मी कोर्टात नोकरीला असताना मला समाजाच्या असा स्तरातील गुन्हेगारी जवळुन पहायला मिळाली ते पाहुन कोणत्या ही सहदय माणसाच्या डोळ्यातुन आश्रु नक्कीच येतील.
गरीबी अत्यत वाईट शाप दोन वेळेचे पोट भरल्यावर सगळी तत्वे जीवनात अगिकारली जातात. पोटाच्या भुके पुढे काही गोष्टी हतबल होतात.
मी कोर्टात जजची पी.ए. म्हणुन होते त्यामुळे सतत डायसवर असायचे त्यामुळे गुन्हेगार आणि त्याने केलेला गुन्हा कोणत्या परिस्थित झाला त्याची पार्श्वभुमी जाणुन घेण्याची सधी जवळुन मिळाली.
एकदा एका मजुराला एका चोरीच्या गुन्ह्यात समोर आणले. त्याच्याकडे पाहुन त्याच्या परिस्थितीची जाणीव होत होती आणि चोरीचा आरोप तरी कसला असेल तर साखर, तादुळ आणि तुरडाळ त्याने दुकानातुन चोरली होती. आता चोरी ही चोरीच ती छोटी असो वा मोठी प्रत्येक गुन्हयाला शिक्षा ही हवीच हा भाग वेगळा, पण जेव्हा आमच्या जज साहेबानी त्याला बोलते केले तेव्हा त्याने जी गोष्ट सागितली त्यामुळे डोळे पाणावले.
अगोदरच कोकण भागात मजुरीला फारसा वाव नाही, त्याला ८ /९ महिण्याचा एक मुलगा होता,बायको पोटभर जेवण मिळत नसल्याने आजारी असायची, त्या त्याच्या लहानग्याला २ दिवस आईच्या दुधा शिवाय काही मिळाले नव्हते आणि त्या माऊलीच्या पोटात ही अन्न नसल्याने तीला दुध ही नाही. त्याचा लहानगा रडुन रडुन बेशुध्द व्हायचा बाकी होता, हा गुन्हेगार हतबल होता पैसा नसल्याने विकत काही घेता ही येत नव्हते, त्याच्याकडे पाहुन उधार ही कोणी देत नव्हते मग त्याच्यातील पिता त्याला स्वस्थ बसु देईना, म्हणुन त्याने साखर, तादळ आणि तुरडाळ चोरली होती. आणि तो त्यामध्ये सापडला होता, त्याला जामिन ही कोणी नव्हते त्यामुळे त्याची रवानगी जेल मध्ये झाली. त्याची बायको आणि लहानगा कोर्टाच्या बाहेर बसुन होते, आम्ही सगळ्या स्टाफने काही पैसे काढुन त्या बाईला दिले आणि आमच्यातील एका शिपायाने त्या बाळाला एक ग्लुकोज बिस्कीतचा पुडा आणुन दिला. तेव्हा तीच्या चेह-यावर झालेला आनद अजुन माझ्या चेह-या समोर आहे तीला पैसे दिल्या पेक्षा आपल्या मुलाला कोणी तरी खाऊ आणुन दिला हे समाधान दिसत होते आणि त्यामुळे तीचे अश्रु वाहत होते.
आमचे जज साहेब ही माणुसकी राखुन होते त्यानी मला त्याच्या केबिन मध्ये बोलावले आणि म्हणाले मला अन्नासाठी केलेली चोरी मनाला दुखावते, मी ह्या जजच्या नात्याने एका चोराच्या फेमिलीला मदत करू शकत नाही त्यावेळी त्याना थाबवत मी त्याना सागितले की आम्ही स्टाफने काही रक्कम आणि त्याच्या लहानग्याला खाऊ दिला आहे. तेव्हा त्याच्या चेह-यावर आपला स्टाफ बद्दल अभिमान वाटला हे लगेच दिसुन आले.
मी कोर्टात असताना अशी बरीच उदाहरणे पाहिली आहेत की पोट्याच्या भुकेसाठी आणि अधश्रध्दा ह्या गोष्टी साठी माणुस कोणत्या ही थराला जातो.
अशीच एक अधश्रध्दे मुळे एका काकाने आपल्या पुतण्याचा खुन केला होता एका मात्रिकाच्या सागण्यावरून.
त्या गुन्हेगाराला समोर आणले तेव्हा त्याच्या चेह-यावरील भाव इतके विचित्र होते कीत्याला ह्या गोष्टी बद्दल काहीच पश्चतावा झालेला दिसत नव्हता.
त्याला कोणत्या तरी मात्रिकाने सागितले नरबळी दिलास तर तुला गुप्त धन मिळेल ह्या गुन्हेगाराने मग आपल्याच घरातल्या मोठ्या भावाच्या मुलगा जो शाळेत इ. ४ होता त्याला सायकल वरून शाळेतुन मधुनच घेऊन आला आणि काकाच आला आहे न्यायला म्हटल्यावर हा मुलगा ही त्याच्या बरोबर गेला तर काकाने असे माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले. ज्याची एफ.आय.आर. वाचतनाही तळ पायाची आग मस्तकाला जात होती. पुढे त्या केस मध्ये त्यालाही कदाचित जन्मठेपची का फाशीची शिक्षा झाली हे आता आठवत नाही कारण असल्या केसचे निकाल डिस्ट्रीक, हाय कोर्ट ते सुप्रीम कोर्टा पर्यत फे-या मारून मग लागतात. त्यामुळे समाजात ह्या गोष्टीची भिती उरत नाही कारण लोकाच्या डोक्यातुन अनेक वर्षाने ही गोष्ट पुसट झालेली असते त्यामुळे त्याचे गाभिर्य रहात नाही आणि त्याला झालेली शिक्षा ही जसा गुन्हा पसरतो तशी पसरत नाही.
प्रतिक्रिया
16 Jul 2008 - 9:22 am | किर्ति
मला लेख खुप आवडला
आणि तुझा आभिमान हि वाटत आहे
16 Jul 2008 - 9:25 am | यशोधरा
>>गरीबी अत्यत वाईट शाप दोन वेळेचे पोट भरल्यावर सगळी तत्वे जीवनात अगिकारली जातात
खरं आहे शीतल.
16 Jul 2008 - 10:32 am | अनिल हटेला
ऑफ्कोर्स !!
शितल देवी,
शिक्षा ठोठवतान गुन्ह्यामागची पार्श्वभुमी जमेस धरावी
शिवाय वरील लेख वाचुन सुन्न झाल्या सारख वाटल...
बिन कामी कोर्टाच्या खेपा मीही मारल्यात....
त्यामुळे कदाचीत कोर्ट - कचेरी,पोलीस ह्याविषयी फार - फार वाइट अनुभव गाठीशी आहेत..
असो...
तुम्ही जज च्या पी ए होतात ..
मग तुम्हाला सिस्टीम चान्गली माहिती असेल....
मी उघड्या डोळ्यानी पाहिलये...
असो....
लेख मात्र छान आहे.....
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
16 Jul 2008 - 10:44 am | सूर्य
लेख आवडला. पार्श्वभुमी लक्षात घ्यावी हे मत लेख वाचुन अजुन पक्के झाले आहे.
- सूर्य.
16 Jul 2008 - 10:55 am | मनस्वी
शितल,
अशा प्रकारची नोकरी करताना एकदम खंबीर मन लागते. धन्य आहेस तू.
मला वाटतं की शिक्षा ठोठावताना गुन्ह्यामागची पार्श्वभुमी जमेस धरावी, पण तिच्या खरेपणाची पूर्ण शहानिशा करावी. नाहीतर उद्या कोणीही अट्टल गुन्हेगार खोटे चित्र उभे करून सुटेल.
तुझे अनुभव वाचायला आवडतील.
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
16 Jul 2008 - 2:26 pm | आनंदयात्री
खरेपणाची पूर्ण शहानिशा करावी. हे महत्वाचे.
16 Jul 2008 - 11:01 am | इनोबा म्हणे
शिक्षा ठोठावताना गुन्ह्याची पार्श्वभूमी लक्षात घेतली जातेच.
लेख वाचुन खरेच सुन्न झाल्यासारखे वाटले.
गरीबी अत्यत वाईट शाप दोन वेळेचे पोट भरल्यावर सगळी तत्वे जीवनात अगिकारली जातात
अगदी बरोबर
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
16 Jul 2008 - 11:06 am | विजुभाऊ
पैगंबर म्हणतात की न्याय आणि अन्याय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
एकाला दिलेला न्याय हा कोणावरतरी अन्याय करत असतो.
फाशी जाणाराची मुलेबाळे उघडी पडतातच की.
फासे पारध्यांच्यात एकदाही चोरी/ डाका न घातलेल्याचे लग्न होत नाही.
नैतीक / अनैतीक हे सापेक्ष असते.
अन्यथा तत्वासाठी लढणारा दहशवादी / आणि स्वातन्त्र सैनीक यात फरक कसा होऊ शकतो.
स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावह. किंवा जेहाद ही कल्पना कुराणातल्या इतर लोक भटकलेल्या मार्गाने जात आहेत त्याना योग्य मार्ग दाखव या वरुन आलेली आहे. काफिर ( मार्ग भटकलेले / अल्लावर श्रद्धा न ठेवणारा).
प्रत्येक वेळेस जर गुन्ह्याची पार्श्वभूमी लक्षात घेत बसले तर कायदा / नियम हा नाममात्र होईल आणि निवाडा देण्यार्याला काय भासले याला महत्व येईल.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
16 Jul 2008 - 11:15 am | विसोबा खेचर
अगोदरच कोकण भागात मजुरीला फारसा वाव नाही, त्याला ८ /९ महिण्याचा एक मुलगा होता,बायको पोटभर जेवण मिळत नसल्याने आजारी असायची, त्या त्याच्या लहानग्याला २ दिवस आईच्या दुधा शिवाय काही मिळाले नव्हते आणि त्या माऊलीच्या पोटात ही अन्न नसल्याने तीला दुध ही नाही.
पण ह्याला जबाबदार कोण? ज्या माणसाचं काहीही कयमस्वरुपी उत्पन्न आहे त्याने बायको, मुलगा या फंदात पडावंच का?
चोरी ती चोरी! आणि तिला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. इथे शितलला त्या माणसाबद्दल पुळका आहे असं वाटतंय, परंतु ज्या बिचार्याचं धान्य चोरीला गेलं त्याचा काय दोष? त्याला न्याय मिळायला नको का??
उद्या मी लग्न करेन, चार मुलांना जन्म देईन आणि त्याना पोसण्याकरता चोर्या करत सुटेन तर ते चालेल का?
अर्थात, माणुसकीच्या नात्याने तुमच्या स्टाफने त्या कुटुंबाला मदत केली हे कौतुकास्पद आहे परंतु त्या चोराचा पुळका गैर आहे असं मला वाटतं....
आपला,
(न्यायप्रेमी) तात्या.
16 Jul 2008 - 12:58 pm | छोटा डॉन
अगदी बरोबर तात्या ...
झालेल्या चुकीचे प्रायश्चित्त अथवा शिक्षा ही झालीच पाहिजे ...
मानवता, गुन्ह्यामागच्या पार्श्वभुमी या गोष्टी जमेस भरल्याच पाहिजेत त्या शिक्षा ठोठावताना ...
सरळसोट माफी देता येणार नाही .
म्हणतात ना "म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावता कामा नये" ...
जर गुन्हा हा "जाणुनबुजुन केलेली हत्या वा इतर काही" असेल तर बाकीच्या कुठल्याही गोष्टी जमेस न धरता शिक्षा ही क्झालीच पाहिजे. मग गुन्हेगार "कोकणातला फाटका गरिब असो वा माजोरडा मनु शर्मा या सलमान" असो.
त्याचे "सामाजिक स्थानही" विचारात घेण्यचे कारण नाही कारण गुन्हा करताना त्याचे "सामाजिक स्थान" त्याने वेशीवर टांगले असते व "कोण माझे बिघडवतो" ह्या माजोरडेपणाने गुन्हा केलेला असतो ...
जर "परिस्थीतीने हतबल" झालेल्याकडुन "स्वसंरक्षणार्थ" गुन्हा घडला असेल तर शिक्षा ठोठावताना थोडा शिथीलपणा आणता येईल पण माफ करता येणार नाही ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
16 Jul 2008 - 1:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पोटाची भूक भागवण्यासाठी गरिबाने वाण्याकडे चोरी करायची.
>> पण ह्याला जबाबदार कोण? ज्या माणसाचं काहीही कयमस्वरुपी उत्पन्न आहे त्याने बायको, मुलगा या फंदात पडावंच का?
कायमस्वरुपी उत्पन्न नाही म्हणून लग्न नाही केलं तर शरीराच्या भूकेसाठी आणखी कुठे डल्ला मारायचा का? गरीब असला तरी तोही माणूसच आहे. लग्न करूनही पुढे जबाबदारी कशी वाढणार नाही याची माहिती गरजू लोकांपर्यंत पोहोचतच नाही. धान्याच्या चोरीसाठी शिक्षा करणं हे त्या जागी ठीक आहे, पण तो कायमस्वरूपी उपाय नव्हे! अर्थात ही काही न्यायालयाची जबाबदारी नाही.
(गोंधळलेली) संहिता
16 Jul 2008 - 1:20 pm | छोटा डॉन
"भुक ही भुक असते" हे बरोबर पण त्याला "चोरी" हा उपाय कदापी होऊ शकत नाही ...
अहो हातापायाने "पांगळी / लंगडी" माणसे कष्ट करुन पोट भरतात व "जीवन नैय्या उस पार" लावतात मग ह्या "धडधाकट माणसांना" काय धाड भरली ???
मी उपाशी होतो म्हणुन मी चोरी केली हे त्याच्या अपराधाचे समर्थन होऊ शकत नाही ...
ह्याचीच पुढची पायरी म्हणजे "दरोडे, वाटमारी " असे गुन्हे ....
का हे पण "चालते" ह्या सदरात मोडतात ?
"माझ्याकडे घालायला कपडे नाहीत म्हणुन मी दरोडा घातला" हा युक्तीवाद होऊ शकतो का ?
त्याच्याऐवजी "कष्ट" करुन पोट भरन्याची बुद्धी का होत नाही ?
>>लग्न करूनही पुढे जबाबदारी कशी वाढणार नाही याची माहिती गरजू लोकांपर्यंत पोहोचतच नाही.
का बरे ?
ह्यात सांगण्यासारखे काय आहे ? स्वतःला जाणीव होत नाही का याची, डोक्याने अधु आहे का ?
अशा छोट्या छोट्या व कॉमनसेन्स असलेल्या गोष्टींची "माहिती गरजुंपर्यंत" पोहचवण्याचा आग्रह होत असेल तर ह्या "गरजा" पुर्ण करण्यासाठी "यादवी" होण्याचे दिवस लांब नाहीत.
>>धान्याच्या चोरीसाठी शिक्षा करणं हे त्या जागी ठीक आहे, पण तो कायमस्वरूपी उपाय नव्हे! अर्थात ही काही न्यायालयाची जबाबदारी नाही.
येस, यु सेड इट !!!
हेच त्याचे उत्तर, असे "तात्पुरते गुन्हेगारी" उपाय शोधण्यापेक्षा "कायमस्वरुपी यश " देणारा "कष्टाचा राजमार्ग" का नको वाटतो ?
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
16 Jul 2008 - 1:37 pm | कुंदन
पण भौ अमर्याद वाढती लोकसंख्या पाहता प्रत्येकाला नोकरी मिळणे अवघड आहे.
शिवाय रोजगार हमी सारख्या सर्वसामान्यांसाठी राबवल्या जाणार्या योजनांमधला भ्रष्टाचार ही पण अडचण आहेच.....
हे सर्व पाहता यादवी माजेल तो दिवस दुर नाही.
16 Jul 2008 - 2:04 pm | छोटा डॉन
नोकरीच का पाहिजे ?
उद्योगधंदे करा, शेती करा आणि काही करा पण कष्टाची भाकरी मिळवा ...
काही किमानकौशल्यावर आधारीत असणरे भरपुर कोर्सेस आहेत, त्यातनं आरामात पोट भरु शकेल की ...
जर त्या " सो कॉल्ड आरामाच्या आयटी जॉब" चे आकर्षण असेल तर " मन लाऊल शिका " की ...
सगळेच कसे आयते मिलेल ?
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
16 Jul 2008 - 2:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
छोटा डॉन, मला आपलं म्हणणं पटतं. पण असंही वाटतं की शिकलेल्या, सुस्थितीमधल्या पालकांच्या घरात जन्माला आले म्हणून मी एवढातरी विचार करु शकले/शकते. विचार आजूबाजूच्या परिस्थितीमुळेच (बय्राचदा) आहेत तसे होतात. पण विचारही करायला सुरुवातच होणार नाही एवढी भीषण परिस्थिती असेल तर काय करायचं? या गरीबाने सोपा (पण वेळ मारून नेणारा) मार्ग शोधला. प्राप्त परिस्थितीमुळे ज्यांची एवढी विचार करण्याची कुवतच नाही त्यांचा विचारही ज्यांची कुवत आहे त्यांनी करू नये का? (करणारे असतात म्हणूनच अण्णा कर्वे जन्माला आले आणि त्यांच्या कार्याला हातभार लावणारे तात्यापण!) गरीब माणूस कदाचित आपण म्हणता तसा विचारच करू शकत नाही म्हणून खूप पैसे मिळवू शकत नाही, म्हणून शिक्षण नाही, आणि म्हणून गरिबी पुढच्या पिढ्यांतही रहाते. प्रत्येक चोराला, गरिबाला आपली परिस्थिती बदलूच नये असं वाटत असेल का? या माणसाला असं वाटत असेल का की ज्या पोरासाठी मी चोरी केली त्यालाही माझ्यासारखंच आयुष्य मिळावं? नक्कीच नाही. पण असेल किती (टक्के) लोक आपण पहातो जे फार हलाखीतून सुस्थितीमधे आले आहेत?
(फक्त लेखणी आणि कळफलक चालवणारी) संहिता
16 Jul 2008 - 7:27 pm | टारझन
>>>जर त्या " सो कॉल्ड आरामाच्या आयटी जॉब" चे आकर्षण असेल तर " मन लाऊल शिका " की ...
असा विचार करणार्यांचा आम्ही निषेध करतो ! आय टी हे शारिरीक नाही मानसिक कष्टाचं काम आहे. आराम नक्कीच नाही.
बाकी डॉनराव आणि तात्यांच्या विचारांशी बिलकूल सहमत. ईंदूरीकर महाराज त्यांच्या किर्तनात म्हणतात "पोर्याला कमवायची अक्कल आल्याशिवाय त्याचं लग्न करू नये" आयला ... मी स्वता: जर त्या माणसाच्या ठिकाणी असतो तर कसलं पण काम करून माझ्या पोटाची आधी सोय केली असती... ये लग्न अन् पोर काढायची हुशारी नसतीच केली... चोरी ती चोरीच .. तो दुकानदार पण पोटात पोट काढून धंदा करतो... काय लुटवायंका त्याने ? अपराध्यांचा पुळका नको .. तात्यांशी सहमत
कुबड्या खवीस
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
16 Jul 2008 - 12:19 pm | छोट्या
पार्श्वभूमी लक्षात न घेउन कसे चालेल?
नाही तर खुन करणारा गुन्हेगार आणि त्याला फाशी देणारा जज यात फरक तो काय रहिला?
16 Jul 2008 - 1:24 pm | इनोबा म्हणे
पार्श्वभूमी लक्षात न घेउन कसे चालेल?
नाही तर खुन करणारा गुन्हेगार आणि त्याला फाशी देणारा जज यात फरक तो काय रहिला?
अगदी हेच म्हणतो. हे म्हणजे सूड घेतल्यासारखे झाले.
जर गुन्ह्याची पार्श्वभूमी न पाहता शिक्षा द्यायची तर मग स्वातंत्रसैनिक/क्रांतिकारी ही गुन्हेगारच ठरले की!
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
16 Jul 2008 - 1:59 pm | विसोबा खेचर
जर गुन्ह्याची पार्श्वभूमी न पाहता शिक्षा द्यायची
गुन्ह्याची पार्श्वभूमी न बघता शिक्षा द्यायची म्हणजे नक्की काय करायचं? गुन्हा हा गुन्हाच असतो!
त्या माणसाच्या बायकोमुलाकरता अन्नाची गरज होती म्हणून त्या धान्याची चोरी केली. उद्या माझ्या बायकोपोरांना पैशांची गरज लागेल म्हणून मी पैसे चोरायचे का? :)
मग स्वातंत्रसैनिक/क्रांतिकारी ही गुन्हेगारच ठरले की!
मल हा मुद्दा येथे अत्यंत गैरलागू वटतो! तो लढा देशाकरता होता, ब्रिटिश सत्तेची गुलामगिरी मोडून काढण्याकरता होता. स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारांनी जी काही कृत्ये केली ती देशाकरता होती, स्वत:च्या वैयक्तिक स्वार्थाकरता नव्हती! वैयक्तिक स्वार्थाकरता कुणा स्वातंत्र्यवीराने आपण म्हणता तशी 'गुन्हेगारी' केल्याचं माझ्या तरी ऐकीवात नाही, आपल्या असेल तर माहीत नाही! :)
तात्या.
16 Jul 2008 - 4:48 pm | रम्या
मल हा मुद्दा येथे अत्यंत गैरलागू वटतो! तो लढा देशाकरता होता, ब्रिटिश सत्तेची गुलामगिरी मोडून काढण्याकरता होता. स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारांनी जी काही कृत्ये केली ती देशाकरता होती, स्वत:च्या वैयक्तिक स्वार्थाकरता नव्हती!
अहो देश देश म्हणजे काय? एक जमिनीचा तुकडा? ब्रिटिश सत्तेची गुलामगिरी मोडून काढण्याचं कारण काय? ब्रिटीश सत्ता कोणत्यातरी आडमार्गाने का होईना भारतीय जनतेला आणि परिणामी स्वातंत्र्यसैनिकाना नुकसान देणारीच होती. स्वतंत्र्यसैनिकांना याची पुर्ण जाणीव होती. म्हणूनच ते लढले. मग शेवटी तो त्यांचा आडमार्गाने केलेला स्वार्थच झाला की.
त्यामूळे हा मुद्दा गैरलागू मुळीच नाही.
बाकी गुन्हा केला तर शिक्षा झालीच पाहिजे पण गुन्हेगाराचा पुर्वेईतिहास आणी गुन्ह्याची पार्श्वभूमी पाहून शिक्षेची सौम्यता किंवा कठोरता ठरवायला हवी.
16 Jul 2008 - 5:17 pm | विसोबा खेचर
अहो देश देश म्हणजे काय? एक जमिनीचा तुकडा? ब्रिटिश सत्तेची गुलामगिरी मोडून काढण्याचं कारण काय? ब्रिटीश सत्ता कोणत्यातरी आडमार्गाने का होईना भारतीय जनतेला आणि परिणामी स्वातंत्र्यसैनिकाना नुकसान देणारीच होती. स्वतंत्र्यसैनिकांना याची पुर्ण जाणीव होती. म्हणूनच ते लढले. मग शेवटी तो त्यांचा आडमार्गाने केलेला स्वार्थच झाला की.
मी आपल्या अफाट बुद्धीमत्तेला आणि युक्तिवादाला दाद देतो! धन्य आहे तुमची!
17 Jul 2008 - 4:49 pm | ऍडीजोशी (not verified)
विनोद बुद्धीला दाद द्यायची विसरलात तात्या
आपला,
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
16 Jul 2008 - 12:24 pm | अन्या दातार
ज्याला स्वत:चे पोट नीट भरता येत नाही, त्याने लग्न, पोरं, बाळं या फंदातच पडू नये.
आपला,
(कुठल्याही फंदात नसणारा) अन्या
16 Jul 2008 - 1:43 pm | श्री
ज्याला स्वत:चे पोट नीट भरता येत नाही, त्याने लग्न, पोरं, बाळं या फंदातच पडू नये.
आपला,
(कुठल्याही फंदात नसणारा) अन्या
=======================================================
बरोबर आहे. सरकारने आता के ईम सारखि हॉस्पिटले/सामाजिक संस्था लगेचच बंद करावित कारण मी मेहनत करतो आणी सरकारी कर भरतो आणी त्याच्या जिवावर हे सरकार/सामाजिक संस्था हे असले नीरथक काम करते.
ह्याना आजारी पडल्यावर खर्च सोसवत नाहि तर ते सरळ मरुन का जात नाही ? त्या पुढे जाउन मी तर असे म्हणेन गरीब माणसाने जन्मालाच का यावे ?
आपला,
(छंदी फंदी ) श्री
16 Jul 2008 - 1:50 pm | विसोबा खेचर
सरकारने आता के ईम सारखि हॉस्पिटले/सामाजिक संस्था लगेचच बंद करावित कारण मी मेहनत करतो आणी सरकारी कर भरतो आणी त्याच्या जिवावर हे सरकार/सामाजिक संस्था हे असले नीरथक काम करते.
ह्याना आजारी पडल्यावर खर्च सोसवत नाहि तर ते सरळ मरुन का जात नाही ?
ह्यात आपल्याला जर काही दोष द्यायचाच असेल तर तो सरकारला द्या, आजारी पडणार्या व्यक्तिंना नाही. त्यांना सरकारी मदत मिळते आणि ती ते स्वीकारतात. कुठेही चोरी करत नाहीत! शीतलने मांडलेला मुद्दा हा भादंसं अंतर्गत गुन्हा ठरणार्या चोरीचा आहे. कुठल्याही सरकारी अनुदानाचा वा मदतीच नाही! तो वेगळा चर्चाविषय होऊ शकतो!
आपला,
(न्यायाचा आदर करणारा) तात्या.
16 Jul 2008 - 12:25 pm | अनिल हटेला
सहमत
छोट्या!!!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
16 Jul 2008 - 1:33 pm | मराठी_माणूस
१)काहि दिवसापुर्वि चांगल्या घरातिल मुले चोरिच्या प्रकरणात पकडलि गेलि होति त्यामागिल कारण निव्वळ चैन होते(मोबाइल, पब वै.)
२)अमलि पदार्थांचा व्यवहार करुन तरुणांचे जिवन नासवणारे
३)अधिक पैशासाठि भ्रष्टचार करणारे
अशि अजुन बरिच उदाहरणे देता येतिल. हि उदाहरणे आणि वरिल चोरिचा गुन्हा ह्याना न्याय देताना वेगळा विचार व्हायला हवा. तो मजूर काहि अट्टल गुन्हेगार नव्हता
16 Jul 2008 - 1:37 pm | विसोबा खेचर
हि उदाहरणे आणि वरिल चोरिचा गुन्हा ह्याना न्याय देताना वेगळा विचार व्हायला हवा.
तो कसा काय अन् का? चोरी ही चोरीच असते मग कारणं काहीही असोत!
नाहीतर उद्या कुणीही उठून चोर्या करायला लागेल! मस्त लग्न वगैरे करायचं, पोरं जन्माला घालायची आणि त्याना पोसता येत नाही म्हणून चोर्या करत सुटायचं! च्यायला, हा धंदा बरा आहे! :)
आपला,
(न्यायप्रेमी) तात्या.
16 Jul 2008 - 1:53 pm | मराठी_माणूस
सरकारि अधिकार व्हायचे , राजकारणी व्हायचे, अजुन काय काय व्हायचे आणि मजबूत पैसे कमवायचे हा पण धंदा छान आहे आणि एक फायदा म्हणजे चोरि हि चोरिच हा नियम तंतोतंत लागु होत नाहि.
16 Jul 2008 - 2:03 pm | विसोबा खेचर
सरकारि अधिकार व्हायचे , राजकारणी व्हायचे, अजुन काय काय व्हायचे आणि मजबूत पैसे कमवायचे हा पण धंदा छान आहे आणि एक फायदा म्हणजे चोरि हि चोरिच हा नियम तंतोतंत लागु होत नाहि.
अगदी खरं! जोपर्यंत पकडले जात नाही तोपर्यंत कुणीच चोर नसतो! तोपर्यंत कुणीही काहीही धंदे करावे! तो धान्य चोरणारा माणूसदेखील पकडला गेला हाच त्याचा दोष! :)
तो पकडला गेला नसता तर आमचं काहीच म्हणणं नव्हतं! आणि हा विषयदेखील इथे उपस्थित झाला नसता! :)
तात्या.
16 Jul 2008 - 2:24 pm | मराठी_माणूस
जोपर्यंत पकडले जात नाही तोपर्यंत कुणीच चोर नसतो
अगदि बरोबर , पण हे मोठे(?) लोक जेन्व्हा पकडले जातात तेन्व्हा बहुत करुन वाचावयस असे मिळते "सब्बळ पुरव्या अभावि निर्दोष मुक्तता" आता हे पुरावे कसे "मॅनेज" केले जातात हे सर्वाना माहित असते कारण लागेबांधे "सब्बळ" असतात. वरच्या घटने सारखि निकालाचि तत्परता ह्यांच्या बाबतित का बघायला मिळत नाहि.
16 Jul 2008 - 2:36 pm | विसोबा खेचर
वरच्या घटने सारखि निकालाचि तत्परता ह्यांच्या बाबतित का बघायला मिळत नाहि.
अगदी खर! परंतु त्या फुटकळ चोराचे लागेबांधे सबळ नव्हते त्याला आता काय इलाज? पण म्हणून त्याचा पुळका येण्याचं काहीच कारण नाही. शेवटी चोरी ती चोरी आणि त्यातून जर ती पकडली गेली आणि पुरेसे पुरावे असतील व जर सबळ लागेबांधे नसतील तर ते फारच वाईट! :)
तात्या.
16 Jul 2008 - 4:43 pm | छोट्या
कोणताही गुन्हा हा 'गुन्हा केला' किंवा 'गुन्हा नाही केला' अशा दोन मधे एकदम विभागता येत नाही (१ or ० in software terms ).
जोपर्यंत गुन्ह्याच्या मगिल motive किंवा उद्देश स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्याला शिक्षा देणे म्हणजे रानटीपणाचं ठरेल.
चोरी करण्यामागे जर उद्देश परिस्थितीजन्य किंवा समाजमान्य असेल तर... त्याला तो गुन्हा माफ होउ शकतो किंवा शिक्षा कमी होउ शकते.
गुन्हा हा धंदा होत असेल तर त्याला जबरी शिक्षा ही झालीच पाहिजे!!!
16 Jul 2008 - 5:45 pm | इनोबा म्हणे
जोपर्यंत गुन्ह्याच्या मगिल motive किंवा उद्देश स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्याला शिक्षा देणे म्हणजे रानटीपणाचं ठरेल.
सहमत
गुन्हा हा धंदा होत असेल तर त्याला जबरी शिक्षा ही झालीच पाहिजे!!!
हेच म्हणणे आहे माझे. गुन्हेगाराला शिक्षा देताना त्या गुन्ह्यामागची पार्ष्वभूमी लक्षात घ्यायलाच हवी.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
16 Jul 2008 - 5:56 pm | विसोबा खेचर
गुन्हेगाराला शिक्षा देताना त्या गुन्ह्यामागची पार्ष्वभूमी लक्षात घ्यायलाच हवी.
ती कशी काय लक्षात घेणार? कशावरून त्या माणसाने आधीही असं केलं नसेल? फक्त पकडला गेला नसेल इतकंच! ते ठीकच आहे. पकडला न गेल्यामुळे त्याला दोषी मानता येईलच असं नाही. परंतु या वेळेस तो पकडला गेला आहे त्यामुळे त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे!
बरं मग इनोबा, गुन्ह्यामगच्या पार्श्वभूमीबद्दल इतक्या काकुळतीने बोलताय तर इतकंच सांगा, की ज्या माणसाचं धान्य चोरलं गेलं त्याच्या न्यायाचं काय? त्याला न्याय कसा मिळणार??
आपला,
(न्यायप्रेमी) तात्या.
16 Jul 2008 - 6:49 pm | आनंदयात्री
१० दोषी सुटले तरी चालतील पण एक निर्दोष बळी जाता कामा नये, या सुत्रावर भारताचा दंड देण्याचा कायदा आधारित आहे असे एकिवात आहे.
संबधित विषयातील जाणकारांनी कृपया स्पष्ट करावे. वरिल विधान एकिव माहितीवर आधारित आहे त्यामुळे कृपया चुक भुल माफ करावी.
17 Jul 2008 - 5:00 pm | शितल
१० नव्हे आन्द्या १०० दोषी म्हण
पण एक निरअपराध्याला शिक्षा होता कामा नये अशी न्याय व्यवस्था असल्यामुळे आज हा समाजात कायदा एवढा पाळला जातो.
16 Jul 2008 - 1:37 pm | शिप्रा
>>असे "तात्पुरते गुन्हेगारी" उपाय शोधण्यापेक्षा "कायमस्वरुपी यश " देणारा "कष्टाचा राजमार्ग" का नको वाटतो ?
कोण देणार काम? शिक्षण नाहि म्हणुन काम नाहि, काम नाहि म्हणुन पेसा नाहि आणि म्हणुन शिक्षण नाहि ह्याच दुश्ट चक्रात अडकलेले असतात हि लोके...मी बघीतली आहेत अशी लोके जि कष्टाला तयार आहेत्..पण शिक्षण नाहि म्हणुन काम नाहि...तुम्हि कोणि द्यायला तयार आहात का काम? काम मिळ्णे एवधे सोपे असते का? आणि आपल्या सारख्या आय टी लोकांना ते मिळ्व्णे सोपे असेलही..ह्या लोकांसाथि नक्किच नाहि...
जिथे कमी तिथे आम्ही ..:)
16 Jul 2008 - 1:55 pm | छोटा डॉन
काम नाही असे कुणी सांगितले ?
पण ते काम करण्याच्या लायक तरी स्वतःला बनवा की ? [ हे मी तुमच्या बाबत बोलत नसुन ही ज्यंची भुमीका आहे आफ्=गर जे लोक असा ओरडा करतात त्यांच्यासाठी आहे ...]
>>शिक्षण नाहि म्हणुन काम नाहि, काम नाहि म्हणुन पेसा नाहि
आपण काय फक्त "आयटी किंवा तत्सम एसी/पीसी" वाल्या कामाबद्दल बोलत आहात काय ?
शिक्षण कमी असेल तर दुसरे काम करता येईल की ...
पण नोकरीच का हवी ? काही धम्दापाणी करु शकत नाही का ?
एवढा कसला न्युनगंड ?
शेती करा, किमानकौशल्यावर आधारीत बरेच उद्योग आहेत, त्यातही पैस्सा मिळतोच की. अगदी उपाशी मरावे लागत नाही, उलट "घामाचा पैसा " मिळाल्याने समाधान लाभते, प्रतिष्ठा मिळते ...
ते का नको आहे ? फक्त "व्हाईट कॉलर" का हवे ?
व्हाईट कॉलर ही मिळेल पण तसे शिक्षण हवे, त्याशिवाय काम मिलायला ही काय "धर्मदाय संस्था " आहे का ?
मुळात "व्हाईट कॉलर" काम म्हणजे" मुबलक पैसा, छनछौकी जीवन, आराम" ही संकल्पना डोक्यातनं काढा ...
जास्त नाही सांगत , एकच सांगतो ....
"सर्व्हाईव्हल ऑफ फिटेस्ट" हा ह्या जगाचा सिद्धात आहे, त्यानुसार जग चालते ..
तुम्ही पहिल्यांदा फिट व्हा मग आपोआप "सर्व्हाईव्ह" कराल ...
>>आपल्या सारख्या आय टी लोकांना ते मिळ्व्णे सोपे असेलही..
असे का ?
आम्हाला काय "जन्मप्रमाणपत्राबरोबर आयटी नोकरीचे "अपॉइंटमेंट लेटर मिळाले होते का ?
का आमच्या बापाची कंपनी आहे आम्हाला असेच घ्यायला ???
आम्ही आत्तापर्यंत केलेल्या कष्टाची , रात्रंदिवस केलेल्या अभ्यासाची, त्यासाठी आम्ही केलेल्या त्यागाची काहीच किंमत नाही का? आम्हाला "जहागिरी" म्हणुन नोकरी मिळाली नाही हे लक्षात का घेत नाही ...
आयटी वाल्यांवर एवढा राग का ?
मला एक सांगा, तुमची कल्पना काय आहे "आयटी जॉब" बद्दल ?
आम्हाला काय "मॉलीश करुन देतात, चांगले चुंगले खाऊपिऊ घालतात, झालच तर पोरी फिरवता येतात, ऐश करता येते" असे वाटते काय तुम्हाला ? आम्ही जे रात्रंदिवस कष्ट करतो त्याची जाणीव आहे का ?
माझच घ्या ना, कामासाठी मी "सकाळी ६ ला कंपनीत येतो व कधीकधी घरी जायला रात्रीचा १ वाजतो " ...
आरामच आहे ना ? अशा नोकर्या करणेही सोप्पे असेल ना ?
पुन्हा तेच सांगतो ..."सर्व्हाईव्हल ऑफ फिटेस्ट"
अवांतर : मी आयटीवाला नाही ....
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
16 Jul 2008 - 2:18 pm | डोमकावळा
अगदी योग्य उत्तरं दिलीस मित्रा.
>>"सर्व्हाईव्हल ऑफ फिटेस्ट" हा ह्या जगाचा सिद्धात आहे, त्यानुसार जग चालते ..
>>तुम्ही पहिल्यांदा फिट व्हा मग आपोआप "सर्व्हाईव्ह" कराल ...
सरळ सोप्पा स्रुष्टीनियम आहे.
>>मुळात "व्हाईट कॉलर" काम म्हणजे" मुबलक पैसा, छनछौकी जीवन, आराम" ही संकल्पना डोक्यातनं काढा ...
सहमत.
>>मला एक सांगा, तुमची कल्पना काय आहे "आयटी जॉब" बद्दल ?
>>आम्ही जे रात्रंदिवस कष्ट करतो त्याची जाणीव आहे का ?
>>कामासाठी मी "सकाळी ६ ला कंपनीत येतो व कधीकधी घरी जायला रात्रीचा १ वाजतो " ...
>>आरामच आहे ना ? अशा नोकर्या करणेही सोप्पे असेल ना ?
स्पष्ट भाषेत बोलायचं झालं तर "ज्याची जळते त्यालाच कळतं".
16 Jul 2008 - 2:10 pm | शिप्रा
किति घाइ ???
मी आप्ल्या सारख्या म्ह ण ले ...ते तुम्हाला आदराथि म्हणुन नाहि तर मि पण आय टि मधलि आहे म्हणुन,.....
>>>>आम्हाल काय "जन्मप्रमाणपत्राबरोबर आयटी नोकरीचे "अपॉइंटमेंट लेटर मिळाले होते का ?
का आमच्या बापाची कंपनी आहे आम्हाला असेच घ्यायला ???
आम्ही आत्तापर्यंत केलेल्या कष्टाची , रात्रंदिवस केलेल्या अभ्यासाची, त्यासाठी आम्ही केलेल्या त्यागाची काहीच किंमत नाही का? आम्हाला "जहागिरी" म्हणुन नोकरी मिळाली नाही हे लक्षात का घेत नाही ...
आयटी वाल्यांवर एवढा राग का ? सगळे बोलुन मोक्ळे....निट वाचा ना आधि त्यापेक्क्षा...:)
>>मला एक सांगा, तुमची कल्पना काय आहे "आयटी जॉब" बद्दल >>
आता सांगु का काय कल्पना आहे ते...:)
>>आम्ही जे रात्रंदिवस कष्ट करतो त्याची जाणीव आहे का ?
हे मला विचारत आहेस का? जाणिव आहेच ..मला पण कंपनि फुक्ट्च्चा पगार देत नाहि...
>>मुळात "व्हाईट कॉलर" काम म्हणजे" मुबलक पैसा, छनछौकी जीवन, आराम" ही संकल्पना डोक्यातनं काढा ...
असे मि म्हणले आहे का?????????? माझ्या बापजाद्यानि माझासाथि जमिन जुमला थेवला नवता...कश्ट करुनच वर आले आहे...
>>पण नोकरीच का हवी ? काही धम्दापाणी करु शकत नाही का ?फक्त "व्हाईट कॉलर" का हवे ?
एवढा कसला न्युनगंड ?
कोणि सांगितले कि ते धम्दापाणी कराय्ल्ल तयार नाहित? त्या साथि पण भांडवल लाग्ते...शेति साथि जमिन लागते...
जिथे कमी तिथे आम्ही ..:)
16 Jul 2008 - 2:33 pm | छोटा डॉन
सर्वात प्रथम आपल्या पहिल्या प्रतिसादाबद्दल ...
त्यात आपण जे "आपल्या " लिहले होते ते "आम्हाला [ हे मात्र स्वतःला आदरार्थी बरे ] " आदराथी वाटले पण ते "आपल्यासारख्या लोकांसाठी" असे अपेक्षीत होते.
जरासे स्पष्ट [ का समजेल असे स्पष्ट म्हणु ?] न लिहल्याने आमचा अंमळ गैरसमज झाला ...
असो. आता सगळे स्पष्ट समजले आहे ...
तरीसुद्धा आमची "भुमीका" तिच आहे ...
आता आपल्या [ हे आदरार्थी ] "प्रतिसादाबद्दल " बोलु ...
मी माझ्या प्रतिसादात मांडलेले मुद्दे खोडुन काडणे अथवा त्याचे समर्थन करणे ह्या " दोनच गोष्टी" अपेक्षीत होत्या ...
त्यातले काही नाही केले आपण ...
उलट मी पण आपल्या सारखी आहे व "आपन बॉ फार घाई करता" हेच मुद्दे आपण हाताळले ...
असो. काही प्रॉब्लेम नाही ....
अजुन एकदा लिहा की माझे काय चुकले ते ?
मी कष्ट करा म्हणालो ते चुकले ? की आम्हाला जे मिळते त्यामागे कष्ट आहेत हे म्हणालो ते चुकले ?
जीवनाचा जो सिद्धांत सांगितला ते चुकले ? की चांगली "आय टी नोकरी" मिळवायला काय करावे लागेल ते सांगितलेले चुकले ? की त्यातील लाईफ कसे आहे हे सांगितलेले चुकले ?
सांगा हो नक्की काय चुक झाली ते ?
तुम्ही ह्याकडे अंमळ "दुर्लक्ष" करुन बाकीच्या अनावश्यक बाबींचा विचार करुन मला उलट प्रतिसाद टाकलात ...
हे मात्र "आमच्या [ हे आदरार्थी ] " मते तुमचे चुकले ...
असो. आता "घाई नका करु" , जी काही "टेक्नीकल मते" आहेत ती मांडा ...
सरळ चर्चा करायला आम्ही आहोतच !!!
तळटीप : प्रतिसादाचा आशय लक्षात घ्यावा व तो अर्थातच ह. घ्या. पण "मुळ मुद्दा" विसरु नये ....
[घाईगडबडवाला ] छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
16 Jul 2008 - 2:18 pm | मनस्वी
कंपनीतून बाहेर पडल्यावर एक मोठ्ठा चौक आहे. पुढे रस्त्यावर मॉल, हॉटेल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स वगैरे आहेत.
१ बाई - तिचा नवरा - बाईच्या कडेवर १ मूल : अशी २ कुटुंबे
आलटून - पालटून महिन्याच्या अंतराने चौकात दिसतात.
थांबलेल्या दुचाकी / चारचाकी जवळ जातात अथवा पादचार्याला पकडतात. व्यक्ती मराठी दिसली की मराठीतून नाहीतर हिंदीतून संवाद चालू करतात :
तुम्हाला मराठी येतं का? आम्ही नांदेड / अलाणा / फलाण्याचे आहोत.. जवळचे सगळे पैसे चोरीला गेले.. परत गावी जायचे आहे.. मदत करा..
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
16 Jul 2008 - 5:16 pm | श्री
मनस्वी ताई,
राग मानू नका, पण ह्या एक अवांतर किस्सा चे येथे प्रयोजन कळ्ले नाही.
16 Jul 2008 - 2:41 pm | शिप्रा
>>अजुन एकदा लिहा की माझे काय चुकले ते ?
तुझे काय चुकले हया साथि हि चच्रा नाहि....
>>तुम्ही ह्याकडे अंमळ "दुर्लक्ष" करुन बाकीच्या अनावश्यक बाबींचा विचार करुन मला उलट प्रतिसाद टाकलात ... माझे पण तुझा प्रतिसादा बद्द्ल हेच मत आहे...तुझि नोकरि, तुझे कष्ट हे स्वताचे फ्रस्टेशन सांगितलेस फक्त...टेक्नीकल मते" कुथे??
>>सरळ चर्चा करायला आमही आहोतच !!!
नको...अस्ल्या चर्चा करायला मला कंपनि पगार देत नाहि...फक्त असाच वेळ घालवला तर मला पण सकाळि ६ ला येऊन रात्रि १ ला जावे लागेल...
जिथे कमी तिथे आम्ही ..:)
16 Jul 2008 - 2:51 pm | आनंदयात्री
>>>>सरळ चर्चा करायला आमही आहोतच !!!
>>नको...अस्ल्या चर्चा करायला मला कंपनि पगार देत नाहि...फक्त असाच वेळ घालवला तर मला पण सकाळि ६ ला येऊन रात्रि १ ला जावे लागेल...
ठोsss ठोsss ठोsss
=)) =)) =)) =))
16 Jul 2008 - 2:57 pm | छोटा डॉन
च्यायला ह्या "अस्ल्या चर्चा करायला मला कंपनि पगार देत नाहि...फक्त असाच वेळ घालवला तर मला पण सकाळि ६ ला येऊन रात्रि १ ला जावे लागेल..." वाक्याला आम्हीही ....
=)) =)) =))
काय बोलणार ?
काही का असेना, भारीच ...
जाऊ दे, आमचाही आता "अंमळ गंभीर चर्चा" करायचा मुड गेला ...
बास झाले आता ....
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
16 Jul 2008 - 3:04 pm | आनंदयात्री
याला म्हणतात जिंदादीली .. नायतर साला चर्चा म्हटले की हाण हाण हानामार्या चालुच.
आपलाच
(डान्याचा प्राउड फ्रेंड) छोटा आंद्या
अवांतरः
इतिहासाचा अभ्यास करुन आमचे एक मत पक्के झालेय की मराठी माणुस त्याची भांडणाची खाज मिटवण्यासाठी अगदी पुरातन काळापासुन संकेतस्थळे बनवत आलाय. आयचा घो त्या चामुंड्याचा ..... ;)
16 Jul 2008 - 3:09 pm | छोटा डॉन
>>(डान्याचा प्राउड फ्रेंड) छोटा आंद्या
धन्यवाद ... धन्यवाद ...
[ इज्जतीच्या चिंध्या झाल्यावर सुद्धा धन्यवाद म्हणणे याला आजच्या भाषेत "सॉफॅस्टीकेटेडनेस" म्हणतात ]
[ बिनकामी ] छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
16 Jul 2008 - 3:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
>>सरळ चर्चा करायला आमही आहोतच !!!
नको...असल्या चर्चा करायला मला कंपनी पगार देत नाहि...फक्त असाच वेळ घालवला तर मला पण सकाळि ६ ला येऊन रात्रि १ ला जावे लागेल...
खरंय! =))
16 Jul 2008 - 3:42 pm | शिप्रा
क्षमस्व डॉन भाउ... दुखवायचा उद्देश नव्हता....दोस्ति खात्यात बोलले...:)
जिथे कमी तिथे आम्ही ..:)
16 Jul 2008 - 5:06 pm | शितल
कोकणातील पुरूष मोस्टली मु॑ब॑ईत असतात,गणपती आणि शिमग्याला ते गावी सणा॑ना येतात.म्हणजे मधे आधी ही येत असतात, पण तेथे ता॑दळा शिवाय काही पिकत ही नाही म्हणजे आ॑बा, फणस हे सोडुन , मजुर लागतो फक्त ह्या पेरणी आणि कापणीच्या वेळी बाकी रोजगार उपलब्ध नाही फार फार तर कोणत्या तरी हॉटेलात काम मिळु शकते कारण तेथे सरकारच्या योजना अगदी तळागाळ्यातल्या लोका॑पर्य्॑त पोहचल्या ही नाहीत. तेथे आताशा मु॑बई- गोवा हायवे मुळे जरा तेथील लोक खाण्याच्या टप-या उघडु लागले आहेत. पण ते ही ज्याचे कोणीतरी मिळवते मु॑ब॑ईत आहेत त्या॑च्या कडुन पैसा आल्यावर हे जमते, दुसरी गोष्ट शिक्षणाचा आभाव त्यामुळे फक्त अ॑ग मेहनतीची कामेच अशी लोक करू शकतात,अशी कामे १२ म. उपलब्ध नसतात त्यामुळे कधी कधी हातात काहीच नसते. तात्याचे म्हणने बरोबर आहे, मिळवता झाल्याशिवाय लग्नाचा विचार करू नये, पण बायको,मुलाला काय खायला घालणार हा विचार ही हवा,
दुख: इतकेच वाटले की त्या लहान मुलाला अन्न मिळाले नव्हते म्हणुन, जगातल्या कोणत्या आई- वडिला॑ना त्याचे मुल उपासमारीमुळे रडुन रडुन बेशुध्द व्हायचे पहायला मिळाले तर स्वतःला किती दोषी समजतील.
पोटाची आग आणि पोट्याच्या गोळ्याची माया माणसाला काहिहि करायला भाग पाडते तेव्हा त्याचे मन त्याला फक्त तेच बरोबर आहे ते सा॑गत असते (काही गोष्टी जवळुन पाहिल्या आहेत)
पुढच्या वेळी मी नैसर्गिक न्याय ह्या मध्ये २/३ किस्से सा॑गेन.
म्हणजे माणुन आपले गुन्हा कितीही लपवायाचा प्रयत्न केला तो त्यात सफल ही होतो पण निसर्ग त्याला वेळ्या स्वरूपाची शिक्षा देतो.
17 Jul 2008 - 5:46 pm | प्रकाश घाटपांडे
जरुर सांगा.उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकरांचे "कायदा आणि माणुस" हे पुस्तक जे पुर्वी रविवार सकाळ मध्ये लेखमालिका स्वरुपात केले होते ते वाचनीय आहे. त्यातील फिर्यादीनेच केला न्याय हे वाचण्यासारखे आहे. 'एक रुका हुआ फैसला' हा चित्रपट एका खोलीत बसलेल्या ज्युरींच्या भोवतीच एका केसभोवती गुंफलेला आहे. 'निकाल' म्हणजे 'न्याय' नव्हे. तांत्रिक बाजु भक्कम असतील तर निकाल अन्यायाच्या बाजुने जातो. संशयाचा फायदा हा आरोपीलाच मिळतो.
गुन्हा या गोष्टीची सर्वसमावेशक व्याख्या करता आलेली नाही. एका देशात केलेले कृत्य गुन्हा असेल तर तेच कृत्य दुसर्या देशात गुन्हा असणार नाही.
आपल्या सदसद विवेक बुद्धीच्या न्यायालयात जो निकाल आपल्याला मिळतो तो न्याय्य. ऐहिक न्यायालयात निर्दोष असणारी व्यक्ती आपल्या सदसद विवेकबुद्धीच्या न्यायालयात गुन्हेगार असु शकते. अथवा दोषी असणारी व्यक्ती सदसद विवेक बुद्धीच्या न्यायालयात निर्दोष असु शकते. माझ्या स्वेच्छानिवृतीच्या वेळी संचालकांना मी हे लिहिले होते ते आठवले.
प्रकाश घाटपांडे
16 Jul 2008 - 5:16 pm | शितल
चर्चत ज्या वाचका॑नी आपली मते मा॑डली त्याबद्दल त्याचे धन्यवाद !
:)
16 Jul 2008 - 5:57 pm | वरदा
कदाचित त्या गरीब माणसाला लग्न केलं तेव्हा काही काम असेल नंतर सुटले असेल्...त्यामुळे त्याने लग्न करणे चुकीचे हा मुद्दा चुकीचा आहे...
पण हे मान्य, की करायचं असेल तर कुठलही काम करता येतं...आमच्याच जवळच्या छोट्या गावातला गरीब माणूस १० कंपन्यांमधे लागला आणि त्याला काढून टाकला...शेवटी त्याने स्टेशनजवळ चहा आणि ग्लुकोज बिस्कीटं मिळणारी गाडी टाकली आणि २४ तास तिथे बसला.. नाईट शिफ्ट आणि फर्स्ट शिफ्ट मधल्या लोकांना रात्री आणि पहाटे चहा मिळायला लागल्यावर गाडी एवढी चालायला लागली... हळूहळू जम बसल्यावर वडे तळायचं सामानही जमवलं...बायको वडे करायला लागली.....सॉलीड मस्त चालायला लागली त्याची गाडी...
तर मुद्दा हा की नोकरी मिळत नाही म्हणून बसून काही होणार नाही...आणि अशा माणसांना चोरी करुन शिक्षा न देता सोडलं तर त्यांना अजून आत्मविश्वास येईल की रडलं की शिक्षा होणार नाही आणि ते तेच करु लागतील....खॉटं करणार्यांची काही कमी नाही...
शितल तुझे अनुभव छान गं..त्या पुतण्याचा खून केलेला काका किती नालायक नुसता संताप आला वाचून्....सॉलीड डोकं सुन्न होत असेल ना हे काम करताना...
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
16 Jul 2008 - 6:04 pm | विसोबा खेचर
आणि अशा माणसांना चोरी करुन शिक्षा न देता सोडलं तर त्यांना अजून आत्मविश्वास येईल की रडलं की शिक्षा होणार नाही आणि ते तेच करु लागतील....
सहमत आहे!
तात्या.
16 Jul 2008 - 6:19 pm | शितल
अग तो काका असा कितीसा मोठा असेल जेम ते २५ चा असेल.
चेहर्यावर असे भाव की ह्याने काही गड जिकुनच आणला आहे.
खरच भर चॊकात अशा लोकाना फाशी दिली पाहिजे आणि त्या मात्रिकाला ही
तेव्हा कोठे जरा वचक बसेल.
अग लहान मुलाना असे काही केले तर डोके कामातुन जाते ग. :)
16 Jul 2008 - 6:53 pm | सुचेल तसं
"शिक्षा ठोठवतान गुन्ह्यामागची पार्श्वभुमी जमेस धरावी काय ?"
हा खरोखरच अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा प्रश्न आहे. माझ्या मते न्यायाधीश लोक गुन्हेगाराचा इतिहास, गुन्हा करतेवेळीचे त्याचे/तिचे वय, गुन्ह्याची कारणं ह्याचा निश्चितच विचार करत असतील.
परवाच म.टा. मधे सतीश कामतांचा एक लेख वाचला. त्यात त्यांनी सुमारे ५० वर्षांपुर्वीच्या "नानावटी केस" बद्दल लिहील आहे. त्याची थोडक्यात माहिती अशी: कावस नानावटी हे नौदलाच्या 'म्हैसूर' या युद्धनौकेवर कमांडर होते. त्यांची पत्नी सिल्व्हिया व तीन मुले मुंबईत राहत असत. सन १९५६मध्ये प्रेम अहुजा नावाच्या एका उद्योगपतीशी त्यांचा परिचय झाला. त्याचे रूपांतर कौटुंबिक मैत्रीत झाले. नानावटी जहाजावर असताना, अहुजा आणि सिल्व्हिया यांच्यातील भेटीगाठी वाढल्या आणि सिल्व्हियाने अहुजाशी विवाह करण्याचे ठरवले. नानावटी २२ एप्रिल १९५९ला घरी आले, तेव्हा सिल्व्हियाच्या तुटक वागणुकीने ते अस्वस्थ झाले. त्याचे कारण विचारल्यावर, अहुजाशी प्रेमसंबंध निर्माण झाल्याची कबुली तिने दिली. उद्विग्न झालेल्या नानावटींनी नौदलाच्या भांडारात जाऊन रिव्हॉल्व्हर आणि काडतुसे घेतली. तेथूनच ते मोटारीने अहुजाच्या घरी गेले आणि त्याला गोळ्या घातल्या. खुनानंतर ते आधी नौदलाच्या अधिकाऱ्यांना आणि नंतर पोलिसांना शरण आले.
नानावटींनी खून केला असला, तरी खटला चालू असताना आणि नंतरही बहुसंख्य मुंबईकर त्यांच्याच बाजूला होते. सहा-सहा महिने कुटुंबापासून दूर राहून देशकर्तव्य बजावणारा अधिकारी हा 'हीरो' ठरला होता आणि त्याच्या पत्नीला 'नादी' लावणारा अहुजा खलनायक. खुनाच्या आरोपावरून खटला चालू असताना, नानावटींच्या 'पश्चात्ताप-दग्ध' पत्नीने त्यांच्या बाजूने साक्ष दिली. नानावटी हे कार्यक्षम, प्रामाणिक, चारित्र्यवान अधिकारी असल्याचे प्रमाणपत्र नौदलप्रमुखांनी साक्षीत दिले. खटल्याच्या खर्चासाठी नागरिक पैसे पाठवीत असत आणि अनेक स्त्रियांनी पाठवलेल्या नोटांवर लिपस्टिकच्या खुणा असत, असे वर्णन त्यावेळच्या बातम्यांत आढळते.
वास्तविक या प्रेमसंबंधांत सिल्व्हियाचा सारखाच वाटा होता. तिची पत्रे याला साक्षी होती. तरीही केवळ अहुजालाच खलनायक मानले गेले. कदाचित नानावटींच्या बाजूने साक्ष देऊन सिल्व्हियाने आपल्या पापाचे प्रायश्चित्त घेतले, असे मुंबईकरांच्या नैतिक न्यायव्यवस्थेने मानले असेल. अहुजा मात्र दोषी ठरला, तो एका नौदल अधिकाऱ्याच्या पत्नीचे प्रेम अव्हेरण्याची नैतिकता त्याने दाखविली नाही म्हणून आणि हा गुन्हा देहदंडास योग्य मानला गेला.
भावनेच्या या प्रवाहात ज्युरी वाहून गेले, तरी कोर्टाने आपले कर्तव्य बजावले. नानावटींवर खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याचा निष्कर्ष कोर्टाने काढला. सुप्रीम कोर्टाने त्यावर शिक्कामोर्तब केले आणि नानावटींना जन्मठेपेची शिक्षा झाली. पुढे राज्यपालांनी ती माफ केली आणि नानावटी कुटुंबासह देश सोडून कॅनडाला गेले, ते न परतण्यासाठी.
राज्यपालांनी ही शिक्षा माफ करताना काय निकष लावले असतील? नानावटी हे नौदलात उच्चपदस्थ अधिकारी होते आणि ते कार्यक्षम अधिकारी असल्यामुळे? की हा खून नसून परिस्थितीमुळे उद्भवलेला सदोष मनुष्यवध आहे असं मानून?
ह्याचाच अर्थ असा की न्यायव्यवस्था देखील शिक्षा ठोठावताना पार्श्वभुमीचा विचार करते.
http://sucheltas.blogspot.com
16 Jul 2008 - 7:21 pm | वरदा
मला ही केस माहीत होती..म्हणजे ऐकली होती...पण तुम्ही योग्य वेळी योग्य उदाहरण दिलंत....
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
16 Jul 2008 - 7:26 pm | शितल
नानावटी खुन खटाला हा अजरामर झाला आहे
म्हणजे न्याय व्यवस्थेत काम करणार्या बहुताश: लोकाना हा खटला माहित आहे.
आता नेव्हीत आणि त्याचे सबध तेवढे वरचे होते.पण सामान्य नागरिकाच्या दृष्टीने हा खुप उच्च कोटीतला खटला आहे.
असे फार कमी होते की खुन केल्यावर जन्मठेप हो ऊन राज्यपाल/ राष्ट्र्पती त्याची शिक्षा माफ करतो.
16 Jul 2008 - 8:48 pm | रामदास
कायदा एखाद्या गुन्ह्याबद्दल शिक्षा देताना पार्श्वभूमीचा विचार करते.उदा: पहिला गुन्हा , सामाजीक पार्श्वभूमी ,गुन्हेगाराचे वय वगैरे वगैरे .काही वेळा सक्त ताकीद देऊन सोडून देण्यात येते. (दारु पिऊन गाडी चालवणे.) काही वेळा आर्थीक दंड करून सोड्ण्यात येते.
दारुच्या नशेतला खून , कट करून केलेला खून , खुनाचा हेतू नसताना झालेली हत्या या सगळ्याचा विचार वेगळ्या कलमाखाली होतो.बलात्कार अल्पवयीन मुलीवर (कलम ३७६) हा जास्त दंडनीय आहे .
समस्या अशी आहे की आपले कायदे फार जुने झाले आहेत. त्यामुळे काही वेळा छोट्या गुन्ह्यासाठी मोठी सजा लागते. एका मिल मजूराला १५ ग्रॅम टिनोपाल चोरले म्हणून दिड वर्षाची शिक्षा झालेली पाहिली आहे.
थोडक्यात सांगायचे तर पार्श्वभूमी आपोआप लक्षात घेतली जाते.पण कायदे फार जुने आहेत.पण पुढाकार घेणार कोण?
16 Jul 2008 - 10:22 pm | शितल
पण कायदे फार जुने आहेत.पण पुढाकार घेणार कोण?
तुमचे म्हणने अगदी खरे आहे
ब्रिटीशा॑नी घालुन दिलेले कायदेच आपण स्वात॑त्र्या न॑तर ही पाळत बसलो आहोत
मला असे वाटते ही जसा समाज तसा कायदा केला पाहिजे.
पुर्ण नविन कायदा अस्तित्वात आला पाहिजे आणि शिक्षा देन्याचा कालावधी ही ठरला पाहिजे.
कोर्टाच्या कागदी घोडे कमी केले पाहिजेत.
तपास य॑त्रणा ही अधिक सुधारली पाहिजे.
17 Jul 2008 - 1:59 am | एकलव्य
"शिक्षा ठोठवतान गुन्ह्यामागची पार्श्वभुमी जमेस धरावी काय ?"
नक्कीच धरावी आणि तशी ती धरली जाते देखील. कायदा हा तर पाळायलाच हवा पण हा गुन्हा म्हणजे ही शिक्षा असा एकास एक नियम अस्तित्वात नाही. शिक्षा किती तीव्र द्यायची याचा न्याय करण्यासाठी तर योग्य "माणूस" हवा.
(१) खून - मस्तीसाठी केलेला खून, क्षणिक रागात झालेला खून, राजकीय हत्या, बालहत्या आणि चिथावणीखोर भाषणांतून झालेल्या हत्या या प्रत्येकासाठी दिली जाणारी शिक्षेची तीव्रता वेगळी असते.
(२) चोरीच्या बाबतीतही का आणि कोणत्या परिस्थितीत गुन्हा घडला यावर न्यायाधीश शिक्षा ठरवितात.
(३) अगदी इतकेच नव्हे तर न्यायदानास अतिविलंब झाल्यास आता शिक्षा देण्यात अर्थ नाही याचीही जाण (काहीवेळा पळवाट) कायदा ठेवतो. दहा वर्षापूर्वी केलेल्या चोरीबद्दल आज एखाद्याला शिक्षा करणे म्हणजे चोर सोडून सन्याशाला सुळावर चढविण्यासारखे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
असो... शितल - आपला लेख आवडला.
- एकलव्य
17 Jul 2008 - 5:10 am | राधा
विचार करायला लावणारा लेख आहे ग..............
17 Jul 2008 - 2:21 pm | मदनबाण
गुन्ह्यामागची पार्श्वभुमी समजल्याने गुन्हा का केला,करवला गेला यांचे निदान करण्यास सोपे जाते..
धान्य चोरले = गुन्हा (ज्याच धान्य चोरीला गेल त्याचे नुकसान झाले व त्याला न्याय मिळाला पाहिजे हे अगदी मान्य)
कारण :- पोटातली भुक !!!!! इथ चोरीचा उद्देश कुठल्याही प्रकारची चैन करणे हा नसुन्..जगण्यासाठी केली गेलेली धडपड आहे असे मला वाटते.
परिस्थीतीमुळे माणुस कोणत्याही थराला जाऊ शकतो हे काही वेगळ सांगायची गरज नाही !!
(दोन वेळच पोटभर जेवणार्यांना भुकेचा अर्थ खरचं कळतो का ?) ह्या विचारात पडलेला..
मदनबाण.....
17 Jul 2008 - 4:59 pm | अनिल हटेला
गुन्हा हा धंदा होत असेल तर त्याला जबरी शिक्षा ही झालीच पाहिजे!!!
हे मात्र पटल......
बाकी आपल्या कडे ब-याच प्रकार च्या चो-या होतात....
आय मीन राज्कारणी,फिक्सीन्ग्,वगैरे...
आणी वर म्हटल्या प्रमाणे "पकडला जातो तोच चोर...."
मग एखाद्याच्या हातुन चुकुन किवा अगदी असहाय्य्ते पोटी गुन्हा घडला ,
तर त्यामागील पाश्वभुमीचा विचार करुनच शिक्षा व्हावी,आणी केली जाते.....
अगदी हेच म्हणायच होत मला ही....
बाकी वरील चर्चा वाचुन मूड बनला बर...!!!!!!!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
18 Jul 2008 - 6:47 pm | कोडगा
जरी कायदा बदल आवश्यक असला, तरी समाजातील भ्रष्टाचार कमी होणे महत्वाचे आहे.
ह्यासाठी स्वतःपासून सुरुवात करुया.....
20 Jul 2008 - 7:04 pm | मुकेश
शिक्षा ठोठवतान गुन्ह्यामागची पार्श्वभुमी जमेस धरू नये. गुन्हा हा गुन्हाच असतो, त्याचे समर्थन करू नये असे मला वाटते.
फक्त गुन्हा हा स्वसंरक्षणासाठी झाला असेल तरच गुन्ह्यामागची पार्श्वभुमी जमेस धरावी.
मुकेश
20 Jul 2008 - 8:14 pm | शितल
फक्त गुन्हा हा स्वसंरक्षणासाठी झाला असेल तरच गुन्ह्यामागची पार्श्वभुमी जमेस धरावी.
पण बाकीच्या वेळी ही पार्श्वभुमी जमेत धरतात ,कागदोपत्री आणि साक्षीदारा॑च्या जबाणीवरूनपण जर तो गुन्हा सिध्द झाला तर त्यावेळी ही जी शिक्षा देण्यात येते तेव्हा त्या गुन्हाची पार्श्वभुमी असा गुन्हा त्या गुन्हेगारने याआधी केला आहे का, गुन्हा चुकुन झाला आहे का असे अनेक प्रकार असतात.