मौलवींची मौलिक मौक्तिके !

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
14 Sep 2011 - 4:30 am
गाभा: 

http://timesofindia.indiatimes.com/city/lucknow/Qazis-knotty-terms-to-so...

ज्या निकाहाच्या वेळी बुफे पद्धतीचे जेवण आणि पार्श्वभूमीवर संगीत असेल तिथे काझी लोक निकाह लावणार नाहीत असे फर्मान काही मुस्लिम धर्म मार्तंडानी काढले आहे. संगीत हे इस्लामला मंजूर नाही. आणि बुफेचे खूळही.

ह्या फर्मानामुळे अनेक मुस्लिम कुटुंबांची पंचाईत झाली आहे. चांगले वाजत गाजत, साग्रसंगीत लग्न, आय मीन निकाह लावण्यावर संक्रांत आली आहे.

खानेवाला राझी और सुननेवाला राझी तो क्या करेगा काझी असे म्हणता आले असते. पण तसे होत नाही.
विशेष म्हणजे शिया आणि सुन्नी दोन्ही गटांचे अध्वर्यू याबाबतीत एकमतात आहेत.

(आपल्या लाडक्या सकाळमधेही ही बातमी काही तासांपूर्वी आली होती पण काही अज्ञात कारणांमुळे उडवून लावली आहे.)
ऐकावे ते नवलच!

प्रतिक्रिया

हि बघा लिंक

http://72.78.249.107/esakal/20110914/4779604889786783975.htm

पण ह्या बातमीचा तुमच्या आमच्या वर काय फरक पडतो. (तुम्ही मुसलमान नाही आहात आणि भविष्यात कुठल्याही मुसलमान मुलाशी / मुलीशी लग्न करणार नसाल असे गृहीत धरतो विचारात आहे ) :)

राजेश घासकडवी's picture

14 Sep 2011 - 4:50 am | राजेश घासकडवी

परवा आमच्या मित्राचे लग्न होते. पण आयत्या वेळी भटजीने लग्न लावून द्यायला नकार दिला - का तर म्हणजे पंगतीत गोमांस वाढू नये! आता मी म्हणतो, खानेवाला राझी तो क्या करेगा भटजी असे म्हणता आले असते. पण नाही. भटजीशिवाय नुसते रजिष्टर करावे लागले लग्न. आता मला सांगा, हे काय खरे लग्न का? आधी दोन वर्षे एकत्र रहात होते तसेच रहातात, फक्त एक सर्टिफिकेट घेऊन....

Nile's picture

14 Sep 2011 - 4:53 am | Nile

साष्टांग स्विकारा हो गुर्जी!

सहज's picture

14 Sep 2011 - 6:00 am | सहज

हा हा हा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Sep 2011 - 7:50 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अहो, हे तर सोडाच. आम्ही म्हटलं आमचं लग्न लावून द्या तर चक्क दक्षिणा, नारळ आणि काय काय मागत होता. वर त्याची पावतीही देणार नाही म्हणाला! आता पावती नाही याचा अर्थ हे पैसे काळे नाही का झाले? आम्ही खपून मिळवलेले पांढरे पैसे असे काळे होताना बघवले नाहीत. मग दिली तडी त्या भटजीला!

राजेश घासकडवी's picture

14 Sep 2011 - 7:54 am | राजेश घासकडवी

स्विस बॅंकेत सर्वाधिक संपत्ती ठेवलेले कोणी भटजीच आहेत असं ऐकून आहे...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Sep 2011 - 8:46 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

त्या सर्व भटजींची यादी जाहीर करावी अशी मागणी अण्णांनी स्विस सरकारकडे सुपोषण* करावी असं पत्रं मा. सुधीर काळे यांनी लिहावं अशी विनंती मी करत आहे.

*उपोषणासहित

विजुभाऊ's picture

14 Sep 2011 - 11:29 am | विजुभाऊ

वरील प्रतिसादात मिपा सदस्य श्री काळे यांचा उल्लेख कशासाठी करण्यात आलेला आहे?
कारण नसताना एखाद्याची थट्टा कशासाठी करायची?

पाषाणभेद's picture

15 Sep 2011 - 2:02 am | पाषाणभेद

>>> त्या सर्व भटजींची यादी जाहीर करावी अशी मागणी अण्णांनी स्विस सरकारकडे सुपोषण* करावी असं पत्रं मा. सुधीर काळे यांनी लिहावं अशी विनंती मी करत आहे.

*उपोषणासहित
===================================
सुपोषण= सु+पोषण=सु= चागंले, उत्तम, व्यवस्थीत
(उदा. सुगम, सुलोचन, सुनीती आदी.)

आता आपण सुपोषण* म्हणजे *उपोषणासहित असे म्हणता आहात.

आपण सपोषण म्हटले असते तर ठिक आहे. सुपोषण म्हणजे उपोषणाच्या अगदी विरूद्धअर्थी शब्द तयार होतो आहे.

"सुपोषण* म्हणजे *उपोषणासहित" म्हटले म्हणजे एक नविन चुकीचा शब्दार्थ तयार होतो आहे. केवळ आपल्या नजरेस आणून देण्याचा प्रयत्न. बाकी चालू द्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Sep 2011 - 3:40 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सविनय = स+विनय तसेच सुपोषण = स+उपोषण.

पाषाणभेद's picture

15 Sep 2011 - 3:52 am | पाषाणभेद

वादाचा मुद्दा आहे खरा

विश्वनाथ मेहेंदळे's picture

15 Sep 2011 - 9:30 am | विश्वनाथ मेहेंदळे

मग ते सौपोषण असे पाहिजे ना ?? (अ + उ =औ )

सुपोषण चा अर्थ नेमका उलट होईल. सु + पोषण असा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Sep 2011 - 9:32 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हां ... पण सौपोषण हा शब्द कानाला बरा नाही वाटत आहे. त्यापेक्षा मी तो शब्द मागे घेऊन उपोषणासहित हाच शब्द पुढे करते.

आशु जोग's picture

16 Sep 2011 - 11:01 pm | आशु जोग

>> सौपोषण हा शब्द कानाला बरा नाही वाटत आहे. त्यापेक्षा मी तो शब्द मागे घेऊन उपोषणासहित हाच शब्द पुढे करते

मागे म्हणजे नावामागे सौ

भटजी लोकांबद्दल बरीच माहिती दिसत्ये

म्हणजे तुम्ही ... नक्कीच

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Sep 2011 - 3:41 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पिवळा डांबिस's picture

14 Sep 2011 - 5:01 am | पिवळा डांबिस

आमचा याबाबतीत काजीलोकांना पाठिंबा!!

हिंदू लग्नातही बुफे बंद करून जर पंगत बसवून जेवण वाढलं नाही आणि फिल्मी गाण्यांच्याऐवजी जर सनई-चौघडा वाजवला नाही तर आम्ही लग्न लावणार नाही अशी कणखर भूमिका भटजीलोक घेतील तर बरं होईल!!!!!

एका लग्नात तर चक्क भेळ्पुरी-पाणीपुरीच्या गाड्या लावलेल्या पाहिल्या...
च्यामारी, ही काय थट्टा आहे?
तुम्हाला साग्रसंगीत धार्मिक लग्न करायचंय ना, मग आपापले रीतीरिवाज पाळा ना!
नंतर उरलेलं आयुष्य आहेच की मोकळं वधूवरांना, स्वतःच्या आयुष्याची चौपाटी करायला!!!!!
पटत नसेल तर मग सरळ रजिष्टर लग्न करा.....

("कायतरी गाण्याचं कुळधर्म पाळा की! उगीच नाही तो हुंबपणा कशाला?", रावसाहेब)
:)

विकास's picture

14 Sep 2011 - 6:00 am | विकास

श्री. पिडांशी आदर राखत असहमती दर्शवत आहे. त्यांच्या लेखनावरून हे स्पष्ट झाले की त्यांनी यश चोप्रा आणि कंपनींचे चित्रपट आणि त्यातून झालेले लग्नसमारंभाचे लोकशिक्षणाचे कोर्सेच बंक केले आहेत. (त्याबद्दल वेगळा निषेध! ;) ).

बाकी वरील बातमी (आणि सकाळमधील) वाचल्यावर असे लक्षात आले आहे की वाजंत्री आणि बफे/बुफे ला आक्षेप आहे. त्यात त्यांनी सरसे सरसे सरकी चुनरीया... पासून ते दिलवाले वगैरे मधील गाण्यांमधे दाखवलेल्या नाचांच्या बाबतीत आक्षेप घेतलेला नाही. म्हणून जर त्यांच्या या अप्रत्यक्ष फतव्याचा निषेध करायचाच असेल तर अशा प्रसंगी सर्वांनी नाचावे...

शुचि's picture

14 Sep 2011 - 6:36 am | शुचि

>> तुम्हाला साग्रसंगीत धार्मिक लग्न करायचंय ना, मग आपापले रीतीरिवाज पाळा ना! >>
खरच!!! अगदी १००% खरय.
केळीच्या पानावर किंवा ताटात वाढलेला मसाले भात, मठ्ठा, गरम पांढरा भात वरण वर तूपाची धार, पापड कुर्ड्या, कोशींबीर, चटणी, अळूची पातळ भाजी, जिलबी किंवा श्रीखंड-पुरी. किती मस्त जेवण असायचं पूर्वी.

सनईने तर इतकी मंगल वातावरणनिर्मीती होते : ) त्यात होमाचा धूर, लाह्या टाकणे.

वाळा, मोगरा अशी पारंपारीक अत्तरे लावलेल्या , गजरे माळलेल्या शोडषयौवनांची, पुरंध्रींची, ते आज्जीबाईंपर्यंत सर्वांची एकच लगबग. लहान मुलांचा उत्साह, भटजींचे मंत्रोच्चारण तर या सर्वावर कळस.

केवढी मजा असते लग्नात.

शाहिर's picture

14 Sep 2011 - 8:30 am | शाहिर

+१
शुचि तै .....
एकदुम मंगल वातावरणा मधे पोचवलत ..
साग्रसंगीत धार्मिक लग्न आणि वर सांगिअतल्य प्रमाणे जेवण .अहाहा

स्वतच्या लग्नात पंगतच हवीच असा (जावइ)आग्रह धरणारा

शाहिर

नितिन थत्ते's picture

14 Sep 2011 - 10:33 am | नितिन थत्ते

>>केळीच्या पानावर किंवा ताटात वाढलेला मसाले भात, मठ्ठा, गरम पांढरा भात वरण वर तूपाची धार, पापड कुर्ड्या, कोशींबीर, चटणी, अळूची पातळ भाजी, जिलबी किंवा श्रीखंड-पुरी. किती मस्त जेवण असायचं पूर्वी.

हा भोजनप्रकार "अस्साच्या अस्सा" नक्की किती हजार वर्षे रूढ आहे त्याची माहिती मिळेल का? म्हणजे शतका-दशकात काहीच बदल झाले नाहीत का? माझ्याच आठवणीत पाटावरची पंगत बंद होऊन टेबलावरील पंगत रूढ झाली आहे.

>>सनईने तर इतकी मंगल वातावरणनिर्मीती होते : ) त्यात होमाचा धूर, लाह्या टाकणे.
मंगल वातावरण निर्मिती ही मानसिक स्थिती (a state of mind) आहे. ती सनई पासून सॅक्सोफोनपर्यंत कश्यानेही होऊ शकते. (विवाहात मंगल काय असतं माहिती नाही). होमाच्या धुराने आणि लाह्यांनी उपस्थितांच्या डोळ्यांची आग होण्याखेरीज काही घडत नाही असा स्वानुभव आहे. (होमाच्या धुराने हवा शुद्ध होते असे प्सांगू नका, प्लीज).

>>वाळा, मोगरा अशी पारंपारीक अत्तरे लावलेल्या , गजरे माळलेल्या शोडषयौवनांची, पुरंध्रींची, ते आज्जीबाईंपर्यंत सर्वांची एकच लगबग. लहान मुलांचा उत्साह, भटजींचे मंत्रोच्चारण तर या सर्वावर कळस.

कुठच्या प्रकारे विवाह होत आहे यामुळे या लगबगीत आणि उत्साहात काही फरक पडत नाही. आता अत्तर वाळ्याचं लावावं की लव्हेण्डरचं हा वैयक्तिक चॉईस असावा. म्हणजे पारंपरिक मोगरा आणि वाळ्याच्या अत्तराऐवजी लव्हेण्डरचं अत्तर लावलं तर मांगल्य कमी होतं असं काही नसावं.

>>केवढी मजा असते लग्नात.

ती तर अजूनही असतेच. उलट होम आणि लाह्यांचा धूर एलिमिनेट झाला तर आणखी मजा येईल.

नितिन थत्ते

ऋषिकेश's picture

14 Sep 2011 - 11:20 am | ऋषिकेश

ठ्ठो! :))
थत्ते चाचा झिंदाबाद!

थत्तेचाचिच्यांशी १००००% सहमत
भटजींचे मंत्रोच्चारण तर या सर्वावर कळस.
याच्या इतका ईनोदी प्रकार माझ्या पहाण्यात नाही.
लग्नातील लाज्या होम यात धार्मिक काय असते ते जाणकारानी भाष्य करून सांगावे. " भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास" या पुस्तकात होमाचे थोतांड उघड केलेले आहे

माझ्या लग्नात भटजीची बोबडी वळली* होती मंत्र म्हणताना त्याची आठवण झाली.

*वळणारच, त्याच्या मागे सात पैलवान उभे करून ठेवले होते. ;)

लग्नाआधीपासूनच प्रोटेक्शनची गरज पडली की काय? ;-) (ह. घेणे)

अर्धवट's picture

14 Sep 2011 - 11:52 am | अर्धवट

हाहाहा.. तेव्हा आंधळा होतो रे... आत्ता वाटतय की ते पैलवान वास्तवीक माझ्या मागे उभे करायला हवे होते.
;)

आख्ख्या आळंदीत दुसरा भटजी मिळेना ऐनवेळेला म्हणून त्याला उचलून आणला होता. पळुन जाउ नये म्हणून पैलवान ठेवले होते..

आम्ही शुचि तै च्या प्रतिसादाला अनुमोदन दिला आहे म्हणुन...

>>हा भोजनप्रकार "अस्साच्या अस्सा" नक्की किती हजार वर्षे रूढ आहे त्याची माहिती मिळेल का?

जेवणाच्या बाबतीत एखादा पूर्वी म्हणतो तेव्हा ते स्वअनुभवावरुन असता..ते हजार वर्षे नक्किच नसता..

>>माझ्याच आठवणीत पाटावरची पंगत बंद होऊन टेबलावरील पंगत रूढ झाली आहे.

पंगत पाटावरची कि टेबलावरील हा मुद्दा नाहिये ...जेवणामधील पदार्थ या विषयी आहे ..

>>मंगल वातावरण निर्मिती ही मानसिक स्थिती (a state of mind) आहे. ती सनई पासून सॅक्सोफोनपर्यंत कश्यानेही होऊ शकते.

सर्व साधारण विधान आहे ...आणि मान्सिक स्थिती असेल तर प्रत्येक जण अनुभवा नुसार लिहिल..आम्हाला सनै ने मंगल वाटते म्हणुन आम्ही अनुमोदन दिले ..

>>विवाहात मंगल काय असतं माहिती नाही
ज्याच्या त्याच्या मानण्यावर आहे ...चिंतातूर जंतू असेल तर मंगल काय असेच म्हणेल ..

>> होमाचा धूर, लाह्या टाकणे

ह्या विषयी एक किस्सा संगतो
एक लेखक एकदा इस्त्राइल ल गेले ..
तेथील वास्तव्यात त्याना जेरुसलेम दाखवले ..आणि त्या गृहस्थांनी विचारले , तुम्हाला पवित्र वाटले का ?

तर याना काहेच वाटले नव्हते ..
तसेच गंगाजल, गंगा नदी हिन्दु संस्कृती मधे पवित्र मानतात .. म्हनुन सश्रद्ध हिन्दुना त्या विषयी पवित्र भावना आहेत ..

गणपती ची मुर्ति हि मातीचिच असते ..आप्ले संस्कार , रिति रिवाज त्या मधे देव पण आनतात..
असो..अवांतरा बद्दल क्षमस्व ..

होमाचा धूर बर्याच लोकांना पवित्र वाटतो कारण श्रद्धा आणि संस्कार ( ते चुकिचे बरोबर् ते फिल्टरेशन नन्तर )

>>वाळा, मोगरा अशी पारंपारीक अत्तरे लावलेल्या , गजरे माळलेल्या शोडषयौवनांची, पुरंध्रींची, ते आज्जीबाईंपर्यंत सर्वांची एकच लगबग. लहान मुलांचा उत्साह, भटजींचे मंत्रोच्चारण

हा ज्यचा त्याचा घरच्या लग्नाचा अनुभव ..
पंजाबी किन्वा गुज्राथी लोक वेगले लिह्तिल ...ख्रिस्ती किन्वा मुस्लिम यांची वर्णन करण्याची पद्धात वेगली असेल ..

मुद्दा लक्षात घ्या हो ...किस कशाला पाडत बस्ला आहत ??

>>केवढी मजा असते लग्नात.

एवढा बाकी सहमत आहे..
स्वानुभवावरुन स्वतापेक्षा जवळच्या नातेवाइक , मित्र यांच्या लग्नात जास्त मजा येते

पंगतीला पैज लावुन जेवणारा

शाहिर

मूकवाचक's picture

14 Sep 2011 - 11:49 am | मूकवाचक

अमुक एका पद्धतीने केलेल्या सोहळ्यात मान्गल्य असते, परम्परेचे अधिष्ठान असते, मजा असते असे मत असण्याचाही 'वैयक्तिक चॉईस' असायला हरकत नसावी.

Nile's picture

14 Sep 2011 - 11:51 am | Nile

अमुक एका पद्धतीने केलेल्या सोहळ्यात मान्गल्य, परम्परेचे अधिष्ठान वगैरे असते असे वाटणारे हुकलेले असतात असा आमचा वैयक्तिक चॉईस असायला कुणाची हरकत नसावी.

मूकवाचक's picture

14 Sep 2011 - 11:58 am | मूकवाचक

जो जे वान्छिल तो ते लाहो प्राणिजात ...

नितिन थत्ते's picture

14 Sep 2011 - 12:14 pm | नितिन थत्ते

एक लेखक एकदा इस्त्राइल ल गेले ..
तेथील वास्तव्यात त्याना जेरुसलेम दाखवले ..आणि त्या गृहस्थांनी विचारले , तुम्हाला पवित्र वाटले का ?

तर याना काहेच वाटले नव्हते ..
तसेच गंगाजल, गंगा नदी हिन्दु संस्कृती मधे पवित्र मानतात .. म्हनुन सश्रद्ध हिन्दुना त्या विषयी पवित्र भावना आहेत ..

गणपती ची मुर्ति हि मातीचिच असते ..आप्ले संस्कार , रिति रिवाज त्या मधे देव पण आनतात..
असो..अवांतरा बद्दल क्षमस्व ..

होमाचा धूर बर्याच लोकांना पवित्र वाटतो कारण श्रद्धा आणि संस्कार ( ते चुकिचे बरोबर् ते फिल्टरेशन नन्तर )

अहो, तेच तर म्हणणे आहे मांगल्य हे त्या सनईच्या सुरांत नसतेच; ते आपल्या डोक्यात असते.
(अश्लीलता ही पाहणार्‍याच्या डोळ्यात असते - इति ह. भ. प. दादामहाराज कोंडके)

नितिन थत्ते

अप्पा जोगळेकर's picture

14 Sep 2011 - 11:26 pm | अप्पा जोगळेकर

ती तर अजूनही असतेच.
कसली घं* मजा असते हो अलीकडच्या लग्नात ? पण्णास पदार्थ आतात त्यातले अर्ध्याहून अधिक उत्तर भारतीय प्रकार किंवा जेवणात खाल्ले न जाणारे प्रकार जसे - पाणीपुरी, रगडा पॅटिस, फरसाण इत्यादी इत्यादी. आणि सगळीकडे तेलाचा महापूर. परत ते जड ताट हातात घेउन स्वतःच स्वतःला सर्व्ह करा.या स्वतःच स्वतःला वाढण्याच्या प्रकारामुळे अन्न टाकणे लोकांनी बंद केले असेही दिसले नाही.
पैजा लावून लोक जिलब्यांच्या आणि जांबुच्या राशी उठवायचे ती मजा मात्र गेली.
शिवाय मधेच नवरा-नवरी मेकाप्साठी कल्टी मारतात तोपर्यंत लोक उपाशी.

विवाहात मंगल काय असतं माहिती नाही
हे मान्य आहे. पण मग पंगतही नको ती बुफेही नको. लो़कांना बोलावणांच नको असा स्टान्स घेतला तर ठीक.

Nile's picture

15 Sep 2011 - 12:05 am | Nile

>>पण मग पंगतही नको ती बुफेही नको. लो़कांना बोलावणांच नको असा स्टान्स घेतला तर ठीक.

मी तर म्हणतो लग्नच नको असा स्टान्स घ्या ना तुम्ही आप्पासाहेब!!

आत्मशून्य's picture

16 Sep 2011 - 10:36 pm | आत्मशून्य

शिवाय मधेच नवरा-नवरी मेकाप्साठी कल्टी मारतात तोपर्यंत लोक उपाशी.

जबरा........ खिक्.

राही's picture

14 Sep 2011 - 1:23 pm | राही

मसालेभात,मठ्ठा,अळूची पातळ भाजी इ.इ्. अखिल महाराष्ट्राचे प्रातिनिधिक लग्नजेवण (आणि आता विस्मृतीत गेलेला सांस्कृतिक ठेवा) मानले जातेय की काय?
उघड: अर्थात वरती 'आपापले रीतिरिवाज' असा उल्लेख आहे म्हणा!

शाहिर's picture

14 Sep 2011 - 1:32 pm | शाहिर

'आपापले (सदाशिव पेठी) रीतिरिवाज म्हणायचे आहे का ??

केवढी मजा असते लग्नात
केवढी मजा असते दुसर्‍याच्या लग्नात!
तुला तुझ्या लग्नातलं काय आठवतय?;)
किती चवीनं जेवलीस तू तुझ्याच लग्नात?
एकतर आपणच आपल्याला ओळखू येणार नाही अश्या अवतारात असतो.
सगळं आवरून झालं की कोणी आत्या, मावशी येऊन काजळाचं बोट गालावर लावून जातात.
आता निदान मला तरी कोणाचीही दृष्ट लागण्याची शक्यता नव्हती.
कपड्यालत्त्यामुळं जे काय ध्यान बरं दिसायची शक्यता होती तीही त्या काजळामुळं नाहीशी झाली.;)

इष्टुर फाकडा's picture

16 Sep 2011 - 7:28 pm | इष्टुर फाकडा

सगळं आवरून झालं की कोणी आत्या, मावशी येऊन काजळाचं बोट गालावर लावून जातात.

......केळीच्या पानावर किंवा ताटात वाढलेला मसाले भात, मठ्ठा, गरम पांढरा भात वरण वर तूपाची धार, पापड कुर्ड्या, कोशींबीर, चटणी, अळूची पातळ भाजी, जिलबी किंवा श्रीखंड-पुरी. किती मस्त जेवण असायचं पूर्वी.....

शुचिताई एका वाक्यात बाळपणीच्या अतीव सुखद आठवणींमध्ये घेऊन गेल्या.
त्याकाळच्या द्रोण-पत्रावळीवरील जेवणाच्या आणखी काही गंमतीदार आठवणी....

तेंव्हा "टेकूची भाजी" हा एक प्रकार असे. भोपळा किंवा वांगी-बटाट्याच्या मोठमोठ्या फोडींच्या या भाजीचा सर्वसंमत उपयोग म्हणजे मठ्ठा वा अन्य पातळ पदार्थांच्या द्रोणाला ते लवंडू नाहीत म्हणून टेकण लावणे. ही भाजी कुणी खात होते की नाही, कुणास ठाउक.

दुसरे म्हणजे "गव्हल्यांची खीर." ही प्रसादाची खीर अगदी थोडीशी, तीही सुरुवातीला एकदाच वाढली जात असे, त्यातही जेवण सुरु करेपर्यंत त्यातले दूध पत्रावळीवर वाहून गेलेले असे. मला ही भयंकर आवडायची. पण जास्त कधीच मिळत नसे, मग मी घरी गेल्यावर आईपाशी हट्ट धरायचो, की मला वाडगाभर गव्हल्यांची खीर करून दे. आई म्हणायची, अरे, थोडक्यात गोडी. पण शेवटी तिने एक दिवस खूप मेहनत घेऊन (गव्हले करणे हे फार कष्टाचे, वेळखाऊ काम होते) वाडगाभर खीर बनवून मला दिली... पण खरोखर ती वाडगाभर खीर माझ्याच्याने खाववली गेली नाही, आणि तितकीशी आवडली पण नाही, तेंव्हा मला "थोडक्यात गोडी" चे मर्म कळले.

तेंव्हा पंगतीत ठेकेदाराचे वाढपी नसत, तर लहान मुली, शोडषयौवना, पुरंध्री, आज्जीबाई अश्या सर्व स्त्रिया हौसेने वाढप करायच्या.
तेंव्हा (म्हणजे आम्ही जरा मोठे झाल्यावर) "नको असलेला पदार्थ" सुद्धा "हव्याश्या वाटणार्‍या मुलीकडून" पुन्हा पुन्हा मागून घेण्यातली गंमत काही औरच होती. अश्या प्रकारातून काही लग्ने पण जुळायची.

मूकवाचक's picture

14 Sep 2011 - 10:16 am | मूकवाचक

आहार निद्रा भय मैथुनं च सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम् |
धर्मो हि तेषामधिको विशेष: धर्मेण हीनाः पशुभिः समाना: ||

या धाग्यावरची चर्चा वाचून एक सुभाषित आठवले. (अवान्तराबद्दल क्षमस्व).

सुनील's picture

14 Sep 2011 - 10:16 am | सुनील

शीर्षकातील अनुप्रास आवडला!

साती's picture

14 Sep 2011 - 10:54 am | साती

मौजा मौजा म्हणा नी मौलवींना विसरा.

आमच्या गावातली मुस्लिम लग्नाची पत्रिका स्कॅन करून टाकावीशी वाटते.

उदा.

By the grace of Allah, we are cordially inviting you on the gracious occasion of wedding of

Mohammad Abdulah Mohammad Irfan (B.A.)
(son of Haji Mohammad Farat bin Mohammad Sultan- senior electrician, KEB.)

with

Daughter of
Mohammad Rehman bin Imran Hussinsaab,) lab technician KGN diagnostics.)

पहिल्यांदी अशी पत्रिका बघितली तेव्हा मुलीचं णाव चुकीने लिहायचं राहिलंय का असंच वाटलं होतं.
चार पाच पत्रिकांनंतर लक्षात आलं मुलीचं नाव पत्रिकेत लिहायला बंदीच असते म्हणे.तसंही कुठल्याही स्त्रीचं नाव नसतं पत्रिकेत.
असलंच तर.मिसेस अँड मिस्टर अमुक तमुक असंच.

बघा म्हणजे लग्नात मुलीच्या नावालाही बुरखा.
स्टेजवर फक्त नवरामुलगा उभा असतो गिफ्ट घ्यायला.
पुरुषांना तर नवरीमुलगी पहायलाही मिळत नाही.
बायकांसाठी वेगळी बसायची आणि जेवणाची व्यवस्था असते.

Nile's picture

14 Sep 2011 - 11:53 am | Nile

सासर्‍यला ढीगभर पोरी असतील तर बोहोल्यावर चढेपर्यंत पुष्कळ 'वैयक्तिक चॉईस' आहे तर! चालेल ब्वॉ आपल्याला. ;-)

सहज's picture

14 Sep 2011 - 12:02 pm | सहज

अरे नाईल्या पाहीले आहेस का कधी पारंपारीक मुस्लीम लग्न? वधू असते पडद्या आड. पडद्या आडून नेमके कोणत्या पोरीचा "कबूल है' आला हे कळायचे नाही... सासु-सासर्‍याचा वैयक्तीक चॉईस 'वर'चढ होणार. :-)

Nile's picture

14 Sep 2011 - 12:04 pm | Nile

नाही आवडली तर व्हिडिओ चॅट रीटर्न सर्विस वापरुन परत करायची, हाय काय अन नाय काय!

सहज's picture

14 Sep 2011 - 12:15 pm | सहज

असो पारंपारीक मुस्लीम विवाहात आधी तुझा नायल खान होईल. आम्ही मित्रमंडळी तुझा अगदी 'विधीवत' (इफ यु नो व्हॉट आय मिन) नायल खान करायला लावू. :-)

आम्ही मित्रमंडळी तुझा अगदी 'विधीवत' (इफ यु नो व्हॉट आय मिन) नायल खान करायला लावू. Smile

=))

-हल्कट(नायल्याचा) मित्र. ;)

Nile's picture

14 Sep 2011 - 8:43 pm | Nile

तुम्हा लोकांची कोती बुद्धी पाहुन एखाद्या प्रतिगाम्यालाही* शरम येईल!! तुम्हा लोकांचं म्हणजे, मी इथे एक हालिवुडातील गोंडस पोरगी पहा म्हणतोय अन तुमचं लक्ष मात्र तिच्या बॉयफ्रेंडच्या मुळव्याधीकडेच, असं आहे!

अहो, आजकाल तसल्या शस्त्रक्रिया म्हणजे काय मोठी गोष्ट आहे का? आणि लग्नासारख्या काळ्या पाण्याच्या शिक्षेसमोर तर काहीच नाही. तेव्हा मोठे व्हा** तुम्ही दोघे!!

* रुढार्थ वापरणे, स्वतःचे चावट अर्थ उगीच व्यक्त करू नयेत.
** सद्य परिस्थितीत या संदेशाचा प्रसार करणे वारसाने माझ्याकडेच आल्याने मला तसे करण्याशिवाय पर्याय नाही.

नंदन's picture

15 Sep 2011 - 5:21 am | नंदन

आस्वान डॅम आठवला :)

Nile's picture

15 Sep 2011 - 5:49 am | Nile

=))

अश्लील!! अश्लील!!!

अर्धवट's picture

14 Sep 2011 - 12:07 pm | अर्धवट

>>सासर्‍यला ढीगभर पोरी असतील तर बोहोल्यावर चढेपर्यंत

रुढार्थानं बोहोल्यावर चढल्यानंतर आणि अजून काही तदुद्भव कार्ये झाल्यवरच लग्नविधी पुर्ण झाला असे मानण्याचा सामाजीक संकेत असल्यामुळे तसे होइपर्यंत 'सासरा' हा शब्दप्रयोग टेक्नीकली बरोबर नाही असे वाटते. इथे उपवधूपिता हा शब्द जास्त बरोबर होइल. अर्थात ज्या विशिष्ठ धर्माचा उल्लेख उपरोक्त प्रतिसादात केला आहे त्यातील विवाहविषयक कायद्यातील विषेश तरतूदींमुळे हे विधान काही अपवादात्मक परीस्थीतीत* टेकनीकली बरोबरही असू शकते याची जाणीव आहेच.

*उदाहरणार्थ आत्ता आहे त्या सासर्‍याच्या उरलेल्या मुलींपैकीच एकीशी अथवा पुन्हा त्याच तरतूदींच्या आधार घेउन अनेकीशी पुढचे लग्न होत असल्यास

वेताळ's picture

14 Sep 2011 - 11:35 am | वेताळ

बुफे मुळे निदान सालण्यात व बिर्याणीत ज्यादा मटन कसे येईल हे बघता तरी येते. जर पंगत वाढली तर किलोभर भात घेवुन देखिल एक फोड वाटणीला येत नाही.काजीला हा अनुभव आला नसेल.

परिकथेतील राजकुमार's picture

14 Sep 2011 - 12:33 pm | परिकथेतील राजकुमार

धर्म - संस्कार - रुढी ह्यांच्या नावानी ओकार्‍या काढण्यासाठी अजून एका धाग्याची सोय झाली :)

नितिन थत्ते's picture

14 Sep 2011 - 12:44 pm | नितिन थत्ते

धाग्याचा मूळ (विशिष्ट धर्माविषयी ओकार्‍या काढण्याचा) उद्देश काहींच्या प्रतिसादांमुळे फ्लॉप झाला. :)

परिकथेतील राजकुमार's picture

14 Sep 2011 - 12:47 pm | परिकथेतील राजकुमार

विशिष्ट धर्माविषयी ओकार्‍या काढण्याचा

ओकार्‍या काढणे जास्ती महत्वाचे थत्ते चाचा :) मग ते कुठल्याही धर्माविषयी का असेना. अर्थात हिंदू धर्माविषयी काढल्यावर काही धोका होण्याचा संभव नसतो म्हणून मग जास्ती जोर येतो.

अर्थात ओकार्‍याच काढायच्या आहेत म्हणल्यावर धर्मात तरी फरक कशाला ? सब घोडे बारा टके...

नितिन थत्ते's picture

14 Sep 2011 - 12:57 pm | नितिन थत्ते

>>अर्थात हिंदू धर्माविषयी काढल्यावर काही धोका होण्याचा संभव नसतो म्हणून मग जास्ती जोर येतो.

इथे काढलेल्या ओकार्‍या कुठल्याही धर्माविषयी असल्या तरी कुणाला काही धोका नसतो. :)

नगरीनिरंजन's picture

14 Sep 2011 - 1:19 pm | नगरीनिरंजन

>>अर्थात हिंदू धर्माविषयी काढल्यावर काही धोका होण्याचा संभव नसतो म्हणून मग जास्ती जोर येतो.

कै च्या कै. हिंदू धर्म किती मागासलेला आणि कर्मकांडात गुरफटलेला आहे हे तुमच्या सारख्यांना काय कळणार? शिवाय त्या कर्मकांडांविरुद्ध बोलायची सोय तरी आहे का तुम्हाला?
अशा या साचलेल्या डबक्याला स्वच्छ करण्याची हिंमत केवळ हे विचारवंतच करु शकतात. चिल्लर-थिल्लर लोकांची कामं नाहीत ती. हे लोक आहेत म्हणून तरी हिंदूंना काहीतरी आशा आहे भविष्याची.

परिकथेतील राजकुमार's picture

14 Sep 2011 - 1:21 pm | परिकथेतील राजकुमार

हे लोक आहेत म्हणून तरी हिंदूंना काहीतरी आशा आहे भविष्याची.

सहमत सहमत.

आज सुद्धा जे काही चार क्षण सुखाचे मिळत आहेत ती ह्या लोकांचीच कृपा आहे.

नितिन थत्ते's picture

14 Sep 2011 - 2:03 pm | नितिन थत्ते

>>आज सुद्धा जे काही चार क्षण सुखाचे मिळत आहेत ती ह्या लोकांचीच कृपा आहे.

अगदी बरोबर बोललात. वेळोवेळच्या आगरकर, सावरकर आदि 'विचारजंतां'नी लावलेल्या सुधारणांच्या रेट्यामुळेच काहींना "आम्ही पुरोगामी" असा टेंभा मिरवणे शक्य झाले आहे.

धमाल मुलगा's picture

14 Sep 2011 - 2:19 pm | धमाल मुलगा

>>वेळोवेळच्या आगरकर, सावरकर आदि 'विचारजंतां'नी लावलेल्या सुधारणांच्या रेट्यामुळेच
कृपा करुन वास्तविक विचारवंत असलेल्यांना विचारजंतांच्या पंक्तीला बसवू नका ही विनंती!
मुळात ह्या दोन वर्गवारीतला मुलभूत फरक जाणून घ्यावा.

उगाच त गंगूतेल्यानं भोजराजाच्या खांद्यावर मित्रत्वानं थाप मारुन गप्पा केल्यासारखं वाटेल.

बाकी गोष्टींबद्दल बोलण्यात अर्थच नसल्याने इत्यलम्!

सहज's picture

14 Sep 2011 - 2:25 pm | सहज

थत्ते चाचांशी सहमत, आज आमचा हिंदू धर्म किती पुढारलेला आहे बघा, किती सुधारणा झाल्या आहेत हे अभिमानाने सांगताना वेळोवेळी विरोध पत्करुन कार्य केलेले सुधारक ज्यांना त्या त्या वेळी 'विचारजंत' म्हणुन हिणवल्याचे विसरले जाते.

बाकी गंगू तेल्याने भोजराजाच्या खांद्यावर मित्रत्वाची थाप ठेवू नये किंवा ठेवलाच तर त्याचा विशेष उल्लेख केला जावा अश्या काही परंपरा अजुन असतील असे वाटले नव्हते.

नगरीनिरंजन's picture

14 Sep 2011 - 2:31 pm | नगरीनिरंजन

हा हा! घेतील हो त्यांचही नाव घेतील पुढच्या पिढीत.
बाकी वर जी नावं घेतलीत त्यांनी बाब्याला नावं ठेवली म्हणून कार्ट्याचे दोष नव्हते शोधले. वाईटाला वाईटच म्हणायचे ते. हा फरक उरेलच.

धमाल मुलगा's picture

14 Sep 2011 - 2:32 pm | धमाल मुलगा

लायकी! एखाद्या तेल्याची लायकी/कुवत, देशाच्या राजाच्या खांद्यावर थाप मारण्याची नसणं हे वावगं नसावं असं वाटतं.
उदाहरणादाखल असं समजू, तुमची स्वतः एखादी मोठी कंपनी आहे, आणि गेटावरच्या दारवानाने/ऑफिसातल्य प्युनने वगैरे तुम्ही ऑफिसात आल्यावर तुमच्या पाठीवर थाप मारुन बोललं तर बहुधा तुम्हालाही, एका मोठ्या कंपनीचा मालक म्हणून ते वावगं वाटेल असा कयास! तसं वाटणं नसल्यास क्षमस्व!

>>वेळोवेळी विरोध पत्करुन कार्य केलेले सुधारक ज्यांना त्या त्या वेळी 'विचारजंत' म्हणुन हिणवल्याचे विसरले जाते.
अहं! तसं नव्हे ते. तुमच्याच वाक्याच्या पुर्वार्धात गम्मत दडली आहे पहा. :)
म्हणूनच मी विचारवंत आणि विचारजंत ह्यातला फरक पहा म्हणालो इतकंच.

असो,
चला, एका मित्राच्या मित्राच्या मित्राचा निकाह आहे, तिकडं जाऊन येतो, बफेवर बंदी येण्याच्या आत!

नितिन थत्ते's picture

14 Sep 2011 - 2:28 pm | नितिन थत्ते

वास्तविक विचारवंत आणि विचारजंत यात फरक ओळखण्याची लक्षणे ठाऊक असल्यास सांगावी.

अन्यथा आगरकरांची प्रेतयात्रा काढली गेल्याचे सर्वांना ज्ञात आहे आणि त्यांना (तसेच सावरकरांना देखील) विचारजंत*च समजले जात होते हे सर्वश्रुत आहे. कर्वे यांच्या कुटुंबावर मुरुड गावात बहिष्कारही टाकला गेला होता असे वाचले आहे.

*विचारजंत हा चटपटीत शब्द त्या काळी वापरला जात होता का ते माहिती नाही.

(मिपा सर्टिफाईड विचारजंत)
नितिन थत्ते

धमाल मुलगा's picture

14 Sep 2011 - 2:39 pm | धमाल मुलगा

सावरकर, आगरकर, कर्वे, आणि प्रभॄतींशी बरोबरी करतेवेळी, एकतरी विचारजंत अशा सुधारकांशी बरोबरीकरिता आपली लायकी सिध्द करवू शकत असेल तर मी माझी विनंती/विधाने बिनशर्त मागे घ्यायला तयार आहेच.
समाजाचे भले* झाले तर कोणाला नको आहे?

*भले=सर्वसामावेशक, समाजाला योग्य असेल असे. आत्मकेंद्रीत वैचारिक अहंगंड सुखावणारे असे नव्हे.

मृत्युन्जय's picture

14 Sep 2011 - 2:57 pm | मृत्युन्जय

अजुन १०० वर्षांना याच विचारवंतांना (जंतांना लिहिलेले नाही याची कृपया नोंद घेण्यात यावी) तुमचे पुत्रपौत्र डोक्यावर घेउन नाचतील तेव्हा कळेल तुम्हाला त्यांची किंमत (अर्थात तेव्हा तुमच्यासारखे असंमजस, समाजद्रोही लोक जिवंत नसतील ही गोष्ट वेगळी). तुम्हाला नुसते सावरकर, कर्व, आंबेडकरांचे गोडवे गाता येतात. कोणी सुधारणावादी विचार मांडले की तुम्ही बोंबाबोंब करायला तयार, अहो असे विचार नाही मांडले तर उद्याचे सावरकर, कर्वे, आंबेडकर, आगरकर कसे जन्माला येणार? समकालीन लोकांना विचारवंतांचे उदात्त विचार कळत नाहीत हेच खरे. छ्या आज मिपाकर असल्याची शरम वाटली मला.

नितिन थत्ते's picture

14 Sep 2011 - 3:08 pm | नितिन थत्ते

>>एकतरी विचारजंत अशा सुधारकांशी बरोबरीकरिता आपली लायकी सिध्द करवू शकत असेल

लायकी सिद्ध करण्याचा क्रायटेरिया कळवावा. विचार केला जाईल.

बाकी आगरकर, कर्वे जे करत सांगत आहेत त्यात समाजाचे भले नाही असेच तेव्हाच्या सामान्यांचे आणि धर्ममार्तंडांचे मत होते. हे नाकारायचा प्रयत्न करू नका. सावरकरांनाही 'लोकांचा बुद्धिभेद करू नका' असाच सल्ला दिला गेला होता हे आम्हास माहिती आहे.

धमाल मुलगा's picture

14 Sep 2011 - 3:20 pm | धमाल मुलगा

>>लायकी सिद्ध करण्याचा क्रायटेरिया कळवावा. विचार केला जाईल.
सावरकर, आगरकर,कर्वे!

परिकथेतील राजकुमार's picture

14 Sep 2011 - 2:54 pm | परिकथेतील राजकुमार

वेळोवेळच्या आगरकर, सावरकर आदि 'विचारजंतां'नी

छ्या छ्या !

अहो आगरकर, सावरकर कसले आलेत ? उगाच कोणाची तरी नावे घेउन त्यांना विनाकारण मोठेपण देउ नका.

आज समाजाला जर खरी गरज कुणाची असेल तर ती एम. एफ. हुसेन, मिरा नायर, शबाना आझमी अशा लोकांची. अशा लोकांच्या पंक्तित तुम्ही त्या आगरकर, सावरकरांना कुठे आणून बसवताय ?

प्रतिक्रिया मागे घ्या बरे. का मी एक डू-आयडी काढून तुमच्या माफिची मागणी करायला सुरुवात करु ?

Nile's picture

14 Sep 2011 - 8:46 pm | Nile

>>का मी एक डू-आयडी काढून तुमच्या माफिची मागणी करायला सुरुवात करु ?

माफिसाठी पुर्वी टाहो फोडलेले जुने आयडी ड्वोल्यांसमोर आले आणि मी पाणावलो!! ;-) हे गुपित बाहेर काढल्याबद्दल पर्‍याला अर्धी क्वार्टर माझ्याकडून!

मृत्युन्जय's picture

14 Sep 2011 - 1:48 pm | मृत्युन्जय

धर्म - संस्कार - रुढी ह्यांच्या नावानी ओकार्‍या काढण्यासाठी अजून एका धाग्याची सोय झाली

आक्षेप. गरज पडल्यास कुठल्याही मुतारीत ओकार्‍या काढता येतात. त्यासाठी खास सोय करण्याची (किंवा होण्याची) गरज नसते.

Nile's picture

14 Sep 2011 - 8:48 pm | Nile

मुतारी हे संबोधन, इथे, नक्की कशासाठी वापरता आहात हे कळले नाही. मनात दोनचार शक्यता आल्या पण खात्री करायच्या आधी विचारावं म्हटलं. अर्थात सांगायला पाहिजेच असे काही नाही, आम्ही आपले फक्त निरीक्षण नोंदवले.

काझी म्हणजे न्यायाधिश किंवा जज

आमच्या खानदानात ही बरेचसे बुजुर्ग अजूनही लग्न लावणे, भांडण तंटा सोडवणे,
न्यायिक Verdict देणे, योग्य निर्णय घेणे या बाबतित ’काझी’ या हुद्यावर अजूनही काम पहातात अन ते ही हदिया (मानधन) न घेता !!

आता हि चांगली बातमी प्रिंट करुनच पाठवायला पाहीजे
निश्चितच स्वागतार्ह निर्णय आहे. निकाह मध्ये पैशांचा शोऑफ करणार्‍या लोकांना चांगलाच धडा मिळेल.
~ वाहीदा काझी

सातारकर's picture

14 Sep 2011 - 3:00 pm | सातारकर

आमच्या खानदानात ही बरेचसे बुजुर्ग अजूनही लग्न लावणे, भांडण तंटा सोडवणे,
न्यायिक Verdict देणे, योग्य निर्णय घेणे या बाबतित ’काझी’ या हुद्यावर अजूनही काम पहातात अन ते ही हदिया (मानधन) न घेता !!

यातला न्यायिक Verdict देणे हा भाग म्हणजे सरकारी न्यायालयाच काम का?

होय काही पदवी संपादन करुन न्यायीक Verdict देतात पण त्यासाठी त्यांना सरकारच पैसे देतो
पण काही वंशपरंपरागत पध्दतीने ती गोष्ट हाताळतात .
असो,
बाकी निकाह च्या नावावर पैशांचा जो अपव्यय चालतो त्याला मात्र नक्कीच लगाम लागेल
बुफे जेवण लोक हव्वे तेवढे घेतात अन मग मग उष्टावलेले जेवण वाया जाते तसे न करता जेवढे गरज आहे तेवढेच घ्यावे नाहीतर गरिब मुलांना , अनाथांना तरी खायला द्यावे. पैसे लाऊड म्युजिक , थिल्लर शोऑफ बतावण्या करण्यापेक्षा कुणा अनाथमुलीचे लग्नात हातभार लाऊन दाखवा

परिकथेतील राजकुमार's picture

14 Sep 2011 - 3:48 pm | परिकथेतील राजकुमार

बाकी निकाह च्या नावावर पैशांचा जो अपव्यय चालतो त्याला मात्र नक्कीच लगाम लागेल

अच्छा अच्छा म्हणून तू इतकी खुश आहेस होय ;)

वाहीदा's picture

14 Sep 2011 - 4:35 pm | वाहीदा

तु कित्ती कित्ती मनकवडा रे परा ! स्त्रीयांच्या / मुलींच्या भावना लगेच ओळ्खतोस :P

रेवती's picture

14 Sep 2011 - 8:05 pm | रेवती

अगं, सवयच्चे त्याला!;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

14 Sep 2011 - 4:44 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>पैसे लाऊड म्युजिक , थिल्लर शोऑफ बतावण्या करण्यापेक्षा कुणा अनाथमुलीचे लग्नात हातभार लाऊन दाखवा
हे ठीक आहे. चांगला विचार आहे. पण त्यासाठी या गोष्टीला धर्माचा मुलामा कशाला द्यायला हवा? तुम्हाला या बातमीने आनंद झालेला दिसतो म्हणून विचारतो की प्रत्येक लहानसहान गोष्टीला इस्लाम विरोधी ठरवून बंदी घालणे हे घातक आहे असे नाही वाटत? आज लग्नातील संगीतावर बंदी घातली, उद्या तुम्ही २४ तास बुरखा घातला पाहिजे म्हणतील (एक उदाहरण म्हणून, या जागी तुमच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे काहीही उदाहरण घेऊ शकता). तेव्हाही असाच आनंद व्यक्त कराल का?

मला तर असे वाटते की समाजसुधारणा आणि धर्म हे फार मिक्स करता कामा नये. धर्मानुसार बंदी घालणे हे दुधारी शस्त्र आहे इतके लक्षात असू द्या.

जर निर्णय काझी घेत असतील तर तसे होईल असे वाटत नाही पण जर काझीला धुडकवून मुल्ला मौलवींनी निर्णय घेऊन जर बंदी लावली तर मग कठीण आहे.
कारण कुराणात या विषयी काही वेगळे आहे पण मला हा विषय जास्त वाढवायचा नाही तेव्हा तुर्तास एवढेच

सातारकर's picture

14 Sep 2011 - 5:01 pm | सातारकर

तुम्ही मला अजूनच गोंधळात टाकलत.

काही पदवी संपादन करुन न्यायीक Verdict देतात पण त्यासाठी त्यांना सरकारच पैसे देतो
ही पदवी सरकारी कायद्याची असते (कोणत्याही विधी महाविद्यालयातून घेतलेली) की धार्मिक?
आता ही जर असल्या कोणत्याही महाविद्यालयातून घेतलेली असेल तर न्यायालय आहेच की.

तस नसेल, जर ती पदवी धार्मिक शिक्षणाशी संबंधीत असून सरकारी कायदेशीर शिक्षणाशी संबंधीत नसेल, तरी सरकार त्याला पैसे देत?

दुसर म्हणजे काही वंशपरंपरागत पध्दतीने ती गोष्ट हाताळतात .
हे म्हणजे हिंदूंमधे ब्राम्हण / गुरव / जंगम पूजा-इत्यादी (वंशपरंपरेने - त्या त्या जातीत जन्माला आले म्हणून) करतात त्या प्रकारात का?

आणि यांनाही सरकार पैसे देत का?

वाहीदा's picture

14 Sep 2011 - 5:12 pm | वाहीदा

I am talking about actual Judge who are there in Local and District court well if you wana know more google it up !

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Sep 2011 - 3:11 pm | बिपिन कार्यकर्ते

लाउड म्युझिकच्या बाबतीत निर्णय अतिउत्तम असे म्हणावेसे वाटते. मंद आवाजातील संगितावर आक्षेप नसावा असे वाटते. बुफेबद्दल मात्र गंमत वाटली. बुफेमधे सुकूनमधे जेवता येत नाही हा जावईशोध हास्यास्पद आहे. परवाच एका लग्नात आम्ही बुफे पद्धतीच्या जेवणात अगदी नीट आरामशीर बसून भोजनाचा आस्वाद घेतला. त्याच्बरोबर लहानपणी पंगतीतल्या जेवणातही अर्धपोटी उठल्याची एक आठवण आहे.

शिवाय असे निर्णय धार्मिक आवरणाखाली घेतले जातात त्याबद्दल तीव्र असहमती आहे. एकदा का धर्माच्या / कर्मकांडाच्या आवरणाखाली असे फारसे चुकीचे न वाटणारे निर्णय घेतले गेले की मग हळू हळू कोणत्याही बाबतीत हस्तक्षेप होऊ लागतो. त्यामुळे हा ट्रेंड धोकादायक आहे. अर्थात, एखाद्या धार्मिक कर्मकांडाच्या प्रकारात त्या त्या धर्मातील ढुढ्ढाचार्यांचा वरचष्मा राहणारच. कर्मकांड झुगारून देणे अथवा त्यात शक्य तेवढे बदल घडवून ते करणे असे मार्ग कमीतकमी हिंदू धर्मियांमधे सर्रास रूढ होताना दिसत आहेत. इतर धर्मांमधे, विशेषतः मुस्लिम धर्मात, एवढी समाजिक सुधारणा होणे हे काही पायाभूत कारणांमुळे तुलनेने तितकेसे सोपे (शक्य असल्यास) नाही.

सातारकर's picture

14 Sep 2011 - 5:22 pm | सातारकर

विशेषतः दुसर्‍या परिच्छेदाशी

घाटावरचे भट's picture

14 Sep 2011 - 8:39 pm | घाटावरचे भट

धागा आणि सोबतची खमंग चर्चा वाचून आनंद जाहला!!

आशु जोग's picture

15 Sep 2011 - 11:19 pm | आशु जोग

उभे नाही तर आडवे

पण

जेवण हे आवश्यकच
--
जेवल्याशिवाय जायचं नाही बरं का !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Sep 2011 - 8:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चर्चा प्रस्ताव, प्रतिसाद माहितीपूर्ण आणि मनोरंजन करणारे आहेत.
चालू ठेवा. :)

-दिलीप बिरुटे