[ -घोडा म्हणजे मनातील विकार . दूरदेशी गेल्यावर त्यावर नियत्रण ठेवणे अवघड जाते .आपले मन म्हणजे संस्कार .संस्कार म्हणजे लगाम. आपला आपल्याला लगाम लावणे अवघड जाते त्रास होतो आणि ही तारेवरची कसरत असते].
ह्या शहरात आल्यावर एक झाले
त्याचे घोडे उधळू लागले
येथे त्याला लगाम नव्हता
कुणाचा जाच नव्हता
आणि त्याचा तोच लगाम होता
घोडा तो
स्वार तो
म्हणाला उधळू दे घोडा
होऊ दे बेफाम कितीही
उधळला जरी घोडा
तरी खेचणारा मीच आहे
लगाम माझा मीच आहे
येथे आल्यावर एक झाले
पेपर लिहिणारा तोच
पेपर तपासणारा तोच
शप्पत येथे एक झाले
मार्काच्या खाली कधीच लाल रेघ आली नाही
कारण ..?
लाल रेघ मारणारा तोच होतो
प्रगती पुस्तक गावी पाठविल्यावर
आई बाबा खुष होते
त्याचे मार्क पाहून
अगदी तुप्त होत होते
घोडा उधळला तरी
लगाम त्यांचे हात होते ...!!
जबडा तोच न लगाम तोच
किती खेचणार लगाम ..?
कारण काच त्यालाच होत होता
त्याचाच जबडा दुखत होता
मग तोच थोडी थोडी ढील द्यायचा
नि घोडा उधळून जायचा
मग त्यालाच प्रश्न पडायचा
ह्याला आवरायचां कसा ..?
सूर्याचे सात घोडे
नि सारथी पक्का तरबेज होता
उधळले घोडे जरी किती तरी
सारथी त्याचा पक्का होता
त्याने मोजले त्याचेच घोडे
दोन होते ..?
की चार होते ..??
काय सांगू तुम्हाला
मोजणे अवघड होते
कोणता घोडा उधळेल केव्हा
सांगणे अवघड होते
उधळलेला घोडा आवरणे खूप कठीण होते
कारण घोडा तोच
नि लगाम फक्त त्याचे हात होते ...!!
प्रतिक्रिया
3 Oct 2011 - 11:05 am | प्रास
कविता आवडली.
3 Oct 2011 - 11:13 am | मदनबाण
ह्म्म... समजण्याचा प्रयत्न करतोय.
3 Oct 2011 - 11:35 am | मिसळलेला काव्यप्रेमी
खुप आवडली!!
3 Oct 2011 - 2:31 pm | पाषाणभेद
थोडक्यात शहरात होस्टेलवर राहील्यावर बॅचलरचा घोडा होतो.
(बॅचलर या व्याख्येत विद्यार्थी व नोकरीनिमीत्त लग्न झालेले पण बाहेरगावी एकटे राहणारेपण आलेत.)
5 Oct 2011 - 9:25 am | प्रभाकर पेठकर
घोडा म्हणजे मनातील विकार असे आधीच स्पष्ट केले आहे. पण घोडा म्हणजे अजून दूसरे काही असेल तरीही कविता 'अर्थपूर्ण' आहे असे म्हणावयास हरकत नाही.
8 Oct 2011 - 7:00 pm | नन्दादीप
व्वा.... मस्त... छान..