पक्षांची सकाळ (भाग - १)

जागु's picture
जागु in कलादालन
29 Nov 2011 - 11:51 am

दर रविवरी मी सकाळी कॅमेरा घेऊन टेरेसवर, अंगणात किंवा आमच्या बेडरुमच्या खिडकीत बसते. कारण ह्या वेळी पक्षी कोवळे उन अंगावर घेण्यासाठी झाडांच्या फांद्यांवर बसायला येतात. इतर दिवशी फांदिवर बसायला आणि कॅमेरा हातात असायला योगायोग जुळून आला तर एखादा पक्षी कॅमेर्‍याच्या पिंजर्‍यात अडकतो. माझ्याबरोबर माझी मुलगीही तोंडावर बोट ठेउन निरिक्षण करते. कारण तिला माहीत आहे जर आपण आवाज केला तर पक्षी उडून जाणार. तर ही थोडक्यात पक्षांची सकाळ

सुरुवात पुष्पदेऊन म्हणजेच सोनकुसुमाने करते (इनरव्हिलच्या लागोपाठच्या कार्यक्रमांचा परीणाम :हाहा:)

१)

२) उठा उठा सकाळ झाली.

३) उठलो उठलो.

४) बाकीचे उठले का ?

५) धनेश

६) पोपट

७) निबंध लिहाव का ह्याच्यावर ?

८) हळद्या

९) काय म्हणताय राव ? घुबड

१०) आमच सकाळच भांडण झालय. - कोकिळ

११) मी नाहीच बोलणार.

१२) पाणकोंबडीची पिल्ले

१३) पाणकोंबडी

१४)

१५)

१६) ढोक / पेंटेड स्टॉर्क

हे पक्षी कोकणातल्या सकाळचे.
१७) पारवा

१८) सातभाई

१९) खाटीक (रूफस बॅक्ड श्राईक)
आमच्या घरासमोरच्या आवारात आला होता. टेरेसवरून फोटो काढला आहे. वेगळाच वाटला.

२१) हा ऑफिसला जातानाच्या रस्त्यावरच्या सकाळचा. सुगरण

२२) ही माहेरची सकाळ - पाणकावळा/कॉरमॉरंट

२३) हा कोतवाल आमच्याच केबलवरचा

२४) पनवेलमधील एका रिसॉर्ट मधील बदके

२५) हे इमू साहेब कोल्हापुरच्या सकाळचे

२६) हे साहेब रोज येतात पण फोटो काढायला भाव खातात. - भारद्वाज

२७) ह्या बुलबुलांचे २४ तास आमच्या घरात होते काही महिन्यांपुर्वी अगदी त्यांच्या बाळांसकट

२८)

ज्यांची मी नावे नमुद केली नाहीत त्यांची जाणकारांनी द्यावीत ही विनंती. अजुन २-३ पक्षी भाव खातात त्यामुळे त्यांचे फोटो टाकायचे राहीलेत. पण किती दिवस भाव खातील येतीलच कधीतरी कॅमेर्‍यात.

छायाचित्रण

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

29 Nov 2011 - 11:56 am | मदनबाण

अरे वा... बरेच पक्षी कॅमेर्‍याच्या पिंजर्‍यात कैद झालेले दिसत आहेत. :)
पोपटाचा दुसरा फोटो आहे ना तो...झोप अनावर झाली आहे असं वाटतं त्याच्याकडे पाहुन! ;)

फोटो आणि त्यावरच्या तुझ्या काँमेँटसही मस्त आहेत जागुतै

अन्या दातार's picture

29 Nov 2011 - 11:57 am | अन्या दातार

सॉल्लिड आहेत फोटो. पहिल्या चित्रात पोपट अंमळ कावल्यासारखाच दिसतोय (उगा सकाळी सकाळी इच्छा नसताना उठल्यासारखा)
२८ क्र.चा फोटो नक्की कशाचा आहे?

मदनबाण, जाई धन्यवाद.

अन्या ती बुलबुलची पिले आहेत. आमच्या झुंबरामध्ये बुलबुलने अंडी उबवली होती. त्याच्यावरचा लेखही मी आधी टाकला होता. लोकसत्ताच्या वास्तुरंगमध्येही प्रकाशीत झाला होता.

शिल्पा नाईक's picture

29 Nov 2011 - 12:35 pm | शिल्पा नाईक

बिच्चारा पोपट, जागुताईवर 'उपकार' म्हणून उठलाय जणू

कुंदन's picture

29 Nov 2011 - 1:12 pm | कुंदन

अरे वा !
सगळेच फोटो छान आलेत.

इकडे मात्र पाखरे संध्याकाळी बाहेर पडतात. ;-)

वाहीदा's picture

29 Nov 2011 - 1:20 pm | वाहीदा

जागुताई ,आय एम फिलींग डय़ाम एनव्हियस अबाऊट यू नाऊ !! रानावनात भटकायला तसाही तुला छान वेळ मिळतो आता रानातच घर बांधलंस का ग टुमदार ? :-)
... आम्ही आपले अडकलो आहोत ऑफीसात क्लायंट कोड-डिलेवरीच्या चक्रात :-(

तुझा ला लेख मस्तच !! :-)

गणपा's picture

29 Nov 2011 - 1:26 pm | गणपा

धन्य आहे बाई तुझी.
अरे निसर्गाने काय दान दिलय हिला.

जागु's picture

29 Nov 2011 - 3:47 pm | जागु

शिल्पा, कुंदन, गणपा धन्यवाद.

वहीदा मी नाही ग कुठे रानात क्वचीत कधीतरीच जाते. आमच्या भवतीच्या परीसरात झाडे आहेत त्यावरच हे पक्षी येतात.

फास्टरफेणे's picture

29 Nov 2011 - 4:15 pm | फास्टरफेणे

सगळे फोटू मस्त!
१६ व्या फोटोतला पक्षी ओपन बिल्ड स्टॉर्क आहे...

पेंटेड स्टॉर्क (चित्रबलाक) असा दिसतो -

५० फक्त's picture

29 Nov 2011 - 4:17 pm | ५० फक्त

जबरदस्त फोटो आहेत सगळे, एवढ्या जवळ आहात तुम्ही निसर्गाच्या मला तुमचा प्रचंड हेवा वाटतो आहे.

मिपावर आल्याचा हा एक मोठा तोटा झाला आहे, ब-याच लोकांचा हेवा वाटायला लागतो अन आधीच छोटं करुन घेतलेलं हे आयुष्य बरंच काही करायला अजुन छोटं पडेल याची भिती वाटायला लागते,

गणपा, वल्ली, सानिकास्वप्निल, मृणालिनी, रामदास काका, गवि, मदनबाण आणि अजुन बरेच, किती नावं घ्यावीत, एवढ्या सगळ्यांचा हेवा करायचा म्हणजे माझं एक आयुष्य कमी पडणार नक्कीच.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Nov 2011 - 4:45 pm | अत्रुप्त आत्मा

वाहवा...तुमच्या आजपर्यंच्या सगळ्या अश्या धाग्यांमधला हा दी बेस्ट आहे जागु ताई...दी बेस्ट

तो 'धनेश' म्हणजे कर्ज वसुली अधिकाय्रासारखा व्यक्तिमत्वानीच भेदक दिसतोय,हळद्या,७भाइ आणी सुगरण हे पक्षीसृष्टीमधले व्यक्तिविशेष म्हणावेत असे वाटते...पण कोतवाल बाकी अगदी पक्का कोतवालच हो ... त्याच्या नजरेतनं आणी जरबेतनं कुणी सुटेल....?....काय बिशाद आहे ...? कस्टम ऑफिसवर हा जर का लावला त्या स्वगोत्रजांना हा आधी धरेल,,,मग बाहेर ड्युटी...! वा वा धन्य झालो याच्या दर्शनानी... :-)

मन१'s picture

29 Nov 2011 - 5:03 pm | मन१

इतके सगळे पक्षी दिसतील तिथे येउन प्रत्यक्ष पहावेत अशी इच्छा होते आहे.
हर्षदरावांशी(५० फक्त) तर भलताच सहमत.
इथं नुसतं वाचूनही, नुसता जागता वावर ठेवूनही खूप काही कमावता येतं हे मला आवडतं.

चिगो's picture

29 Nov 2011 - 5:03 pm | चिगो

खुप सुंदर फोटोज आहेत.. माझ्याकडेपण पोपटांचे (आणि नेपाळी म्हणतात त्या पक्ष्याचे, ह्याला गुलाबी झाक असते थोडी) फोटोज होते, पण दुर्दैवाने ते उडाले.. फोटोज, पक्षी नाही.. ;-)

सर्वच पक्षांचे फोटो छान आलेत.
तुमच्या घराच्या आसपास इतके पक्षी दिसतात ते पाहून नवल वाटलं.खरच खूप लकी आहात तुम्ही.

अतृप्त आत्मा छान वर्णन करता तुम्ही.

मन, चिगो, मानस धन्यवाद.

दीपा माने's picture

30 Nov 2011 - 5:23 am | दीपा माने

जागू,
सुंदर फोटो आले आहेत. डोळ्यांनाही मेजवानी दिलीस.

प्रचेतस's picture

30 Nov 2011 - 8:36 am | प्रचेतस

सुंदर फोटो.
तुमच्या निसर्गाच्या ओढीला सलाम.

जागु's picture

30 Nov 2011 - 12:27 pm | जागु

दिपा, वल्ली धन्यवाद.

गणपा's picture

30 Nov 2011 - 2:21 pm | गणपा

हे माझ्या कडे असलेले काही फोटो.
कुणाला यांची नावं माहीत असतील तर हवी आहेत.

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

गणपा मस्तच फोटो. त्यांची नावे माहीत आहेत का ?

अगं नावंच तर हवी आहेत.
ईथे अनेक दिग्गज आहेत. म्हटलं कुणी मदत करतय का पाहु. :)

गणपा ४ नंबरचा कोतवाल वाटतोय आणि शेवटचा फ्लेमींगोची कुठलीतरी जात असेल.

फास्टरफेणे's picture

1 Dec 2011 - 7:01 pm | फास्टरफेणे

हे परदेशी पक्षी दिसताहेत...४ नंबरचा कोतवाल नसावा, जागुतैंच्या फोटोतल्या कोतवालाची शेपटी बघा आणि ह्याची बघा...फरक लगेच कळेल...(गणपांच्या "कोतवालाने" शेपटीची पिसे गोल कातरुन घेतली असल्यास कल्पना नाही ! :) )

प्रभाकर पेठकर's picture

1 Dec 2011 - 2:55 pm | प्रभाकर पेठकर

जागु आणि श्री. गणपा ह्यांनी करुन दिलेली पक्षीजगताची ओळख फारच मनोहारी आहे. अभिनंदन.

आमच्या हाती कॅमेरा असतो तेंव्हा पक्षी गायब असतात. पक्षी दिसतात तेंव्हा कॅमेरा हाती नसतो. दुर्दैव दुसरे काय....!

पक्ष आणि पक्षी वेगवेगळे आहेत. ;) छायाचित्रे सुंदर !

सुंदर , फारच छान फोटो.
बाकि पक्षांची सकाळ म्हणजे वैताग , बादली भर पाण्याने गाडी धुवुन काढणे एवढच समीकरण होत.

वीणा३'s picture

6 Dec 2011 - 3:37 am | वीणा३

मस्त फोटो

शिल्पा ब's picture

6 Dec 2011 - 8:23 am | शिल्पा ब

भारी फोटो आहेत...अन गणपाने काढलेले सुद्धा भारी आहेत. आवडले.

संदीप चित्रे's picture

6 Dec 2011 - 9:44 pm | संदीप चित्रे

नीडलेस टू से दॅट टेक इट अ‍ॅज अ कॉम्प्लिमेंट :)
(मराठीचा अभिमान, प्रेम इ. सारे काही आहे पण हे वाक्य इंग्लिशमधेच भावना पोचवतं !!!)