मी नुकतेच एका इंग्रजी लेखकाचे एक 'क्रिप्टिक' वाक्य वाचले. ते खाली दिले आहे.
Parliament is so strange. A man gets up to speak and says nothing. Nobody listens..... and then everybody
disagrees.
पार्लमेंट ही किती अजब जागा आहे! एक सदस्य बोलायला म्हणून उभा राहतो. कांहीच (महत्वाचे) सांगत नाही. कोणीसुध्दा (तो काय बोलतो आहे ते) ऐकत नाही
....... आणि सारेच त्याच्याशी असहमत होतात.
काल आणि परवा आपल्या लोकसभेच्या खास अधिवेशनाचा 'आँखो देखा हाल' पाहतांना ते वचन पुन्हा पुन्हा आठवत होते. आपल्या लोकांनी त्यात थोडी मोलाची भर टाकली आहे.
काय बोलले जात आहे हे कोणीसुध्दा ऐकण्यापूर्वीच कांही लोक आरडाओरड करून त्याचे बोलणे बंद पाडतात. तरीही तो बोलत राहिलाच तर ते कुणालाही ऐकू जात नाही.
सभापती डोळस असून सुध्दा द्यूतसभेतल्या धृतराष्ट्रासारखे "ये क्या हो रहा है?" असे सारखे म्हणत असतात.
प्रतिक्रिया
23 Jul 2008 - 11:10 am | II राजे II (not verified)
तुम्ही कधी तरी रस्त्याच्या कडेला / झाडाखाली.. पाच-सात कुत्रे / कुत्री एकत्र झालेले पाहीलेच असेल.... एक भुंकु लागले की पाठीपाठ सगळे भुंकू लागतात.. व ज्या ने सुरवात केलेली असते तो आपला गप्प बसलो... थोड्यावेळाने सगळे गप्प झाल्यावर परत तो भुंकू लागतो....
असेच काही तरी मला टिव्हीवर दिसत होते... :D
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
23 Jul 2008 - 2:43 pm | अनिल हटेला
राजे !!
तुम्ही कुत्रान्ना बदनाम करत आहात ,
असा एखादा खटला तुमच्यावर भरु शकतो !!!
कुत्री बरी आहेत ,
अशी म्हणायची वेळ येते !!!!!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
23 Jul 2008 - 3:19 pm | मनस्वी
लालूचे मजेशीर भाषण येथे बघायला मिळेल.
काही गोष्टी खरंच मुद्द्याच्या बोलल्या आहेत.
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *