हाती कळ्याच माझ्या

मकरन्दबेहेरे's picture
मकरन्दबेहेरे in कलादालन
15 Dec 2011 - 11:28 pm

हाती कळ्याच माझ्या सजवून साथ गेली
फुलवून त्या कळ्यांना उमलून रात गेली

आता कशास होती संवाद गूज गोष्टी
करुनी मुक्या मुक्याने सहजात बात गेली

होते नभात तेव्हा अगणित लाख तारे
दावून ती दिशाही कोन्यात वात गेली

झाली युगा युगांची शेजेत भेट जेव्हा
लाजून ती निशाही अडवून हात गेली

हरलो कसा कळेना गाफील राहिलो मी
माझी प्रियाच तेव्हा देऊन मात गेली

बेहेरे मकरंद
११०२६०११

गझल

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

16 Dec 2011 - 12:09 am | अत्रुप्त आत्मा

रचना छान आहे...पण ती टाकताना- गल्ली चुकलं कि वो तुम्ही...

प्रभाकर पेठकर's picture

18 Dec 2011 - 9:06 am | प्रभाकर पेठकर

होते नभात तेव्हा अगणित लाख तारे

'अगणित' म्हणजे ज्यांचे गणित मांडता येणार नाही असे. त्यामुळे त्याच्याच पुढे, तार्‍यांचे गणित मांडणारे, 'लाख' हे विशेषण तर्कशास्त्रात बसत नाही. तिथे 'लाख' ऐवजी 'लख्ख' हे विशेषण टाकल्यास हा दोष दूर करता येईल. कारण लख्ख हे विशेषण तार्‍यांच्या तेजाचे वर्णन करणारे आहे.

दावून ती दिशाही कोन्यात वात गेली

हे वाक्य काही कळले नाही.

बाकी कविता छान आहे.