सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
26 Nov 2011 - 6:02 pm | विनायक प्रभू
२६/११, आग आणि क्रिकेट मधील सो कॉल्ड पराभव एकाच तागडीत?
26 Nov 2011 - 6:18 pm | सुहास झेले
कैच्याकै....
26 Nov 2011 - 6:23 pm | चिंतामणी
अती क्रिकेट बघावे कशाला.|( \( :angry:
26 Nov 2011 - 7:56 pm | आत्मशून्य
.
26 Nov 2011 - 8:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कालचा खेळ संपला तेव्हा कसोटी अनिर्णीत राहील असे वाटले होते. आणि कसोटी अनिर्णीतही राहीलीही.
पण आपण नेहमीप्रमाणे जिंकता जिंकता सामना अनिर्णीत ठेवला. जिंकण्याची सर्वात चांगली संधी आजच्या सामन्यात आपल्याला होती. पण क्षणाक्षणाला सामना रंग दाखवत गेला. एक क्षण असे वाटायला लागले की, आपला आता पराभव होतो. एकदा वाटायला लागले की आपला विजय सहज आहे. पण मजा आली. कसोटी क्रिकेट रंगतदार होईल असे वाटत नसते. पण काही क्रिकेट कसोटी सामने मजा आणतात. दोन दिवसापूर्वी आफ्रिकी आणि ऑष्ट्रेलियाचा सामना असाच रंगतदार झाला. आजचा सामना असाच होता. पण, आज खर्या अर्थाने जिंकले ते विंडीज.
आपण जिंकु शकलो नाही त्याची माझी कारणे अशी :
१) सेहवागचा बेजवाबदारीने मारलेला रिव्हर्स स्वीप. बॅटीच्या कडेला बॉल लागला. पण गरज नव्हतीच.
२) लक्ष्मणचा बेजवाबदार फटका. ऑफ साईडचा चेंडूला जाग्यावरुन फाईन लेगला खेळण्याचा अजब फटका.
३)अश्विनने शेवटच्या काही षटकादरम्यान ष्ट्राइक स्वतःकडे ठेवायला पाहिजे होते.
४)तीन षटकात तीन खेळाडू बाकी होते आणि फक्त नऊ धावा हव्या होत्या. अशा वेळी टुचुटुचु खेळण्याची अवसान घातकी फलंदाजी.
५) शेवटच्या चेंडुवर मोठ्या फटक्याची गरज असतांना दुसरी धाव घेण्यासाठी अश्विन पिसाळलेला कुत्रा मागे लागला आहे, असे समजून धावला असता तर दुसरी धाव पूर्ण करुन विजय मिळवला असता. पण क्रिकेटमधे जर तरला तसंही काही महत्त्व नसतं.
असो, कसोटी क्रिकेटने मजा आणली.
-दिलीप बिरुटे
27 Nov 2011 - 2:07 pm | शेखर काळे
पराभव ? अनिर्णित सामना जिंकू शकलो नाही म्हणून ?
आणि एक साधा खेळ आणि २६/११ चा भीषण हल्ला या दोन गोष्टी एकाच मापाने कशा तोलू शकता येतात?
28 Oct 2021 - 11:28 am | शशिकांत ओक
रविवार २४ ऑक्टोबर २०२१ ची टी२० स्पर्धेतील पाकिस्तान भारत लढत
पहिल्या ओव्हरमधे रोहित शर्मा आणि के एल राहूलची दांडी गुल झाली... खेळाचे तंत्र बिघडले ते बिघडले... पंड्या आला न खांदा चोळत परतला... गोरटेल्या शाहीन आफ्रीदीने विराटला खाकोटीला मारले... १५१ मधे संपला डाव...
नाबाद १५२ रन्स काढून भारतीय गोलंदाजीची पिसे काढली... आणि १० विकेट्सनी भारताचा दारुण पराभर झाला खरा...