...पुत्ररत्नाची प्राप्ती होणे हा काय सुखद अनुभव असतो ह्याचा प्रत्यय मला नुकताच सुखावून गेला...मला वसुबारस, रमा एकादशी ह्या शुभ मुहूर्ती पुत्र रत्नाची प्राप्ती
झाली...आता नाव काय ठेवायचं हा यक्षप्रश्न माझ्या समोर उभा ठाकला...बर्रीच नावे पालथी घातली...पण एक नाव पसंतीस उतरेल तर शप्पथ.. बरयाच द्राविडी
प्राणायामानंतर एक नाव पसंतीस उतरले...मी माझ्या सुपुत्राचे नामकरण "चि. शौनक" केले. पण बरयाच जणांना हे नाव अपरिचित होते.अगदी आप्तांना सुद्धा...
मलाही शौनकची दोनच उदाहरणे ठाऊक होत्ती.....१. विद्वान ऋषी (शौनक), २.शौनक अभिषेकी (स्वरसुर्य जितेंद्र अभिषेकी यांचे सुपुत्र)..सगळे शौनक ह्या नावाचा
अर्थ काय होतो अशी विचारणा करू लागले पण माझ्याकडे ह्या दोन उदाहरणापलीकडे काही खुलासा करू शकलो नाही...मग माझ्या वाचनात नर्मदेतला गोटा ह्यांचे
'नावात काय आहे' मी.पा. वरचा लेख पाहण्यात आणि वाचण्यात आला..आणि माझ्या आशा पल्लवित झाल्या.. मला मी.पा. ( ह्या विद्वान व सुज्ञ लोकांचा वावर असणाऱ्या) संकेतस्थळावर माहितीचा आधार मिळू शकेल अस्सं वाटल्यामुळे हा पत्रप्रपंच.. (बुडत्याला काडीचा आधार म्हणतात ना हिब्रूमध्ये...) तर चला दाबा कळ आणि नोंदवा आपली प्रतिक्रिया पटकन....अगदी धो-धो पाऊस पडू द्यात प्रतिक्रियांचा....आणि मला मदत करा...शौनकचा एक नाही अनेक अर्थ सांगण्याचा...मग
काय ? माझा मी. पा. वरील आधाराचा विश्वास सार्थ ठरवाल ना ?
तळटीप: 'नावात काय आहे' ला प्रतिसाद देणाऱ्या मी. पा. करांनी देखील भरभरून प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती..
प्रतिक्रिया
31 Dec 2011 - 8:56 pm | पक पक पक
'शौनक'..छान नाव ठेवलत मुलाच ,पण पेढे न देता आता उगाच 'इथे ' अर्थ समजाउन घेउन कशाला अर्थाचा अनर्थ करता आहात.
शेवटी ते कोणतरी म्हण्ल आहे ना कि नावात काय आहे ?
31 Dec 2011 - 9:16 pm | पैसा
नाव आहे. अथर्ववेद लोकांपर्यंत पोचवायचं काम त्यानी आणि त्यांचे शिष्य आश्वलायन आणि कात्यायन यानी केलं. एवढी माहिती पुरे ना! मग वेदांच्या शिक्षकाला शौनक म्हणू लागले. नाव छान आहे.
31 Dec 2011 - 9:40 pm | पक पक पक
सही...एकदम छान माहिती दिलीत तुम्ही , खरच तुमचा अभ्यास खुप आहे.मानल तुम्हाला.
धन्यवाद...
4 Jan 2012 - 3:33 pm | परिकथेतील राजकुमार
अंमळ गल्लत होते आहे का ?
माझ्या अल्पज्ञानाप्रमाणे शौनक म्हणजे शुनाकाचा पुत्र. शुनाकपुत्र = शौनक.
शुनाक ह्यांनी ऋग्वेदाच्या काही भागाचे लिखाण केलेले आहे. शौनकचा अजून एक अर्थ विद्वान असा देखील आहे.
4 Jan 2012 - 5:58 pm | जाई.
+१११
31 Dec 2011 - 9:42 pm | पक पक पक
'अव्यक्त' तुम्हाला हवी असलेली माहिती मिळाली आहे........
31 Dec 2011 - 10:36 pm | अत्रुप्त आत्मा
शौनक या शब्दाचा अर्थ मलाही माहित नाही..(किंबहुना माझा असा कयास आहे,की या नामाचा विशेष असा काहि अर्थ निघणारच नाही) पण या ऋषींनी ऋग्वेदाच्या आश्वलायन सूत्र प्रणीत शाकल शाखेतील कर्मकांडाचे अनेक प्रयोग(पूजा/यज्ञयाग इ.) निर्माण केलेले आहेत. वास्तुशांतिचा 'प्रयोग' यांचाच... :-) तेंव्हा धार्मिक क्षेत्रातले हे एक विद्वान ऋषी आहेत,एवढं नक्की.
31 Dec 2011 - 11:16 pm | अव्यक्त
एवढी माहिती पुरे ना!
@ (पैसा) ज्योतीजी, आपल्या प्रतीसादाकरिता धन्यवाद... अजून माहिती असल्यास मंडळ आभारी राहील !
युत्पत्तीशोधक अव्यक्त
1 Jan 2012 - 7:37 pm | पक पक पक
आता काय संपुर्ण पुराण ऐकायचे आहे का तुम्हाला...?
3 Jan 2012 - 11:38 pm | रेवती
असं बोलू नका.
या निमित्ताने तरी ते व्यक्त झालेत.;)
3 Jan 2012 - 10:37 pm | सुनिल पाटकर
वेदाचा शिक्षक हे बरोबर आहे .
4 Jan 2012 - 3:14 pm | विनायक प्रभू
पुढच्या नावासाठी यॅड्वान्स बुकींग केंव्हा?
4 Jan 2012 - 6:18 pm | आत्मशून्य
अभिनंदन.