'पहाटे ओरड पाहिजे तेवढे-'
कोंबडी म्हणाली कोंबड्याला,
'ऐकावी लागणार दिवसभर
नंतर पक् पक् माझी तुला !'
मांजर निघाले घाईघाईत
शिकार उंदराची करायला -
आडवा आला माणूस नेमका
परतावे लागले मांजराला !
मुंगळयाने पाहिली गुळाची ढेप
निघाला तुरुतुरु खायला -
मधेच एक माशी शिंकली
माणसाच्या पायाखाली आला !
एक खेकडा सकाळी उठला
पूर्वेकडून पश्चिमेला निघाला -
संध्याकाळ होईपर्यंत
उत्तरेला नेमका पोहोचला !
प्रतिक्रिया
31 Dec 2011 - 12:27 am | पाषाणभेद
हा हा हा मस्त चारोळ्या आहेत
31 Dec 2011 - 12:47 pm | निश
लय भारी मस्त चारोळ्या आहेत
31 Dec 2011 - 1:28 pm | वैशाली माने
छान!
31 Dec 2011 - 3:05 pm | अत्रुप्त आत्मा
वा विदेसराव वा..! अत्यंत मजेशीर आहेत... विशेषत: मुंगळ्याची -वाचताना तर अगदी टॉम&जेरी प्रमाणे प्रसंग उभा राहतोय डोळ्यासमोर... झकास..झकास...!