कसे आयुष्य फुलून जाते ..!!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
21 Oct 2011 - 9:26 am

कशी अचानक गाठ पडते..?
कसे आयुष्य फुलून जाते..!
ती आली की ,
कसे ऋतू बदलून जातात
अगदी हवेहवेसे होऊन जातात
आयुष्य म्हणजे कविता होऊन जाते
मस्त सूर नि ताल
मन कसे गाऊन जाते ....!!

कशी अचानक फुलापाखारासारखी येते
मनाच्या आभाळात गिरकी घेत झुलत राहते
कसे मनसोक्त सूर लागतात
सूर कसे ताल धरतात
सगळेच कसे बदलून जाते
निळ्या निळ्या आभाळाचे
छान कसे गाणे होते ...?

ती आठवली की
मन कसे सैरभैर होते
शरीरावर रोमांच उठून जातात
कसे रक्तामध्ये दिवे पेटून जातात
कोणीतरी काळीज ओंजळीत घेऊन
कुणालातरी देऊन टाकते
ती दिसली की असेच होते
असेच होऊन जाते

आपण सर्वस्वी तिचे होऊन जातो
काळीज आपले हरवून बसतो
शप्पत हे खरे असते
हरवल्याचा हिशेब कोणी ठेवीत नाही
ती आपली झाली की खरेच असे होते
हरवण्यात देखील गम्मत असते ..!!

मांडणी

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

21 Oct 2011 - 10:01 am | मदनबाण

मस्तच ! :)

पाषाणभेद's picture

21 Oct 2011 - 10:06 am | पाषाणभेद

कवितेमुळे एकदम हरवून गेलो. माझ्याही मनात काल असलेच सोज्वळ विचार येत होते.
पण त्यानंतर मी एक लावणी लिहीली. (सवय! दुसरं काय?) आता येथे टाकत नाही त्यामुळे काळजी करू नका.

मदनबाण's picture

21 Oct 2011 - 10:16 am | मदनबाण

त्यानंतर मी एक लावणी लिहीली.
खी खी खी... येउ दे दफोराव. ;)
हल्ली लावण्या पाहण्याची लयं आवड उत्पन्न झाली हाय बघा ! ;)
गुरु ठाकुर इतक्या मस्त लावण्या लिहतो की इचारु नका ! :) नटरंग मधे त्यानी लिहलेली सर्व गाणी / लावण्या क्लासच आहेत. :)

विदेश's picture

21 Oct 2011 - 11:03 am | विदेश

ती आली की, ...
आयुष्य म्हणजे कविता होऊन जाते

छान !

अत्रुप्त आत्मा's picture

22 Oct 2011 - 11:37 pm | अत्रुप्त आत्मा

वा रं वा आमच्या दादानु...कडक परफॉरमन्स दिलाना राव तुमी...

बाजीगर-बाकी,तुमची हार आवडली बरका आमाला!

सुहास झेले's picture

23 Oct 2011 - 1:39 am | सुहास झेले

सुंदर :) :)