अहमदाबाद - चीन आणि गुजरात सरकारच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एशिया इंटर-डाय-एग्झिबिशनमध्येही नरेंद्र मोदींची लोकप्रियता दिसून आली.
येथे उपस्थित पाकिस्तानी उद्योगपतींमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी आणि त्यांच्यासोबत उभे राहून फोटो काढण्यासाठी चढाओढ दिसून आली. यावेळी मोदींनी आपल्या कोणत्याही चाहत्याला निराश होऊ दिले नाही. त्यांनी सर्वांना पर्सनल ऑटोग्राफ तर दिलेच, शिवाय त्यांच्यासोबत फोटोही काढून घेतले.
अहमदाबाद येथे ‘रंगीत रसायन निर्मिती उत्पादनाचे' आशिया खंडातील सर्वात मोठे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात संपूर्ण आशिया खंडातून ४५० उद्योगपतींनी भाग घेतला.
या उद्योगपतींमध्ये पाकिस्तानी उद्योगपतींचाही समावेश होता. यावेळी पाकिस्तानी उद्योगपतींनी मोदी यांना कराची मेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीजचे स्मृतिचिन्ह भेट रुपात दिले. महात्मा गांधी यांनी जुलै १९३४ साली या संस्थेचे भूमिपूजन केले होते.
ही बातमी वाचल्याव्र (तथाकथीत) सेक्यूलर लोकांची काय प्रत्रीक्रीया असेल??????
आर्थीक क्षेत्रातील तज्ञ याच्यावर काय प्रतिक्रीय देतील????????????
प्रतिक्रिया
10 Dec 2011 - 3:27 am | गणपा
प्रदर्शन कुठे होते? अहमदाबाद ना? म्हणजे अपनेही गली में.
वहाँ तो हर...... भी शेर होता है अशी काहीशी म्हण आहे ना?
छे बॉ हल्ली फार विसमरण होते. वाढत्या वयाचा प्रभाव.
माझ्या मते मोदींनी हैद्राबाद, लखनौ इथुनच काही भाड्याची मंडळी बोलावली असतील. आणि चिनी म्हणुन मुंबईतील चायनीज ठेल्यावरची आणि संकुलात रात्रपाळी करणार्या गुरेखे मंडळींना आवताण धाडलं असणार नक्कीच.
10 Dec 2011 - 8:04 am | कापूसकोन्ड्या
म्हणजे
@ गणपा मला उपरोध कळाला नसेल तर माफ करा.
अगदी हद्द झाली. मोदी फोबिया
आता कराची मध्ये पण मोदींची माणसे आहेत असा प्रचार करा
10 Dec 2011 - 8:19 am | कापूसकोन्ड्या
10 Dec 2011 - 9:19 am | सोत्रि
ह्या धाग्याचे प्रयोजन नाही कळले?
हा सगळा पैशाचा खेळ असतो चिंका. उद्योगपती जिथे फायदा असणार तिथे असणारच.
चार पाकिस्तानी लोकांनी तेही उद्योगपती, जे 'एशिया इंटर-डाय-एग्झिबिशन' साठी आले होते, त्यांनी मोदींबरोबर फोटो काढले तर त्यात काय बिघडले. त्या एग्झिबिशनचे आयोजक गुजरात सरकार होते, आणि त्या सरकारचा मुख्यमंत्री या नात्याने कोणी त्यांच्याबरोबर फोटो काढले तर लगेच त्यात 'पाकिस्तानी लोकांना' आकर्षण असा अनर्थ काढायची गरज नसावी असे मला वाटते. शीर्षकावरून सगळा पाकिस्तान मोदींचा चाहता आहे असे सूचित होत आहे.
अतिशय निरर्थक प्रश्न. बादरायण संदर्भ लावण्याचा प्रयत्न. प्रत्येक गोष्टीकडे पाकविरोधी चष्मा लावून बघितले की असे होते.
हा, आता हा मामला पूर्णतः 'अर्था'शीच निगडीत ( ते गुगळ्यांचे निगडी नव्हे ;) ) असल्यामुळे आर्थिक आहे, पण त्यावर आर्थीक क्षेत्रातील तज्ञांनी प्रतिक्रिया द्यावी असे काही फार आहे असे मला वाटत नाही. फारतर ह्या घटनेचे विश्लेषण करता येऊ शकेल भारत-पाक आर्थिक-संबंधांवर.
असो, चिंका हा धागा पटला नाही.
- (पुरोगामी) सोकाजी
10 Dec 2011 - 12:49 pm | सुहास झेले
ह्येच म्हणतो....
साखर तिथे मुंग्या :) :)
11 Dec 2011 - 1:11 am | दादा कोंडके
या बातमी नुसार मोदींना कराची चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने मोदींना निमंत्रण पाठविले आहे.
10 Dec 2011 - 9:47 am | पक पक पक
हे देखील 'आवान्तर्'आहे असे वाटते.........
10 Dec 2011 - 10:21 am | अप्रतिम
टुकार धागा.
10 Dec 2011 - 11:18 am | चिंतामणी
आणि आपला एखादातरी "अप्रतिम" धागा येइल ही आशा.
:) :-) :smile:
10 Dec 2011 - 12:59 pm | गेंडा
असे म्हणत ४० आठवडे गेले.
आता तुमी येक जंक्शन धागा काडुन दाखवाच. समदे म्हनले पायीजेत की "अप्रतिम"
11 Dec 2011 - 7:33 pm | श्रावण मोडक
मोदींनी पवारांचं कौतूक केलं ते अलीकडेच. त्यामुळं... ;)
12 Dec 2011 - 1:13 am | चिंतामणी
ही बातमी वाचा.
आता काय म्हणणार????? 8) 8-) :cool:
12 Dec 2011 - 8:03 am | सुनील
"अहो रुपम् अहो ध्वनि" ह्या सुभाषिताची आठवण आली!
12 Dec 2011 - 10:12 am | श्रावण मोडक
+१
12 Dec 2011 - 10:56 am | चिरोटा
ही चढाओढ स्वतःचा धंदा वाढवण्यासाठी असते.स्वतःची छबी,प्रतिमा सुधारण्यासाठी असते. उद्या अंबानी,बजाज कराचीत गेले तरी असेच करतील. सध्या ब्रॅन्ड गुजरातचे काम चालु आहे असे वाटते. वरील बातमी आल्यानंतर टाइम्स ऑफ इन्डियामध्ये भारतिय शहरांचा एक 'सर्वे' आला. त्यात अहमदाबाद हे सर्व महानगरांमध्ये राहण्यास अधिक योग्य असल्याचा निष्कर्षे काढला होता.
अर्थात राज्यकर्त्यांना असे ब्रॅन्डिंग अधूनमधून करावेच लागते. गुजरातेत अनेक उद्योग उभे राहत आहेत हे चांगलेच आहे.
12 Dec 2011 - 12:20 pm | परिकथेतील राजकुमार
मोदींमध्ये चे. सु. गु. दिसले.