नमस्कार "मिपा" कर आणि मिपा चे समस्त वाचक !
तात्यांनी वर पु.ल.,पंडीत भीमसेन जोशी,कुसुमाग्रज आणि बाबूजी यांच्या फोटोसोबत गुरुपौर्णिमेची एक छान सुरुवात करून दिलीच आहे , त्याचीच जाणीव म्हणून मी मागे लिहिलेला एक लेख माझ्या हस्ताक्षरात इथे प्रसिध्द करत आहे. ही माझी तमाम समाजाला गुरु म्हणून विनम्र अशी मानवंदना आहे ! ज्या भारतीय समाजाने माझ्यावर अतोनात प्रेम केलं त्यांचं हे ऋण कधीही न फिटणारं आहे याची जाण मला काल होती, आज आहे आणि आमरण राहील !
आपण मला इथेही भेटू शकता :
कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com/
आणि
कवितांजली : http://uday-sapre.blogspot.com/
कळावे लोभ आहेच तो वृध्दिंगत व्हावा ही विनंती !
आपला विनम्र,
उदय सप्रेम
प्रतिक्रिया
18 Jul 2008 - 11:44 am | विसोबा खेचर
सुंदर आहे लेखन...!
18 Jul 2008 - 11:58 am | सहज
लेख आवडला.
18 Jul 2008 - 12:34 pm | अनिल हटेला
छान आहे लिखाण !!
हस्ताक्षरात असल्याने जास्त आवडला....
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
18 Jul 2008 - 3:31 pm | बाजीरावाची मस्तानी
मूळ लेखाची सत्यप्रत आणि लेखकची एकूणच जिज्ञासा लक्षणीय आहे....
असेच चालू ठेवा....
आपल्या..चान्गल्या भाग्याची अपे़क्षा करते...
कडून,
बाजीरावाची मस्तानी.
(मीच लय भारी...)
18 Jul 2008 - 3:41 pm | बिपिन कार्यकर्ते
उदय, किती छान लिहिले आहेस? अप्रतिम. तुझ्या लेखातल्या बहुतेक सर्व व्यक्ति मला चांगल्या आणि जवळून माहिती असल्याने अजून वाचनिय झाला लेख. आपल्या त्या वेळच्या गोरेगावात खरोखर वातावरण किती वेगळे होते ना? काही फारच थोर थोर मंडळी अगदी साधेपणाने वावरताना बघितली आहेत. हॅट्स ऑफ...
((बहुतेक) सरवटे मावशींचा शेजारी) बिपिन.
18 Jul 2008 - 9:12 pm | उदय सप्रे
बिपीन , ही तर आणखीनच चांगली गोष्ट झाली की तू सरवटे मावषींच्या बाजूचा (स्नेहवर्धिनी मधील !) , डॉ.सुबोध दफ्तरदार माझा पर्ले कॉलेजचा क्लासमेट !.....
18 Jul 2008 - 4:41 pm | शितल
तुम्ही खुप छान आणी भावस्पर्शी झाले आहे.
तुमच्या आईची आणि तुमची जीद्द ही वाखणण्याजोगी आहे.
:)
18 Jul 2008 - 9:27 pm | मदनबाण
हेच म्हणतो..
मदनबाण.....
18 Jul 2008 - 4:49 pm | अमोल केळकर
वा मस्त
गुरुपौर्णिमेनिमित्त लिहीलेला लेख आवडला . आपल्याला घडवण्यात ज्यांचा हातभार लागला आहे त्यांचे यानिमित्याने स्मरण करणे अत्यंत स्तुत्य.
आज ऑफीस मधे बसुन अरामात एक्स्पोर्ट मार्केटिंग चे काम करत असताना
आठवतात ते उमेदीच्या काळात केलेले मार्केटिंग. यातुन मिळणारे अनुभव ही आपल्याला खुप काही शिकवुन जातात.
दारावर विक्रिसाठी येणारे सेल्समन, लोकल मधे माल विकणारी मुले , त्यांच्यातील चिकाटी, नकार पचवण्याची ताकत, जिद्द हे गुण शिकण्यासारखे.
अमोल
--------------------------------------------------
गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा !!
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
18 Jul 2008 - 5:49 pm | वरदा
उदय..ह्या सगळ्या मदत करणार्यांची आठवण ठेवणे आणि त्यांचे स्मरण करणे हा खरच सुंदर उपक्रम
तुमच्या आईची आणि तुमची जीद्द ही वाखणण्याजोगी आहे.
हेच म्हणते...
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
18 Jul 2008 - 5:58 pm | प्रियाली
काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या. सप्रे नावाच्या एक बाई पुरणपोळ्या करत असे आठवते परंतु पुढले काही आठवत नाही. हेमंत लेले हे नाव ऐकल्यासारखे वाटते पण नेमके आठवत नाही. नाईकवाडीतल्या केतकरसरांबद्दलही ऐकले आहे. प. बा. सामंत आणि कुसुमताईंबद्दल पुढे काही सांगायलाच नको.
असो, लेख अतिशय आवडला. आपल्या मातोश्रींची धूसर मूर्ती डोळ्यासमोर येते आहे, पण चेहरा नेमका आठवत नाही. त्याहीपेक्षा त्यांच्या पुरणपोळ्या आठवतात. माझ्या आईने कधी घेतल्या नसाव्यात परंतु गोरेगावात इतरांच्या घरी काही कार्यक्रमांना, सणासुदीला खाल्लेल्या आठवतात.
18 Jul 2008 - 9:10 pm | उदय सप्रे
प्रियाली जी,
आई अजूनही पुरणपोळ्या करते , माझी आई म्हणून नाही सांगत पण खरोखरच आईच्या हातच्या पुरणपोळ्या ज्यांनी खाल्ल्या ते सांगतात "अशी दुसरी नाही!"एक लहान मुलगा त्यच्या आईला एकदा म्हणाला,"आई, यावेळी तू दुसरीकडून आणल्या आहेस पुरणपोळ्या , सप्रेंच्या पुरणपोळ्या ओठांनी खाता येतात !" या मुलाचे वय होते त्यावेळी ४ वर्षे ! तो अजूनही येतो ! अंधेरीला रहातात .....
केतकर सर हे माझे श्रध्दास्थान आहे !
सामंत लोकांबध्दल लेखात लिहिले आहेच , मला समस्त सामंत लोकांबध्दल नितांत आदर आहे ! यात डॉ.जगदीश सामंत , डॉ.अश्विन सामंत (हा मला १ वर्ष पार्ले कॉलेज्मधे जूनियर , पण एकदम मस्त मुलगा !)......
तरी जागेअभावी किती नावे लिहिली गेली नाहीत , त्यांचा मी आजन्म ऋणी राहीन !
उदय सप्रेम
18 Jul 2008 - 9:59 pm | प्रियाली
या सर्व सामंत फॅमिलीबद्दल गोरेगावात आदर न बाळगणारा कोणी मिळणार नाही, नाही का?
सन्मित्र शाळेला मी कशी कोण जाणे विसरून गेले आणि एकदम अ.भि. लक्षात आली.
19 Jul 2008 - 11:14 am | उदय सप्रे
प्रियाली जी,
तुम्हाला डॉ.अश्विन सामंत १ वर्ष पार्ले कॉलेजला जूनियर असेल तर तुम्ही पार्ले कॉलेजला माझ्याच बॅचच्या आहात असे दिसते - १९८२.तुमचे आताचे नाव काय आणि पूर्वाश्रमींचे नाव काय्?मी एफ डिविजनला होतो.म्हणजे धनंजय जोशी, पारिजात चितळे, ह्या मुलांच्या डिव्हिजन ला.
असो, सामंत लोकांशी आमचा कित्येक वर्ष जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
तुमच्या उत्तराची वाट पहात आहे.
तुम्ही गोरेगांवात कुठे रहात होतात किंवा रहाता?माझे हेड ऑफिस (आई) अजूनही गोरेगांवातच आहे आणि ब्रँच ऑफिस ठाणे (मी रहातो) आणि मार्केटिंग ऑफिस बोरिवली येथे आहे (जेथून जावयाचे फुकट मार्केटिंग होते .....).....
उदय सप्रेम
18 Jul 2008 - 6:03 pm | मनस्वी
छान आणि मनापासून लिहिलं आहे.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वरा|
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम:||
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
18 Jul 2008 - 6:33 pm | शिप्रा
खुप छान लिहिले आहे...तुमच्या आणी आईच्या जिद्दिला माझा सलाम..
जिथे कमी तिथे आम्ही ..:)
18 Jul 2008 - 7:30 pm | आनंदयात्री
सुंदर लिहलय उदयराव, आवडले.
18 Jul 2008 - 9:44 pm | प्राजु
अगदी मनापासून लेखन करता. असं वाटतं की, हा लेख नसून आपण समोर बसून सांगताहात. छान ... आवडला लेख. आपल्याला गुरूस्थानी असणार्यांच्या चरणी माझाही नमस्कार.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/