जीवाला जप तुझ्या, त्यात जीव माझा गुंतला आहे
निम्मा रस्ता इतक्यातच संपला आहे
पुढच्या वळणावर राहू परत उभे
हातात हात घालून जाऊ सोबत दोघे
जीवाला जप तुझ्या, त्यात जीव माझा गुंतला आहे
सावर सगळे काळजीने, आयुष्य जग आनंदाने
पुढचा रस्ता खुप खडतर आहे
जीवाला जप तुझ्या, त्यात जीव माझा गुंतला आहे
फिरुनी सोबत जगण्यासाठी उमेद ठेव जराशी
उमेदिसोबत शारीर न झुकणार आहे
जीवाला जप तुझ्या त्यात जीव माझा गुंतला आहे
प्रतिक्रिया
23 Nov 2011 - 1:36 pm | प्रचेतस
आनंदी आनंद गडे,
तुमच्याच कविता चोहीकडे
23 Nov 2011 - 2:16 pm | अत्रुप्त आत्मा
+१ टु वल्ली....
इतक्या ठिकाणी ;-) इतका जीव गुंतवु नका हो.. नंतर त्रास होइल त्याचा तुम्हाला... आणी अजुन असल्या कविता वाचायचा आंम्हाला... :-)
23 Nov 2011 - 5:14 pm | navinavakhi
माझ्या त्रासाची नका हो काळजी करू ..
हम्म, तुमच्या त्रासाची मात्र आम्ही काळजी घेऊ .. म्हणजे इथून पुढे कवितांचा पाऊस नाही पडू देणार. कसे !!
काय आहे न, मी आहे नवीनवखी;
त्यामुळे सुरुवातीला तरी अशा छोट्या मोठ्या चुका, मिपाकरांनी माफ कराव्यात, नाही का ???
23 Nov 2011 - 5:40 pm | अन्या दातार
दिल्या प्रतिक्रियेला जागाल अशी अपेक्षा व्यक्त करुन मी माझे दोन शब्द संपवतो
(अखिल मिपा हितवर्धक संघटनेच्या वतीने) अन्या