बरिस्तात जाऊन Coffie प्यायची
की CCD तला थंड चहा
प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं
कोणी सांगेल का मला?
कधी Mc'd चा बर्गर खा
नाहीतर मल्टिप्लेक्स मध्ये जाऊन एखादा पिक्चर पाहा
प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं
कोणी सांगेल का मला?
तिला घेऊन खडकवासला
की कार काढून लोणावळा
प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं
कोणी सांगेल का मला?
दररोज फोन calls आणि SMS
करावे लागतील तिला?
प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं
कोणी सांगेल का मला?
प्रेम हा विषयच आमचा कच्चा
ह्याचा कोचिंग क्लास असेल कुठे तर पाहा
प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं
कोणी सांगेल का मला?
अहो, ह्या कसल्या
प्रेमात पडायच्या ना ना तऱ्हा
प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं
कोणी सांगेल का मला?
एकटं राहायचा ताप आलाय
म्हणून कविता लिहिण्याचा प्रपंच सारा
प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं
कोणी सांगेल का मला?
प्रेमाच हे गणित
कळलंय तरी का देवाला?
प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं
तुम्ही तरी काय सांगणार मला?
प्रतिक्रिया
8 Jul 2008 - 6:26 pm | मनस्वी
>> म्हणून कविता लिहिण्याचा प्रपंच सारा
कशाला येवढा प्रपंच?
>>प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं
>>कोणी सांगेल का मला?
हो.. त्वरीत भडकमकर क्लासेस् ना ऍडमिशन घे.
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
8 Jul 2008 - 7:06 pm | आनंदयात्री
हा हा ... बाकी आजकाल कोणताही प्रश्न पडला की उत्तर एकच .. जॉईन भडकमकर क्लासेस !
8 Jul 2008 - 7:07 pm | II राजे II (not verified)
जॉईन भडकमकर क्लासेस !
=))
राज जैन
येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता
8 Jul 2008 - 8:06 pm | प्राजु
उत्तरं तर तुम्हीच दिली आहेत... मग कशाला प्रश्न पडला आहे तुम्हाला? आणि तरी उत्तर हवं असेल तर... मनस्वीने सांगितल्या प्रमाणे भड्कमकर क्लासेस जिंदाबाद..!!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/