नाडीग्रंथ महर्षींचे आणि विज्ञानवाद्यांचे वाकडे असायचे कारण नाही...
मित्रांनो,
माझे, नाडीग्रंथ महर्षींचे आणि विज्ञानवादी अंनिसचे काही वाकडे नाही. ते करत असलेले काम समाजहिताचे आहे. याचा मला आनंद व अभिमान आहे. तेंव्हा गैरसमज नसावा की मी पुराणमतवादी वा अविज्ञानवादी, अंनिस विरोधी आहे.
मात्र त्यांनी नाडी महर्षींच्या ग्रंथांना थोतांडाचा शिक्का मारायच्या आधी ते विविध अंगानी तपासावे म्हणजेच शास्त्रीय कसोटी घ्यावी असे माझे त्यांना नम्र निवेदन गेली १७ वर्षे आहे. अशा शोध अभ्यासाला मी माझा हात सदैव पुढे केलेला आहे. हे मी डॉ. जयंत नारळीकरांना १६वर्षापुर्वी पाठवलेल्या पत्रातून स्पष्ट होते. मात्र काही न करता त्यांनी नाडीग्रंथांवर जो शिक्का मारला तो एक विज्ञानाला मानणारा म्हणून मला मान्य होत नाही. आपण एकत्र येऊ. अभ्यास करू. असे माझे आजही जे प्रांजळपणे या विषयावर काम करू इच्छितात यांना निमंत्रण आहे.
एकदा तोंड देखले गेलेल्या एकांच्या 'आपल्याकडून माहिती काढून तीच माहिती आपल्याला नाडपट्टीतून आली आहे असे भासवतात या कथनाची ढाल पुढे करून किती दिवस मारुन नेणार?
अंनिसवर भक्ती असलेल्या आपल्या पैकी कोणी मदतीचा हात पुढे केला नाहीत तरी आता ताडपत्रातील लिपीचा पद्धतशीर अभ्यास करून त्या पट्यातील ओळी-ओळीच्या मजकुराची शहानिशा करून त्यातील कुट लिपीची फोड करणारे अभ्यास लेख सादर केले गेलेत. पैकी एक उपक्रम दिवाळी अंकातून प्रसिद्ध झालेल्या लेखाला सर्वात जास्त वाचले गेले.
हा विषय ज्योतिषशास्त्राच्या अखत्यारीतला म्हणून ते न मानणाऱ्यांना धोपटायला सोईचा झाला आहे, तिकडे ज्योतिषी लोक आपली वट कमी होते या काळजीने नाडी ग्रंथांना अनुल्लेखाने मारतात. भाषा तमिळ म्हणून त्यातील गम्य नसलेल्या तमिळेतर लोकांना भाषेची अडचण, नाडी वाचकांना ती सबब फसवणूक करायला सोपी व सोईची आहे असे वाटून अपसमज पसरवायला जड जात नाही. असे आजूबाजूचे वातावरण असल्याने त्यावर नाडीग्रंथांचा प्रत्यक्ष अनुभव हेच खरे उत्तर आहे.
अनुभव घेण्याची तसदी न घेता तर्काने फाटे फोडणाऱ्यांनी हा विषय चेष्टेचा करून, मला दुषणे द्यायला सोईचे जाते म्हणून नेहमीच विषयाचे गांभिर्य कमीकरून वाटेला लावायला संधी मिळते म्हणून कुत्सितपणे हाताळला आहे. याची मला कल्पना आहे. पण त्यानी माझ्या अंगाना काही भोके पडत नाहीत म्हणून मी निर्भीडपणे आत्तापर्यंत या सर्व विरोधी, उपरोधी वा विनोदी प्रतिक्रियांकडे खिलाडूवृत्तीने पहातो. विज्ञानाची कास धरणाऱ्या नाडी विरोधकांची नाडीग्रंथांच्या सत्यतेला पद्धतशीर प्रतारणा दुर्लक्ष करून किती दिवस चालणार?
इथे माझे एक मित्र नाडी ग्रंथ पाहून आलेले आहेत. त्यांची तक्रार त्यांच्या भविष्यातील कथनातील तफावतीची आहे. पण त्यांनी निदान नाडीग्रंथ पाहिल्याची व त्यातील माहितीची ओळख करून घेतली आहे. इतर तेवढेही करायला तयार नाहीत. असो.
मग आहेत कोणी सचोटीने नाडी ग्रंथांच्या अभ्यासाला तयार?...
बोला...
वर्गीकरण
प्रतिक्रिया
नाहीएत.
+१
ओक साहेब तुमच्या पेशन्स ची
+१
नक्कि काय वाकडे असायचे कारण नाही ?
लंबक अजुन झुलतोच आहे
अत्यंत वस्तव वादी आणी परखड लेख
आहेत कोणी सचोटीने नाडी ग्रंथांच्या अभ्यासाला तयार?
खात्री होइपर्यंत विनामूल्य ..
फुकटे कुठचे...
नाडीवाचन विनामूल्य मिळेल अशी सोय ओक साहेब करू शकतात का
श्री. ओक, तुमची गल्लत होते
बिकांशी
+१
गल्लत
एक वकीली प्रश्न
नाडीमहर्षींची महती सांगायला मला कसला आलाय संकोच.
ओककाका,
अगदी एकाकी
त्यांचं संस्थळ?
आपण समर्थ आहात
मस्त लेखन
+१०००
पुढचा नंबर कोणाचा
आम्ही जाहिर करतो .
जाहिरातींचा भडीमार
एवढी चिकाटी माझ्या अंगी
खपलो
ही मोफत सेवा कशाकरिता पुरवित आहात?
काय हे सोकाजीराव!
>> शोभतं का तुम्हाला हे! आं??
शं का नि र स न
गुगळे, तुम्ही असं मुक्काम
का रे ?
सहमत
कथा कुणाची व्यथा कुणा....
नमस्कार ओक सर, आपण ते पूर्ण
उत्तर दया !!!
जगात काही मोफत असते त्यावर माझा विश्वासच नाहीयेय...
इथुन पुढचा प्रतिसाद फारच
काही म्हणी / वाक् प्रचार आठवले.
शी....
?
धाग्याचं शीर्षक इतकं अश्लील
अनुभव घेण्याची तसदी न घेता
तीच तर गोम आहे
सचोटी या शब्दातून आशय
जर
अन्य कोणाला त्या जागी बसुन ऐकायला परवानगी असते का
ते सर्व जाउ द्या.....आधी मला सांगा