गाभा:
सौंदर्य हा कुठल्या जातिचा..धर्माचा वा प्रांताचा मक्ता नाहि असे जरी असले तरी सुंदर व रेखिव सौंदर्य या मधे बंगाली तरुणींचा भरणा सर्वात जास्त आहे असेच पुर्वि पासुनच आढळुन येते....
चित्रपट.. माध्यमे.. पत्रकारीता..मॉडेलिंग या मधे बहुसंख्य तरुणी बंगाली आढळतात..
सिनेमा व सिरियल हे क्ष्रेत्र तर अनेक बंगाली सौंदर्य वतिनी गाजवले आहेच..सुचित्रा सेन..अपर्णा सेन.. शर्मीला..काजोल..राणी..मुनमुन सेन ..जया बच्चन एक ना अनेक अशी उदाहरणे पहावयास मिळतात..
एव्हढेच नव्हे तर कालच्या गिता दत्त पासुन ते आजच्या श्रेया घोषाल या मधाळ आवाजांच्या गायिकेस सौंदर्याची देणगी पण विधात्याने बहाल केली आहे..
ह्या कलाकर तरुणी म्हणजे सौंदर्य व कला गुणांचा मधुर संगमच आहेत असे नमुद करावेसे वाटते....
बंगाली मुलिंची नावे पण खुप सुंदर असतात.हे पण पहाण्यात आलेले आहे...
प्रतिक्रिया
25 Sep 2011 - 3:04 pm | बिपिन कार्यकर्ते
मग? पुढे?
25 Sep 2011 - 3:08 pm | मितभाषी
कुण्या गावाचं आलं पाखरु :D
25 Sep 2011 - 3:31 pm | तर्री
माझा हाच अनुभव आसामी मुलींच्या बाबतीत आहे. त्या कमालीच्या सुंदर दिसतात.
बंगाली आणि आसामी महीलांच्या देहाची ठेवण अधिक सुडौल असते . ह्या मागे काही भौगोलिक कारण आहे का ?
25 Sep 2011 - 8:43 pm | आत्मशून्य
उदा. हिलस्टेशनवरच्या मूली (व मूले ही) जास्त देखण्या भासतात... उदा नाशीक/ महाबळेश्वर/ काश्मीर च्या लोकांची व्यक्तीमत्वे बघा. उष्ण कटीबंधाचा त्वचेच्या रंगासोबतच एकूणच शारीरीक रचनेवर प्रभाव पडतो असं वाटतं... अर्नोल्ड श्वार्झेनेगरप्रमाणे वयाच्या विसाव्या वर्षीच मिस्टर यूनीवर्स बनणे उष्ण कटीबंधातील व्यक्तीमत्वाला शक्य आहे असं वाटत नाही....
अवांतर :- असाम वरून आठवलं एका असामी मूलीशी मैत्री झाली होती... तिच नाव ब्रीज्टी होतं (म्हणजे पाऊस वृश्टी, व्रीश्टी ब्रीश्टी व पूढे ब्रीज्टी वगैरे वगैरे...) पण लोकांनी ब्रीज्टी नावाचा भलताच अपभ्रंष केला.....
25 Sep 2011 - 3:50 pm | आशु जोग
तुम्ही महाराष्ट्रातले आहात का ? त्यापलिकडे कुठल्या प्रांतात फिरला आहात !
--
बंगालमधेही एक मिसळपाव चालते
तिथे हा प्रश्न विचारला तर उत्तर मिळेल
--
25 Sep 2011 - 3:56 pm | नंदन
"बंगालशी संबंधित असल्याने ह्या धाग्याला 'वंगाळ' म्हणता येईल काय? आणि ह्याला स्त्रीवादी प्रत्युत्तर म्हणून 'अंगापेक्षा बोंगा मोठा?' (आठवा - असा मी 'असामी' मधला सुकुमार) असा धागा येईल काय?", अशी प्रतिक्रिया लिहिल्यास ती उडेल का शाबूत राहील ह्याचा तूर्तास (लॉर्ड कर्झनला स्मरून) विचार करतो आहे ;)
25 Sep 2011 - 4:03 pm | बिपिन कार्यकर्ते
=)) एक लंबर!
बाकी आम्हाला मेलं कसलंच अंग नाही!
25 Sep 2011 - 4:09 pm | अत्रुप्त आत्मा
१)आपला हा धागा काढण्यामागचे मर्म काय?......... :-)
२)शीर्षकामुळे 'हा धागा प्रत्येकाने उधडून बघावा' असे काहीसे मर्म वाटते,कारण धागा काथ्या-कूट या सदरात काढल्यावर सामान्यतः जी अपेक्षा असते,ती यातुन अजीबात व्यक्त होत नाही... आपले उत्तर काय?
25 Sep 2011 - 5:13 pm | बिपिन कार्यकर्ते
मर्म आहे असा संशय का आला हो तुम्हाला? आणि मर्म असलेच तर ते वर्म हे असावे! ;)
आज पर्यंत अकुकाकांनी धागा टाकल्यावर परत तिथे येऊन काही उत्तरे दिल्याचे उदाहरण आहे काय? असल्यास मला माहित नाही हो! ;)
25 Sep 2011 - 9:12 pm | अत्रुप्त आत्मा
आणि मर्म असलेच तर ते वर्म हे असावे! .... कळले हो...वर्माजी ;-)
अवांतर-तुमच्या सारखे कार्यकर्ते बी पीन मारतात तर मधेच...! ;-)
25 Sep 2011 - 6:03 pm | अविनाशकुलकर्णी
१)आपला हा धागा काढण्यामागचे मर्म काय?.
ईतर सर्व धाग्या प्रमाणे टी.पी.....
हाय काय अन नाय काय...
25 Sep 2011 - 9:17 pm | अत्रुप्त आत्मा
@-ईतर सर्व धाग्या प्रमाणे टी.पी.... :-) > टि.पि. टि.पि. टीपटॉप... व्हॉट कलर यु आर...? ;-)
25 Sep 2011 - 10:11 pm | धन्या
टी पी टी पी बरसे धागे... धागोने आग लगा दी ;)
25 Sep 2011 - 10:43 pm | मृत्युन्जय
टी पी टी पी बरसे धागे... धागोको आग लगा दे
26 Sep 2011 - 8:48 am | प्रचेतस
टीप टिप टिप धागे शुरु हो गये...
26 Sep 2011 - 10:14 am | llपुण्याचे पेशवेll
टी आणि पी मधला आर कुठे राहून गेला काय?
25 Sep 2011 - 5:50 pm | आशु जोग
मुलाचे नाव पूर्वी दगडू ठेवीत असत
तस झालय
25 Sep 2011 - 5:59 pm | अविनाशकुलकर्णी
......
25 Sep 2011 - 8:30 pm | आत्मशून्य
त्यांची अदा खरोखर घायाळ करते यात किंतू नाही.. मग ती तरूणी शिकली सवरलेली असो वा नसो अथवा कोणत्याही सामाजीक पार्श्वभूमीची असो त्यांच्या व्यक्तीमत्वातला फिमेल फॅक्टर (शारीरीक रेखीवता व वर्तणूक) खरोखर लोभस .
असो.. धाग्याचे प्रयोजन संपूर्ण लक्षात आले नाही कारण.. स्त्रियांच्या सौदर्यावर किती लिहणार ? शब्द कमीच पडतील.... हूस्नै जाना की तारीफ मूमकीन नही.....
25 Sep 2011 - 8:44 pm | शुचि
तात्यांचा स्त्रीसौंदर्यास वाहीलेला हा लेखही वाचावा. .
25 Sep 2011 - 8:51 pm | मदनबाण
सदर लेखकाचे आत्ता पर्यंतचे लेखन पाहता,असे धागे भविष्यातही येतील ! ;)
आवरा ! आवरा ! आवरा ! ;)
25 Sep 2011 - 9:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>> सदर लेखकाचे आत्ता पर्यंतचे लेखन पाहता,असे धागे भविष्यातही येतील !
सदरील लेखकाने दोन दोन ओळीचं लेखन सोडून दहा ओळीपर्यंत लेखन करण्यापर्यंत मजल मारली आहे, हेच सध्या मला महत्त्वाचं वाटतं आणि त्या दहा ओळीतून सध्या काही भरीव चर्चेचीही अपेक्षा ठेवत आहेत हा अमुलाग्र बदल काय कमी आहे. बाकी, चर्चेतील मुद्यावर भविष्यात काही उत्तरेही लिहितील याबद्दल माझ्या मनात शंकाच नाही.
बाकी, बंगाली तरुणींच्या सौंदर्याचे निकष काय ? यावर लेखकाने काही उजेड पाडला असता तर चर्चेने अधिक दमदार पावलं टाकली असती असे वाटते.
-दिलीप बिरुटे
25 Sep 2011 - 9:16 pm | मदनबाण
सदरील लेखक दोन दोन ओळीचं लेखन सोडून सदरील लेखक दहा ओळीपर्यंत आले आहेत हेच सध्या मला महत्त्वाचं वाटतं
खी खी खी... विवा हे वाक्य माझ्या प्रतिसादात टाकलं व्हतं... पण नंतर काढुन टाकलं. मनातलं टंकल्या बद्धल मंडळ आभारी आहे.;)
25 Sep 2011 - 9:44 pm | रेवती
अगदी सहमत!
दोनपेक्षा जास्त ओळी टंकल्यात म्हणून आम्हीच आभार मानायला हवेत.
बाकी अकुंच्या लेखन कौशल्याला नेहमीच दाद दिलेली आहे.;)
25 Sep 2011 - 9:48 pm | आशु जोग
मिसळीवरच्या थोर लोकांनी चिंध्या करण्यापेक्षा आणि नावे ठेवण्यापेक्षा
असच लिहायचं की ज्याच्या चिंध्या केल्या तरी वाइट वाटणार नाही.
---
मिसळीची लक्षणे गंभीर आहेत का ?
डॉक्टरला बोलावले पाहिजे.
डॉक्टर म्हणजे रोग्याला बरा करणारा म्हणायचे आहे
26 Sep 2011 - 1:57 pm | वपाडाव
....अजुन एक बंगाली तरुणी......
....दाक्षिणात्य चित्रपटांत अभिनेत्री आहे....
....कामलिनी मुखर्जी असे नाव आहे....
26 Sep 2011 - 2:07 pm | गणपा
तरी म्हटलं अजुन एकही फटु कसा बर नाय आला अजुन या धाग्यावर.. :)
26 Sep 2011 - 5:37 pm | आत्मशून्य
फटू नॉट अप टू एक्सपेक्टेशन असल्याने अंमळ निषेध व्यक्त करून लोकभावनेला वाट करून द्यावी म्हणतो....
26 Sep 2011 - 6:40 pm | मी-सौरभ
तुझ्या नावावरुन तुला गोल गोष्टींमधे फरच रस असावा असे दिसते... ;)
जाऊ दे...
बाकीचे फोटो व्यनीतून देणे ईष्ट राहील ना :)
27 Sep 2011 - 3:34 am | आत्मशून्य
मालक तूमच्या नावाचा शोर्टफॉर्म थोडक्यात कै सांगतो हो सासुसौ ?
टैम लै खराब है.... ;)