या छुप्या शत्रू आहेत. काहीही लिहितात.
त्या ठोंब्याला त्याच्या आईनं (म्हणजे सासूबाईंनी) वेळीच काही शिकवलं नाही हा त्यांचा दोष आहे हे खरं. पण तो एकूण परिस्थितीत किंचित दोष आहे. त्या माऊलीनं न शिकवलेल्या गोष्टी तो ठोंब्या करतच नाही का? एखादा पेग मारला असेलच. एखादा कशही मारला असेल. तसंच हे घरच्या कामाचंही स्वतः शिकता येतंच. करायचं असेल तर करता येतं. इथं मुळातच करायचं नाहीये. त्याला कळेल अशा भाषेत ते सांगितलं पाहिजे. ते सांगण्याचं काम ती माऊली नाही करू शकणार. पण या ठोंब्याची बायको का मूग गिळून गप्प बसलीये?
आता या तिघीही या लेखनात सासूबाई असल्यानं त्यांना दोष असतील तर माहिती नाही. असो. ;)

पुष्करिणी's picture

26 Jan 2012 - 2:59 pm | पुष्करिणी

श्रामो :) , बंडूच्या बायकोला कै प्रोब्लेम नैच आहे...ती बिचारी स्वतःचं सगळं आवरून वेळेवर नोकरीला जाते, शिवाय जे काही चालू आहे त्याबद्दल बाहेर जाउन काही वाच्यता करत नाही, प्रॉब्लेम माउलीलाच आहे नं, म्हण्जे स्वातीविशू ताईंना त्यांनी सांगितलय तसं . आता त्यांचा प्रॉब्लेम आहे म्हण्जे योग्य उत्तर त्यांनाच शोधलं पाहिजे ना, अगदीच बंडूला सांगता येत नसेल तर १-२ दिवस काहीच न करता त्यांनी बसून राहावं ऐष करत .
आणि माउली बंडूला का म्हणून सांगू शकणार नाही म्हणे? बाहेरच्या ,२-३ दिवस गावी येणार्‍या स्वातीविशू ताईंना वेळ काढून सांगू शकतात तर
त्यांचा खरा प्रॉब्लेम त्यांना सगळं काम करावं लागतं हा नसून मुंबैच्या बंड्याला बायकोकडून नोकरी आणि घरकाम दोन्ही करून घेता येतें पण या गाववाल्या बंड्याला ते जमत नाही हा आहे :) . बंड्यानं किंवा त्याच्या बायकोनं घरात सगळ्या कामाला मोलकरिण ठेवली तरी माउलीचा प्रॉब्लेम सुटणार नाही, बहुतेक बंड्याला हे माहित असावं आणि तो तितका ठोंब्या नसून बराच स्मार्ट असावा...:)

पैसा's picture

26 Jan 2012 - 3:08 pm | पैसा

मस्त विश्लेषण! मला अशी दाट शंका येतेय की हा "ठोंब्या" मुद्दामच घरातली कुरबूर थांबवायचा प्रयत्न करत नाहीये, अशासाठी की, एक तर त्याला घरातलं काही काम न करता आरामात रहाता येतं, आणि आई व बायको दोघीनांही सहानुभूती दाखवून भांडत ठेवलं की घरात त्याचंच राज्य! थोडक्यात म्हणजे divide and rule. शिवाय "या दोघींच्या भांडणामुळे मला बघा किती त्रास होतोय" असं म्हणत सगळ्या गावाची सहानुभूती मिळवता येते. कित्ती बै हुषार हा मनुष्य!

श्रावण मोडक's picture

26 Jan 2012 - 3:10 pm | श्रावण मोडक

असं आहे होय! मला वाटलं, हा धागा स्त्रीमुक्तीचा असावा. पण तो तर 'स्त्रीच स्त्रीची शत्रू' मालिकेतला दिसतोय.
ती सून नोकरी करते, ठोंब्याही करत असावा. दोघांनी घरचं काम शेअर करायचं आहे. त्याऐवजी ते त्या सुनेवरच पडावं अशी सासूची इच्छा दिसते. बरं... मग चालू द्या. आपली काही हरकत नाही. ;)

स्मिता.'s picture

26 Jan 2012 - 3:19 pm | स्मिता.

असं आहे होय! मला वाटलं, हा धागा स्त्रीमुक्तीचा असावा. पण तो तर 'स्त्रीच स्त्रीची शत्रू' मालिकेतला दिसतोय.

तुमच्या वाटण्याने काय होतंय? 'स्त्रीच स्त्रीची शत्रू' हे त्रिकालाबाधित सत्य तुम्ही कसे विसरू शकता??

श्रावण मोडक's picture

26 Jan 2012 - 3:26 pm | श्रावण मोडक

आय रेस्ट माय केस! ;)

स्मिता.'s picture

26 Jan 2012 - 3:32 pm | स्मिता.

पाशवी शक्तीचा विजय असो!!

हा हा हा श्रामोंनी गुगलीवर विकेट काढली.
आणि आपली विकेट पडल्याच खे़ळाडुला कल्ला पन नाय. =))

स्मिता.'s picture

26 Jan 2012 - 3:53 pm | स्मिता.

गणपाभाऊ, तुमची फॅन असल्याने तुम्हाला सोडून देतेय ;)

ओ ताय विकेट श्रामोंनी काढली. त्यांला धरा.
मीनी काय नाय केला. :)

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Jan 2012 - 5:49 pm | बिपिन कार्यकर्ते

गण्या! असं नाही... मोडकांचा हनुमान झाला... बायको एकाची, पळवली दुसर्‍याने आणि शेपूट जाळून घेतली ह्याने! बायकाबायकांच्या भांडणात.... असो! ;)

श्रावण मोडक's picture

26 Jan 2012 - 6:12 pm | श्रावण मोडक

अवांतर: हनुमानाने शेपूट जाळून घेतली नाही. रामायणाचा अभ्यास कमी पडतोय. असो. ज्याचे त्याचे आकलन... ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Jan 2012 - 6:14 pm | बिपिन कार्यकर्ते

व्यर्थ शब्दच्छल... असो. असं होतंच.

श्रावण मोडक's picture

26 Jan 2012 - 6:28 pm | श्रावण मोडक

मुद्दा संपला की शब्दच्छल वगैरे युक्तिवाद सुरू होतात. असो. थांबतो. पावशेर टाकण्याची संधी आहे तुम्हाला. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

27 Jan 2012 - 11:40 am | परिकथेतील राजकुमार

माझा इथला एक निरुपद्रवी प्रतिसाद कुठे गेला ?

ह्यापुढे प्रतिसाद पण आधी संपादकांकडून संमत करून घ्यावे लागणार का काय ?

श्रावण मोडक's picture

27 Jan 2012 - 12:13 pm | श्रावण मोडक

हाण्ण तिच्या... खपलो!

जौद्या काका, आज की सुन भी कल सास बनेगीच ना. ;)

स्मिता.'s picture

26 Jan 2012 - 3:11 pm | स्मिता.

@श्रावण: मिळालं तुम्हाला हवं असलेलं उत्तर? की आणखी काही अपेक्षित आहे? ;)

श्रावण मोडक's picture

26 Jan 2012 - 3:30 pm | श्रावण मोडक

बाहेरच्या ,२-३ दिवस गावी येणार्‍या स्वातीविशू ताईंना वेळ काढून सांगू शकतात

नक्की? ही तर 'कहानी घरघरकी' दिसतीये!

पैसा's picture

26 Jan 2012 - 3:38 pm | पैसा

तुम्ही कधीपासून केकता कपूरच्या सीरीयली बघायला लागलात?

पुष्करिणी's picture

26 Jan 2012 - 5:42 pm | पुष्करिणी

हो मग्...मुंबै नाहीच आहे वाई मधे ... अभ्यास अभ्यास !!

श्रावण मोडक's picture

26 Jan 2012 - 5:53 pm | श्रावण मोडक

असं होय? ;)

पुष्करिणी's picture

26 Jan 2012 - 5:45 pm | पुष्करिणी

२ वेळा पडला म्हणून डिलिट

मेघवेडा's picture

26 Jan 2012 - 5:55 pm | मेघवेडा

असं होय? ;)

हा धागा उघडून माझीच चूक झाली.

नोकरी करणार्‍या बाईचा नवरा, सासरेबुवा यांचा कुठेही उल्लेख नाही.
पुरुष मंडळी राहतात ना घरात?
इथे आपल्यासारख्या 'मुलींचे' ;) चुकते.
एकत्र कुटुंब म्हणतो ना आपण, आणि बघा पुरुषांना कसं तांदळातल्या खड्यासारखं वगळलय.;)
किती हे दुष्टासारखं वागणं. (हलके घ्या.)

शिल्पा ब's picture

25 Jan 2012 - 10:13 pm | शिल्पा ब

माझ्या घरात मी थोडं करते अन बाकी नवर्‍याकडुन करुन घेते. त्याची आई आलीच तर तिलासुद्धा कामाला लाउन मी बाहेर शॉपींगचं काम उरकते, म्हणजे सगळे कसे बिझ्झी बिझ्झी राहतात अन घरात शांतता वाढते. हा उपाय तुम्हीसुद्धा करुन पहा अन त्याचा अजुन एक धागा काढा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jan 2012 - 5:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझ्या घरात मी थोडं करते अन बाकी नवर्‍याकडुन करुन घेते. त्याची आई आलीच तर तिलासुद्धा कामाला लाउन मी बाहेर शॉपींगचं काम उरकते, म्हणजे सगळे कसे बिझ्झी बिझ्झी राहतात अन घरात शांतता वाढते.

ही वरवर दिसणारी शांतता असावी. आमच्या पारंपरिक भारतीय संस्कृतीत हे कै बसणारं नाही. सासुबाईनं घरातली झाड-झुड करायची, सैपाक-पाणी करायचं, गोधड्या बिधड्या आवरुन ठेवायच्या , आल्या गेल्याचं करायचं आणि सुनबाईनं शॉपींगला जायचं.... ये कब्बी नै हो सकता आणि याने शांतता नांदु शकत नाही.

कमीत कमी सुनबाईनं सासुबाईला शॉपींगला नेलं आणि तिथे सासुबाईसाठी अधिक खेरेदी-बिरेदी झाली तर मायनस गोष्टी प्लस होऊ शकतील. पण हाही कामाच्या मोबदल्यात झालेला व्यवहार वाटला नाही तर... असं वाटतं बा...!

अरे हो, हे सर्व पाहीले की असे वाटते चुकते कोण? सासू की सून ?

शंभर टक्के सून चुकते.

-दिलीप बिरुटे

शिल्पा ब's picture

27 Jan 2012 - 10:41 am | शिल्पा ब

अहो हो, पण मी त्यांच्या घरी गेले की हेच उलटं होतं त्यामुळे फिट्टंफाट होते. :)
तुम्ही बरे लग्गेच माझ्या न बघितलेल्या सासुची बाजु घेउन मोकळे झालात? अशाने आमी कट्टी घेउ. हुं!!

अजितजी's picture

25 Jan 2012 - 11:54 pm | अजितजी

जणू काही सासुबायीच्या सासूबाई तिला नवर्याला काम सांगू देत असतील ४०,५० वर्षा पूर्वी !---अजित गद्रे

शिल्पा ब's picture

25 Jan 2012 - 11:58 pm | शिल्पा ब

तुमच्यात वेळ बदलत नै का?

वपाडाव's picture

26 Jan 2012 - 3:44 pm | वपाडाव

त्यांचा देश कधी बदललाच नसेल म्हणुन त्यांना हा प्रश्न पडतच नसेल....
(कळाले नसल्यास पुन्हा वाचा)

माझे कध्धीच चूक नसते...
मी फक्त, नेहमी नेहमी सहनच करत असते .
(असेच सगळ्यांना वाटते, मलासुद्धा :) )

प्रभाकर पेठकर's picture

26 Jan 2012 - 10:40 am | प्रभाकर पेठकर

हे पाहून थोरली सून गावाला राहून नोकरी करु लागली.[ म्हट्ले जाउद्या...घरात, शेतात काही काम होत नाही, नोकरीवर तरी उजेड पडेल....] मधे एकदा गावाला जाण्याचा योग आला असता असे दिसले की, बाईसाहेब फक्त स्वतःचे आवरून कामाला निघून जातात. सासूबाई घरी नाष्टा, स्वयंपाक, धुणे, भांडी, पाणी भरणे, दोन नातवंडांचे आवरून त्यांना शाळेत पाठवून शेतात जातात.

नोकरी करणे म्हणजे घरकामातून रजा घेणे असे कुठेही लिहिलेले नाही. कितीतरी प्रतिष्ठित ठिकाणी नोकरी करणा-या महिला घरची कामे तितक्याच समरस होऊन करतात.

दुसरीकडे सुनबाईला वाटते की तिला कोणी विचारत नाहीत / किंमत देत नाही. [चोराच्या उल्ट्या बोंबा.....]

चर्चा प्रस्तावात समतोलाचा अभाव आहे. प्रस्तावातच छुप्या पद्धतीने 'चुक कोणाची' हे सुचविले आहे. त्यामुळे चर्चा डळमळीत पायावर उभी आहे हे जाणवते आहे. असो.

अनेक वर्षे त्या घरात कर्त्या स्त्रीचे मध्यवर्ती स्थान भुषविल्यावर, सुनेच्या आगमनानंतर दुय्यम स्थान स्विकारायला, स्वयंपाकघराचा ताबा सुनेकडे द्यायला कित्येक सासवा मनाने तयार नसतात. त्यामुळे स्वयंपाकघराचा ताबा आपल्याच हातात राहावा आणि सुनेला मदत केल्याला मोठेपणाही आपसुक मिळावा असा कावा कित्येक सासवा करताना दिसतात. नातवांचे करताना प्रेम, आपल्या मुलाची मुले ही स्वामित्व भावना असते. मुलीची मुले ही सहसा जावयाची मुले म्हणून पाहिले जाते. (जावयाचे पोर एक नंबर चोर). नातवंडांचे करून आत्मिक समाधान तर मिळवायचे पण सुन मुलांकडे पाहात नाही मलाच सर्व (ह्या वयात) पाहावे लागते (आणि मी पाहाते, माझ्यात धमक आहे तेवढी) असा कांगावा करून इतरांची सहानुभुती मिळवायची, किमान सुनेची सहानुभुती करणार्‍यांची संख्या कमी करून आपले पारडे जड करून घ्यायचे असा, मुद्दाम नाही तरी नकळत प्रयत्न होत असतो.

सुनेची बाजू लक्षात घेता, स्त्रीयांनी नोकरी करण्यात स्वातंत्र्याची भावना असते, 'मीही नोकरी करून घराला, संसाराला हातभार लावते आहे. माझा पगार मी काही माझ्या माहेरी नाही पाठवत. केलं जरा घरकाम तर काय झालं? तुमच्या मुलाच्या संसारासाठीच करता नं? की माझ्या सुखासाठी मी तुम्हाला राबवते आहे?' असा सुर सुनेच्या मनांत असतो. तर काही सुनांवर त्यांच्या नवर्‍याकडून नोकरी करून अर्थार्जनाची जबरदस्ती असते. काही स्त्रीयांमध्ये नोकरी आणि घरकाम दोन्ही सांभाळण्याची शारिरीक क्षमता नसते. पण लक्षात कोण घेतो?

पत्नीकडून अर्थार्जनाची अपेक्षा असेल तर नवर्‍याने घरकामात ५०% हातभार लावावा. आपल्या अपेक्षा कमी कराव्यात. अन्यथा तो आईवर-पत्नीवर अन्याय होऊ शकतो. पत्नीने नोकरी करणे पसंत नसेल तर तसे लग्न ठरविण्याआधीच स्पष्ट शब्दात सांगावे. गृहीत धरु नये. उच्च शिक्षित पत्नीची अपेक्षा करताना तिच्या करिअरला प्राधान्य असावे. नपेक्षा कमी शिकलेली पण गृहकृत्यदक्ष मुलगी निवडावी. अशा वेळी सुनेने ऐहिकतेच्या आपल्या आशा-आकांक्षांना मुरड घालावी आणि नवर्‍याच्या मिळकतीत जास्तीत जास्त सुखाचा संसार करावा.

वरील सर्व गोष्टींचा जिथे अभाव असतो तिथे तिथे तिघांपैकी (आई, मुलगा, सुन) एकावर किंवा दोघांवर किंवा तिघांवरही अन्याय होतो आणि खटके दैनंदिन आणि नित्याचे होतात.

शिल्पा ब's picture

26 Jan 2012 - 11:02 am | शिल्पा ब

आजोबांचा प्रतिसाद आवडला.

प्रभाकर पेठकर's picture

26 Jan 2012 - 1:08 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद शिल्पा ब.

रमताराम's picture

26 Jan 2012 - 3:05 pm | रमताराम

चला टंकायचे कष्ट वाचले. पेठकरकाकांचे आभार.

प्रभाकर पेठकर's picture

26 Jan 2012 - 12:56 pm | प्रभाकर पेठकर

01

नेट वरील छायाचित्र आपले प्रोफाईल छायाचित्र म्हणून वापरण्यासाठी लेखिकेने (?) मालकाकडून आवश्यक ती संमती घेतली आहे असे गृहीत धरतो. अन्यथा, मिपा अडचणीत येऊ शकेल.

सुहास झेले's picture

26 Jan 2012 - 1:12 pm | सुहास झेले

चुकलो...

देवा, मला माफ कर !!!

प्रभाकर पेठकर's picture

26 Jan 2012 - 1:17 pm | प्रभाकर पेठकर

अच्छा..! हा पण आय डी तुमचा आहे तर. असो.

देव दयाळू आहे (असे वाटते!) तो तुम्हाला माफ करेलच.

सुहास झेले's picture

26 Jan 2012 - 1:22 pm | सुहास झेले

हा हा हा ...

तो दयाळू असता, तर हा धागा पूर्ण वाचला नसता ;)

पर्नल नेने मराठे's picture

26 Jan 2012 - 4:37 pm | पर्नल नेने मराठे

सासुने शहरातिल सुनेकडे जाउन रहावे हे उत्तम !!!

श्रावण मोडक's picture

26 Jan 2012 - 4:48 pm | श्रावण मोडक

ये हुई बात! ;)

स्मिता.'s picture

26 Jan 2012 - 4:55 pm | स्मिता.

या सुचवणीवर स्वातीविशुतैंचे मत जाणण्यास उत्सुक!

मेघवेडा's picture

26 Jan 2012 - 5:14 pm | मेघवेडा

सर्वात बेष्ट प्रतिसाद!

वपाडाव's picture

26 Jan 2012 - 5:35 pm | वपाडाव

लैच दिसांनी चुचुतैंचा प्रतिसाद पाहिला.... बरे वाटले हो...

पुष्करिणी's picture

26 Jan 2012 - 5:52 pm | पुष्करिणी

चुच्स झिंदाबाद

पुष्करिणी's picture

26 Jan 2012 - 5:53 pm | पुष्करिणी

चुच्स झिंदाबाद

पर्नल नेने मराठे's picture

26 Jan 2012 - 5:54 pm | पर्नल नेने मराठे

पुश्के ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Jan 2012 - 6:00 pm | बिपिन कार्यकर्ते

ही पुश्की आणि चुच्स म्हणजे ना... अगदी अहोरूपम अहोध्वनि त्यातला प्रकार आहे!

पुष्करिणी's picture

26 Jan 2012 - 6:06 pm | पुष्करिणी

चुच्स, बिका आपल्याला उंट आणि गाढव म्हणतायत .....कुठे आहेस तू ?

श्रावण मोडक's picture

26 Jan 2012 - 6:09 pm | श्रावण मोडक

पुष्करिणी, असं काही तरी, 'नंदी कोण, महादेव कोण?' स्वरूपाचा प्रश्न निर्माण होईल असं लिहू नये. ;)
असो!

पुष्करिणी's picture

26 Jan 2012 - 6:15 pm | पुष्करिणी

:) .... आम्हाला काहीही चालेल
तसंही नंदी आणि महादेव दोघांनाही नमस्कार करावा लागतो :)

श्रावण मोडक's picture

26 Jan 2012 - 9:52 pm | श्रावण मोडक

तसंही नंदी आणि महादेव दोघांनाही नमस्कार करावा लागतो

हो. पण इथं गाढव आणि उंट आहे. त्यामुळं प्रश्न पडतोच, कुणाला नंदी मानून नमस्कार करावा आणि कुणाला महादेव! असो. ;)

पर्नल नेने मराठे's picture

26 Jan 2012 - 6:09 pm | पर्नल नेने मराठे

अग सन्स्क्रुत शिकायला हवे आता मला =))

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Jan 2012 - 6:09 pm | बिपिन कार्यकर्ते

सांजवात लावायला गेली असेल.

पुष्करिणी's picture

26 Jan 2012 - 6:18 pm | पुष्करिणी

हो मग, एक आदर्श सून आहे चुच्स

हंस's picture

26 Jan 2012 - 5:55 pm | हंस

असेच म्हणतो!

वरील देखाव्यात म्हणजे भेदक कथेत सासुबाई स्वतः एका गंभीर आजारात असुन देखील खुपच कष्ट करता आहेत. तसेच सुनबाई घरची परिस्थिती व जावेबद्दल च्या कौतुकाला कंटाळुन नोकरी करताहेत. म्हणजे दोघीही त्याच्या कुवती पेक्षा जास्त कष्ट करत आहेत. त्यामुळे त्याना बदली म्हणुन मुलाने/सुनेच्या नवर्‍याने सरळ दुसरे लग्न करुन दोघीचा ताण हलका करावा. इथे चुकतो तो त्याबाईंचा/ त्या अश्राप महिलेचा पतीच.त्यामुळे त्याने आपली चुक सुधारुन सरळ दुसरे लग्न करावे म्हणजे दोन्ही स्त्रीयाना त्याचा कामातुन थोडी उसंत मिळेल.
आपलाच
दोडकाकिसु

अरेच्च्या! हा पाशवी धागा काही तासात बरेच उड्डाण करून गेलाय.
अश्यावेळी ना मला भारतात नसल्याचं वैट्ट वाटतं.
पाशवी चर्चांचं समाधान कै मिळत नै.
स्वातीविशुतैंनी एव्हाना त्या कुटुंबातील बैलोबांना गदागदा हलवून जागं केलं असेलच.
अहो एवढे प्रतिसाद मिळवता अश्या धाग्यावर? किती वाईट वाटतं म्हायतिये!;)

शेवटी काय ठरलं ?
कोण चुकतं आहे नक्की ?

हंस's picture

27 Jan 2012 - 9:34 am | हंस

छापा-काटा करा पाहू!

सेरेपी's picture

27 Jan 2012 - 9:38 am | सेरेपी

अय्या.................................
स्वातीकाकू तूमी आमच्या वाईच्या घरी गेला होतात? बरं झालं त्या मेल्या माझ्या थोरल्या जावेचं नाक ठेचलंत ते! आगाऊ मेली....चांगली आता हज्जारो लोकांसमोर नाचक्की झाली!!!!!!! या बरंका कधीतरी आमच्याकडे आता.

- तुमचीच,
मुंबईची (कामसू) सूनबै

स्वातीविशु's picture

27 Jan 2012 - 12:21 pm | स्वातीविशु

@पेठ्कर काका: तुम्ही अगदी योग्य विश्लेषन केलेत आणि

"त्यामुळे स्वयंपाकघराचा ताबा आपल्याच हातात राहावा आणि सुनेला मदत केल्याला मोठेपणाही आपसुक मिळावा असा कावा कित्येक सासवा करताना दिसतात."

अगदी बरोबर वाटते.

सासुने शहरातिल सुनेकडे जाउन रहावे हे उत्तम !!!

चुचु तै नी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. (त्या सासूबाई सध्या मुंबैत आहेत आणि आम्ही त्यांना अजुन ८ दिवस नाही जौ देत हो.....जरी त्यांना सारखे बोलावण्याचे फोन येत आहेत तरी...)

अहो एवढे प्रतिसाद मिळवता अश्या धाग्यावर? किती वाईट वाटतं म्हायतिये!

रेवती तै मला खरेच वाटले नव्हते इतके जास्त आणि छान छान प्रतिसाद येतील म्हणुन.....(काही प्रतिसाद परत परत वाचून खुप हसत आहे.)
धन्यवाद.

नितिन थत्ते's picture

27 Jan 2012 - 12:49 pm | नितिन थत्ते

>>त्या सासूबाई सध्या मुंबैत आहेत आणि आम्ही त्यांना अजुन ८ दिवस नाही जौ देत हो.

अच्छा, म्हणजे त्या दुसर्‍या जाऊबाई म्हणजे धागालेखिका आहेत वाट्टं.

श्रावण मोडक's picture

27 Jan 2012 - 12:54 pm | श्रावण मोडक

थत्तेचाचा, ती एक शक्यता आहे. आणखी एक शक्यता आहे - हा नणंद-भावजया असाही मामला असू शकतो. ;)

कवितानागेश's picture

27 Jan 2012 - 12:38 pm | कवितानागेश

कुणाचे चुकते ते सांगता येणार नाही,
कारण मला अशी उगीच्च कुणाच्या चुका काढायची सवय नाही! ;)

@ रेवतीताई: येउ द्या की अजून एक मुरंबा. लांबलचक धागा तयार करुयात... :)

अवांतरः घरकाम म्हंजे काय असते?
----- (लाडावलेली) माउ

घरकाम म्हंजे काय असते?
जे काम सुनेची इच्छा असते सासूनं करावं आणि सासूची इच्छा असते सुनेनं करावं त्याला घरकाम म्हणतात.;)
किंवा घरातले बैलोबा ज्या कामाला हात लावत नाहीत ते घरकाम.

श्रावण मोडक's picture

27 Jan 2012 - 9:33 pm | श्रावण मोडक

अवांतर -
गाडी बैल ओढतो. नांगरही तोच ओढतो. पाण्याची मोट तोच ओढतो. ही कामं गाईकडून करून घेतली जात नाहीत. म्हशीकडूनही नाही. तसं क्वचितही झालं तर 'कुत्रा माणसाला चावतो ती बातमी नव्हे तर माणूस कुत्र्याला चावतो ती बातमी' या व्याख्येनुसार त्या घडामोडीची बातमी होते. आता असं असूनही काम न करणाऱ्या माणसाला 'बैल' का म्हटलं जात असावं?

प्रश्न बरोबर आहे. उत्तरही तयार आहे पण .......

श्रावण मोडक's picture

27 Jan 2012 - 9:45 pm | श्रावण मोडक

द्या हो उत्तर. इथंच विषय मिटवून टाकू. :)

रेवती's picture

27 Jan 2012 - 9:53 pm | रेवती

नको नको. संमं चे काम वाढवल्याबद्दल मला बाहेरचा रस्ता दाखवतील. आजकाल बरेच ष्ट्रीक्ट झालेत म्हणे!;)

गणपा's picture

27 Jan 2012 - 9:46 pm | गणपा

झाड धरले आहे.

अरे काय हे? हसून वाट लागली.

श्रावण मोडक's picture

27 Jan 2012 - 9:57 pm | श्रावण मोडक

उतरा आता. संपादकांनी संपादकांसाठी दिलेला संपादकांचा प्रतिसाद ठरायचा हा. लवकर उतरा खाली. ;)
संदर्भ

स्मिता.'s picture

27 Jan 2012 - 9:40 pm | स्मिता.

अवांतराशी सहमत... घरकाम न करणार्‍याला बैल म्हणून गाडी, नांगर ओढणे असली कष्टाची कामे करणार्‍या बैलाचा अपमान करू नये!