Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by शितल on Wed, 07/16/2008 - 09:08
  • Log in or register to post comments
  • 28909 views

प्रतिक्रिया

Submitted by शिप्रा on Wed, 07/16/2008 - 15:42

Permalink

सारि :)

क्षमस्व डॉन भाउ... दुखवायचा उद्देश नव्हता....दोस्ति खात्यात बोलले...:) जिथे कमी तिथे आम्ही ..:)
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Wed, 07/16/2008 - 17:06

Permalink

काही विश्लेशन.

कोकणातील पुरूष मोस्टली मु॑ब॑ईत असतात,गणपती आणि शिमग्याला ते गावी सणा॑ना येतात.म्हणजे मधे आधी ही येत असतात, पण तेथे ता॑दळा शिवाय काही पिकत ही नाही म्हणजे आ॑बा, फणस हे सोडुन , मजुर लागतो फक्त ह्या पेरणी आणि कापणीच्या वेळी बाकी रोजगार उपलब्ध नाही फार फार तर कोणत्या तरी हॉटेलात काम मिळु शकते कारण तेथे सरकारच्या योजना अगदी तळागाळ्यातल्या लोका॑पर्य्॑त पोहचल्या ही नाहीत. तेथे आताशा मु॑बई- गोवा हायवे मुळे जरा तेथील लोक खाण्याच्या टप-या उघडु लागले आहेत. पण ते ही ज्याचे कोणीतरी मिळवते मु॑ब॑ईत आहेत त्या॑च्या कडुन पैसा आल्यावर हे जमते, दुसरी गोष्ट शिक्षणाचा आभाव त्यामुळे फक्त अ॑ग मेहनतीची कामेच अशी लोक करू शकतात,अशी कामे १२ म. उपलब्ध नसतात त्यामुळे कधी कधी हातात काहीच नसते. तात्याचे म्हणने बरोबर आहे, मिळवता झाल्याशिवाय लग्नाचा विचार करू नये, पण बायको,मुलाला काय खायला घालणार हा विचार ही हवा, दुख: इतकेच वाटले की त्या लहान मुलाला अन्न मिळाले नव्हते म्हणुन, जगातल्या कोणत्या आई- वडिला॑ना त्याचे मुल उपासमारीमुळे रडुन रडुन बेशुध्द व्हायचे पहायला मिळाले तर स्वतःला किती दोषी समजतील. पोटाची आग आणि पोट्याच्या गोळ्याची माया माणसाला काहिहि करायला भाग पाडते तेव्हा त्याचे मन त्याला फक्त तेच बरोबर आहे ते सा॑गत असते (काही गोष्टी जवळुन पाहिल्या आहेत) पुढच्या वेळी मी नैसर्गिक न्याय ह्या मध्ये २/३ किस्से सा॑गेन. म्हणजे माणुन आपले गुन्हा कितीही लपवायाचा प्रयत्न केला तो त्यात सफल ही होतो पण निसर्ग त्याला वेळ्या स्वरूपाची शिक्षा देतो.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on गुरुवार, 07/17/2008 - 17:46

In reply to काही विश्लेशन. by शितल

Permalink

पुढच्या

पुढच्या वेळी मी नैसर्गिक न्याय ह्या मध्ये २/३ किस्से सा॑गेन.
जरुर सांगा.उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकरांचे "कायदा आणि माणुस" हे पुस्तक जे पुर्वी रविवार सकाळ मध्ये लेखमालिका स्वरुपात केले होते ते वाचनीय आहे. त्यातील फिर्यादीनेच केला न्याय हे वाचण्यासारखे आहे. 'एक रुका हुआ फैसला' हा चित्रपट एका खोलीत बसलेल्या ज्युरींच्या भोवतीच एका केसभोवती गुंफलेला आहे. 'निकाल' म्हणजे 'न्याय' नव्हे. तांत्रिक बाजु भक्कम असतील तर निकाल अन्यायाच्या बाजुने जातो. संशयाचा फायदा हा आरोपीलाच मिळतो. गुन्हा या गोष्टीची सर्वसमावेशक व्याख्या करता आलेली नाही. एका देशात केलेले कृत्य गुन्हा असेल तर तेच कृत्य दुसर्‍या देशात गुन्हा असणार नाही. आपल्या सदसद विवेक बुद्धीच्या न्यायालयात जो निकाल आपल्याला मिळतो तो न्याय्य. ऐहिक न्यायालयात निर्दोष असणारी व्यक्ती आपल्या सदसद विवेकबुद्धीच्या न्यायालयात गुन्हेगार असु शकते. अथवा दोषी असणारी व्यक्ती सदसद विवेक बुद्धीच्या न्यायालयात निर्दोष असु शकते. माझ्या स्वेच्छानिवृतीच्या वेळी संचालकांना मी हे लिहिले होते ते आठवले. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Wed, 07/16/2008 - 17:16

Permalink

सर्वाचे आभार.

चर्चत ज्या वाचका॑नी आपली मते मा॑डली त्याबद्दल त्याचे धन्यवाद ! :)
  • Log in or register to post comments

Submitted by वरदा on Wed, 07/16/2008 - 17:57

Permalink

मला वाटते

कदाचित त्या गरीब माणसाला लग्न केलं तेव्हा काही काम असेल नंतर सुटले असेल्...त्यामुळे त्याने लग्न करणे चुकीचे हा मुद्दा चुकीचा आहे... पण हे मान्य, की करायचं असेल तर कुठलही काम करता येतं...आमच्याच जवळच्या छोट्या गावातला गरीब माणूस १० कंपन्यांमधे लागला आणि त्याला काढून टाकला...शेवटी त्याने स्टेशनजवळ चहा आणि ग्लुकोज बिस्कीटं मिळणारी गाडी टाकली आणि २४ तास तिथे बसला.. नाईट शिफ्ट आणि फर्स्ट शिफ्ट मधल्या लोकांना रात्री आणि पहाटे चहा मिळायला लागल्यावर गाडी एवढी चालायला लागली... हळूहळू जम बसल्यावर वडे तळायचं सामानही जमवलं...बायको वडे करायला लागली.....सॉलीड मस्त चालायला लागली त्याची गाडी... तर मुद्दा हा की नोकरी मिळत नाही म्हणून बसून काही होणार नाही...आणि अशा माणसांना चोरी करुन शिक्षा न देता सोडलं तर त्यांना अजून आत्मविश्वास येईल की रडलं की शिक्षा होणार नाही आणि ते तेच करु लागतील....खॉटं करणार्‍यांची काही कमी नाही... शितल तुझे अनुभव छान गं..त्या पुतण्याचा खून केलेला काका किती नालायक नुसता संताप आला वाचून्....सॉलीड डोकं सुन्न होत असेल ना हे काम करताना... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 07/16/2008 - 18:04

In reply to मला वाटते by वरदा

Permalink

सहमत...

आणि अशा माणसांना चोरी करुन शिक्षा न देता सोडलं तर त्यांना अजून आत्मविश्वास येईल की रडलं की शिक्षा होणार नाही आणि ते तेच करु लागतील.... सहमत आहे! तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Wed, 07/16/2008 - 18:19

In reply to मला वाटते by वरदा

Permalink

अग खरच ग वरदे,

अग तो काका असा कितीसा मोठा असेल जेम ते २५ चा असेल. चेहर्यावर असे भाव की ह्याने काही गड जिकुनच आणला आहे. खरच भर चॊकात अशा लोकाना फाशी दिली पाहिजे आणि त्या मात्रिकाला ही तेव्हा कोठे जरा वचक बसेल. अग लहान मुलाना असे काही केले तर डोके कामातुन जाते ग. :)
  • Log in or register to post comments

Submitted by सुचेल तसं on Wed, 07/16/2008 - 18:53

Permalink

विचार करायला लावणारा प्रश्न

"शिक्षा ठोठवतान गुन्ह्यामागची पार्श्वभुमी जमेस धरावी काय ?" हा खरोखरच अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा प्रश्न आहे. माझ्या मते न्यायाधीश लोक गुन्हेगाराचा इतिहास, गुन्हा करतेवेळीचे त्याचे/तिचे वय, गुन्ह्याची कारणं ह्याचा निश्चितच विचार करत असतील. परवाच म.टा. मधे सतीश कामतांचा एक लेख वाचला. त्यात त्यांनी सुमारे ५० वर्षांपुर्वीच्या "नानावटी केस" बद्दल लिहील आहे. त्याची थोडक्यात माहिती अशी: कावस नानावटी हे नौदलाच्या 'म्हैसूर' या युद्धनौकेवर कमांडर होते. त्यांची पत्नी सिल्व्हिया व तीन मुले मुंबईत राहत असत. सन १९५६मध्ये प्रेम अहुजा नावाच्या एका उद्योगपतीशी त्यांचा परिचय झाला. त्याचे रूपांतर कौटुंबिक मैत्रीत झाले. नानावटी जहाजावर असताना, अहुजा आणि सिल्व्हिया यांच्यातील भेटीगाठी वाढल्या आणि सिल्व्हियाने अहुजाशी विवाह करण्याचे ठरवले. नानावटी २२ एप्रिल १९५९ला घरी आले, तेव्हा सिल्व्हियाच्या तुटक वागणुकीने ते अस्वस्थ झाले. त्याचे कारण विचारल्यावर, अहुजाशी प्रेमसंबंध निर्माण झाल्याची कबुली तिने दिली. उद्विग्न झालेल्या नानावटींनी नौदलाच्या भांडारात जाऊन रिव्हॉल्व्हर आणि काडतुसे घेतली. तेथूनच ते मोटारीने अहुजाच्या घरी गेले आणि त्याला गोळ्या घातल्या. खुनानंतर ते आधी नौदलाच्या अधिकाऱ्यांना आणि नंतर पोलिसांना शरण आले. नानावटींनी खून केला असला, तरी खटला चालू असताना आणि नंतरही बहुसंख्य मुंबईकर त्यांच्याच बाजूला होते. सहा-सहा महिने कुटुंबापासून दूर राहून देशकर्तव्य बजावणारा अधिकारी हा 'हीरो' ठरला होता आणि त्याच्या पत्नीला 'नादी' लावणारा अहुजा खलनायक. खुनाच्या आरोपावरून खटला चालू असताना, नानावटींच्या 'पश्चात्ताप-दग्ध' पत्नीने त्यांच्या बाजूने साक्ष दिली. नानावटी हे कार्यक्षम, प्रामाणिक, चारित्र्यवान अधिकारी असल्याचे प्रमाणपत्र नौदलप्रमुखांनी साक्षीत दिले. खटल्याच्या खर्चासाठी नागरिक पैसे पाठवीत असत आणि अनेक स्त्रियांनी पाठवलेल्या नोटांवर लिपस्टिकच्या खुणा असत, असे वर्णन त्यावेळच्या बातम्यांत आढळते. वास्तविक या प्रेमसंबंधांत सिल्व्हियाचा सारखाच वाटा होता. तिची पत्रे याला साक्षी होती. तरीही केवळ अहुजालाच खलनायक मानले गेले. कदाचित नानावटींच्या बाजूने साक्ष देऊन सिल्व्हियाने आपल्या पापाचे प्रायश्चित्त घेतले, असे मुंबईकरांच्या नैतिक न्यायव्यवस्थेने मानले असेल. अहुजा मात्र दोषी ठरला, तो एका नौदल अधिकाऱ्याच्या पत्नीचे प्रेम अव्हेरण्याची नैतिकता त्याने दाखविली नाही म्हणून आणि हा गुन्हा देहदंडास योग्य मानला गेला. भावनेच्या या प्रवाहात ज्युरी वाहून गेले, तरी कोर्टाने आपले कर्तव्य बजावले. नानावटींवर खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याचा निष्कर्ष कोर्टाने काढला. सुप्रीम कोर्टाने त्यावर शिक्कामोर्तब केले आणि नानावटींना जन्मठेपेची शिक्षा झाली. पुढे राज्यपालांनी ती माफ केली आणि नानावटी कुटुंबासह देश सोडून कॅनडाला गेले, ते न परतण्यासाठी. राज्यपालांनी ही शिक्षा माफ करताना काय निकष लावले असतील? नानावटी हे नौदलात उच्चपदस्थ अधिकारी होते आणि ते कार्यक्षम अधिकारी असल्यामुळे? की हा खून नसून परिस्थितीमुळे उद्भवलेला सदोष मनुष्यवध आहे असं मानून? ह्याचाच अर्थ असा की न्यायव्यवस्था देखील शिक्षा ठोठावताना पार्श्वभुमीचा विचार करते. http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by वरदा on Wed, 07/16/2008 - 19:21

In reply to विचार करायला लावणारा प्रश्न by सुचेल तसं

Permalink

खूपच अभ्यासपुर्ण प्रतिक्रीया

मला ही केस माहीत होती..म्हणजे ऐकली होती...पण तुम्ही योग्य वेळी योग्य उदाहरण दिलंत.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Wed, 07/16/2008 - 19:26

Permalink

नानावटी खुन खटाला.

नानावटी खुन खटाला हा अजरामर झाला आहे म्हणजे न्याय व्यवस्थेत काम करणार्या बहुताश: लोकाना हा खटला माहित आहे. आता नेव्हीत आणि त्याचे सबध तेवढे वरचे होते.पण सामान्य नागरिकाच्या दृष्टीने हा खुप उच्च कोटीतला खटला आहे. असे फार कमी होते की खुन केल्यावर जन्मठेप हो ऊन राज्यपाल/ राष्ट्र्पती त्याची शिक्षा माफ करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on Wed, 07/16/2008 - 20:48

Permalink

कायदा

कायदा एखाद्या गुन्ह्याबद्दल शिक्षा देताना पार्श्वभूमीचा विचार करते.उदा: पहिला गुन्हा , सामाजीक पार्श्वभूमी ,गुन्हेगाराचे वय वगैरे वगैरे .काही वेळा सक्त ताकीद देऊन सोडून देण्यात येते. (दारु पिऊन गाडी चालवणे.) काही वेळा आर्थीक दंड करून सोड्ण्यात येते. दारुच्या नशेतला खून , कट करून केलेला खून , खुनाचा हेतू नसताना झालेली हत्या या सगळ्याचा विचार वेगळ्या कलमाखाली होतो.बलात्कार अल्पवयीन मुलीवर (कलम ३७६) हा जास्त दंडनीय आहे . समस्या अशी आहे की आपले कायदे फार जुने झाले आहेत. त्यामुळे काही वेळा छोट्या गुन्ह्यासाठी मोठी सजा लागते. एका मिल मजूराला १५ ग्रॅम टिनोपाल चोरले म्हणून दिड वर्षाची शिक्षा झालेली पाहिली आहे. थोडक्यात सांगायचे तर पार्श्वभूमी आपोआप लक्षात घेतली जाते.पण कायदे फार जुने आहेत.पण पुढाकार घेणार कोण?
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Wed, 07/16/2008 - 22:22

Permalink

खर्॑च.

पण कायदे फार जुने आहेत.पण पुढाकार घेणार कोण? तुमचे म्हणने अगदी खरे आहे ब्रिटीशा॑नी घालुन दिलेले कायदेच आपण स्वात॑त्र्या न॑तर ही पाळत बसलो आहोत मला असे वाटते ही जसा समाज तसा कायदा केला पाहिजे. पुर्ण नविन कायदा अस्तित्वात आला पाहिजे आणि शिक्षा देन्याचा कालावधी ही ठरला पाहिजे. कोर्टाच्या कागदी घोडे कमी केले पाहिजेत. तपास य॑त्रणा ही अधिक सुधारली पाहिजे.
  • Log in or register to post comments

Submitted by एकलव्य on गुरुवार, 07/17/2008 - 01:59

Permalink

धरावी आणि धरली जाते देखील!

"शिक्षा ठोठवतान गुन्ह्यामागची पार्श्वभुमी जमेस धरावी काय ?" नक्कीच धरावी आणि तशी ती धरली जाते देखील. कायदा हा तर पाळायलाच हवा पण हा गुन्हा म्हणजे ही शिक्षा असा एकास एक नियम अस्तित्वात नाही. शिक्षा किती तीव्र द्यायची याचा न्याय करण्यासाठी तर योग्य "माणूस" हवा. (१) खून - मस्तीसाठी केलेला खून, क्षणिक रागात झालेला खून, राजकीय हत्या, बालहत्या आणि चिथावणीखोर भाषणांतून झालेल्या हत्या या प्रत्येकासाठी दिली जाणारी शिक्षेची तीव्रता वेगळी असते. (२) चोरीच्या बाबतीतही का आणि कोणत्या परिस्थितीत गुन्हा घडला यावर न्यायाधीश शिक्षा ठरवितात. (३) अगदी इतकेच नव्हे तर न्यायदानास अतिविलंब झाल्यास आता शिक्षा देण्यात अर्थ नाही याचीही जाण (काहीवेळा पळवाट) कायदा ठेवतो. दहा वर्षापूर्वी केलेल्या चोरीबद्दल आज एखाद्याला शिक्षा करणे म्हणजे चोर सोडून सन्याशाला सुळावर चढविण्यासारखे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. असो... शितल - आपला लेख आवडला. - एकलव्य
  • Log in or register to post comments

Submitted by राधा on गुरुवार, 07/17/2008 - 05:10

Permalink

हममममम.....................

विचार करायला लावणारा लेख आहे ग..............
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 07/17/2008 - 14:21

Permalink

गुन्ह्याम

गुन्ह्यामागची पार्श्वभुमी समजल्याने गुन्हा का केला,करवला गेला यांचे निदान करण्यास सोपे जाते.. धान्य चोरले = गुन्हा (ज्याच धान्य चोरीला गेल त्याचे नुकसान झाले व त्याला न्याय मिळाला पाहिजे हे अगदी मान्य) कारण :- पोटातली भुक !!!!! इथ चोरीचा उद्देश कुठल्याही प्रकारची चैन करणे हा नसुन्..जगण्यासाठी केली गेलेली धडपड आहे असे मला वाटते. परिस्थीतीमुळे माणुस कोणत्याही थराला जाऊ शकतो हे काही वेगळ सांगायची गरज नाही !! (दोन वेळच पोटभर जेवणार्‍यांना भुकेचा अर्थ खरचं कळतो का ?) ह्या विचारात पडलेला.. मदनबाण.....
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on गुरुवार, 07/17/2008 - 16:59

Permalink

गुन्हा हा

गुन्हा हा धंदा होत असेल तर त्याला जबरी शिक्षा ही झालीच पाहिजे!!! हे मात्र पटल...... बाकी आपल्या कडे ब-याच प्रकार च्या चो-या होतात.... आय मीन राज्कारणी,फिक्सीन्ग्,वगैरे... आणी वर म्हटल्या प्रमाणे "पकडला जातो तोच चोर...." मग एखाद्याच्या हातुन चुकुन किवा अगदी असहाय्य्ते पोटी गुन्हा घडला , तर त्यामागील पाश्वभुमीचा विचार करुनच शिक्षा व्हावी,आणी केली जाते..... अगदी हेच म्हणायच होत मला ही.... बाकी वरील चर्चा वाचुन मूड बनला बर...!!!!!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments

Submitted by कोडगा on Fri, 07/18/2008 - 18:47

Permalink

कायदा बदल आवश्यक

जरी कायदा बदल आवश्यक असला, तरी समाजातील भ्रष्टाचार कमी होणे महत्वाचे आहे. ह्यासाठी स्वतःपासून सुरुवात करुया.....
  • Log in or register to post comments

Submitted by मुकेश on Sun, 07/20/2008 - 19:04

Permalink

चुकांचे समर्थन करू नये....

शिक्षा ठोठवतान गुन्ह्यामागची पार्श्वभुमी जमेस धरू नये. गुन्हा हा गुन्हाच असतो, त्याचे समर्थन करू नये असे मला वाटते. फक्त गुन्हा हा स्वसंरक्षणासाठी झाला असेल तरच गुन्ह्यामागची पार्श्वभुमी जमेस धरावी. मुकेश
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Sun, 07/20/2008 - 20:14

Permalink

ती धरली जातेच.

फक्त गुन्हा हा स्वसंरक्षणासाठी झाला असेल तरच गुन्ह्यामागची पार्श्वभुमी जमेस धरावी. पण बाकीच्या वेळी ही पार्श्वभुमी जमेत धरतात ,कागदोपत्री आणि साक्षीदारा॑च्या जबाणीवरूनपण जर तो गुन्हा सिध्द झाला तर त्यावेळी ही जी शिक्षा देण्यात येते तेव्हा त्या गुन्हाची पार्श्वभुमी असा गुन्हा त्या गुन्हेगारने याआधी केला आहे का, गुन्हा चुकुन झाला आहे का असे अनेक प्रकार असतात.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com