नमस्कार !
*******************************
सर्वप्रथम,
गणपा,आपला 'मदत -मिपावर फोटो चिकटवणे.' हा धागा खूपच उपयोगी आहे.
वल्ली आणि पैसा -धन्यवाद,तुम्ही मदत केल्यामुळेच मी छायाचित्रे टाकू शकलो.
धागा वाचून मला मी केलेली चूक कळाली आहे.मी छायाचित्राच्या 'प्रॉपरटीज' मध्ये जाऊन युआरएल कॉपी न करता ब्रोवसर मधली केली होती म्हणून हा घोळ झाला.
पहिला धागा संपादित न करता आल्यामुळे,हा नवीन धागा टाकला आहे.
माझी संपादक मंडळाला नम्र विनंती आहे कि त्यांनी पहिला धागा 'घरगुती आकाशकंदील' हा धागा उडवून टाकावा.
कदाचित,या आधी धागा संपादित करण्याचा पर्याय उपलब्ध होता.
*******************************
सर्व मिपाकरांना व प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!!
आधीपासूनच कलेची आवड असल्यामुळे,गणपतीचा देखावा घरीच वेळ काढून बनवतो.
दिवाळीला सुट्ट्या कमी असल्यामुळे आकाशकंदील बनवायला वेळ कधीच मिळाला नाही.पण यंदा दिवाळीच्या दोन दिवस आधीपासून सुट्ट्या लागल्यामुळे,आकाशकंदील बनविण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आकाशकंदील उजेडात !
आकाशकंदील रात्री !
विद्युत पणत्या !
आणखी काही छायाचित्रे !
हि दिवाळी सर्वांना आनंदाची,सुखाची,समृद्धीची आणि भरभराटीची जावो हि सदिच्छा !!!!
प्रतिक्रिया
28 Oct 2011 - 6:05 pm | प्रास
आता फोटो दिसत असल्याने प्रतिसाद देतोय.
छान आहे तुमचा आकाश कंदिल आणि त्याचे फोटोसुद्धा!
तो रांगेत लावलेल्या पणत्यांचा फोटोही खूप छान आहे. आवडला.
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
:-)
28 Oct 2011 - 6:24 pm | दादा कोंडके
अशा आकाशदिव्यांना जिलेटीन कागद लावण्यापेक्षा रंगीत तावच छान दिसतो. त्यामुळे युनिफॉर्म मंद प्रकाश पडतो.
5 Nov 2011 - 1:17 pm | स्वतन्त्र
म्हणूनच मुद्दाम पाताक्याचा कागद वापरलाय !
28 Oct 2011 - 7:42 pm | प्रचेतस
आकाशकंदिल सुरेखच बनवला आहे. गॅलरीतल्या पणत्या आणि माळेच्या पार्श्वभूमीवर अधिकच खुलुन दिसत आहे.
28 Oct 2011 - 7:54 pm | प्राजु
विद्युत पणत्या????????????????????????????
माझ्यासाठी न्युजच आहे ही. अशा लाईटच्या माळेसारख्या पणत्या मिळतात का हल्ली?
आवांतर : आकाशकंदील खूप सुंदर आहे.
28 Oct 2011 - 7:57 pm | प्रचेतस
इथे सगळीकडेच मिळतात हल्ली त्यापण फक्त १०० रूपयात. :)
28 Oct 2011 - 8:01 pm | प्रभो
त्यावर फुलबाजी लावता येते का नेहमीच्या पणतीसारखी ?? ;)
28 Oct 2011 - 8:10 pm | प्राजु
विद्युत फुलबाजी लागेल. :)
28 Oct 2011 - 8:06 pm | गणपा
गेल्या वर्षी ही असली पणत्यांची रांग पाहुन मी फसलो होतो.
लांबुन अगदी खर्या पणत्याच वाटतात.
असाच पारंपारिक आकाश कंदील आम्ही आमच्या ईमारतीसाठी बनवायचो. फक्त आकाराने तो किंचीत मोठा (४ ते ५ फुटी) असायचा.
एकदा सांगाडा केला की दरवर्षी केवळ थोडी डागजुगी करावी लागे. वरुन रंगीत कागद लावला की झालं. कणिक भिजवुन खळ म्हणुन वापरायचो. आदल्या रात्री सगळे मित्र मंडळ गच्चीवर एकत्र जमुन टिंगल टवाळी करत रात्र भर जागत भल्या पहाटे पर्यंत आकशकंदील तयार करत असु.
28 Oct 2011 - 8:16 pm | रेवती
फोटो आवडले.
1 Nov 2011 - 6:24 am | मीनल
खूप छान कंदिल. मला उजेडतला सर्वात आवडला
1 Nov 2011 - 6:49 am | टुकुल
प्रिया ब ह्यांच्या धाग्यातुन प्रेरणा घेवुन आकाश कंदिल बनवल तर खरा, पण फोटो टाकायला बराच आळस केला, पण आता आळस झटकतो :-)
--टुकुल
5 Nov 2011 - 1:16 pm | स्वतन्त्र
टुकुल,आकाशकंदील भारीच जमलाय !
5 Nov 2011 - 1:19 pm | स्वतन्त्र
सर्वांचे मनापासून आभार !