सुरेश वाडकरांनी गायलेला नवीन अल्बम "आता उजाडेल"

योगेश पितळे's picture
योगेश पितळे in कलादालन
1 Sep 2011 - 12:42 am

आता उजाडेल या अप्रतिम अल्बमद्वारे ओंकार घैसास या तरूण संगीतकाराने संगीतक्षेत्रात आपलं पदार्पण केलय! या अल्बममध्ये वेगवेगळ्या प्रकारची १० गीते आहेत.

कै. श्री सुरेश भटांनी लिहिलेली "जगून मी पाहिले कितीदा" ही गझल आणि शास्रीय अंगाने जाणारं, तीनतालात बांधलेलं "बरसत आल्या अमृत धारा", "सूर आनंदघन", "उजाडेल तरी न का" या सगळ्या गाण्यांचं सुरेशजींनी आपल्या स्वरांनी सोनं केलय! या व्यतिरीक्त झी मराठी महागायिका वैशाली माडेने गायलेलं, स्पृहा जोशीने लिहिलेलं "खुळे मन माझे" हे गीत आणि मंदार आपटेसह तिने गायलेलं "आता उजाडेल" हे टायटल ट्रॅक; ही गाणीही यात आहेत.

या अल्बममधील सगळी गाणी तुम्ही http://www.maanbindu.com/new-marathi-music-album-Aata-Ujadel या दुव्यावर ऐकू शकता. तरीही मिपावरील संगीतरसिकांनी या संधीचा लाभ घ्यावा :)

संगीत

प्रतिक्रिया

"बरसत आल्या अमृत धारा", "सूर आनंदघन" ही गाणी फारच छान वाटली. ओंकार घैसास यांचे संगीत खूपच आवडले. पण या साईट्वरून, परदेशस्थ लोकांना विकत घेता येत नाही बहुधा कारण किंमत रुपयात आहे शिवाय क्रेडिट कार्ड चा फॉर्मॅट वेगळा आहे.

योगेश पितळे's picture

1 Sep 2011 - 9:17 pm | योगेश पितळे

धन्यवाद!

किंमत जरी रुपयांमध्ये असली तरी माझ्यामते क्रेडीट कार्ड द्वारे तुम्ही खरेदी करू शकता. मास्टरकार्ड,व्हिसा,डायनर्स क्लब इ. इंटरनॅशनल क्रेडीट कार्डसचे पर्याय उपलब्ध आहेत! :)

शुचि's picture

1 Sep 2011 - 5:52 am | शुचि

प्रकाटाआ