मी एक फळा...
प्रत्येकाच्या आयुष्यात रंगांची ऊधळण करणारा........
रंग माझा काळा नांव माझे फळा,
घर माझी शाळा, जीथे पिकतो उद्याच्या सुजाण नागरीकांचा मळा,
हेडमास्तर इथले मालक विद्यार्थी त्यांचे बालक,
आई वडीलांनंतर हेच आमचे पालक,
ह्याच फळ्यावर गीरवतो अनेक विषयांचे धडे,
त्याचमुळे जीवनात प्रत्येकाचे पाऊल पडते पुढे....
असा मी असलो जरी काळा तरी जीथे पिकतो उद्याच्या सुजाण नागरीकांचा मळा
सुजाण नागरीकांचा मळा.......
प्रतिक्रिया
7 Nov 2011 - 2:15 am | पाषाणभेद
मंग काय! ठोका हो! ठोका हो!! ठोका हो!!!
इथंच फळ्यासाठी खिळा!
8 Nov 2011 - 3:20 pm | मेघवेडा
हा हा.. पाभे, तुम्ही मागं एकदा 'बाई इथंच ठोकू का खिळा' नामक धमाल युगुलगीत लिहिलं होतं ते आठवलं!
होऊन जाऊ द्या आणखी एखादं!
7 Nov 2011 - 11:07 am | मदनबाण
छान...
आमचा एक मास्तुर्या डस्टर फेकुनशान मारायचा... त्याची आठवण आली. ;)
7 Nov 2011 - 11:26 am | किसन शिंदे
शाळा कुठली?? मो.ह. विद्यालय का?? सुर्यवंशी नावाचे आमचे एक सर सुध्दा हाच प्रकार करायचे.
7 Nov 2011 - 11:30 am | मदनबाण
व्हय...! तू मो.ह. चा का रे ? इथले बरेच जण मो.ह चे आहेत रे ! :)
सुर्यवंशी नावाचे आमचे एक सर सुध्दा हाच प्रकार करायचे.
आम्हाला पीटी ला होते रे.., कंची ब्यॅच तुझी ?
7 Nov 2011 - 11:13 pm | यकु
पहा मास्तर किती दुरदर्शी होते ते..
घ्या आता एकमेकांची गळाभेट!
7 Nov 2011 - 11:38 am | लीलाधर
धन्यवाद.....
छान...
आमचा एक मास्तुर्या डस्टर फेकुनशान मारायचा... त्याची आठवण आली.
अरे आता गेले ते दिवस आणि राहील्या त्या फक्त आणि फक्त आठवणी........
7 Nov 2011 - 11:55 am | मदनबाण
अरे आता गेले ते दिवस आणि राहील्या त्या फक्त आणि फक्त आठवणी........
खरंय...
7 Nov 2011 - 12:26 pm | गवि
आमचे इंग्लिशचे सर तर ऐशा आवेशाने डस्टर मारायचे की तो खरंच टाळक्यात बरोबर जागी बसला असता तर तत्क्षणी "गेल्या त्या आठवणी" अशी फिल्मी कंडिशनही होऊ शकली असती..
7 Nov 2011 - 11:34 am | किसन शिंदे
:bigsmile:
आमचं वर्गमास्तर व्हतं ते. :) २००० ची बॅच.
7 Nov 2011 - 12:06 pm | मदनबाण
आमचं वर्गमास्तर व्हतं ते. २००० ची बॅच.
अच्छा असं हाय काय ! ;) म्या ९७ ला बाहेर पडलो.
चोपडे मास्तर होते का रे तुला ?
जाम मारायचे !!! आमचा तळ्या ( माझा मित्र तळेगावकरला आम्ही तळ्या याच नावाने हाक मारायचो.) मास्तुर्याचं फिक्स गिर्हाईक होत. ! लयं मारं खायचा... ;)
एकदा मास्तर शिकवत होते... त्यांचा चेहरा फळ्याकडे होता... हा पठ्या बाजुलाच बसलेला होता, मास्तुर्याच लक्ष नाय हे पाहताच त्याने टेबलावर ठेवलेल्या पुस्तकाची पाने उलटली... मास्तर थोड्या वेळाने वळले. परत पुस्तकाचे पान त्यांनी त्यांना हवे होते तिथे केले, परत फळ्याकडे चेहरा करुन लिहायला लागले,तळ्या गप्प बसेल कसा ? हळुच आला आणि परत पाने पलटली !... असे २-३ वेळा झाले ! मास्तुर्या वैतागला ! पंखा चालु नाही तर पाने पलटतात कशी ? पुन्हा तसेच करताना तळ्या फसला ! मगं काय चांगला बुकलुन काढला त्याला ! ;)
गेले ते दिवस...
7 Nov 2011 - 12:19 pm | किसन शिंदे
चोपडे मास्तर होते का रे तुला ?
होते तर!! बीजगणित शिकवायला, पण त्यांच्या तासाला कोणत्याही विद्यार्थ्याने वर्गात अभ्यास केल्याचं स्मरत नाही. एवढा गोंधळ असायचा कि ते काय शिकवायचे हेच आम्हाला कळायचं नाही.
मित्राचा किस्सा लय भारीये, पण आमच्या बॅचला त्यांच्याकडून मार असा कोणी खाल्लाच नाही.
7 Nov 2011 - 12:31 pm | मदनबाण
होते तर!! बीजगणित शिकवायला, पण त्यांच्या तासाला कोणत्याही विद्यार्थ्याने वर्गात अभ्यास केल्याचं स्मरत नाही. एवढा गोंधळ असायचा कि ते काय शिकवायचे हेच आम्हाला कळायचं नाही.
हॅहॅहॅ म्हणुनच माझं गणित कच्च राहिल रे. कळ्ळ आता ! ;) गोंधळ घालण्यासाठीच त्यांचा तास होता ! ;)
त्यात शाळेच्या मागे मशिद का दफन भूमी आहे,,,,बर्याच वेळा त्यांचा तास चालु असताना भोंग्यातुन बांगेचा आवाज यायचा... त्या आवाजाला ठसन देण्यासाठी शिवसेनेच्या शाखेतुन शिवाजी महाराजांचा पोवाडा लावला जायचा ! इकडुन अल्ला ची बांग आणि तर तिकडुन महाराजांनी अफजल खानाचे पोट फाडुन कोथळा बाहेर काढला इ. ;)
मग काय मागे ती धमाल आणि वर्गात ही धमाल !
थोडक्यात फुल टु धमाल ! ;)
(धाग्याचा खव केल्या बद्धल क्षमा मागत आहे.)
7 Nov 2011 - 12:40 pm | किसन शिंदे
त्यात शाळेच्या मागे मशिद का दफन भूमी आहे,,,,बर्याच वेळा त्यांचा तास चालु असताना भोंग्यातुन बांगेचा आवाज यायचा... त्या आवाजाला ठसन देण्यासाठी शिवसेनेच्या शाखेतुन शिवाजी महाराजांचा पोवाडा लावला जायचा ! इकडुन अल्ला ची बांग आणि तर तिकडुन महाराजांनी अफजल खानाचे पोट फाडुन कोथळा बाहेर काढला इ.
मग काय मागे ती धमाल आणि वर्गात ही धमाल !
हा हा हा..हॅहॅहॅ :D :D :D
आठवतयं रे, हसून हसून पुरेवाट व्हायची अगदी. :bigsmile:
मैदानाच्या मागच्या बाजुला असलेल्या लाकडाच्या वखारीत जोराने टोलवलेला चेंडू जावून पडायचा आणी मग त्या वखारवाल्याचं आणी क्रिकेट खेळणार्या पोरांच हे तुफान हुज्जत घालणं चालू व्हायचं ते अगदी मधली सुट्टी संपेपर्यंत. ;)
7 Nov 2011 - 7:08 pm | ५० फक्त
फळा ते चेंडुफळी - धाग्याचा प्रवास छान चालु आहे.
8 Nov 2011 - 11:30 am | अत्रुप्त आत्मा
जीथे पिकतो उद्याच्या सुजाण नागरीकांचा मळा
सुजाण नागरीकांचा मळा...........:-D याच्या नंतर आंम्हाला प्रती वाक्य भळा भळा हसू आले... ;-)
या वरुन आंम्हला खडू,डस्टर,ब्लॉक-बस्टर :-p अश्या फसफसुन वहात्या प्रतिभेच्या कविता सुचु लागल्या आहेत...
2 Mar 2012 - 6:47 pm | वपाडाव
रंगांची उधळण अरे करतो आहे फळा...
का त्यांना बघुन तु आत्म्या काढतो आहेस गळा...
वाहते करुयात पाण्याला काढुन तुंबलेला बोळा...
नवकव्यांची साथ जरा देत जा तु बाळा...
डोंगराला आग लागली पळा पळा पळा...
- (आद्यनवविडंबक) वपाडाव
2 Mar 2012 - 8:03 pm | मोहनराव
वप्याच्या अंगी नाना कळा..
आद्यनवविडंबक म्हणुन काढतोय गळा!! ;)
2 Mar 2012 - 10:22 pm | अत्रुप्त आत्मा
तुमच्या कशास वाहू लागल्या हो भावना या भळाभळा
गरोदर झाले दुसरेच कुणी आणी तुमच्या पोटी उठल्या कळा
आंम्ही त्यांनाच चावतो जे,पिकवतात नुसताच शब्दांचा मळा
तुंम्ही व्यर्थ यात पडू नका... जा तिकडे लव्-कर पळा :-p
2 Mar 2012 - 7:12 pm | अन्नू
आत्ताच मी शाळा हा चित्रपट पाहीला आणि आत्ताच हा शाळेचा फळा इथे दिसला! :)
9 Apr 2012 - 3:57 pm | प्रचेतस
चचा, कुठे गेलास रे?
अजून एक कविता येऊ देत.
27 Apr 2012 - 8:34 am | मोदक
+१
:-D
18 Jun 2012 - 9:36 am | प्रचेतस
शाळा नुकत्याच सुरु झाल्याने 'फळा' सारखी वास्तवदर्शी कविता पुन्हा एकदा वर काढत आहोत. :)
21 Jun 2012 - 2:35 am | मोदक
व्वा.. झकास रे चचा.. :-D
4 Jul 2012 - 10:50 am | प्रचेतस
बारसं झालेलं दिसतंय परत एकदा.
4 Jul 2012 - 10:57 am | लीलाधर
घुगर्र्या वाटा हो परत एकदा :)
4 Jul 2012 - 11:05 am | प्यारे१
बारश्याच्या शुभेच्छा!
बाकी ही लीला कोण?
4 Jul 2012 - 12:58 pm | अत्रुप्त आत्मा
बाकी ही लीला कोण? >>> ही लीला प्रभूची हो प्यारे काका, तुम्ही आध्यात्मिक आहात,आम्च्या सारख्या इहलौकिकांनी या ऊप्पर आणखी काय सांगावे..? ;-)
3 Dec 2012 - 10:44 am | सस्नेह
हा धागा मजकूर व प्रतिसादांसह वाचण्यास मिळेल का ?
3 Dec 2012 - 11:43 am | मोदक
धाग्याचा मजकूर व प्रतिसादांवर तुमचा प्रतिसाद वाचण्यास मिळेल का? ;-)
3 Dec 2012 - 12:29 pm | अभ्या..
मोदकराव आलेत मग
आम्हाला सेंचुरी बघायला मिळेल का? ;)
3 Dec 2012 - 1:29 pm | अत्रुप्त आत्मा
4 Dec 2012 - 12:18 am | मोदक
अरे ही चौथी की पाचवी इनींग सुरू आहे..
या फळ्यावर खडू, डस्टर अशी बरीच विडंबने कोरली गेली होती.
हे काव्य त्या भळभळत्या जखमा कायम वाहत राहील... :-D
3 Dec 2012 - 1:40 pm | वात्रट
फळा आवड्ला..
3 Dec 2012 - 3:40 pm | सस्नेह
फळ्याच्या ‘कळा’ पाहून हसले भळाभळा
असेच धागे ढवळा अन लावा भुइनळा..!
काय जमलंय का लीलाधरा ?
3 Dec 2012 - 6:43 pm | अत्रुप्त आत्मा
..........................................
@असेच धागे ढवळा अन लावा भुइनळा..!>>>
4 Dec 2012 - 4:16 pm | ५० फक्त
मा. बुवा, ढवळायची अन भुईनळ्याची स्माईली मिळ्ळी नाय का ओ.
11 Aug 2014 - 1:11 pm | तिमा
ह्या फळ्यामुळेच फुलला
काही 'सुजाण' नागरिकांचा मळा
आणि त्यांचे भाग्य वाहिले फळफळा.