✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पाकिस्तानींनाही आहे नरेंद्र मोदींचे आकर्षण

च
चिंतामणी यांनी
Sat, 12/10/2011 - 02:08  ·  लेख
लेख
अहमदाबाद - चीन आणि गुजरात सरकारच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एशिया इंटर-डाय-एग्झिबिशनमध्येही नरेंद्र मोदींची लोकप्रियता दिसून आली. येथे उपस्थित पाकिस्तानी उद्योगपतींमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी आणि त्यांच्यासोबत उभे राहून फोटो काढण्यासाठी चढाओढ दिसून आली. यावेळी मोदींनी आपल्या कोणत्याही चाहत्याला निराश होऊ दिले नाही. त्यांनी सर्वांना पर्सनल ऑटोग्राफ तर दिलेच, शिवाय त्यांच्यासोबत फोटोही काढून घेतले. अहमदाबाद येथे ‘रंगीत रसायन निर्मिती उत्पादनाचे' आशिया खंडातील सर्वात मोठे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात संपूर्ण आशिया खंडातून ४५० उद्योगपतींनी भाग घेतला. या उद्योगपतींमध्ये पाकिस्तानी उद्योगपतींचाही समावेश होता. यावेळी पाकिस्तानी उद्योगपतींनी मोदी यांना कराची मेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीजचे स्मृतिचिन्ह भेट रुपात दिले. महात्मा गांधी यांनी जुलै १९३४ साली या संस्थेचे भूमिपूजन केले होते. ही बातमी वाचल्याव्र (तथाकथीत) सेक्यूलर लोकांची काय प्रत्रीक्रीया असेल?????? आर्थीक क्षेत्रातील तज्ञ याच्यावर काय प्रतिक्रीय देतील????????????
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3594 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

बनावट

गणपा
Sat, 12/10/2011 - 03:27 नवीन
प्रदर्शन कुठे होते? अहमदाबाद ना? म्हणजे अपनेही गली में. वहाँ तो हर...... भी शेर होता है अशी काहीशी म्हण आहे ना? छे बॉ हल्ली फार विसमरण होते. वाढत्या वयाचा प्रभाव. माझ्या मते मोदींनी हैद्राबाद, लखनौ इथुनच काही भाड्याची मंडळी बोलावली असतील. आणि चिनी म्हणुन मुंबईतील चायनीज ठेल्यावरची आणि संकुलात रात्रपाळी करणार्‍या गुरेखे मंडळींना आवताण धाडलं असणार नक्कीच.
  • Log in or register to post comments

अगदी हद्द झाली. मोदी फोबिया

कापूसकोन्ड्या
Sat, 12/10/2011 - 08:04 नवीन
म्हणजे @ गणपा मला उपरोध कळाला नसेल तर माफ करा. अगदी हद्द झाली. मोदी फोबिया आता कराची मध्ये पण मोदींची माणसे आहेत असा प्रचार करा
  • Log in or register to post comments

ही घ्या लिन्क

कापूसकोन्ड्या
Sat, 12/10/2011 - 08:19 नवीन
  • Log in or register to post comments

प्रचंड असहमत

सोत्रि
Sat, 12/10/2011 - 09:19 नवीन
ह्या धाग्याचे प्रयोजन नाही कळले? हा सगळा पैशाचा खेळ असतो चिंका. उद्योगपती जिथे फायदा असणार तिथे असणारच. चार पाकिस्तानी लोकांनी तेही उद्योगपती, जे 'एशिया इंटर-डाय-एग्झिबिशन' साठी आले होते, त्यांनी मोदींबरोबर फोटो काढले तर त्यात काय बिघडले. त्या एग्झिबिशनचे आयोजक गुजरात सरकार होते, आणि त्या सरकारचा मुख्यमंत्री या नात्याने कोणी त्यांच्याबरोबर फोटो काढले तर लगेच त्यात 'पाकिस्तानी लोकांना' आकर्षण असा अनर्थ काढायची गरज नसावी असे मला वाटते. शीर्षकावरून सगळा पाकिस्तान मोदींचा चाहता आहे असे सूचित होत आहे.
ही बातमी वाचल्याव्र (तथाकथीत) सेक्यूलर लोकांची काय प्रत्रीक्रीया असेल??????
अतिशय निरर्थक प्रश्न. बादरायण संदर्भ लावण्याचा प्रयत्न. प्रत्येक गोष्टीकडे पाकविरोधी चष्मा लावून बघितले की असे होते.
आर्थीक क्षेत्रातील तज्ञ याच्यावर काय प्रतिक्रीय देतील????????????
हा, आता हा मामला पूर्णतः 'अर्था'शीच निगडीत ( ते गुगळ्यांचे निगडी नव्हे ;) ) असल्यामुळे आर्थिक आहे, पण त्यावर आर्थीक क्षेत्रातील तज्ञांनी प्रतिक्रिया द्यावी असे काही फार आहे असे मला वाटत नाही. फारतर ह्या घटनेचे विश्लेषण करता येऊ शकेल भारत-पाक आर्थिक-संबंधांवर. असो, चिंका हा धागा पटला नाही. - (पुरोगामी) सोकाजी
  • Log in or register to post comments

+ १

सुहास झेले
Sat, 12/10/2011 - 12:49 नवीन
ह्येच म्हणतो.... साखर तिथे मुंग्या :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

तसं वाटत नाही.

दादा कोंडके
Sun, 12/11/2011 - 01:11 नवीन
या बातमी नुसार मोदींना कराची चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने मोदींना निमंत्रण पाठविले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

वहाँ तो हर...... भी शेर होता

पक पक पक
Sat, 12/10/2011 - 09:47 नवीन
हे देखील 'आवान्तर्'आहे असे वाटते.........
  • Log in or register to post comments

टुकार धागा.

अप्रतिम
Sat, 12/10/2011 - 10:21 नवीन
टुकार धागा.
  • Log in or register to post comments

हे ही दिवस जातील.

चिंतामणी
Sat, 12/10/2011 - 11:18 नवीन
आणि आपला एखादातरी "अप्रतिम" धागा येइल ही आशा. :) :-) :smile:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्रतिम

भाउ, हे ही दिवस जातील.

गेंडा
Sat, 12/10/2011 - 12:59 नवीन
असे म्हणत ४० आठवडे गेले. आता तुमी येक जंक्शन धागा काडुन दाखवाच. समदे म्हनले पायीजेत की "अप्रतिम"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्रतिम

सहज आठवलं म्हणून

श्रावण मोडक
Sun, 12/11/2011 - 19:33 नवीन
मोदींनी पवारांचं कौतूक केलं ते अलीकडेच. त्यामुळं... ;)
  • Log in or register to post comments

श्रा.मो.- थोडे विषयांतर होत आहे. तरीही

चिंतामणी
Mon, 12/12/2011 - 01:13 नवीन
ही बातमी वाचा. आता काय म्हणणार????? 8) 8-) :cool:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

अहो रुपम् अहो ध्वनि

सुनील
Mon, 12/12/2011 - 08:03 नवीन
"अहो रुपम् अहो ध्वनि" ह्या सुभाषिताची आठवण आली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

+१

श्रावण मोडक
Mon, 12/12/2011 - 10:12 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

लायनी

चिरोटा
Mon, 12/12/2011 - 10:56 नवीन
पाकिस्तानी उद्योगपतींमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी आणि त्यांच्यासोबत उभे राहून फोटो काढण्यासाठी चढाओढ दिसून आली
ही चढाओढ स्वतःचा धंदा वाढवण्यासाठी असते.स्वतःची छबी,प्रतिमा सुधारण्यासाठी असते. उद्या अंबानी,बजाज कराचीत गेले तरी असेच करतील. सध्या ब्रॅन्ड गुजरातचे काम चालु आहे असे वाटते. वरील बातमी आल्यानंतर टाइम्स ऑफ इन्डियामध्ये भारतिय शहरांचा एक 'सर्वे' आला. त्यात अहमदाबाद हे सर्व महानगरांमध्ये राहण्यास अधिक योग्य असल्याचा निष्कर्षे काढला होता. अर्थात राज्यकर्त्यांना असे ब्रॅन्डिंग अधूनमधून करावेच लागते. गुजरातेत अनेक उद्योग उभे राहत आहेत हे चांगलेच आहे.
  • Log in or register to post comments

हम्म

परिकथेतील राजकुमार
Mon, 12/12/2011 - 12:20 नवीन
मोदींमध्ये चे. सु. गु. दिसले.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा