काय, तोंडाला पाणी सुटलं की नाही नाव वाचुनच? :)
माझंही असच होतं खेकड्याचं नाव काढलं की. काल मस्त मोठ्ठे खेकडे मिळाले. म्हटल नेहमीच्या कालवणापेक्षा आज काही वेगळं करुन पहावं. मागे एका जालीय मैत्रीणीच्या जालनीशीवर तंदूर खेकड्याचे फोटो पाहिले होते. म्हटलं चला हेच करुन पहावं.
मंडळी तस ही पाककृती करायला एकदम सोप्पी कमी वेळ काढू आहे. पण तरी तुमच्याकडे वेळ मुबलक हवा. अहो चवीने खायचं तर तेवढी फुरसत हवीच. ;)
चला तर लागुया तयारीला......
साहित्यः
मोठे खेकडे. जेवढी माणसं असतील त्या प्रमाणात.
४ मोठे चमचे ताजं घट्ट दही.
३ मोठे चमचे तंदूर मसाला.
२ मोठे चमचे काश्मीरी लाल तिखटं. (वस्त्रगाळ केलं असल्यास उत्तम रंग येतो.)
मीठ चवीनुसार. (खेकडे गोडुस असतात त्या प्रमाणे कमी जास्त प्रमाण ठरवावे.)
२ चमचे तेल. (ऑलिव्हचं त्यातल्या त्यात हृदयासाठी बरं.)
कृती:
खेकड्याचं कवच काढुन त्याचे कल्ले (गिल्स्) काढुन टाकावे.वहात्या पाण्याखाली स्वछ धुवून घ्यावे.
फांगडे / नांग्या तोडून वेगळ्या कराव्या. खेकडे मोठे असतील तर मधो मध कापून २ तुकडे करावे.
खलबत्त्याच्या दांड्याने फांगडे किंचींत ठेचावे म्हणजे मीठ मसाला आत शिरू शकेल.
दही, मीठ, तेल, मसाला, लाल तीखट एकत्र करुन घ्यावं.
खेकड्याच्या प्रेत्येक तुकड्याला त्यात घोळवून नंतर फ्रीज (फ्रीजर्मध्ये नाही) मध्ये ३० मिनीटे मुरत ठेवावं.
अर्ध्या तासानंतर बेकिंग ट्रेला अॅल्युमिनियमची फॉईल लावुन त्यावर सर्व तुकडे पसरवून ठेवावे.
ओव्हन १८०° C वर तापमान ठेवून खेकडे अॅल्युमिनियमच्या फॉईलने झाकून १०-१५ मिनीटे शिजवावे
१०-१५ मिनीटांनंतर वरुन ठेवलेली अॅल्युमिनियम फॉईल काढुन टाकावी. आणि अजुन १०-१५ मिनीटे शिजवावे. मध्येच एकदा तुकडे वर खाली करुन बाजू बदलावी.
वरुन कोथिंबीर पेरुन आणि लिंबाच्या फोडींनी सजवून गरमा-गरम सर्व्ह करावं.
प्रतिक्रिया
10 Dec 2011 - 2:23 pm | चिंतामणी
लै भारी रे.
शेवटचे दोन फोटो तर जास्त कातील.
भौ, एक सांग. फ्रिजमधे ३० तास ठेवायचे??? :O :-O :shock:
10 Dec 2011 - 2:58 pm | गणपा
चुक नजरेस आणुन दिल्या बद्दल धन्यवाद. :)
३० मिनीटे हवं. बदल केले आहेत.
10 Dec 2011 - 2:28 pm | इंटरनेटस्नेही
मार डाला!
10 Dec 2011 - 4:42 pm | सुहास झेले
मी हा धागा बघितला नाही, मी कमेंट करणार नाही ;)
तू ग्रेट आहेस यार... ग्रेट :) :)
10 Dec 2011 - 5:31 pm | स्वाती२
यम्मी!
10 Dec 2011 - 6:35 pm | सोत्रि
गणप्या,
कुठे फेडशील रे ही पापं? च्यायला हे बघून जीव गेला ना लेका!
तु लेका भारतात येउच नकोस. आलास की तु किडनॅप झालास म्हणून समज. :)
तुझ्या बायकोची मजा आहे रे, असला 'सुगरण' नवरा मिळायला भाग्य लागतं ;)
- (भयंकर जळजळ झालेला) सोकाजी
10 Dec 2011 - 7:31 pm | प्रभाकर पेठकर
खेकडा हा जलचर प्राणी आपल्या चविष्ट पाककृतीने आणि अप्रतिम छायाचित्रांच्या जोडीने अमर झाल्यागत वाटतो आहे.
त्याची ती, शेवटच्या चित्रातील, हात जोडून केलेली, 'या आणि मला खा' ही विनवणी , मनाला फारच अनावर करणारी आहे.
अभिनंदन.
10 Dec 2011 - 9:17 pm | इरसाल
मित्रा,
( खत्रा पाकृ, प्रचंड आवडले, शेवटचा फोटोचा रंग एकदम भारी चढलाय)
का उगाच छळत आहेस मार्गशीर्षात ?
आजच मासे खायचा योग जुळत होता पण मार्गशीर्ष आडवा आला ना !
10 Dec 2011 - 9:21 pm | जागु
गणपा आता उद्याच मार्केट मध्ये जाऊन खेकडे आणावे लागतील.
अम्हाला एकदा वरच्या खेकड्या पेक्षा दुप्पट मोठा खेकडा मिळाला होता. तो आम्ही आख्खा चुलीत निखार्यावर भाजला होता. एकदम जबराट.
10 Dec 2011 - 9:49 pm | सानिकास्वप्निल
खल्लास!
फोटो एकदम जबरा आले आहेत
पाकृबद्दल काय बोलणार, नेहेमीप्रमाणे झकास आहे :)
तोंपासु
10 Dec 2011 - 9:54 pm | विशाखा राऊत
का का का असा छळवाद करत आहात..
कधी नव्हे ते शनिवारी लॉगईन केले आणि नेमका तंदुरी खेकडा..
नेहमीप्रमाणे कौतुकाचे सगळे शब्द लिहिले असे समजावे. जबर्दस्त रेसेपी. :)
10 Dec 2011 - 10:14 pm | गणपा
स्वारी मंडळी पण खरच कुणाला जळवण्यासाठी वा छळण्यासाठी ह्या पाककृत्या देत नाही.
एखादा पदार्थ जर बरा जमला तर तुमच्या सोबत शेयर करावा इतकाच प्रांजळ उद्देश आहे. :)
10 Dec 2011 - 11:12 pm | सोत्रि
गणापाभौ,
ह्याला म्हणतात "तोंड दाबून बुक्क्यांचा मार"!
आमची जळजळ हीच आहे, काही केल्या असलं बरं जमतच नाही. :(
- (हा प्रदिसाद देउन इनो घेतलेला) सोकाजी
10 Dec 2011 - 11:15 pm | मोहनराव
अप्रतिम!! खेकडेही धन्य झाले असतील आपण गणपाच्या हाती जाणार म्हणुन!!
10 Dec 2011 - 11:36 pm | जाई.
झकास
रविवाराची मस्त सोय
10 Dec 2011 - 11:38 pm | पिंगू
धन्य ते गणपाशेफ आणि धन्य ते खेकडे... :)
- पिंगू
11 Dec 2011 - 1:13 am | कौशी
खुपच आवडली..
11 Dec 2011 - 1:47 am | धनंजय
भारीच दिसतायत.
(म्हणजे दह्यात कालवलेल्या कुठल्याही मसाल्याला हीच पाककृती लागू करता येईल, असा विचार करतो आहे... माझ्या घरी तंदूरी मसाला साधारणपणे नसतो.)
11 Dec 2011 - 10:21 am | बाप्पा
कुठलासा मराठी महिना चालु आहे त्यमुळे बायको अभक्श भक्शण करु देत नाइए... फोटु बघुन तर वेड लागलंय...
(महीना काय कुत्रा आहे , पाळायला..)
11 Dec 2011 - 10:49 am | चिंतामणी
हा हा हा
यावरून एक विनोद आठवला.
डॉ.विजय मल्ल्या यांचा जनतेला संदेश-
कुत्रा पाळा.
घोडा पाळा.
गाढव पाळा.
ससे पाळा.
वाघ सिंहसुद्धा पाळा.
पण श्रावण (सध्या मार्गशीष) नका पाळु.
11 Dec 2011 - 11:48 am | अत्रुप्त आत्मा
आला आला गणपाभौंचा खादाडी-लेख हा आला
स्वतःच्या पायांनी चालत चालत खेकडा अमर झाला... :-)
11 Dec 2011 - 4:33 pm | jaypal
सोकाजिराव मी तुम्हाला सुपारी देतो (एकदा कराच किडनॅप )
11 Dec 2011 - 7:00 pm | मयुरपिंपळे
थंडी मधे हे खायला आवडेल... गणपा! अंडा बुरजी ची पाककृती कधी मिळेल ? :)
12 Dec 2011 - 11:14 am | खादाड
वेळ घेणारा पण चवदार पदार्थ !! रस्सा बनवला आहे !!!पण तंदुरी ट्राय करावाच लागेल व्याप कमी दीसतो आहे ह्यात !!
12 Dec 2011 - 11:26 am | गौरी१२
खुप सहज आणि सोपी करून लिहिता. तुमच्या सगळ्या पाककृती आवडतात.. :)
खेकड्याची पाककृती सुद्धा मस्त आहे. मी अशीच चिकन टाकून करू शकते ना ?
पण इथे माझा प्रश्न असा आहे कि आपण खेकड्याचे बाहेरचे कवच काढून टाकतो. मग खेकड्याच्या आत त्या मसाल्यची चव कशी लागणार ?
12 Dec 2011 - 12:38 pm | गणपा
खेकड्याचे वरचे कवच याचसाठी काढायचे की आत थोडा तरी मसाला लागावा.
तसही बनवताना बराचसा मसाला आणि खेलड्यातला रस खाली बेकिंग ट्रे मध्ये उतरतो. तो टाकुन देऊ नये.
डिपिंग सॉस म्हणून त्याचा उपयोग करावा. :)
12 Dec 2011 - 2:12 pm | परिकथेतील राजकुमार
अतिशय निरस आणि भिकार पाकृ.
फटू मध्ये तर नक्की काय आहे ते पण दिसत नाहीये. उगाच कै च्या कै लिहायचे म्हणून लिहीले आहे.
खलबत्त्याचा दांडा ?
खल वेगळा आणि बत्ता वेगळा असतो. त्या दांड्यालाच बत्ता म्हणतात.
लिखाणात तशा अजून बर्याच चूका आहेत म्हणा, पण गणपा हा मिपाचा बाब्या असल्याने गप्प बसावे लागत आहे.
12 Dec 2011 - 4:11 pm | स्वाती दिनेश
मस्तच रे गणपा, लई भारी!!
ए परा.. होतात अशा किरकोळ चुका ,, विशेषतः खेकडे खायची घाई असली की..
स्वाती
12 Dec 2011 - 5:56 pm | कानडाऊ योगेशु
शाकाहारी असुनही केवळ गणपाची पा.कृ म्हणुन धाग्याला भेट दिली.
चित्रे,विवेचन नेहेमीप्रमाणेच सुंदर.
जाता जाता: खेकडेरावांना आमच्याकडुन श्रध्दांजली. :)
13 Dec 2011 - 4:13 pm | सुहास..
दंडवत !!
लोटांगण !!
ग्रेट !!
तुस्सी ग्रेट हो पाजी !
13 Dec 2011 - 7:27 pm | प्रभाकर पेठकर
तुस्सी ग्रेट हो पाजी !
पाजी नाही प्राजी.
'पाजी' हा शब्द मराठीत शिवी सारखा वापरला जातो तर 'प्राजी' शब्द पंजाबी भाषेत मोठ्या भावाला संबोधन म्हणून वापरला जातो.
मला वाटतं आपल्याला पंजाबी 'प्राजी' अभिप्रेत आहे.
13 Dec 2011 - 7:31 pm | सुहास..
तुस्सी ग्रेट हो पाजी !
पाजी नाही प्राजी.
'पाजी' हा शब्द मराठीत शिवी सारखा वापरला जातो तर 'प्राजी' शब्द पंजाबी भाषेत मोठ्या भावाला संबोधन म्हणून वापरला जातो.
मला वाटतं आपल्याला पंजाबी 'प्राजी' अभिप्रेत आहे. >>.
तुम्हाला पण दंडवत पेठकर काका ! ;) ( प्रतिसादाला बुच मारले, आता संपादित ही करता येईना ! )
गणपा भौ स्वारी बरका ! काका धन्यवाद !!
13 Dec 2011 - 4:15 pm | सुहास..
कात्री मारली आहे !
13 Dec 2011 - 4:27 pm | चिगो
व्वा वा.. खेकडा ह्या चविष्ट प्राणी-पदार्थाची जरा उशिराच ओळख झाली, पण मला लै आवडतो..
आता पा़कृ साठवून ठेवतो.. ओव्हन आल्यावर केल्या जाईल..
गणपाशेठ, साष्टांग नमन तुमच्या पाक-कलेला..
13 Dec 2011 - 4:41 pm | गवि
पाकृ छान आहे. पण खेकड्याचा ताटात ठेवताना टण असा आवाज येतो, त्यामुळे टेस्टी असूनही आवडत नाही.. ते आतले काढून कोणी दिले किंवा बिन कवचाचा भाग कालवणत असेल तर आवडते..
एरवी हाटेलात मोठा खेकडा मागवल्यास "टूलकिट"च येते त्याच्या तोडफोडीसाठी... केवढी ती हत्यारे..पकडी, सांडशा, एकेका पंजातला अन नळीतला आतला गर काढायला टोचे अन आकडे..
एक ग्रॅम खाद्यभागासाठी दहा ग्रॅम कचरा आजुबाजूला..
काही गैरसमज असल्यास दूर करणे... :)
(खेकडाप्रेमी कलिग्जसोबत जेवणे चापणारा) गवि.
13 Dec 2011 - 4:57 pm | गणपा
अहो गवि म्हणुन तर तुमच्या सारख्या खवय्यांसाठी क्रॅब मीट आयत हजर असत बाजारात. :)
पण जातीच्या खेकडे खाणार्याला त्यात मजा यायची नाही.
(कृपया येथे गैरसमज करुन घेउ नये. :))
13 Dec 2011 - 5:02 pm | गवि
धन्यवाद.. :)
आता इथे क्रॅब मीट शोधणे आले..
14 Dec 2011 - 5:58 am | रेवती
आता इथे क्रॅब मीट शोधणे आले
काळजी नको. पराला विचारा.
त्याला दुकाने माहित आहेत.
चला, आता पर्याला शेधणे आले असे मात्र म्हणू नका.:)
14 Dec 2011 - 9:10 am | प्यारे१
>>>>चला, आता पर्याला 'शेधणे' आले असे मात्र म्हणू नका.
इथें 'शेंधणे' वाचलं आणि फुटलो. ;)
13 Dec 2011 - 5:33 pm | सुहास..
पण जातीच्या खेकडे खाणार्याला त्यात मजा यायची नाही. >>
लई वेळा सहमत !! शिवाय मासेप्रेमी खेकडा असाच खातो :)
गणपाशेठ तु क्रॅबसुप टाका एकदा !
13 Dec 2011 - 5:44 pm | वेताळ
मला वरील फोटो दिसत नाही. तसेच मला ते दाखवायचा देखिल कुणी प्रयत्न करु नये.
14 Dec 2011 - 9:12 am | प्यारे१
>>>>काथ्याकूट भावपूर्ण श्रध्दांजली पुण्याचे वटवाघूळ
>>>>पाककृती तंदूरी खेकडे / क्रॅब्स् गणपा
हे असं का दिसतंय मला? ;)