मित्रांनो,
माझे, नाडीग्रंथ महर्षींचे आणि विज्ञानवादी अंनिसचे काही वाकडे नाही. ते करत असलेले काम समाजहिताचे आहे. याचा मला आनंद व अभिमान आहे. तेंव्हा गैरसमज नसावा की मी पुराणमतवादी वा अविज्ञानवादी, अंनिस विरोधी आहे.
मात्र त्यांनी नाडी महर्षींच्या ग्रंथांना थोतांडाचा शिक्का मारायच्या आधी ते विविध अंगानी तपासावे म्हणजेच शास्त्रीय कसोटी घ्यावी असे माझे त्यांना नम्र निवेदन गेली १७ वर्षे आहे. अशा शोध अभ्यासाला मी माझा हात सदैव पुढे केलेला आहे. हे मी डॉ. जयंत नारळीकरांना १६वर्षापुर्वी पाठवलेल्या पत्रातून स्पष्ट होते. मात्र काही न करता त्यांनी नाडीग्रंथांवर जो शिक्का मारला तो एक विज्ञानाला मानणारा म्हणून मला मान्य होत नाही. आपण एकत्र येऊ. अभ्यास करू. असे माझे आजही जे प्रांजळपणे या विषयावर काम करू इच्छितात यांना निमंत्रण आहे.
एकदा तोंड देखले गेलेल्या एकांच्या 'आपल्याकडून माहिती काढून तीच माहिती आपल्याला नाडपट्टीतून आली आहे असे भासवतात या कथनाची ढाल पुढे करून किती दिवस मारुन नेणार?
अंनिसवर भक्ती असलेल्या आपल्या पैकी कोणी मदतीचा हात पुढे केला नाहीत तरी आता ताडपत्रातील लिपीचा पद्धतशीर अभ्यास करून त्या पट्यातील ओळी-ओळीच्या मजकुराची शहानिशा करून त्यातील कुट लिपीची फोड करणारे अभ्यास लेख सादर केले गेलेत. पैकी एक उपक्रम दिवाळी अंकातून प्रसिद्ध झालेल्या लेखाला सर्वात जास्त वाचले गेले.
हा विषय ज्योतिषशास्त्राच्या अखत्यारीतला म्हणून ते न मानणाऱ्यांना धोपटायला सोईचा झाला आहे, तिकडे ज्योतिषी लोक आपली वट कमी होते या काळजीने नाडी ग्रंथांना अनुल्लेखाने मारतात. भाषा तमिळ म्हणून त्यातील गम्य नसलेल्या तमिळेतर लोकांना भाषेची अडचण, नाडी वाचकांना ती सबब फसवणूक करायला सोपी व सोईची आहे असे वाटून अपसमज पसरवायला जड जात नाही. असे आजूबाजूचे वातावरण असल्याने त्यावर नाडीग्रंथांचा प्रत्यक्ष अनुभव हेच खरे उत्तर आहे.
अनुभव घेण्याची तसदी न घेता तर्काने फाटे फोडणाऱ्यांनी हा विषय चेष्टेचा करून, मला दुषणे द्यायला सोईचे जाते म्हणून नेहमीच विषयाचे गांभिर्य कमीकरून वाटेला लावायला संधी मिळते म्हणून कुत्सितपणे हाताळला आहे. याची मला कल्पना आहे. पण त्यानी माझ्या अंगाना काही भोके पडत नाहीत म्हणून मी निर्भीडपणे आत्तापर्यंत या सर्व विरोधी, उपरोधी वा विनोदी प्रतिक्रियांकडे खिलाडूवृत्तीने पहातो. विज्ञानाची कास धरणाऱ्या नाडी विरोधकांची नाडीग्रंथांच्या सत्यतेला पद्धतशीर प्रतारणा दुर्लक्ष करून किती दिवस चालणार?
इथे माझे एक मित्र नाडी ग्रंथ पाहून आलेले आहेत. त्यांची तक्रार त्यांच्या भविष्यातील कथनातील तफावतीची आहे. पण त्यांनी निदान नाडीग्रंथ पाहिल्याची व त्यातील माहितीची ओळख करून घेतली आहे. इतर तेवढेही करायला तयार नाहीत. असो.
मग आहेत कोणी सचोटीने नाडी ग्रंथांच्या अभ्यासाला तयार?...
बोला...
प्रतिक्रिया
14 Sep 2011 - 1:49 am | Nile
कोणीही नाहीएत. मग आता जाणार का?
14 Sep 2011 - 2:39 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुमच्या किंवा आणखी कोणाच्या नाडीपट्टीत हे लिहीलेलं नाही? अय्या, कमालच आहे की नाडी महर्षिंची! असं कसं काय विसरले ते? का हे त्यांना माहितच नव्हतं? का हे सगळं थोतांडच आहे?
14 Sep 2011 - 11:02 am | विजुभाऊ
ओक साहेब तुमच्या पेशन्स ची कमाल म्हणायची.
14 Sep 2011 - 10:57 am | ऋषिकेश
हा शब्द तुम्हाला लागू होतो का? जर अंनीस 'नाडी थोतांड आहे' याच पूर्वग्रहाने नाडीकडे बघते आहे तर तुम्ही देखील 'नाडी सत्य आहे' या पूर्वग्रहाने त्याचा अभ्यास करता आहात. मग प्रांजळपणा कोठे राहिला?
सचोटीचा अर्थ काय? नाडी वर विश्वास ठेऊन त्याचा अभ्यास करणे?
त्यापेक्षा नकोच.. नायल्याशी +१
इथे कोणीही नाडीचा अभ्यास करण्यात आपला वेळ फुकट घालवणारे नाहीत. आता तरी असे जाहिरातीसाठी उघडण्यात येणारे, नवे मासे शोधणारे धागे बंद होतील का?
14 Sep 2011 - 1:52 am | आत्मशून्य
.
14 Sep 2011 - 2:16 am | नर्मदेतला गोटा
लंबक अजुन झुलतोच आहे
14 Sep 2011 - 2:59 am | शाहिर
वास्तविक विज्ञान म्हणजे परीक्षण करुन , प्रयोग करुन एखाद्या गोष्टीचे सत्यता पड्ताळून पहाणे,
पण सो कॉल्ड विज्ञान महर्षी नवीन गोष्टी मागचे विज्ञान शोधण्याचा प्रयत्न का करीत नाहित याचे आश्चर्य वाटते..
ओक साहेब , तुम्ही चालु ठेवा....सध्या आम्ही लंबकाचा अभ्यास करत आहे
१. नाडी
२. लंबक
३. पिरॅमिड
४.प्लँचेट
५.लिंबू मिरचि
या क्रमाने अभ्यास करावा असे मला वाटते..
14 Sep 2011 - 3:27 am | चित्रगुप्त
होय आहेत तयार.
स्वतः प्रचिती घेतल्याशिवाय एखादी गोष्ट आपल्या आजवरच्या विचारसरणीला अनुकूल नाही, म्हणून सरसकटपणे तिचा उपहास वा अव्हेर करणे समंजसपणाचे नव्हे.
या विचारसरणीचे काही लोक (व मी स्वतः) याविषयी अनुभव घ्यायला व अभ्यास करायला नक्कीच तयार आहेत.
परंतु अश्या लोकांना नाडीकेंद्र वाल्यांकडून पूर्ण सहकार्य, तेही विनामूल्य मिळेल अशी सोय ओक साहेब करू शकतात का?
माझे काही मित्र व ओळखीचे लोक ( हे सर्व सुशिक्षित, बुद्धीमान, चिकित्सक वृत्तीचे आहेत) आपला वेळ देण्यासाठी तयार आहेत, पण दर वेळी सातशे रुपये ( वा तत्सम रक्कम) देणे शक्य नाही... तसेच हे लोक शांतिदिक्षा वगैरे काहीही करणार नाहीत.
दिल्लीतील नाडीकेंद्रात दर वेळी एकेकाला मी घेऊन जायला तयार आहे.
एवढे जर करू शकत असाल, तर जरूर घेऊ हे काम अंगावर.
14 Sep 2011 - 8:24 am | शाहिर
खात्री होइपर्यंत विनामूल्य सहकार्य मिळावे ही अपेक्षा रास्त आहे ...
ओक साहेब यावर भाष्य करतिल अशी अपेक्षा आहे ...
14 Sep 2011 - 9:21 am | धन्या
अहो, नाडी ग्रंथाचे वाचन करणे या कामासाठी श्रम करावे लागत नाहीत का? मग त्या श्रमाचा मोबदला नको का? आणि धरुन चला की त्यांनी सामाजिक बांधिलकी वेग्रे वेग्रे म्हणून फुकटात करुन दिलं तर उद्या कुणीही माकडे लाकडे धनाजीराव वाकडे त्यांच्याकडे जाईल आणि म्हणेल माझी नाडी बांधून दया स्वारी नाडी वाचून दाखवा म्हणेल.
14 Sep 2011 - 3:37 pm | शशिकांत ओक
चित्रगुप्त,
आपल्या प्रतिसादाने आनंद झाला.
नाडी केंद्राचे पुर्ण सहकार्य नाडीपट्टी शोधायला असतेच. त्यांचा तो व्यवसाय आहे. म्हणजे आपल्याला आपली पट्टी पहायला त्यांच्या प्रथेप्रमाणे जे सहकार्य करावे लागेल त्यासाठी आपले सहकार्य असावे लागते. आपण त्यांना वही मिळावी अशी विनंती करू शकता किंवा जिथे न मागताच ताडपट्टीवरील मजकूर एका वहीत लिहून द्यायची सोय उपलब्ध असेल तेथे जावे. तमिळ जाणकार बरोबर असल्यास ताडपट्टीतील निदान आपल्या नावाबाबतचा तपशील त्याच्याकडून तपासायला मदत होईल. ताडपट्टीचा फोटो काढून देण्यास मान्यना मिळवता आली तर फारच चांगले. अशा साठी माझी उपस्थिती वा रदबदली गरजेची नाही. त्यासाठी ओकांनी खास सोय करायला हवी असा हट्ट नको. किंबहुना ओकांचा पट्टी शोधायच्या कामात दुरान्वनेही सहभाग नसावा. कारण त्यांच्यावर हे ओकांनी घडवलेले कारस्थान असेल वा आहे असा म्हणायला वाव मिळतो असा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. असो.
आता प्रश्न उरतो तो 'फुकट' वा ' विनामुल्य' नाडी ग्रंथ वाचन करून मिळायला ओक रदबदली करू शकतात काय?
याचे उत्तर आपणच आपल्या अनुभवावरून द्यावे की मी माझ्या मित्रांना आपली कलाकृती आपण फुकट द्यावी अशी रदबदली केलेली आपल्याला आवडेल काय? नक्कीच नाही. पण तुम्ही काही कारणांनी खूष होऊन त्या याचकांना आपणहून "एकच काय दहा घेऊन जा फुकट" म्हणू शकाल. तसे आपण म्हणालात तर तो आपल्या अखत्यारीतला विषय आहे. मला त्याचे चांगले किंवा वाईट वाटायला नको. तसेच इथे आहे.
आपल्याला नाडी ग्रंथ अनुभवायचे आहेत तर येईल तोखर्च करायला आपली तयारी हवी. याउप्पर केंद्रवाल्यांनी आपल्याला काही सुट दिली तर तो त्यांचा व्यवसायाचा भाग आहे. मी त्यात मध्यस्ती करणे अयोग्य आहे.
मी माझे नाडीग्रंथवाचन करायला जातो तेंव्हा त्यांची पुर्ण फी त्यांना दिली जाते. असे खरे तर वेगळे सांगायला नको.
पण काहींच्या मनात नकळत वा मुदाम असे भासवण्याचा प्रयत्न होतो कि ओकांना काही तरी लाभ झाल्याशिवाय ते नाडी नाडी करत नसणार.
पुर्वी हवाईदलातील एकाने हाच विचार मला बोलून दाखवला तेंव्हा मी गप्प होतो. काही काळाने त्याने नाडी ग्रंथ पाहिले त्यात आलेल्या अनुभवावरून त्याने इतरांना महती सांगायला सुरवात केली. तेंव्हा इतरांनी त्याच्या आर्थिक लाभाविषयी शंका व्यक्त करायला सुरवात केली. तेंव्हा मी त्याला विचारले, "काय रे आता तूच मला सांग मी किती कमावतो?
" क्या बात कर रहे हो सर, आपकी नियतपर भला कैसे कोई शक कर सकता है? जितने मूंह उतनी बाते, छोडो सर, आप और मैं महर्षींयो की महती बताऐंगे जिसको जाना होगा वे जाऐंगे। ऐसी सब बाते नाडीग्रंथों का अनुभव न लेने के बहाने है।"
त्याचे बोल अनुभवाचे होते.
14 Sep 2011 - 3:50 pm | बिपिन कार्यकर्ते
श्री. ओक, तुमची गल्लत होते आहे. नाडीग्रंथांची सत्यासत्यता पडताळणे ही आमची इच्छा नसून तुमची गरज आहे. आम्ही काय मानायचे ते ऑलरेडी मानून बसलो आहोत. तुम्हाला त्याबद्दल आक्षेप आहे. नारळीकरांना पत्रही आपणच लिहिले होते. ते नव्हते आले तुमच्याकडे. तेव्हा तुमचा गोंधळ होतो आहे. तुम्हाला जर का नाडीग्रंथांचा प्रसार / प्रचार करायचा आहे तर हे असे करणे, अगदी वन्स अँड फॉर ऑल का होईना, करणे योग्यच आहे आणि व्यवहाराला धरूनच आहे.
उद्या चित्रगुप्तांना आपली चित्रे जगभर जावीत, प्रसिद्ध व्हावीत असे वाटले तर त्यांनी काही चित्रे स्वतःहून काही अभ्यासू आणि जाणकार व्यक्तींना दिली तर ते ठीकच असेल. याउलट, असेल माझ्या चित्रांमधे दम तर जग येईल माझ्या पायाशी आपणहून अशी धमक असेल तर त्यांनी निवांत चित्रं काढत रहावीत... जगाला त्यांची किंमत आपोआप कळेलच. नाही कळली तर जगाचे दुर्दैव, चित्रकार आहेच आपल्या मस्तीत.
आता बघा ब्वॉ तुमचे तुम्हीच!
14 Sep 2011 - 3:57 pm | प्रास
तंतोतंत सहमत......
ओककाका, याचाही विचार कराच.
14 Sep 2011 - 4:03 pm | सहज
आणी जे लोक स्वताचे पैसे व श्रम खर्च करुन आले आहेत व तरीही आक्षेप घेत आहेत. त्यांची बोळवण तुम्ही तथाकथीत बुद्धीवादी, वि़ज्ञानवादी तसेच नाडीपट्टीची बदनामी करणारे किंवा अनिंसवाले अशीच करत आला आहात.
तुमच्या नाडीपट्टीबाबतच्या वक्तव्यांवर आता गंभीरपणे घ्यावे असे काही राहीले नाही की तुमच्या अश्या आग्रहात काही निरागसता दिसत नाही. येनकेनप्रकारेण पैसा टाकून अनुभव घ्या. त्यातुन तुम्ही खोट काढली तरी मी महर्षींच्या आशीर्वादाने तुमचा समाचार घेईन हा तुमचा पवित्रा जगजाहीर आहे. गळ्याला सुरी लावून तुम्ही नाडीपट्टीचे पैसे मागत नाही आहात इतकाच काय तो तुमचा प्रामाणीकपणा!
ठीक आहे की हा तुमचा धंदा आहे. करा इमानदारीत, पण आपण लै प्रामाणीक आहोत व नाडीपट्टी काहीतरी अदभूत चमत्कार आहे असा इथे तरी आव आणू नका.
14 Sep 2011 - 4:41 pm | श्रावण मोडक
श्री. बिपिन कार्यकर्ते,
गल्लत ओकांची होत नाही. तुमचीच होते आहे. ओकांनी स्पष्ट लिहिले आहे, "नाडी केंद्राचे पुर्ण सहकार्य नाडीपट्टी शोधायला असतेच. त्यांचा तो व्यवसाय आहे."
तर, हा व्यवसाय आहे. ही व्यवसायाची जाहीरात आहे. तेव्हा त्याविषयी गल्लत नको. ओकांमध्ये दम आहे, अशा रीतीने व्यवसायाची इथे जाहीरात करण्याचा. तुम्ही त्यांच्या या दमाला दाद द्या.
आहे दम? ;)
15 Sep 2011 - 2:28 am | रामपुरी
जर ओकांनी इथे सरळ सरळ कबूल केले आहे की नाडी हा व्यवसाय आहे तर एखाद्या व्यवसायाची अशी जाहीरातबाजी मिपाच्या ध्येयधोरणात बसते का????
15 Sep 2011 - 10:48 am | शशिकांत ओक
मित्रांनो ,
नाडीमहर्षींच्या लेखन कार्याची ओळख कोणा एका व्यवसायाची ती सोय व्हावी असे म्हणून मी करत नाही.
म्हणूनच नाडी केंद्रांना मध्यवर्ती ठेऊन लिखाण केलेले नाही.
महर्षींनी लिहिलेले कथन योग्य त्या व्यक्तिला सांगितले जावे अशी व्यवस्था आहे. आता नाडी ग्रंथ पहायची सोय करु देणारे तो व्यवसाय म्हणून चालवतात. विवक्षित पट्टी जर त्या व्यक्तीची नसेल तर त्यातील मजकूर इतरांच्या हाती वा कानी न पडावा असे कटाक्षाने पाळले जाते. मात्र जर त्या व्यक्तीने आपणहून काही लोकांसमावेत पाहायला किंवा ऐकायला विरोध केला नाही तर त्यांना नाडीग्रंथ कथन ऐकायला मिळते.
राहिला प्रश्न आपली पट्टी आपल्याला देतात का तर याचे उत्तर -
हो असे आहे. जर एखाद्याच्या पट्टीत तसा उल्लेख असेल तर ते जरूर देतात. असा माझा अनुभव आहे. आपण प्रयत्न करून पहा. कदाचित आपल्या बाब तशी व्यवस्था असेल तर तुमची पट्टी तुम्हाला न मागता मिळेल.
14 Sep 2011 - 9:26 am | धन्या
एक प्रामाणिक प्रश्नः एव्हढा टोकाचा विरोध असूनही तुम्ही मात्र अगदी जीवनकर्तव्य असल्यासारखे अगदी एकाकी खिंड लढवत आहात. यातून तुम्हाला काय मिळते? लोकांच्या भल्यासाठी काही केल्याचे समाधान, नाडी केंद्रांकडून कमिशन, निवृत्तीनंतर वेळ जात नाही म्हणून उगाच आपला टाईमपास यट शेट्रा.
14 Sep 2011 - 8:29 pm | शशिकांत ओक
मित्रांनो,
"एकाकी" असे इथे मिपावरील कथनांच्या प्रतिसादावरून सुचित होत असले तरी तसे ते प्रत्यक्षात नाही.
नाडीग्रंथांच्या कथनांचा अभ्यास अनेक भारतीय व विदेशी लोक करत आहेत, असे आता हळूहळू उकलू लागले आहे. त्यातला मी एक छोटासा सहभागी.
नाडीग्रंथांवर अनेक इंग्रजी ग्रंथ उपलब्ध आहेत. काहींनी या विषयाला टीव्ही व युट्यूब वरून प्रसारित करून दाखवले आहे.
त्यात काहींनी नाडीमहर्षींविरुद्ध खोटा व विकृत प्रचार करणाऱ्यांना माझ्यापेक्षा हिरीरीने व सडेतोडपणे नाडीग्रंथांची सत्यता मांडली आहे.
14 Sep 2011 - 9:02 pm | Nile
>>"एकाकी" असे इथे मिपावरील कथनांच्या प्रतिसादावरून सुचित होत असले तरी तसे ते प्रत्यक्षात नाही.
नाडीग्रंथांच्या कथनांचा अभ्यास अनेक भारतीय व विदेशी लोक करत आहेत,
त्यांचं कुठलं संस्थळ बिंस्थळ नाही का??
14 Sep 2011 - 9:26 pm | शशिकांत ओक
शोधा म्हणजे सापडेल.
14 Sep 2011 - 12:38 pm | परिकथेतील राजकुमार
बुद्धीवाद्यांचा ऑलरेडी पराभव झालेला असताना विज्ञानवाद्यांचा पराभव होताना बघणे ह्यासारखे दुसरे सुख नाही.
14 Sep 2011 - 12:44 pm | स्पा
बुद्धीवाद्यांचा ऑलरेडी पराभव झालेला असताना विज्ञानवाद्यांचा पराभव होताना बघणे ह्यासारखे दुसरे सुख नाही.
=))
=))
=))
एवढी चिकाटी माझ्या अंगी बाणवली तर कुठच्या कुठे जैन मी
14 Sep 2011 - 1:01 pm | शाहिर
ओक काका नी बुद्धीवाद्यांचा पानिपत केल्यानंतर विज्ञानवाद्यां कडे मोर्चा वळवला आहे ..
काल सकाळी आम्ही नाडी पाहिली असता (कोण हसते रे ? केन्द्रा मध्ये जाउन बघितलि) तर त्या मध्ये विज्ञानवाद्यांचा घोर पराभव लिहिल्याचे आढळुन आले..
तसेच थोर शास्त्रज्ञ जयंत नारळीकार यांचा पराभव झाल्याचे आम्ही जाहिर करतो ..
विज्ञानवाद्यां नंतर कोण या संदर्भातले नाडी परीक्षण लौकर च केले जाइल
14 Sep 2011 - 8:01 pm | शशिकांत ओक
मित्रा,
तुम्ही वा मी तसे जाहीर करून झाले.
आता ज्यांना उद्देशून ते म्हटले गेले त्यांनी तसे म्हणायला हवे. आपण ही करा प्रयत्न...
खरे तर ही कुस्तीतील हार-जीत नाही. तसे मला व आपल्याला अपेक्षित नाही.
फक्त नाडी ग्रंथांच्याकडे पहायचा दृष्टीकोन विज्ञानावरील निष्ठांना बाळगून अभ्यासकरून ठरवावा असे मला म्हणायचे आहे. डॉ. नारळीकर वा अन्य विद्वतजन त्यांच्या क्षेत्रातील दिग्गज आहेत म्हणून त्यांच्या शब्दाला मान.... व त्यांनी यात लक्ष घालावे म्हणून एका वाचकानी मला तसे सुचवले म्हणून मी आपणहून त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे मत विचारले होते. तो पत्राचार कोणी वाचायला मागितला तर सादर करता येईल.
डॉ. नारळीकरांना नाडी केंद्रात नेऊन बसवायचा चंग किंवा स्वप्न ओकांनी बाळगले आहे. असे विकृत चित्र उभे करून मुख्य शोधकार्याच्या विषयाला बगल किती वेळा देणार.
15 Sep 2011 - 9:39 am | ऋषिकेश
न मागताच न विचारता तुम्ही नाडीच्या 'धंद्या'च्या (व्यवसाय काय धंदा काय एकच) जाहिरातींचा भडीमार करता आहात. पत्राचारही न मागताच आगाऊपणे प्रसिद्ध होईल / झाला असेल असे नाडीपट्टीत न बघताही सांगता यावे
15 Sep 2011 - 11:45 am | सोत्रि
स्पावड्या,
नको रे तु उगी जैन वगैरे बनण्याच्या भानगडीत पडु नकोस. तुझे परममित्र श्रियुत 'चेतन सुभाष गुगळे' ह्यांनी जैन कसे दुटप्पी असतात ह्यावर प्रचंड अभ्यास वग्रै करुन एक लेख पाडला आहे तो वाचाला नाहीस का?
- (दुटप्पी नसलेला हिंदु) सोकाजी
15 Sep 2011 - 12:15 pm | स्पा
स्पावड्या,
नको रे तु उगी जैन वगैरे बनण्याच्या भानगडीत पडु नकोस. तुझे परममित्र श्रियुत 'चेतन सुभाष गुगळे' ह्यांनी जैन कसे दुटप्पी असतात ह्यावर प्रचंड अभ्यास वग्रै करुन एक लेख पाडला आहे तो वाचाला नाहीस का?
=))
=))
=))
खपलो :D
16 Sep 2011 - 10:19 am | चेतन सुभाष गुगळे
हा धागा मी काढलेला नाहीय? अद्याप माझी या धाग्यावर कुठली ही प्रतिक्रिया देखील नाही. असे असताना माझा उल्लेख इथे करण्याचे कारणच काय?
माझ्या प्रसिद्धीचे घाऊक कंत्राट आपण घेतले आहे काय?
<< तुझे परममित्र श्रियुत 'चेतन सुभाष गुगळे' ह्यांनी जैन कसे दुटप्पी असतात ह्यावर प्रचंड अभ्यास वग्रै करुन एक लेख पाडला आहे तो वाचाला नाहीस का? >>
या विषयावरील चर्चा तिथेच करायला हवी ना?
<<(दुटप्पी नसलेला हिंदु) सोकाजी >>
दुटप्पी नसलेला हे धादांत खोटे विशेषण आहे. एकतर तुम्ही दुटप्पी आहातच. इथे सोकाजी बनून माझे टीकाकार / प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम करता, तर तिकडे फेसबुकावर ब्रिजेश मराठे बनुन माझ्याशी मैत्रीचा हात पुढे करता (जो मी स्वीकारला). त्यातही पुन्हा तुमच्या व्यक्तिमत्वाच्या सोकाजी आणि ब्रिजेश मराठे या दोन रुपांपैकी सोकाजी तरी खात्रीने दुटप्पी च आहे.
या सोकाजीच्याच रुपात तुम्ही माझ्या एका धाग्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती तर दुसरीकडे स्वतंत्र धागा उघडून त्याच धाग्याची खिल्लीही उडविली होती.
16 Sep 2011 - 10:31 am | Nile
काय हे सोकाजीराव! शोभतं का तुम्हाला हे! आं?? आम्हाला तुमच्याकडून कीती अपेक्षा होत्या!!
बाकी वरचा आणि हा प्रतिसाद एकामागोमाग एक वाचून हृदय हेलावले!!
16 Sep 2011 - 11:40 am | नगरीनिरंजन
>> शोभतं का तुम्हाला हे! आं?? आम्हाला तुमच्याकडून कीती अपेक्षा होत्या!!
चालायचंच. ते कधी सोकाजी तर कधी झोकाजी (इथे अंगठा तोंडाला आणि करंगळी हवेत अशी स्मायली) असावेत अशी शंका आम्हाला होतीच, त्यामुळे त्यांनी घेतलेला हा झोका अपेक्षितच आहे. चेतन सुभाष गुगळे हा सोकाजींचाच डुआयडी नाही ना अशी शंका आमची अधूनमधून उतरवते. :)
(सर्व संबंधितांनी ह. घ्या.)
16 Sep 2011 - 12:07 pm | चेतन सुभाष गुगळे
<< चेतन सुभाष गुगळे हा सोकाजींचाच डुआयडी नाही ना अशी शंका आमची अधूनमधून उतरवते. >>
ही शंका निराधार आहे. खालील माहिती वाचा.
सोकाजीरावत्रिलोकेकर
सदस्यंता कालावधी
१ year 45 आठवडे
चेतन सुभाष गुगळे
सदस्यंता कालावधी
3 वर्षे १ दिवस
16 Sep 2011 - 11:01 am | शिल्पा ब
गुगळे, तुम्ही असं मुक्काम पोस्ट परभणीचं वारं लागल्यासारखं काय करताय? बाकी प्रत्येक आय डीचं खरं नाव एखादा धागा काढुनच सांगुन टाका अशी एक नेहमीप्रमाणे आगाउ विनंती.
16 Sep 2011 - 12:02 pm | परिकथेतील राजकुमार
का रे बाबांनो त्या गुगळेंना छळता सगळे ?
सतत त्यांच्या मागे हात धुवून लागलेले असता ते :(
गुगळे, तुम्ही ह्या अडाणी लोकांकडे लक्ष देउ नका. स्वतःच्या बुद्धीचा आवाका सिमीत असल्याने ते तुमच्यावर जळतात आणि मग असली काहीतरी खुसपटे काढून तुम्हाला छळून स्वतःचे समाधान करून घेतात. त्यांच्यातर्फे मी तुमची माफी मागतो.
16 Sep 2011 - 12:08 pm | Nile
चेसुगु हे पराकुमारांची फाईंड आणी त्याबरोबरच मिपाला देणगी आहे हे मिपासदस्यांनी विसरता कामा नये. पराकुमारांनी चेसुगु, परभणी यांसारखे सदस्य मिपाला बहाल केले नसते तर मिपाचं काय झालं असतं या चिंतेने माझे अंतःकरण भडभडून आले!
16 Sep 2011 - 1:31 pm | शशिकांत ओक
गुगळे जी,
नमस्कार,
काहीतरी खुसपटे काढून... तुम्ही .... लोकांकडे लक्ष देउ नका
आपल्या एका धाग्यावर आत्मशून्यांनी
एक, शून्य, शून्य.... करत संपर्क केला होता...
तेंव्हा आपण त्यांना पुण्यातील नाडीकेंद्रात सफर करायला मान्यता दिल्याचे काही काळापुर्वी स्मरते. त्याचे काय झाले याची आठवण झाली ....
.... आठवले तर सांगा.
आपल्या सारखा शोधकवृत्तीचा विचारवंत नाडी ग्रंथांच्या सत्यतेकडे वैज्ञानिक नजरेने पहातो. त्यामागे काही तरी धोरणाचे असणार असा विचार आला..
16 Sep 2011 - 2:32 pm | चेतन सुभाष गुगळे
नमस्कार ओक सर,
आपण ते पूर्ण वाचले असेल तर आपल्या लक्षात येईल माझ्या शेवटच्या प्रत्युत्तरावर पुन्हा काहीच प्रतिसाद आलेला नाहीय. मी तिथे जे लिहीलंय तेच पुन्हा इथे लिहीन.
http://www.misalpav.com/node/18753#comment-333482
प्रश्न उरतो तो आव्हान स्वीकारणार्या व्यक्तिचा वेळ / मेहनत खर्ची पडण्याचा. तर यात आव्हान देणार्याचाही वेळ जात असतोच की. तेव्हा कोणी कुणाला मेहनताना / मानधन द्यायचे?
माझ्या पुरते म्हणाल तर हे जे कोणी ज्योतिषी (नाडीतज्ज्ञ / हस्तसामुद्रिक / पत्रिका विशेषज्ञ) असतील त्यांना मी माझी पत्रिका / हात / अंगठ्याचा ठसा दाखवायला तयार आहे. त्याकरिता पुण्यात कुठेही येउन एक दिवस खर्च करायची माझी तयारी आहे. याकरिता मी कुठलीही फी / मानधन घेणार नाही. त्याचप्रमाणे या ज्योतिषांनाही मी कुठलाही मोबदला देणार नाही. या संपूर्ण भविष्य कथनाचे व्हीडिओचित्रीकरण करण्यास माझी हरकत नाही, तसेच मी असे व्हिडीओचित्रीकरण करण्याला या मान्यवरांनीही हरकत घेऊ नये.
सदर चित्रीकरणातच आव्हान स्वीकारणारे जिंकले की हरले याचा सोक्षमोक्ष होऊ शकेल.
<< आपल्या सारखा शोधकवृत्तीचा विचारवंत नाडी ग्रंथांच्या सत्यतेकडे वैज्ञानिक नजरेने पहातो. त्यामागे काही तरी धोरणाचे असणार असा विचार आला.. >>
मी खुल्या नजरेने पाहतोय. जर results मिळू शकत असतील तर विश्वास ठेवला जाईल.
आता यावर तुमचे उत्तर अपेक्षित आहे.
16 Sep 2011 - 3:09 pm | धन्या
ओक काका,
श्री. चेतन सुभाष गुगळेंसारख्या शोधकवृत्तीचे विचारवंत नाडी ग्रंथांच्या सत्यतेकडे वैज्ञानिक नजरेने पाहतात. त्यामागे काही तरी धोरणाचे असावे आणि त्या धोरणानूसार त्यांनी त्यांचे मत मांडले आहे.
आता तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. :)
16 Sep 2011 - 2:36 pm | सोत्रि
कोणी कोणाचा उल्लेख कुठे/कधी करावा ह्या विषयी मिपा ध्येय-धोरणामधे काहीही लिहिले नाही, सबब मी कोणाचाही कुठेही उल्लेख करु शकतो बेधडक.
मी नोकरी करतो त्यामुळे मी नोकर आहे, सबब कंत्राटे घेण्याचा अधिकार नोकरांना नसतो
त्या धाग्यावर चर्चा करावे असे काहीच नव्हते, सबब केली नाही
इथुन पुढचा प्रतिसाद फारच वैयक्तिक आहे, सबब व्यनितुन उत्तर दिले जाइल.
- (सबबी शोधणारा जबाबदार) सोकाजी
16 Sep 2011 - 2:40 pm | स्पा
इथुन पुढचा प्रतिसाद फारच वैयक्तिक आहे, सबब व्यनितुन उत्तर दिले जाइल.
जमल्यास आम्हाला सीसी ठेवा :D
उत्सुक (स्पा)
14 Sep 2011 - 2:40 pm | गणपा
उपड्या घड्यावर पाणी.
रामाची सीता कोण?
ये रे माझ्या मागल्या.
हात दाखवुन अवलक्षण.
गिरे तो गिरे फिर भी टांग उप्पर !
नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे.
*
लगे रहो ओकसाहेब, आले अंगावर,तर घ्या शिंगावर कारण शेवटी प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे. ;)
* अजुन बर्याच आहेत पण कुणी आवरा म्हणायच्या आत आवरतो ;)
14 Sep 2011 - 5:03 pm | मन१
य्याक्क....
ज्यांचे वाकडे आहे त्यांनी सरळ करुन घ्यावे.
14 Sep 2011 - 5:06 pm | विनायक प्रभू
त्यात शी काय?
खुप जणांचा प्रॉब्लेम असतो तो.
पण वाकडे सरळ होतच नाही हे त्यांना आणि ब्रिगेडीयर (किंवा जनरल) साहेबांना सांगुन उपयोग नाही मनोबा.
@ श्रामो
अगदी सहमत.
ब्रि.किंवा ज. हे मिपाचे चोजन वन आहेत हे बिकाना कळत नाही त्याला काय करणार?
14 Sep 2011 - 5:09 pm | स्पा
धाग्याचं शीर्षक इतकं अश्लील आणि द्व्यर्थी काय म्हणुन ठेवलय ते....
ज्यांचं वाकडं आहे त्यांनी सरळ करुन घ्यावे.
बाब्बो
बेकार हाणलाय राव..
फुटलोय हसून हसून
14 Sep 2011 - 6:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अनुभव घेण्याची तसदी न घेता तर्काने फाटे फोडणाऱ्यांनी हा विषय चेष्टेचा करून, मला दुषणे द्यायला सोईचे जाते म्हणून नेहमीच विषयाचे गांभिर्य कमीकरून वाटेला लावायला संधी मिळते म्हणून कुत्सितपणे हाताळला आहे. याची मला कल्पना आहे. पण त्यानी माझ्या अंगाना काही भोके पडत नाहीत म्हणून मी निर्भीडपणे आत्तापर्यंत या सर्व विरोधी, उपरोधी वा विनोदी प्रतिक्रियांकडे खिलाडूवृत्तीने पहातो.
विषयाचं जाऊ द्या. पण, मला आपली खिलाडूवृती आणि विषयाबद्दलची चिवट असलेली वृत्ती आवडते.
-दिलीप बिरुटे
14 Sep 2011 - 8:35 pm | शशिकांत ओक
सर,
तीच तर गोम आहे.
अण्णा हजाऱयांच्या उपोषणाला नाव ठेवता येत नाही म्हणून "म्हातारा बराच चिवट आहे' अशी खवट स्तुती करणारे काही असतात.
14 Sep 2011 - 7:41 pm | शशिकांत ओक
मित्रांनो,
खाली म्हटल्याप्रमाणे परिस्थिती खरेच आहे किंवा नाही यासाठी शोध कार्य करावे... त्यासाठी ज्योतिषशास्त्रावर विश्वास असावा असा आग्रह नाही.
ताडपट्टीतील कथन काय आहे ते शोधाला सोपी युक्ती आहे. ताडपट्टीतील लेखन एका वहीत लिहून देतात त्याचा अभ्यास करता येतो. तो करावा असे माझे निवेदन आहे. विवक्षित व्यक्तीला उद्देशून त्यात जे काय कथन केलेले आहे त्याचा पडताळा त्या व्यक्तीने सचोटीने मान्य किंवा अमान्य करावा असा सचोटी या शब्दातून आशय व्यक्त होतो.
15 Sep 2011 - 2:45 am | रामपुरी
जर ती नाडी माझीच आहे हे नक्की असेल तर ती माझी खाजगी मालमत्ता समजून माझ्या ताब्यात देण्यात यावी एवढेच माझे निवेदन आहे. त्यासाठी वेगळी वही बाद करण्याची गरज नाही.
(यावरून सहज सुचलं, समजा एखाद्याला "तुझी नाडी सापडली" म्हणून या व्यवसायवाल्यांनी एक बाड घडाघडा वाचून दाखवलं तर ती व्यक्ती "हे माझं बाड आहे आणि यात माझ्याबद्दल खाजगी गोष्टी लिहिलेल्या आहेत. आणि त्या जगजाहीर होउ नयेत म्हणून ते माझ्या हवाली केलं जावं" असा कोर्टात दावा घालू शकेल काय? मिपा वरील या विषयातील (म्हणजे कायदा, नाडी नव्हे) तज्ञ मंडळींचे काय मत आहे?)
15 Sep 2011 - 11:03 am | शशिकांत ओक
महर्षींनी लिहिलेले कथन योग्य त्या व्यक्तिला सांगितले जावे अशी व्यवस्था आहे. आता नाडी ग्रंथ पहायची सोय करु देणारे तो व्यवसाय म्हणून चालवतात. विवक्षित पट्टी जर त्या व्यक्तीची नसेल तर त्यातील मजकूर इतरांच्या हाती वा कानी न पडावा असे कटाक्षाने पाळले जाते.
एकाचे नाडीग्रंथवाचन करताना ते कथन अन्य कोणाला त्या जागी बसुन ऐकायला परवानगी असते का याचा आपण शोध घ्यावा.
मात्र जर त्या व्यक्तीने आपणहून काही लोकांसमावेत पाहायला किंवा ऐकायला विरोध केला नाही किंवा जर महर्षींनी त्याला संमती दिली वा प्रतिरोध केला नाही तर त्यांना नाडीग्रंथ कथन ऐकायला मिळते. जसे काही मुले आपल्या आई-वडिलांनी थांबून ते ऐकावे असा आग्रह धरतात. तर कधी पती-पत्नीपैकी एकाचे कथन चालू असता ते ऐकायला जोडीदाराने आवर्जून थांबावे असे वाटले तर त्याला परवानगी दिली जाते.
14 Sep 2011 - 9:28 pm | अर्चिस
स्विस बँकेतले भारतीयांचे काळे पैसे भारत सरकार कधी परत आणणार ?
14 Sep 2011 - 9:35 pm | गणपा
त्यासाठी आधी सगळ्या राजकारणी/बिझनेस टायकुन्स् आदींच्या नाड्या सोडाव्या शोधाव्या लागतील.
त्यासाठीचे पैसे कोण भरणार?
16 Sep 2011 - 12:00 pm | ईश आपटे
कुत्र्याची शेपटी कधी सरळ होते का ?? तसे भारतातील वैज्ञानिक, कम्युनिस्ट, सेक्युलर, अंधश्रध्दानिर्मुलनवादी, पुरोगामी हे जन्मजात वाकडे आहेत...........................
16 Sep 2011 - 12:05 pm | Nile
मेलो! मेलो!! मेलो!!!
त्रिकोणी पृथ्वी वाले आम्हाला वाकडे म्हणत आहेत, आता याचा काय अर्थ घ्यायचा हे कोणीतरी सांगा रे!! =)) =))
16 Sep 2011 - 12:08 pm | ईश आपटे
आला पहिला वाकडा आला...
आता लगेच बाकीचे म्हातारे, नर मादी वाकडे ही येतील.. अगदी धनाजीराव वाकडे ही येतील... :)
16 Sep 2011 - 12:08 pm | शिल्पा ब
त्रिकोणी पृथ्वी? हे काय नवीन?
16 Sep 2011 - 1:44 pm | शशिकांत ओक
शिल्पादेवी जी,
नाडीने आधीच वात आलाय... त्यात आता वाकड्यात शिरायचे म्हणजे ...
म्हणून नका मला की नाडीतून काही लिहिलय का त्याबद्दल म्हणून...
... की मी लगेच म्हणणार .... प्रत्यक्ष अनुभव घ्या ....
.... तुम्ही धनंजय व प्रियालींप्रमाणे म्हणणार... ... असल्या फालतू कामाला मला वेळ नाही... मग मी म्हणणार (मनात)... इथे चकाट्या पिटायला समय की कोई कमी नहीं।
तुम्ही म्हणणार ... आपल्या चिकाटीचे कौतुक वगैरे...
16 Sep 2011 - 2:02 pm | श्रावण मोडक
शांत व्हा. हे आंतरजाल आहे*! ;)
* या विधानाचे श्रेय माझे नाही. ते उपक्रमी धम्मकलाडू यांचे आहे.
16 Sep 2011 - 2:08 pm | शशिकांत ओक
ईशजी,
मानवांचे माहित नाही. पण नुकतीच एक पत्रकार सभा झाली. त्यात दिसेल त्याजागी, मिळेल त्या वस्तूंवर पायवर करून घाण करण्याने पर्यावरणाचे नुकसान होत असल्याची तक्रार चर्चेला आली होती. त्यासाठी कुंड बांधून त्यात विधी करावा असा प्रस्ताव मांडला गेला. तसे असून ही काहींच्या शेपट्या अजून ही वाकड्या असल्याची तक्रार करून म्हटले गेले की ते आचरण करीत नसले तर त्यांच्यावर कारवाई शिवाय गत्यंतर नाही....
... असा सर्व श्वानांचा सूर होता.