स्टीव्ह जॉब्ज

विकास's picture
विकास in काथ्याकूट
6 Oct 2011 - 6:03 am
गाभा: 

आत्ताच जालावर वाचले की अ‍ॅपलने संपूर्ण संगणक जगात क्रांती घडवून आणणारे स्टीव्ह जॉब्ज यांचे निधन झाले.

This was the commercial that introduced the Apple Macintosh Computer to the world.

अतिशय प्रेरणादायी जीवन जगलेल्या या व्यावहारीक संशोधकाला सलाम आणि श्रद्धांजली. अजून बरेच काही लिहीता येण्यासारखे. पण तुर्तास इतकेच...

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Oct 2011 - 6:28 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पॅनक्रिएटीक कॅन्सर जिंकला. RIP Steve Jobs.

http://news.stanford.edu/news/2005/june15/jobs-061505.html

वाचलं नसलंत तर जरूर वाचा.
वाचलेलं असेल तर you probably have read it again just now already.

विकास's picture

6 Oct 2011 - 6:59 am | विकास

ते परत परत वाचावे/पहावे असे स्टॅनफर्डच्या पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना उद्देशून केलेले भाषण आहे. त्यातील शेवटचा काही भाग जसाच्या तसा इंग्रजीतच देत आहे:

No one wants to die. Even people who want to go to heaven don't want to die to get there. And yet death is the destination we all share. No one has ever escaped it. And that is as it should be, because Death is very likely the single best invention of Life. It is Life's change agent. It clears out the old to make way for the new. Right now the new is you, but someday not too long from now, you will gradually become the old and be cleared away. Sorry to be so dramatic, but it is quite true.

Your time is limited, so don't waste it living someone else's life. Don't be trapped by dogma — which is living with the results of other people's thinking. Don't let the noise of others' opinions drown out your own inner voice. And most important, have the courage to follow your heart and intuition. They somehow already know what you truly want to become. Everything else is secondary.

When I was young, there was an amazing publication called The Whole Earth Catalog, which was one of the bibles of my generation. It was created by a fellow named Stewart Brand not far from here in Menlo Park, and he brought it to life with his poetic touch. This was in the late 1960's, before personal computers and desktop publishing, so it was all made with typewriters, scissors, and polaroid cameras. It was sort of like Google in paperback form, 35 years before Google came along: it was idealistic, and overflowing with neat tools and great notions.

Stewart and his team put out several issues of The Whole Earth Catalog, and then when it had run its course, they put out a final issue. It was the mid-1970s, and I was your age. On the back cover of their final issue was a photograph of an early morning country road, the kind you might find yourself hitchhiking on if you were so adventurous. Beneath it were the words: "Stay Hungry. Stay Foolish." It was their farewell message as they signed off. Stay Hungry. Stay Foolish. And I have always wished that for myself. And now, as you graduate to begin anew, I wish that for you.

Stay Hungry. Stay Foolish.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Oct 2011 - 7:25 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

बिपिनच्या खरडवहीत त्याने अलिकडेच स्टीव्हच्या भाषणाचा मराठीत अनुवाद लावला आहे.
अ‍ॅपलचं एकही उत्पादन मी स्वतः कधीही वापरलं नाही, पण वाईट वाटलं. फेसबुकावरून उधार प्रतिक्रिया iSad.

पाषाणभेद's picture

6 Oct 2011 - 7:38 am | पाषाणभेद

अनुवाद वाचला. (मराठीत वाचले की लवकर समजते. बिपिनचे आभार.)

+१

स्टीव्ह जॉब्ज यांना आदरांजली.

"इतरांची मतं, त्यांचे जगण्याचे निष्कर्ष, मार्गदर्शन या गोंडस नावाने त्यांच्याकडून लादली जाणारी मतं.. याचा कसलाही विचार करू नका.. इतरांच्या मतांचं ओझं कधीही वागवू नका.. जे काही जगायचंय ते स्वत:च आयुष्य जगा. तुम्हाला आयुष्यात काय आवडतं ते तुमच्या मनाला माहीत असतं.. त्याचं तेवढं लक्ष देऊन ऐका. बाकीचं सगळंच दुय्यम असतं."

- स्टीव्ह जॉब्ज

मी ही बिपिनदाच्या खवत मराठी भाषांतर वाचलं.

मरणाचं भान सतत असलं मनात तर आपण वेळ वाया घालवत नाही. यशापयश, मानापमान वगैरे सर्व भौतिक भावना मरणात संपून जातात. आपण काहीतरी गमावणार आहोत ही भावना मृत्यूच्या जाणिवेने आपल्याला नग्न करत असते. याचं भान आलं की एकच प्रश्न त्यावर पुरून उरतो. आपण जो काही वेळ आपल्याला मिळाला.. त्याचं काय केलं?

हे ज्याला कळलं त्याला आयुष्य कळलं.

ईश्वर स्टीव्हच्या आत्म्यास शांती देवो.

''मरणाचं भान सतत असलं मनात तर आपण वेळ वाया घालवत नाही. यशापयश, मानापमान वगैरे सर्व भौतिक भावना मरणात संपून जातात. आपण काहीतरी गमावणार आहोत ही भावना मृत्यूच्या जाणिवेने आपल्याला नग्न करत असते. याचं भान आलं की एकच प्रश्न त्यावर पुरून उरतो. आपण जो काही वेळ आपल्याला मिळाला.. त्याचं काय केलं?''

हीच भावना मला व्यक्त करता येत नव्हती, त्यामुळं माझा संकल्प अजुन बळकट झाला आता,

एका लढवय्याला विनम्र श्रद्धांजली.........

मिसळपाव's picture

6 Oct 2011 - 8:09 am | मिसळपाव

का वेगळं असतं ते पहायचं असलं तर हा व्हिडीओ बघ.
http://www.youtube.com/watch?v=aeXAcwriid0

अर्थातच थोडी अतिशयोक्ति आहे. पण साधारण अ‍ॅपल प्रॉडक्ट म्हणजे simple yet elegant.

मराठी_माणूस's picture

6 Oct 2011 - 10:09 am | मराठी_माणूस

लिन्क वर क्लिक केल्यावर खालिल संदेश येतो

You are not authorized to access this page. .

मिसळपाव's picture

6 Oct 2011 - 3:46 pm | मिसळपाव

http://www.youtube.com/watch?v=EUXnJraKM3k
ट्राय करून बघ. आणि हि पण नाही चालली तर youtube.com वर if microsoft designed ipod package सर्च कर.

शिल्पा ब's picture

6 Oct 2011 - 7:37 am | शिल्पा ब

:(

चतुरंग's picture

6 Oct 2011 - 7:43 am | चतुरंग

स्टीव जॉब्ज हा नुसता असामान्य इंजिनिअर किंवा तंत्रज्ञ नव्हता तर एक खंदा लढवय्या वीर होता. आयुष्यातल्या अनंत अडचणींवर मात कशी करायची आणि सतत नाविन्याचा आणि परिपूर्णतेचा ध्यास घेऊन पुढे जात रहायचं याचा वस्तुपाठच. लोकांना काय हवं ते तयार करणारे पुष्कळ असतात परंतु आपण जे तयार करु ते लोकांची गरज बनलं पाहिजे असं स्वप्न बघणारा आणि अनेकदा प्रत्यक्षात आणणारा स्टीव हा विजनरी होता यात शंका नाही.
त्याच्या स्मृती त्याच्या कामातून सदैव राहतील. स्टीवला विनम्र अभिवादन!

-(दु:खी)रंगा

ता.क. अ‍ॅपलचं नवीन प्रॉडक्ट आजच लाँच व्हावं हा काय दुर्दैवी योगायोग. त्याचं चरित्र नोवेंबर मध्ये प्रकाशित होतंय.

पाषाणभेद's picture

6 Oct 2011 - 9:02 am | पाषाणभेद

(मुख्य म्हणजे ते आयआयटी आयाआयएम किंवा तत्सम संस्थेमध्येही शिकलेले नव्हते, किंवा १८ महिन्यात पिएचडी घेतलेलेही नव्हते हे महत्वाचे!)

पैसा's picture

6 Oct 2011 - 7:48 am | पैसा

बिपिन कार्यकर्तेंच्या खरडवहीत असलेलया भाषणाचं भाषांतर सर्वांनी जरूर वाचा. स्टीव्ह जॉब्जला श्रद्धांजली.

आळश्यांचा राजा's picture

6 Oct 2011 - 10:02 am | आळश्यांचा राजा

हे भाषांतर इतकं सहजसुंदर आणि अकृत्रिम झाले आहे, की सहजसुंदर आयफोन आणि आयपॅड बनवणार्‍या स्टीव्हला हे भाषांतर ही खरी श्रद्धांजली आहे.

बातमी समजल्यावर वाईट वाटलं.

राजेश घासकडवी's picture

6 Oct 2011 - 8:29 am | राजेश घासकडवी

मी आयफोन वापरला आणि ऍपलच्या प्रेमात पडलो. आत्तापर्यंत गॅजेट्स (खासुपकरणं हा शब्दप्रयोग नुकताच कुठेतरी वाचला) बनवली जायची ती इंजिनियर्सनी बनवल्याप्रमाणे. त्यात सगळी बटणं असायची, वेगवेगळ्या भन्नाट फीचर्स असायच्या पण आयफोनइतकं सहज सुंदर काही बघितलं नव्हतं. त्याचा स्पर्श, आकार, सोपेपणा यात काहीतरी भुरळ घालणारं होतं. इतक्या प्रचंड शक्तिशाली उपकरणाचं युझर मॅन्युअल दोन पानांचं. त्यात चार्ज कसा करावा, आणि चालू कसा करावा इतकंच. बस. बाकी कशाची गरजच नाही इतकं इंट्युइटिव्ह. त्या फोनने डिझाइनच्या विश्वात क्रांती केली. त्यानंतर सगळीच प्रॉडक्ट्स आयफोनच्या आकारात दिसायला लागली...

अशा सुंदर वस्तु बनवणं हे एका माणसाचं काम नसतं. पण त्यामागची व्हिजन बाळगणारा, प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रचंड यंत्रणा बांधणारा म्हणून स्टीव्ह जॉब्स थोर आहे याबाबत वादच नाही. एके काळी ऍपल कॉंप्युटर्सला मायक्रोसॉफ्टने कुठल्याकुठे मागे टाकून दिलं वगैरे ऐकून असताना आता जगातली सर्वाधिक मार्केट कॅपिटलायझेशन असलेली कंपनी आहे (जवळपास मायक्रोसॉफ्ट + गूगल)...

हॅट्स ऑफ.

धन्या's picture

6 Oct 2011 - 1:11 pm | धन्या

आत्तापर्यंत गॅजेट्स (खासुपकरणं हा शब्दप्रयोग नुकताच कुठेतरी वाचला) बनवली जायची ती इंजिनियर्सनी बनवल्याप्रमाणे.

हे अकलेचे तारे आम्ही आमच्या ब्लॉगवर तोडले आहेत. आणि नुकताच तुम्ही आमचा ब्लॉग चाळला आहे. अर्थात आमचा मुळ शब्द जालखासुपकरण असा असून आम्ही तो "विजेट" साठी वापरला आहे. :)

विकास's picture

6 Oct 2011 - 8:50 pm | विकास

मायक्रोसॉफ्टने त्यांच्या संस्थळावर शोकसंदेश ठेवला आहे. त्याचा दुवा तांच्या होमपेजवर देखील आहे.

मदनबाण's picture

6 Oct 2011 - 8:57 am | मदनबाण

अत्यंत दु:ख झाले. :(
एक असामान्य व्यक्तिमत्व ! त्यांची स्वतःची एक स्टाईल होती,जी त्यांच्या विचारातुन आणि उत्पादनातुन दिसुन आली.
स्टीव्ह जाणार हे माहित होते,त्यांच्या आजारा बद्धलच्या आणि त्यांच्या बद्धल इतर माहिती असलेले दुवे मी माझ्या सही मधे आधी दिले होते.

ईश्वर स्टीव्हच्या आत्म्यास शांती देवो.

क्लिंटन's picture

6 Oct 2011 - 9:15 am | क्लिंटन

भावपूर्ण श्रध्दांजली. :(

इतरांची मतं, त्यांचे जगण्याचे निष्कर्ष, मार्गदर्शन या गोंडस नावाने त्यांच्याकडून लादली जाणारी मतं.. याचा कसलाही विचार करू नका.. इतरांच्या मतांचं ओझं कधीही वागवू नका.. जे काही जगायचंय ते स्वत:च आयुष्य जगा. तुम्हाला आयुष्यात काय आवडतं ते तुमच्या मनाला माहीत असतं.. त्याचं तेवढं लक्ष देऊन ऐका. बाकीचं सगळंच दुय्यम असतं.

हे असं जगायला हवं!

स्टीव्ह जॉब्स यांना भावपुर्वक श्रध्दांजली!

नितिन थत्ते's picture

6 Oct 2011 - 10:21 am | नितिन थत्ते

वरच्या सर्वांशी सहमत.

lakhu risbud's picture

6 Oct 2011 - 11:24 am | lakhu risbud

स्टीव जॉब्स यांना आदरपूर्ण श्रद्धांजली.माणूस मोठा चिवट आणि लढवय्या होता.

धाग्याच्या विषयच्या संदर्भात प्रतिसाद थोडा अवांतर वाटेल
जग अमेरिकेला मेल्टिंग पॉट म्हणून ओळखते,पण तिथल्या मातीत(समाजव्यवस्थेत, अर्थव्यवस्थेत) असा काय गुण आहे माहित नाही पण जग बदलवून टाकणारी उत्पादने तिथे मोठ्या प्रमाणात जन्माला येतात.एखादी नवी कल्पना,विचार घेऊन सुरवात करणाऱ्या द्रष्ट्या माणसाच्या सुरवातीला लहान असणाऱ्या छोट्या उद्योगाचे मिलियन डॉलर्स चे साम्राज्यात रुपांतर हे एकाच पिढीत होते. Apple,Microsoft,Google,Yahoo,Ansys,Aspen,Adobe आणि अगदी अलीकडचे म्हणजे facebook हि याची मोठी उदाहरणे.आपल्याकडे याच्या सगळ्यात जवळ जाणारे उदाहरण म्हणजे Reliance आहे.त्यांना पण भारतातील सर्वात मोठी कंपनी हा खिताब सुरवात केल्यानंतर जवळपास चाळीस वर्षानंतर मिळाला(उल्लेखित अमेरिकेच्या कंपन्यांच्या तुलनेत यांचे उत्पादन पूर्ण वेगळे आहे हे मान्य पण वरील उदाहरणांच्या जवळ जाणारी हि एकमेव भारतीय कंपनी आहे,गवगवा असणाऱ्या IT कंपन्यांची तर बातच सोडा!.भारती टेलीकॉम (Airtel)हे अजून एक उदाहरण,पण त्यांचे स्वःताचे असे उत्पादन,तंत्रज्ञान नाही,प्रगत देशांनी विकसित केलेले तंत्रच ते वापरतात ).Tata,Birla या पिढ्यानपिढ्या उद्योगात असणाऱ्या घराण्यांची गोष्ट वेगळी.
आपल्याकडे हे असे का होऊ शकत नाही याची अनेक करणे आहेत.याचा संकेतस्थळावर श्री विकास यांचे मूर्ती विरुद्ध भगत आणि इंडोवेशन हे धागे आहेत,त्यात आणि त्याखालील प्रतिसादात आपल्याकडे हे असे का होऊ शकत नाही या प्रश्नाच्या उत्तराची दिशा मिळेल असे वाटते.

जे.पी.मॉर्गन's picture

7 Oct 2011 - 4:04 pm | जे.पी.मॉर्गन

खाली सुद्धा एका प्रतिक्रियेत स्टीव्ह जॉब्सना "मार्केटिंग जीनियस" म्हटले आहे जे तंतोतंत पटतं. अमेरिकेच्या मेल्टिंग पॉट (खरंतर salad bowl) मध्ये उद्योगांच्या बाबतीत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे त्यांची अफलातून मार्केटिंग स्ट्रॅटेजी. पु.लंच्या "जावे त्यांच्या देशा" मध्ये १९७० च्या दशकातल्या ज्या अमेरिकेचे वर्णन केले आहे त्यातले मार्केटिंगचे फंडेसुद्धा आजच्या भारतीयांच्या डोक्याला झिणझिण्या आणतील. भारतातली सांस्कृतिक, आर्थिक, भौगोलिक अगदी रूपरंगातली प्रचंड विविधता आणि गरीबी ह्यांमुळे फक्त मार्केटिंगच्या जोरावर बाजारपेठ काबीज करणं कर्मकठीण काम आहे.

शिवाय अमेरिकतली ग्राहकांची मानसिकता - आपल्याकडे कोणीच let's try out म्हणून एखादं उत्पादन घेणार नाहीत. पण अ‍ॅपलच्या फक्त मार्केटिंगवर आयपॉड, आयफोन आणि आयपॅड लाँच झाले तेव्हा दुकानांबाहेर रांगा लागल्या होत्या. भारतात असं काही होणं फार फार मुश्किल आहे. त्यात आपण नेहेमीच पाश्चिमात्य देशांत तयार झालेली उत्पादनं / सर्व्हिसेस वापरतो. तेव्हा नवी उत्पादनातली उत्सुकतादेखील आपल्याकडे क्वचितच असते. रिलायन्स काय, टाटा - बिर्ला काय, एअरटेल काय किंवा विप्रो, इन्फोसिस, एचसीएल काय - कोणीच कधीच "जगावेगळं" काही केलं नाही आणि म्हणून भारतीय ग्राहक अजूनही पश्चिमेसाठी बनवलेल्या गेलेल्या गोष्टीच वापरतोय. ज्या दिवशी एखादी भारतीय कंपनी भारतीय गरजा ओळखून सर्व भारतीयांना आवडेल आणि परवडेल असं एखादं उत्पादन बाजारात आणेल तेव्हाच भारताला आपली पहिली गूगल, अ‍ॅपल अथवा फेसबुक मिळेल.

स्टीव्ह जॉब्सचे मार्केटिंगचे तंत्र "केस स्टडी" म्हणून वाचण्यासारखे आहे.वर दिलेली मॅकच्या लाँचच्या वेळेची जाहिरातच बघा ना. अश्या मार्केटिंग जीनियसला आणि त्याच्या अफाट कल्पनाशक्तीला सलाम ! स्टीव्ह जॉब्सना श्रद्धांजली.

जे.पी.

माझीही शॅम्पेन's picture

6 Oct 2011 - 1:36 pm | माझीही शॅम्पेन

स्टीव जॉब्स म्हणजे तंत्रद्न्यन विश्वाला पडलेल एक भन्नाट स्वप्न , ते स्वप्न आज सम्पल :( अतिशय दुख:द बातमी धक्का बसला. कॅन्सर विरूध्धाचा त्याचा लढा खरच कौतुकास्पद होता.

त्यानी बनवलेले गॅझेटस वापरणे हा अत्यंत अभिमनाची गोष्ट आहे.
आय-पॉड पहिल्याने वापरल्यानतरच आनंद अवार्णिय होता .
आज ही आय-फोन वापरताना रोज आनंद होतो. पण स्टीव च्या निधाना नंतर माझे सगळे आय-प्रॉडक्ट्स पॉरके झाल्या सारख वाटताय.

आयपॅड २ लाँच वेळी समारोप करताना त्यानी जे भाषण केल त्यात त्यानी सर्वांचे आभार मानले होते , तेंव्हाच त्याना कदाचीत हा आपला शेवटचा लॉंच आहे अस त्यानी जाणल असाव महणून त्यानी स्वता:ची आजार-पाणाची सुट्टी रद्द करून हजार झाले होते. आज खरच माझ्या घरातील कोणी व्यक्ती गेल्या सारख वाटताय

तंत्रद्यान क्षेत्रातल्या ह्या अवलिया जादुगारला मनापासून सलाम !

शाहिर's picture

6 Oct 2011 - 12:19 pm | शाहिर

स्टीव्ह जॉब्ज यांना आदरपूर्ण आदरांजली..
:(

मरणाचं भान सतत असलं मनात तर आपण वेळ वाया घालवत नाही. यशापयश, मानापमान वगैरे सर्व भौतिक भावना मरणात संपून जातात. आपण काहीतरी गमावणार आहोत ही भावना मृत्यूच्या जाणिवेने आपल्याला नग्न करत असते. याचं भान आलं की एकच प्रश्न त्यावर पुरून उरतो. आपण जो काही वेळ आपल्याला मिळाला.. त्याचं काय केलं? तो सत्कारणी लावला का? हा प्रश्न माझ्या डोक्यातून कधी जात नाही....

नितांत सुंदर !!

यकु's picture

6 Oct 2011 - 12:44 pm | यकु

अरेरे!
वाईट झाले.
श्रध्दांजली.
बिकांच्या खव मध्ये त्यांचे भाषण वाचले होते.

योगी९००'s picture

6 Oct 2011 - 1:22 pm | योगी९००

स्टीव्ह जॉब्ज यांना भावपुर्ण श्रध्दांजली...

एकदा असेही वाटून गेले की iphone4S ला मिळालेल्या कमी प्रतिसादाने त्यांना मानसिक धक्का तर बसला नसावा ना..पण शेवटी कर्करोग जिंकला..

Three apples that changed the world - One seduced Eve, one awakened Newton, the third one was in the hands of Steve Jobs ..!!!

सुहास झेले's picture

6 Oct 2011 - 3:49 pm | सुहास झेले

:( :( :( :(

स्मिता.'s picture

6 Oct 2011 - 1:32 pm | स्मिता.

स्टीव्ह जॉब्स यांना भावपुर्वक श्रध्दांजली!

Apple ने तर मनाला कायम भुरळ घातली आहे. तर Stay Hungry, Stay Foolish हे भाषण दहादा ऐकून झालंय. काही दिवसांपूर्वीच इथे स्टीव्ह जॉब्सवर चर्चा वाचली आणि आज सकाळी अचानक ही बातमी बघून किंचित धक्काच बसला. अर्थात ही बातमी येणार होतीच पण एवढ्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं. :(

चिंतातुर जंतू's picture

6 Oct 2011 - 1:33 pm | चिंतातुर जंतू

माझ्या दृष्टीनं हे महत्त्वाचं:

Don't be trapped by dogma, which is living with the results of other people's thinking.

पहिला मॅक पाहिला, हाताळला आणि प्रेमात पडलो त्याला कित्येक वर्षं झाली. मला अजूनही तेव्हाचा (मायक्रोसॉफ्टपासून स्वातंत्र्य आणि तेही सुरेख पद्धतीनं!) जॉब्ज आणि अ‍ॅपल आवडतात. नंतरची उत्पादनं सुंदर असली तरीही 'आमच्या चार भिंतींत असलेल्या बागेतच (वॉल्ड गार्डन) तुम्हाला स्वर्गसुखं मिळतील' अशा धर्तीचं तत्त्वज्ञान फार साम्राज्यवादी आणि मूळच्या माझ्या आवडत्या जॉब्जशीच प्रतारणा करणारं वाटलं म्हणून फारसं प्रिय नाही. मला स्वातंत्र्य अधिक प्रिय आहे.

आत्मशून्य's picture

6 Oct 2011 - 2:09 pm | आत्मशून्य

ह्याच भावना आहेत.

अप्पा जोगळेकर's picture

6 Oct 2011 - 2:15 pm | अप्पा जोगळेकर

अतिशय दु:खद घटना. ग्रेट माणूस गेला.

सोत्रि's picture

6 Oct 2011 - 4:17 pm | सोत्रि

स्टीव्ह एक सच्चा, हाडाचा, आणि खराखुरा 'आर्किटेक्ट'!

प्रॉडक्ट्चे, हार्ड्वेअर डिझाइन पासुन सॉफ्ट्वेअर डिझाइन ते सर्वसमावेशक युजर इंटरफेस डिझाइन ह्या सर्वांचा एकहाती विचार करण्याची पात्रता आणी व्हिजन असलेला एकमेव खरा इंजिनीअर!

स्वत:च्याच कंपनीतुन हाकलले गेल्यानंतर जिद्दीने नवीन कंपनी चालु करुन ती मुळ कंपनीला विकत घ्यायला भाग पाडणे आणी पुन्हा एक बलाढ्य अशी कंपनी बनवणे हे सर्व करु शकणारा विसाव्या शतकातील एकमेव अवलिया!

लिसा, मॅकिंतोश, मॅकबुक, आयपॅड, आयफोन, आयपॅड आणी अ‍ॅप स्टोअर ह्या आणि अश्या अनेक उच्च अभियांत्रिकी मुल्य असलेली प्रॉडक्ट्स त्याने संगणक विश्वाला बहाल केली.

संगणक इतिहास, उच्च अभियांत्रिकी मुल्यांशी कधीही तडजोड न कराणार्‍या स्टीव्हच्या नावाशिवाय अपूर्ण असेल. त्याइतिहासात त्याचे नाव सोनेरी अक्षरांनीच लिहीले जाईल. ह्या थोर आर्किटेक्टचा व्यावसायिक आणि शोध प्रवास अनुभवायला मिळाला ह्याचा मला अभिमान आहे.

पुन्हा एकदा ह्या अवलियाला मानाचा मुजरा!

- (iSad) सोकाजी

सोत्रि's picture

6 Oct 2011 - 4:50 pm | सोत्रि

आत्ताच एका ब्लॉगवर वाचलेले वाक्य :

Jobs should be considered a great American icon in the same way that Michelangelo is associated with Italy or Mozart with Austria.

अगदी खरे आहे हे!

-(iSad) सोकाजी

क्रेमर's picture

6 Oct 2011 - 5:21 pm | क्रेमर

स्टिव जॉब्ज यशाच्या शिखरावर होता असे म्हणायला हरकत नाही. दशकानुदशके एकाच क्षेत्रात राहून नवे काही करण्याची क्षमता घालवून बसलेल्या कंपन्यांचा धंदा बसवणारा जॉब्ज हा प्रत्येक उद्योगात निर्माण होवो.

अ‍ॅपल कंपनीची उत्पादने हाताळण्यास उत्तम असतात. ही उत्पादने बंद (क्लोज्ड) असतात, स्पर्धेला जाणूनबुजून मारक असतात आणि ग्राहकांकडून जास्तीत जास्त पैसा कसा स्क्विझ करता येईल यादृष्टीने बनवलेली असतात. माझ्या अ‍ॅंड्रॉइड फोनला अ‍ॅप्ससाठी मी एक रूपयाही दिलेला नाही. आयपॅडवर अ‍ॅप्ससाठी बरेच पैसे द्यावे लागले आहेत. अ‍ॅपलची उत्पादने भविष्यात न घेण्याचे ठरवले आहे.

आत्मशून्य's picture

6 Oct 2011 - 8:40 pm | आत्मशून्य

जेल ब्रेक वापरा...

निवेदिता-ताई's picture

6 Oct 2011 - 5:28 pm | निवेदिता-ताई

स्टीव्ह जॉब्स यांना भावपुर्वक श्रध्दांजली!

विकास's picture

6 Oct 2011 - 7:12 pm | विकास

इतरत्र लिहीलेल्या एका प्रतिसादातील एक भागः

स्टीव्ह जॉब्जबद्दल आत्ता ऐकत होतो. ८४ साली मॅक आणला पण ८५ साली त्याला अ‍ॅपल सोडावे लागले. (काढले). मग अ‍ॅनिमेशनसाठी तत्कालीन संगणक विकणार्‍या पिक्सारला विकत घेतले. त्यांना काहीतरी वेगळे करायचे होते. त्यात गुंतला आणि स्वतःचा पैसा गुंतवला. सलग पाच वर्षे $१ मिलीयन्स प्रतिवर्ष स्वतःच्या पैसे घालवणे सहन केले. नंतर काहीसे यश येऊ लागले. डिस्नीला इंटरेस्ट आला आणि १९९५ (अ‍ॅपल मधून काढल्यावर दहा वर्षांनी) टॉयस्टोरी प्र्काशीत झाला आणि नशीब बदलले. नंतर पिक्सार पब्लीक कंपनी झाली, नेटस्केपपेक्षा ही त्या वर्षाचा मोठा आयपीओ ह्या कंपनीचा होता. मग डिस्नीने पिक्सार विकत घेतली आणि जॉब्ज डिस्नीचा सर्वात मोठा व्यक्तीगत शेअर होल्डर झाला. मग परत ९७-९८ मधे त्याला अ‍ॅपलने बोलावले! केवळ ८५-९७ हा असा काळ होता जेंव्हा अ‍ॅपल हे तोट्यात गेले होते. आणि तोच काळ केवळ असा होता जेंव्हा ती कंपनी "प्रोफेशनल्स मॅनेजमेंटनी" चालवली होती. ह्यात प्रोफेशनल मॅनेजमेंट असणे वाईट असते असे म्हणायचे नाही. पण "थिंक डिफरंट" अ‍ॅप्रोच हा केवळ अ‍ॅपल पुरताच नसतो कुठेही लागू होऊ शकतो असे वाटते.

गणपा's picture

6 Oct 2011 - 7:59 pm | गणपा

पण "थिंक डिफरंट" अ‍ॅप्रोच हा केवळ अ‍ॅपल पुरताच नसतो कुठेही लागू होऊ शकतो असे वाटते.

एक अवलिया थिंकर हरवला. :(

इंटरनेटस्नेही's picture

6 Oct 2011 - 8:22 pm | इंटरनेटस्नेही

iRespect

प्रभाकर पेठकर's picture

6 Oct 2011 - 8:47 pm | प्रभाकर पेठकर

अ‍ॅपलची उत्पादने कधी वापरली नाहीत, तसा योगच आला नाही. दुर्दैव असे की स्टीव्ह जॉब्ज ह्यांच्या बद्दलही काही माहिती नव्हती. आज इथे वाचून त्यांची महानता लक्षात आली. जो संदेश त्यांनी दिला आहे तो फार अमुल्य आहे.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हिच इच्छा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Oct 2011 - 11:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अ‍ॅपलची उत्पादने कधी वापरली नाहीत, तसा योगच आला नाही. दुर्दैव असे की स्टीव्ह जॉब्ज ह्यांच्या बद्दलही काही माहिती नव्हती.

मलाही स्टीव्ह जॉब्ज माहिती नव्हता. परवा बिकाच्या खरडीत भाषण वाचलं. सर्वसामान्य माणसांना जगण्याची प्रेरणा देणारा माणूस आणि त्याचं भाषण मला खूपच भावलं. स्टीव्ह जॉब्जची ओळख झाली ती अशी. आणि आज विकास यांच्या धाग्यात स्टीव जॉब्जची निधनाची बातमी कळली. विकास म्हणतात त्या प्रमाणे माझीही भावना अशीच आहे की, ''अतिशय प्रेरणादायी जीवन जगलेल्या या व्यावहारीक संशोधकाला सलाम आणि श्रद्धांजली''

-दिलीप बिरुटे

चिरोटा's picture

6 Oct 2011 - 9:01 pm | चिरोटा

जॉब्स ह्यांना श्रद्धांजली. iCon आणि inside Steve's brain ही दोन्ही पुस्तके वाचण्यासारखी आहेत. दुसर्‍या पुस्तकात जॉब्स कंपनीत कसे काम करायचे त्यावर लेखकाने चांगली माहिती दिली आहे. अभियांत्रिकी वा प्रोग्रॅमिंगमध्ये जॉब्स ह्यांचे योगदान नसले तरी कुठलाही प्रॉडक्ट कसा असला पाहिजे, त्याचे पॅकिंग कसे हवे, कोणी कुठले काम करायचे ह्यावर त्यांचे प्रभुत्व होते.
टीमचा आकार कमी हवा, टीम सभासद त्यांच्या क्षेत्रातले सर्वोकॄष्ट हवेत, पगार देताना, शेयर्स देताना 'मचमच' करायची नाही, पैसे वाचवण्यासाठी दुसर्‍या देशांत जावून उगाच तेथील लोकाचे गोडवे गायचे नाहीत. हे त्यांचे गुण घेण्यासारखे आहेत.!!

सोत्रि's picture

6 Oct 2011 - 9:55 pm | सोत्रि

अभियांत्रिकी वा प्रोग्रॅमिंगमध्ये जॉब्स ह्यांचे योगदान नसले तरी

म्हणजे काय? जरा विस्तार करु शकणार का ?

- (अभियांत्रिक आणि प्रोग्रामर) सोकाजी

चिरोटा's picture

7 Oct 2011 - 11:59 am | चिरोटा

वर उल्लेखलेल्या दोन्ही पुस्तकांमध्ये जॉब्स हे मार्केटिंग जिनियस होते हे दिसून येते.Mac OS लिहिली ती जॉब्स ह्यांनी नव्हे तर Wozniak आणि ईतर सहकार्‍यांनी. तीच गोष्ट iPod/iMac/iPod ची. ह्या प्रॉडक्टसचे मुख्य डिझायनर जोनाथन ईव( http://en.wikipedia.org/wiki/Jonathan_Ive ) . अर्थात प्रॉडक्टचा मूळ कंसेप्ट जॉब ह्यांचा असू शकेल. योगदान नाही म्हणतो ते अभियांत्रिकीत/प्रोग्रॅमिंगमध्ये संशोधन वा पेपर्स ह्या संदर्भात.

सोत्रि's picture

7 Oct 2011 - 4:09 pm | सोत्रि

जरा हा दुवा तपासुन बघा:
http://www.google.com/search?q=Steve+jobs&btnG=Search+Patents&tbm=pts&tb...

प्रोग्रामिंग आणि OS च्या लेवलची काही पेटंट्स
Transfer and synchronization of media data
Live content resizing
Data Backup for Mobile Device
Management of files in a personal communication device

इंजीनियरींगची काही पेटंट्स.
Power adapter
Glass support member
Techniques and Graphical User Interfaces for Review of Media Items

त्याचे जे सहकारी किंवा टीम जी होती ती त्याने 'हायर' केलेली होती. त्याच्या कल्पनांना मुर्त स्वरूप देण्यासाठी कारण तो एकटाच सगळी कामे करणे शक्य नव्हते.

- (जास्तच iSad) सोकाजी

केशवराव's picture

6 Oct 2011 - 11:50 pm | केशवराव

स्टीव्ह ला मानाचा मुजरा !

अर्धवटराव's picture

7 Oct 2011 - 12:04 am | अर्धवटराव

स्टीव्ह साहेब म्हणजे सकारात्मकेतेचा अजोड नमुना !!
सलाम.

अर्धवटराव

५० फक्त's picture

7 Oct 2011 - 9:39 am | ५० फक्त

चेपुवरुन साभार

मितभाषी's picture

7 Oct 2011 - 1:20 pm | मितभाषी

श्रध्दांजली.

स्टीव्ह जॉब्ज यांना भावपूर्ण आदरांजली !

मालोजीराव's picture

7 Oct 2011 - 2:51 pm | मालोजीराव

ipod वर काळा ठिपका लावण्यात आला आहे ! :(

- मालोजीराव

ज्यांना बिपिनदांच्या खरडवहीपर्यंत पोचण्याची मुभा नाही अशांसाठी (ज्यांपैकी मीही एक आहे) तो संपूर्ण अनुवाद स्वतंत्र लेखरूपाने छापल्यास / छापला गेल्यास सर्वांना लाभ मिळेल. कुणीतरी / बिपिनदा यांनी तसे करावे ही विनंती.
- दिगम्भा

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Oct 2011 - 11:07 am | बिपिन कार्यकर्ते

हे घ्या साहेब!

अस्वीकृती : हे भाषांतर मी केलेलं नाहीये. मला मेल मधून आलं आणि मी फक्त त्याचे फॉर्मॅटिंग नीट करून ते माझ्या खव मधे लावले.

****

मित्रांनो, मला तुमच्यासमोर भाषणासाठी संधी मिळाली, याबद्दल मी मनापासून आपला आभारी आहे. इतक्या प्रतिष्ठित विद्यापीठातील बुद्धिमान मुलांसमोर बोलायला मिळणं, हा मला माझा मोठा सन्मान वाटतो. खरं सांगायचं विद्यापीठाशी माझा संबंध आला तो हा असा आणि इतकाच. कारण तुमच्यासारखं असं माझं शिक्षण कधीच झालं नाही. आता तुमच्यासमोर आलोच आहे, तर मला तीन प्रमुख गोष्टी तुमच्यासमोर उघड करायच्या आहेत.

पहिलं म्हणजे मी माझं महाविद्यालयीन शिक्षण कधीच पूर्ण करू शकलो नाही. सहा महिन्यांतच मला इथल्या वातावरणाचा कंटाळा आला. नंतर कसंबसं वर्ष काढलं मी महाविद्यालयात. पण मी इथं कधी रमलोच नाही. हे असं का झालं असावं? माझ्या दृष्टीनं याची कारणं माझ्या जन्मातच असावीत. माझी आई अविवाहित असतानाच तिला मी झालो. बाळंत झाली तेव्हा ती महाविद्यालयात शिकत होती. तेव्हा तिची परिस्थिती लक्षात घेता तिनं मला दत्तक द्यायचं ठरवलं. एक वकील आणि त्याची सुविद्य पत्नी मला दत्तक घेणार होते. पण ऐन वेळी ते म्हणाले त्यांना मुलगी हवीये. तेव्हा माझी आई चिडली. तिची अट होती की कोणा पदवीधरालाच मला दत्तक द्यायचं. पण हे असं घडलं. तेव्हा ऐन वेळी जो समोर आला, त्याला तिनं मला देऊन टाकलं. अट एकच. मला महाविद्यालयात शिकू द्यायचं. तेव्हा माझे आताचे जे आईवडील आहेत, ते मला लाभले.

गरीब होते ते. पण त्यांना मी शिकावं असं प्रामाणिकपणे वाटत होतं. माझ्या खऱ्या आईच्या इच्छेला मान देत त्यांनी मला शिकू द्यायचं ठरवलं. तेव्हा मी महाविद्यालय निवडलं ते अगदी महागडं होतं. अगदी स्टॅनफोर्डइतकं. माझं म्हणणं शिकायचं तर मग स्वस्त महाविद्यालयात कशाला जा. पण खरं सांगायचं तर त्यात काहीही अर्थ नव्हता. कारण मी जे काही शिकत होतो, त्यातलं काहीही मला आवडत नव्हतं. एकीकडे पोटाला चिमटा काढून माझी फी भरणारे माझे आईवडील आणि ओढूनताणून शिकणारा मी. १७ वर्षांचा होतो, तेव्हा हे जाणवलं. मग ठरवलं. हे फारच होतंय. आयुष्यात काय कराचंय ते दिसत नाहीये आणि तरीही आपण आईवडिलांचे घामाचे पैसे असे उधळतोय. हे बरोबर नाही. त्याच क्षणी निर्णय घेतला. हे नावडतं शिकणं थांबवायचं. बाहेर पडलो महाविद्यालयातून. मोकळा श्वास घेतला. एव्हाना जाणवलं होतं, आपण जे काही करतोय ते फारच स्वप्निल आहे. मित्राच्या वसतिगृहावर राहायला गेलो. इतरांच्या रिकाम्या कोकच्या बाटल्या वगैरे विकून जेवायला चार पैसे मिळाले तर मिळवायचो. आठवडय़ातून एकदा मात्र पलीकडच्या गावातल्या हरे कृष्ण मंदिरात जायचो. अर्थात तिथे काही भक्ती वगैरे होती म्हणून नाही. तर तिथे आरतीनंतर मोफत जेवण मिळायचं म्हणून. पण तिथे जायलाही पैसे नसायचे. तेव्हा चालत जायचो. म्हणजे जायचेयायचे १४ किमी अंतर मी चालायचो. या काळात मला प्रश्न पडायचा. मला नक्की काय आवडतंय. तेव्हा लक्षात आलं. आपलं सुलेखन कलेवर प्रेम आहे. मग ते शिकायला लागलो. अक्षरांचे आकार, त्यांचे तलम पोत मला फार आवडायचे. अक्षरांच्या नुसत्या मांडणीतूनसुद्धा काही सांगता येतं, असं मला वाटायचं. आपण त्यांना कसं सादर करतो, यावर बरंच काही अवलंबून असतं, हे मला जाणवलं. त्यामुळे मी त्या कलेचं शिक्षण घ्यायला लागलो. जे शिकतोय त्याचा काय उपयोग, नोकरी मिळणार आहे का त्यामुळे, वगैरे फालतू प्रश्नांनी मी मला विचलित होऊ देत नव्हतो. आवडतंय ना.. शिकायचं. इतकाच तो विचार.

पुढे १० वर्षांनी जेव्हा मी माझा पहिला संगणक तयार केला, तेव्हा या सुलेखन कलेचा उपयोग झाला. कारण इतरांच्या तुलनेत माझ्या संगणकाचा कळफलक जास्त चांगला आणि सुलेखनासाठी उपयुक्त असलेला होता. मी तेव्हा जे शिकलो, ते हे असं उपयोगी आलं. मग जाणवलं, बरंच झालं आपलं महाविद्यालय सुटलं ते. मी असा त्या वेळी बाहेर पडलो नसतो, तर हे काही जमलंच नसतं. दुसरी गोष्ट माझ्या उद्योगाची. मी आणि वॉझ यांनी माझ्या वडिलांच्या गॅरेजमध्ये पहिला संगणक तयार केला. बरीच खटपट करावी लागली. चांगलं फळ आलं त्याला.

तेव्हा आम्ही नाव दिलं आमच्या संगणकाचं अ‍ॅपल. हे जमलं तेव्हा मी जेमतेम २० वर्षांचा होतो. मग आम्ही दोघांनी कंपनीच काढली. पुढच्या १० वर्षांत आम्हा दोघांच्या कंपनीत चार हजारजण नोकरीत होते आणि अ‍ॅपलचा आकार २०० कोटी डॉलर्सचा झाला होता. आमचा पहिला मोठा संगणक जन्माला आला होता. मॅकिंतोश. मी तेव्हा तिशीत होतो. तिथे दुसरा धक्का बसला.

मला माझ्या भागीदारानं कंपनीतून काढूनच टाकलं. मला प्रश्न पडला. मीच जी कंपनी जन्माला घातली, तिथून मलाच कसं काय हे लोक बाहेर काढतात. पण तसं झालं होतं खरं.

तेव्हा मी ठरवलं, या प्रश्नाच्या उत्तरात रक्त आटवायचं नाही. नवं करूया काहीतरी. खरं तर समोर अंधार होता. पण म्हटलं हरकत नाही. जमेलच आपल्याला काही ना काही. तशी खात्री होती. कारण माझं माझ्यावर प्रेम होतं. शांत बसलो. स्वत:लाच विचारलं. झालं ते झालं. आपल्याला आता काय करायला आवडेल. माझं पहिलं प्रेम होतं ते अर्थातच अ‍ॅपल. दुसरं काय? तर तेही अ‍ॅपलच.

मग दुसरी संगणक कंपनी काढायची मी ठरवलं. तिला नाव दिलं नेक्स्ट. पाठोपाठ दुसरा उद्योग सुरू केला पिक्सर नावानं. जगातली पहिली अ‍ॅनिमेशन फिल्म मी केली. तिचं नाव टॉय स्टोरी. आजही तिची लोकप्रियता कमी झालेली नाही. याच काळात माझ्या कंपनीचा विस्तार इतका झाला की अ‍ॅपलला पुन्हा मोह झाला या कंपन्या घेण्याचा. कारण मी विकसित केलेलं तंत्रज्ञानच तसं होतं. शेवटी अ‍ॅपलनं या कंपन्या विकत घेतल्या. मी आपोआपच पुन्हा अ‍ॅपलमध्ये आलो. अ‍ॅपलचा सध्याचा जो काही विस्तार सुरू आहे तो मी नेक्स्ट आणि पिक्सरमध्ये जे काही केलं, त्याच्या जोरावर. इथंच मला माझी जीवनसाथी मिळाली. लॉरीन आणि माझा संसार उत्तम सुरू आहे. मागे वळून बघितल्यावर आता मला वाटतं, अ‍ॅपलनी मला हाकललं नसतं तर नेक्स्ट आणि पिक्सर जन्माला आल्या असत्या का? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मला लॉरीन मिळाली असती का?

माझी तिसरी गोष्ट मरणाविषयीची आहे.

सतराव्या वर्षी मी कुठेतरी वाचलं होतं, ‘‘आपण प्रत्येक उगवणारा दिवस हा आपला जणू शेवटचाच दिवस आहे असं जगायला लागलो तर एखादा दिवस असा उजाडतो की त्या सगळय़ा जगण्याचा अर्थ कळतो.’’ हे वाक्य माझ्या डोक्यात सतत गुंजत असतं.

मरणाचं भान सतत असलं मनात तर आपण वेळ वाया घालवत नाही. यशापयश, मानापमान वगैरे सर्व भौतिक भावना मरणात संपून जातात. आपण काहीतरी गमावणार आहोत ही भावना मृत्यूच्या जाणिवेने आपल्याला नग्न करत असते. याचं भान आलं की एकच प्रश्न त्यावर पुरून उरतो. आपण जो काही वेळ आपल्याला मिळाला.. त्याचं काय केलं? तो सत्कारणी लावला का? हा प्रश्न माझ्या डोक्यातून कधी जात नाही.

गेल्या वर्षी कर्करोग झाल्याचं निदान झालं. ते कळल्यावर डॉक्टरांनाच वाईट वाटलं. कारण हा अगदी दुर्मीळ असा कर्करोग आहे. स्वादुपिंडाचा. डॉक्टर म्हणाले, तयारीला लागा.. शेवटच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करून घ्या.. जेमतेम तीन महिने तुम्हाला मिळतील.

मी घरी गेलो. दोन दिवसांनी माझी बायोप्सी करायची होती. त्यासाठी मला डॉक्टरांनी भूल दिली. घशातून एंडोस्कोप पोटात सोडला अणि माझ्या स्वादुपिंडाच्या काही पेशी घेऊन तो बाहेर आला. मी बेशुद्धच होतो. पण लॉरीन ते सगळं पडद्यावर बघत होती. ती म्हणाली, एंडोस्कोप बाहेरआल्यावर डॉक्टरच रडायला लागले. कारण त्यांना लक्षात आलं, परिस्थिती काही इतकी वाईट नाही. शस्त्रक्रिया केली तर मी वाचू शकेन. तशी ती शस्त्रक्रिया झाली आणि मी वाचलोदेखील.

मृत्यूच्या या स्पर्शानं मला बरंच काही शिकवलं. मरणाइतकं काहीही शाश्वत नाही. आपल्याला वेळ कमी असतो आणि तरीही त्यातला मोठा वाटा आपण वायाच घालवतो. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, मला सांगायचंय ते इतकंच की..

इतरांची मतं, त्यांचे जगण्याचे निष्कर्ष, मार्गदर्शन या गोंडस नावाने त्यांच्याकडून लादली जाणारी मतं.. याचा कसलाही विचार करू नका.. इतरांच्या मतांचं ओझं कधीही वागवू नका.. जे काही जगायचंय ते स्वत:च आयुष्य जगा. तुम्हाला आयुष्यात काय आवडतं ते तुमच्या मनाला माहीत असतं.. त्याचं तेवढं लक्ष देऊन ऐका. बाकीचं सगळंच दुय्यम असतं.

धन्यवाद.

वाहीदा's picture

15 Oct 2011 - 2:24 am | वाहीदा

इतरांच्या रिकाम्या कोकच्या बाटल्या वगैरे विकून जेवायला चार पैसे मिळाले तर मिळवायचो. आठवडय़ातून एकदा मात्र पलीकडच्या गावातल्या हरे कृष्ण मंदिरात जायचो. अर्थात तिथे काही भक्ती वगैरे होती म्हणून नाही. तर तिथे आरतीनंतर मोफत जेवण मिळायचं म्हणून.

पण तिथे जायलाही पैसे नसायचे. तेव्हा चालत जायचो. म्हणजे जायचेयायचे १४ किमी अंतर मी चालायचो.

स्टीव जॉब्स या माणसाकडून संगणकाच्या जगाव्यतीरिक्त ही खुप काही शिकण्यासारखे आहे .. नशिबावर त्याने खरंच मात केली माझा खालील प्रतिसाद जेव्हा मी लिहीला तेव्हा मला हे माहीत नव्हते.
बिका धन्यवाद या अनुवादासाठी !

वाहीदा's picture

7 Oct 2011 - 6:39 pm | वाहीदा

स्टीव संधर्भात हे ही वाचण्यात आले
http://www.macobserver.com/tmo/article/steve_jobss_biological_father_reg...

दोन मुद्दे - एकतर जर स्टीवला अतीप्रगत देशात - अमेरिकेत जर कोणी दत्तक घेतले नसते तर त्याला नशिबाने एवढी प्रगती करण्याची साथ दिली असती का ? आपल्या सारख्या देशातही असे कितीतरी स्टीव होण्याच्या लायकीचे असतील ही पण त्यांना ते पोषक वातावरण मिळत नाही हि एक खंत अन दुसरी एक खंत की हल्ली कर्करोगाने मृत्यूमुखी पडणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्याला आपली अयोग्य Life Style कारणीभूत आहे का ?

सुहास झेले's picture

8 Oct 2011 - 3:20 am | सुहास झेले

एक चांगली वेबसाईट मिळालीय स्टीव जॉब्सबद्दल एकदा भेट देऊन बघा ...

http://allaboutstevejobs.com/index.html

विकास's picture

11 Oct 2011 - 2:20 am | विकास

चांगल्या आणि माहितीपूर्ण दुव्याबद्दल धन्यवाद!

वाहीदा's picture

15 Oct 2011 - 11:45 pm | वाहीदा

माहीतीपूर्ण दुवा, धन्यवाद

अमोल केळकर's picture

15 Oct 2011 - 12:18 pm | अमोल केळकर

धन्यवाद. दुवा आवडला.

अमोल केळकर

राजहंस's picture

10 Oct 2011 - 10:35 pm | राजहंस

भावपुर्ण श्रध्दांजली.

उल्हास's picture

11 Oct 2011 - 10:20 pm | उल्हास

स्टीव्ह जॉब्ज यांना आदरपूर्ण आदरांजली..