Father Complex
५०शी ला आलो होतो,...छंद म्हणुन C++ चा क्लास लावला
ति पण यायची क्लासला....असेल १९-२० ची.....
काळीसावळि..पण उफाड्याची...माझ्या बाजुलाच तिचा कॉम्प होता..
बघितले कि हसायची...क्लास सुटला कि माझी वाट खाली थांबायची.
सारखी माझ्या कडे बघत रहायची.....
मला जरा सार संकोचल्यागत होत होते...काहिस ठीक नव्हत..
कारखान्याच्या कामासाठी मी ३-४ दिवस बाहेरगावि होतो..
३-४ दिवसानि क्लास ला गेलो तर ति खालीच वाट बघत होति..
डोळे रडुन सुजलेले...’सर तुम्हि कुठे होता?
मला किति काळजी वाटत होति तुम्हि आला नाहि म्हणुन"
माझा हात धरत ति म्हणाली...सारच अवघड होत चालल होत
मी बोललो नाहि...ठरवल द्यायची तिला समज..
एकदा क्लास संपल्यावर तिला बोललो..फाडफाड..रडायला लागली..
दुसऱ्या दिवशी पहिल..ति क्लासला आली नव्हति..
४-५ दिवस ति आली नहि ...मी पण अस्वस्थ झालो
पत्ता घेवुन घरी गेलो..घरी आईच होति..ओळख करुन दिलि....
बोलताना समजल...त्यांचा डायव्हर्स झाला होता..
ति तापान आजारी होति...आत पलंगावर झोपली होति..मलुल, ग्लानीत,
कपाळावर हात ठेवला..ताप जाणवत होता..
हाताचा स्पर्श होताच ति मंद पणे बडबडली" पपा, पपा....आलात
मी सुन्न झालो..बाहेर येवुन बराच वेळ विचार करत होतो........
______________
Avinash...............
प्रतिक्रिया
9 Oct 2011 - 12:06 pm | पैसा
सुन्न करणारा अनुभव...
9 Oct 2011 - 12:09 pm | सोत्रि
असेच म्हणतो!
- (सुन्न आणि विचारमग्न) सोकजी
9 Oct 2011 - 1:33 pm | प्रभाकर पेठकर
सुन्न करणारा अनुभव...
हा अनुभव आहे? की कल्पनाविलास?
पन्नाशी म्हणजे काही फार वय नाही. पण अर्थात, वयातील फरक लक्षात घेऊन मुळातच अश्या भावनेस मनात थारा देता कामा नये. तसेही, कवीच्या मनातील भावना त्यामुलीच्या मनात नसतील तर तिच्या वर्तणूकीतून, नजरेतून हे सहज लक्षात यावे. एखाद्या प्रेयसीच्या, प्रियकरा॑कडे पाहण्यातून व्यक्त होणार्या, भावना आणि मुलीच्या, पित्याकडे पाहण्यातून व्यक्त होणार्या, भावनांमध्ये जमिन-अस्मानाचा फरक असतो.
असो. माणूस आहे. चुका व्हायच्याच.
भविष्यासाठी शुभेच्छा.
9 Oct 2011 - 4:25 pm | स्वानन्द
असहमत. दोघांमध्ये अजून कुठलेच नाते निर्माण झालेले नसेल तर केवळ पाहण्यातून आवड किंवा नावड समजू शकते, आवड असेल तर ती कुठल्या अँगल ने आहे हे नि:संदीग्धपणे सांगणे कठीण आहे. फारतर त्या व्यक्तीच्या इतर कृतींकडे पाहून जजमेंट घेता येईल की तिला काय नाते अपेक्षित आहे.
9 Oct 2011 - 5:42 pm | प्रभाकर पेठकर
दोघांमध्ये अजून कुठलेच नाते निर्माण झालेले नसेल तर....
नाते मनाने मानण्यातून निर्माण होते. कवी, मुलीच्या भावनांना प्रेयसीचा प्रतिसाद मानतो आहे. कारण कुठेतरी खोल मनात त्याला तसे नाते अभिप्रेत असावे. पण मुलीच्या मनांत पित्याच्या संदर्भातील भावना असल्यामुळे मनांत निर्माण झालेल्या ह्या भिन्न नात्यांनी भावनांचा जो गुंता निर्माण झाला आहे त्यानेच ह्या काव्यप्रकटनास जन्म दिला आहे असे मला वाटते.
अर्थात, हा माझा तर्क झाला. आपणास असहमत असण्याचा पुरेपुर अधिकार आहे.
9 Oct 2011 - 9:22 pm | ५० फक्त
+१ टु पेठकर काका, जर ती मुलीकडे खरेच मुलीच्या नात्यानं पाहिले गेले असते तर ती उफाड्याची आहे का कशी हा विचार मनात वा मेंदुत आलाच नसता,
9 Oct 2011 - 5:43 pm | पिवळा डांबिस
हाताचा स्पर्श होताच ति मंद पणे बडबडली" पपा, पपा....आलात
मी सुन्न झालो..
सुन्न व्हायला काय झालं? तुम्ही ५०तले, ती २०तली. तुम्ही काय अपेक्षा केली होतीत?
9 Oct 2011 - 8:43 pm | वाहीदा
जमाना बदल रहा हैं !
काही सांगता येत नाही हल्ली , त्या चार्ल्स सोबराजची बायको बघीतली ना कित्ती लहान आहे त्याच्या पेक्षा ..चक्क ४४ वर्षे लहान !
त्यांच्या लग्नाचा हा व्हिडियो पहा ..लग्न एका शातिर(मराठी ?) चोर चे ते पण एका जेल मध्ये आहे की नाही कमाल ?
http://efacebook.in/charles-sobhraj-nihita-biswas-marriage-chemistry/
अन फराहखानचा नवरा ही तिच्या पेक्षा वयाने खुप लहान आहे. केमिस्ट्री कुठे ही कशी ही होऊ शकते.
10 Oct 2011 - 1:08 am | प्रभाकर पेठकर
अशी लग्न जरूर होताना दिसतात आजूबाजूला. परंतू दोघांच्याही मनात एकच भावना असते.
जी मुलगी मनाने एखाद्याला पित्याच्या जागी, प्रामाणिकपणे, मानत असेल ती पुढे त्याच्याशी लग्न करेल असे वाटत नाही.
आणि जी उदाहरणे तुम्ही दिली आहेत ती वेगळ्या 'विश्वातील' माणसे आहेत. त्यांना आपल्या विश्वाचे नियम लागू नसावेत.
10 Oct 2011 - 12:02 pm | वाहीदा
पेठकर काका,
मी हल्लीच्या वयाला न जुमानणार्या लोकांबध्दल बोलत होते, त्याचे एक कारण म्हणून अ.कुलकर्णी का सुन्न झाले याचे विश्लेषण करत होते ही मुलगी लेखकाला पित्याच्या भुमीकेत पहात होती हे स्वतः लेखकाला ही माहीत नव्हते, त्याचे कारणच हल्लीच्या वातावरणात आहे.
10 Oct 2011 - 2:13 pm | प्रभाकर पेठकर
ही मुलगी लेखकाला पित्याच्या भुमीकेत पहात होती हे स्वतः लेखकाला ही माहीत नव्हते
ह्यावर, 'अनुभव????' ह्या माझ्या सर्वात पहिल्या प्रतिसादातच माझे मत दिले आहे. मुलीच्या भावना लेखकाने ओळखायला पाहिजे होत्या. प्रेयसीचे प्रतिसाद आणि मुलीचे प्रतिसाद ह्यात जमिन-अस्मानाचा फरक असतो. तिथेच लेखकाने त्या मुलीस समजण्यात चूक केली आहे. हे त्याने ओळखले नाही म्हणून त्याच्यावर 'सुन्न' होण्याची वेळ आली आहे असे वाटते.
त्याचे कारणच हल्लीच्या वातावरणात आहे.
हल्लीचे वातावरण पुर्वीच्या वातावरणाच्या तुलनेत जास्त (जरा अतीच) मोकळे-चाकळे आहे हे मान्य. पण त्याच बरोबर हल्लीच्या मुलीही पूर्वीच्या मुलींच्या तुलनेत जास्त सजग आहेत. त्या आपल्यापेक्षा वयाने मोठ्या पुरुषास लगेच 'काका' वगैरे बनवून टाकून सुरक्षित होतात. त्यांची शाब्दीक आणि शारीरीक लगट ही अशा 'काका' लोकांनी पित्याच्या भावनेतूनच अनुभवायची असते. असो.
ही कथा, कविता, मुक्त प्रकटन जे काही आहे ते फार सुंदर आहे पण वास्तवापासून दूर आहे.
10 Oct 2011 - 10:21 pm | पिवळा डांबिस
केमिस्ट्री कुठे ही कशी ही होऊ शकते.
मान्य वाहिदाजी, मान्य!
पण इथे धाग्यातल्या कथेत केमिस्ट्री झालेली दिसत नाहिये, एकतर्फीच दिसतं आहे सगळं....
इथे फक्त बायालॉजी अॅक्टिव्ह झालेली दिसतेय!! :)
....आणि त्यामुळे सायकॉलॉजी गंडलीये!!!!!
:)
10 Oct 2011 - 10:40 pm | वाहीदा
इथे फक्त बायालॉजी अॅक्टिव्ह झालेली दिसतेय!!
आणि त्यामुळे सायकॉलॉजी गंडलीये!!!!!
नि:शब्द ! ____/\_____
=))
11 Oct 2011 - 10:50 pm | मन१
आमचाही --------/\---------
9 Oct 2011 - 2:28 pm | पाषाणभेद
कल्पनाविलास छान आहे.
या सुन्न करणार्या अनुभवाचे विनोदातही रुपांतर करता येवू शकते.
9 Oct 2011 - 5:34 pm | मन१
सहमत.
10 Oct 2011 - 11:21 am | विश्वनाथ मेहेंदळे
बहुतेक प्रासंगिक / परिस्थितीजन्य (इथे मला situational असे म्हणायचे आहे) विनोद हे त्यातील पात्रांच्या दु:खातूनच निर्माण झालेले असतात.
9 Oct 2011 - 9:07 pm | रेवती
हम्म्म....
चिनी कम ची आठवण झाली.;)
अकु, तुमच्या तिच्याबद्दल असलेल्या भावना पटल्या नाहीत.:)
तुम्ही तिच्या घरी जाण्याचा चांगुलपणा दाखवलात म्हणून अभिनंदन!
9 Oct 2011 - 9:34 pm | मन१
चीनी कम मध्ये अमिताभ पन्नाशी-साठी उलटून गेलेला तर तब्बू सुद्धा घोडनवरी , चांगली डंगरी आहे.
आमाला तर बुवा अमिताभचाच नि:शब्द आठवला.
10 Oct 2011 - 2:51 am | शिल्पा ब
डंगरी =)) =))
म्हणजे काय हो? भारीच मजेदार शब्द आहे.
10 Oct 2011 - 7:58 am | पाषाणभेद
डंगरी (सौजन्य: आंतरजालावरून विनापरवानगी घेतले)
डंगरी हे एक कारखान्यात सुरक्षितपणे काम करण्यासाठी घालण्यासाठी खास शिवलेले कपडे आहेत. शर्ट व पँट एकत्रच असते.
येथे डंगरी हा शब्द थोराड, तब्बेतीने मजबूत अशा अर्थाने घ्यायचा आहे. मुलांसाठी याच अर्थाचा डंगर हा शब्द आहे. ग्रामीण भागात हे शब्द सर्रास वापरला जातो.
10 Oct 2011 - 9:22 am | ५० फक्त
डंगरी पेक्षा खंगरी शब्द जास्त बरा वाटतो.
10 Oct 2011 - 3:56 pm | पाषाणभेद
नाही. खंगरी शब्द योग्य नसून डंगरी हाच येथे योग्य शब्द आहे. खंगरी म्हणजे जास्त चांगला किंवा वाईटही. खंगरी हा शब्द टपोरीकडे झुकणारा किंवा त्याची उत्पत्ती तेथेच असणारा आहे. याउलट डंगर/डंगरी हा शब्द ग्राम्य बोलीभाषेतला आहे.
डंगरी/ डंगर शब्द म्हणजे खाऊन खाऊन वाढलेला, माजलेला, व्यर्थ कामे वाढवणारा अशा अर्थाने येतो.
10 Oct 2011 - 2:05 pm | वपाडाव
हा शब्द आमच्या तीर्थरुपांना लै वेळा वापरताना ऐकलेले आहे....
मला वाटायचे की याचा उगम विदर्भात झालेला असावा.....
10 Oct 2011 - 2:29 pm | मितभाषी
ह्या शब्दाचा उगम माहीत नाही पण हा शब्द लहानपणापासुन ऐकत आलो आहे. "प्रौढशिक्षण" वर्गाला "डंगरीशाळा" असा उल्लेख केला जायचा. :D
10 Oct 2011 - 2:48 pm | किसन शिंदे
आमच्या गावाकडेही एखाद्या म्हातार्या माणसाचा उल्लेख आगाऊपणे करताना डंगर हा शब्द वापरतात.
10 Oct 2011 - 2:56 pm | मितभाषी
किसनराव म्हातारचळ सुटलेल्या डंगर्याला काय म्हणतात माहीत आहे का? =)) =))
जिज्ञासुंनी व्यनि करावा. ;)
10 Oct 2011 - 4:29 pm | किसन शिंदे
आता तुम्हाला माहीतेय म्हटल्यावर आम्हालाही माहीतच असणार कि ;)
10 Oct 2011 - 4:37 pm | पर्नल नेने मराठे
५०शीला पण असे सुचते का ..कमालच झाली बाइ :(
10 Oct 2011 - 4:46 pm | पैसा
मी चुकून ५० ला असं वाचलं..
10 Oct 2011 - 6:10 pm | ५० फक्त
मेलो मेलो मला आता डायरेक्ट पं भवानी दास / पं. म्ख्खन चख्खन / वैदय राममुर्ती / अनिलकुमार सिखौला / अखिलेश कुमार सिखौला (मोनु) किंवा राजेश्वर (राज) यांच्या थ्रु मिपावर यावे लागेल.
10 Oct 2011 - 5:50 pm | विश्वनाथ मेहेंदळे
त्यात कमाल कसली झाली? पन्नाशीत सगळ्यांनाच Andropause येत नाही. पन्नाशीतले सगळे विशीतल्या सगळ्या तरुणींकडे बापाच्या नजरेतून बघतात काय? जाणकारांनी प्रकाश टाकावा.
हे शिंचे जाणकार हल्ली गायबच असतात त्यामुळे इथे पन्नाशीतले अनेक लोक असतील, त्यांनी तरी सांगावे. ;-)
10 Oct 2011 - 6:18 pm | प्रभाकर पेठकर
आम्ही फक्त, सुन्न होत नाही.
10 Oct 2011 - 8:01 pm | गणपा
जेब्बात :)
10 Oct 2011 - 10:28 pm | विश्वनाथ मेहेंदळे
हॅहॅहॅहॅ !!!! मग तुमची कातडी कथा नायकाच्या कातडी पेक्षा निबर आहे असे समजायचे का हो ? ;-)
आणि माननीय पर्नल बाई (किंवा ताई / मावशी / अक्का, जे आवडेल ते) , यांचा आक्षेप मूळ भावनेवर होता, सुन्न होण्यावर नाही, असे मला वाटले. जाणकार (किंवा पर्नल बाई (किंवा ताई / मावशी / अक्का) ) योग्य तो खुलासा करतीलच :-)
11 Oct 2011 - 9:09 pm | प्रभाकर पेठकर
प्र.का. टा. आ.
10 Oct 2011 - 8:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजून येऊ द्या असेच सुन्न करणारे लेखन. :)
-दिलीप बिरुटे
11 Oct 2011 - 10:38 pm | आत्मशून्य
मधूर भंडारकरचा दिल तो बच्चा है जी चित्रपट आठवला...