मदत हवी आहे...
...पुत्ररत्नाची प्राप्ती होणे हा काय सुखद अनुभव असतो ह्याचा प्रत्यय मला नुकताच सुखावून गेला...मला वसुबारस, रमा एकादशी ह्या शुभ मुहूर्ती पुत्र रत्नाची प्राप्ती
झाली...आता नाव काय ठेवायचं हा यक्षप्रश्न माझ्या समोर उभा ठाकला...बर्रीच नावे पालथी घातली...पण एक नाव पसंतीस उतरेल तर शप्पथ.. बरयाच द्राविडी
प्राणायामानंतर एक नाव पसंतीस उतरले...मी माझ्या सुपुत्राचे नामकरण "चि. शौनक" केले. पण बरयाच जणांना हे नाव अपरिचित होते.अगदी आप्तांना सुद्धा...
मलाही शौनकची दोनच उदाहरणे ठाऊक होत्ती.....१. विद्वान ऋषी (शौनक), २.शौनक अभिषेकी (स्वरसुर्य जितेंद्र अभिषेकी यांचे सुपुत्र)..सगळे शौनक ह्या नावाचा
अर्थ काय होतो अशी विचारणा करू लागले पण माझ्याकडे ह्या दोन उदाहरणापलीकडे काही खुलासा करू शकलो नाही...मग माझ्या वाचनात नर्मदेतला गोटा ह्यांचे
'नावात काय आहे' मी.पा. वरचा लेख पाहण्यात आणि वाचण्यात आला..आणि माझ्या आशा पल्लवित झाल्या.. मला मी.पा. ( ह्या विद्वान व सुज्ञ लोकांचा वावर असणाऱ्या) संकेतस्थळावर माहितीचा आधार मिळू शकेल अस्सं वाटल्यामुळे हा पत्रप्रपंच.. (बुडत्याला काडीचा आधार म्हणतात ना हिब्रूमध्ये...) तर चला दाबा कळ आणि नोंदवा आपली प्रतिक्रिया पटकन....अगदी धो-धो पाऊस पडू द्यात प्रतिक्रियांचा....आणि मला मदत करा...शौनकचा एक नाही अनेक अर्थ सांगण्याचा...मग
काय ? माझा मी. पा. वरील आधाराचा विश्वास सार्थ ठरवाल ना ?
तळटीप: 'नावात काय आहे' ला प्रतिसाद देणाऱ्या मी. पा. करांनी देखील भरभरून प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती..
वाचने
3989
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
'शौनक'..छान नाव ठेवलत मुलाच
एका ऋषीचं
In reply to एका ऋषीचं by पैसा
सही...एकदम छान माहिती दिलीत
In reply to एका ऋषीचं by पैसा
ऑ ?
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
शौनकचा अजून एक अर्थ विद्वान
'अव्यक्त' तुम्हाला हवी असलेली
शौनक या शब्दाचा अर्थ मलाही
एवढी माहिती पुरे ना! @ (पैसा)
In reply to एवढी माहिती पुरे ना! @ (पैसा) by अव्यक्त
आता काय संपुर्ण पुराण ऐकायचे
In reply to आता काय संपुर्ण पुराण ऐकायचे by पक पक पक
असं बोलू नका. या निमित्ताने
वेदाचा शिक्षक
नाव
:)