जोगवा

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
18 Jul 2008 - 2:50 am

आमची प्रेरणा स्वातीताईंची कविता गोडवा

जोगवा
.

घडी भर असेच राहू, बदा बदा नको लिहू!
हातामधली लेखणी जरा, खाली उतरवून ठेवू!!

जलद विडंबकांचा, कसा आता सूड घेऊ!
नीती मती सोडून, प्रतिभेचा तळ गाठू!!

चल पुन्हा एकदा, वाचकांना 'पेन' देऊ!
आणि वर प्रतिसादाचा, जोगवा मागत राहू!!

=======================
केशवसुमार.............. १७-०७-२००८

विडंबन

प्रतिक्रिया

सर्किट's picture

18 Jul 2008 - 2:55 am | सर्किट (not verified)

बदा बदा: ८
प्रतिभेचा तळ : १०
'पेन' मधले मूळ कवितेचा श्लेष खुबीने विडंबनात वापरल्याबद्दल : १०
"घडी भर असेच राहू" ऐवजी गप्प राहू / शांत राहू असते, तर अर्धा मार्क जास्त दिला असता.

मुख्य म्हणजे मूळ कवितेच्या दुसर्‍या कडव्यातील यमकाचा घोळ जसाच्या तसा विडंबनात आणल्याबद्दल : १० !!

एकूण : ९.५

- सर्किट

केशवसुमार's picture

18 Jul 2008 - 10:04 am | केशवसुमार

०.५ मार्क गेलाच का! असो धन्यवाद!!
(आभारी)केशवसुमार
स्वगतः काय खडूस माणुस आहे हा .. :W केश्या ह्या माणसा कडून ७ च्या वर गुण मिळाले हेच नशिब समज :B

प्रियाली's picture

18 Jul 2008 - 2:58 am | प्रियाली

हा घ्या....प्रतिसाद!

चल पुन्हा एकदा, वाचकांना 'पेन' देऊ!
आणि वर प्रतिसादाचा, जोगवा मागत राहू!!

मानलं....

मुक्तसुनीत's picture

18 Jul 2008 - 3:02 am | मुक्तसुनीत

कसले पोपट विडंबन करताय ! ~X(

बेसनलाडू's picture

18 Jul 2008 - 3:13 am | बेसनलाडू

राखल्याबद्दल दुसरे कडवे माफ ;)
(इमानी)बेसनलाडू
शेवटचे कडवे खास!बदा बदा पण आवडले.
(जोगी)बेसनलाडू

वा वा तुझ्या जोगव्याचा गोडवा काही औरच हो केशवा! ;)

चतुरंग

आंबोळी's picture

18 Jul 2008 - 12:16 pm | आंबोळी

चल पुन्हा एकदा, वाचकांना 'पेन' देऊ!
आणि वर प्रतिसादाचा, जोगवा मागत राहू!!
हे जबरा !!

आंबोळी

विश्वजीत's picture

18 Jul 2008 - 1:31 pm | विश्वजीत

मजा आली.

स्वाती दिनेश's picture

18 Jul 2008 - 1:44 pm | स्वाती दिनेश

चल पुन्हा एकदा, वाचकांना 'पेन' देऊ!
आणि वर प्रतिसादाचा, जोगवा मागत राहू!!

हे लईच आवडले..
स्वाती

ऋषिकेश's picture

18 Jul 2008 - 2:12 pm | ऋषिकेश

लिहिलेलं छान आहे .... आवडलं.. पण मुळ कविता कुठाय? दुवा द्याल का?

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

ऋषिकेश's picture

18 Jul 2008 - 2:23 pm | ऋषिकेश

मिळाली मुळ कविता.. (वरीच खाली होती त्यामुळे वाचली नव्हती :) )
विडंबन पुन्हा वाचलं.. आता विडंबन म्हणूनही आवडलं :)

विडंबनकारांनो,
आपण फार जलद, घाऊक व सुंदर विडंबनं करताय हे निर्विवाद आहे. तरी वाचकांच्या सोयिसाठी (तरी) मुळ कवितेचा दुवा द्यावा ही विनंती..त्यामुळे विडंबनाचा अधिक आस्वाद घेता येईल

- ऋषिकेश

वरदा's picture

18 Jul 2008 - 5:57 pm | वरदा

हा घ्या प्रतिसाद....
जोगवा ची आयडीया सही....

"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

अभिज्ञ's picture

18 Jul 2008 - 8:07 pm | अभिज्ञ

अफाट विडंबन!!!!
विडंबन सम्राट केसु साहेब
आपल्या प्रतिभेला सलाम!!!!!!!!
विडंबन आवडले.

अभिज्ञ

मदनबाण's picture

18 Jul 2008 - 8:28 pm | मदनबाण

अगदी हेच म्हणतो..

मदनबाण.....

भाऊ ठाकुर's picture

19 Jul 2008 - 5:28 pm | भाऊ ठाकुर

केशव् सुमार, नाव बदला आता!

केशव 'तु'मार करा.

केवळ उत्तम!!

भाऊ

केशवसुमार's picture

19 Jul 2008 - 10:23 pm | केशवसुमार

प्रतिसाद देलेल्या आणि प्रतिसाद ना दिलेल्या सर्व वाचकांचे मनापाससून आभार!!
(आभारी)केशवसुमार

धोंडोपंत's picture

20 Jul 2008 - 7:08 am | धोंडोपंत

हा हा हा हा हा,

केशवा,

अजब काम आहे तुझे.

आपला,
(हसरा) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com