गांधी टोपी

सू डोकू's picture
सू डोकू in काथ्याकूट
20 Jan 2012 - 10:41 am
गाभा: 

परमपूज्य लाल बहादूर शास्त्री व पंडित जवाहरलाल नेहरु हे पांढरी टोपी वापरत असत, पण ती टोपी त्यांच्या नांवाने कधीही प्रसिध्द झाली नाही. त्या टोपीला शास्त्री टोपी, नेहरु टोपी असे नांव न पडता गांधी टोपी हे नांव कसे पडले? व ते नामकरण कुणी केले? याचा जाणकारांनी खुलासा करावा.

आमच्या माहितीनुसार महात्मा गांधीजींनी पांढरी टोपी (जी आज त्यांच्या नांवाने प्रसिध्द आहे ती स्वतःच्या डोक्यावर) कधीही घातल्याचे ऐकिवात, वाचण्यात व पहाण्यात नाही.

जर कुणा जाणकारांकडे याची माहिती असेल तर ती द्यावी. व महात्मा गांधींजींचा (गांधी) टोपी परिधान केलेला 'तो' दुर्मिळ अप्रकाशित फोटो येथे अपलोड करावा.
धन्यवाद!

प्रतिक्रिया

नगरीनिरंजन's picture

20 Jan 2012 - 10:51 am | नगरीनिरंजन

सुडोकू साहेब, सध्या सुट्टीवर आहात का?
असाल तर किती दिवस ते सांगा कृपया.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jan 2012 - 11:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुडोकूंचा धागा आहे, म्हणून म्हणत नाही.

पण, माहिती हवी. चौकशी, कुठे मिळेल, असे धागे संगणकावर दिसण्यापूर्वी माझा संगणक फूटला पाहिजे असे मला नेहमी वाटते. :)

-दिलीप बिरुटे

त्यापेक्षा संपादकीय अधिकार वापरून धागेच अप्रकाशित करून टाका की. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jan 2012 - 11:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> त्यापेक्षा संपादकीय अधिकार वापरून धागेच अप्रकाशित करून टाका की.
हा पर्याय असतोच संपादकांकडे असे म्हणतात. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ली खूप चर्चा होत असते तेव्हा संपादकांचा हात जरासा सैल असावा असे वाटते. ;)

सदस्यांनी काही चौकशी करण्यापूर्वी गुगल गुर्जीची मदत घेतली तर बरेच प्रश्न सुटतील. काही प्रश्नांसाठी खरडवही खरडफळा याचा उपयोग झाला पाहिजे. काही माहिती जिवाभावाच्या सदस्यांशी चर्चा करुन मिळेल. अगदी महत्त्वाची आणि गरजेची माहिती असल्यास अशा वेळी त्या धाग्याचं महत्त्व सदस्यांना वाटले पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. काय म्हणता ?

असो, आवरतो.

-दिलीप बिरुटे

अन्या दातार's picture

20 Jan 2012 - 11:49 am | अन्या दातार

सदस्यांनी काही चौकशी करण्यापूर्वी गुगल गुर्जीची मदत घेतली तर बरेच प्रश्न सुटतील. काही प्रश्नांसाठी खरडवही खरडफळा याचा उपयोग झाला पाहिजे. काही माहिती जिवाभावाच्या सदस्यांशी चर्चा करुन मिळेल.

इथे असे धागे काढून काय होते हे लक्षात घेतले पाहिजे.
१. फक्त हवी असलेलीच नाही, तर इतरही अवांतर माहिती मिळते.
२. फुटकळ धागा म्हणून का होईना, निषेधात्मक असल्यातरी 'प्रतिक्रिया मिळतात' (जशी माझी आहे)
३. बदनाम हुए तो क्या हुआ, कमसे कम नाम तो हुआ या म्हणीचा प्रत्यय धागाकर्ता व इतर सदस्यांनाही येतो

इतके सगळे फायदे दिसत असताना तुम्ही काय त्या गुगल गुर्जीचे कौतुक सांगताय? राहता राहिला खफच्या वापराचा प्रश्न. तिथे फक्त आणि फक्त 'हवी असलेली माहिती मिळण्याचा चान्स असतो'. आता तुम्हीच सांगा प्रा.डॉ. आहे कि नै एक तीर तीन शिकार??

परिकथेतील राजकुमार's picture

20 Jan 2012 - 11:54 am | परिकथेतील राजकुमार

महत्वाचा.. नव्हे नव्हे अतिमहत्वाचा फायदा कसा विसरलास ?

जून्या दारूला नव्या बाटलीत उडी मारता येते.

आदरणीय पराण्णांचा हा धागाही त्यासाठी मार्गदर्शक आहे. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

20 Jan 2012 - 12:10 pm | परिकथेतील राजकुमार

नका हो त्या धाग्याची आठवण काढु.

साला तो धागा आणि त्यावरच्या प्रतिक्रियांमुळे मिपावरुन 'आत्ममैथुन' हा शब्द कायमचाच नाहीसा झाला बघा. ;)

साला तो धागा आणि त्यावरच्या प्रतिक्रियांमुळे मिपावरुन 'आत्ममैथुन' हा शब्द कायमचाच नाहीसा झाला बघा.

=)) =)) =))

सगळ लक्षात राहत तुझ्या ;)

©º°¨¨°º©वापरा ©º°¨¨°º©
आमचे (कसले डोंबलाचे) राज्य
Have Happy Endings with Fairytales ;) ...

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

20 Jan 2012 - 11:32 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

©º°¨¨°º©वापरा ©º°¨¨°º©
आमचे (कसले डोंबलाचे) राज्य

या वा परावर एकदम फिदा!!
बेक्कार हसलोय राव!!

सू डोकू's picture

20 Jan 2012 - 2:19 pm | सू डोकू

इतके सगळे फायदे दिसत असताना तुम्ही काय त्या गुगल गुर्जीचे कौतुक सांगताय?

मनातलं बोललात भौ.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jan 2012 - 4:22 pm | अत्रुप्त आत्मा

@-असे धागे संगणकावर दिसण्यापूर्वी माझा संगणक फूटला पाहिजे असे मला नेहमी वाटते. :-) >>>
<<< म्हणजे असा का..? ;-)

अवांतरः-@आमच्या माहितीनुसार महात्मा गांधीजींनी पांढरी टोपी (जी आज त्यांच्या नांवाने प्रसिध्द आहे ती स्वतःच्या डोक्यावर) कधीही घातल्याचे ऐकिवात, वाचण्यात व पहाण्यात नाही. >>>
<<< अहो .. साहेब.. टोपी नेहमी दुसर्‍याचाच नावानं घालतात.. ;-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jan 2012 - 10:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या हातोडीनं माझ्या संगणकाच्या मॉनीटरच्या आणि कळफलकाच्या (मॉनीटरला मराठी शब्द काय आहे हो) ठिकर्‍या ठिकर्‍या झाल्या पाहिजेत. आणि या सर्व ठिकर्‍या जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथेच नव्हे तर ज्ञात आणि अज्ञात ग्रह तार्‍यापर्यंतही जर तिथे मराठी माणूस असेल तर तिथे या ठिकर्‍या पोहचल्या पाहिजेत. फाल्तू आणि चौकश्यांच्या धाग्याच्या वेळेस या ठिकर्‍या मांजरीप्रमाणे कळफलक बडविण्यापूर्वी मराठी माणसाच्या बोटात लाडिळवाळपणे माझ्या संगणकाच्या ठिकर्‍या 'असे धागू काढू नको रे' बाबा म्हणून घोटाळल्या पाहिजेत, अशा त्या संगणकाच्या ठिकर्‍या झाल्या पाहिजेत.

पण अन्या दातार म्हणतात तसे धाग्याचा हेतु असल्यामुळे आता टंकण्यासारखं काही राहीलं नाही. धन्स रे अन्याभाऊ. :)

-दिलीप बिरुटे
(वैतागलेला)

सुमो's picture

24 Jan 2012 - 12:03 pm | सुमो

डॉ.साहेबांमुळे....

"संगणकाच्या ठिकर्‍या झाल्या."

असा प्रतिसाद मिपावर रुढ होईल. :)

असे धागे संगणकावर दिसण्यापूर्वी माझा संगणक फूटला पाहिजे असे मला नेहमी वाटते.

तुमच्या संगणकावर तसे ऑप्शन जर उपलब्ध असेल
आणि ते अनचेक केलेले असेल
तर ते चेक करुन ठेवा, म्हणजे पुढचे काम तुमचा संगणक आपसूक पार पाडेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jan 2012 - 10:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकि....वर ही माहिती दिसते.

वरील माहितीचा उत्तम अनुवाद करुन ती माहिती मराठी विकि...वर टाकाल काय ?
[आपण भर नाही घातली तरी ते काम सवडीने मी करीनच]

-दिलीप बिरुटे

सुनील's picture

20 Jan 2012 - 10:57 am | सुनील

महात्मा गांधींजींचा (गांधी) टोपी परिधान केलेला 'तो' दुर्मिळ अप्रकाशित फोटो येथे अपलोड करावा.

गांधी टोपी घातलेले महात्मा गांधी फक्त पानवाल्याच्या दुकानात पहायला मिळतात असे पुल्देश्पाडांच्या एका लेखात वाचल्याचे आठवते.

चिरोटा's picture

20 Jan 2012 - 11:16 am | चिरोटा

पानवाला चुना लावतो.
गांधी टोपी घालतात. मतितार्थ एकच.

छोटा डॉन's picture

20 Jan 2012 - 11:25 am | छोटा डॉन

गांधी टोपीचे माहित नाही, पण 'नेहरु शर्ट' घातलेले गांधीजी पानवाल्याच्या दुकानात पहायला मिळतात असे पुल्देशपांडे म्हणल्याचे नुकतेच ऐकले होते, असो.

- ( १२०-३०० ) छोटा डॉन

पैसा's picture

20 Jan 2012 - 11:29 am | पैसा

gandhi

याची लिंक मी पूर्वीही एका धाग्यावर दिली होती असं मला आठवतंय. कोणता धागा ते आठवत नाहीये.

तुषार काळभोर's picture

20 Jan 2012 - 7:44 pm | तुषार काळभोर
पैसा's picture

20 Jan 2012 - 7:52 pm | पैसा

एवढं उत्खनन केल्याबदल!!!

तुषार काळभोर's picture

21 Jan 2012 - 9:32 pm | तुषार काळभोर

ऑल इट टूक वॉज ३० सेकंड्स...

परिकथेतील राजकुमार's picture

20 Jan 2012 - 11:32 am | परिकथेतील राजकुमार

ज्या कोणा पामरांना गांधी टोपी मध्ये गांधींचे दर्शन झालेले नाही आणि त्या मुळे ज्यांना मुक्ती मिळण्याशी शक्यता नाही अशा पापी लोकांच्या उद्धारासाठी अण्णांनी अवतार घेतला आहे.

स्पा's picture

20 Jan 2012 - 11:41 am | स्पा

ज्या कोणा पामरांना गांधी टोपी मध्ये गांधींचे दर्शन झालेले नाही आणि त्या मुळे ज्यांना मुक्ती मिळण्याशी शक्यता नाही अशा पापी लोकांच्या उद्धारासाठी अण्णांनी अवतार घेतला आहे.

मृत्युन्जय's picture

20 Jan 2012 - 3:17 pm | मृत्युन्जय

भें ** बेक्कार हसतो आहे फोटो बघुन.

स्मिता.'s picture

20 Jan 2012 - 3:58 pm | स्मिता.

फोटो बघून बेक्कार हसत आहे :D

विशाखा राऊत's picture

20 Jan 2012 - 4:01 pm | विशाखा राऊत

पराण्णा जबरदस्त :)

अप्पा जोगळेकर's picture

21 Jan 2012 - 1:49 pm | अप्पा जोगळेकर

अ‍ॅनिमेटर दादा. तुम्ही खतरनाक आहात. यापुढे जपून राहिलं पाहिजे.

रमताराम's picture

27 Jan 2012 - 11:56 am | रमताराम

मेलो.
पराचे खरे रूप आज कळले. जपून र्‍हायले पायजे आता. नायतर मागच्या रिटर्न्समधे लेक्चर झाडल्याचे १२५/- रेम्युनरेशन दाखवले नाही, टॅक्स भरला नाही हे त्याला कळले तर उपोषणाला बसेल लेकाचा. (नंतर तेच १२५ रु खर्च करून त्याला मोसंबीचा रस पाजावा लागेल.)

उदय के&#039;सागर's picture

20 Jan 2012 - 11:36 am | उदय के'सागर

अहो ति टोपी गांधीजींनी 'डिझाईन' केली होती म्हणुन तिला 'गांधी' टोपी म्हणतात.... (ते चरख्या वर नाहि का सुती कपडे/वस्त्रं विणायचे, त्यातलच हे एक 'क्रिएशन').... :)

('साडी में साडी पराग साडी' अशी जाहिरात नव्हती का... अता त्यात थोडीच 'पराग' नवाचा माणुस ती साडी घालत होता ... ते पराग नावाच्या कंपनीचं (माणसाचं ) फक्त एक 'क्रिएशन' आहे ;) ... तसंच हे हि ...:P)

well, just kidding पण जालावर मलाहि कुठेच त्यांचा 'गांधी टोपी' घातलेला फोटो सापड्ला नाहि... मजेशीरच आहे, कधी नोटीसच केलं नव्हतं.....:)

पुण्याचे वटवाघूळ's picture

20 Jan 2012 - 3:34 pm | पुण्याचे वटवाघूळ

टोपी गांधीजींनी 'डिझाईन' केली होती म्हणुन तिला 'गांधी' टोपी म्हणतात..

शाळेत इतिहासाच्या पुस्तकात गांधीजींचा तशी टोपी घालून असलेला फोटो होता हे पक्के आठवते.

(रात्रीच्या वेळी झाडावर उलटे लटकणारे) पुण्याचे वटवाघूळ
मी ऐसी अक्षरे संकेतस्थळावर "पिसाळलेला हत्ती" नावाने वावरतो.

टिकली's picture

21 Jan 2012 - 11:29 am | टिकली

खालील लिंका पहा:
हिंदीमध्ये
http://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%A7%E0%A5%...

इंग्रजीमध्ये
http://en.wikipedia.org/wiki/Gandhi_cap

भारतीय नेता और राजनैतिक दल इस प्रकार की टोपी के अलग अलग प्रारूप इस्तेमाल करते थे. सुभाष चन्द्र बोस खाकी रंग की तो हिन्दू महासभा और राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के कार्यकर्ता काले रंग की टोपी पहनते थे.
आज भी इस टोपी की प्रासंगिकता बनी हुई है. जहाँ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस इसे अभी भी अपनाए हुई है वहीं समाजवादी पार्टी के कार्यकर्ता लाल रंग की गांधी टोपी पहनते हैं.

^
कॉपी-पेस्ट

नगरीनिरंजन's picture

22 Jan 2012 - 10:45 am | नगरीनिरंजन

छान माहिती.

सुडोकू साहेब,
अजून वेगवेगळ्या रंग, स्वाद*, पोत** असलेल्या टोप्यांची माहिती हवी असल्यास इथेच विचारून घ्या. वेगळा धागा काढू नये ही कळकळीची विनंती.

* स्वाद = फ्लेवर
**पोत = टेक्श्चर.

अरुण मनोहर's picture

24 Jan 2012 - 11:55 am | अरुण मनोहर

>>> हिन्दू महासभा और राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के कार्यकर्ता काले रंग की टोपी पहनते थे.
आज भी इस टोपी की प्रासंगिकता बनी हुई है. जहाँ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस इसे (सफेद) अभी भी अपनाए हुई है वहीं समाजवादी पार्टी के कार्यकर्ता लाल रंग की गांधी टोपी पहनते हैं.<<<

सभी पार्टीके नेता कार्यकर्ताओको सिर्फ सुनहरे रन्गकी टोपी पहनाते है.

फिर कार्यकर्ते अपनी अपनी अलग पहचान दिखाने के लिये उसके उपर भिन्न भिन्न रन्गोकी टोपी पहनते है.

चेतनकुलकर्णी_85's picture

25 Jan 2012 - 12:17 am | चेतनकुलकर्णी_85

गांधी टोपी म्हणजे नक्की काय???

शहाण्या लोकांना मूर्ख व निरुपयोगी बनवायचे अहिंसक शस्त्र..........