बेवडे

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
16 Jul 2008 - 10:22 pm

स्वातीताईंची पावले ही सुंदर कविता वाचली आणि आम्हाला आमची वाकडी तिकडी पडणारी पावले आठवली
बेवडे
.

पिता पिता बेवडे
थांबतात,
थकतात,
कि कानोसा घेतात..

आपल्याच सभोवतालचा!

पिता पिता बेवडे
अडखळतात,
मागे बघतात,
कि चाचपतात. .

आपल्याच खिश्याला!

पिता पिता बेवडे
शिणतात,
वैतागतात,
कि विचार करतात..

"ते पिता आहेत,
कि पाजवली जात आहे याचा!"

पिता पिता बेवडे
चाचपतात,
विचार करतात,
कि पडताळून पहातात..

"दु:ख आहे म्हणून..
ते पितात,
कि ते पितात म्हणून..
दु:ख आहे?"

पिता पिता बेवडे
थांबतात,
अडखळतात,
कि विचारी बनतात!!!

====================
आपला केशवसुमार................२००८

विडंबन

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

16 Jul 2008 - 10:42 pm | ऋषिकेश

हं.. चांगले आहे. विडंबन आवडले

-(पिता नसलेला) ऋषिकेश

प्रियाली's picture

16 Jul 2008 - 10:44 pm | प्रियाली

हे काव्य बेवड्यांवर आहे का वडिलांवर (पिता) हे कळायला जरा कठीण गेले. ;) ह. घ्या.

केसु, विडंबनांचा कारखाना जोरात दिसतोय.

चतुरंग's picture

16 Jul 2008 - 11:40 pm | चतुरंग

विडंबन अनलिमिटेड्.इंकॉर्पोरेटेड?!!

केशवा, आता तुझी काव्यप्रतिभा अंमळ तापली आहे, आता 'अनिरुद्ध अभ्यंकरला' बाहेर काढ आणि एखादी फर्मास गजल टाक बघू! एकदम वरीजिनल!! :)

चतुरंग

केशवसुमार's picture

16 Jul 2008 - 11:50 pm | केशवसुमार

रंगाशेठ,
त्याच काय आहे तो बाहेर आला की सगळे शब्द घाबरून पळून जातत
(व्यथित)केशवसुमार
स्वगतः ह्या रंग्याची डेरिंग वाढलीय हं :W , डायरेक्ट मलाच कच्चामाल मागतोय :O

चतुरंग's picture

16 Jul 2008 - 11:55 pm | चतुरंग

'अनिरुद्ध अभ्यंकर' सलामत तो विडंबन पचास! :)

चतुरंग

वरदा's picture

17 Jul 2008 - 12:29 am | वरदा

त्या स्वातीताईंनी कविता करायला घेतल्यापासून केसुंनी तर फडशा पाडलाय एका एका कवितेचा....विडंबनं छान आहेत्..पण
ते अभ्यंकरांना म्हणावं आम्ही गझलेची खूपच वाट पहातोय...प्लीज लिहा ना लोकाग्रहासाठी.. :)

"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

धनंजय's picture

17 Jul 2008 - 12:36 am | धनंजय

अभ्यंकरांची दर्जेदार गझल वाचून फार दिवस झालेत. त्यांनीही लिहावे.

केशवसुमार's picture

17 Jul 2008 - 9:06 pm | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)केशवसुमार

प्रकाश घाटपांडे's picture

17 Jul 2008 - 9:22 pm | प्रकाश घाटपांडे


पिता पिता बेवडे
थांबतात,
अडखळतात,
कि विचारी बनतात


अहो टाकल्याव लई ल्वॉक इचारवंत बन्त्यात.
(समविचारी)
प्रकाश घाटपांडे

सर्किट's picture

17 Jul 2008 - 9:30 pm | सर्किट (not verified)

केसु, सुंदर विडंबन.

पण जरा लांबल्या सारखे वाटते ;-)

सहा गुण.

- (विचारवंत) सर्किट

पिवळा डांबिस's picture

17 Jul 2008 - 11:37 pm | पिवळा डांबिस

कविता सुंदर असली तरी,
मदिरेवर जाज्वल्य श्रद्धा असणार्‍या लाखो-करोडो भक्तांना "बेवडे" म्हणून त्यांच्या भावना दुखावल्याबद्द्ल आपला जाहीर निषेध!!!
[(

शाप देण्याच्या तयारीत,
श्री श्री श्री डांबिसमहाराज
महंत - लॉसेंजेलिसपीठ
मिसळपावसंप्रदाय
>:P

विसोबा खेचर's picture

18 Jul 2008 - 12:32 am | विसोबा खेचर

मदिरेवर जाज्वल्य श्रद्धा असणार्‍या लाखो-करोडो भक्तांना "बेवडे" म्हणून त्यांच्या भावना दुखावल्याबद्द्ल आपला जाहीर निषेध!!!

डांबिसा, तुझ्याशी सहमत रे! मीही हेच म्हणतो...!

त्रिवार निषेध..!

बाय द वे, मिसळपावसंप्रदाय हा शब्द आवडला! :)

तात्या.

केशवसुमार's picture

18 Jul 2008 - 3:07 am | केशवसुमार

श्री श्री श्री डांबिसमहाराजशेठ,
अता गाढवाला गाढव म्हणाचे नाही तर काय अश्वराज म्हणायचे का?
डांबिसाला डांबिस नाहितर काय डांबिसमहारज म्हणायचे का?
(अश्वराज)केशवसुमार

धनंजय's picture

18 Jul 2008 - 3:15 am | धनंजय

म्हणजे गाढवाला 'खर' म्हणायचं:
खरराज
खरवर
इ.इ.

बेसनलाडू's picture

18 Jul 2008 - 3:58 am | बेसनलाडू

चुकून खरवस वाचले;परत वाचता गाढव दिसले आणि खरवस अशक्य आहे हे जाणवले #-o
(खरवर)बेसनलाडू

पिवळा डांबिस's picture

18 Jul 2008 - 8:25 am | पिवळा डांबिस

पिता आणि बेवडे या चर्चेत हा गाढव कुठून काढलांत?
आणि गाढवाला गर्दभराज म्हणता येईल की....
अश्वराज फारतर घोड्याला म्हणता येईल....

बाकी डांबिसाला तुम्हाला योग्य वाटेल ते काहीही म्हणा हो, त्याला तुमचा राग नाही....

स्वप्निल..'s picture

18 Jul 2008 - 4:04 am | स्वप्निल..

केशवसुमार,

>>विडंबन अनलिमिटेड्.इंकॉर्पोरेट..

चालु द्या...मस्तच आहे..वरील मंदळींचे प्रतिसाद वाचुन वाटत आहे की आता गझल होउन जाउ द्या..

स्वप्निल..

अनिल हटेला's picture

18 Jul 2008 - 7:07 am | अनिल हटेला

"दु:ख आहे म्हणून..
ते पितात,
कि ते पितात म्हणून..
दु:ख आहे?"

मस्तच !!!!!!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~