निवॄती

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
21 Jul 2008 - 12:46 pm

छळले मी त्या सर्व कवींना स्मरतो आहे
शेवटचे मी आज विडंबन लिहितो आहे

वा व्वा टाळ्या खूप मिळाल्या मज रसिकांच्या
आत तरीपण एक कवी घुसमटतो आहे

कसा अडकलो प्रतिमेच्या जाळ्यात कळेना
सुटण्यासाठी माशासम धडपडतो आहे

मित्रांनी ही सावध केले होते मजला
आठवणींनी त्या सार्‍या गलबलतो आहे

डोळ्यांन मध्ये स्वप्नांच्या ना पाहू शकतो
आरसाही बघण्यास मी घाबरतो आहे

शब्दांच्या मी या कोलांट्या खूप मारल्या
विदूषकाचा भोग आज मज कळतो आहे

करा मोकळा प्रतिमेच्या पिंजर्‍यातून आता
हेच मागणे, हीच विनवणी करतो आहे

साद घालते मला खुले आभाळ कधीचे
आज नवी सुरुवात पुन्हा मी करतो आहे

विडंबन

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

21 Jul 2008 - 12:50 pm | विसोबा खेचर

केवळ अप्रतीम! अन्य शब्द नाहीत.....!

एकेक ओळ दाद द्यावी अशी. जियो केशवा....!

आपला,
(केशवाच्या विडंबनांपेक्षा त्याच्या कवितांचाच जबरदस्त चाहता!) तात्या.

धनंजय's picture

21 Jul 2008 - 5:43 pm | धनंजय

अप्रतिम +१
(केशवाच्या विडंबनांपेक्षा त्याच्या कवितांचाच जबरदस्त चाहता!) +१

निवृत्ती नका घेऊ, (सहज म्हणतात) +१

पण त्या कवीला पिंजर्‍यातून सोडवा अधूनमधून.

भाऊ ठाकुर's picture

21 Jul 2008 - 1:03 pm | भाऊ ठाकुर

गुरुजी ,

हे बरे झाले, पण केशवा, विडम्बने एकदम बन्द करु नकोस.
कविता छानच!

भाऊ

आंबोळी's picture

21 Jul 2008 - 1:04 pm | आंबोळी

केसुनाना,
अतिसुंदर.....
एकेक ओळ दाद द्यावी अशी. सहमत.

वि.सु. : आम्ही ही कविता आहे असेच समजून आहोत. हे जर तुमच्य निवृत्तेचे पत्र असेल तर यास केराची टोपली दाखवण्यात येइल.
स्वगतः हा कच्चा माल म्हणून वापरता येइल काय?

आंबोळी

अमोल केळकर's picture

21 Jul 2008 - 1:26 pm | अमोल केळकर

कविता मस्तच
विशेष सुचनेशी - १०० % सहमत

( विद्यार्थी ) अमोल

--------------------------------------------------
गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा !!
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

केशवसुमार's picture

21 Jul 2008 - 1:28 pm | केशवसुमार

अंबोळीशेठ,
हा कच्चा माल म्हणून वापरता येइल काय?
विचारत काय बसलाय.. वापरा..
(निवॄत)केशवसुमार
स्वगतः झाडावरच्या कैर्‍या बघायच्या आणि रखवालदाराला विचारायचे चोरू का? ~X(
निवृती घेतली नसती तर अत्ता पर्यंत खूर्दा पडला असता :B

अनिल हटेला's picture

21 Jul 2008 - 1:38 pm | अनिल हटेला

अचानक निव्रूत्ती वगैरे घेउ नका राजे....

अजुन बरीच मजल मारायची आहे आपल्याला....

एवढ्यात्च दमलात ...

आणी कविता एक्दम सही ~~~~~~~~
आपल्या कवितेचा चाहता,
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

सहज's picture

21 Jul 2008 - 1:48 pm | सहज

कविता अफलातुन.

विडंबनकार केसु ना विश्रांती जरुर द्या पण निवृत्त करायचा विचार देखील आणू नका. व ही विनंती नाही तर धमकीच समजा.

विकास's picture

21 Jul 2008 - 2:48 pm | विकास

कविता अफलातुन.

विडंबनकार केसु ना विश्रांती जरुर द्या पण निवृत्त करायचा विचार देखील आणू नका. व ही विनंती नाही तर धमकीच समजा.

धमकी अशाकरता कारण माझ्यासारख्याला विडंबने येथे येऊन लिहावी लागतील :)

नरेंद्र गोळे's picture

21 Jul 2008 - 2:14 pm | नरेंद्र गोळे

निवृत्ती.................................प्रवृत्ती

छळले मी त्या सर्व कवींना स्मरतो आहे..........छळले मी ज्या सर्व कवींना स्मरतो आहे
शेवटचे मी आज विडंबन लिहितो आहे..........पहिल्यांदा का आज विडंबन लिहीतो आहे

वा व्वा टाळ्या खूप मिळाल्या मज रसिकांच्या...वा व्वा टाळ्या जरी मिळाल्या मज रसिकांच्या
आत तरीपण एक कवी घुसमटतो आहे .........आत तयांच्या खरा कवी घुसमटतो आहे

कसा अडकलो प्रतिमेच्या जाळ्यात कळेना .....पुरा समजलो विडंबनी जाळेच तुटेना
सुटण्यासाठी माशासम धडपडतो आहे.........त्या जाळ्यातुन सुटण्यासाठी पळतो आहे

मित्रांनी ही सावध केले होते मजला.............मित्रांनी का सावध केले होते मजला?
आठवणींनी त्या सार्‍या गलबलतो आहे .........आठवुनी ते सारे मी गलबलतो आहे

डोळ्यांन मध्ये स्वप्नांच्या ना पाहू शकतो ........डोळ्यांन मध्ये स्वप्नांच्या मी पाहू शकतो
आरसाही बघण्यास मी घाबरतो आहे ..........आरसा मला बघण्याला घाबरतो आहे

शब्दांच्या मी या कोलांट्या खूप मारल्या .......शब्दांच्या मी का कोलांट्या खूप मारल्या
विदूषकाचा भोग आज मज कळतो आहे .......विदूषकाचा भोग काय ना कळतो आहे?

करा मोकळा प्रतिमेच्या पिंजर्‍यातून आता ......करा बंद पिंजराच एकदा प्रति-प्रतिभेचा
हेच मागणे, हीच विनवणी करतो आहे ..........हेच मागणे, हीच विनवणी करतो आहे

साद घालते मला खुले आभाळ कधीचे ..........होत मोकळे मला खुले आभाळ कधीचे
आज नवी सुरुवात पुन्हा मी करतो आहे ........आज नवी सुरूवात पुन्हा का करतो आहे

अनिल हटेला's picture

21 Jul 2008 - 2:24 pm | अनिल हटेला

सही !!!

नरेन्द्रजी !!!!

बढीया!!!!!!!!!!!!!!!!!!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

चतुरंग's picture

21 Jul 2008 - 6:01 pm | चतुरंग

एकाहून एक सरस द्विपदी! खरं सांगू आत तुटलं रे कुठेतरी!

(स्वगत - ऐन भरात असताना अशी निवृत्ती? खरंच विचार करतोय हा केशा की काय? कोण आहे रे तिकडे जरा फर्मास कच्चा माल काढा बघू. ;)

चतुरंग

मनीषा's picture

21 Jul 2008 - 8:08 pm | मनीषा

साद घालते मला खुले आभाळ कधीचे
आज नवी सुरुवात पुन्हा मी करतो आहे
सुरुवात तर छानच आहे ...

छळले मी त्या सर्व कवींना स्मरतो आहे... कविंना नक्की असं वाटत नसेल
शेवटचे मी आज विडंबन लिहितो आहे...असं नका करु , लिहीत रहा

अविनाश ओगले's picture

21 Jul 2008 - 9:29 pm | अविनाश ओगले

आमची प्रतिक्रिया येथे वाचा....

प्रियाली's picture

21 Jul 2008 - 9:33 pm | प्रियाली

छान आहे.

"मनोगत" असेल तर मात्र आवडले नाही. ;)

प्राजु's picture

21 Jul 2008 - 9:45 pm | प्राजु

केशव सुमार... पुन्हा एकदा विलक्षण प्रतिभेचा अनुभव आला आपल्या. केवळ सुंदर..

पण विडंबनातून निवृत्ती नका घेऊ..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मदनबाण's picture

25 Jul 2008 - 2:34 pm | मदनबाण

अगदी हेच म्हणतो..

(केसुच्या विडंबनाच चाहता)
स्वगतः-- काय राव नविन कच्चा माल मिळाला का ?
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

बेसनलाडू's picture

21 Jul 2008 - 10:39 pm | बेसनलाडू

निवृत्तीची घोषणा हवी तर अशी!
मनातला एक-एक विचार स्पष्टपणे,प्रामाणिकपणे मांडणारे सग़ळेच खणखणीत शेर आवडले.
मित्रांनी ही सावध केले होते मजला
आठवणींनी त्या सार्‍या गलबलतो आहे
शब्दांच्या मी या कोलांट्या खूप मारल्या
विदूषकाचा भोग आज मज कळतो आहे

तुमची प्रतिभा वादातीत आहे;आणि कदाचित म्हणूनच तुमच्यातला विडंबनकार तुमच्यातल्या कवीवर अन्याय करत असतो/होता असे वाटते.
कदाचित माझे मत हे सर्वमान्य जनमताच्या विरोधात वाटेल,पण निवृत्तीचा निर्णय स्वागतार्ह वाटतो.कोणत्या भावनेतून तुम्ही तो घेतला असेल,याची कल्पना आहेच आणि शेरांमधून ते पुरेसे स्पष्टही झाले आहे,असे वाटते.तुमच्यातल्या कवीचे मनोगत समजू शकतो.पण असा महत्त्वाचा नि टोकाचा निर्णय अचानक घेण्यापेक्षा चूझ युवर गेम ऍन्ड प्ले लाइक सचिन,असे म्हणावेसे वाटते ;) हे विडंबनकार ते कवी हे संक्रमण अधिक प्रगल्भतेकडे होणारे संक्रमण असे अचानक न होता स्मूथ झाले तर बेहतर!
(समजूतदार)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

21 Jul 2008 - 11:23 pm | विसोबा खेचर

सहमत आहे,

केशवा, विडंबनातून निवृत्ती घेतो आहेस ते बरंच आहे. अरे तू इतक्या सुंदर कविता करतोस, त्यातून आपले विचार इतके सुंदर व्यक्त करतोस तर उत्तम कविता करत जा की! प्रत्येक वेळेसच कहितरी कच्चा माल शोधत बसायचं आणि त्याचं विडंबन करायचं ह्यात तुला कसली रे सर्जनशीलता वाटते? एखाददा मजेमजेत किंवा मस्करीत एखादं विडंबन ठीक आहे परंतु दरवेळेसच करायचं म्हणून काहीतरी विडंबन करायचं आणि एखाद्या चांगल्या काव्याला हास्यास्पद ठरवायचं यात काय हशील?

मला सांग मूळ कवितांना किती आयुष्य असतं आणि त्याच्या विडंबनाला किती?

ने मजसि ने या कवितेचं कर पाहू विडंबन! अहे हिंमत?? मी पैज लावून सांगतो की फार फार तर एका दिवसा पेक्षा अधिक तुझ्या त्या विडंबनाचं आयुष्य नसेल! कुठलीही कला असो, प्रत्येकवेळेसच तिचं विडंबन योग्य वाटत नाही! एखाददा मजामस्करीत ठीक आहे!

हिरवे हिरवे गार गालिचे या अप्रतीम कवितेचं पोरकट विडंबन एखाद्याला शक्यही होईल परंतु ती एक सर्जनशील, उत्तम कलाकृती असेल का हो?

असो, केश्या निवृत्तीचा निर्णय घेतलास ते योग्यच झाले. मी मनापासून स्वागतच करतो या निर्णयाचं! आता आम्हाला केशवसुमाराचं काही 'ओरिजिनल' काव्य वाचायला मिळेल! ते अत्यंत सुरेख असेल अशी माझी खात्री आहे!

असा परप्रकाशी किती दिवस राहणार रे तू केश्या?

तात्या.

विसोबा खेचर's picture

21 Jul 2008 - 11:44 pm | विसोबा खेचर

या कवितेचं विडंबन कर पाहू केश्या!

संथ वाहणार्‍या भीमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी!

आहे ताकद वरील ओळींचं विडंबन करण्याची??

करून बघ, म्हणजे आपण किती लहान आहोत हे तुला लगेच समजेल! त्यापेक्षा, तुझ्या वकुबानुसार एखादी उत्तम कविता कर, ती तुझी असेल, ओरिजिनल असेल! आणि एक सर्जनशील कलाकार म्हणून तुझं तुलाच खूप समाधान मिळेल!

नाहीतर शेवटी,

वा व्वा टाळ्या खूप मिळाल्या मज रसिकांच्या
आत तरीपण एक कवी घुसमटतो आहे

कसा अडकलो प्रतिमेच्या जाळ्यात कळेना
सुटण्यासाठी माशासम धडपडतो आहे

हेच म्हणत बसायची वेळ येईल!

बरं झालं, सावध झालास आणि वेळीच निवृत्ती घेतलीस ते! अभिनंदन...!

साद घालते मला खुले आभाळ कधीचे
आज नवी सुरुवात पुन्हा मी करतो आहे

अगदी खरं! हे खुलं आभाळच खरं! प्रत्येकवेळेसच कुणाच्या तरी काव्यपंक्तिवर जगणं सोडून दे आता! म्हणजेच केव्हातरी,

शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा
रानफुले लेवून सजल्या या हिरव्या वाटा
या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावो दे

असं कधितरी तुलाही छानसं लिहिता येईल..!

आपला,
(केशवच्या कवितांचा चाहता!) तात्या.

श्रीकृष्ण सामंत's picture

21 Jul 2008 - 10:43 pm | श्रीकृष्ण सामंत

कविता आवडली
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

पिवळा डांबिस's picture

21 Jul 2008 - 10:58 pm | पिवळा डांबिस

केशवसुमारजी, कविता अगदी उत्तमच आहे.
पण गुरुदेव, खरंच निवृत्ती नका घेऊ हो!
अहो, आमचं शिक्षण अजून पुरं व्हायचंय स्वामी! आम्हाला दुसरा गुरू शोधावा लागेल ना!

गुरूबिन कौन लगावे वाट?

आपला अबोध शिष्य,
पिवळा डांबिस

(स्वगतः त्या बेला ला आणि रंगाला गुरु करण्यात काही अर्थ नाही! ते लेकाचे माझ्यापेक्षाही जास्त डांबिस आहेत!!!:))

केशवसुमार's picture

23 Jul 2008 - 10:41 pm | केशवसुमार

डांबिसशेठ,
आपले शिक्षण चालू राहील..
(निवृत्त) केशवसुमार
बेला आणि रंगा ते लेकाचे माझ्यापेक्षाही जास्त डांबिस आहेत.. हे आवडले..
मी आधी रंगा आणि बिल्ला असे वाचले...;)

सर्किट's picture

21 Jul 2008 - 11:34 pm | सर्किट (not verified)

ही तर स्वतंत्र रचना आहे.

फक्तः

डोळ्यांन मध्ये स्वप्नांच्या ना पाहू शकतो
आरसाही बघण्यास मी घाबरतो आहे

ह्यातील दुसरी ओळीतला मात्रांचा घोळ वगळता,

बाकी मस्त आहे !

एकूण ९.५ गुण.

बाकी, बेसनलाडू आणि तात्याच्या विचारांशी मी व्यक्तिशः सहमत नाही.

विडंबन ही एक कला आहे. आणि केशवसुमार हे त्या कलेचे अनभिषिक्त सम्राट आहेत.

हल्लीचेच उदाहरण बघा : बाप्पा आणि बिग बी. बिगबी हे विडंबन वाटतच नाही, असे विडंबन आहे. ते करण्याची शक्ती केसुंपाशी आहेच.

बाकी तुमची मर्जी.

- (केसुचा फ्यान) सर्किट

कोलबेर's picture

24 Jul 2008 - 12:46 am | कोलबेर

बेसनलाडू आणि तात्याच्या विचारांशी मी व्यक्तिशः सहमत नाही.
बाकी तुमची मर्जी.

- (केसुचा फ्यान) कोलू

चित्रा's picture

22 Jul 2008 - 12:00 am | चित्रा

निवृत्ती नको हो..
कविता छान (आणि काही विडंबनेही लक्षात आहेत!)

स्वप्निल..'s picture

22 Jul 2008 - 12:50 am | स्वप्निल..

केशवसुमारजी,

तुम्ही जेवढ्या चांगल्या कविता करता तेवढीच चांगली विडंबने देखिल..!!

जास्त कविता करा पण विडंबने पण सुरु ठेवा हेच आमचे सांगणे..!!

स्वप्निल..

केशवसुमार's picture

23 Jul 2008 - 10:35 pm | केशवसुमार

निवृत्त व्हा आणि निवृत्त नका होऊ म्हणणार्‍या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)केशवसुमार

धोंडोपंत's picture

24 Jul 2008 - 7:36 am | धोंडोपंत

मित्रवर्य केशवसुमार,

कविता आवडली. भावना पोहोचल्या. तुम्ही विडंबनातून मुक्त होत आहात असा अर्थ त्यातून उमगला . त्यावरून सांगावेसे वाटते की, विडंबन हे तुमच्या रक्तात आहे.
विडंबन हा तुमचा पिंड आहे आणि स्वतःच्या अभिजात पिंडाविरूद्ध कुणीही सुखाने जगू शकत नाही. तुम्ही देखिल विडंबनाशिवाय सुखाने जगू शकणार नाही. हे आम्ही अत्यंत ठामपणे सांगत आहोत. याची प्रचिती तुम्हाला येईलच.

जेव्हा आम्ही तुमची कुंडली पाहिली तेव्हाच तुम्हाला सांगितले होते की तुम्ही एवढी उत्तम विडंबने का आणि कशामुळे करू शकता. तुम्हाला ते स्मरत असेलच. तुमच्या कुंडलीत काही अत्यंत प्रबळ बौद्धिक योग आहेत, जे तुमच्या लेखनाला उत्तम नावलौकिक आणि प्रतिष्ठा मिळवून देतील हे आम्ही तुम्हाला सांगितले होते ते जरा आठवा.

तुमचा बुध खूप शुभ असून त्याला स्थानबलही उत्तम आहे. बुध हा खोडकर ग्रह आहे. तो शनीसारखा आडमुठ्या, माणूसघाण्या नाही, गुरूसारखा लोकांना शहाणपणाचे आणि तत्वज्ञानाचे डोस पाजणारा नाही, तर हसरा, खेळकर आणि मार्मिकपणाने टिपण्णी करणारा बुध आहे.

तो तुमच्या कुंडलीत आत्यंतिक शुभ असल्यामुळे विडंबनात्मक, खुमासदार लेखनाचा तुमचा पिंड आहे. बुध अनुकूल असल्यामुळे तुमच्या विडंबनाचा दर्जा उच्च आहे. कुठल्याही गोष्टीतले वर्म शोधून त्यावर मार्मिकपणे भाष्य करण्यात तुमची हातोटी आहे.

ज्या गोष्टींना ग्रहांची अनुकूलता असते त्या गोष्टी सहजसाध्य असतात. त्यामुळे ग्रहस्थितीचा फायदा करून घ्यावा. निवृत्तीचे विचार हे अभद्र डोहाळे आहेत. तुमच्या व्यक्तिमत्वाशी ते विसंगत असल्याने त्यात यश येणार नाही हे निश्चित.

त्यामुळे पुन्हा लेखणी हाती घ्यावी आणि झकास विडंबने करून हा निवृत्तीचा धोंडा दूर सारून तुमच्या प्रतिभेचा पाझर मोकळा करावा हेच सांगणे आहे.

"केशवसुमार" हा मराठीतील उत्कृष्ठ विडंबनकारांपैकी एक आहे..... अशी मराठी सृजनाची धारणा होण्याचा दिवस फार दूर नाही. हे वास्तव तुम्हाला सांगणे हाच आमचा उद्देश आहे.

पुढील विडंबनाची आतुरतेने वाट पहात आहोत.

आपला,
(भविष्यवेत्ता) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

सर्किट's picture

24 Jul 2008 - 8:37 am | सर्किट (not verified)

कुंडली वगैरे गेली तिकडे (तुम्हाला कुठे ते माहितीच आहे.)

केसु च्या लिखाणाला मार्मिक ठरवण्यसाठी त्याच्या कुंडलीच्या चाचपणीची गरज नाही. त्याचे काव्यकर्तनालय पुन्हा सुरू व्हावे, अशी इच्छा करण्यास त्याच्या ग्रहांच्या परिस्थितीची माहितीही आवश्यक नाही.

त्याला जे वाटते, ते करू द्यावे, असे आम्हाला वाटते. आम्ही आग्रहात कमी पडलो, तर आमची कुंडली तपासा ना !

आमचे ग्रह कुठे कमी पडतात, ते अभ्यासा. आमच्या सर्वांच्या कुंडलीचाही काहीतरी संबंध असेलच ना ?

- सर्किट