सध्या भारतात विश्वासदर्शक ठरावाच्या नावाखाली जे काही चालले आहे ते पहाता आपली सर्वात मोठी "सट्टाशाही" आहे असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते. खालील बातम्या वाचताना अथवा जे काही चालले आहे ते पहाताना आपल्याला काय वाटते? परिस्थिती बदलता येईल का हे असेच चालणार म्हणत गप्प बसण्याला पर्याय नाही? सामान्य माणसाला यात काय करता येईल - एकट्याने अथवा एकत्रीत?
संदर्भः महाराष्ट्र टाइम्स
युपीए सत्तेवर राहील म्हणून ० . ३८ पैसे तर युपीए सत्तेवर राहणार नाही यासाठी २.९० पैसे असा भाव सध्या बाजारात सुरू आहे. याव्यतिरिक्त २७२ मतांसाठी ०.३८ पैसे , २७३ मतांसाठी ० . ५० पैसे , २७४ मतांसाठी ० . ८० पैसे भाव सुरू आहे.
सरकार जिंकलं तर या एक रुपयाला वर दिलेल्या किंमतीनुसार भाव मिळेल. पण सरकार पडलं तर बुकींना प्रत्येक रुपयावर दोन रुपये मोजावे लागतील. दिवसेंवदिवस सट्टा बाजार गरम होत चालला आहे. आत्तापर्यंत सट्टाबाजारात ८५० कोटी लावण्यात आले आहेत. बुकिंच्या म्हणण्यानुसार २२ जुलैपर्यंत हा आकडा ३ हजार कोटी रुपयांपर्यंत जाईल.
- रेंगे-पाटीलांना उचललं कुणी?
- स्पीकरपद न सोडल्याने सोमनाथदांवर लाल खफा
इत्यादी...
प्रतिक्रिया
21 Jul 2008 - 6:18 pm | धनंजय
या बाबतीत "फ्यूचर्स मार्केट"चे फायदेतोटे काय आहेत?
सरकार राहाण्या-पडण्याने जेवढा फायदा-तोटा होणार असेल, त्यामानाने जर सट्ट्यात होणारा नफा-नुकसान नगण्य असेल, तर ठीक आहे. मग सट्ट्याचे आकडे (ऑड्स) म्हणजे थोडेफार "सरासरी तज्ञ-भाकित" (ऍव्हरेज एक्स्पर्ट ओपिनियन) मानता येईल. अभिनिवेशमुक्त आकडा असल्यामुळे आपले स्वतःचे राजकीय मत कुठल्याही बाजूला असले, तरी ही माहिती वापरता येईल.
सट्ट्यातून होणारा नफा जर राजकीय फायद्याइतकाच असेल तर मात्र हे लोकशाहीला घातक होऊ शकेल. म्हणजे सरकारच्या बाजूने/विरुद्ध मत दिल्याने एखाद्या खासदाराचा १०लाखांचा फायदा-तोटा होत असेल, पण सट्ट्यात त्याचा २० लाखांचा फायदा-तोटा होत सेल, तर "कॉन्फ्लिक्ट ऑफ इन्टरेस्ट" फार होतो. खासदार स्वतःच सट्ट्यात पैसे गुंतवतील. असा खासदार तोंडाने सांगताना आपला पाठिंबा एका दिशेने दाखवेल, पण मतदान उलट्या दिशेने करेल. ही वागणूक गुप्त असल्यामुळे पुढच्या निवडणुकीत तिच्याबद्दल त्या खासदाराला जबाबदार धरता येणे शक्य नाही.
21 Jul 2008 - 6:32 pm | विकास
धनंजयराव, कुठल्या जमान्यात वावरत आहात? :)
दहा लाख काय घेउन बसलात - किंमती २५ कोटींपर्यंत चालल्यात म्हणूनच उद्विन्ग झालो! (म्हणजे मी का खासदार नाही म्हणून उद्विग्न झालो नाही तर हे चुकीचे वाटले म्हणून!)
21 Jul 2008 - 8:17 pm | धनंजय
आमची कल्पनाशक्तीच तोकडी :
"चैन करा लेकहो - दररोज मटार उसळ खा! खा रोजची शिक्रण!" इतपतच आमची पुणेरी मजल.
21 Jul 2008 - 9:33 pm | विकास
"चैन करा लेकहो - दररोज मटार उसळ खा! खा रोजची शिक्रण!" इतपतच आमची पुणेरी मजल.
एकदम चपखल! =))
21 Jul 2008 - 6:33 pm | सुनील
विश्वासदर्शक ठरावावरील खासदारांचे मतदान हे गुप्त असते का? असल्यास काहीही घडू शकते.
रेंगे-पाटीलांना उचललं कुणी?
आताच असे वाचले की, रेंगे पाटील दिल्लीत पोचले असून सरकारच्या बाजूने मतदान करणार आहेत. बहुदा नारायण राणेंनी त्यांना उचलेले असावे.
स्पीकरपद न सोडल्याने सोमनाथदांवर लाल खफा
ह्याला कारणीभूत आहेत करात आणि प्रभृती. लोकसभेचे सभापतीपद हे घटनात्मक पद असल्याची चाड त्यांनी ठेवली नाही. सोमनाथदांनी जे केले ते योग्यच आहे.
खरी गंमत ही की, जर मनमोहन सरकार पडलेच तर पर्यायी पंतप्रधान म्हणून अडवाणींऐवजी मायावतींच्याच नावाची चर्चा सुरू आहे!!
(उद्विग्न) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
21 Jul 2008 - 7:44 pm | मुक्तसुनीत
१९८९ ला काँग्रेसची सत्ता गेल्यापासून हे आणि असे राजकीय स्थैर्याबद्दलचे प्रश्न वेळोवेळी भेडसावत आहेत. आता दोन आघाड्यांमधला सत्तासंघर्षाचा समतोल डाव्यांमुळे अचानक शिगेला पोचल्यामुळे हे प्रश्न पुन्हा समोर आलेत. राजकीय घोडेबाजार (पोलिटिकल हॉर्स ट्रेडींग) हा प्रकार कमीत कमी १८ वर्षे तरी जुना आहे. द्विपक्षीय पद्धती, राष्ट्राध्यक्ष-पद्धती असे वेगवेगळे पर्याय सुचविले जातात. अर्थात हा बदल सहजासहजी होणे नाही. सत्तेची कुत्तरझोंबड काहीही चालो, जर का आर्थिक, सामाजिक आघाड्यांवर फारसा बदल होणार नसेल तर चालते आहे ते चालू द्या असे सामान्य माणसाला म्हणणे अपरिहार्य ठरते...
21 Jul 2008 - 9:03 pm | सुचेल तसं
भाववाढ इथे पण आहे. १९९३ मधे एका खासदाराच्या मताचा भाव ५० लाख होता. तो आज १५ ते २५ कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे.
खरं तर पाठिंबा काढुन घ्यायची कॉंग्रेसची जुनी सवय आहे. १९९६ मधे देवेगौडा सरकारला, नंतर गुजराल सरकारला असलेला पाठिंबा कॉंग्रेसनी काढुन घेतला होता.
फक्त आज कॉंग्रेस दुसर्या भुमिकेत आहे एवढचं.....
http://sucheltas.blogspot.com
22 Jul 2008 - 2:25 am | हर्षद आनंदी
हे सत्ता टीकविण्याच्या द्रुष्टीने चालविलेले प्रयत्न म्हणजे फक्त नालायकपणाचा कळस आहे. वाढती महागाइ॑, उत्तर व पुव॑ भारतात पावसाचा कहर या पाश्व॑भुमीवर हा सत्तेचा खेळ भारतीय राजकारणी लोकांचे खरे चित्र जगापूढे परत एकदा मांडत आहे. ह्या गोष्टीवरून जर आपण वेळीच धडा नाही घेतला तर आपले हाल कुत्रा सुध्दा खाणार नाही.
22 Jul 2008 - 2:42 am | स्वप्निल..
जो पर्यंत कुठल्याही एका पक्षाला थोडे तरी बहुमत मिळत नाही तो पर्यंत हा सट्टा बाजार असाच सुरु राहनार..
मला तरी वाटते की इतके टेकु घेउन उभे असनारे सरकार अर्धा वेळ ते वाचवायचे कसे याचाच विचार करत असेन नेहमी..
जर या गोष्टींमधुन वेळ मिळाला तर मग देश, जनता.....
मला तरी हा डाव्यांनी केलेला मुर्खपणा वाटतो आहे. हे माझे वैयक्तिक मत आहे..
स्वप्निल..
22 Jul 2008 - 2:52 am | विसोबा खेचर
खालील बातम्या वाचताना अथवा जे काही चालले आहे ते पहाताना आपल्याला काय वाटते?
खरं सांगू का? पूर्वी असं काही पाहताना लाज, शरम वाटायची, परंतु अलिकडे काही वाटेनासं झालंय! अहो, एक सामान्य माणूस यात काय करू शकणार?
परिस्थिती बदलता येईल का हे असेच चालणार म्हणत गप्प बसण्याला पर्याय नाही?
परिस्थिती कशी बदलणार? आपणच तर राजकारण्यांना निवडून देतो!
सामान्य माणसाला यात काय करता येईल - एकट्याने अथवा एकत्रीत?
मतदान! त्यातल्या त्यात लायक माणसाला मत देणे व आपला लोकशाहीचा हक्क बजावणे हा एकच मार्ग आहे. दर ५ वर्षातनं फक्त एकदा सामान्य माणसाला ही संधी मिळते. दुसरं सामान्य माणसाच्या हातात काय आहे? आज दिवसभर दूरदर्शनवर खासदारांच्या भाषणांचा छान तमाशा पाहायला मिळाला, लोकशाहीच्या नावाखाली सगळी मंडळी यथेच्छ गोंधळ घालत होती. पण आपण काय बोलणार आणि आपल्याला विचारतंय कोण? ती सगळी आपलीच माणसं! कारण आपणच त्यांना निवडून देतो!
बाकी सट्ट्याचं काही हल्ली विशेष वाटेनासं झालं आहे. प्रत्येक गोष्टीतच सट्टा चालतो!
मी जेव्हा टाटा स्टील चे ६७५ च्या भावाने १००० समभाग विकत घेतो आणि बाजार बंद व्हायच्या आत एक तर ६८० किंवा ६७० ने विकतो तेव्हा मीदेखील ५००० रुपयाच्या फायद्या किंवा तोट्याचा सट्टाच खेळतो ना? आधी मुळात ६७५ च्या भावाने १००० समभाग घेण्याकरता माझ्याकडे ६७५००० रुपये असतातच कुठे? तरीही सेबी मला हा व्यवहार करण्याची परवानगी देतेच ना? मला ५००० च्या डिफरन्सशी मतलब आणि सेबीला सर्विस टॅक्स आणि टर्नओव्हर टॅक्सशी मतलब! ज्या माणसाकडे ६७५००० इतकी रक्कम नाही त्या माणसाला केवळ ५/१० टक्के मार्जिन भरून असा व्यवहार करू द्यायचा की नाही, तो त्याच्या हिताचा आहे किंवा नाही, त्यात त्याचे काही हजार रुपये नुकसान होऊ शकते, हा विचार नैतिक विचार सेबी कुठे करते?
म्हणजेच सेबीचा या सट्ट्याला अधिकृत पाठिंबाच नव्हे काय? तसंच इतर सट्ट्यांचं! दुसरं काय?
असो...
आपला,
(मायबाप सरकारच्या धोरणांवर बरंच काही अवलंबून असणारा एक सामान्य भारतीय नागरीक!) तात्या.
22 Jul 2008 - 3:49 am | विकास
मतदान! त्यातल्या त्यात लायक माणसाला मत देणे व आपला लोकशाहीचा हक्क बजावणे हा एकच मार्ग आहे. दर ५ वर्षातनं फक्त एकदा सामान्य माणसाला ही संधी मिळते.
हेच मला म्हणायचे होते... मी तर त्यापुढे जाऊन असेही म्हणतो की तुमची कुठल्या पक्षाशी अथवा उमेदवाराशी बांधिलकी नसली तर दर निवडणूकीत आधिच्या पक्षाच्या विरोधात करत रहा... ही "प्रोसेस" हळू आहे पण जेंव्हा राजकारण्यांच्या लक्षात येईल की सर्वसामान्य जनता मते देयला येत आहे तेंव्हा कुठे मानसिकतेत बदल होईल. सगळे मतदार एकत्र असण्याचे कारण नाही निर्णय "स्टॅटिस्तीकली" आपोआप लागत राहतील.