✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गांधी टोपी

स
सू डोकू यांनी
Fri, 01/20/2012 - 10:41  ·  लेख
लेख
परमपूज्य लाल बहादूर शास्त्री व पंडित जवाहरलाल नेहरु हे पांढरी टोपी वापरत असत, पण ती टोपी त्यांच्या नांवाने कधीही प्रसिध्द झाली नाही. त्या टोपीला शास्त्री टोपी, नेहरु टोपी असे नांव न पडता गांधी टोपी हे नांव कसे पडले? व ते नामकरण कुणी केले? याचा जाणकारांनी खुलासा करावा. आमच्या माहितीनुसार महात्मा गांधीजींनी पांढरी टोपी (जी आज त्यांच्या नांवाने प्रसिध्द आहे ती स्वतःच्या डोक्यावर) कधीही घातल्याचे ऐकिवात, वाचण्यात व पहाण्यात नाही. जर कुणा जाणकारांकडे याची माहिती असेल तर ती द्यावी. व महात्मा गांधींजींचा (गांधी) टोपी परिधान केलेला 'तो' दुर्मिळ अप्रकाशित फोटो येथे अपलोड करावा. धन्यवाद!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7956 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

सुडोकू साहेब, सध्या सुट्टीवर

नगरीनिरंजन
Fri, 01/20/2012 - 10:51 नवीन
सुडोकू साहेब, सध्या सुट्टीवर आहात का? असाल तर किती दिवस ते सांगा कृपया.
  • Log in or register to post comments

चौकशीच्या धाग्यांनी वात आणला आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 01/20/2012 - 11:05 नवीन
सुडोकूंचा धागा आहे, म्हणून म्हणत नाही. पण, माहिती हवी. चौकशी, कुठे मिळेल, असे धागे संगणकावर दिसण्यापूर्वी माझा संगणक फूटला पाहिजे असे मला नेहमी वाटते. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

त्यापेक्षा संपादकीय अधिकार

प्रचेतस
Fri, 01/20/2012 - 11:09 नवीन
त्यापेक्षा संपादकीय अधिकार वापरून धागेच अप्रकाशित करून टाका की. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अवांतराबद्दल क्षमस्व.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 01/20/2012 - 11:20 नवीन
>>>> त्यापेक्षा संपादकीय अधिकार वापरून धागेच अप्रकाशित करून टाका की. हा पर्याय असतोच संपादकांकडे असे म्हणतात. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ली खूप चर्चा होत असते तेव्हा संपादकांचा हात जरासा सैल असावा असे वाटते. ;) सदस्यांनी काही चौकशी करण्यापूर्वी गुगल गुर्जीची मदत घेतली तर बरेच प्रश्न सुटतील. काही प्रश्नांसाठी खरडवही खरडफळा याचा उपयोग झाला पाहिजे. काही माहिती जिवाभावाच्या सदस्यांशी चर्चा करुन मिळेल. अगदी महत्त्वाची आणि गरजेची माहिती असल्यास अशा वेळी त्या धाग्याचं महत्त्व सदस्यांना वाटले पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. काय म्हणता ? असो, आवरतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

फायदा

अन्या दातार
Fri, 01/20/2012 - 11:49 नवीन
सदस्यांनी काही चौकशी करण्यापूर्वी गुगल गुर्जीची मदत घेतली तर बरेच प्रश्न सुटतील. काही प्रश्नांसाठी खरडवही खरडफळा याचा उपयोग झाला पाहिजे. काही माहिती जिवाभावाच्या सदस्यांशी चर्चा करुन मिळेल.
इथे असे धागे काढून काय होते हे लक्षात घेतले पाहिजे. १. फक्त हवी असलेलीच नाही, तर इतरही अवांतर माहिती मिळते. २. फुटकळ धागा म्हणून का होईना, निषेधात्मक असल्यातरी 'प्रतिक्रिया मिळतात' (जशी माझी आहे) ३. बदनाम हुए तो क्या हुआ, कमसे कम नाम तो हुआ या म्हणीचा प्रत्यय धागाकर्ता व इतर सदस्यांनाही येतो इतके सगळे फायदे दिसत असताना तुम्ही काय त्या गुगल गुर्जीचे कौतुक सांगताय? राहता राहिला खफच्या वापराचा प्रश्न. तिथे फक्त आणि फक्त 'हवी असलेली माहिती मिळण्याचा चान्स असतो'. आता तुम्हीच सांगा प्रा.डॉ. आहे कि नै एक तीर तीन शिकार??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अन्या लेका

परिकथेतील राजकुमार
Fri, 01/20/2012 - 11:54 नवीन
महत्वाचा.. नव्हे नव्हे अतिमहत्वाचा फायदा कसा विसरलास ? जून्या दारूला नव्या बाटलीत उडी मारता येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

आदरणीय पराण्णांचा हा धागाही

प्रचेतस
Fri, 01/20/2012 - 12:01 नवीन
आदरणीय पराण्णांचा हा धागाही त्यासाठी मार्गदर्शक आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अरे रे ..

परिकथेतील राजकुमार
Fri, 01/20/2012 - 12:10 नवीन
नका हो त्या धाग्याची आठवण काढु. साला तो धागा आणि त्यावरच्या प्रतिक्रियांमुळे मिपावरुन 'आत्ममैथुन' हा शब्द कायमचाच नाहीसा झाला बघा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

साला तो धागा आणि त्यावरच्या

सुहास..
Fri, 01/20/2012 - 12:20 नवीन
साला तो धागा आणि त्यावरच्या प्रतिक्रियांमुळे मिपावरुन 'आत्ममैथुन' हा शब्द कायमचाच नाहीसा झाला बघा. =)) =)) =)) सगळ लक्षात राहत तुझ्या ;) ©º°¨¨°º©वापरा ©º°¨¨°º© आमचे (कसले डोंबलाचे) राज्य Have Happy Endings with Fairytales ;) ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

__/\__

मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 01/20/2012 - 23:32 नवीन
©º°¨¨°º©वापरा ©º°¨¨°º© आमचे (कसले डोंबलाचे) राज्य
या वा परावर एकदम फिदा!! बेक्कार हसलोय राव!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

मनातलं बोललात भौ

सू डोकू
Fri, 01/20/2012 - 14:19 नवीन
इतके सगळे फायदे दिसत असताना तुम्ही काय त्या गुगल गुर्जीचे कौतुक सांगताय?
मनातलं बोललात भौ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

@-असे धागे संगणकावर

अत्रुप्त आत्मा
Fri, 01/20/2012 - 16:22 नवीन
@-असे धागे संगणकावर दिसण्यापूर्वी माझा संगणक फूटला पाहिजे असे मला नेहमी वाटते. :-) >>> <<< म्हणजे असा का..? Image removed. ;-) अवांतरः-@आमच्या माहितीनुसार महात्मा गांधीजींनी पांढरी टोपी (जी आज त्यांच्या नांवाने प्रसिध्द आहे ती स्वतःच्या डोक्यावर) कधीही घातल्याचे ऐकिवात, वाचण्यात व पहाण्यात नाही. >>> <<< अहो .. साहेब.. टोपी नेहमी दुसर्‍याचाच नावानं घालतात.. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हो असाच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 01/21/2012 - 22:10 नवीन
आपल्या हातोडीनं माझ्या संगणकाच्या मॉनीटरच्या आणि कळफलकाच्या (मॉनीटरला मराठी शब्द काय आहे हो) ठिकर्‍या ठिकर्‍या झाल्या पाहिजेत. आणि या सर्व ठिकर्‍या जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथेच नव्हे तर ज्ञात आणि अज्ञात ग्रह तार्‍यापर्यंतही जर तिथे मराठी माणूस असेल तर तिथे या ठिकर्‍या पोहचल्या पाहिजेत. फाल्तू आणि चौकश्यांच्या धाग्याच्या वेळेस या ठिकर्‍या मांजरीप्रमाणे कळफलक बडविण्यापूर्वी मराठी माणसाच्या बोटात लाडिळवाळपणे माझ्या संगणकाच्या ठिकर्‍या 'असे धागू काढू नको रे' बाबा म्हणून घोटाळल्या पाहिजेत, अशा त्या संगणकाच्या ठिकर्‍या झाल्या पाहिजेत. पण अन्या दातार म्हणतात तसे धाग्याचा हेतु असल्यामुळे आता टंकण्यासारखं काही राहीलं नाही. धन्स रे अन्याभाऊ. :) -दिलीप बिरुटे (वैतागलेला)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

चला...

सुमो
Tue, 01/24/2012 - 12:03 नवीन
डॉ.साहेबांमुळे.... "संगणकाच्या ठिकर्‍या झाल्या." असा प्रतिसाद मिपावर रुढ होईल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुमचा संगणक आपसूक पार पाडेल

सू डोकू
Fri, 01/20/2012 - 19:21 नवीन
असे धागे संगणकावर दिसण्यापूर्वी माझा संगणक फूटला पाहिजे असे मला नेहमी वाटते.
तुमच्या संगणकावर तसे ऑप्शन जर उपलब्ध असेल आणि ते अनचेक केलेले असेल तर ते चेक करुन ठेवा, म्हणजे पुढचे काम तुमचा संगणक आपसूक पार पाडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकि. म्हणते..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 01/20/2012 - 10:53 नवीन
विकि....वर ही माहिती दिसते. वरील माहितीचा उत्तम अनुवाद करुन ती माहिती मराठी विकि...वर टाकाल काय ? [आपण भर नाही घातली तरी ते काम सवडीने मी करीनच] -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

हम्म

सुनील
Fri, 01/20/2012 - 10:57 नवीन
महात्मा गांधींजींचा (गांधी) टोपी परिधान केलेला 'तो' दुर्मिळ अप्रकाशित फोटो येथे अपलोड करावा. गांधी टोपी घातलेले महात्मा गांधी फक्त पानवाल्याच्या दुकानात पहायला मिळतात असे पुल्देश्पाडांच्या एका लेखात वाचल्याचे आठवते.
  • Log in or register to post comments

फरक

चिरोटा
Fri, 01/20/2012 - 11:16 नवीन
पानवाला चुना लावतो. गांधी टोपी घालतात. मतितार्थ एकच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

नेहरु शर्ट

छोटा डॉन
Fri, 01/20/2012 - 11:25 नवीन
गांधी टोपीचे माहित नाही, पण 'नेहरु शर्ट' घातलेले गांधीजी पानवाल्याच्या दुकानात पहायला मिळतात असे पुल्देशपांडे म्हणल्याचे नुकतेच ऐकले होते, असो. - ( १२०-३०० ) छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

हा फोटो

पैसा
Fri, 01/20/2012 - 11:29 नवीन
Image removed. याची लिंक मी पूर्वीही एका धाग्यावर दिली होती असं मला आठवतंय. कोणता धागा ते आठवत नाहीये.
  • Log in or register to post comments

हा काय?

तुषार काळभोर
Fri, 01/20/2012 - 19:44 नवीन
http://www.misalpav.com/node/16610#comment-284704
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

धन्यवाद!

पैसा
Fri, 01/20/2012 - 19:52 नवीन
एवढं उत्खनन केल्याबदल!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

खि खि खि...

तुषार काळभोर
Sat, 01/21/2012 - 21:32 नवीन
ऑल इट टूक वॉज ३० सेकंड्स...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हम्म्म

परिकथेतील राजकुमार
Fri, 01/20/2012 - 11:32 नवीन
ज्या कोणा पामरांना गांधी टोपी मध्ये गांधींचे दर्शन झालेले नाही आणि त्या मुळे ज्यांना मुक्ती मिळण्याशी शक्यता नाही अशा पापी लोकांच्या उद्धारासाठी अण्णांनी अवतार घेतला आहे.
  • Log in or register to post comments

ह्म्म्म्म्म्म

स्पा
Fri, 01/20/2012 - 11:41 नवीन
ज्या कोणा पामरांना गांधी टोपी मध्ये गांधींचे दर्शन झालेले नाही आणि त्या मुळे ज्यांना मुक्ती मिळण्याशी शक्यता नाही अशा पापी लोकांच्या उद्धारासाठी अण्णांनी अवतार घेतला आहे.
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

भें ** बेक्कार हसतो आहे फोटो

मृत्युन्जय
Fri, 01/20/2012 - 15:17 नवीन
भें ** बेक्कार हसतो आहे फोटो बघुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

हा हा हा...

स्मिता.
Fri, 01/20/2012 - 15:58 नवीन
फोटो बघून बेक्कार हसत आहे :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

पराण्णा जबरदस्त

विशाखा राऊत
Fri, 01/20/2012 - 16:01 नवीन
पराण्णा जबरदस्त :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

अ‍ॅनिमेटर दादा. तुम्ही खतरनाक

अप्पा जोगळेकर
Sat, 01/21/2012 - 13:49 नवीन
अ‍ॅनिमेटर दादा. तुम्ही खतरनाक आहात. यापुढे जपून राहिलं पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

ठ्ठो

रमताराम
Fri, 01/27/2012 - 11:56 नवीन
मेलो. पराचे खरे रूप आज कळले. जपून र्‍हायले पायजे आता. नायतर मागच्या रिटर्न्समधे लेक्चर झाडल्याचे १२५/- रेम्युनरेशन दाखवले नाही, टॅक्स भरला नाही हे त्याला कळले तर उपोषणाला बसेल लेकाचा. (नंतर तेच १२५ रु खर्च करून त्याला मोसंबीचा रस पाजावा लागेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

गांधी'ज क्रिएशन!!!!

उदय के'सागर
Fri, 01/20/2012 - 11:36 नवीन
अहो ति टोपी गांधीजींनी 'डिझाईन' केली होती म्हणुन तिला 'गांधी' टोपी म्हणतात.... (ते चरख्या वर नाहि का सुती कपडे/वस्त्रं विणायचे, त्यातलच हे एक 'क्रिएशन').... :) ('साडी में साडी पराग साडी' अशी जाहिरात नव्हती का... अता त्यात थोडीच 'पराग' नवाचा माणुस ती साडी घालत होता ... ते पराग नावाच्या कंपनीचं (माणसाचं ) फक्त एक 'क्रिएशन' आहे ;) ... तसंच हे हि ...:P) well, just kidding पण जालावर मलाहि कुठेच त्यांचा 'गांधी टोपी' घातलेला फोटो सापड्ला नाहि... मजेशीरच आहे, कधी नोटीसच केलं नव्हतं.....:)
  • Log in or register to post comments

गांधींचा फोटो

पुण्याचे वटवाघूळ
Fri, 01/20/2012 - 15:34 नवीन
टोपी गांधीजींनी 'डिझाईन' केली होती म्हणुन तिला 'गांधी' टोपी म्हणतात..
शाळेत इतिहासाच्या पुस्तकात गांधीजींचा तशी टोपी घालून असलेला फोटो होता हे पक्के आठवते. (रात्रीच्या वेळी झाडावर उलटे लटकणारे) पुण्याचे वटवाघूळ मी ऐसी अक्षरे संकेतस्थळावर "पिसाळलेला हत्ती" नावाने वावरतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय के'सागर

खालील लिंका पहा:

टिकली
Sat, 01/21/2012 - 11:29 नवीन
खालील लिंका पहा: हिंदीमध्ये http://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%A7%E0%A5%80_%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80 इंग्रजीमध्ये http://en.wikipedia.org/wiki/Gandhi_cap भारतीय नेता और राजनैतिक दल इस प्रकार की टोपी के अलग अलग प्रारूप इस्तेमाल करते थे. सुभाष चन्द्र बोस खाकी रंग की तो हिन्दू महासभा और राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के कार्यकर्ता काले रंग की टोपी पहनते थे. आज भी इस टोपी की प्रासंगिकता बनी हुई है. जहाँ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस इसे अभी भी अपनाए हुई है वहीं समाजवादी पार्टी के कार्यकर्ता लाल रंग की गांधी टोपी पहनते हैं. ^ कॉपी-पेस्ट
  • Log in or register to post comments

छान माहिती. सुडोकू

नगरीनिरंजन
Sun, 01/22/2012 - 10:45 नवीन
छान माहिती. सुडोकू साहेब, अजून वेगवेगळ्या रंग, स्वाद*, पोत** असलेल्या टोप्यांची माहिती हवी असल्यास इथेच विचारून घ्या. वेगळा धागा काढू नये ही कळकळीची विनंती. * स्वाद = फ्लेवर **पोत = टेक्श्चर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिकली

पहनना और पहेनाना

अरुण मनोहर
Tue, 01/24/2012 - 11:55 नवीन
>>> हिन्दू महासभा और राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के कार्यकर्ता काले रंग की टोपी पहनते थे. आज भी इस टोपी की प्रासंगिकता बनी हुई है. जहाँ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस इसे (सफेद) अभी भी अपनाए हुई है वहीं समाजवादी पार्टी के कार्यकर्ता लाल रंग की गांधी टोपी पहनते हैं.<<< सभी पार्टीके नेता कार्यकर्ताओको सिर्फ सुनहरे रन्गकी टोपी पहनाते है. फिर कार्यकर्ते अपनी अपनी अलग पहचान दिखाने के लिये उसके उपर भिन्न भिन्न रन्गोकी टोपी पहनते है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिकली

गांधी टोपी म्हणजे नक्की काय???

चेतनकुलकर्णी_85
Wed, 01/25/2012 - 00:17 नवीन
गांधी टोपी म्हणजे नक्की काय??? शहाण्या लोकांना मूर्ख व निरुपयोगी बनवायचे अहिंसक शस्त्र..........
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा