(खेळी)

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
15 Jul 2008 - 2:47 pm

स्वातीताईं फडणीसांचीखेळी वाचून आमच्या मनात गेले कित्येक दिवस आमच्या विडंबनांना घटत चाललेल्या प्रतिसादांचे खरे कारण समजले..

(खेळी)

लिहित होतो मी........
वाचक चकवत होते.

वाहवा प्रतिसाद!!
कधीच मला न येणारे.

मग ठरवल,
बास!.
आता नाही लिहायचे,
पुरे झाला कविता-विडंबनाचा खेळ,
आणि थांबलो.
एका जागी निश्चल.
जिंकल्या सारखा.
:
:
:
खुप उशिरा कळलं,
ती ही त्यांचीच खेळी.

पुन्हा बरोबर पडलेली.

========================
केशवसुमार...................... १५-०८-२००८

विडंबन

प्रतिक्रिया

सहज's picture

15 Jul 2008 - 2:49 pm | सहज

अचुक खेळी आपलं विडंबन :-)

स्वगतः अरे प्रतिसाद नको देउ. थांबलेला सुटायचा परत!

आनंदयात्री's picture

15 Jul 2008 - 2:52 pm | आनंदयात्री

>>ती ही त्यांचीच खेळी.

चुकुन " ती ही तात्यांचीच खेळी " असे वाचले.

केशवसुमार's picture

15 Jul 2008 - 2:56 pm | केशवसुमार

हळू बोला
डायरशेठ लगेच नवीन नियम काढतील,
(डायरशेठला घाबरणारा :SS )केशवसुमार

साती's picture

15 Jul 2008 - 6:39 pm | साती

मी सुद्धा असंच वाचंलं.
चांगलं विडंबन!
साती

स्वाती फडणीस's picture

15 Jul 2008 - 2:54 pm | स्वाती फडणीस

:)

अमोल केळकर's picture

15 Jul 2008 - 3:30 pm | अमोल केळकर

मस्त विडंबन
मुळ खेळी ही छान

आमची ही एक ((खेळी ))
========================
अमोल केळकर.....................१५-८-२००८

((खेळी) )

शिकत होतो मी....
शिक्षक फसवत होते.
गणिती विषय !!
कधीच मला न येणारे
मग ठरवल
बास !
आता नाही शिकायचे.
पुरे झाला पुस्तकी अभ्यास
आणि थांबलो.
एका जागी शांत
जणु अध्यात्मिक गुरु
:
:
खुप लवकर कळले
हीच योग्य खेळी

कमी कष्टात
पैसा मिळवुन देणारी
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

केशवसुमार's picture

15 Jul 2008 - 3:59 pm | केशवसुमार

केळकरशेठ,
धन्यवाद!!.. आहो प्रतिसाद म्हणून काय देता तुमची खेळी.. स्वतंत्र धागा टाका
केशवसुमार

अमोल केळकर's picture

15 Jul 2008 - 4:08 pm | अमोल केळकर

साहेब,
ट्रॅफिक जाम टाळण्याचा प्रयत्न करतो आहे. :D

(आपली शिकवणी लावण्यास उत्सुक ) अमोल
(स्वगत : कालच प्रतिज्ञा करुन बसलो आहे की आठवड्यातुन एकदाच स्वतःची गाडी वापरायची आणी आज लगेच नविन धागा हे काही खरे नाही.
आज साहेब खुश आहे , कामात लक्ष आहे म्हणाला )

--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

चतुरंग's picture

15 Jul 2008 - 4:55 pm | चतुरंग

केसुशेठच्या विडंबनाबरोबर डबलसीट बसून आलंय, ट्रॅफिकजॅम नको म्हणून! :D
चतुरंग

केळकर साहेब स्वतंत्र गाडी काढलीत तरी चालेल. मस्त विडंबन.

चतुरंग

ऋषिकेश's picture

15 Jul 2008 - 3:33 pm | ऋषिकेश

चांगले विडंबन आवडले :) :) ..
पण मुळ कविता जास्त आवडली :)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश

स्वाती फडणीस's picture

15 Jul 2008 - 3:39 pm | स्वाती फडणीस

मुळ कविते खाली प्रतिसाद दिले तरी चालतील

आनंदयात्री's picture

15 Jul 2008 - 3:53 pm | आनंदयात्री

असेच म्हणतो.

(सहमत) प्रसादलाडु.

चतुरंग's picture

15 Jul 2008 - 4:58 pm | चतुरंग

चतुरंग

प्राजु's picture

15 Jul 2008 - 6:36 pm | प्राजु

केसु आणि केळकर साहेब... दोघांनाही ..
दोन्ही मस्त विडंबने.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सर्किट's picture

15 Jul 2008 - 10:25 pm | सर्किट (not verified)

केसु शेठ आणि केळकर शेठ,

दोघांनाही १० पैकी ७ मार्क. (मुक्तछंदाच्या विडंबनाला आम्ही यापेक्षा अधिक मार्क देत नाही.)

दोन्ही विडंबने आवडलीत.

- सर्किट

केशवसुमार's picture

16 Jul 2008 - 12:03 pm | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)केशवसुमार